कृष्णमूर्ति ज्योतिष: September 2019

Sunday 22 September 2019

स्वप्न --एम एस होण्याचे

                            ग्वाल्हेर हुन एका आईचा फोन .. माझा मुलगा इंजिनिअर झाला आहे . त्याला परदेशात जाऊन एम एस करायचे आहे . आणि माझी पण खूप इच्छा आहे त्याने एम एस करावे . माझ्या मुलाचा ज्योतिषावर विश्वास नाही. म्हणून त्याच्या परस्पर मी तुम्हाला विचारते कि , माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात केंव्हा जाईल. ? आईने असा प्रश्न विचारला आहे म्हणजे तिला , मुलगा उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणार आहे हे नक्की. फक्त तो केंव्हा जाणार आहे हे तिला जाणून घ्यायचे आहे . सद्याच्या काळात जग फार जवळ आलेले आहे . परदेशात जायचे हे काही अप्रुप  राहिलेले नाही. परदेशात कोण  जाते , परदेशात वेगवेगळ्या कारणासाठी जातात. कोणी नोकरीसाठी जातात. कोणी कंपनी तर्फे परदेशात जातात. कोणी सहल म्हणून टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून जातात. कोणी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. कोणी औषधोपचार साठी परदेशात जातात. कोणी व्यवसाय निमित्त परदेशात जातात. अशी वेगवेगळी कारणे असू शकतात. कारणाशिवाय कोणी परदेशी  जात नाही.

                                                     कृष्णमूर्ती मध्ये परदेशी जाण्यासाठीचा नियम --व्यय भावाचा सब ३,९,१२ भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ या भावाच्या कार्येश दशेत व्यक्ती परदेशी जाते . शिक्षणासाठी ३,९,१२ भावाबरोबर ४,९,११ हे भाव असले पाहिजेत . नोकरीसाठी ३,९,१२ बरोबर २,६,१० भाव असले पाहिजेत. व्यवसायासाठी ३,९,१२ बरोबर ६,७,१० भाव असले पाहिजेत . सहल म्हणून जायचे असेल तर ३,९,१२ भावाबरोबर ५,११ भाव असले पाहिजेत.
                                         गोपनीयतेच्या कारणास्तव याठिकाणी मी संबंधित जातकाचे बर्थ डिटेल्स दिले नाहीत . ज्यांना पत्रिकेची पडताळणी करावयाची असेल तर त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा.

जातक दि ---  वेळ -- स्थळ रे ७३,१८ अ  १६,५९

हि कर्क लग्नाची कुंडली आहे
या पत्रिकेत लग्न भावाचा सब मंगल आहे व चंद्र नक्षत्र स्वामी मंगल च आहे . तसेच चतुर्थाचा सब शनी आहे , शनी मिन राशीत बुधा च्या नक्षत्रात आहे आईच्या पत्रिकेत चंद्र वृश्च्छिक राशीत गुरूच्या नक्षत्रात आहे सब शनीचा राशी स्वामी गुरु आहे जो आईच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्र स्वामी आहे जातकाच्या पत्रिकेत नवम  (वडील) भावाचा सब शुक्र आहे वडिलांच्या पत्रिकेत चंद्राचा राशी स्वामी शुक्रंच   आहे  म्हणजे दिलेली कुंडली बरोबर आहे आता आपण मूळप्रश्ना कडे वळू -----

१)   व्यय भावाचा सब  बुध  आहे .बुधाचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 5   3 12     Moon-Drusht  11  1
It's N.Swami :-------- Ketu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Saturn (8)   7 8
It's Sub :------------ Mars:- 6   5 10     Venus-Yuti  6  4 11
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   (2)  Cusp Yuti: (5)

बुध ३,९,१२ पैकी कोणत्याही भावाचा कार्येश नाहीत्याच बरोबर ४,११ भाव सुद्धा नाहीत सादर जातक परदेशी जाऊ शकत नाही. व्यय भावाचा सब जर नकार दर्शवित असेल तर दशा पाहण्याचा प्रश्न येत नाही. .हि गोष्ट मुलाच्या आईला सांगणे हि अवघड जबाबदारी माझ्यावर आली. सर्वच जातकांना प्रश्नाचे उत्तर ज्योतिषाने सकारात्मक द्यावे हि अपेक्षा असते . पण आयुष्यात सर्वच गोष्टी मानसारखया घडतात. का ? पण  मला वाटते वास्तव काय आहे ते स्पष्ट सांगावे नाहीतर ज्योतिष शात्राशी  प्रतारणा केल्यासारखे होईल.
याची खात्री करण्यासाठी मी थोडे वेगळ्या पद्धतीने विचार  करायचे ठरविले. आईच्या पत्रिकेत मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल का ? हे पाहण्याचे ठरविले. .

