कृष्णमूर्ति ज्योतिष: 2020

Sunday 22 November 2020

संतती ---

माझ्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन ---- तो म्हणाला मला तुम्हाला भेटायचे आहे . मी त्याला रविवारी यायला सांगितले रविवारी सकाळी १० वाजता ती व्यक्ती आली  म्हणाली  मला एक प्रश्न विचारायचं आहे . मी म्हटले काय विचारायचे आहे . तो म्हणाला आमच्या लग्नाला ७ वर्षे झाली परंतु अद्याप संतती नाही; आमच्या दोघांच्या ट्रीटमेंट चालू आहेत . मार्च २०१८ मध्ये एक गर्भपात झाला आहे त्यानंतर काही नाही . मी म्हटले दोघांचे बर्थ डिटेल्स आहेत का ? हो, आहेत. मी ते लिहून घेतले . ते खालीलप्रमाणे --- प्रथम मी त्यांच्या पत्नीच्या पत्रिकेचा विचार करायचे ठरविले . कारण गर्भपात होतोय याचा अर्थ गर्भधारणा होतेय . .म्हणजे पतीकडे दोष असणार नाही.  स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ स्थिर राहत नाही . त्यामागे काय कार्यकारण भाव असावा हे पाहण्यासाठी स्त्री च्या पत्रिकेचा विचार प्रथम करायचे ठरविले .  

दिनांक---२३/९/१९८६        वेळ-- १६-२०       स्थळ अ १८,०७ रे ७५,०१

हि मकर लग्नाची कुंडली आहे . मी ज्यावेळी पत्रिका सोडवायला घेतली त्यावेळी खालील रुलिंग होते . 

दि २२/११/२०    वेळ १०-१८-४४

शुक्र * गुरु , मंगल , शनी , रवी 

नियम --पंचमाचा सब जर २,५,११ भावाचा कार्येश असेल तर २,५,११ कार्येश ग्रहांच्या दशेत संतती होते . 

या पत्रिकेत पंचमाचा सब शुक्र आहे . शुक्र रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे शुक्राचे  कार्येशत्व खालीलप्रमाणे

 PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9)   (4) 9  
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Jupiter (1)   2 11 (12)  Mars-Drusht  (11)   3 10
It's Sub :------------ Moon:- 3   7  Cusp Yuti: (4)    
It's Sub's N.Swami :-- Sun:- (8)    Cusp Yuti: (8)    
Itself aspects :------ 4

शुक्र १,२,४,८,९,११,१२ चा कार्येश आहे . यातील २,९,११ संतती होण्यास अनुकूल आहेत पहिल्या दोन स्टेप प्रमाणे घटना घडते व ३,४ स्टेप मुले घटनेचे परिणाम दिसून येतात . शुभ कि अशुभ . पहिल्या दोन स्टेपमुळे गर्भधारणा झाली परंतु ३-४ स्टेप मध्ये ४,८ हे भाव पूर्ण विरोधी असल्यामुळे गर्भपात झाला ३-४ स्टेप मध्ये पूर्ण विरोधी भाव असल्यामुळे संतती होण्याची शक्यता नाही. या व्यतिरिक्त अजून काही कारणे आहेत 

१) पंचमाचा सब शुक्र प्लूटो युतीत आहेत ( ६.५), शुक्राचा हर्षल बरोबर ३६.३ च अशुभ योग्य होत आहे तसेच ४ थ्या पायरीवर रवी चा प्लूटो बरोबर ३५. ७ चा व नेपच्यून बरोबर केंद्र योग्य ( ९२. ९) होत आहे 

२) गर्भधारणा होतेय परंतु गर्भपात होतोय याचा अर्थ गर्भ स्थिर राहात नाही म्हणजे याठिकाणी चर राशीचा संबंध असावा . पंचमाचा सब शुक्र तूळ या चर राशीत आहे . सब , राहूच्या नक्षत्रात आहे राहू मिन या द्विस्वभाव व बहुप्रसव राशीत आहे . परंतु राहू २८ अंश ११ कला वर आहे . द्विस्वभाव राशीमध्ये चर व स्थिर दोन्ही तत्वे आहेत .पहिले १५ अंश स्थिर तत्वाचे , १५ ते ३० अंश चर तत्वाचे आहेत . राहू २८ अंश आहे म्हणजे राहू चर तत्वामध्येच आहे . 

३) राहू शुक्र गुरु दशेत गर्भपात झाला त्यावेळी ----

राहू---५,६,८,१०

शुक्र ----१,२,४,८,९,११,१२

गुरु ----१,१०,१२

राहू शुक्र गुरु ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी आहेत . म्हणून गर्भपात झाला . 

४) कुंडलीची भाषा --नाशिकचे प्रकाशन या पुस्तकात स्त्री पुरुषांचे प्रजनन क्षमता पाहण्याचे सूत्र आहे यासंबंधी माझे मित्र श्री काजरेकर सर, व सौ प्रज्ञा तिखे मॅडम यांनी फेसबुक वर यापूर्वी लेख लिहिले होते . यामध्ये स्त्री च्या बाबतीत चंद्र , मंगळ ( मासिक धर्म ) व गुरु (संतती ) यांच्या राशी अंश कला ची बेरीज करायची असते जो बिंदू येईल त्यावरून लग्न  व नवमांश ठरवायचे जर लग्न  व नवमांश सम असतील तर प्रजनन क्षमता बलवान असते . लग्न  विषम व नवमांश सम असेल तर मध्यम बलवान ,( किंवा याच्या उलट ).लग्न  व नवमांश दोन्ही विषम असतील तर प्रजनन क्षमता दुर्बल असते . या पत्रिकेत -----

          रा   अंश    कला 

चंद्र----२ , ०७ , १३ 

मंगळ --९ , २८ , ३४

गुरु ----११, २२ , ३९

---------------------

           २३,  २८ , २६

११,२८ ,२६   रास कुंभ व नवमांश मिथुन आहे . दोन्ही विषम असतील तर प्रजनन क्षमता दुर्बल असते याठिकाणी प्रजनन क्षमता दुर्बल आहे म्हणून संतती होणार नाही . अजून  खात्री करण्यासाठी मी नंबर कुंडलीचा विचार करायचे ठरविले. . संबंधित स्त्री कडून मी एक नंबर घेतला स्त्री ने ४३ नंबर दिला . 

दि २२/११/२० वेळ १०-३६-४१   फलटण 

या पत्रिकेत पंचमाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व --

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12       Rashi-Swami Venus 5   12
It's N.Swami :-------- Mars:- (10)   6  
It's Sub :------------ Jupiter:- 8   7 8 11     Saturn-Yuti  8  9 10
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6)   (4)  
Itself aspects :------ 6

राहू पूर्ण विरोधी भावांचा कार्येश आहे . सबब सदर स्त्रीला संतती  होणार नाही असे खात्रीपूर्वक सांगता येईल. आता याला दुसरा पर्याय काय असू शकतो . दत्तक घेणे . 

