कृष्णमूर्ति ज्योतिष: December 2019

Saturday 28 December 2019

Case  Study -150       

                                          दत्तक कन्या --जन्मवेळ काढणे 

                     एकत्र कुटुंब पद्धतीचे आताच्या काळात जवळ जवळ विसर्जन झाले आहे . प्रत्येक जण स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा गरजा वाढत चालल्या आहेत.   मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोघांनी पैसे कमविणे गरजेचे झाले आहे . सद्याचे कुटुंब बऱ्याच ठिकाणी त्रिकोणी च पाहायला मिळते आहे . म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी. क्वचित ठिकाणी दुसरी संधी घेण्याचा प्रयत्न दिसतोय. परंतु काही ठिकाणी संतती दत्तक घेण्याकडे कलही  दिसून येतोय. पण ह्यामुळे  एकगोष्ट कमी होत चाललेली आहे ती म्हणजे नाते . समजा   एखादा घरात फक्त मुलगी असेल तर भाऊ  नाही किंवा मुलगा असेल तर बहीण नाही त्यामुळे भविष्यकाळात मामा , मामी , काका ,काकी , आत्या , मावशी म्हणजे कोण ? यांच्या व्याख्या मुलांना शिकवाव्या लागणार आहेत. किंवा एकलुताएक  मुलगा,  मुलगी असेल तर मोठेपणी कोणीतरी आधार म्हणून जवळचे असे कोणी असणारच नाही . ह्याला ही एक अपवाद आहे स्वतःचा मुलगा असताना सुद्धा अनाथ आश्रमातून एक मुलगी दत्तक घेतली जाते. हि एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न दिसून येतो हि बाब खरोखरच कौतुकास्पद नक्कीच आहे . 
                                          बंगलोर स्थित एक स्त्री फोन वर बोलत होती .... माझ्या बहिणीला एक मुलगा आहे पण तरी सुद्धा तिने   एक मुलगी दत्तक घेतली आहे . तिची जन्मतारीख निश्चित आहे . पण तिची वेळ काही मिळू शकली नाही . दत्तक घेण्याची प्रोसेस आता ऑनलाइन झाली आहे . आम्ही एक वर्षांपूर्वी फॉर्म भरला होता. अगदी वर्षाच्या शेवटी संबंधित संस्थेकडून फोन आला . म्हणाले एक दोन वर्षाची मुलगी आहे . आम्ही प्रथम जाऊन  मुलीला पाहून आलो व १५ दिवसात दत्तक घेण्याची प्रोसेस पूर्ण करून मुलीला घरी,  घेऊन आलो. आपला लेख वाचनात आला म्हणून मी तुमच्याशी संपर्क करीत आहे . मुलीचा जन्मस्थळाची अचूक माहिती कळली नाही पण ज्याठिकाणाहून आणली त्याच्या जवळच्या खेड्यात तीचा जन्म झाला आहे एवढे कळले एवढ्या माहितीवरून तुम्ही तिची पत्रिका काढू शकाल का ? असे मला विचारले . मी  म्हटले ,. मी प्रयत्न करतो . मनात म्हटले रुलिंग प्लॅनेट ने सहकार्य केले तर मी हि पत्रिका काढू शकेन . त्यांनी दिलेली माहिती खालीलप्रमाणे ---

दि २३ फेब्रुवारी २०१५  वेळ --------- स्थळ अ  १७,१७   रे ७४,१२

कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्म वेळ  ठरविता येते . पण रुलिंग प्लॅनेट हे दैवी मार्गदर्शन आहे हे सगळ्यांनाच लाभते असे नाही. बऱ्याच वेळा रुलिंग प्लॅनेट ने मला सहकार्य केले आहे . मी ज्यावेळी कुंडली काढायचे ठरविले तेंव्हा खालील रुलिंग होते

दि २४/१२/२०१९  वेळ --१६-००-११

लग्न नक्षत्र स्वामी रवी , लग्नस्वामी  -शुक्र , नक्षत्र स्वामी शनी , राशी स्वामी- मंगळ , वार स्वामी--मंगळ