२)  आईची पत्रिका  दि ---- वेळ ---  स्थळ   रे ७३,१८ अ  १६,५९

हि मिन लग्नाची पत्रिका आहे .लग्नाचा सब शुक्र आहे शुक्र मिन राशीत शनी नक्षत्रात व चंद्र वृश्च्छिक राशीत गुरु नक्षत्रात सब चा राशी स्वामी गुरु आहे जो चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे . पंचमाचा सब राहू आहे राहू मेष या मंगळाच्या राशीत शुक्राच्या नक्षत्रात . पंचमाचा सब राहूच राशी स्वामी मंगल जो मुलाच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्रस्वामी आहे . सप्तमाचा सब शुक्र आहे जो पतीच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी आहे म्हणजे आईची पत्रिका बरोबर आहे .

पंचमात कर्क रास आहे. आईच्या पत्रिकेत पंचम स्थान हे मुलाचे लग्न स्थान होईल. म्हणून पंचम हे लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली.
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये व्यय भावाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 8   4 11  
It's N.Swami :-------- Saturn:- (8)   (7) 8     Jupiter-Drusht  (12)   (6) 9
It's Sub :------------ Rahu:- 9       Rashi-Swami Mars 3   5 10
It's Sub's N.Swami :-- Venus:- (8)   4 (11)  
Itself aspects :------ 3

शुक्र शनी नक्षत्रात गुरूने दृष्ट आहे म्हणून १२ भावाचा कार्येश आहे परंतु ३-४ पायरीला पूर्णपणे अशुभ आहे
सबब सादर जातक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकत नाही. दोन्ही पत्रिकेत एक वाक्यात येतेय.

३)  नंबर कुंडली प्रमाणे प्रयत्न करून पाहण्याचे ठरविले. जातकाचे आईना सांगितले मनामध्ये माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी केंव्हा जाईल असा विचार करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा . त्यांनी १९१ हि संख्या दिली.  नंबर १९१ वरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली. हि मकर लग्नाची कुंडली आहे चंद्र लग्नातच आहे म्हणजे प्रश्न मनापासून विचारला आहे . या पत्रिकेत पंचम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली

फिरवून घेतलेल्या कुण्डलिमध्ये व्यय भावाचा सब राहू आहे राहूचे कार्येशत्व खालील प्रमाणे


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   2 (5)  Saturn-Drusht  (8)   9 (10)
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   8 (11)     Mars-Drusht  (4)   7 (12)
It's Sub :------------ Jupiter:- 7   8 11     Mars-Drusht  4  7 12
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   2 (5)     Venus-Yuti  (4)   (1) (6)
Itself aspects :------ 8

व्यय भावाचा सब दुसऱ्या पायरीला १२ भावाचा कार्येश आहे  परंतु ३-४ पायरीला फक्त ४ भावाचा कार्येश आहे उच्च शिक्षणासाठी ९  भाव आवश्यक आहे . तो नाही .

येथे सुद्धा उत्तर नकारात्मक आले.

४) शेवटचा पर्याय म्हणून मी वडिलांची पत्रिका पहायचे ठरविले . वडिलांच्या पत्रिकेत मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी केम्व्हा जाईल हे पाहायचे ठरविले .

