कृष्णमूर्ति ज्योतिष: 2018

Friday 26 October 2018

ब्युटी पार्लर व्यवसायातून लाभ होईल का?

स्त्री: १९-८-२०१७
 १८-०९

के.पी  नं  2

नियम: दशमाचा सब २,६,१०,११  व ७ चा कार्येश असून मंगळाशी संबंधित असेल तर व्यवसायात लाभ होतो.
 १० चा सब ५ चा हि कार्येश असावा . ५ कला, सौंदर्य
१० चा सब चा शुक्राशी संबंध असावा
(न.स्वामी, द्रुष्टी , युती ,)

बुध शुक्र    सौंदर्य ,
शुक्र शनी केसांचे सौंदर्य
सप्तम भावावरून गिर्हाईक चा बोध होतो . सप्तम भावाचा सब बुध आहे

 बुध शुक्र...लहान कुमारवयीन मुली
 मंगळ शुक्र ...तरूण स्त्रिया
रवी शुक्र ..उच्चभ्रु  स्त्रिया,
शनी शुक्र ..वयस्कर स्त्रिया
ग्राहक असू शकतील
१० चा सब बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे .
बुधाचे कार्येशत्व...

बुध..
शुक्र..४ , २, ३, ७, दृष्टी १०
रवी..५  रा यु. ५ के द्रुष्ट ११
केतू..११ श ८ १२ र द्रु ५श द्रु ८ १२
           न. मंगळ ५ ,१ ,९
१० चा.सब बुध २, ३, ४, ५, ७ ,८, ९ ,१०, ११ ,१२ चा कार्येश आहे
५ कला, ७ / १० व्यवसाय ११ लाभ .  शुक्र मिथुन २८-५-१६ आहे व ४ भावारंभ मिथुन २४-७-५२ आहे म्हणून शुक्र ४ भावारंभी आहे (फरक ३-५७-२४ ) त्याची दृष्टी १० भावारंभी आहे
शिवाय मंगळ ग्रहाचा संबंध आहे
सदर ची व्यक्ती व्यवसाय करेल.


सध्याच्या दशा पाहू....
गुरू मधे राहू २८/३/१८ पर्यंत.
गुरू राहू २८/३/२०१८ पर्यंत आहे. गुरु नंतर शनी दशा सुरु होईल

 गुरू .. .                                                                
मंगळ ..५,१,९                                               
राहू .. ५ र ५                                                                     
केतू .. ११ श ८,१२ र दृ ५                                               

राहू .. ५ र ५               केतू .. ११ श ८,१२ र दृ ५     
केतू ..        
मंगळ .. ५,१,९      

शनी .. ८,१२,९ क  यु
बुध .. ५
गुरु ..

मंगळ .. ५,१,९





वरील गुरु राहू व शनी दशा पाहता सर्वच १,५,८,९,११,१२ च्या कार्येश आहेत यामध्ये २,६,१० भाव कोठेच नाहीत .
५  ८। १२ हे भाव व्यवसाय करण्यास अनुकूल नाहीत ८ भाव अडथळे १२ भाव अनावश्यक खर्च / गुंतवणूक दाखवतात
 पार्लर च्या व्यवसायात लाभाचे प्रमाण अल्प राहील .
 ६ भाव असणे आवश्यक आहे.  कारण ७ भाव हे गिर्हाईक आहे त्याच्या पैशाचा व्यय म्हणजे  ६ भाव होतो
  फक्त १०  ११ लागणे म्हणजे आपल्या इच्छैखातर व्यवसाय चालू ठेवणे असे होईल
तसेच दशम भावारंभी प्लूटो ग्रह आहे . दशम भावारंभ धनु २४-७-५२ आहे व प्लूटो धनु २३-१३-३६ आहे म्हणजे फक्त ५४ कला १६ विकला चे अंतर आहे प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे यामुळे सुद्धा पार्लरचा व्यवसाय फायदेशीर ठरणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल .

किंवा ५। ८। १२ हे भाव समोरच्या व्यक्ती चे २। ६। ११ भाव होतात. दर महिन्याला ठराविक रक्कम घेऊन दुसर्याला चालवायला देणे हे फक्त होऊ शकेल.
 परंतू भागिदारी त करू नये. 

Saturday 20 October 2018



भोपाळ टेस्ट ....
एक गोष्ट आपणामध्ये शेअर करू इच्छितो आठ दिवसापूर्वी मी नेहमीप्रमाणे लॅपटॉप सुरु केला . आणि काय लॅपटॉप मध्ये उभ्या रेषा रंगबेरंगी दिसायला लागल्या . स्क्रीन क्लीन दिसत नवहता . अस्पष्ट दिसत होते मला कळत नव्हते कि काय झाले आहे . डाव्या बाजूला नेहमीचे ऑपशन दिसत होते पण अस्पष्ट . तरीसुद्धा मी कुंडलीचे विश्लेषण , तपासायचे काम चालूच ठेवले. पण त्याच्यातील अक्षरे अस्पष्ट दिसत होती डोळ्यावर ताण  पडत होता . मनात म्हटले असेच चालू राहिले तर काम करणे अवघड होणार आहे . अजून बऱ्याच  कुंडल्यांचे विश्लेषण बाकी होते . काय करावे मला सुचत नव्हते. शेवटी मी माझा नेहमीचा  कॉम्पुटर चा टेक्निशियन ला बोलावयाचे ठरविले . त्याला फोन केला तो म्हणाला दुपारी येतो. दुपारी तो आला त्याने नेहमीच्या पद्धतीने सरावाने बटणे दाबायला सुरुवात केली तरी काहीच फरक  पडत नव्हता शेवटी त्याने सांगितले कॉम्पुटर चा डिस्प्ले काम करत नाही   हा इथे दुरुस्त होणार नाही . पुण्याला दुरुस्त होईल . पण फार खर्च येईल मी म्हटले किती येईल ६ते ७ हजार. तोम्हणाला खर्च करण्यापेक्षा तुम्ही नवीन कॉम्पुटर च घ्या नवीन ची किंमत काय असेल तो म्हणाला २५-२६ हजार . आता एकदम एवढा खर्च करणे शक्य नव्हते . मला खरोखरच टेन्शन आले होते. . तो दिवस असाच विचार करण्यात गेला .

                                     दुसऱ्या दिवशी सकाळी सहज मनात आले भोपाळची  टेस्ट घेऊन बघावी मनात विचार केला माझा कॉम्पुटर दुरुस्त होईल का ? घड्याळात किती वाजले ते पहिले सकाळचे ६-५४ झाले होते

तासामध्ये एक अधिक करायचा  म्हणून ६+१=७ ७ नंबरची रास  म्हणजे तुला येते हे तुला लग्न झाले . आता मिनीटावरून आपण चंद्र स्थिती काय येते ठरवू
५४ या मिनिटांना ५ या संख्येने भागायचे

५४/५= भागाकार १० येतो  व बाकी ४ राहतात

म्हणून १० नंबर च्या पुढची राशी घ्यावी म्हणजेच ११ नंबरची कुंभ

आता कुंडलीत लग्न झाले तुला व चंद्र आहे कुंभ राशीला . लग्नापासून चंद्र कितवा येतो ते मोजून पहा . लग्नापासून चंद्र  पाचवा येतो  म्हणजेच लग्न व चंद्र यांच्यामध्ये नवं पंचम योग्य झाला आहे . नवपंचम योग्य हा शुभ योग्य आहे म्हणून कॉम्पुटर दुरुस्त होणार असे उत्तर आले .मला खूप बरे वाटले .

आता प्रत्यक्ष कृती ची वेळ आली  .अंदाजे १० वाजता  मला एक फोन आला सर, घरीआहात  का ? मी म्हटले आहे ,या . मी विचारले काय करायचे आहे पत्रिका जुळतात का ते पाहायचे आहे ,बर बर  ... या

ते आल्यानंतर मी कॉम्पुटर सुरु केला उत्सुकता होती काय होतंय....
कॉम्पुटरची स्थिती जैसे थे .. आता काय करावे .. मनात म्हटले आलेल्या जातकाचे काम उरकू मग बघू काय करायचे .. मी हळू हळू पत्रिका तपासायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले हळू हळू माझा कॉम्पुटर क्लीन होतोय . पुन्हा स्वच्छ दिसायला लागलाय . फक्त वरच्या बाजूला एक बारीक आडवी लाईन दिसत होती मी म्हटले ठीक झाले . आता लगेच च नवीन कॉम्पुटर घेण्याची आवश्यकता नाही .
                             याला चमत्कार म्हणायचं का भोपाळ टेस्ट ची सत्यता

Sunday 7 October 2018



               फेब्रुवारी महिन्यात मी भोपाळला एक ज्योतिषशात्राचा महाकुंभ मेळ्याला  गेलो होतो. त्यामध्ये एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली ती आपणामध्ये शेअर करू इच्छितो ज्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असते . असा प्रश्नाचे उत्तर एका मिनीटात देता येते . ते उत्तर बरोबर येते असे त्या लेखकाचा दावा आहे
          ज्यावेळी प्रश्न विचारला जाईल त्यावेळी किती वाजलेत ते बघायचे . अगदी अचूक मिनिटापर्यंत
उदा . दुपारी ३-३७, सकाळी ९-१८   रात्री ११-३५ असे
आता जे तास आहेत त्यामध्ये एक मिळवायचा जी संख्या येईल ते पत्रिकेतील लग्न धरायचे व जी मिनिटे राहतील त्यावरून चंद्र राशी ठरवायची खालीलप्रमाणे ...


 ०--५ मेष , ६-१० वृषभ , ११-१५ मिथुन, १६--२० कर्क
 २१--२५ सिंह , २६--३० कन्या , ३१--३५ तूळ , ३६--४० वृश्चिक
४१ --४५ धनु , ४६--५० मकर ,५०--५५ कुंभ ५६--६० मिन


यानंतर लग्न व चंद्र यामधील योग्य कोणता आहे ते पहा.
१) युती --उत्तम --होय
२) लाभ --चांगले --होय
३) केंद्र --कष्टप्रद
४) नवपंचम --शुभ --होय
५) षडाष्टक --अशुभ --नाही
६) प्रतियोग ---होय

उदा-- १) मी एका व्यक्तीला भेटावयाला चाललो आहे ती व्यक्ती भेटेल का ?
          २) आज माझा रिझल्ट लागेल का ?
          ३) अमुक रेल्वे वेळेवर येईल का ?

मी याचा अनुभव घेतला आहे बऱ्याच वेळा उत्तरे बरोबर येतात.  काहीवेळा चुकतात सुद्धा . आपण अनुभव घेऊन पहा . उत्तर बरोबर येण्याचे प्रमाण जास्त आहे.


 उदा.--- १)  सकाळी ८-३२
  ८+१=९ म्हणजे धनु लग्न झाले
आता चंद्र ची स्थिती ठरवायची
३२मी ३१ ते ३५ या गटात येतात म्हणजे तुला राशी  झाली
 धनु व तुला यामध्ये लाभ योग्य होतोय म्हणजे उत्तर होकारार्थी आले
 

२)   रात्री  ११-३५
११+१=१२ म्हणजे मिन लग्न झाले
आता चंद्राची स्थिती पाहू
३५ मिनिटे हि ३१--३५ या गटात येतात म्हणजे तुला राशी झाली

मिन लग्न व तुला राशी यामध्ये षडाष्टक योग्य होतोय  उत्तर नकारार्थी
शुभम भवतु 

Thursday 4 October 2018

परदेशगमन

       माझ्या मित्राने आज फोन करून विचारले  मला अमेरिकेला जावयाचे आहे , तर मी अमेरिकेला केंव्हा जाईन ? तुझा बँक आणि खाते क्र . पाठव मी लगेच फी  ट्रान्सफर करतो.  मी म्हटले एक नंबर सांग. त्याने १३५ नंबर सांगितला मी के.पी. पद्धतीने १३५ संख्येवरून कुंडली काढली . हि कुंडली तुला लग्नाची आहे म्हणजे चर तत्वाची आहे याचा अर्थ घटना लवकर घडणार आहे . 

