कृष्णमूर्ति ज्योतिष: May 2014

Tuesday 20 May 2014

१२ सायन्स नंतर कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे ?

                  माझ्या विध्यार्थ्याची मुलगी ,नुकतीच तिने बारावी सायन्स ची परिक्षा दिली होती . पुढील शिक्षण कोणत्या प्रकारचे घ्यावे या संबंधी घरामध्ये चर्चा चाललेली होती . वडिलांचे मत होते तिने फार्मसीचे शिक्षण घ्यावे . तिचे म्हणणे होते कोम्पुटर किंवा आर्किटेक चे शिक्षण घ्यावे . 
                   माझा ज्योतिषाचा अभ्यास आहे हे त्याला माहित होते . एक दिवस त्याने मला फोन केला  व म्हणाला मला आपली भेट घ्यावयाची आहे केंव्हा येऊ? मी त्याला सकाळी १०=००  यायला सांगितले . त्याप्रमाणे तो सकाळी आला . बरोबर मुलीला घेऊन आला . थोडा वेळ इतर गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला मी एका खास कामासाठी तुमच्याकडे आलो आहे . मी म्हटले काय काम आहे ? तो म्हणाला ज्योतिष विषयक एक सल्ला पाहिजे . मी म्हटले काय प्रश्न आहे ? हि माझी मुलगी नुकतीच तिने १२ वि  सायन्स ची परीक्षा दिली आहे . पुढील शिक्षण कोन्त्याप्रकाराचे घ्यावे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आलो आहे .
                   मी हा प्रश्न दोन प्रकारे सोडविला . १ ) एल,एस आर डि ( रुलिंग )प्रमाणे  २) संख्या शास्त्रा प्रमाणे
     तिला एका कागदावर ४ पर्याय लिहिलायला सांगितले व प्रत्येकापुढे एक संख्या लिहायला सांगितली तिने खालीलप्रमाणे लिहिले

१) आर्किटेक   २) आय टी   ३) कोम्पुटर   ४ )फार्मसी   
       ०७               २००            १७८                   १७२

दिनांक १८ / ५ / २०१४  वेळ - १०. १५  या वेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे 
१)   एल - चंद्र ,  एस -शुक्र ,   आर -गुरु ,   डी -रवि
एल-लग्नस्वामी , एस .. नक्षत्रस्वामी , आर ... राशिस्वामी , डी ...वाराचा स्वामी  संख्या शास्त्राप्रमाणे ----रुलिंग मधील लग्न स्वामी चंद्र आहे म्हणजे रास कर्क आहे . कर्क राशीचा क्रमांक ४ आहे . रुलिंग मधील नक्षत्रस्वामी शुक्र आहे . शुक्राच्या राशी दोन आहेत. वृषभ व तूळ  वृषभ हि दोन क्रमांकाची रास  व तुला हि ७ क्रमांकाची रास आहे म्हणून २+७ घ्या .  रुलिंग मधील राशी स्वामी गुरु आहे .गुरूच्या दोन राशी आहेत धनु व मिन धनु रास क्रमांक ९ व मिन राशीचा क्रमांक १२ म्हणून ९+१२ घ्या . रुलिंग मधील वरचा स्वामी रवी आहे रवीची सिंह आहे सिंह राशीचा क्रमांक ५ आहे .या सर्वांची बेरीज करणे खालीलप्रमाणे 

१)   चंद्र --कर्क राशी क्रमांक ---     ४
२)  शुक्र --वृषभ व तुल २+७----    ९
३)  गुरु ---धनु व मीन   ९+१२----२१
४)  रवि --- सिंह                   ----- ५
                                     ----------------
                                                    ३९
पर्याय फक्त ४ आहेत म्हणून ३९ या संखेला ४ ने भागिले बाकी ३ शिल्लक राहिली म्हणून तिसरा पर्याय कोम्पुटर हे उत्तर आले

२) तिने शाखेच्या पुढे ज्या संख्या लिहिल्या  आहेत त्यावरून  मी कृष्णमुर्ती कोष्टकाप्रमाणे राशी स्वामी , नक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामी काढले ते खालीलप्रमाणे आले 

१)  आर्किटेक ०७---  मंगळ --केतू -- गुरु 

२) आय टी   २०० --- शनि ---चंद्र --- बुध 

३) कोम्पुटर  १७८ ---गुरु ---शुक्र ---चंद्र 

४) फार्मसी   १७२ ----गुरु ---केतू ---राहू 

             यांची तुलना त्यावेळेच्या एल एस आर डि ( रुलिंग ) बरोबर केली . रुलिंग मधील ग्रह आहेत चंद्र शुक्र व गुरु  हे क्रमांक ३ च्या पर्याया बरोबर तंतोतंत जुळते म्हणून मी तिला सांगितले तुला कॉ म्पुटर या शाखेत प्रवेश मिळेल . 