 रवी* शुक्र, शनी, मंगळ, मंगळ

रुलिंग मध्ये रवी आहे याचा अर्थ जन्म दिवसा  झाला आहे हे निश्चित . यापूर्वीच्या लेखात रुलिंगमध्ये चंद्र आला होता म्हणून आपण रात्र गृहीत धरली होती . आता दिवस कोठपासून कोठ पर्यंत घ्यायचा हे ठरवावे लागेल. सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत च्या कालावधीला दिवस म्हणता येईल. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी जन्मठिकाणी सूर्योदय सकाळी ६-५५-०१ आहे व सूर्यास्त १८-३७-४८ पर्यंत आहे  याच्या मधील काळ म्हणजे एकूण ११ तास ४२मिनिटे आहे एकूण अंदाजे सहा लग्ने येतील आता पंचागामध्ये या वेळेला कोणती लग्ने  येतात ते पाहू
    १) कुंभ --६-२३-००७ ते ८-०१-०५   स्वामी शनी
    २) मिन--८-०१-०५ ते ९-३६-४३      स्वामी गुरु
    ३) मेष --९-३६-४३ ते ११-२१-१४    स्वामी मंगळ
    ४) वृषभ --११-२१-१४ ते १३-२१-३५  स्वामी शुक्र
    ५) मिथुन --१३-२१-३५  ते १५-३३-५३ स्वामी बुध
    ६) कर्क ---१५-३३-५३ ते १७-४६-११  स्वामी चंद्र
    ७) सिंह ---१७-४६-११ ते १९-५३-०३  स्वामी रवी

दि २३ फेब्रुवारी २०१५ रोजी वरील कालावधीत एकूण सात लग्ने येतात . यापैकी कुंडलीचे एकच लग्न असणार आहे . आलेल्या  लग्न स्वामींची तुलना रुलिंग प्लॅनेट बरोबर केली तर --- रुलिंग मध्ये गुरु बुध चंद्र नाहीत . म्हणजे मिन , मिथुन  व कर्क लग्न असणार नाही . आता शिल्लक राहिली  कुंभ, मेष , वृषभ, सिंह .                                        
        कुंभ, मेष , वृषभ, सिंह .
                     कुंभ (शनी ) , मेष (मंगळ ) वृषभ (शुक्र ), सिंह ( रवी ) सर्व राशी स्वामी रुलिंग प्लॅनेट मध्ये आहेत या पैकी एक लग्न असणार हे नक्की .

                     दत्तक कन्येचे आपल्याला लग्न , लग्न नक्षत्र , सब व सब सब ठरवायचे आहे . रुलिंग प्लॅनेट मधील ग्रहांचा विचार करू.------
                        १)  यामध्ये रवी लग्न नक्षत्र स्वामी आहे . म्हणून सिंह लग्नाचा विचार प्रथम करू . सिंह राशीमध्ये केतू शुक्र व रवीची नक्षत्रे आहेत . यापैकी शुक्र व रवी रुलिंग मध्ये आहेत. परंतु रवी दोनदा आलेला नाही म्हणून सिंह लग्न  रवी नक्षत्र घेता येणार नाही . म्हणून सिंह रास शुक्र नक्षत्र घ्यावे लागेल. शनी नक्षत्र स्वामी आहे म्हणून सब शनी घ्यावा लागेल व सब सब म्हणून मंगळ घ्यावा लागेल . सिंह रास शुक्र नक्षत्र शनी सब व मंगळ सब सब , जेंव्हा उदयास येईल त्यावेळी दत्तक कन्येचा जन्म असेल . उप उपचे कोष्टक वापरले तर २३ अंश २० कला २५ विकला येतात. या अंशावरून कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून वेळ येते १९-२५-१४ . हि वेळ सूर्यास्तानंतर ची आहे म्हणून हि वेळ आपणाला घेता येणार नाही. सिंह लग्न असू  शकत नाही
                      २) त्यापुढील शुक्राचा विचार करू वृषभ राशीमध्ये रवी चंद्र मंगळा ची नक्षत्रे आहेत. यापैकी रवी मंगल रुलिंगमध्ये आहेत. लग्न वृषभ नक्षत्र रवी घेतले तर मंगळा चा सब उपलब्ध नाही. म्हणून वृषभ लग्न रवी नक्षत्र मंगल सब घेता येणार  नाही
                      ३) आता उलट विचार  करू वृषभ लग्न , मंगल नक्षत्र  घेतले तर रवीचा सब उपलब्ध नाही म्हणून वृषभ लग्न मंगल नक्षत्र रवी सब घेता येत नाही .
                      ४) वृषभ लग्न मंगल नक्षत्र सब म्हणून शनी उपलब्ध आहे. म्हणून वृषभ लग्न मंगळ नक्षत्र शनी सब व रवी सब सब घेऊन अंश  किती येतात पाहू. अंश येतात २९-०४-३०. यावरून कॅम्पुटर मधील ट्रान्झिटऑपशन  वापरून वेळ येते  १३-१७-३८  दुपारी
                      ५) अजून एक पर्याय आहे . वृषभ लग्न रवी नक्षत्र शनी सब मंगल सब सब असे सुद्धा होऊ शकेल हि साखळी वापरून वेळ येते ११-३८-०१  सकाळी
                      ६) आपल्याला दोन वेळा मिळाल्या आहेत . यापैकी एक वेळ नक्की असणार आहे . पण कसे ठरवायचे ? ज्या पत्रिकेत  दत्तक जाण्याचा योग्य असेल ती पत्रिका खरी . आणि त्या पत्रिकेची वेळ हीच दत्तक कन्येची जन्म वेळ असणार.
                 .
        दत्तक जाण्याचा योग्य --संदर्भ-- ज्योतिषांचा संदर्भ ग्रंथ --नेमीचंद सोनार पान  नंबर १५६ क्रं ४६

