कृष्णमूर्ति ज्योतिष: March 2021

Saturday 27 March 2021

विवाह --

फेसबुकवरील  लेख वाचून एका स्त्री जातकाचा फोन -----माझा विवाह केंव्हा होईल हे सान्गु शकाल का ?  आपले बर्थ डिटेल्स द्या मी म्हटले . ती म्हणाली देते , पण माझे डिटेल्स कृपया सार्वजनिक करू नका . ठीक आहे मी म्हटले . ज्यांना पत्रिकेची पडताळणी करायची असेल त्यांनी व्यक्तिगत मेसेंजर वर मेसेज करावा . तिचे डिटेल्स खालील प्रमाणे ----

दि १६ मे ----- वेळ १२--५२  ( सुधारित ) स्थळ XXXX 

मी जातकाची जन्मवेळ सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे निश्चित केली आहे . ( आई, वडील,बहीण ) 

१) लग्नाचा सब राहू चा राशिस्वामी गुरु , जो चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे . 

२) लाभाचा सब राहू चा राशिस्वामी गुरुची अंशात्मक दृष्टी मोठ्या बहिचणीच्या चंद्रावर आहे 

३) चतुर्थाचा सब बुध शुक्रच्या नक्षत्रात , शुक्र आईच्या चंद्राचा राशिस्वामी आहे 

४) नवम भावाचा सब राहू हा वडिलांचा चंद्र नक्षत्रस्वामी आहे 


हि कुंडली सिंह लग्नाची आहे . 

विवाह -- ७चा सब २,७,११ भावांचा कार्येश असेल तर २,७,११ भावांच्या कार्येश दशेत विवाह होईल 

या पत्रिकेत ७ चा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व 

PLANET : RAHU

Itself :-------------- Rahu:- 5     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Jupiter 1   5 8  Jupiter-Drusht  1  5 8

It's N.Swami :-------- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11

It's Sub :------------ Jupiter:- 1   5 8   

It's Sub's N.Swami :-- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11

Itself aspects :------ 11

२ व ४ थ्या पायरीवर केतू राहू नक्षत्रात आहे राहू पंचमात आहे राहू धनु राशीत राशिस्वामी गुरु प्रथम स्थानी आहे म्हणून ५,१, चे कार्येशत्व केतूला मिळेल.  
राहू १,२,५,९,११ चा कार्येश आहे विवाह होणार हे निश्चित सांगता येईल. 
                             आता केंव्हा होणार ह्यासाठी आपण दशा पाहू ..  कुंडली पाहतेवेळी बुध महादाशेमध्ये बुध  अंतर्दशा ३ ऑक्टोबर २०२० पर्यंत होती. कुंडलीचे लग्न सिंह हे स्थिर लग्न असल्यामुळे बुध  अंतर्दशेमध्ये विवाह होणार नाही म्हणून बुधाची अंतर्दशा सोडून दिली. त्यापुढील केतूची अंतर दशा विचारात घेतली बुध व केतू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे --- बुध  / केतू  ३ /१०/२०२० ते ३० / ९/२०२१ प आहे 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (9)   (2) 11     Jupiter-Drusht  (1)   5 8
It's N.Swami :-------- Venus:- (9)   3 (10)     Moon-Drusht  (3)   (12)
It's Sub :------------ Venus:- (9)   3 (10)     Moon-Drusht  (3)   (12)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (9)   3 (10)     Moon-Drusht  (3)   (12)
Itself aspects :------ 3

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 11     Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury 9   2 11
It's N.Swami :-------- Rahu:- (5)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Jupiter (1)   5 8  Jupiter-Drusht  (1)   5 8
It's Sub :------------ Jupiter:- 1   5 8   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11
Itself aspects :------ 5

बुध २,३,९ ( पंचमचे पंचम ) चा कार्येश आहे . केतू १, २,५,९,११ चा कार्येश आहे ( ४ थ्या पायरीवर केतू राहू नक्षत्रात आहे राहू पंचमात आहे राहू धनु राशीत राशिस्वामी गुरु प्रथम स्थानी आहे )  यामध्ये ७ भाव आलेला नाही . या पत्रिकेत ७ भाव फक्त चंद्र  व मंगळ दाखवितात. चंद्र प्लूटो  अंशात्मक युती ( ०. २ ) असल्यामुळे चंद्र विदशा सोडून दिली व मंगल विदशा निश्चित केली मंगल चे कार्येशत्व ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 8   4 9   
It's N.Swami :-------- Saturn:- (6)   6 (7)   
It's Sub :------------ Rahu:- 5     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Jupiter 1   5 8  Jupiter-Drusht  1  5 8
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11
Itself aspects :------ 2 11 3

मंगळ २,५,७,९,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . बुध  महादशा केतू अंतर्दशा व मंगळ विदशा चा कालावधी येतो 
१० फेब्रुवारी २०२१  ते ३ मार्च २०२१ .

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात  विवाह ठरला आहे असा  जातकाने मेसेज केला.  

उत्तराच्या जवळ पोहोचण्याचे आनंद वेगळाच असतो ना .... 

या कुंडलीचे वैशिष्ट्य असे आहे विवाहाचा कारक शुक्रावर प्लुटोची अंशात्मक दृष्टी आहे ( ३ अंश २५ कला ) असे असूनसुद्धा विवाह ठरला कारण साध्या कुंडलीप्रमाणे  गुरु ची शुक्रावर दृष्टी आहे ( अंशात्मक नाही ) 

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु !!!