                किंवा बी सी एस किंवा बी सी ए या शाखेमध्ये प्रवेश घेशील . कारण हि सुधा कोम्पुटर ची शाखा आहे . 

अशाप्रकारे दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले .

शुभम भवतु 

Monday 12 May 2014

पतीचे त्या स्त्री बरोबर संबंध असतील का ?

                   एक लेडी डॉक्टर ,. तिचे एका डॉक्टर बरोबर विवाह झालेला होता . दोघांची प्रक्टिस चांगली चाललेली होती . सगळे काही व्यवस्थितित चालले होते . दोन वर्षात तिला एक मुलगा झाला  . घरी फक्त सासू सासरे हि दोघ आणि त्यांचा मुलगा .एवढेच होते . हि घराचे सगळे आवरून दवाखान्यात जात होती ती दवाखान्यात जाते त्यावेळी सासू सासरे मुलाची काळजी घेतात . 
                        सगळ्याच गोष्टी व्यावास्थितीत चालल्या तर ते जीवन कसले . कधी कधी आयुष्यात  अचानक एखादे वादळ येते आणि सगळेच बदलून जाते . आयुष्य ढवळून निघते .
                           दोघेही स्वतंत्र प्रक्टिस पुण्यामध्ये करीत आहेत . पति कडे एक नवीन शिकाऊ लेडी डॉक्टर प्रक्टिस करण्यास येत होती .  ती आल्यापासूनच या दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले होते  तिला कळेना पति यापूर्वी असे कधी वागत नव्हते . आताच काय झाले ?सध्या नवरा तिच्यासाठी वेळ देत नव्हता . हिच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली .
                             एके दिवशी तिने मला फोन करून विचारले माझ्या पतीचे त्या स्त्री बरोबर तश्या प्रकारचे संबंध असतील का ? मी म्हटले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग तिने १५७  संख्या सांगितली . हा प्रश्न मी
   २८ एप्रिल २०१४ रोजी दुपारी १५=३८=५७ वाजता अ १७,५९ रे ७४,२६ येथे सोडविला .
               कृष्णमुर्ती नियम -- पंचमाचा सब द्विस्वभाव राशीत असून ५ व ११   या भावाचा कार्येश असेल तर संबंध असतील व पंचमाचा सब स्थिर राशीत असून ६ व १२ भावांचा कार्येश असेल तर संबंध असणार नाहीत
               हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे . पत्नीने प्रश्न विचारला आहे म्हणून सप्तम स्थान पतीचे लग्न स्थान होईल . सप्तमा स्थान वृषभ लग्न आहे म्हणून सप्तमस्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे .
              पतीचे पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---
           
             शुक्र --
न स्वा    गुरु --२,८
सब       मंगळ --५ कास्प युती
स न स्वा चंद्र --११,३,के यु ११
 
                       येथे पंचमाच सब शुक्र कन्या या द्विस्वभाव राशीत असून ५ व ११ या भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे पतीचे त्या स्त्री बरोबर संबंध आहेत हे सिद्ध होते . शुक्र लग्नेश आहे . सब चा नक्षत्रस्वामी गुरु हा सुधा मिथुन  द्विस्वभाव राशीत आहे . संबंध आहेत हे खात्रीपूर्वक सांगता येते . 
                    आता महादशा अंतर्दशा पाहू --
प्रश्न पाहते वेळी केतू महादशे मध्ये रवीची अंतर्दशा चालू होती केतूचे कार्येशत्व ----


केतू --११,  मं ४,१२ चं यु ११,३               रवि --११,बु यु ११          चंद्र --
केतू --११,मं   ४,१२ चं यु ११,३               शुक्र --१०,१                  केतू --११,मं ४,१२ चं यु ११,३
चंद्र --                                                 शुक्र --                         रवि --११,बु यु ११
केतू --११,मं   ४,१२, चं यु ११,३              गुरु ---२,८                    शुक्र --- १०, १


मंगळ --५                            राहू --५,शु १०,१ चं दृ ११,३          गुरु --२,८              शनि --६,९
चंद्र ---११,के यु ११                 मंगळ --४,१२,५ क यु                गुरु --२,८               गुरु --२,८
बुध --११ , १२ क यु                शुक्र ---                                    गुरु --२,८               शुक्र --
शुक्र -- १०,१                          गुरु --२,८                                  गुरु ---२ , ८           गुरु --२,८


राहू व केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने देतात 

वरील सर्व ग्रहांचे कार्येशत्व पाहता केतू मध्ये रवि , चंद्र , मंगळ व राहू अंतर्दशे पर्यंत संबंध चालू राहतील . 
गुरु अंतर्दशे मध्ये गुरु ५, ११  भावाचा कार्येश नाही तसेच शनि ५, ११ भावांचा कार्येश नाही . गुरु अंतर्दशे पासून म्हणजे १६ मे २०१६ पासून संबंध संपुष्टात येतील .