 दि ----- वेळ---- स्थळ रे ७२,५८ अ १९,१३

कृष्णमूर्ती मध्ये प्रथम मुलाचा विचार लाभ स्थानावरून  करतात म्हणून लाभ स्थान लग्न स्थान  धरून कुंडली फिरवून घेतली.फिरवून घेतलेल्या कुंडली मध्ये व्यय भावाचा सब राहू   आहे . राहू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे




PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 11     Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury 1   2 11
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   5 (8)  Cusp Yuti: (8)       Mars-Drusht  (1)   (4) (9)  Saturn-Drusht  (6)   6 7
It's Sub :------------ Mercury:- 1   2 11  
It's Sub's N.Swami :-- Sun:- (12)   1     Venus-Yuti  (12)   (3) (10)
Itself aspects :------ 5



राहू ३,  ९,  १२ अनुकूल भावाचा कार्येश आहे त्याच बरोबर ९,११ अनुकूल भावाचा कार्येश आहे . वडिलांच्या पत्रिकेतून मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार असा निष्कर्ष निघतो . आता पर्यंत आपण एकूण ४ पत्रिकांचा अभ्यास केला पैकी ३ पत्रिकेत नकार आलेला आहे व एका पत्रिकेत होकार आलेला आहे . म्हणजे टक्केवारीत म्हणायचे झाले तर २५ टक्के शक्यता आहे.

महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा .

शुभम भवतु !!!

Thursday 5 September 2019

केस --93 घराचे स्वप्न  ---

मुंबई हून एका जातकाचा फोन . म्हणाले सर, एका अपार्टमेंट मध्ये माझा फ्लॅट होता. हा फ्लॅट मी गुंतवणूक म्हणून खरेदी केला होता . मी त्याठिकाणी राहत नव्हतो . आमच्यासारखेच अजून दोन अपार्टमेंट होती. प्रत्येक अपार्टमेंट मध्ये १०-११ फ्लॅट होते . एका बिल्डरने तीनही अपार्टमेंट रिडेव्हलोप   करण्याचा प्रस्ताव मांडला सर्वच फ्लॅट धारकांनी विचारविनिमय करून अपार्टमेंट रिडेव्हलोप करण्यासाठी खाली केले . फ्लॅट तयार होईपर्यंत बिल्डर सर्वानाच घरभाडे देत होता. तीनही अपार्टमेंट त्याने पाडून टाकली . सद्य जागा पूर्ण रिकामी आहे . अद्याप त्याठिकाणी काहीही बांधकाम केलेले नाही. ह्या गोष्टीला पाच वर्षे झाली . आणि गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून घरभाडे द्यायचे बंद केले आहे . आयुष्यभराची कमाई  फ्लॅट मध्ये घातली होती. आता आम्हाला काळजी वाटायला लागली आहे . आमचा फ्लॅट आम्हाला मिळेल का असा प्रश्न त्यांनी मला विचारला मी म्हटले हाच विचार मनात करून १ ते २४९ यापैकी एक संख्या मला सांगा . त्यांनी विचार करून २५ हि संख्या सांगितली
२५ या संख्येवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . हि कुंडली वृषभ या स्थिर लग्नाची आहे .
दि ५ /९ / २०१९ वेळ १७-४८-५८ फलटण .

रुलिंग प्लॅनेट

राहू * शनी , शनी , मंगळ , गुरु

आता मनातील विचार जुळतो का ते पाहू ---
चंद्र सप्तमात भावचलित कुंडलीत चतुर्थेश  आहे चंद्राचे कार्येशत्व

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (7)   4  
It's N.Swami :-------- Saturn:- (8)   (10) (11)     Ketu-Yuti  (8)    Rahu-Drusht  (2) 
It's Sub :------------ Sun:- (4)   (5)     Mars-Yuti  (4)   7 8  Mercury-Yuti  (4)   (3) (6)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (4)   (1) 2  Cusp Yuti: (5)    
Itself aspects :------ 1

चंद्र ४,११ भावाचा कार्येश आहे अनुकूल आहे. त्याच बरोबर चंद्र    ५ ,६, ८ , १०  या विरोधी भावाचा कार्येश प्रश्नाचा रोख बरोबर आहे                                                                                                                                                                                                                                                                                                        नियम -- चतुर्थाचा सब ,किंवा त्याचा नक्षत्रस्वामी  वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसेल आणि  ४. ११, १२ भावांचा कार्येश असून मंगल शनी संबंध असेल तर ४,११,१२ भावांच्या कार्येश दशेत फ्लॅट मिळेल                       त्याच बरोबर लाभाचा सब लग्न भावाचा कार्येश असेल तर जातकाची इच्छापूर्ती होईल .
 या दोन नियमांचा वापर आपण करणार आहोत.