नियम--- पंचमाचा सब ५,४ या दोन्ही भावांचा कार्येश असेल तर दत्तक घेता येईल. 

वरील मूळ पत्रिकेत पंचमाचा सब शुक्र आहे

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9)   (4) 9  
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Jupiter (1)   2 11 (12)  Mars-Drusht  (11)   3 10
It's Sub :------------ Moon:- 3   7  Cusp Yuti: (4)    
It's Sub's N.Swami :-- Sun:- (8)    Cusp Yuti: (8)    
Itself aspects :------ 4

शुक्र १,२,४,८,९,११ भावांचा कार्येश आहे . यात ५ भाव नाही . परंतु ९ भाव हा पंचमापासून पंचम येतो. म्हणून ९ भाव पंचम धरावयास काही हरकत नसावी . शुक्र ५व ४ या दोन्ही भावांचा कार्येश आहे . म्हणून सदर स्त्री दत्तक घेऊ शकते . महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा . 


शुभंम भवतु !!!



Thursday 5 November 2020

नोकरी ----

                         फेसबुकवरील लेख वाचून लंडनहून एका स्त्री जातकाचा फोन ..... .म्हणाली सद्य मी यु के मध्ये लंडन येथे राहत आहे . २००६ पासून मी माझे पती व थोरला मुलगा एकत्र रहात होतो. माझे पती कार्डिओग्राफिक सर्जन होते . परंतु सद्याच्या कोरोना महामारीच्या वातावरणात मार्च २०२० मध्ये माझ्या पतींना कोरोना झाला . हा आजार नवीनच असल्यामुले योग्य औषधोपचार होऊ शकले नाहीत . त्यातच त्यांचे एप्रिल मध्ये निधन झाले मला १९ मार्च २०२० ला नोकरी लागली होती परंतु नवऱ्याला कोरोना झाला व कंपनी ने सुद्धा मला कळविले कि सद्य ह्या वातावरणात आम्ही तुला जॉईन करू शकत नाही .  त्यामुळे मलाही नोकरीवर रुजू होता आले नाही . .परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती  माझा येथील  खर्च मला माझ्या मुळावर टाकायचा नव्हता . म्हणून मी पुन्हा नोकरी करायचे ठरविले आहे . मी म्हटले आता तुमचे वय काय आहे ती म्हणाली वय वर्षे ५३ . या वयात सुद्धा तुम्हाला नोकरी करावीशी वाटते , मी म्हटले.  ति म्हणाली येथे जेव्हढे तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही नोकरी करू शकता . वय वर्षे ६५-६७ पर्यंत व्यक्ती नोकरी करू शकते त्यानंतर तिने मला नोकरी केंव्हा लागेल असा प्रश्न विचारला मी म्हटले आपले बर्थ डिटेल्स द्या . तिने खालीलप्रमाणे बर्थ डिटेल्स दिले 

 दि १९/८/१९६७  वेळ--२३-०६  स्थळ--अ १८,३८  रे--७२,५२

कुंडलीचा अभ्यास करून तिला सांगितले नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ मध्ये नोकरी लागेल . ३ नोव्हेंबर ला व्हाट्सअप वर तिचा मेसेज आला कि , काल  म्हणजे २ नोव्हेंबर ला मला कंपनीचे ऑफर लेटर  आले आहे .. व ९ नोव्हेम्बरला मला कंपनीत हजर राहायला सांगितले आहे . कारण ९ तारखेला तेथील लोकडाऊन संपणार आहे . 


मी जेंव्हा कुंडली सोडवायला घेतली दि १४/१०/२०२०  वेळ ---२२-४०-१२ त्यावेळी रुलिंग प्लॅनेट होते खालीलप्रमाणे 

राहू* ,बुध  , रवी,  रवी , बुध 

हि कुंडली मेष लग्नाची चर तत्वाची आहे . . जातकाने आतापर्यंत केलेल्या नोकऱ्या मी पडताळून पहिल्या 

१) सप्टेंबर २०१४    

शनी शुक्र गुरु दशेत लागली 

शनी--२,६,१०,११  शुक्र--२,६ गुरु --२,६,१० चा कार्येश 

 २) नोव्हेंबर २०१७

 शनी चंद्र बुध  लागली 

शनी-२,-६,१०,११  चंद्र --१०,११  बुध ---१०

३) सप्टेंबर २०१८

 शनी मंगल राहू दशेत लागली 

शनी --२,६,१०,११ मंगल--१०,११ राहू --२,६,१० 

ह्या सर्व नोकऱ्या यु.के लंडन मध्ये केल्या आहेत म्हणून परदेशगमनाचे योग्य तपासून पहिला . व्यय भावाचा सब चंद्र ३., ९,१०,११,१२ भावाचा कार्येश आहे व्ययाचा  सब  चंद्र ३,९,१२ परदेश गमन व १० ,११ नोकरीसाठी अनुकूल आहे 

या तीन नोकऱ्या  व्यतिरिक्त भारतात एका शाळेमध्ये  त्यांनी  नोकरी केली आहे . 

दशमाचा सब शुक्र आहे. परंतु रुलिंग मध्ये रवी आहे म्हणून रवी चे कार्येशत्वं 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (4)   5   
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (5)   (2) 7
It's Sub :------------ Venus:- (5)   (2) 7   
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   (2) 7  
Itself aspects :------ 11

रवी २,४,६ चा कार्येश आहे ४ शैक्षणिक क्षेत्र दाखवते . 

येथून पुढील नोकरी केंव्हा लागेल हे पाहण्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील कुंडली सोडवितेवेळी शनी मध्ये ऱाहू चीअंतर  दशा चालू होती. शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (12)   10 (11)   
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Ketu:- 6       Rashi-Swami Venus 5   2 7
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   (1) (8)
Itself aspects :------ 6 2 9
 

४ थ्या पायरीवर राहू केतू येत असतील तर त्यांचे नक्षत्र पाहावे . राहू , केतू नक्षत्रात आहे केतू ६,५,२ चे कार्येश आहे 

शनी २,६,१०,११ चा कार्येश आहे . आता राहूचे कार्येशत्व 

 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12       Rashi-Swami Mars 7   1 8
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (5)   (2) 7
It's Sub :------------ Jupiter:- 4   9 12     Mercury-Yuti  4  3 6  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
Itself aspects :------ 7

राहू २,६,१० चा कार्येश आहे . याठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली आहे . यानंतर विदशा मी बुधा ची घेतली कारण रुलिंग बुध आहे .आणि कुंडली मेष चर तत्वाची आहे .बुधाचे कार्येशत्व ----

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Jupiter:- 4   9 12     Mercury-Yuti  4  3 6  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
Itself aspects :------ 10 

शनी म . द. राहू अ .द. बुध  विदशेचा कालावधी आहे   २/११/२०२०  ते ३०/३/२०२१ 

याच कालावधीत जातकाला नोकरी लागली आहे . 