         आता जातकाच्या मनातील भाव पाहू . चंद्र हा मनाचा कारक चंद्रावरून आपणाला त्याच्या मनातील भाव ओळखता येतील . या पत्रिकेत चंद्र दशमात आहे आणि तो दशमेश आहे चंद्र बुध च्या नक्षत्रात आहे बुध व्ययात आहे आणि बुधा च्या राशी  नवम भाव आणि व्यय भावात आहेत म्हणजे चंद्र ३,१०,१२ चा कार्येश आहे  माझ्या मित्राला नोकरी व्यवसायानिमित्त परदेश जावयाचे आहे . प्रश्नाचा रोख बरोबर आहे 

कृ  नियम--व्यय भावाचा सब ३,९,१२ भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ भावांच्या सयुंक्त दशेत जातक परदेशी जाईल 

या पत्रिकेत व्यय भावाचा सब शनी आहे ज्यावेळी शनी संबंध येतो त्यावेळी परदेशगमनाला उशीर लागेल . 
शनीचे कार्येशत्व पाहू 
PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 2   4 5   
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (2)   (4) (5)
It's Sub :------------ Jupiter:- (1)   3 (6)   
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (1)   3 (6)   
Itself aspects :------ 9 5 12

शनी दुसऱ्या पायरीला ३,५ या अनुकूल भावांचा कार्येश आहे परंतु ३-४ पायरीला पूर्णपणे विरोध दर्शवितो 
याचा अर्थ जातक परदेशी जाणार नाही . याला काय कारण असावे . परदेशी जाण्यासाठी संबंधी देशाचा व्हिसा लागतो . आता आपण व्हिसा मिळतो का ते पाहू 
कृ नियम --व्हिसा म्हणजे संबंधित देशाने आपल्या देशात येण्यासाठी  दिलेले परवानगीचेपत्र . सर्व कागद पत्रे ,लिखाण, दस्तऐवज ह्या गोष्टी त्रितिय स्थानावरून पहिल्या जातात 
त्रितिय स्थानाचा सब लाभाचा कार्येश असेल तर व्हिसा मिळेल . 

या पत्रिकेत त्रितिय स्थानाचा सब शुक्र आहे  शुक्राचे कार्येशत्व ----

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (1)   1 (8)  Cusp Yuti: (1)     
It's N.Swami :-------- Rahu:- (9)      Rashi-Swami Moon (10)   10
It's Sub :------------ Venus:- (1)   1 (8)  Cusp Yuti: (1)     
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9)      Rashi-Swami Moon (10)   10 N shani २,४,५ 
Itself aspects :------ 7

शुक्र लाभाचा कार्येश होत नाही परंतु ८ चा कार्येश होत आहे ८ मुळे व्हिसा मिळण्यात अडथळे येणार आहेत . जो पर्यंत व्हिसा मिळत तोपर्यंत जातक परदेशी जाणार नाही . व्हिसा मिळत नाही म्हणून दशा पाहण्याचा प्रश्न येत नाही 
अजून खात्री करण्यासाठी आपण लाभाचा सब पाहू लाभाचा सब जर लग्नाचा कार्येश होत असेल तर त्याची परदेशगमनाची इच्छपुर्ती होईल 
लाभाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व ---

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 10   10   
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   9 12   
It's Sub :------------ Rahu:- 9       Rashi-Swami Moon 10   10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (2)   (4) (5)    

चंद्र सुद्धा लग्नाचा कार्येश होत नाही म्हणजे जातकाची परदेशगमनाची इच्छापूर्ती होणार नाही 

शुभम भावतु 




Wednesday 26 September 2018

पत्रिका मेलन ... 
              आज एका मुलीची पत्रिका ग्रह मेलन व गुण मेलं साठी माझ्याकडे आली. मी नेहमी आधी पत्रिका तपासून पाहतो म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे का ? यासाठी त्यावेळेचे रुलिंग घेतो व विचारलेल्या भावाचा सब रुलिंगमध्ये आहे का ते पाहतो. जर सब रुलिंगमध्ये असेल तर पत्रिका बरोबर आहे . सध्या अजून एका पद्धतीने पत्रिका तपासतो . मूळ पत्रिकेचा लग्नाचा सब चंद्र राशी अथवा चंद्र नक्षत्राशी संबंधित आहे का ते पाहतो . लग्नाचा सब चंद्राशी संबंधित असेल तर पत्रिका बरोबर . किंवा त्या मुलीला अथवा मुलाला भाऊ बहीण  असेल त्यांच्या जन्म तारखा मागवून घेतो .  मोठा भाऊ,बहीण  असेल तर मूळ पत्रिकेचा लाभाचा सब त्यांच्या चंद्राशी संबंधित आहे का ते पाहतो. किंवा लहान भाऊ बहीण असेल तर मूळ पत्रिकेतील त्रितिय भावाचा सब त्यांच्या चंद्राशी संबंधित आहे का ते पाहतो. हे सगळेच जुळले तर पत्रिका बरोबर आहे.

उदाहरण १)  स्त्री १३/९/९५ वेळ १८-५५ स्थळ...  रे ७३,५४   अ  १७,५६
रुलिंग एल . मंगल एस .. बुध आर .. गुरु डी ..बुध एल एस ..शनी
(२६/९/१८ वेळ ११-१५-५० फलटण )

मूळ पत्रिकेत सप्तमाचा सब गुरु आहे रुलिंगमध्ये गुरु आहे म्हणजे पत्रिका बरोबर आहे .
आता सब चंद्र संबंध पाहू

या पत्रिकेत लग्नाचा सब राहू आहे
व चंद्र मेष राशीत भरणी ह्या शुक्राच्या नक्षत्रात आहे .

आता राहू आणि चंद्राचा संबंध आहे का ते पाहू ....

राहू तुला राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत आहे व मंगळाच्या नक्षत्रात आहे  तसेच चंद्र मेष  राशीत म्हणजे मंगळाच्या राशीत आहे .व शुक्राच्या नक्षत्रात आहे .  राहू मंगळाच्या नक्षत्रात आहे यावरून लग्नाच्या सब चा चंद्राच्या राशीशी व नक्षत्राशी संबंधित आहे . हे सिद्ध होते . लग्नाचा सब चंद्र राशीशी अथवा नक्षत्राशी संबंध असावा या चा अर्थ पत्रिकेची वेळ बरोबर आहे . जातक ह्या मुलीची पत्रिका फक्त घेऊन आले होते . त्यामुळे तिच्या भावा बहिणींच्या जन्म तारखा मिळाल्या नाहीत

आता या पत्रीकेविषयी  विचार करू
विवाहसंबंधी विचार करायचा आहे
सप्तमाचा सब गुरु आहे गुरुचे कार्येशत्व ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 9   1 10 11
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   12     Sun-Drusht  (6)
It's Sub :------------ Rahu:- 7       Rashi-Swami Venus 7   3 8
It's Sub's N.Swami :-- Mars:- (8)   2 9  Cusp Yuti: (8)  
Itself aspects :------ 3 1 5

याठिकाणी बलवान भावच विचारात घ्यावयाचे आहेत . गुरु ६,८,१२ भावाचा कार्येश आहे 
४ त्या पायरीला ८ भाव अनुकूल आहे परंतु जोडीला ६,१२ भाव आहेत म्हणू वैवाहिक सुख असमाधान कारक असेल . केवळ विवाह करणे हा उद्धेश नसतो ता विवाहानंतर कमीत कमी २५-३० वर्षे वै सौख्य असावे हे अभिप्रेत असते 
आता लग्नाचा सब पाहू . लग्नाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व ... 

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Venus 7   3 8
It's N.Swami :-------- Mars:- (8)   2 9  Cusp Yuti: (8)     
It's Sub :------------ Venus:- 7   3 8  Cusp Yuti: (7)     
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6)       Saturn-Drusht  (12)   12
Itself aspects :------ 2

राहू ६,७,८,१२ चा कार्येश आहे पत्रिका मिन लग्नाची आहे म्हणजेच द्विस्वभाव राशी . द्विस्वभाव राशीला सप्तम स्थान बाधक आहे . लग्नाचा सब षष्ठ चा कार्येश आहे व्यक्ती सतत आजारी असेल ८ स्थान अशुभ स्थान  , मंगळा शी संबंधी म्हणून अपघात, १२ स्थान स्वतः च्या शरीराचं व्यय ,हॉस्पिटल , मोक्ष , ७ स्थान बाधक 

थोडक्यात आयुष्यमान कमी आहे असे म्हणता येईल. अल्पायु 

पंचम स्थान पाहू -- पंचमाचा  सब रवी आहे . (संतती) रवीचे कार्येशत्व ... 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 6        Saturn-Drusht  12  12
It's N.Swami :-------- Venus:- (7)   (3) 8  Cusp Yuti: (7)     
It's Sub :------------ Ketu:- (1)      Rashi-Swami Mars (8)   2 9
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (1)      Rashi-Swami Mars (8)   2 9
Itself aspects :------ 12

रवी दुसऱ्या पायरीला ३ भावाचा कार्येश आहे ३ स्थान पंचमापासून लाभ स्थान म्हणू शुभ आहे . परंतु ३-४ पायरीला १,८ भावाचा कार्येश आहे भाव १ म्हणजे द्वितीय भावाचा व्यय भाव म्हणजे कुटुंब वृद्धीचा अभाव , आणि ८ भाव पंचमापासून ४ स्थान आहे (मोक्ष ) फक्त गर्भपात .  संतती चा अभाव शिवाय ३-४ पायरीवर केतू आहे केतू संतती विरोधक आहे . 

संपूर्ण पत्रिकेचा विचार करता , विवाहा साठी आयुष्यमान , वैवाहिक सौख्य, व संतती हे घटक आवश्यक आहेत. एक वेळ आपण संतती नसली तरी चालू शकते असे म्हणू शकतो , पण आयुष्यमान आणि वै. सौख्य असले च पाहिजे . 

गुण मेलन चा विचार केला तर मुलगा  मुलीच्या एकूण २३ गुण  जुळतात . आता सांगा फक्त गुण  मेलन करून विवाह करायचं का ? हे कितपत योग्य ठरेल का ? 

Saturday 22 September 2018

प्लॉट विक्री ....

एक वयस्कर व्यक्ती अंदाजे ६२_६३ वय. अजून ही नोकरी करतेय.ही व्यक्ती एका चांगल्या कंपनीत नोकरीला होती एका मोठ्या पदावर. विनाशकाले विपरीत बुद्धी असे जे काही म्हणतात ते यांच्या नशिबी आले. नोकरी पूर्ण व्हायला ८ वर्षे बाकी असताना ह्यांनी सेवा निवृती घेतली.  त्यांचा  पाऊण एकराचा प्लॉट आहे. तो विकून पैसे बँकेत डीपोझीट ठेवता येईल त्यावर राहिलेले आयुष्य आरामात काढता येईल असा विचार त्यांनी केला होता. परंतु झाले भलतेच. प्लॉट विकण्यासाठी २-३ वर्षे वाट पाहिली,पण प्लॉट विकला जाईना. कारण तो प्लॉट नदीच्या कडेला होता. निळ्या झोन मध्ये आहे. नदीपासून १५० मीटर अंतर च्य आत असणारी  विकता येत नाही. त्यानंतर ओळखीच्या ठिकाणी २ वर्षे नोकरी केली ,सहा महिने एके ठिकाणी केली . २-३ वर्षे घरी बसून राहिले. आता सहा महिन्यांसाठी एके ठिकाणी नोकरी करत आहेत. एके दिवशी त्यांनी मला फोन करून प्रश्न विचारला...माझा प्लॉट केंव्हा विकला जाईल.त्यांचे बर्थ डिटेल्स मी मागवून घेतले.
तारीख १६-५-५६ वेळ ४-०५ ठाणे
या वरून मी पत्रिका काढली
नियम...१० चा सब १० ,५,६ छा कार्येश असेल तर १०,५,६ या भावांच्या संयुक्त कार्येश दशेत प्लॉट विकला जाईल.
या पत्रिकेत १० चां सब गुरु आहे.
त्यावेळचे रुलींग...
L शनी / केतू  S.बुध,R मंगल  D.चंद्र / राहू Ls Ravi
१० Cha सब गुरु ruling मध्ये नाही म्हणून शनी घेतला.

शनी..८,१२
शनी..८,१२
बुध..
चंद्र..४

१० च सब शनी१०-५-६ यापैकी कोणत्याही भावाचा कार्येश नाही.
सबब जमीन विकली जाणार नाही.
ह्याची खात्री करण्यासाठी त्यांच्या कडून एक केपी नंबर घेतला त्याने १५७ नंबर दिला या नंबर वरून मी पत्रिका काढली
२०-८-२०१८ वेळ २०-५२-१९
फलटण.
या पत्रिकेत १० चा सब राहू आहे.
राहू..८ चं १
शनी..१,३,४
रवी..
केतू..२, श १,३,४ न. चं १

राहू १०,५,६ पैकी एकाही भावाचा कार्येश नाही. त्यामुळे प्लॉट विकला जाणार नाही .
दशा पाहण्याचा प्रश्न येत नाही.

