कृष्णमूर्ति ज्योतिष: February 2022

Monday 28 February 2022

कॅन्सर असेल का ?-----. २

                                      एक अपरिचित जातकाचा दि १५ / १२ /२०२१ रोजी  फोन , म्हणाला तुमचा नंबर मला गोंधळेकर यांनी दिला ( सदर गृहस्थ माझ्या ओळखीचे आहेत ) मी म्हटले बर , पुढे बोला , तो म्हणाला आम्ही दोघे नोकरीला असतो . माझी पत्नी एका हॉस्पि टल मध्ये नोकरीला आहे . तिथे दरवर्षी मेडिकल चेकअप केले जाते . तसे ह्यावर्षी सुद्धा केले . ह्यावर्षी डॉ नि तिला मॅमोग्राम ची टेस्ट घेण्याचा आग्रह केला . त्याप्रमाणे ती टेस्ट झाली . हि टेस्ट झाली १३ डिसेंबर २०२१ ला . त्या रिपोर्ट वरून डॉ नि सांगितले तिच्या स्तनामध्ये एक छोटी गाठ आहे   आणि ती तपासायला पाठवली पाहिजे . हे तो सांगत असताना त्याच्यावर कमालीचे टेन्शन आले होते . शेवटी तो म्हणाला असे काही असेल का ? मी म्हणालो असे प्रश्न मूळ कुंडलीवरून नाही सोडविता येणार . हा प्रश्न ,प्रश्न कुंडलीवरून सोडवू. नंतर त्याला थोडक्यात प्रश्न कुंडली ( नंबर कुंडली ) बदल सांगितले . १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग . त्याने  ३५ हि संख्या  सांगितली ३५ ह्या संख्येवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .  

दि --१५  /  १२  /२०२१      वेळ--१६-१२-०४       फलटण १७,५९   ७४,२६  के.पी. नंबर ३५

हि वृषभ लग्नाची   आहे . चंद्रावरून जातकाच्या मनात काय आहे ते पाहू . प्रश्न जर  खरोखरच तळमळीने कळकळीने विचारला असेल तर प्रश्नाचे उत्तर बर्याच अंशी  बरोबरच येते अर्थात  होय किंवा नाही . चंद्र व्यय स्थानात म्हणजे मनामध्ये  चिंता काळजी आहे . व्यय स्थान म्हणजे पत्नीचे शष्ट  स्थान होईल ( सप्तम स्थानापासून व्यय स्थान सहावे येते )म्हणजे पत्नीचे आजारासंबंधी प्रश्न असा अर्थ निघतो चंद्राची रास कर्क  तृतीय स्थानी म्हणजे पत्नीच्या बाधकस्थानी ( पत्नीचे वृश्चिक लग्न ) चंद्र शुक्राच्या नक्षत्रात शुक्र अष्टम स्थानात म्हणजे पत्नीच्या द्वितीय स्थानात ,मारक स्थान . शुक्र पत्नीचा सप्तमेश व व्ययेश आहे   पत्नीकडून विचार केला तर चंद्र ६ , ९,१२ , २,७ चा कार्येश होतो . ६ आजार ,१२ हॉस्पिटल २,७ मारक , ९ बाधक . म्हणजे जातकाचा प्रश्न बरोबर आहे . 

 

कॅन्सर --षष्ठ भावाचा संबंध राहुशी येत असेल आणि त्याचा कोणत्याही प्रकारे गुरूशी संबंध येत असेल तर ( युती किंवा  दृष्टी ) कॅन्सरची शक्यता जास्त असते कारण राहू हा शरीरात गाठ निर्माण करतो आणि या गाठीचा विस्तार गुरु करतो . गुरु गाठीतील पेशींची अनावश्यक वाढ करतो. 

येथे पत्नीसंबंधी प्रश्न आहे म्हणून सप्तम स्थान लग्न धरून कुंडली फिरवूंन घेतली आहे 