                           चतुर्थाचा सबलॉर्ड हा द्विस्वभाव राशीत (मिथुन, कन्या, धनु , मिन ) असला पाहिजे किंवा बुध असला पाहिजे किंवा बुधाशी संबंधित असला पाहिजे  आणि अष्टमाचा कार्येश असेल तर ते मूल  दत्तक जाते .
  ( या संदर्भात चंद्र बुधाची गोष्ट आहे )
द्विस्वभाव राशीत या मागील अर्थ --त्या मुलाच्या दोन आया म्हणजे एक जन्म देणारी आई ,  दुसरी पालन पोषण करणारी आई असणे आणि अष्टमाचा कार्येश असला पाहिजे  कारण अष्टम स्थान हे दत्तक घरी वारसा प्राप्त होणे आणि मूळ जन्मदात्यापासून फारकत. या दोन्ही कारणा साठी तो अष्टमाचा कार्येश असला पाहिजे.


दि   २३/२/२०१५  वेळ ११-३८-०१  स्थळ अ  १७,१७   रे ७४,१२ हि वेळ वापरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली    या पत्रिकेत चतुर्थाचा सब चंद्र मेष राशीत आहे मेष रास चर रास  आहे द्विस्वभाव नाही .  याठिकाणी पहिला भाग पूर्ण होत नाही पण तो अष्टमाचा कार्येश आहे . येथे चंद्र अष्टमाचा कार्येश आहे पण चंद्र द्विस्वभाव राशीत नाही. म्हणून हि वेळ असणार नाही . हे नक्की सांगता येईल . 

दि  २३/२/२०१५    वेळ- १३-१७-३८ दुपारी    स्थळ अ  १७,१७    रे ७४,१२

या पत्रिकेत चतुर्थाचा सब राहू आहे राहू कन्या राशीत आहे कन्या हि द्विस्वभाव रास आहे राहू बुधाचे प्रतिनिधित्व करतो . कन्या राशीचा स्वामी बुध  अष्टमात ( भावचलित कुंडलीत )आहे या ठिकाणी दोन्ही गोष्टीची पूर्तता झाली आहे . म्हणून दत्तक कन्येची वेळ दुपारी १३-१७-३८ आहे हे नक्की सांगता येईल. अशा प्रकारे आपण रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने दत्तक कन्येची वेळ निश्चित केली . 

                  अजून सब चंद्र संबंध थेअरी प्रमाणे ह्या कुंडलीची सत्यता पडताळून पाहू.खरे तर याठिकाणी हि थेअरी लागू पडणार नाही. कारण मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे . त्यांची  स्वतः ची नाही. तरीसुद्धा ह्या पद्धतीने तिची वेळ बरोबर आहे का ते पाहण्याचा प्रयत्न केला आहे .