या कुंडलीत चतुर्थाचा सब   रवी आहे रवीचे कार्येशत्व ----                                                                                                                                                                                                                                                      PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (4)   (5)     Mars-Yuti  (4)   7 8  Mercury-Yuti  (4)   (3) (6)
It's N.Swami :-------- Venus:- (4)   (1) 2  Cusp Yuti: (5)    
It's Sub :------------ Rahu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)  Saturn-Drusht  (8)   (10) (11)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (9) (12)  
Itself aspects :------ 10
                                                                                                                                                                        रवी ४,११, १२  भावाचा कार्येश आहे   रवी शनी मंगळाशी स,बांधीत आहे .    
लाभाचा सब लग्नाचा कार्येश होतोय का ते पाहू ...
लाभाचा सब बुद्ध आहे बुद्धाचे कार्येशत्व ----

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 4   3 6     Mars-Yuti  4  7 8  Sun-Yuti  4  5
It's N.Swami :-------- Venus:- (4)   (1) 2  Cusp Yuti: (5)    
It's Sub :------------ Rahu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)  Saturn-Drusht  (8)   (10) (11)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (9) (12)  
Itself aspects :------ 10

बुध शुक्रच्या नक्षत्रात असून लग्नाचा कार्येश आहे म्हणजे जातकाची इच्छापूर्ती होणार .   याचा अर्थ फ्लॅट ताब्यात मिळणार .    आता फ्लॅट केंव्हा मिळणार त्यासाठी दशा पाहू .
प्रश्न पाहतेवेळी शनी मध्ये रवी दशा   होती.      शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 8   10 11     Ketu-Yuti  8    Rahu-Drusht  2 
It's N.Swami :-------- Venus:- (4)   (1) 2  Cusp Yuti: (5)    
It's Sub :------------ Rahu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)  Saturn-Drusht  (8)   (10) (11)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (9) (12)  
Itself aspects :------ 2 10 5


शनी ४,११,१२ या तीनही भावाचा कार्येश आहे   रवी अंतर्दशा १५ दिवसांनी संपणार आहे म्हणून हि दशा सोडून दिली पुढील चंद्र अंतर्दशा सुद्धा सोडू दिली कारण रुलिंगमध्ये चंद्र नाही . त्यापुढील मंगळ अंतर्दशा निश्चित केली . आणि मंगल रुलिंगमध्ये आहे . मंगळाचे कार्येशत्व ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (4)   7 8     Sun-Yuti  (4)   (5)  Mercury-Yuti  (4)   (3) (6)
It's N.Swami :-------- Venus:- (4)   (1) 2  Cusp Yuti: (5)    
It's Sub :------------ Mars:- (4)   7 8     Sun-Yuti  (4)   (5)  Mercury-Yuti  (4)   (3) (6)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (4)   (1) 2  Cusp Yuti: (5)    
Itself aspects :------ 10 7 11

मंगल ३,४ या अनुकूल भावाचा कार्येश आहे आता विदशा पाहू त्यापुढील विदशा राहूची आहे  राहू रुलिंगमध्ये आहे . राहूचे कार्येशत्व ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)  Saturn-Drusht  (8)   (10) (11)
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   (9) (12)  
It's Sub :------------ Jupiter:- 7   9 12  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   (3) (6)     Mars-Yuti  (4)   7 8  Sun-Yuti  (4)   (5)
Itself aspects :------ 8
                                                                                                                                                                     राहू  ३,४,११, १२ या भावाचा कार्येश आहे

शनी महादशा , मंगल अंतर्दशा राहू विदशा मध्ये फ्लॅट ताब्यात मिळेल .
हा कालावधी येतो ४ /५/ २१ ते ४ / ७ / २१                                                                                                                   सादर जातकाने हा फ्लॅट ताब्यात मिळाल्यानंतर विकावा , कारण सर्वच ठिकाणी ५,६,१० भाव कार्यान्वित होताना दिसत आहे .

शुभम भवतु  !!!                                    