या पत्रिकेत शष्ट  भावाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

चंद्र---६ क यु 

शुक्र --२, ७ 

राहू ---६   शु २,७ मंगल दृष्ट १२

रवी---१ ,  १०

साध्य कुंडलीप्रमाणे मंगळाची दृष्टी ४ स्थानावर पडते 

चंद्र १,२,४,६,७ , १० , १२ चा कार्येश आहे येथे चंद्राचा सब राहू आहे . राहून गाठ निर्माण केली परंतु राहू बरोबर कोणत्याही प्रकारे गुरूचा संबंध येत नाही . त्यामुळे गाठीचा विस्तार झाला नाही . येथे मंगळाचा संबंध आलेला आहे मंगल शस्त्रक्रिया दाखवितो , म्हणून शस्त्रक्रिया करून गाठ काढली पाहिजे येथपर्यंत मी निष्कर्ष  काढला . सदर जातकाला सांगितले गाठ आहे ती शस्त्रक्रिया करून काढली पाहिजे . परंतु कॅन्सर नाही . हे मी १५ डिसेंबर ला च सांगितले दुसरी दिवशी म्हणजे १६ डिसेम्बरला गाठीचा बायोप्सीचा रिपोर्ट येणार होता . त्या दिवशी जातकाकडून काहीच रिप्लाय आला नाही . मी एक दिवस वाट पाहून मीच त्याला फोन केला ,आणि वैचारले काय झाले . त्याने सांगितले डॉ म्हणतात कॅन्सर आहे . मी ठासून म्हटले शक्यच नाही . मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. . त्यानंतर तो म्हणाला हा cure होणार कॅन्सर आहे . बरा होणार कॅन्सर  आहे . हे मी प्रथमच ऐकत होतो . आतापर्यंत कॅन्सरवर  औषध नाही हे माहित होते . मग त्याने सांगितले डॉ म्हणतात हा                                                               TUBULAR BREAST CARCINOVA STAGE--I . असा आहे . हा कॅन्सर पहिल्या स्टेजवरच आहे म्हणून हा काढून टाकता येईल त्यानंतर रेडिएशन थेरपी करून पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो. 

२३ /१२/२०२१ रोजी ऑपरेशन करून गाठ काढली . त्यानंतर रेडिएशन थेरपी वापरून १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पेशंट पूर्ण बारा झाला . शुक्र राहू बुध  राहू दशेमध्ये शश्त्रक्रिया केली 

अशाप्रकारचं एक लेख यापूर्वी प्रसिद्ध केला आहे . त्यामध्ये सुद्धा राहूच समबंध येत होता पण गुरूच संबंध आलेला नाही. त्यावेळी गाठीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. फक्त शस्त्रक्रिया करून गाठ काढली होती. 

असो--- महाजनांनी मार्गदर्शन करावे ----

शुभम भवतु !!!

 

Saturday 26 February 2022

नोकरी--

कोरोनाच्या काळात खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या .  जेंव्हा ऐन संसाराच्या मध्यावर नोकरी जाते तेंव्हा त्या  कुटुंबावर आभाळ कोसळते कारण मुलांची शिक्षणे शेवटच्या टप्प्यात आलेली असतात. , घराचे हप्ते चालू असतात. हे सर्व मॅनेज करणे कर्त्या पुरुषाला खूप अवघड जाते . कोठूनही आर्थिक स्तोत्र निर्माण करता येत नाही . काहीं तर जगण्यासाठी आपली घरे विकून भाड्याच्या घरात राहू लागलीआहेत. . जी काही आयुष्याची पुंजी साठवली होती ती सुद्धा संपत आली    पण नवीन नोकरी काही मिळेना . एका जातकाने माझ्याशी फोनवर संपर्क केला .आणि म्हणाला आता मी एका कंपनीत नोकरी करत आहे . मला , आहे हि नोकरी सोडून दुसरी चांगली नोकरी केंव्हा मिळेल  ? आणि म्हणाला मला व्यवसाय करण्याची इच्छा आहे . मी त्याचे बर्थ डिटेल्स मागवून घेतले . कृष्णमूर्ती पद्धतीने ( ४ स्टेप ) मार्गदर्शन केले ते खालीलप्रमाणे ---   .  

जन्मतारीख ---९ /१० /१९९०   वेळ १२-१० दुपारी  स्थळ --अ १६,५१  रे ७४,३५

हि धनु लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब शनी आहे . शनी शुक्राच्या नक्षत्रात आहे व चंद्राचा राशिस्वामी शुक्र च आहे ( चंद्र वृषभ रस रोहिणी नक्षत्रात ) म्हणजे कुंडलीची वेळ बरोबर आहे . 

कुंडली सोडवितेवेळी घेतलेले रुलिंग 

दि   २८ / १/ २०२१  वेळ १६-२०-०९

राहू * बुध , शनी , चंद्र , गुरु 

नियम ---दशम भावाचा सब २,६,१० या भाव पैकी चा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते सद्य हा जातक नोकरी करत आहे .म्हणून  नोकरी सोडण्यासाठी ३,५,९ पैकी भावाचा कार्येश असावा 

व्यवसाय करण्यासाठी दशम भावाचा सब २,६,७,१० भावाचा कार्येश असेल किंवा दशम भावाचं सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी जर चर राशीत असून ६,७ भावाचा कार्येश असेल जातक व्यवसाय करतो .