तिला जेंव्हा सांगितले त्यावेळी मी गोचर पहिले नव्हते . तिचा मेसेज आल्यानंतर मी गोचर पहिले . गोचर पाहताना मी शनी व राहूचे सब मधील भ्रमण व बुधा चे नक्षत्रातील भ्रमण पहिले २ नोव्हेंबर २०२० पासून गोचर पाहायला सुरुवात केली 

                             २ नोव्हेम्बरला २०२० ला शनि व राहू , गुरु व शनीच्या सब मध्ये आहे गुरु शनी दोन्ही अनुकूल आहेत . परंतु बुध मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि मंगल वक्री  आहे . ९ नोव्हेंबर ला शनी राहू, गुरूच्या सब मध्ये आहेत. व बुध  मंगळाच्या नक्षत्रात आहे मंगल वक्री आहे . ११ नोव्हेंबर ला शनी राहू,  गुरु च्या सब मध्ये आहे बुध  राहूच्या नक्षत्रात आहे . म्हणजे ११ नोव्हेंबर पासून गोचर अनुकूल आहे . असे असून सुद्धा जातक ९ नोव्हेंबर ला मंगल वक्री असताना कंपनीत हजर होत आहे . येथे दोन दिवसाचा फरक पडला आहे हा फरक केवळ संबंधित स्थळाचे अक्षांश रेखांश व अयनांश  अचूक नसल्यामुळे पडला असेल असे समजायचे का ? तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे. 


शुभम भवतु  !!!

Tuesday 20 October 2020

वाचकांचा प्रतिसाद ----काही वाचकांनी व्हाट्सअप वर आपले प्रतिसाद पाठविले आहेत. 

आदरणीय सर, सादर प्रणाम. मी आपणाकडून 1 महिन्यापूर्वी मुलीच्या विवाह संदर्भात मार्गदर्शन घेतले होते आणि आपण जवळ जवळ एक तास वेळ देऊन सर्व विश्लेषण केले होते. ते सर्व विश्लेषण मुलीने ऐकल्यानंतर ती एका सकारात्मक आणि चांगल्या निर्णयापर्यंत आली आणि तिच्या   भविष्यात होणारी संभाव्य हानी टाळता आली. आपण मनापासून केलेल्या सहकार्यामुळे आणि सखोल ज्योतिष विश्लेषण यामुळे तिने एक चांगला निर्णय घेतला याबद्दल मी आणि माझे कुटुंबीय आपले ऋणी आहे, मनःपूर्वक धन्यवाद.

डॉ स्वाती कळसकर .

Sunday 11 October 2020

नोकरी ---

                           जातक मॅनेजर पदावर काम करीत होता . कंपनीने त्याच्यवर एका  प्रोजेक्ट ची जबाबदारी सोपविली होती. वर्षभर काम करून त्याने प्रोजेक्ट जवळ जवळ पूर्ण केला होता. यावर त्याचे प्रमोशन अवलंबून होत. तो खुशीत  होता. ह्यावेळी आपल्याला प्रमोशन नक्की मिळणार ह्याची त्याला खात्री होती. परंतु नियतीच्या मनात वेगळेच घोळत होते. त्याचे सर्व काम त्याच्या बॉसने स्वतः चे नावावर दाखविले . आणि त्याचे प्रमोशन झाले . त्याच्या बॉसला मनातून ह्या जातकाबद्दल भीती  वाटत होती  आज ना उद्या हा वरिष्ठाना सांगेल. त्यामुळे तो त्याला त्रास देऊ लागला . म्हणाला तू राजीनामा दे  नाहीतर मी तुला काढून टाकतो. त्यामुळे  त्याला  राजीनामा देणे भाग  पडले आयुष्याच्या मध्यावर अशा प्रकारे नोकरी सोडावी लागणे हे त्याचे दुर्दैव . पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात केली . कामाचा त्याला १०-१२ वर्षाचं अनुभव होता त्याला वाटत होत आपल्याला नोकरी सहजच मिळेल पण जस जसे दिवस जाऊ लागले तस तसे त्याचे टेन्शन वाढत चालले होते कारण वरच्या पदावरच्या नोकऱ्या जास्त प्रमाणात नसतात. आतापर्यंत जे सेव्हिंग केले होते त्यावर त्याचे घरखर्च कसातरी भागत होता. पण हे किती दिवस चालणार . दिवसेंदिवस त्याचे  डिप्रेशन वाढत होते अशा अवस्थेत त्यांने  मला फोन केला आणी  वरील सर्व सांगितले मला नोकरी केंव्हा मिळेल असा प्रश्न विचारला जवळ जवळ एक वर्ष झाले होते . मी त्याला ठराविक कालावधी सांगितला . मला आठवते मी त्याला नोव्हेंबर डिसेंबर २०१९ सांगितलेले होते . त्यावेळी तो म्हणाला म्हणजे अजून  सहा महिने थांबावे लागेल. चालेल मी नक्कीच वाट पाहीन . त्यानंतर ३-४ महिन्यांनी त्याने मला फोन केला , म्हणाला  तुम्हीं म्हणालात त्या प्रमाणे मला हैद्राबाद चा कॉल आला   माझे मुलाखतीचे तीन राऊंड झाले आहेत . मी  एच आर बरोबर बोललो.  तो म्हणाला तुमची निवड झाली आहे . थोड्या दिवसात तुम्हाला ऑफर लेटर येईल . इथेही नशिबाने दगा दिला . ऑफर लेटर  आलेच नाही. तो खूप निराश झाला . पुन्हा त्याने माझ्याशी संपर्क केला . तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित जुळून आले होते पण त्याचे ऑफर लेटर आले नाही . पुन्हा एकदा माझी पत्रिका पहा ना .... माझे रिडींग चुकले होते . 

मी पुन्हा पत्रिका तपासायला सुरुवात केली . असे का झाले ..... आणि त्याला सांगितले ऑगस्ट सप्टेंबर २०२० . या महिन्यात तुला नोकरी लागेल . तो म्हणाला , अजून सहा महिने ? ठीक आहे . आणि लॉक डाउन सुरूझाले . कोरोनाने  हळू हळू पाय पसरायला सुरुवात केली होती. बऱ्याचकंपन्यांनी नोकर कपात केली होती . सगळेच ठप्प झाले होते . हे सहा  महिने कसेबसे ढकलत होता. जुलै महिन्याच्या शेवटी त्याच फोन आला म्हणाला सर, एका MNC कंपनीचा कॉल आला होता सर्व मुलाखतीचे राऊंड online क्रॅक केले .मुलाखतीच्या वेळी मी त्यांना स्पष्ट सांगितले कि माझा २ वर्षाचा गॅप आहे . असे असून सुद्धा माझी निवड झाली फक्त ऑफर लेटर आले नाही . 