Tuesday 28 August 2018

हर्षल नेपच्यून चा झटका 

   १५- २० वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये एक लेख आला होता . पाश्चिमात्य देशातील शास्त्रज्ञानानं च जास्त प्रमाणात नोबेल पारितोषिक मिळतात आणि आशिया खंडातील शास्त्रज्ञानाना मिळत नाही . यावर एक सर्वे झाला होता . त्यातुन निघालेले निष्कर्ष खालीलप्रमाणे
१) तुमच्याकडे अपार कष्ट करण्याची मानसिकता हवी
२) तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा उपलब्ध असला पाहिजे .
३) तुम्ही खूप खूप नशीबवान असले पाहिजे .
यापैकी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात पैसे उपलब्ध होऊ शकत नाही . परंतु कष्ट करण्याची मानसिकता आपल्याकडे नक्कीच आहे . आणि मला वाटते नशीब हा फॅक्टर ज्योतिषाशी निगडित आहे . संबंधित व्यक्तीमध्ये तश्या प्रकारचे योग्य असतील तर नक्कीच यशस्वी होतील .
 परंतु तशा प्रकारचे योग्य असून सुद्धा कधी कधी नियती चे फटके सुद्धा बसतात .
एक टॉपर मुलगी, बी ई इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन  झालेली होती . कॅम्पस मधेच तिचे एका एमएनसी कंपनीमध्ये निवड झाली होती . पॅकेज होते चार लाखाचे . दि . २०/१०/२०१४   रोजी ती रुजू झाली . दिड दोन वर्षे नोकरी केल्यानंतर तिला वाटले आपण आपली योग्यता वाढवावी म्हणून तिने नोकरी सोडून दिली. दि २५/७/२०१६ . त्यानंतर तिने एमबीए फायनान्स केले . त्यावर्षी तिला विद्यापीठाकडून गोल्ड मेडल मिळाले .
           ( २०१६-२०१८ )त्याच वर्षी तिचे एका एम एन सी  कंपनीमध्ये निवड झाली . पॅकेज होते आठ लाखाचे . दि ४/६/२०१८ रोजी नोकरी सुरु झाली नोकरीची वेळ होती सकाळी ९ ते रात्री १०-११,घरी यायला ११.३० -१२  वाजत
साधारणपणे १०-१५ दिवस झाले असतील एवढा वेळ काम करण्याची सवय नसल्यामुळे ती आजारी पडली . तिने मॅनेजरला फोन केला आज मी येऊ शकत नाही . मॅनेजर म्हणाले तुम्हाला रजा मिळणार नाही . नोकरीला लागल्यापासून कंपनीमध्ये टॉर्चर खूप करत होते . . नाईलाजास्तव तिने एक महिन्याची नोटीस देऊन राजीनामा दिला . दि १९/६/२०१८. तसेच कंपनीतील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून  अनेक उमेदवारांनी   राजीनामे दिले.   महिन्याभरात तिने प्रथम ज्याठिकाणी नोकर केली होती त्या कंपनीचा तिला कॉल आला . तिची निवड झाली . परंतु पॅकेज मिळाले ३.५०  लाखाचे . बी इ ,एमबीए ,दोन वर्षाचा अनुभव असूनसुद्धा तिला अपमानास्पद नोकरी स्वीकारावी  लागली . ह्याला काय म्हणावे ...  ती एक नियतीने मारलेली चपराक होती ..... नियतीने केलेली क्रूर चेष्टा च नाही का !  ८ ते १० लाखाचे पॅकेज अपेक्षित असताना तीला हि नोकरी स्वीकारावी लागली . दि ३०/७/२०१८ . हा नियतीचा दैवदुर्विलास नाही का ... ह्यालाच  म्हणायचे नशीब , प्रारब्ध ... हे असे का घडावे .... तिच्या पत्रिकेत कशा प्रकारचे योग्य आहेत  ते  पाहण्याचा केलेला अट्टाहास ....
                          जन्मतारीख २३ एप्रिल १९९३ वेळ.. ४=३३=०९  जन्म ठिकाण रे ७५,२० अ १९,५३
           तिच्या पत्रिकेची लग्नशुद्धी करून वेळ दिली आहे .
          तिचे शिक्षण बी ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन , एम बी ए फायनान्स
या पत्रिकेत चतुर्थाचा व नवमाचा सब राहू आहे राहू बुद्धाच्या नक्षत्रात आहे . बऱ्याच ठिकाणी मी पहिले आहे ज्यावेळी शिक्षण ENTC असते त्यावेळी राहू बुद्धाचा संबंध असतो ( राहू इलेक्ट्रॉनिक्स व बुद्ध टेलिकम्युनिकेशन )
बुद्ध गुरूचा संबंध असतो त्यावेळी वाणिज्य शाखा असते हि मुलगी एमबी ए फायनान्स आहे . गुरु शनी मंगळाचा संबंध असतो त्यावेळी व्यक्ती एम बी ए असते .

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (9)      Rashi-Swami Mars (5)   2 9
It's N.Swami :-------- Mercury:- (1)   (4) 7
It's Sub :------------ Venus:- 1   3 8  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  7  1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   (11) 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  (5)   2 9
Itself aspects :------ 3
राहू बुद्धाच्या नक्षत्रात आणि शुक्राच्या सब मध्ये आहे . राहू ४,५,९ ,११ चा कार्येश आहे . तसेच ४ थ्या पायरीवर शनी कस्प युती १२ आहे म्हणजे त्याची दृष्टी षष्ठ भावारंभी आहे फायनान्स साठी षष्ठ भाव आवश्यक.

नोकरी .. पहिली नोकरी लागली २०/१०/२०१४ रोजी .त्यावेळी दशा होती चंद्र शनी राहू

चंद्राचे कार्येशत्व ...

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 2   5
It's N.Swami :-------- Venus:- (1)   3 (8)  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  (7)   1 (10)
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Mars (5)   2 9
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (1)   (4) 7
Itself aspects :------ 8

चंद्र १,१० भावाचा कार्येश आहे . 

शनीचे कार्येशत्व ... 
PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 12   11 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  5  2 9
It's N.Swami :-------- Mars:- (5)   2 9  Cusp Yuti: (5)     
It's Sub :------------ Venus:- 1   3 8  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  7  1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   (11) 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  (5)   2 9
Itself aspects :------ 6 2 9

शनी प्रथम व ४ थ्या पायरीवर कस्प युती १२ म्हणजे त्याची षष्ठ भावारंभी दृष्टी आहे . म्हणून शनी ६ भावाचा कार्येश आहे . 
राहू चे कार्येशत्व .. 

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (9)      Rashi-Swami Mars (5)   2 9
It's N.Swami :-------- Mercury:- (1)   (4) 7   
It's Sub :------------ Venus:- 1   3 8  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  7  1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   (11) 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  (5)   2 9
Itself aspects :------ 3

राहू ११ व शनीच्या माध्यमातून ६ भावाचा कार्येश आहे . आतापर्यंत ६,१०,११ भाव मिळाले परंतु २ भाव लागला नाही म्हणून सूक्ष्मदश रवीची पाहिली   ( दि १५/१०/२०१४ ते १९/१०/२०१४ )

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (1)   (6)   
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Venus (1)   3 (8)
It's Sub :------------ Jupiter:- (7)   1 (10)     Venus-Drusht  (1)   3 (8)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (2)   5   
Itself aspects :------ 8

रवी २,६,१० भावांचा कार्येश आहे . या ठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली. 
या कंपनीमध्ये दिड दोन वर्षे नोकरी केल्यानंतर तिने पात्रता वाढविण्यासाठी नोकरी सोडून दिली. 
दि .२५ /७/२०१६. 
या काळात चंद्र म .द. केतू अ.द. व शुक्र अ  .द. १७/६/२०१६ ते १७/९/२०१८ 
चंद्र १,४,५,७,८,९,१० चा कार्येश 
केतू १,२,५,११,१२
शुक्र १,५,११,१२,६
या काळात ४,५,९,११ या भावांची कार्येशची दशा  असल्यामुळे एम बी ए शिक्षण पूर्ण झाले . 
दि ४/६/२०१८ रोजी एका एम एन सी  कंपनीमध्ये ८ लाखाचे पॅकेज वर तिची निवड झाली. या काळात तिला चंद्र मध्ये शुक्राची अंतर दशा बुद्ध विदशा व केतू सूक्ष्मदशा चालू होती . 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 1   3 8  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  7  1 10
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   (11) 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  (5)   2 9
It's Sub :------------ Venus:- 1   3 8  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  7  1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   (11) 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  (5)   2 9
Itself aspects :------ 7

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (1)   (4) 7   
It's N.Swami :-------- Mercury:- (1)   (4) 7   
It's Sub :------------ Mercury:- (1)   (4) 7   
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (1)   (4) 7   
Itself aspects :------ 7

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 3       Rashi-Swami Venus 1   3 8
It's N.Swami :-------- Moon:- (2)   5   
It's Sub :------------ Venus:- 1   3 8  Cusp Yuti: (1)       Jupiter-Drusht  7  1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   (11) 12  Cusp Yuti: (12)       Mars-Drusht  (5)   2 9
Itself aspects :------ 9

चंद्र १,१० शुक्र ६,११ बुद्ध १ व केतू २,६,११ चा कार्येश येथे २,६,१०,११ साखळी पूर्ण होते. 
शुक्र अंतर दशेमध्ये शुक्र शनीच्या नक्षत्रात व शुक्राच्या सबमधे आहे . शुक्राचा हर्षल नेपच्यून बरोबर अनुक्रमे ७१.६ व ७२.६ अंशाचा योग्य आहे तसेच शनीचा हर्षल नेपच्यून बरोबर अनुक्रमे ३६. ३ व ३७. ३ चा योग  आहे . शुक्र शनीचा हर्षल बरोबरच्या योगामुळे तिने  तडकाफडकी राजीनामा दिला .  व शुक्र शनीचा नेप्च्यून बरोबरीला योगामुळे दुसऱ्या नोकरीमध्ये तिची फसवणूक झाली . ८ ते १० लाखाच्या पॅकेजची  अपेक्षा असताना तिला ३.५० लाखाचे पॅकेज स्वीकारावे लागले . नेपच्यून हा ग्रह फसवणूक करतो. ज्या ज्या वेळी शुक्र अंतर्दशा किंवा शनी अंतर्दशा असेल त्या त्या वेळी असे प्रसंग तिच्या वाट्याला येतील अशावेळी सावध राहावे 
              पुढील नवीन नोकरी चंद्राच्या महादाशेमध्ये रवीच्या अंतर्दशेमध्ये  लागू शकते . कारण रवी अंतर्दशा २,६,१० ची कार्येश आहे . 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (1)   (6)   
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Venus (1)   3 (8)
It's Sub :------------ Jupiter:- (7)   1 (10)     Venus-Drusht  (1)   3 (8)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (2)   5   
Itself aspects :------ 8

चंद्र ५,९,१० चा कार्येश आहे व रवी २,३,६,१० चा कार्येश आहे . यामधील ३,५,९ नोकरी सोडण्यासाठी व २,६,१० नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहे हा कालावधी येतो १७/९/२० १८ ते १८/३/२०१९. रवी च्या नक्षत्रात कोणताही ग्रह नसल्यामुळे रवी षष्ठ स्थानाचा एकमेव बलवान कार्येश आहे याच रवी अंतर्दशेमध्ये नवीन नोकरी लागू शकते . 

Tuesday 7 August 2018

       मुलाखतीमध्ये निवड होईल का ?

एक मुलगी एमटेक करीत आहे. हे तिचे दुसरे वर्ष आहे. सध्या कॅम्पस मुलाखती चालू आहेत. तिने प्रश्न विचारला आहे कॅम्पस मध्ये निवड होईल का ?
       के पी नं ९३   दि ६ऑगस्ट २०१८   वेळ १३-५-५६    फलटण
नियम...   3 चा सब 11 चा कार्येश असेल मुलाखत होईल 11 चा सब 3 चा कार्येश असेल तर निवड होईल ।
या पत्रिकेत 3 चा सब व 11 चा सब बुद्ध आहे ।
बुद्ध 12,2
बुद्ध  12,2
राहू   11, 12 क यु चंद्र 9
शनी  4,6,7

3चा सब बुद्ध 11 चा कार्येश आहे म्हणजे मुलाखत होईल परंतु 11 चा सब 3 चा कार्येश होत नाही म्हणून निवड होणार नाही
विशेष म्हणजे आतापर्यंत तिचे 2 मुलाखती झाल्या अगदी 4 राउंड पर्यंत परंतु तिची निवड झाली नाही अजून दोन मुलाखती आहेत म्हणून तिने हा प्रश्न विचारला ।
6 चा सबचा विचार करायचे म्हटले तरी। 6 चा सब राहू आहे
राहू  11,12 क यु चंद्र 9
शनी। 4,6,7
चंद्र
रवी।  12

राहू 3,4 स्टेपला पूर्ण विरोधी आहे सबब निवड होणार नाही

Saturday 28 July 2018

प्रमोशन केंव्हा मिळेल ?