 या पत्रिकेत दशम भावाचा सब बुध आहे . बुध  रुलिंग मध्ये आहे 

बुद्धाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (9)   7 10     Venus-Yuti  (9)   6 (11)
It's N.Swami :-------- Moon:- (6)   8   
It's Sub :------------ Rahu:- (1)    Cusp Yuti: (2)      Rashi-Swami Saturn (1)   (2) (3)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (10)   9  Cusp Yuti: (10)       Saturn-Drusht  (1)   (2) (3)
Itself aspects :------ 4


 बुध २,६,१०,११ भाव बरोबरच ३, ९ भावाचा कार्येश आहे . म्हणजे सादर जातकाला नवीन नोकरी लागणार हे निश्चित सांगता येईल. आता केंव्हा लागेल यासाठी आपणाला महादशा अंतर्दशा पाहाव्या लागतील . बुध ७ भावाचा कार्येश नाही म्हणून सदर जातक व्यवसाय करू शकणार नाही. 

कुंडली सोडवितेवेळी गुरु मध्ये केतू ची अंतर्दशा चालू होती. परंतु कुंडलीचे लग्न धनु हे द्विस्वभावि  लग्न असल्यामुळे घटना उशिरा घडणार आहे म्हणून मी पुढील शुक्राची अंतर्दशेचा विचार करायचे ठरविले . गुरु शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (8)   1 (4)  Cusp Yuti: (8)     
It's N.Swami :-------- Saturn:- (1)   (2) (3)   
It's Sub :------------ Jupiter:- (8)   1 (4)  Cusp Yuti: (8)     
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (1)   (2) (3)   
Itself aspects :------ 2 12 4

गुरु  १,२,३,४,८ भावाचा कार्येश आहे . यामध्ये २,८ भाव अनुकूल आहे . ३ रा भाव नोकरी सोडण्यासाठी अनुकूल आहे . काही ज्योतिषी म्हणतात ८ भाव प्रतिकूल आहे . परंतु ८ भाव दशमापासून लाभ स्थानात आहे म्हणून ८ व भाव विचारात घ्यावयास काही हरकत नसावी अशे माझे मत आहे . ८ भाव अडथळे ,ताणतणाव निर्माण करेल पण पूर्णतः अशुभ नाही.

 PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 9   6 11  Cusp Yuti: (10)       Mercury-Yuti  9  7 10
It's N.Swami :-------- Moon:- (6)   8   
It's Sub :------------ Saturn:- 1   2 3   
It's Sub's N.Swami :-- Venus:- (9)   6 (11)  Cusp Yuti: (10)       Mercury-Yuti  (9)   7 10
Itself aspects :------ 4

शुक्र ६,९,१०,११  कार्येश आहे यापैकी ६,१०,११ नोकरी लागण्यासाठी अनुकूल आहे व ९ भाव नोकरी सोडण्यासाठी अनुकूल आहे . 

गुरु महादशा व शुक्र अंतर्दशे मध्ये २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली . परंतु यात ५ भाव आलेला नाही . या पत्रिकेत ५ भाव फक्त चंद्र च दाखवितो. म्हणून मी चंद्राची विदशा निश्चित केली . शिवाय रुलिंग मध्ये चंद्र आहेच . चंद्राचे कार्येशत्व हल्ल्याप्रमाणे ----

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 6   8   
It's N.Swami :-------- Mars:- (6)   (5) (12)   
It's Sub :------------ Jupiter:- (8)   1 (4)  Cusp Yuti: (8)     
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (1)   (2) (3)   
Itself aspects :------ 12

चंद्र १,२,३,५,६,८,१२ भावाचा कार्येश आहे यापैकी २,६,८ नोकरी लागण्यासाठी व ३,५,१२ नोकरी सोडण्यासाठी अनुकूल आहेत. 

गुरु महादशा शुक्र अंतर्दशा चंद्र विदशा चा कालावधी येतो ४ जानेवारी २०२२ ते २७ मार्च २०२२ 

वरील कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले . हा जरी कालावधी आपण ठरविला तरी ह्या कालावधीत ग्रहांचे गोचर अनुकूल असेल तरच घटना घडणार आहे म्हणून या कालावधीतील गोचर पहिले .

गोचर भ्रमण ---गुरु  हा मंद गतीचा ग्रह आहे  व शुक्र जलद गतीचा ग्रह आहे व चंद्र अतिशीघ्र गतीचा ग्रह आहे . . मंदगतीच्या ग्रहाचे सब मधील भ्रमण पाहावे व जलद गतीच्या ग्रहाचे नक्षत्रातील भ्रमण पाहावे लागेल . गुरु व  शुक्राचे सब व नक्षत्रातील भ्रमण पहिले असता ७ फेब्रुवारी २०२२ ते २७ मार्च २०२२ हा कालावधी नोकरी मिळण्यास अनुकूल होता. . या कालावधीत नोकरी लागेल  असे सांगितले .

१५ फेब्रुवारीला सादर जातकाचा फोन  आला आणि म्हणाला आपण म्हटल्याप्रमाणे मी आज नवीन नोकरीत रुजू होतो आहे . तो म्हणाला १९ जानेवारीला ऑफर लेटर आले व आज १५ फेब्रुवारीला मी जॉईन होत आहे . 

महाजनांनी मार्गदर्शन करावे 

शुभम भवतु !!!