कृष्णमूर्ति ज्योतिष: December 2022

Thursday 1 December 2022

 जन्मवेळ काढणे 

                                     नागपूरच्या एका व्यक्तीने फोन केला आणि म्हणाला माझ्या आईची पत्रिका काढायची आहे मला फक्त साल माहित आहे . तारीख वेळ माहित नाही . तर पत्रिका काढता येईल का ? मी म्हटले रुलिंग प्लॅनेट वरून पत्रिका काढता येईल. त्याने आईचे जन्मसाल सांगितले १९४०. 

                                      कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ काढता येते. रुलिंग मधील लग्न राशीतून रवी भ्रमण केंव्हा होते ते पाहावे त्यावरून आपणाला महिना ठरविता येईल. रुलिंग मधील लग्न राशीतून नक्षत्रातून जेंव्हारवी चे भ्रमण होईल त्यावरून आपणाला अंदाजे तारीख कळेल. रुलिंग मधील लग्न राशीतून नक्षत्रातून उपनक्षत्रातून चंद्राचे भ्रमण पहिले असता आपणाला अचूक तारीख कळेल. , तसेच रुलिंग मधील लग्न राशीतून नक्षत्रातून उपनक्षत्रातून उप उप नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण होईल त्यावेळी अचूक जन्मवेळ काढता येईल. 

मी जेंव्हा कुंडली काढावयास सुरुवात केली त्यावेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे होते . 

३० नोव्हेंबर २०२२    वेळ--२१-५०-०५

शनी लग्न नक्षत्रस्वामी , चंद्र लग्न स्वामी , राहू नक्षत्र स्वामी , शनी राशिस्वामी , वार बुधवार 

चंद्र  , राहू , शनी , बुध  या रुलिंग चा वापर केला . 

कर्क राशीमध्ये शनी नक्षत्र आहे . म्हणून कर्क राशीतून  शनी नक्षत्रातून भ्रमण रवीचे भ्रमण  केंव्हा होते पहिले ते येते २१ जुलै रोजी . 

कर्क राशीतून शनी नक्षत्रातून राहू उप नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण पहिले ते येते २९  जुलै रोजी . 

कर्क राशीतून शनी नक्षत्रातून राहू उप मधून बुध उप उप मधून चंद्राचे भ्रमण  पहिले असता वेळ येते पहाटे ५ वाजून ५४मिनिटे ०३ सेकंड 

अशा प्रकारे केवळ साला वरून तारीख जन्मवेळ ठरवली.   ( तारीख २९ जुलै १९४० , वेळ--पहाटे  ५-५४-०३ नागपूर )