                 १७ ऑगस्ट ला पुन्हा फोन आला म्हणाला सर, ते म्हणाले तुम्ही दोन वर्षाचा गॅप बदल खरे सांगितले म्हणून ऑफर लेटर  देत आहोत .१० तारखेला रात्री ९ वाजता त्यांनी माझ्या ई -मेलवर ऑफर लेटर पाठविले व दिनांक ११ऑगस्ट २०२० रोजी  ऑन लाईन जॉईन करून घेतले . आणि लगेचच लोकडउन असल्यामुळे वर्क फ्रॉम होम साठी काम सुरु झाले . काम खूप होते म्हणून तुम्हाला फोन करायला उशीर झाला .

 त्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे ------.

जन्म तारीख--२ एप्रिल १९७९   वेळ--३-२५ ( सुधारित ) पहाटे  पुणे 

हि मकर लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब शुक्र आहे . शुक्र चंद्र राशिस्वामी आहे . म्हणजे सब चंद्र  कनेक्शन थेअरी प्रमाणे जन्मवेळ बरोबर आहे . 

नियम -- दशमाचा सब २,६,१०,११ पैकी भावाचा कार्येश असेल तर २,६,१० या भावांच्या सयुंक्त दशेमध्ये नोकरी लागेल . खरे तर दशमाचा  सब . पाहण्याची आवश्यता नाही . यापूर्वी २-३ नोकऱ्या केल्या आहेत  डारेक्ट  दशा पहिली तरी चालले असते . प्रश्न कुंडलीमध्ये पाहावे लागले असते . दशमाचा सब मंगल आहे मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --


PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (2)   (3) (10) (11)     Mercury-Yuti  (2)   6  Jupiter-Drusht  (6)   (12)
It's N.Swami :-------- Jupiter:- (6)   (12)   
It's Sub :------------ Rahu:- 7       Rashi-Swami Sun 2   8
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
Itself aspects :------ 9 6 10

तिसऱ्या पायरीवर राहू अष्टम भावारंभी आहे त्यामुळे त्याची दृष्टी द्वितीय भावावर पडते . 

मंगल २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे 

 मी कुंडली पहिली ९/५/२०१९   वेळ  १०-१८-१४  त्यावेळी रुलिंग असे होते    

 गुरु * बुध , राहू , बुध   , गुरु 

 आता दशा पाहू -- कुंडली पाहतेवेळी गुरु मध्ये मंगळाची अंतर्दशा होती . गुरु मंगळाचे कार्येशत्व ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 6   12   
It's N.Swami :-------- Saturn:- (7)   1 2     Venus-Drusht  (1)   4 (5) (9)
It's Sub :------------ Mercury:- 2   6     Mars-Yuti  2  3 10 11  Jupiter-Drusht  6  12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   1 2     Venus-Drusht  (1)   4 (5) (9)
Itself aspects :------ 1 11 3

गुरु २., ६ , १० पैकी कोणत्याही भावाचा कार्येश नाही म्हणून गुरु महादशा सोडून देता येणार नाही. कारण कुंडली मकर लग्नाची चर तत्वाची आहे 

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (2)   (3) (10) (11)     Mercury-Yuti  (2)   6  Jupiter-Drusht  (6)   (12)
It's N.Swami :-------- Jupiter:- (6)   (12)   
It's Sub :------------ Rahu:- 7       Rashi-Swami Sun 2   8
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
Itself aspects :------ 9 6 10

मंगळ २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे कुंडली चर तत्वाची आह म्हणून त्या पुढील राहूची विदशा घेतली 

( रुलिंग मध्ये राहू आहे )

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Sun 2   8
It's N.Swami :-------- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
It's Sub :------------ Saturn:- 7   1 2     Venus-Drusht  1  4 5 9
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
Itself aspects :------ 2

राहू अष्टम भावारंभी आहे त्याची दृष्टी द्वितीय भावावर येते म्हणून राहू २ चे कार्येश दाखवितो. गुरु मंगल राहू चा  कालावधी येतो १५/११/२०१९ ते ५/१/२०२०

त्याला सांगताना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नोकरी लागेल असे सांगितले होते . परंतु या काळात फक्त मुलाखती झाल्या . त्याला नोकरी लागली नाही . पुन्हा जेंव्हा पत्रिका तपासावयास घेतली त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे राहू चा नेपच्यून बरोबर केंद्र योग्य आहे ( ९४ अंश ) यामुळे घटना   घडली नाही . यावर महाजनांनी  मार्गदर्शन करावे. 

म्हणून मी फक्त विदशा बदलली . राहू च्या ऐवजी रवी ची विदशा घेतली कारण रवी सर्वच म्हणजे २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे . रवीचे कार्येशत्व ---

 ( या पत्रिकेत फक्त मंगल आणि रवी च २,६,१०,११ चे कार्येशत्व दाखवितात . )

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (2)   (8)   
It's N.Swami :-------- Mercury:- (2)   6     Mars-Yuti  (2)   (3) (10) (11)  Jupiter-Drusht  (6)   (12)
It's Sub :------------ Mercury:- 2   6     Mars-Yuti  2  3 10 11  Jupiter-Drusht  6  12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   1 2     Venus-Drusht  (1)   4 (5) (9)
Itself aspects :------ 9

गुरु महादशा मंगल अंतर्दशा व रवी विदशा चा कालावधी येतो १७/८/२०२० ते ३/९/२०२०. 

त्याला सांगताना ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नोकरी लागेल. असे सांगितले . 

याप्रमाणे जातक दिनांक ११/८/२०२० रोजी  नोकरीवर रुजू झाला . मी सांगितलेल्या कालावधी पेक्षा सहा दिवस अगोदर रुजू झाला आहे . हा सहा दिवसाचा फरक अयनांश आणि अक्षांश रेखांश मधील फरकामुळे पडू शकतो. 


शुभम भवतु !!!

Wednesday 22 July 2020

नोकरी ----

एका जातकाच्या मित्राचा मुलगा कॅनडा मध्ये नोकरी करत आहे . मागील महिन्यात तेथोल त्याची नोकरी गेली. तिथेच नोकरीचे प्रयत्न करीत असताना  . त्याला दोन कंपनी च्या नोकरीचे ऑफर लेटर आले आहे .दोन्ही  कंपनी चान्गल्या  आहेत . यापैकी कोणती निवडावी असा त्याच्या मनात गोंधळ उडाला आहे . जातकाला मी विचारले त्याचा फोन केंव्हा येणार आहे . तो म्हणाला आज रात्री ८-३० वाजता. (२२/७/२०२०)  मी म्हणालो फोन आला कि त्याच्या कडून दोन कंपनीसाठी दोन वेगवेगळे नंबर घ्या . ( १ ते २४९ या पैकी ) काळ रात्री ९-०० वाजता जातकाचा मला व्हाट्सअप वर मेसेज आला . त्यामध्ये दोन कंपनीसाठी दोन वेगवेगळे नंबर होते . ते खालीलप्रमाणे....