                                                                  एका सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तीने मला विचारले मला प्रमोशन केंव्हा मिळेल. सध्या खात्यात तशा प्रकारचं वातावरण तयार झाले आहे. वरिष्ठांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मी  बरेच दिवस माझ्या प्रमोशन वाट पाहत होतो. पण हाती काही लागत नव्हते . मी त्यांना सांगितले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा त्यांनी एक केपी नंबर दिला ८७ . या नंबरवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . व औगस्ट सप्टेंबर २०१९ मध्ये प्रमोशन मिळेल. असे सांगितले कसे ते खालीलप्रमाणे ----

नियम --- दशमाचा सब २ ६ १० ११ भावांचा कार्येश असून रवी किंवा गुरु किंवा मंगळ ग्रहाशी संबंधित असेल तर २,६,१०,११ कार्येश भावांच्या  संयुक्त दशेत प्रमोशन मिळेल .

हा प्रश्न मी दि . १७/७/१८ रोजी १४-२५-३२ या वेळेत फलटण येथे सोडविला ( रे ७४-२६, अ १७-५९ )
या पत्रिकेत दशमाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 5   6 7
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Saturn (5)   6 (7)  Mars-Yuti  (6)   (4) (9)
It's Sub :------------ Saturn:- 5   6 7
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (6)      Rashi-Swami Saturn (5)   6 (7)  Mars-Yuti  (6)   (4) (9)
Itself aspects :------ 11 7 2

शनी ६ भावाचा कार्येश आहे पण त्याच बरोबर ५, ९ भावांचाही कार्येश आहे . व मंगळ या ग्रहाशी संबंधित आहे  म्हणजे प्रमोशन मिळणार हे नक्की झाले . सुरुवातीला सदर व्यक्ती नेमकी कोठे नोकरीला आहे हे मला  माहीत नव्हते . वरील कार्येश पाहता एखाद्या कंपनीत नोकरी करत असेल तर आहे हि नोकरी सोडून दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळणे असा अर्थ होऊ शकतो किंवा सरकारी नोकरी असेल तर  बदली होऊन प्रमोशन मिळणे . असाही होऊ शकतो. कारण ५, ९ हे भाव नोकरी सोडणे किंवा बदली होणे याचे कारक आहेत.  ४ भाव घराजवळ दर्शवितो . ४ त्या पायरीवर राहू केतू येत असतील तर त्याचा नक्षत्रस्वामी पाहावा . याठिकाणी ४ त्या पायरीवर केतू आहे.  केतू चंद्राच्या नक्षत्रात आहे,  तो प्रथम भावात असून द्वितीय भावारंभी आहे म्हणून केतू १ , २ भावा चे कार्येशत्व देतो.
एकंदरीत शनी १,२, ४,५,६,७,९ या भावांचा कार्येश आहे .
२,६ भाव प्रमोशनसाठी व ५ ९ भाव बदलीसाठी . आता प्रमोशन केंव्हा मिळेल यासाठी दशा पाहाव्या लागतील

प्रश्न पाहतेवेळी रवी मध्ये राहू दशा चालू होती. ती २६ मार्च २०१९ पर्यंत आहे
रवीचे कार्येशत्व --

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 11   1
It's N.Swami :-------- Jupiter:- (3)   5 (8)
It's Sub :------------ Mars:- (6)   (4) (9)     Ketu-Yuti  (6)    Rahu-Drusht  (12)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (1)   12  Cusp Yuti: (2)  
Itself aspects :------ 6

रवी १,२,६ भावांचा कार्येश आहे त्याच बरोबर सब लेव्हलला ४ ,९,१२ भावांचा कार्येश आहे
२,६ भाव प्रमोशन साठो अनुकूल आहेत ४,९,१२ आहे त्याच औफिसमध्ये बदल सुचवीत आहे
नंबर कुंडलीचे लग्न वृषभ आहे म्हणजे स्थिर तत्वाचे आहे म्हणून मी पुढील गुरुची अंतर्दशा घेतली
गुरु अंतर्दशा १२ जानेवारी २०२० पर्यंत आहे .
गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 3   5 8
It's N.Swami :-------- Rahu:- (12)      Rashi-Swami Moon (1)   12  Mars-Drusht  (6)   (4) (9)
It's Sub :------------ Mars:- (6)   (4) (9)     Ketu-Yuti  (6)    Rahu-Drusht  (12)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (1)   12  Cusp Yuti: (2)  
Itself aspects :------ 9 7 11

गुरु २,६ या भावाबरोबरच ४,९,१२ या भावाचा  कार्येश आहे . परंतु अद्याप १० भाव लागला नाही . १० भाव लागणे आवश्यक आहे कारण १० भाव हा अधिकाराची जागा , प्रतिष्टेची जागा दर्शवितो . या पत्रिकेत १० भाव फक्त शुक्र दाखवितो आहे म्हणून शुक्राची विदशा घेतली . रवी गुरु शुक्र दशा १६ ऑगस्ट २०१९ ते ४ औकटोम्बर २०१९ पर्यंत आहे शुक्राचे कार्येशत्व ----

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (1)   3 (10)     Mars-Drusht  (6)   (4) (9)
It's N.Swami :-------- Venus:- (1)   3 (10)     Mars-Drusht  (6)   (4) (9)
It's Sub :------------ Venus:- (1)   3 (10)     Mars-Drusht  (6)   (4) (9)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   3 (10)     Mars-Drusht  (6)   (4) (9)
Itself aspects :------ 7
येथे सुद्धा शुक्र ६,१०, ४,९ भावाचा कार्येश आहे
६,१० भाव प्रमोशन साठी ४,९ भाव आहे त्याच ऑफिसमधे बदल . आतापर्यंत २,६,१०,११ पैकी २,६,१० लागले आहेत पण ११ भाव कोठेच लागला नाही म्हणून मी सूक्ष्म दशा पाहायचे ठरविले . ११ भाव फक्त चंद्र दाखवितो म्हणून चंद्राची सूक्ष्म दशा  निवडली तो कालावधी येतो २७ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ .
चंद्राचे कार्येशत्व ---

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 1   12  Cusp Yuti: (2)  
It's N.Swami :-------- Sun:- (11)   1
It's Sub :------------ Rahu:- 12       Rashi-Swami Moon 1   12  Mars-Drusht  6  4 9
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (5)   6 (7)
Itself aspects :------ 7

चंद्र २,११ या अनुकूल भावाचा व ५ हा भाव बदल सुचवितो 


गोचर भ्रमण
२७ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या काळात गोचर भ्रमण अनुकूल आहे . रवी शुक्र हे शीघ्र गतीचे ग्रह असल्यामुळे त्यांचे नक्षत्रातील भ्रमण अनुकूल आहे . तसेच गुरु हा मंद गतीचा ग्रह असल्यामुळे त्याचे सब मधील भ्रमण अनुकूल आहे 
                 चंद्र ३१ ऑगस्टला रवी च्या नक्षत्रात आहे रवी पहिल्या दोन पायरीला अनुकूल नाही म्हणून २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१९ ह्या कालावधीत प्रमोशन मिळेल.
                         सदर व्यक्तीला ऑगस्ट सप्टेंबर २०१९ मध्ये प्रमोशन मिळेल असे सांगितले . ती व्यक्ती म्हणाली तुम्ही काढलेला कालावधी बरोबर आहे . मी म्हटले कसे काय ? तुम्हाला असे का वाटते ? ती म्हणाली माझे वरिष्ठ ऑगस्ट २०१९ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत . ते निवृत्त झाल्याशिवाय मला प्रमोशन मिळणार नाही .
शुभम भवतु 



Friday 27 July 2018

प्लूटो ची किमया 

पुण्याहून एका परिचित मुलीचा फोन ... ती सध्या एका मल्टि नैशनल कंपनीत नोकरीला आहे . तिने सध्या एक इंटरव्हू दिला आहे त्यामध्ये तिची निवड झाली आहे . एकूण ७८ मुलांचे मुलाखती झाल्या यामध्ये फक्त हिची निवड केली आहे .परंतु  ऑफर लेटर मिळालेले नाही . म्हणून तिने आहे हि नोकरी सोडून या नावाजलेल्या कंपनीत जाऊ का ? असा प्रश्न तिने विचारला आहे . मी तिला एक संख्या सांग असे म्हटले . तिने ६३ हि संख्या सांगितली
                मी बऱ्याच वेळा एक निरीक्षण केले आहे जी संख्या दिली जाते त्या संख्येमध्ये अर्थ दडलेला असतो . या दिलेल्या ६३ संख्येमध्ये ६ हि संख्या नोकरी दर्शविते व ३ हि संख्या नोकरीत बदल सूचित करीत आहे . या संख्येवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
                                    ( २६ जुलै २०१८ वेळ . १६-०८-०९ स्थळ  अ १७,५९ रे ७४ २६ )
                        हि कुंडली कर्क लग्नाची आहे . ज्यावेळी कर्क लग्न येते त्यावेळी होकारार्थी उत्तर द्यावे असा संकेत आहे . आता तिच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू . चंद्र हा मनाचा कारक , चंद्र हा षष्ठ स्थानात आहे षष्ठ स्थान हे नोकरी दर्शविते आणि तो लग्नेश आहे याचा अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे .  चंद्र शुक्राच्या नक्षत्रात आहे शुक्र द्वितीय स्थानात आहे व तो पंचमेश आहे पंचम स्थान नोकरी सोडण्याचे व द्वितीय स्थान नोकरी मिळण्याचे स्थान आहे .म्हणजे प्रश्नाचा रोख  बरोबर आहे.
                             नियम ... दशमाचा सब ३ ५ ९ (३ १० १२ ) आणि २ ६ १० ११ भावांचा कार्येश असेल तर
    २ ६ १० ११ कार्येश भावांच्या संयुक्त दशेत नोकरी लागते .

या कुंडलीत दशमाचा सब गुरु आहे आणि गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (4)   6 (10)
It's N.Swami :-------- Rahu:- (1)      Rashi-Swami Moon (6)   1 2  Sun-Yuti  (1)   (3)  Mars-Drusht  (7)   (11)
It's Sub :------------ Mars:- (7)   (11)     Ketu-Yuti  (7)    Sun-Drusht  (1)   (3)  Rahu-Drusht  (1)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (6)   1 2
Itself aspects :------ 10 8 12

गुरु  ६ १० ११ व ३ या भावांचा कार्येश आहे यामधील  ६ १० ११ भाव नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहेत व ३ भाव हा बदल सुचवीत आहे .
४ थ्या पायरीला चंद्र प्लूटो युती आहे हि युती अडथळे निर्माण करणारी आहे .

आत दशा महादशा पाहू .... हि कुंडली कर्क या चर लग्नाची आहे म्हणून घटना लवकर घडणार आहे .

प्रश्न पाहतेवेळी शुक्र महा.दशा बुद्ध अंतर्दशा २५/२/२०२१ पर्यंत होती .

शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ..

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (2)   (5)  Cusp Yuti: (3)     
It's N.Swami :-------- Venus:- (2)   (5)  Cusp Yuti: (3)     
It's Sub :------------ Saturn:- 6   7 8 9   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (7)      Rashi-Swami Saturn (6)   7 (8) (9)  Mars-Yuti  (7)   (11)  Sun-Drusht  (1)   (3)
Itself aspects :------ 8

शुक्र २ ६ ११ या नोकरी मिळण्यासाठी भावाचा कार्येश आहे व ३ ५ ९ या नोकरी सोडणाऱ्या भावांचा कार्येश आहे ४ त्या पायरीवर केतू चंद्राच्या नक्षत्रात आहे व चंद्र प्लुटोच्या युतीत आहे शिवाय ८ भावाचा कार्येश आहे . 