१) दत्तक मुलीचे वडील-- चंद्र मिथुन (बुध ) आद्रा (राहू ) नक्षत्र
२) दत्तक मुलीची आई ---चंद्र तुला (शुक्र) विशाखा (गुरु ) नक्षत्र
३) दत्तक मुलीचा भाऊ --चंद्र सिंह (रवी ) पूर्वा ( शुक्र ) नक्षत्र

दत्तक मुलीच्या पत्रिकेत लग्नाचा सब शनी वृश्च्छिक ह्या मंगळाच्या राशीत आहे व चंद्र राशिस्वामी मंगल च आहे
मुलीचे नवम भावाचा सब ( वडील) बुद्ध आहे तो वडिलांच्या पत्रिकेत चंद्राचा राशिस्वामी आहे
मुलीचे चतुर्थ भावाचा सब राहू आहे राहू बुधा चे प्रतिनिधित्व करतो आईच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्रस्वामी गुरुची दृष्टी बुधवार आहे .
मुलीच्या पत्रिकेत लाभाचा सब ( थोरला भाऊ ) रवी आहे भावाच्या पत्रिकेत चंद्र राशिस्वामी रवी आहे .
अशाप्रकारे सब चंद्र संबंध पद्धतीने सुद्धा पत्रिकेची वेळ बरोबर  सिद्ध होतेय
                                अजून एक प्रश्न बाकी राहतो तो म्हणजे ज्यांनी कन्या दत्तक घेतली आहे त्यांच्या पत्रिकेत दत्तक घेण्याचा योग्य आहे का ? हे पाहायला पाहिजे .  
दत्तक घेण्याचा नियम --पंचमाचा सबलॉर्ड पंचमाचा कार्येश असून चतुर्थाचा हि कार्येश असेल तर ती व्यक्ती एखादे मूल  दत्तक घेते . 

दि ----------- १२-०८ am   स्थळ रे ७२,४९  अ  १८,५८

या पत्रिकेत पंचमाचा सब रवी आहे आणि रवीचे कार्येशत्व खालील प्रमाणे 

 PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 4   7 
It's N.Swami :-------- Mars:- (3)   3 (10) 
It's Sub :------------ Mercury:- (4)   5 (8)     Saturn-Drusht  (7)   (1) (12)
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (5)    Cusp Yuti: (6)      Rashi-Swami Moon (9)   (6)
Itself aspects :------ 11

पंचमाचा सब रवी ४ व ५ दोन्हीचा कार्येश आहे .


शुभम भवतु  !!!


Monday 16 December 2019

Case  study --132 

 जन्मवेळ काढणे


                                    एक आजी ... वय वर्षे ७०.... फोनवर बोलत होत्या . मला म्हणाल्या आयुष्याच्या नाटकाचे दोन अंक संपले आहेत . तिसरा अंक सुरु झाला आहे . या ७० वर्षात अनेक चढ उतार आले . अनेक पावसाळे पाहीले . येणाऱ्या प्रत्येक समस्यांना हे माझेच कर्म आहे समजून स्वीकारत गेले . पुढे जात राहिले . अनेक समस्यांना तोंड देत इथपर्यंत आले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात शिक्षिकेची नोकरी केली ती पण दोन तीन वर्षे केली नंतर फक्त शिकवण्या घेत राहिले . नंतर लग्न झाले . मला दोन मुले आहेत . दोन्ही मुलांची लग्ने  झाली आहेत . दोन सुना आल्या . दोन्ही सुन्या खूप चांगल्या आहेत . एक नातू आहे .नातवा बरोबर वेळ कसा जातो ते कळत  नाही. आता कोणतीही चिंता नाही देवधर्म चालू आहे . अधून मधून फेसबुक पाहत असते . त्यात तुमचा जन्मवेळ निश्चिती चा लेख पाहिल्यानंतर मलाही वाटायला लागले कि आपलीसुद्धा कुंडली असावी. पण मला तारीख फक्त माहित आहे आणि ती खरी आहे . पण वेळ माहित नाही . आणि आता नात्यात वेळ सांगणारे  वयस्कर असे कोणी राहिले नाही. आयुष्यात कधी भविष्य पहिले नाही. पाहावे असे कधी वाटले नाही . मला माझी रास सुद्धा माहित नाही . त्यामुळे मला माझी कुंडली काढता येत नाही. तर माझी कुंडली तुम्ही काढू शकाल का ? असा प्रश्न त्यांनी विचारला . मी म्हटले निदान वेळ शब्दात तरी , म्हणजे सकाळ दुपार संद्याकाळी, रात्री पहाटे असे काही सांगता येईल का ? त्या म्हणाल्या ते हि मी सांगू शकत नाही. फक्त तारीख व स्थळ निश्चित आहे . मी म्हटले , बर .... मी प्रयत्न करतो . तुमची तारीख व स्थळ  मला सांगा . त्यांनी खालीलप्रमाणे सांगितली .