१) LYFT कंपनी -------------१४२
२) रॉयल बँक ऑफ कॅनडा ---१२१

मी हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवायचे ठरविले

१) ऑपशन थेअरी ----

ह्यासाठी मी प्रश्न सोडवितानाचे रुलिंग प्लॅनेट घेतले

शनी* गुरु , केतू  , रवी  , बुध

गुरु व शनी वक्री  आहेत . म्हणून गुरु व शनी विचार केला नाही . तसेच केतू गुरूच्या राशीत आहे म्हणून त्याचा सुद्धा विचार केला नाही . राहिले फक्त रवी व बुध . यांच्या राशी अंकाची बेरीज घेतली ----

रवी ------५
बुध ---३+६=९

-------------------
                 १४
रुलिंगमध्ये बुद्ध आला आहे म्हणूनत्यातून ३ वजा केले .   १४- ३ =११
पर्याय फक्त दोनच आहेत म्हणून ११ या संख्येला २ ने भागले

११ / २ =  भागाकार ५ व बाकी १ शिल्लक

म्हणून पहिला पर्याय   LYFT  कंपनी . हे उत्तर आले .


२) कृष्णमूर्ती सब चे कोष्टक

पहिली कंपनी चा नंबर १४२ व दुसऱ्या कंपनीसाठी १२१ नंबर आहे .
 याचे कोरुलर घेतले म्हणजे राशी स्वामी , नक्षत्र स्वामी , उपनक्षत्रस्वामी

१) नंबर १४२ ---शुक्र , गुरु , केतू
२) नंबर १२१---बुध , मंगल , मंगल

या दोघांची रुलिंग प्लॅनेट बरोबर केली

रुलिंग प्लॅनेट ----शनी * गुरु , केतू , रवी  , बुध
 जास्तीतजास्त ग्रह कोणत्या पर्यायाला जुळतात ते पाहिले

पहिला पर्याय नंबर १४२ या मधील गुरु व केतू रुलिंगमध्ये आहेत व दुसरा पर्याय नंबर १२१ या मधील फक्त बुध  रुलिंग मध्ये आहे .

पहिल्या पर्यायचे दोन ग्रह जुळतात. दुसऱ्या पर्यायाने एक च ग्रह जुळतो. म्हणून पहिला पर्याय हेच उत्तर

LYFT . दोन्ही पद्धतीने एकाच उत्तर येते.

शुभम भवतु  !!!

Monday 20 July 2020

जन्मवेळ काढणे ----

                         एक स्त्री जातक सद्या कॉलेजचे शिक्षण घेत आहे . ती फोनवर बोलत होती ... म्हणाली माझ्या भावाची पत्रिका पाहाल का ? मी म्हणालो का नाही . ती म्हणाली त्याची जन्मतारीख आहे पण जन्मवेळ नाही . मी म्हणालो आईला विचार , तिला माहित असेल . आई म्हणाली त्याच्यावेळी मी बेशुद्ध होते नक्की केंव्हा जन्म झाला ते मलाही माहित नाही. त्यावेळेची स्थिती फार नाजूक होती. . मी म्हटले ठीक आहे . मला जन्मतारीख व जन्मस्थळ सांग . तिने खालीलप्रमाणे सांगितले

दि ---१९ / १० /२००२ वेळ रात्री १२-३० ते ४-०   स्थळ --अ  १६,४२  रे ७४,१४

कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेटवरून जन्मवेळ शोधात येते . मी कुंडली काढतेवेळी त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले
दि १७ / ७ /२०२० वेळ २०-५९-१८

लग्न नक्षत्रस्वामी  मंगळ , लग्न --शनी ,  नक्षत्र मंगल , रास शुक्र , वार --शुक्र

त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट होते ...

मंगळ *  शनी, मंगळ , शुक्र , शुक्र

जातकाने दिलेल्या वेळेत कोणती लग्ने  होती ते पंचागावरून पहिले

कर्क --००-००-३२ ते २-१२-१५

सिंह --२-१२-१५ ते ४-१८-२१

जातकाने दिलेले वेळेत फक्त हि दोन लग्ने होती . कर्क लग्नाचा स्वामी चंद्र व सिंह लग्नाचा स्वामी रवी . या दोनपैकी एकही  रुलिंग मध्ये नाही . आता प्रश्न पडला कोणते लग्न असेल. थोडा विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जातकाने रात्रीची वेळ दिलेली आहे . याचा अर्थ रुलिंगमध्ये चंद्र यावयास हवा . चंद्र कोणत्या प्रकारे येऊ शकतो.
१) रुलिंग पाहतेवेळी चंद्र लग्नतत्  असेल तर ...
२) किंवा चंद्राची लग्न स्थानावर दृष्टी असेल तर ...
३) किंवा रुलिंगमधील  कोणत्या तरी एका ग्रहाशी चंद्राची युती असेल तर ...

वरील पर्याय पाहता , एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लग्नात चंद्र नाही, तसेच लग्नावर चंद्राची दृष्टी नाही . फक्त रुलिंग मधील शुक्र ग्रहाबरोबर चंद्राची युती आहे  ( चंद्र २३,४५  व शुक्र  १९,१८ )

म्हणून चंद्र रुलींग मध्ये  घेतला

मंगळ *  शनी, मंगळ , शुक्र , ( चंद्र )  शुक्र

रुलिंग मध्ये चंद्र असल्यामुळे जातकाचे लग्न कर्क घेता येईल . कर्क राशी मध्ये पुनर्वसू  ( गुरु ) पुष्य ( शनी ) व आश्लेषा  ( बुद्ध ) नक्षत्रे आहेत यापैकी शनी आपणाला नक्षत्रस्वामी म्हणून घेता येईल . आता फक्त सब व सब सब निवडायचा . मंगल दोन वेळा आला आहे म्हणून खालील दोन लग्ने घेता येतील .

कर्क लग्न शनी नक्षत्र मंगळ सब व मंगळ सब सब
किंवा

कर्क लग्न शनी नक्षत्र मंगळ सब व शुक्र सब सब

यापैकी कोणते घ्यावे ? रुलिंग मध्ये शनी आहे म्हणून मी दुसऱ्या पर्यायाचा विचार करायचे ठरविले .

कर्क लग्न शनी नक्षत्र मंगल सब शुक्र सब सब

कॉम्पुटर मधील ट्रांझिटस ऑपशन वापरून वरील लग्न केंव्हा उदयास येते ते पहिले
जातकाची वेळ येते   ००-५७-००

याठिकाणी वाचक शंका घेतील  की शनी वक्री असताना लग्नशुधी साठी शनी का घेतला?  येथे वेळ रात्रीची असल्यामुळे चंद्र घ्यावा लागला.कर्क राशीमध्ये शनी चे नक्षत्र आहे. रुलिंग मधील दुसरा कोणताच ग्रह कर्क राशीमध्ये नाही. म्हणून या ठिकाणी वक्री ग्रहाचा नियम शिथिल केला.