बुद्धाचे कार्येशत्व .... 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (2)   4 (12)   
It's N.Swami :-------- Mercury:- (2)   4 (12)   
It's Sub :------------ Saturn:- 6   7 8 9   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (7)      Rashi-Swami Saturn (6)   7 (8) (9)  Mars-Yuti  (7)   (11)  Sun-Drusht  (1)   (3)  N Chandra (6)
Itself aspects :------ 7

 बुद्ध २ ६ ११ व ९ १२ या भावांचा कार्येश आहे  ४ त्या पायरीवर केतू चंद्राच्या नक्षत्रात आहे व चंद्र प्लुटोच्या युतीत आहे शिवाय ८ भावाचा कार्येश आहे . या मुले अडथळे मनःस्ताप होऊ शकतो . कुंडली चर लग्नाची आहे म्हणून मी पुढील केतूची विदशा निवडली शिवाय छाया ग्रह नेहमी बलवान असतात म्हणून केतूची विदशा निवडली . केतुचे कार्येशत्व 

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 7       Rashi-Swami Saturn 6   7 8 9  Mars-Yuti  7  11  Sun-Drusht  1  3
It's N.Swami :-------- Moon:- (6)   1 2
It's Sub :------------ Rahu:- 1       Rashi-Swami Moon 6   1 2  Sun-Yuti  1  3  Mars-Drusht  7  11
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   7 (8) (9)
Itself aspects :------ 1

शनी ६ व ९ भावाचा कार्येश आहे . ४ थ्या  पायरीवर शनी व नेपच्यून ७२. ३ अंश आहे
२ ६ १० ११ पैकी २ ६ ११ भाव लागले परंतु १० भाव कोठेच लागला नाही म्हणून मी सूक्ष्म दशा पहायचे ठरविले १० भाव फक्त गुरूच दाखवितो म्हणून गुरु ची सूक्ष्म दशा निवडली . गुरुचे कार्येशत्व ... 
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (4)   6 (10)   
It's N.Swami :-------- Rahu:- (1)      Rashi-Swami Moon (6)   1 2  Sun-Yuti  (1)   (3)  Mars-Drusht  (7)   (11)
It's Sub :------------ Mars:- (7)   (11)     Ketu-Yuti  (7)    Sun-Drusht  (1)   (3)  Rahu-Drusht  (1)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (6)   1 2   
Itself aspects :------ 10 8 12

                                    गुरु  ६ १० ११ व ३ या भावाचा कार्येश आहे या ठिकाणीसुद्धा ४ थ्या पायरीवर चंद्र प्लुटोच्या युतीत आहे. शुक्र बुध  केतू गुरु दशेमध्ये म्हणजेच २५ ऑक्टॉम्बर २०१८ ते २ नोव्हेंबर २०१८ पर्यंत नोकरी लागेल . प्रत्येक ठिकाणी प्लुटो या ग्रहाचा संबंध आलेला आहे. प्लूटो ज्या ग्रहाच्या युतीत असतो अथवा दृष्टीत असतो त्याची फळे तो देत नाही
पाहू या काय होतंय ते .......
एका महिन्यानंतर फोन करून चौकशी केली तेंव्हा कळले कि तिला कंपनीने ऑफर लेटर दिले नाही . प्लूटो याग्रहाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले . केवळ प्लूटो या ग्रहांमुळे तिचे स्वप्न धुळीला मिळाले .
हि आहे प्लुटोची किमया .



Wednesday 20 June 2018

हर्षल , नेपच्यून , प्लूटो ची करामत 
पुरूष...१३/१०/७६ सकाळी ८-१५ स्थळ रे ७७=२० अ १९=९
सदर व्यक्ती कॉम्पुटर इंजिनिअर आहे. अनेक नोकर्या केल्या. पण एकाही नोकरीत टिकला नाही. अध्याप विवाह झाला नाही. व्यवसाय म्हणून काही काळ एल आय सी एजन्सी घेतली. ती पण सध्या बंद केली आहे.   पारंपरिक क्रष्णमुर्ती मधे कोठेही हर्षल , नेपच्यून, प्लूटो चा वापर केलेला नाही.  त्यामुळे काही प्रश्र्न अनुत्तरीत राहतात. या ग्रहांचा वापर केला तर खूप कुंडल्या सोडविता येतील
विवाह....
२०/६/१८ १२-३३-४९ फलटण
L..बुध,S..रवी,R..बुध D..बुध Ls रवी
मुळ पत्रिकेत ७ चा सब शनी आहे. रूलिंगमधे शनी नाही. म्हणून बुध घेतला वेळ येते
८-२१-०७ सकाळी.
या्रून कुंडली तयार केली.
७ चा सब बुध...
बुध..              कन्या
चंद्र...७ १०।     व्रुषभ
चंद्र...७ १०
चंद्र...७ १०

                सप्तमाचा सब ७ भावाचा कार्येश असून  सुधा विवाह झाला नाही. बुध कन्या या व्दिस्वभाव राशीत आहे. एक पेक्षा जास्त विवाह. पण एक तरी विवाह व्हावा . पण झाला नाही.
बुध चंद्राच्या नक्षत्रात आहे व चंद्रावर नेपच्यून ची अंशात्मक द्रुष्टी आहे. नेपच्यून हा फसवा ग्रह आहे. तसेच शनीची सप्तमभावारंभी द्रुष्टी आहे. आणखी एक महत्वाचे म्हणजे विवाहाचा कारक ग्रह शुक्र प्लूटो बरोबर ३८ अंशाचा कोन करित आहे. मा. गोंधळेकर यांचे संशोधन प्लूटो ज्या ग्रहाबरोबर ३६/७२ अंशाचा कोन करीत असेल तर त्या ग्रहाचे फळ नष्ट करतो.
 सर्व ग्रहांचे कार्येश पाहीले तर , बर्याच ठिकाणी हर्षल नेपच्यून चा संबंध आलेला आहे. त्यामुळे योग असून सुध्दा विवाह झाला नाही.
नियम. = सप्तमाचा सब २ ७ ११ / ५ ८ चा कार्येश असेल तर २ ७ ११ कार्येश ग्रहांच्या संयुक्त दशेत विवाह होईल .

विवाह योग्य वयापासून विचार केला तर
गुरू म.द.२८/६/२००४ ते २८/६/२०२० पर्यंत आहे.
गुरू..
रवी...११ १२ कयू
बुव...
चंद्र...७ १०

गुरू ७ ११ चा कार्यश  आहे. परंतू ४ पायरी्वर चंद्र नेपच्यून द्रुष्टी त आहे.
अ .द.शनी २ ३ ४ ५ ६ ७ ९ ११ १२ चा कार्येश पण ४ पायरीवर मंगळ हर्षल च्या युतित आहे.
: अं.द.बुध वरील प्रमाणे
 अं.द. केतू...
केतू...६ मं १२,२के द्रु ६
केतू...६ मं १२, २ के. द्रु ६
शनी...९ ४ ५
बुध...११ गु द्रु ७

या अं.द. शक्यता होती परंतू केतू मंगळा राशीत मंगळ हर्षल युती.

शुक्र अं.द. शुक्र प्लूटो ३८ अंश

अं.द. रवी मंगळाच्या नक्षत्रात मंगळ हर्षल युती.

अं.द.चंद्र ,चंद्र केतू च्या सबमधे केतू मंगळ चे राशीत मंगळ हर्षल युती शिवाय ३-४ पायरीला ६ १२ चा कार्येश

अं.द. मंगळ हर्षल युतित.

या कारणांमुळे आतापर्यंत विवाह झाला नाही.
नोकरी....
दशमाचा सब २ ६ १० ११ चा कार्येश असेल तर २ ६ १० कार्येश ग्रहांच्या संयुक्त दशेत नोकरी लागते .
दशमाचा सब  चर राशीत असेल तर व्यक्ती व्यवसाय करते. सब स्थिर राशीत असेल तर नोकरी करते . सब द्विस्वभाव राशीत असेल तर नोकरी व्यवसाय दोन्ही करतो.
१० चा सब राहू
राहू...१२ शु १ ८ मं यु १२ २  हर्षल युती
राहू..१२ शु १ ८ मं यु १२ २ हर्षल युती.
शनी...९,४,५
बुध...११ गु द्रु ७

राहू तूळ या चर राशीत

शनी कर्क या चर राशीत

बुध कन्या या व्दिस्वभाव राशीत

कोठेही स्थिर राशीचा संबंध नाही.तसेच दशमाचा सब राहू शनी च्या माध्यमातून ९,५ चा कार्येश 
म्हणून नोकरी त टिकणार नाही.
 राहू २ ८ ११ चा कार्येश म्हणून एल आय सी ची एजन्सी चालू ठेवावी.
राहू ४ ५ ९ ११ चा कार्येश ४ ९ शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित म्हणून ट्यूशन चा व्यवसाय करावा

शुभम भवतु 
      वडिलांचा आजार केंव्हा बरा होईल ?                   

  एक वयस्कर व्यक्ती, वय वर्षे ९० ,  ह्यांचे दोन्ही पाय अचानक सुजले. डॉ.नी औषध दिले. दोन दिवसात सूज कमी झाली. पण डोळ्या्वर झापड आली. खूप प्रयत्न करावे लागत होते डोळे उघडायला. परत डॉ.ला दाखवले. डॉ.नी एम आर आय काढायला सांगितले. एम आर आय मधे डोक्यात एक गाठ आहे हे निदर्शनास  आले साधारण पणे ५ ×४ सेंटीमीटर  त्यामुळे मेंदूवर दाब पडतोय. काही शिरा दबतात. डॉ.म्हणतात  ऑपरेशन नाजूक आहे. वयाचा विचार करता गाठ काढली तरी गैरंटी नाही. नाही काढली तर एक बाजू पेरलाईज होऊ शकते.आता सध्या व्यक्ती बेडवर आहे . सर्व विधी बेडवरच होतात.  पाय त्यांना हलवता येत नाही . स्मरण शक्ती कमी होत चालली आहे . दृष्टी कमी . आवाजावरून नातेवाईक ओळखतात. पाठीला जखमा होऊ नयेत म्हणून मुलगा सून आलटून पालटून एका अंगावर झोपवतात . नाकातून नळी घालून द्रवपदार्थ देत आहेत .
 त्यांचा मुलगा आला होता. बाबा केंव्हा बरे होतील ?
आजाराचे प्रश्र्न नंबर कुंडली वरून सोडवावेत असा संकेत आहे. म्हणून त्याच्याकडून एक नंबर घेतला.
केपी नं ५६ यावरून कुंडली तयार केली. मिथून लग्नाची कुंडली आहे.
जातकाच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ..।.
चंद्र भावचलीत कुंडलीमधे द्वितीयात. वडीलांचे स्थान नवम. नवमापासून व्दितीय स्थान हे षष्ट स्थान आहे. म्हणजे वडील आजारी आहे हे कळते प्रश्र्नाचा रोख बरोबर आहे
आता नवम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली.
षष्टाचा सब गुरू आहे.  षष्टाचा सब गुरू असतो तेंव्हा कोणत्याही गोष्टीची वाढ करतो . या ठिकाणी गुरूने अनावश्यक पेशींची वाढ केली . त्यामुळे डोक्यात गाठ निर्माण झाली . म्हणजेच ब्रेन ट्यमर झाला. दूषित गुरू तूळ राशीत नवम  भावारंभी  आहे त्याची दृष्टी तृतीय रंभी आहे . तृतीयात मेष रास.मेष राशीवरून डोक्याचा अर्थबोध होतो.
साध्या कुंडलीत दूषित गुरूची द्रुष्टी लग्नावर.
लग्न कुंभ आहे.
 गुरू...९, २, ९ कयू
गुरू...९, २, ९ कयू
गुरू...९, २, ९ कयू
गुरू.....९ , २ , ९ कयू

कुंभ हे स्थिर तत्वाचे लग्न म्हणजे नवम स्थान हे बाधक स्थान होते.
षष्टाचा सब.गुरू मारक, बाधक स्थानाचा कार्येश आहे. याचा अर्थ आजार गंभीर आहे.
लग्नाचा सब बुध आहे. बुध
२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ११ १२ चा कार्येश आहे. २ ७ मारक , ९ बाधक , ४ मोक्ष , ६ ८ १२ अशुभ स्थाने
आयुष्यमान कमी आहे.
 आता आपण दशा पाहू....
केतू २०२१ पर्येंत आहे
केतू .. ६ ९ १२ २ चा कार्येश आहे.
६ आजार १२ हॉस्पिटल ९ बाधक २ मारक
केतू मधे गुरू ७/१२/१८ पर्यंत
गुरू  ९ २ चा कार्यश
९ बाधक २ मारक
शुक्र रवी चंद्र मंगळ राहू च्या विदशा बाकी आहेत.
शुक्र १३/८/१८  (५ १० ११ १२ १ ,३ )
रवी ३०/८/१८   ( ५ ७ १० ११ १२ १ ३ ४)
चंद्र २७/९/१८  ( ५ ९ १० ११ १२ १ २ ३ )
मंगळ १७/१०/१८   (६ ९ १२ २ )
राहू  ७/१२/१८       ( ६ १० १२ १ )
  यापैकी शुक्र रवी चंद्र ५ ११चे कार्यश आहेत  २७/९/१८ पर्येंत तब्येत ठीक राहील.
मंगळ राहू विदशे मधे त्रास वाढू शकतो.
कारण
मंगळ ६ ९ १२ २                           ६ ( आजार ), ९ (बाधक ), २ (मारक), १२ ( हौ स्पिटल )
राहू  ६ १० १२ १ चा कार्यश आहे.    १ (स्वतः व्यक्ती ) १० लाभाचे व्यय ६ ( आजार ) १२ ( हौ स्पिटल )
ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर २०१८ ह्या कालावधी त तब्येत सिरीयस राहील. धोकादायक राहील.
शुभं भवतु 