दि १२ /७ /४९  वेळ --माहित नाही  स्थळअ २०,५६ रे ७७,४५

कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ ठरविता येते . पण रुलिंग प्लॅनेट हे दैवी मार्गदर्शन आहे हे सगळ्यांनाच लाभते असे नाही. मी ज्यावेळी कुंडली काढायचे ठरविले तेंव्हा खालील रुलिंग होते

 दि १५/११/२०१९  वेळ १२-२२-४८
लग्न नक्षत्रस्वामी चंद्र , लग्न -शनी , नक्षत्रस्वामी मंगल , राशी स्वामी बुध ,वाराचा  स्वामी शुक्र

म्हणजे चंद्र * शनी,मंगळ , बुध , शुक्र

रुलिंग मधील ग्रहांचा विचार केला तर ...
शनी---मकर व कुंभ
मंगळ ---मेष व वृश्चिक
बुद्ध ---मिथुन व कन्या
शुक्र --- वृषभ व तूळ

               मकर मध्ये रवी चंद्र मंगळ हि नक्षत्रे आहेत व कुंभ मध्ये मंगळ राहू गुरु हि नक्षत्रे आहेत यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे मकर किंवा कुंभ असू शकते . मेष राशी मध्ये केतू शुक्र रवी नक्षत्रे आहेत व वृश्चिक मध्ये गुरु शनी बुध आहेत यापैकी शुक्र व शनी बुध हि नक्षत्रे आहेत . म्हणजे मेष व वृश्चिक असू शकते . मिथुन राशी मध्ये मंगळ राहू गुरु हि नक्षत्रे आहेत व कन्या राशी मध्ये रवी चंद्र मंगल हि नक्षत्रे आहेत यापैकी  मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे मिथुन कन्या यापैकी एक असू शकते . वृषभ राशीमध्ये रवी चंद्र मंगळ हि नक्षत्रे आहेत व तुला राशी मध्ये मंगळ राहू गुरु हि नक्षत्रे आहेत . यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे वृषभ किंवा तुला असू शकते . थोडक्यात हि आठ हि लग्ने  असू शकतात . यापैकी कोणते तरी एकच लग्न असणार आहे . ते कसे ठरवायचे हा प्रश्न पडला . शेवटी लग्न नक्षत्र स्वामी चा विचार करायचे ठरविले लग्न नक्षत्र स्वामी चंद्र आहे . रुलिंग मध्ये ज्यावेळी चंद्र येतो त्यावेळी जन्म रात्रीचा असतो आणि रुलिंग मध्ये रवी असेल तर जन्म दिवसा  असतो. परंतु समजा  रुलिंग मध्ये रवी व चंद्र दोन्ही असतील तर ..... इथे श्रेष्ठ कोण आहे ते पाहावे लागेल. जर रवी श्रेष्ठ असेल आणि चंद्र दुसऱ्या प्रतीचा असेल तर संध्याकाळी जन्म असेल . आणि चंद्र रवी पेक्षा श्रेष्ठ असेल तर जन्म पहाटेचा असेल . आता एक आपल्याला कळले आहे कि जन्म रात्रीचा आहे .

आता रात्र म्हणजे कोठून कोठपर्यंत घ्यायची हे ठरवावे लागेल. रात्र म्हटली कि संध्याकाळी ७-३० ते पहाटे ३-० वाजेपर्यंत च्या काळाला रात्र म्हणता येईल परंतु आजी म्हणतात तारीख १२/७/४९ हि नक्की आहे . याचा अर्थ रात्री १२ ते ३ हा कालावधी आपणाला घेता येणार नाही . कारण रात्री १२ नंतर तारीख बदलणार आहे . म्हणून जन्म वेळ ठरविण्यासाठी आपणाला संध्याकाळी ७-३० ते रात्री १२ वाजेपर्यंत चा कालावधी घ्यावा लागेल. या कालावधीत पंचागामध्ये कोणती लग्ने येतात ते पाहू . ती खालीलप्रमाणे आहेत .