या पत्रिकेत लग्नाचा सब मंगल आहे सब मंगळाची चंद्रावर पूर्ण दृष्टी आहे म्हणजे आपण काढलेली वेळ बरोबर आहे . ( चंद्र मिन ४ अंश २० कला व मंगळ कन्या ८ अंश १० कला ) सब चंद्र संबंध थेअरी प्रमाणे जन्मवेळ बरोबर आहे .

 
हि वेळ वापरून मी कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली . जातक सद्या इ १२ वि पास  झाला आहे .
 परंतु इ १० वी   पर्यंतचे शिक्षण घरापासून दूर ठिकाणी झाले आहे .

या पत्रिकेत चतुर्थाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 11   7 8  
It's N.Swami :-------- Mars:- (2)   5 (10)  Cusp Yuti: (3)    
It's Sub :------------ Sun:- 3   2  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (2)   5 (10)  Cusp Yuti: (3)    
Itself aspects :------ 6 2 9

शिक्षणासाठी २ भाव अनुकूल आहे ३ भाव घरापासून दूर ठिकाण दर्शवितो . .

शुभम भवतु !!!

Thursday 18 June 2020

प्रेमविवाह--२

                                गेल्यावर्षीची डायरी चाळत असताना त्यातील एका कुंडलीने लक्ष वेधून घेतले . हि प्रेमविवाहाची पत्रिका होती. ती मी संपूर्ण सोडविली होती. परंतु तो विवाह झाला कि नाही ते कळले नव्हते . म्हणून मी मेसेंजरवर संपर्क साधला . दोन दिवसांनी तिने सांगितले विवाह झाला आहे . मी म्हटले त्याच मुला शी विवाह झाला का ? म्हणाली त्याच मुला शी झाला . मी विचारले केंव्हा झाला ? तिने २८ जून २०१९ रोजी झाला . मी माझी कुंडली तपासून पाहिली तर  . मी दिलेल्या कालावधीतच विवाह झाला आहे . हकीकत अशी होती ..... एका मुलीने मेसेंजर वर माझ्याशी संपर्क साधला होता. म्हणाली माझा प्रेमविवाह होईल का ? मी म्हटले मला दोघांच्या कुंडल्या लागतील ( बर्थ डिटेल्स ) ती म्हणाली मी देते . तिने जेंव्हा मला बर्थ डिटेल्स दिले तेंव्हा माझ्या लक्षात आले कि मुलीपेक्षा मुलगा पांच वर्षांनी लहान आहे . मुलगी नोकरी करत होती  व मुलगाही त्याच गावात नोकरी करत होता . मुलीला वडील नव्हते आई होती ती पण आजारी होती दोन भाऊ होते . हिने तिच्या विवाहाबद्दल घरी सांगितले तेंव्हा भावांनी  विरोध केला .मुलाकडील  लोकांना मान्य होते . तिच्या नावावर शेती होती . भाऊ म्हटले तुझ्या नावावर असलेली जमीन आमच्या नावावर करून दे . तिने त्याला संमती दर्शविली . भावांनी तिच्याकडून शेती स्वतःचे नावावर करून घेतली . आणि म्हणाले जा ..... जमीन नावावर झाल्यानंतर भाऊ उलटले . भाऊ विवाह करून द्यायला तयार नव्हते . मुलीच्या आत्यानी मध्यस्थी केली त्यामुळे भाऊ विवाह करून द्यायला तयार झाले . दरम्यान मुलीच्या आईचे   निधन झाले . नंतर दोन महिन्यांनी मुलीचा विवाह झाला . २८ जून २०१९ .

दि 26 / --- /1985    वेळ 10-20 सकाळी    अ 19,58    रे 79,18

 लग्नाचा सब चंद्रच आहे , तसेच लग्नाचा सब सब शुक्र  आहे . शुक्राचा सब मंगळ आहे व चंद्राचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे . म्हणजे कुंडलीची वेळ बरोबर आहे .

प्रेम विवाह --- सप्तमाचा सब पंचमाचा कार्येश असेल व पंचमाचा सब सप्तमाचा कार्येश असेल तर प्रेम विवाह  होतो .

ह्या पत्रिकेत सप्तमाचा सब राहू आहे . ज्यावेळी 7 चा सब राहू असतो त्यावेळी विवाह विजोड असतो . म्हणजे रूप ,रंग ,उंची ,शिक्षण ,घटस्फोटित किंवा वय ( मुलगी वयाने मोठी असते ) किंवा     आंतरजातीय ,आंतर धर्मीय यापैकी काहीतरी एक तरी फॅक्टर असतो . राहूचे कार्येशत्व ---                                                                                   PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 2       Rashi-Swami Mars 8   3 10  Mars-Drusht  8  3 10
It's N.Swami :-------- Ketu:- (8)      Rashi-Swami Venus (10)   4 9  Mars-Yuti  (8)   (3) 10
It's Sub :------------ Mercury:- (10)   (5) 8  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (10)   (5) 8  
Itself aspects :------ 9                                                                                                                                                                                                                                                                                                        7 चा सब राहू पंचमाचा कार्येश आहे                    आता पंचमाचा सब पाहू . पंचमच सब गुरु आहे

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (12)   2 11  
It's N.Swami :-------- Mars:- (8)   (3) 10     Ketu-Yuti  (8)    Rahu-Drusht  (2) 
It's Sub :------------ Mars:- 8   3 10     Ketu-Yuti  8    Rahu-Drusht  2 
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (2)      Rashi-Swami Mars (8)   (3) 10  Mars-Drusht  (8)   (3) 10
Itself aspects :------ 6 4 8            

गुरु हा 7 चा कार्येश नाही. परंतु पंचमाचा सब गुरु 2,3,8,12 चा    कार्येश आहे      ज्यावेळी पंचमाचा सबचा संबंध    राहू मंगल शुक्र हर्षल शी असतो आणि 5,8,12 शी संबंधित असतात त्यावेळी शारीरिक आकर्षणमुळे मुले एकत्र येतात. असे माझ्या वाचनात आले आहे . याठिकाणी पंचमाचा सब गुरु,  राहू मंगलशी संबंधित असून 8,12 चा कार्येश आहे      विशेष म्हणजे सब गुरु मंगळाच्या नक्षत्रात आहे मंगल प्लूटो पूर्ण युतीत आहे . तसेच 4 थ्या पायरीवर राहू प्लूटो पूर्ण प्रतियोग आहे  (179.4). प्लूटो  या ग्रहाने  आतापर्यंत कधीच  अनुकूलता दर्शविली नाही.     म्हणून मला या विवाहाबद्दल साशंकता आहे