Tuesday 19 June 2018

सब ची प्रतिकूलता 
२०१२ साली माझ्या ओळखीचे एक प्राध्यापक माझ्याकडे आले व म्हणाले आतापर्यंत इतरांचे रिडींग चुकले आहे . हि माझ्या मुलीची पत्रिका  आहे . हीच विवाह योग्य केंव्हा आहे असे विचारले 
जन्म दिनांक --१७ एप्रिल १९८७ वेळ... १४-५४-. २५ स्थळ अकलूज . प्रश्न पहाटे वेळी सप्तमाचा सब गुरु होता. आजही लेख लिहितेवेळी सप्तमाचा सब गुरूच आहे 
दि. --७/६/२०१८ वेळ .. १=३७=२७ दुपारी फलटण   
एल --बुद्ध एस गुरु आर.. शनी  डी --गुरु एल एस .. रवी 
सप्तमाचा सब गुरु रुलिंगमध्ये आहे पत्रिका बरोबर आहे . चंद्र शनी च्या नक्षत्रात आहे ..... पुनरफू योग 

या पत्रिकेत सप्तमाचा सब गुरु आहे 
गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे बलवान भावच दिले आहेत 
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 8   5 8     Rahu-Yuti  8    Ketu-Drusht  2  
It's N.Swami :-------- Mercury:- (8)   2 (11)   
It's Sub :------------ Mercury:- 8   2 11   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (4)   (6) 7   
Itself aspects :------ 2 12 4

गुरु दुसऱ्या पायरीला ८ या दुय्यम भावाचा व ११ या प्रमुख भावाचा कार्येश आहे परंतु ३--४ स्टेपला 
४ ६ या भावाचा कार्येश आहे . हे भाव पूर्णपणे विरोधी आहेत . 
सबब सदर मुलीचा विवाह अध्याप पर्यंत झाला नाही 
याठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली 

Saturday 2 June 2018

सब ची प्रतिकूलता
  एक पत्रिका माझ्याकडे आली. प्रश्र्न विवाहाचा आहे. प्रत्येक के पी अभ्यासक प्रथम रूलिंग घेतो.
३१/५/१८ संध्याकाळी ७-११-०७  स्थळ =फलटण
L..मंगळ , S..केतू , R ..गुरू , D..गुरू Ls.. बुध
७ चा सब शुक्र आहे.
रूलिंगमधे शुक्र नाही. म्हणून त्याच्या मागील केतू ,बुध घेता येत नाही कारण वेळेत खूप फरक पडतो. पुढिल मंगळ घ्यावा का ?
शुक्र,रवी, चंद्र,मंगळ हे शिघ्र गतीचे ग्रह असल्यामुळे वेळेत फारसा फरक पडणार नाही. दुसरे कारण असे कि जन्मस्थळ ओझर्डे ता. वाई हे गांव खेडे आहे.प्रसुति घरी झाली का दवाखान्यात झाली हे माहित नाही.  त्यामुळे मि मंगळ  घ्यायचे ठरविले. त्यानुसार वेळ येते ७-४५ . १५ मिनीटाचा फरक   तो फार होत नाही.
जन्म दि. १८/१०/८२ दिलेली वेळ सकाळी ७-३० ओझर्डे ता. वाई.
७-४५ नुसार मि कुंडली तयार केली .
 आज रोजी ह्या मुलाचे वय ३६ आहे. एवढा उशीर ......
शिक्षण १२ वी, एका सूत गिरणीमधे ६ वर्षे नोकरी करत आहे. सुपरवायझर या पदावर.
 घरी पाच एकर बागाईत जमिन .
 रवी शनी प्लूटो युति
शुक्र कन्येचा व्ययात
शुक्र शनी युति (५ अंश )

७चा सब मंगळ
मंगळ...
बुध...११ ९
गुरू... १ ३ ६
गुरू...१ ३ ६

गुरू १ ३ ६ ९ ११ चा कार्येश
३-४ पायरीवर १ ३ ६ चा कार्येश
३ दुय्यम, ६ १ पुर्ण विरोधी भाव

म्हणून उशिर, शक्यता फार कमी .

सब ची प्रतिकूलता ....
           जातक जन्म दिनांक-३०/०९/१९७५, 
            जन्म वेळ सायंकाळी-०६/१५ (१८-१५)
            
            अद्यापही लग्न झाले नाही.


   विवाह योग  केंव्हा आहे. ?
असा प्रश्र्न विचारला की आपण विवाह योग शोधण्याचा प्रयत्न करतो. के पी अभ्यासक प्रथम रूलिंग घेतात. आणि संबंधीत भावाचा सब रूलिंग मधे आहे का ते पाहतात. असेल तर योग शोधण्याचा प्रयत्न करतात. सब नसेल तर पुढचा किंवा मागचा सब घेऊन वेळ निश्र्चित करतात. व पत्रिका सोडवितात.
माझे मत...
         विवाह योग्य वय किती असते साधारणपणे २५ वर्षे  . आता व्यक्ती चे वय किती आहे .? ४३ चालू आहे. म्हणजे मागील १८ वर्षात योग आलेच नाहीत का ? का आले नाहीत याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. विवाहाला उशिर का झाला ? याचा प्रथम विचार व्हावयास हवा. उशिर का होतोय हे समजले की पुढे जाता येईल.
कारण २ ७ ११ / ५ ८ हे भाव कोठेना कोठे येत राहणार आहेत. म्हणून अमूक अमूक कालावधी त विवाह होईल असे म्हणायचे का . दुसरे असे प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी कुंडली पाहणार म्हणजे प्रत्येकाचे संबंधित भावाचे  सब वेग वेगळे येणार. असो
         मि माझे मत मांडतो .....या कुंडलीत चंद्र शनी नक्षत्रात व युतीत आहे. हि युति पंचम भावारंभी आहे . सगळ्यात महत्वाचा योग म्हणजे रवी प्लूटो युती सप्तम भावारंभी आहे. स्त्री च्या पत्रिकेत रवी म्हणजे पति . प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे. तो ज्याच्या युतित असतो ज्या भावारंभी असतो त्या भावाचे फळ देत नाही. 
( मा. गोंधळेकर सर यांचे संशोधन )
या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व....
शनी...४ ११ १२ ५ क.यू चं द्रुष्ट ४
शनी...४ ११ १२ ५ क यू चं द्रुष्ट ४
केतू...
रवी ...६

शनी ३-४ पायरीला पुर्णपणे अशुभ ,विरोधी  आहे.  या ठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली . 
सबब सदर व्यक्तीचा विवाह होणार नाही ....

Thursday 19 April 2018

नवीन चांगली नोकरी मिळेल का ?
अविनाश  , ने यापूर्वी बऱ्याच वेळा माझा ज्योतिषविषयक सल्ला घेतलं होता . त्याला तसा चांगला अनुभव पण आला होता. आता सध्या ज्या कंपनीत नोकरी करतं आहे त्या ठिकाणी त्याचे वरिष्ठ कंपनी सोडून गेले होते . त्यामुळे त्याला सध्याचे वरिष्ठाकडून नोकरीत त्रास होत होता.  सतत तणावाखाली वावरत होता . तो नवीन नोकरीच्या शोधात होता.एक दिवस त्याने प्रश्न विचारला सर, आज मी एक टेलिफोनिक मुलाखत दिली आहे . मला दुसऱ्या मुलाखतीला बोलावतील का ? व आताची नोकरी सोडून मला नवीन चांगली नोकरी मिळेल का ? मी त्याला १ ते २४९ यापैकी एक संख्या विचारली , त्याने ७२ हि संख्या दिली . त्यावरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
प्रश्न ... दुसऱ्या मुलाखतीला बोलावतील का ? हि  नोकरी सोडून दुसरी मिळेल का ?

दि . १३/२/२०१८  वेळ १२-३०-२२ दुपारी फलटण 




नियम .. ३ चा सब लाभाचा कार्येश असेल तर मुलाखतीला बोलावणे येईल . 
              लाभाचा सब ३ चा कार्येश असेल तर मुलाखतीत यश येईल. 

हि कर्क लग्नाची कुंडली आहे . ज्यावेळी प्रश्न कुंडलीमध्ये कर्क लग्न येईल त्यावेळी उत्तर होकारार्थी द्यावे असा संकेत आहे

या कुंडलीमध्ये ३ चा सब शुक्र आहे

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (8)   4 (11)  Cusp Yuti: (8)       Saturn-Drusht  (5)   7 8
It's N.Swami :-------- Rahu:- (1)      Rashi-Swami Moon (6)   1
It's Sub :------------ Jupiter:- (4)   6 (9)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (4)   6 (9)  
Itself aspects :------ 2

शुक्राच्या नक्षत्रात एक हि ग्रह नसल्यामुळे शुक्र बलवान आहे शुक्र लाभाचा कार्येश आहे म्हणजे मुलाखतीला बोलावणे येणार हे नक्की झाले . त्याप्रमाणे त्याला दुसऱ्या मुलखातीला बोलावणे आले .

लाभाचा सब राहू आहे
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 1       Rashi-Swami Moon 6   1
It's N.Swami :-------- Mercury:- (7)   (3) (12)     Sun-Yuti  (7)   (2)
It's Sub :------------ Venus:- (8)   4 (11)  Cusp Yuti: (8)       Saturn-Drusht  (5)   7 8
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (1)      Rashi-Swami Moon (6)   1 N.swami mercury (7) (3) (12)
Itself aspects :------ 7

लाभाचा सब राहू दुसऱ्या व चौथ्या पायरीला ३ चा कार्येश आहे म्हणजे त्याला मुलाखतीत यश मिळणार व त्याची निवड होणार हे नक्की याठिकाणी सब लेव्हल ला राहू ८ चा कार्येश आहे यामुळे थोडे अडथळे येऊ शकतात पण शेवटच्या चौथ्या पायरीवर ३ चा व ६ चा कार्येश आहे ६ वे स्थान हे प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याचे स्थान आहे . त्यामुळे अडथळ्याच्या शर्यतीतून यश मिळणार आहे . आणि झालेही तसेच . एकूण २२ मुलांमधून ३ जणांची निवड केली . शेवटी ३ जणा मधून  याची निवड झाली  .हि कर्क या चर लग्नाची कुंडली आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे . आता नोकरी रुजू केंव्हा होईल ते पाहू .

नियम .... दशमाचा सब ३ ५ ९ व २ ६ १० या पैकी भावाचा कार्येश असेल तर नवीन नोकरी मिळेल  (३ ५ ९ नोकरी सोडण्यासाठी व २ ६ १० नोकरी मिळण्यासाठी  )

दशमाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे


PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (5)   7 8  Cusp Yuti: (6)    
It's N.Swami :-------- Ketu:- (7)      Rashi-Swami Saturn (5)   7 8
It's Sub :------------ Mercury:- 7   3 12     Sun-Yuti  7  2
It's Sub's N.Swami :-- Mars:- (5)   5 (10)  
Itself aspects :------ 12 8 3

शनी ३ ५ ९ पैकी ५ या भावाचा व २ ६ १० पैकी ६ १० या भावाचा कार्येश आहे .

आता दशा  पाहू रवी मध्ये गुरु ८ ऑगस्त २०१८ पर्यंत आहे
रवीचे कार्येशत्व
PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 7   2     Mercury-Yuti  7  3 12
It's N.Swami :-------- Mars:- (5)   5 (10)  
It's Sub :------------ Mercury:- 7   3 12     Sun-Yuti  7  2
It's Sub's N.Swami :-- Mars:- (5)   5 (10)  
Itself aspects :------ 2

रवी नोकरी सोडण्यासाठी ५ चा व मिळविण्यासाठी १० चा कार्येश आहे .
गुरु चे कार्येशत्व
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (4)   6 (9)  
It's N.Swami :-------- Jupiter:- (4)   6 (9)  
It's Sub :------------ Venus:- (8)   4 (11)  Cusp Yuti: (8)       Saturn-Drusht  (5)   7 8
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (1)      Rashi-Swami Moon (6)   1
Itself aspects :------ 10 8 12


गुरु ५ ९ व ६ ११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . 
३ ५ ९ व २ ६ १० या भावांची साखळी जुळविण्यासाठी अजून २ व ३ भाव आवश्यक आहेत . २ व ३ भाव फक्त चंद्र मंगल राहू दाखवितात म्हणून 

चंद्र---१५ मे  ते ८ जून २०१८ 
मंगळ .... ८ जून ते २५ जून २०१८
राहू... २५ जून ते ८ ऑ गस्ट २०१८ 
कर्क या चर लग्नाची कुंडली असल्यामुळे मी चंद्र विदशा निश्चित केली व १५ मे  ते ८ जून २०१८ या कालावधीत रुजू होशील असे सांगितले. परंतु अविनाश  ९ एप्रिल २०१८ लाच नोकरीवर रुजू झाला . म्हणजे एक महिना अगोदर शुक्राच्या विदशेमध्ये रुजू झाला आहे . शुक्र कार्येशत्व 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (8)   4 (11)  Cusp Yuti: (8)       Saturn-Drusht  (5)   7 8
It's N.Swami :-------- Rahu:- (1)      Rashi-Swami Moon (6)   1
It's Sub :------------ Jupiter:- (4)   6 (9)   
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (4)   6 (9)   
Itself aspects :------ 2

शुक्र ५ ९ चा व २ ६ ११ चा कार्येश आहे . 