मकर  १९-१२-४१ ते २१-०१-२६              स्वामी शनी
कुंभ -- २१-०१-२६ ते २२-३६-४१            स्वामी  शनी
मिन -- २२-३६-४१ ते ००-०९-११            स्वामी  गुरु

वरीलपैकी फक्त शनी रुलिंग मध्ये आहे . याचा अर्थ मकर किंवा कुंभ लग्न असले पाहिजे . मकर राशी मध्ये उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा हि रवी चंद्राची मंगळाची  नक्षत्रे आहेत व कुंभ राशी मध्ये धनिष्ठा शततारका पूर्वाभाद्रपदा हि मंगल राहू गुरुची नक्षत्रे आहेत. रुलिंग मध्ये मंगल आहे म्हणजे मकर किंवा कुंभ यापैकी एक लग्न असणार . पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला याव्यतिरिक्त कोण आहे ते पाहू . रुलिंग मध्ये चंद्र व राहू आहे ( बुधा च्या राशीत राहू आहे ) चंद्र लग्न नक्षत्रस्वामी आहे व राहू तिसऱ्या प्रतीचा आहे लग्न नक्षत्रस्वामी श्रेष्ठ म्हणून कुंडलीचे लग्न मकरच असले पाहिजे . हे निश्चित पणे सांगता येईल.

 मकर लग्न निश्चित झाले / आता नक्षत्र स्वामी ठरवू . रुलिंग मध्ये शिल्लक राहिले मंगल , राहू व शुक्र यापैकी मंगळ नक्षत्र स्वामी आहे म्हणून नक्षत्र मंगळाचे घ्यावे लागेल. आता सब व सब सब ठरवू रुलिंग मध्ये शिल्लक राहिले राहू व शुक्र . शुक्र हा वाराचा स्वामी आहे म्हणून सब राहू घ्यावा लागेल व शुक्र सब सब घ्यावा लागेल.  लग्न मकर  नक्षत्र मंगल  सब राहू व सब सब शुक्र  जेंव्हा उदयास येईल त्यावेळी आजीचा जन्म झाला असे म्हणता येईल.लग्न किती अंशावर आहे हे ठरविण्यासाठी आपणाला कृष्णमूर्तीचे उप उप चे कोष्टक पाहावे लागेल . त्या कोष्टकावरून लग्नाचे अंश येतात २५ अंश ,३३ कला , ४० विकला . येथूनपुढे कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून या अंश कला विकलांना वेळ किती येते ते पाहता येईल. वेळ येते रात्री २०-४६-२४. अशाप्रकारे आजींची जन्मवेळ येते रात्री ८-४६-२४. आता काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही ते पाहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील घटना तपासून पाहता येतील.

१) विवाह  --२३ मे  १९७४
२) प्रथम संतती ---३ एप्रिल १९७६
३) दुसरा मुलगा ---२१ नोव्हेंबर १९८०

१) विवाह   २३ मे  १९७४

विवाहाच्या वेळी गुरु महादशा गुरु अंतर दशा व शनी विदशा चालू होती .
विवाह सप्तमाचा  सब २,७,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये विवाह होतो .

गुरु ---२,६,११,१२ चा कार्येश आहे
शनी ---१,५,७,८ चा कार्येश आहे

विवाहाच्या वेळी २,५,७,८,११ भाव कार्येश होते .

२) प्रथम संतती ---३ एप्रिल १९७६

प्रथम संततीच्या वेळी गुरु शनी शनी दशा चालू होती .
संतती --पंचमाचा सब २,५,११ चा कार्येश असेलतर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये संतती होते .
गुरु २,६,११,१२ चा कार्येश आहे
शनी ---१,५,७,८ चा कार्येश आहे

प्रथम संततीच्या वेळी २,५,११ भाव कार्येश होते.

३) दुसरा मुलगा ---२१ नोव्हेंबर १९८०
दुसऱ्या संततीच्या वेळी गुरु केतू केतू दशा चालू होती

गुरु ---२,६,११,१२ चा कार्येश आहे
केतू ---१,३,४,५,७,८,१० चा कार्येश आहे

द्वितीय संततीच्या वेळी २,३,५,७,११ कार्येश होते ७ स्थान हे द्वितीय संततीचे स्थान आहे .

शुभम भवतु !!!