आता दशा पाहू--- कुंडली पाहतेवेळी  गुरु महादशा मध्ये रवी अंतर्दशा चालू आहे गुरुचे कार्येशत्व ----         गुरुचे कार्येशत्व वर आपण पहिलेच आहे . अंतर्दशा रवीचे कार्येशत्व ---                                                                                                                                                                                                                                   PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (11)   (7)  Cusp Yuti: (11)    
It's N.Swami :-------- Ketu:- (8)      Rashi-Swami Venus (10)   4 9  Mars-Yuti  (8)   (3) 10
It's Sub :------------ Saturn:- (9)   (1) 12  
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (9)   (1) 12  
Itself aspects :------ 5                                                                                                                                                                                                                                                                                                          रवी 3,7,8,9,11 चा कार्येश आहे अनुकूल आहे . रवी अंतर्दशा 30 / 8 /2019 पर्यंत आहे                                                                                                                                                                                                                गुरु  2,3,8,  रवी 3,7,8,9 11 चा कार्येश आहे ह्यात 5 भाव नाही . सदर मुलीने   मे  2019 मध्ये माझ्याशी संपर्क केला होता .त्यावेळी  बुध   केतू शुक्र विदशा शिल्लक आहेत  . 5 भाव दाखविणारे फक्त बुध  व केतू आहे मी छाया ग्रह केतूला प्राधान्य दिले . केतुचे कार्येशत्व ----                                                                                                                                                                                                                                                                      PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 8       Rashi-Swami Venus 10   4 9  Mars-Yuti  8  3 10
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Mars (8)   (3) 10  Mars-Drusht  (8)   (3) 10
It's Sub :------------ Mercury:- (10)   (5) 8  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (10)   (5) 8  
Itself aspects :------ 3  

गुरु रवी केतू दशेचा कालावधी येतोय    25 / 6 /2019 ते      12 / 7 /2019        याच कालावधीत सदर मुलीचा विवाह होईल असे सांगता येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                 कुंडलीचे विशेष म्हणजे प्लूटो ग्रह पूर्ण युतीत , प्रतियोगात आहेत.                                                              आता मुलाची पत्रिका पाहू ----
                                                                                                                                                                              दि 16   /---   / 1990  वेळ--19-56-40    अ    19,30   रे   80,16                                                                                                                                                                                                                                       मुलाच्या पत्रिकेत लग्नाचा सब     राहू आहे राहू मकर राशीत रवी नक्षत्रात आहे चंद्र गुरूच्या नक्षत्रात आहे गुरुची दृष्टी रविवार आहे .    लग्नाचा सब सब शनी आहे व चंद्राचा सब शनी आहे   जन्मवेळ बरोबर आहे .                         मुलाच्या पत्रिकेत सप्तमाचा सब राहू आहे राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----                                           
 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (8)      Rashi-Swami Saturn (7)   8 (9) (10)
It's N.Swami :-------- Sun:- (5)   (4)  
It's Sub :------------ Venus:- (5)   5 12  Cusp Yuti: (6)    
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   8 (9) (10)  
Itself aspects :------ 2         

सप्तमाचा सब राहू 4,5,6,7,8,9,10 चा कार्येश आहे सप्तमाचा सब राहू 5,7,9 चा कार्येश आहे .
आता पंचमच सब पाहू. पंचमाचा सब  बुध  आहे ---                                                                                                                      
  PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 6   1     Mars-Drusht  12  6 11
It's N.Swami :-------- Saturn:- (7)   8 (9) (10)  
It's Sub :------------ Rahu:- (8)      Rashi-Swami Saturn (7)   8 (9) (10)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   (4)  
Itself aspects :------ 12                               

पंचमाचा सब बुद्ध   4, 5,7,8,9,10      चा कार्येश आहे .    
मुलाच्या पत्रिकेत पंचमाचा सब बुध  सप्तमाचा कार्येश आहे . मुलाच्या पत्रिकेत सुद्धा रवी प्लूटो युती आहे .
हा प्रेम विवाह  होणार हे नक्की सांगता येईल.        


 शुभम भवतु   !!!      

Tuesday 16 June 2020

नोकरी ---

                   लंडन हुन एका परिचित स्त्रीचा मेसेंजर वर एक मेसेज , ...... मला म्हणाली माझ्या नवऱ्याचे  तुम्ही सांगितलेले  भाकीत  बरोबर आले आहे. मलाही प्रशम विचारायचा  आहे . मला लंडन मध्ये जॉब केंव्हा लागेल ? कारण मला दोन मुले आहेत , आणि नवरा म्हणतो नोकरी नसेल तर भारतात परत जा . भारतात येऊन मी मुले सांभाळू का नोकरी करू. बर भारतात येऊन लगेच नोकरी लागेल असेही नाही . या आधी मी तास प्रयत्न केला होता . मला येथेच नोकरी मिळवायची आहे . तर मला येथेच नोकरी केंव्हा लागेल  ? मी म्हटले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग , तिने लगेचच ४६ हि संख्या सांगितली . ४६ ह्या संख्ये वरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली. तिचा  प्रथम मेसेज मला भारतीय वेळेनुसार सकाळी ९-५४ आला . दिवसाचा प्रथम प्रश्न हा रुलिंग वरून सोडवावा असा संकेत आहे म्हणून मी त्यावेळेचे रुलिंग घेतले ....

दि १६/६/२०२० वेळ १०-१६-१७

रुलिंग ---बुध *, चंद्र , केतू , मंगळ  , मंगळ

रुलिंगमध्ये बुध  येतो तेंव्हा दोन पर्याय द्यावेत असे अभ्यासले आहे 
म्हणून खालील दोन पर्याय निवडले

रवीचे भ्रमण --- १) मिथुन मंगल चंद्र केतू --- रवी ग्रह मिथुन राशी मधून मंगळाच्या नक्षत्रातून चंद्राच्या सब मधून व केतू  सब  सब मधून भ्रमण करेल   त्यावेळी नोकरी लागेल . म्हणजे साधारणपणे ६ अंश २५ कला ३३ विकला
रवी १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करतो. रोज एक अंश याप्रमाणे ६ दिवस लागतील . २१ किंवा २२ जून रोजी नोकरी लागेल
                       २) कर्क बुध  केतू मंगल --- रवी ग्रह कर्क राशीतून बुध  नक्षत्रातून केतू सब व मंगल सब सब तुन भ्रमण करेल त्यावेळी नोकरी लागेल . म्हणजे साधारणपणे १८ अंश ५२ कला ४७ विकला . रवी १७ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करतो. रोज एक अंश याप्रमाणे १८ अंश ५२ कला म्हणजे १९ अंश जाण्यासाठी ५ ऑगस्ट हि तारिख येईल . दोन पर्याय आले  १) २१ किंवा २२ जुन २०२०
                                               २)  ५ ऑगस्ट २०२० 


आता हाच प्रश्न नंबर कुंडली ने सोडवू ---

के.पी नंबर ४६  दि १६/६/२०२०                    वेळ १०-०८-४८

जातकाच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ----
चंद्र ---११ क.यु
केतू---६,७ क. यु गुरु ८,७ र दृष्ट १२,४
रवी ---१ क.यु
मंगळ ---१०

चंद्र ६,१०,११ चा कार्येश आहे . प्रश्न बरोबर आहे

नियम दशमाचा सब २,६,१०,११ चा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत नोकरी लागेल .