Wednesday 4 September 2019

Case Studt-94नोकरी ----
               भारतिय संस्क्रुतिचे चार पुरुशार्थ धर्म , अर्थ , काम , मोक्श ज्योतिषशास्रात कुंडली मधील १,५,९ त्रिकोणाला धर्म त्रिकोण म्हणतात २,६,१० त्रिकोणाला अर्थ त्रिकोण , ३,७,११ काम त्रिकोण व ४,८,१२ ला मोक्ष त्रिकोण म्हणतात सद्याच्या काळात माणसाचे सरासरी आयुष्यमान ७०-८० असे गृहीत धरले तर पहिली २० वर्षे मध्ये १,५,९ त्रिकोणाची फळे मिळतात . माणसाची क्रयशक्ती जास्तीतजास्त २,६,१० अर्थ त्रिकोण व ३,७,११ काम त्रिकोणामध्येच वापरली जाते . वय वर्षे २० ते ६०. ६० नंतर ४,८,१२ या मोक्ष त्रिकोणाची फळे मिळतात. प्रामुख्याने १,२,३,४ याच स्थानाची संपूर्ण आयुष्यात फळे मिळत असतात . ( १-धर्म ,२-अर्थ ,३-काम , ४-मोक्ष  ) पहिली २० वर्षे  आई वडिलांच्या छत्राखाली वावरत असतो. शेवटची २० वर्षे आपल्या मुलांच्या छत्राखाली किंवा वृद्धाश्रमात वावरत असतो. मधली २० ते ६० वर्षे याच काळात आपण स्वतः ला घडवत असतो. स्वतः ला सुंदर बनविण्याचा प्रयत्न करत असतो. मी , माझे जे काही आहे ते २० ते ६० वर्षे या काळातच घडत असते कारण पहिली २० वर्षे परांवलंबी, शेवटची २० वर्षे परांवलंबी च असतात  अर्थ त्रिकोण आणि काम त्रिकोण हे एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थ त्रिकोण म्हणजे अर्थाजनाला सुरुवात करणे मग ते नोकरीतून असेल किंवा व्यवसायातून असेल. काम त्रिकोण म्हणजे आपली महत्वाकांक्षा , स्वप्ने , हाव ,हव्यास , उपभोग ची पूर्तता करणे . जसे आपले अर्थाजन असेल त्याच प्रमाणात आपण कामत्रिकोणाची पूर्तता करू शकतो. म्हणून माणूस मोठी स्वप्ने, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अर्थाजन करत असतो. मग तो सरळ मार्गानी किंवा आडमार्गाने . पैसा असला कि सगळे आपोआप मागे येत असतात. पण खरच का हो ,  पैसा म्हणजे सर्वस्व आहे ? मला नाही वाटत.

                   हि फार जुनी केस स्टडी आहे. त्यावेळी मला बऱ्यापैकी कृष्णमूर्ती पद्धत समजायला लागली होती . माझी काही भाकिते बरोबर येत होती आणि काही चुकतेही होती. माझ्या कॉलेज मधील बहुतेकांना माझ्या ज्योतिषशास्त्र अभ्यास बदल कल्पना  होती . माझ्या कॉलेज मधील प्रशासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा माझ्या घरी आला , व म्हणाला सर, मी एम सी ए झालो आहे . आत्तापर्यंत २-३ मुलाखती झाल्या , अगदी तिसऱ्या राऊंड पर्यंत जात होतो. परंतु माझी निवड काही होत नाही. तर मला नोकरी केंव्हा लागेल. ? असा प्रश्न मला विचारला . हा  प्रश्न मी दोन पद्धतीने सोडविला . एक रुलिंग प्लॅनेट प्रमाणे व दुसरे नंबर कुंडली प्रमाणे .
 १)  रुलिंग प्लॅनेट----

मी ज्यावेळी प्रश्न  पाहिला त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे ----

L -मंगळ , S --केतू , R --रवी , D --बुध   (२/१०/२०१३   सकाळी 10-20 )

रुलिंग मधील लग्न वृश्च्छिक होते . पण वृश्च्छिक राशी मध्ये केतू चे नक्षत्र नाही म्हणून मी मेष लग्न निश्चित केले
( याठिकाणी सिंह रास केतू नक्षत्र असे घेता येईल पण रवी राशिस्वामी आहे व मंगळ लग्न स्वामी आहे लग्न स्वामी हा राशी स्वामी पेक्षा श्रेष्ठ म्हणून मेष लग्न घेतले ) मेष राशीत केतुचे नक्षत्र आहे मेष रास  केतू नक्षत्र व रवी सब मधून ज्यावेळी रवीचे भ्रमण होईल त्यावेळी नोकरी लागेल. कृष्णमूर्ती कोष्टकाप्रमाणे मेष रास केतू नक्षत्र रवी सब ३अंश ० कला  ते ३ अंश ४० कला पर्यंत आहे . अंदाजे ३-४ अंश मधून रवीचे भ्रमण होईल त्यावेळी नोकरी लागेल. १४ एप्रिल ला रवीचे भ्रमण मेष राशीतून सुरु होते. रवीची रोजची गती अंदाजे १ अंश ३-४ अंश अंतर जायला १७-१८ तारीख येईल . . परंतु मी त्याला  एप्रिल महिन्यात नोकरी लागेल असे सांगितले