शुभंम भवतु 

Friday 30 March 2018

फसवणूक 

                         एका स्त्री ने प्रश्न विचारला, पतीने धंध्यामधे पैसे गुंतविण्यासाठी एका व्क्यक्तीला १० लाख रूपये दिले. १५ दिवसांनी सदर व्यक्ती पळून गेली. त्याव्यक्ती कडून पैसे परत मिळतील का ?
 के पी. १५९ दिनांक २६/३/१८ वेळ १८-१३-५७ फलटण
अ १७-५९ रे ७४ -२६
नियम...षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे मिळतील. 
सब शनी असेल तर कमी मिळतील ,बुध असेल तर हप्त्यांत मिळतील.
पतिने पैसे दिलेत म्हणून कुंडली फिरवून घेतली
षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे परत मिळतील. 
फिरविलेल्या कुंडलीमधे षष्टाचा सब शनी आहे 
शनी..
शुक्र..११ १
शुक्र..
केतू..८ ,९ कस्प युती श ७ ९ 
शनी ३-४ पायरीवर ७,८,९ चा कार्येश आहे  २,६ चा कार्येश होत नाही. 
दशा शनी बुध २६-४-१९ पर्यंत
शनी चे कार्येशत्व वर आहेच. 
बुध..१०, ५ ,११
बुध..१०,५,११
रवी..१०,४ मं द्रुष्ट ७ ,१२
शनी..७ ,९

बुध सुधा २,६ चा कार्येश होत नाही. 

सबब पैसे मिळणार नाहीत.
माझे मत...चतुर्थात पापग्रह असतील तर व्यक्ती, लबाड,अप्रामाणिक, खोटारडी, फसवणूक करणारी असते . (  (शनी,मंगळ,राहू ,नेपच्यून ) 
या कुंडलीमध्ये नेपच्यून चतुर्थ भावारंभी आहे 
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये नेपच्यून दशम भावारंभी येतो . धंद्यामध्ये फसवणूक 
पैसे मिळण्यासाठी सहावा भाव लागलाच पाहिजे, कारण सप्तम भाव हि पळून गेलेली व्यक्ती तिच्या पैशाचा व्यय म्हणजे षष्ट स्थान . षष्ट स्थान लागत नाही. म्हणून पैसे मिळणार नाहीत.
फक्त ६ किंवा २ ६ चा कार्येश असलाच पाहिजे. फक्त २ लागून चालणार नाही.
 ११ भाव तसा दुय्यम आहे. फक्त इच्छापुर्ती दाखवितो. म्हणून ६ ११ किंवा २ ६ ११ भाव असावेत.
शुभम भवतु 





















Wednesday 14 March 2018

   सबची प्रतिकूलता 
                                        आदित्य , अधुनमधून माझ्याकडून ज्योतिष चा सल्ला घेत असे. मध्यंतरी ऑगस्ट २०१७ मधे नोकरीविषयी प्रश्र्न विचारला होता. तो म्हणाला तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे. मि नविन नोकरीसाठी मुलाखत दिली आहे. मला खात्री आहे , माझी निवड होईल. काल त्याचा अहमदाबाद हून फोन आला मला म्हणाला माझा विवाहाचा योग केंव्हा आहे ?  त्याची पत्रिका माझ्याकडे आहेच. शिवाय मि त्याला एक केपी नंबर ध्यायला सांगितले. त्याने ३७ नंबर दिला. २-३ दिवसांनी सांगतो असे म्हणून फोन ठेवला.
त्याची पत्रीका खालीलप्रमाणे।....।
दिनांक...३१/३/१९८५ वेळ...सकाळी १०-१०-१२ स्थळ..परभणी
त्याच्या पत्रीकेची लग्नशुध्दि मि यापुर्वीच केली होती.
नियम... ७ चा सब २ ७ ११ चा कार्येश असेल तर २ ७ ११ च्या संयुक्त दशेमधे विवाह होतो.
या पत्रिकेत ७ चा सब शुक्र आहे.
शुक्राचे कार्येशत्व....
शुक्र...
बुध...११,५ शु युती ११,१
चंद्र...
शनी...६,१०

फोर स्टेप प्रमाणे या ठिकाणी सबची प्रतीकुलता निर्माण झाली आहे. म्हणजे शुक्र ३-४ स्टेपला पुर्णपणे विरोधी भावाचा कार्येश झाला आहे. सबब आदित्य चा विवाह होणार नाही असे खात्रीपुर्वक म्हणता येईल.
तसेच ७ चा सब शुक्र मिन या द्विस्वभाव राशीत आहे व शुक्र बुधाच्या युतीत आहे .
 दशेचा विचार केल्यास आता बुध शनी गुरू दशा २०/७/१८ पर्येंत आहे
                              बुध...११,५ शु यु ११ १
नक्षत्र स्वामी              बुध... ११,५शु यु  ११,१
सब...                       चंद्र...
सब चा न. स्वामी         शनी...६,१०

                           शनी...६,१०
नक्षत्र स्वामी           शनी...६,१०
सब..                    शनी...६,१०
सब चा न. स्वामी.    शनी...६,१०

                                गुरू...
नक्षत्र स्वामी                चंद्र..२,३
सब..                         शनी...६,१०
सब चा न. स्वामी          शनी...६,१०

एकूण दशेचा विचा र केला दशा सुद्धा विरोधी भावाची कार्येश आहे म्हणून  २०/७/१८ पर्यंत विवाह होणार नाही. 

Saturday 3 February 2018

  विवाह केंव्हा ?        

पुरूष ९/९/८९ १२-२५ दुपारी गुलबर्गा  .
मी पत्रिका पहिली त्यावेळचे रुलिंग खालीलप्रमाणे

        दि . ३/२/१८     वेळ ३-०७-४८ दुपारी             फलटण ( अ १७,५९ रे ७४,२६ )
एल..बुध           एस..रवी            आर..रवी              डी..शनी            एल एस मंगळ
दशा म. द  / अं .द  रवी शनी १८/११/१८ पर्यंत .

७ चा सब बुध . 
बुध रूलिंगमधे आहे . तसेच म.द. व अं.द स्वामी रवी , शनी सुधा रूलिंगमधे आहेत म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
बुध..१०,८ श द्रुष्ट १ ४
चंद्र..१
शनी..१,४ गु द्रु ७ २ ५
शुक्र .. ११ १२

बुध २ ५ ७ ८ ११ या अनुकूल भावांचा कार्येश आहे.
रवी शनी दशा १८/११/१८ पर्यंत आहे

रवी ..१०
शुक्र ..११ १२
शनी..१ ४ गु द्रु ७ २ ५
शुक्र ..११ १२

रवी २ ५ ७ ११ चा कार्येश आहे .
शनी..१ ४ गु द्रु ७ २ ५
शुक्र ..११ १२
शुक्र ..
मंगळ .. १० ६

शनी २ ५ ७ ११ या.बरोबर १ ४ ६ १० चा कार्येश आहे म्हणून सोडून दिली . त्या पुढील बुध अं.द.निश्र्चित केली.
बुधाचे कार्येशत्व वर काढललेले आहे . बुध २ ५ ७  ११ चा कार्येश आहे.
रवी बुध बुध १८/११/१८ ते १/१/१९ पर्येंत विवाह होईल.
 गोचर......
रवी बुध दोन्ही जलद गतीचे ग्रह.आहेत म्हणून त्यांचे नक्षत्रस्वामी पहिल्या दोन पायरीवर अनुकूल असेल तर घटना.घडेल .

रवी बुध दोन्ही १८/११/१८ ते १५/१२ /१८ पर्यंत अनुकूल आहेत.
याच कालावधीत विवाह होईल.

Tuesday 30 January 2018

विवाह केंव्हा होईल  ?
 पुरूष २४/८/८०  ६-१५ सकाळी  चोपडा जि जळगाव

 एल   एस   आर    डी
शुक्र   गुरू    शुक्र    बुध    एल एस राहू
 ७/६/१७ . ३-४३-०४ दुपारी   फलटण

७ चा सब.राहू  राहू रूलिंग  मधे आहे
 राहू चे कार्यत्व
राहू १२ चं ६
बुध  १२, १ क यू  दृ ७ रवी यू १२
राहू १२चं ६
बुध  १२, १ क यू दृ ७ रवी यू १२


सब राहू बुधाच्या नक्षत्रात बुद्ध प्रथम भावारंभी आहे  म्हणून बुधाची सप्तम भावावर पूर्ण द्रुष्टी आहे . म्हणून राहू ७ चा का र्येश होतोय
आता विवाह केंव्हा होईल यासाठी दशा पाहू .  गुरू म.द २०३२ प
जन्मकुंडली सिंह लग्नाची आहे.  सिंह स्थिर लग्न म्हणून शनी अंतर्रशा घेतली
गुरू। शनी १०/१०/२०पर्यंत
 गुरू १। २। ३। ७। १०। ११। १२
यामधे २। ३। ७। ११ अनुकूल
शनी १। २। ७। १२ चा कार्येश
 २। ७। अनुकूल शिवाय शनी सप्तमेष आहे  पुढील विदशा पाहू
 बुध २। ३। ७। बरोबर ४। ६ चा कार्येश
 केतू। २। ३। ९। बरोबर १ ,४ ,६ ,१२ चा कार्येश म्हणून बुध व के तू दोन्ही विदशा सोडून दिल्या
 त्यापुढील शुक्र विदशा
शुक्र १। ३। ५। ८। ११ चा कार्येश
 गुरू शनी शुक्र २५/२/१९ ते २९/७/१९  ह्या कालावधीत विवाह होईल, 

Thursday 25 January 2018

पत्रिका मेलन
 पुरूष २४/५/८६  २१-१०  कोल्हापूर
हि पत्रीका पत्रिका मेलन साठी आली होती.
मि ज्यावेळी पत्रिका पाहिली त्यावेळी ७ चा सब गुरू होता. तो रूलींग मधे होता.
आजही गुरू लग्न नक्षत्र स्वामी म्हणून रूलिंग मधे आला आहे.
२६/१/१८  ९-४६-४४ फलटण
एल.. शनी एस..रवी आर..मंगळ डी..शुक्र एल एस..गुरू
म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे.
७ चा सब गुरू
गुरू..३
गुरू..३
बुध.. ६ क.यु
चंद्र..१२ ८
 ४ स्टेप प्रमाणे गुरू ३-४ पायरीला ६ ८ १२ भाव चा कार्येश आहे.
८ भाव हा पुरक भाव आहे. परंतू जोडीला ६। १२ भाव असल्यामुळे सदर पत्रिका जुळत नाही.
सप्तमाचा सब गुरू ६ १२ भावांचा कार्येश आहे म्हणजे या पत्रिकेत वै.सौख्याचा अभाव आहे म्हणून पत्रीका जूळत नाही. 

Thursday 18 January 2018

जन्म वेळ निश्र्चित करणे ( लग्न शु ध्दी ) ...
आमच्या कॉलेजमधील एक प्राध्यापक मला म्हणाले , माझी पत्रीका काढायची आहे . मि म्हटले काढू की. ते म्हणाले मला जन्मतारीख माहीत आहे पण जन्मवेळ माहीत नाही. ठिक आहे मि प्रयत्न करेन. त्या नंतर हि गोष्ट मि विसरून गेलो . एक दिवस त्या सरांनी विचारले पत्रीका काढली का ? तेंव्हा लक्षात आले सरांची पत्रीका काढायची आहे. एक दिवस ठरवून पत्रीका काढायला बसलो.

१०/११/६१ वेळ.. सकाळी स्थळ...करमाळा
वेळ नक्की माहित नाही.
कृष्णमूर्ती पद्धतीने वेळ निश्च्छित करता येते . रुलिंग प्लॅनेट वरून पत्रिकेचे लग्नारंभ ठरविता येतो . रुलिंग प्लॅनेट म्हणजे १) आपण ज्यावेळी पत्रिका काढायला सुरुवात करू त्यावेळी कोणते लग्न आहे ते पाहणे 
                              लग्नाचा स्वामी 
                        २) चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी 
                        ३) चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी 
                        ४) वाराचा स्वामी 
          इंग्रजी मध्ये  L S R D म्हणतात किंवा रुलिंग म्हणतात.      