Wednesday 17 March 2021

कर्ज ---

                          एक त्रिकोणी कुटुंब .पती ,पत्नी व एक ५-६ वर्षाची मुलगी . या पूर्वी ते एकत्र राहत होते . म्हणजे सासू ,मुलगा ,सून व नातं. परंतु सगळ्यांच्या घरात घडते ते यांच्या सुद्धा घरात घडले .  सासू आणि सून यांच्यामध्ये अधून मधून भांडणे होत होती . सासरा मुलगा लहान असतानाच गेला होता . सासूला नवऱ्याची पेन्शन मिळत होती .  पत्नी नवऱ्याला म्हणत होती आपण वेगळे राहू . पण नवरा आईला सोडून वेगळे राहत नव्हता. एक दिवस सासू आणि सुनेचे कडाक्याचे भांडण झाले होते . संध्याकाळी नवरा  घरी आल्यानंतर बायकोने नवऱ्याला भांडणा बद्दल सांगितले . आता बस झाले झाले मी आता माहेरी निघून जाते . नवऱ्याने दोघीना समजावण्याचा प्रयत्न केला . पण काही फरक पडला नाही  . एक दिवस मुलगा बायकोला घेऊन भाड्याच्या खोलीत राहायला गेला  . तिथे गेल्यानंतर दोघांचे व्यवस्थित चालले होते अधून मधून आई मुलाला बोलावून घेत होती. बायकोची त्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती . नवऱ्याची क्लास २ ची सरकारी नोकरी होती. 

    एक दिवस बायको नवऱ्याला म्हणाली किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे . आपल्याला परवडेल अशा एखाधा फ्लॅट बघू . नवऱ्याला ही पटत होते. त्यासाठी दोघेही वेगवेगळ्या साईट्स पाहायला गेले . त्यातील एक फ्लॅट दोघांना पसंत पडला . पण फ्लॅटच्या किंमत कोटीच्या घरात होती. त्यांच्या आवाक्यच्या बाहेर होते पत्नी सुद्धा शिकलेली होती . पण नोकरी नव्हती. पत्नी म्हणाली मी नोकरीसाठी प्रयत्न करते दोघांच्या नोकरीवर आपल्याला घरकर्ज काढता येईल . म्हणून पत्नी नोकरीसाठी प्रयत्न करत होती  अशातच एकदा कपडे धूत असताना बायकोला नवऱ्याच्या पॅन्ट  च्या खिशात पगाराची स्लिप सापडली. तिने वाचली त्यावेळी तिच्या लक्षात आले ह्या महिन्यात एकदम १०,०० रुपयाचे कटिंग झाले होते. ति मनात म्हणाली गेल्या महिन्यात कटिंग नव्हते  आणि ह्या महिन्यात एकदम १०,००० रु का कापले . तिने यासंदर्भात नवऱ्याला विचारले . तर नवरा तिला काहीच सांगत नव्हता. तो म्हणायचं माझ्या पगारात तू लक्ष घालू नको. . पण हिच्या डोक्यातून हा विचार जाईना नवऱ्याने कर्ज काढून पैसे कोणाला दिले असतील ? ह्याच विचारातून तिने मला हा प्रश्न विचारला . मी हा प्रश्न ,प्रश्न कुंडलीने सोडवायचे ठरविले . तिला सांगितले  हाच विचार मनात करून मला एक संख्या सांग . तिने २११ हि संख्या सांगितली ह्या संख्येवरून मी खालीलप्रमाणे कुंडली तयार केली . 

दि --५ मार्च २०२१  वेळ १५-१४-५१   फलटण . 

हि कुंभ लग्नाची कुंडली आहे . 

प्रश्न बायकोने नवऱ्याबद्दल विचारला आहे म्ह्णून ७ स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली . 

चंद्र हा मनाचा कारक . मनातील प्रश्न जुळतो का ते पाहू . 

फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये चंद्र चतुर्थात आहे चंद्र शनीच्या नक्षत्रात आहे आणि शनी षष्ठ स्थानात आहे . षष्ठ स्थानावरून कर्जाचा बोध होतो. म्हणजे प्रश्नाचा रोख बरोबर आहे . आता नवऱ्याच्या पत्रिकेत षष्ठ स्थानचा विचार करू. षष्ठ स्थानाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : SATURN

Itself :-------------- Saturn:- 6   6 7   

It's N.Swami :-------- Moon:- (3)   (12)  Cusp Yuti: (4)     

It's Sub :------------ Jupiter:- 6   5 8     Mercury-Yuti  6  2 11

It's Sub's N.Swami :-- Mars:- (9)   4 9   

Itself aspects :------ 12 8 3

शनी चंद्राच्या नक्षत्रात आहे चंद्र ३स्थानात ४ भावारंभी आहे शनी ३,४,९,१२ भावाचा कार्येश आहे . 

यातील ४ भावावरून घराचा अर्थबोध होतो. १२ भावावरून गुंतवणूक चा विचार केला जातो. ३,९ भावावरून कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे च विचार केला जातो. नवऱ्याने घरासाठी कर्ज काढले आहे असा निष्कर्ष निघतो. तसे मी तिला सांगितले . दोन दिवसांनी तिचा फोन आला म्हणाली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे . तुम्ही सांगितल्यानंतर मी त्याला सुट्टीच दिली नाही मी खोदून खोदून त्याला विचारले सुरुवातीला म्हटले तुमच्या आईला पैसे दिले का ? कारण माझा नवरा मातृभक्त ना ... तर नाही म्हणाला . मग कशाला कर्ज काढले ? मग त्याने सांगितले मी घरासाठी कर्ज काढले आहे . एखादा फ्लॅट आपल्याला पसंत पडला तर त्याचे डाऊन पेमेंट देण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत . म्हणून कर्ज काढले.  मी म्हणाले हे मला सांगायला काय हरकत होती ? असो ... 


शुभम भवतु !!!