२)   नंबर कुंडली प्रमाणे ------


मुलाला  सांगितले आपण अजून एका पद्धतीने प्रश्न सोडवू .  तू मनात नोकरीसंबंधी विचार करून १ ते २४९ मधील एक संख्या सांग त्याने थोडावेळ विचार करून १८५ हा नंबर सांगितला या नंबर वरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली.
दि २ / १० /  २०१३  वेळ सकाळी , फलटण

हि कुंडली धनु लग्नाची आहे म्हणजे द्विस्वभाव राशीची .

नियम --१० भावाचा सब २,६,१०,११  पैकी भावाचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येश दशेत नोकरी लागेल .

या पत्रिकेत १० भावाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (10)   (5) 10  Saturn-Yuti  (10)   (2)
It's N.Swami :-------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (10)   (5) 10  Saturn-Yuti  (10)   (2)
It's Sub :------------ Ketu:- 4       Rashi-Swami Mars 7   4 11  Saturn-Drusht  10  2
It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   (5) 10   
Itself aspects :------ 5-

राहू २,१० भावाचा कार्येश आहे म्हणजे सादर जातकाला नोकरी लागणार हे निश्चित झाले . आता केंव्हा लागणार ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील

प्रश्न पाहतेवेळी केतू मध्ये शनी अंतर्दशा चालू होती .

केतुचे कार्येशत्व ---

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 4       Rashi-Swami Mars 7   4 11  Saturn-Drusht  10  2
It's N.Swami :-------- Venus:- (10)   (5) 10   
It's Sub :------------ Venus:- 10   5 10    
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (6)   (1) (3) (12)  Cusp Yuti: (7)    
Itself aspects :------ 11

केतू  ६,१० या अनुकूल भावाचा कार्येश आहे . कुंडलीचे लग्न धनु  आहे म्हणजे द्विस्वभावी . म्हणून शनी अंतर्दशे मध्ये घटना घडणार नाही  त्यापुढील अंतर्दशा बुधाची घेतली बुद्धाचे कार्येशत्व ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 10   6 7 9  Cusp Yuti: (10)    
It's N.Swami :-------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (10)   (5) 10  Saturn-Yuti  (10)   (2)
It's Sub :------------ Jupiter:- (6)   (1) (3) (12)  Cusp Yuti: (7)    
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (6)   (1) (3) (12)  Cusp Yuti: (7)    
Itself aspects :------ 5



बुध २,६,१० भावाचा कार्येश आहे

केतू महादशा( ६,१० ) बुध  (२,६,१० )  चा कार्येश आहे यामध्ये ११ भाव कोठेच लागत नाही म्हणून कोणती विदशा ११ भाव दाखविते ते पाहू. रुलिंग प्रमाणे आपण केतू व बुध  वापरला आहे पुढील विदशा शुक्र रवी चंन्द्र आहेत रुलिंग मध्ये शुक्र चंद्र नाहीत रवी आहे पण रवी ११ भाव दाखवत नाही शुक्र ६,११ व चंद्र २,१०,११ भावाचा कार्येश आहे . म्हणून मी चंद्राची विदशा निश्चित केली .

केतू महादशा  (६,१० )  बुद्ध अंतर दशा ( २,६,१० ) चंद्र विदशा ( २,१०,११ ) या कालावधीत नोकरी लागेल आणि हा कालावधी येतो १६ एप्रिल २०१४ ते १६ मे २०१४.

सादर जातकाने १९ एप्रिल ला नोकरी लागल्याचे फोनवर सांगितले .उत्तरच्या जवल पोहचन्याचा आनंद ह वेगलच असतो . 

शुभम भवतु !!!