मि रूलिंग प्लनेट पाहिले
१८/१/२०१८ वेळ..१-११-११ फलटण
एल..मंगळ, एस..चंद्र,  आर..शनी ,डी ..गुरू ,एल एस..शुक्र
१) मंगळ ग्रहाची दोन लग्ने मेष , व्रुश्र्चिक
२) चंद्राचे कर्क
३) शनीची मकर व कुंभ
४) गुरू ची धनू व मिन
प्रथम पासून पाहू ....
१) मेष मधे केतू शुक्र व रवी ची नक्षत्रे आहेत यापैकी एकही रूलिंग मधे नाही म्हणजे मेष लग्न असणार नाही. व्रुश्र्चिक मधे गरु शनी बुधाचे नक्षत्र आहे . यापैकी गुरू शनी रूलिंग मधे आहेत . म्हणून व्रुश्र्चिक असू शकते
२) कर्क राशीमधे गुरू शनी बुध नक्षत्रे आहेत. यापैकी गुरू शनी रूलिंगमधे आहेत .म्हणून  कर्क असू शकते
३) मकर मधे रवी चंद्र मंगळ नक्षत्रे आहेत यापैकी मंगळ चंद्र रूलिंगमधे आहेत म्हणून मकर असू शकते तसेच कुंभमधे मंगळ राहू गुरू ची नक्षत्रे आहेत यापैकी मंगळ गुरू रुलिंगमधे आहेत म्हणून कुंभ असू शकते.
४) धनू राशीमध्ये केतू शुक्र रवी ची नक्षत्रे आहेत यापैकी एकही रूलिंगमधे नाही म्हणून धनू असणार नाही. मिन राशीमधे गुरू शनी बुध नक्षत्रे आहेत यापैकी गुरू शनी रूलिंगमधे आहेत परंतू गुरू दोन वेळा नाही म्हणून मिन  लग्न गुरु नक्षत्र असणार नाही. मिन लग्न शनी नक्षत्र घेता येईल
व्रुश्र्चिक ,कर्क ,मकर व कुंभ ,मिन यापैकी एक लग्न आहे हे नक्की झाले.
 व्रुश्र्चिक चा स्वामी... मंगळ
कर्क चा स्वामी..... चंद्र
मकर चा स्वामी...शनी
कुंभ चा स्वामी....शनी
मिन चा स्वामी ... गुरु
आता रूलिंग मधील प्रत वारी चा विचार करू
मंगळ...प्रथम
चंद्र....द्वितीय
शनी...त्रितीय
गुरू....चतुर्थ
कर्क मकर व कुंभ मिन यांची प्रत वारी २ व ३ ,४ क्रमांकाची आहे , म्हणून हि लग्ने घेता येणार नाहीत.सदर व्यक्तीचा जन्म व्रुश्र्चिक लग्नावर झाला असे ठामपणे म्हणता येईल.
आता किती अंशावर जन्म झाला ते पाहू ....
 व्रुश्र्चिक राशीमधे गुरू शनी बुधा ची नक्षत्रे आहेत यापैकी गुरू शनी रूलींग मधे आहेत .पैकी शनी तिसर्या  प्रतीचा व गुरू ४ थ्या प्रतीचा आहे . म्हणून व्रुश्र्चिक रास शनी नक्षत्र असे निवडावे लागेल. आता सब व सब सब निवडायचा . चंद्र व गुरू बाकी आहेत यापैकी चंद्र दुसर्या प्रतीचा व गुरू ४ थ्या प्रतीचा म्हणून सब चंद्र  व सब सब गुरू घ्यावे लागेल .
सदर व्यक्ती चा जन्म व्रुश्र्चिक रास शनी नक्षत्र चंद्र सब व गुरू सब सब वर झाला असे म्हणता येईल.
यावरून शहासने सरांचे उपनक्षत्रस्वामीचे कोष्टक आहे त्यावरून लग्नाचे अंश कला विकला ठरविणे  . सॉफ्टवेअर मधील ट्रान्झिट ऑप्शन वापरून वेळ ठरविता येते . ती वेळ येते ... 
सकाळी ७-५३-१७
या वेळेवरून के पी पध्दतीने कुंडली काढली
काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही हे पहाण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील दोन घटना तपासून पाहील्या .
१ ) नोकरी...१५/२/१९८९
२) विवाह..२५/५/१९९०
नियम .. दशमाचा सब २ ६ १० चा कार्येश असेल तर २ ६ १० च्या संयुक्त दशेमधे नोकरी मिळते 

नोकरी ...१५/२/८९
यावेळी शुक्र शुक्र चंद्र दशा होती
                                          शुक्र..११ ७ बु यू ११ ८
       नक्षत्रस्वामी                मंगळ..१२ ६
      उपनक्षत्रस्वामी ( सब )   रवी..
सब चा नक्षत्रस्वामी            गुरू..२ ५

शुक्र  २ ६ ११ चा कार्येश

                                   चंद्र..१
नक्षत्रस्वामी                शनी.. २ ४
 उपनक्षत्रस्वामी ( सब )गुरू ..
सब चा नक्षत्रस्वामी     रवी .. १२ १०

चंद्र २ ४ १० चा कार्येश
सदर दशा २ ४ ६ १० ११ ची कार्येश आहे . ४ शैक्षणीक क्षेत्र .
सदर व्यक्ती कॉलेज मधे प्रा. आहे.
विवाह...७ चा सब २ ७ ११ चा कार्येश असेल तर २ ७ ११ च्या संयुक्त दशेमधे विवाह होतो.
विवाह..२२/५/१९९०
यावेळी शुक्र शुक्र गुरू दशा होती
शुक्र २। ५। ७। ८। ११
चा कार्येश आहे हे आपण वर पाहिले
गुरू ...
रवी..१२ १०
केतू..३ श २ ४
मंगळ..१२ ६
गुरू २ ३ भावाचा कार्येश आहे
विवाह ठरणे व होणे यामधे अंतर असू शकते. विवाह झाला त्यावेळी गुरू विदशा होती ति फारशी अनुकूल नाही. म्हणूश मि त्याना विचारले विवाह केंव्हा ठरला. ? ते म्हणाले जानेवारी मधे ठरला.
जानेवारी मधे राहू  ची दशा होती
राहू ७ ८ ९ १० ११ १२ चा कार्येश आहे.
राहू ७ ८ ९ ११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे .
   शुभम भवतू 

Tuesday 9 January 2018

कन्सर असेल का ?
माझ्या मेव्हण्याचा नातू. १२-१३ वर्षाचा असेल. एक दिवस खेळताना त्याचा पाय दुखायला लागला. खेळून खेळून दुखत असेल म्हणून घरच्यांनी दुर्लक्ष केल. एक दिवस रात्रीच रडायला लागला म्हणायला लागला , माझा पाय दुखतोय. आई वडीलांनी डॉ.ला दाखवले. डॉ.नी  काही गोळ्या दिल्या . काही दिवस बरे वाटले. पण पुन्हा तो म्हणायला लागला माझा पाय जास्तच दुखतोय. मग सर्वांनाच काळजी वाटायला लागली पुन्हा एका निष्णात डॉ.ला दाखविले त्यावेळी डॉ. म्हणाले पायाच्या हाडाजवळ एक गाठ आहे. ति दुखतेय. ( डाव्या पायाच्या नडगी ..गुडघ्याखाली ) ऑपरेशन करून ति गाठ काढली पाहिजे . व तपासायला पाठवली पाहिजे. आता मात्र सर्व कुटुंब हादरले. नाना शंका यायला लागल्या. आई वडिलांची झोप उडाली. एवढ्या लहान वयात अस होऊ शकत ?
अशावेळी नाही म्हटले तरी मनात शंका येतातच ना.....
याच अवस्थेत मुलाच्य आईने प्रश्र्न विचारला . डॉ.ने सांगितले ते सर्व सांगितले व कन्सर असेल का ? यातून केंव्हा बरा होईल .?
 मि तिला एक केपी नंबर द्यायला  सांगितले.तिने ४० नंबर दिला .
या नंबर वरून मि केपी पध्दतीने कुंडली काढली . या कुंडलीतील चंद्रावरून मनातील विचार जुळतो का ते पाहू .   चंद्र दशमात आहे.चंद्र दशमात म्हणजे पंचमापासून षष्टात. म्हणाजे प्रशश्र्नाच रोख बरोबर आहे.
 दि. २४/१२/२०१७ वेळ..२१-०८-५३  फलटण
 शरीरामधे अनावश्यक पेशींच्या गाठी तयार करणे ह्याचे कारकत्व गुरू ग्रहाकडे आहे. षष्टाचा सब गुरू असेल किंवा सब गुरूच्या नक्षत्रात असेल तर कन्सर असतो.
पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली.
 षष्टाचा सब शुक्र
शुक्र..३ १ श यु. ३
केतू..५ श ३
मंगळ..१ ८
राहू..११ चं ६ न. बु २ १०
षष्टाचा सब गुरू नाही व गुरूच्या नक्षत्रात नाही. त्यामुळे कन्सर नाही हे नक्की.
फक्त मंगळाचा व अष्टम.भावाचा संबंध आहे याचाम्हअर्थ गाठआहे  त्यासाठी ऑपरेशन करावे लागेल. असे सांगितले.
२७ डिसेंबरला  ऑपरेशन झाले. लहान गाठ होती ती काढून टाकली. थोडा तुकडा काढून तपासणी साठी मुंबई ला पाठवीला. त्याचे रिपोर्ट ३ जानेवारी २०१८ रिपोर्ट  मिळाले. रिपोर्ट निल आला . काहिही निष्पन झाले नाही.
 सर्वांना च हायसे वाटले .
पूर्ण बरे होण्यासाठी म.द. अं.द. पाहिल्या . राहू चंद्राची दशा चालू होती.
राहू १० ११ २ ६
चंद्र ११ ६
पुर्ण बरा होण्यासाठी  दशा ५ ११ दोन्ही भावाच्या कार्येश असल्या पाहिजेत. राहू चंद्र ११ भावाचा कार्येश आहे . विदशा ५ भावाची कार्येश असली पाहिजे. प्रश्र्न वेळी शनी विदशा चालू होती .शनी विदशा सोडून दिली 
 शनी ९ १० १२ २ ३ ५
बुध १० १ २ ४ ६ ७
केतू १२ १ ३ ४ ५ ६ ७
शुक्र ९ ११ १ ३ ५ ६ ८
५ ११ चे कार्येशत्व फक्त शुक्र दाखवीतो. म्हणून २०/४/१८ ते २०/७/१८ मधे पुर्ण बरा होईल. आता मुलगा घरातल्या घरात हालचाल करीत आहे.  सध्या पाय दुखत नाही. परंतू २-३ महिने काळजी घ्या असे सुचविले. 
शुभम् भवतू

गाठ कोठे असेल?
यासंबंधी काही विचार करता येईल का ?
षष्टाचा सब शुक्र येतो शुक्र शनी युतीत आहे. शुक्र धनू राशीत धनू राशीवरून मांडी चा विचार करतात, शुक्र शनी युतित आहे शनी वरून पायाचा विचार करतात. शुक्र केतू नक्षत्रात आहे केतू मकर राशीत आहे . मकर राशीवरून गुडघ्याचा अर्थबोध होतो.
धनू रास ..मांडी
शनी...पाय
मकर..गुडघा ( केतू मकर मधे )
पायाचा विचार ...गुडघ्या पासून घोट्या पर्यंत. 
एक राशी ३० अंशाची असते. मुलाचा पाय साधारण१ ते सव्वा फूट असेल.म्हणजे १५ इंच. आपण त्याचे तीन भाग करू. १) १ ते ५ २) ५ ते १० ३) १० ते १५ इंच.आता राशीचे तीन भाग करू. एक ते पांच पर्यंत राशीचे ० ते १०अंश, पांच ते दहा पर्यंत राशीचे १० ते २० अंश होतील. , दहा ते पंधरा राशीचे २० ते ३० अंश होतील.ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फल देतात. शुक्र केतू नक्षत्रात आहे. 
आता केतू २३ अंशावर आहे राहू केतू नेहमीच वक्र गतीने भ्रमण करतात. रवी ते शनी ग्रहांच्या  बाबतीत गुडघ्यापासून घोट्यापर्यंत अंश वाढत जातील , परंतू राहू केतू च्या बाबतीत अंश कमी होत जातील . म्हणजे गुडघ्या पासून सुरुवात केली तर ३०,२९,२८ २७ ,२६ .... आता केतू २३ अंशावर आहे राहू केतू  बाबतीत पाहिला भाग ३० ते २० अंशपर्यंत राहील  आपण जे तीन भाग केलेत त्यातील पहिल्या भागाच्या शेवटी म्हणजे गुडघ्याच्या खाली कोठे तरी गाठ असली पाहिजे.
ऑपरेशनच्या वेळी लक्षात आले गुडघ्याच्याखाली ४ बोटे अंतरावर गाठ होती . ह्याची खात्री करण्यासाठी मी प्रत्यक्ष मुलाला भेटून आलो. त्यावेळी कळले गुडघ्याच्या खाली ४ बोटे अंतरावर गाठ होती.ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास केla तर आपणाला त्यातील रहस्य शोधता येईल.
शुभम भवतु