कृष्णमूर्ति ज्योतिष: May 2019

Wednesday 22 May 2019

                                                              Case Study--69

 नोकरी , विवाह योग

                          फेसबुक वरील लेख वाचून  एका जातकाने मला फोन केला . मी ह्या अगोदर एका कंपनीमध्ये नोकरी करत होते पण ती कंपनी बंद पडली . आणि माझ्या बरोबर बऱ्याच लोकांना नोकरीवरून कमी केले तिने मला प्रश्न विचारला मला नोकरी केंव्हा मिळेल . घरचे सारखा आग्रह करत आहे लग्नाचे पहा . वय पण वाढत चालले आहे . माझा भाऊ , माझे लग्न झाल्याशिवाय तो करणार नाही म्हणतो. माझे नोकरी आणि विवाहाचे योग केंव्हा आहेत . मी म्हटले प्राधान्य कोणत्या गोष्टीला आहे  नोकरी कि विवाह ?. तेंव्हा ती म्हणाली आधी नोकरीचे योग पहा . तिने तिचे बर्थ डिटेल्स दिले . ते  खालील प्रमाणे
दि १ मार्च १९८६    सकाळी ११. १५       रे ७७,२० अ १९,०९
 हि  कुंडली वृषभ लग्नाची आहे
लग्नाचा सब शुक्र आहे व चंद्र तूळ राशीत राहू नक्षत्रात आहे
लग्नाचा सब शुक्र व चंद्र राशी स्वामी शुक्रच आहे . सब चंद्र संबंध आहे . म्हणजे कुंडलीची वेळ बरोबर आहे .

पत्रिकेत नोकरीचा योग पाहू ---दशमाचा सब २,६,१०,११ या पैकी भावाचा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या संयुक्त दशेमध्ये नोकरी लागेल.
दशमाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 10   8 11
It's N.Swami :-------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   7 12
It's Sub :------------ Rahu:- 12       Rashi-Swami Mars 7   7 12
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (10)   (1) 6  Jupiter-Drusht  (10)   (8) 11
Itself aspects :------ 4 2 6

दशमाचा सब गुरु ६,१० भावाचा कार्येश आहे म्हणजे नोकरी लागणार हे नक्की झाले आता केंव्हा लागणार यासाठी महादशा अंतर्दशा पाहू
१५ नोव्हेंबर २०१८ रोजी तिने प्रश्न विचारला तेंव्हा शनी चंद्र दशा चालू होती शनी चंद्र दशा जानेवारी २०१९ पर्यंत होती
शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (7)   (9) 10
It's N.Swami :-------- Saturn:- (7)   (9) 10
It's Sub :------------ Jupiter:- 10   8 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   7 12
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (10)   (1) 6  Jupiter-Drusht  (10)   (8) 11
Itself aspects :------ 1 9 4

४ पायरीवर राहू केतू येत असतील तर त्याचे नक्षत्र स्वामी पाहावा असे माझे गुरु श्री गोंधळेकर सर म्हणत असत.
शनी ६,१० ह्या अनुकूल भावाचा कार्येश आहे . तसेच कुंडलीचे लग्न वृषभ आहे म्हणजे स्थिर लग्न आहे म्हणून ह्या अंतर्दशेत घटना घडणार नाही  म्हणून मी पुढील अंतर दशा घेतली . पुढील अंतर्दशा मंगळाची आहे . मंगळाचे कार्येशत्व ----

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (7)   7 12
It's N.Swami :-------- Mercury:- (11)   (2) (5)
It's Sub :------------ Sun:- (10)  
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   7 12
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (10)   (1) 6  Jupiter-Drusht  (10)   (8) 11
Itself aspects :------ 1 10 2

मंगल २,६,१०,११ आपणाला हव्या असलेल्या सर्व भावाचा कार्येश   आहे याठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली यापुढील विदशा राहू ची आहे . राहूचे कार्येशत्व ---
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12       Rashi-Swami Mars 7   7 12
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (10)   (1) 6  Jupiter-Drusht  (10)   (8) 11
It's Sub :------------ Jupiter:- 10   8 11   
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   7 12
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (10)   (1) 6  Jupiter-Drusht  (10)   (8) 11
Itself aspects :------ 6

शनी मंगल राहू या दशेमध्ये म्हणजे १/२/१९ ते ३/४/१९ या कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले ती म्हणाली याअगोदर नाही का लागणार . मी म्हटले याच कालावधीत तू प्रयत्न करावे याच कालावधीत नोकरी लागेल . ती म्हणाली लग्नाचे योग्य कधी आहेत मी म्हटले नोकरी व लग्नाचे योग या कालावधीच्या पुढे मागे आहेत . विवाहासाठी हाच कालावधी येतो . कारण 
शनी७,
मंगळ २,५,७,८
राहू ७  चा कार्येश आहे हे सर्व भाव विवाहासाठी अनुकूल आहेत. 

एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात तीच फोन आला आणि म्हणाली मला नोकरी लागली . पहिल्यापेक्षा पगार कमी आहे पण नसण्यापेक्षा बरे आहे . आणि विवाहासाठी एक स्थळ पण आले आहे . 

७ चा सब शुक्र आहे 
PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (10)   (1) 6   
It's N.Swami :-------- Jupiter:- (10)   (8) 11   
It's Sub :------------ Ketu:- 6       Rashi-Swami Venus 10   1 6  Jupiter-Drusht  10  8 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   7 12

शुक्र ७,८ या अनुकूल भावाचा कार्येश आहे 

  शुभम भवतु !