दशमाचा सब शुक्र आहे . शुक्राचे कार्येश

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (12)   (5) 12  
It's N.Swami :-------- Moon:- (11)   (2) (3)  Cusp Yuti: (11)    
It's Sub :------------ Rahu:- (12)    Cusp Yuti: (1)      Rashi-Swami Mercury (1)   1  Sun-Yuti  (12)   (4)
It's Sub's N.Swami :-- Mars:- (10)   6 11  Cusp Yuti: (10)    
Itself aspects :------ 6

शुक्राची ६ स्थानावर दृष्टी आहे . म्हणून शुक्र २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे . नोकरी लागणार हे निश्चित सांगता येईल . आता केंव्हा लागेल ह्यसाठी दशा पाहू. -----

प्रश्न पहाते  वेळी केतू महादशा मध्ये रवी ची अंतरदशा चालू होती. . १८ / ७ /२०२० पर्यंत  केतुचे कार्येशत्व काढू

---PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Jupiter (8)   (7)  Sun-Drusht  (12)   (4)
It's N.Swami :-------- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Jupiter (8)   (7)  Sun-Drusht  (12)   (4)
It's Sub :------------ Mars:- 10   6 11  Cusp Yuti: (10)    
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (8)   (7)  Cusp Yuti: (8)    
Itself aspects :------ 1

४ त्या पायरीवर गुरु अष्टम भावारंभी आहे म्हणजे त्याची दृष्टी द्वितीय भावारंभी आहे म्हणून केतू २,६,१० भावाचा कार्येश आहे . मूळ कुंडली चे लग्न मिथुन आहे, द्विस्वभाव राशीचे  आहे म्हणजे उशिरा म्हणून मी रवी ची अंतर्दशा सोडून दिली . त्या पुढील चंद्रची अंतर दशा घेतली चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे चंद्राची अंतर्दशा
१६ / २ / २०२१ पर्यंत आहे .

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 11   2 3  Cusp Yuti: (11)    
It's N.Swami :-------- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Jupiter (8)   (7)  Sun-Drusht  (12)   (4)
It's Sub :------------ Sun:- 12   4  Cusp Yuti: (1)       Rahu-Yuti  12    Mars-Drusht  10  6 11  Ketu-Drusht  6 
It's Sub's N.Swami :-- Mars:- (10)   6 11  Cusp Yuti: (10)    

चंद्र ६,१०,११ भावांचा कार्येश आहे . पढील अंतर्दशा  मी मन्गळाची निवडली मंगळ रुलिंग मध्ये आहे

मंगळाचे कार्येशत्व ----

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 10   6 11  Cusp Yuti: (10)    
It's N.Swami :-------- Jupiter:- (8)   (7)  Cusp Yuti: (8)    
It's Sub :------------ Venus:- (12)   (5) 12  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (11)   (2) (3)  Cusp Yuti: (11)    
Itself aspects :------ 3 12 4

मंगल २,१०,११ भावाचा कार्येश आहे

केतू महादशा चंद्रअंतर्दशा  मंगळाची विदशेचा  कालावधी येतो ५ / ८ /२०२० ते १७ / ८ /२०२०

आता गोचर भ्रमण पाहू --

५ / ८ / २०२० ते १७ / ८ / २०२० या कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल आहे .

चंद्र दर दोन दिवसांनी नक्षत्र बदलतो म्हणून नोकरीचा कारक शनी चे भ्रमण पहिले .

रुलिंग प्लॅनेट वरून आलेली तारीख व नंबर कुंडली वरून आलेली तारीख सारखीच येते .

शुभम भवतु  !!!

Monday 15 June 2020

नोकरी ---


                           मुंबई स्थित एक जातकाला  त्याच्या मुलासंबंधी प्रश्न विचारायचा होता. मी म्हटले मुलाला बोलू द्या. नंतर मुलगा फोनवर बोलू लागला . मला म्हटलं मला मराठी येत नाही . मी म्हटले तू कोणत्याही भाषेत बोल. तो म्हणाला हिंदीत बोलू का ? मी म्हटले ठीक आहे बोल . तो म्हणाला सर, मला दोन कंपनीकडून ऑफर आली आहे . माझा गोंधळ होतोय. कोणती निवडावी . एक आहे Selling Educational package  आणि दुसरी आहे  Dimond M erchant Secretary संदर्भात . यापैकी मी कोणती निवडावी ? 

मी हा प्रश्न ऑपशन थेअरी प्रमाणे सोडवू  असे ठरविले   म्हणून मी म्हटले दोन्ही कंपनी साठी एक संख्या सांग . त्याने पहिल्या कंपनीसाठी ३ संख्या सांगितली . व दुसऱ्या कंपनी साठी ९ हि संख्या सांगितली . 


हा प्रश्न मी दि १५/६/२०२० रोजी  वेळ १४-५२-४० वाजता सोडविला . प्रथम मी ह्या वेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले ते खालीलप्रमाणे 

 

मंगळ *  लग्न शुक्र , नक्षत्र बुध  , रास गुरु , वार   चंद्र ( सोमवार )

 

यामध्ये गुरु,  शुक्र  वक्री  आहेत म्हणून ते सोडून दिले  राहिले फक्त बुध  व चंद्र . रुलिंग साठी कमीतकमी  तीन ग्रह असले  पाहिजेत म्हणून मी लग्न नक्षत्र  स्वामी मंगळ घेतला .आता तीनही ग्रहांच्या राशींची बेरीज घेऊ 

 

मंगळ ---१+८=९

बुध -----३+६=९

चंद्र ----     ४=४

                  --------

                     २२

बेरीज २२ आली . पर्याय फक्त दोन आहेत . म्हणून २ संख्येने भागले . 

 

२२/२= भागाकार ११ बाकी ० आली .

 

 ज्यावेळी बाकी शुन्य येते त्यावेळी शेवटचा पर्याय निवडावा .  शेवटचा पर्याय आहे 

 

  Dimond Merchant Secretary.

 

हाच प्रश्न मी कृष्णमूर्तींच्या सब कोष्टकाप्रमाणे पहिला . 

प्रथम ३ व ९ या संख्येचे  राशीस्वामी , नक्षत्र स्वामी व उपनक्षत्रस्वामी घेतले 

 

संख्या ३=  मंगल केतू  रवी 

संख्या ९= मंगळ केतू बुध 

 

यांची तुलना रुलिंगमधील  ग्रहा बरोबर केली 

 

रुलिंग मधील ग्रह मंगळ ,बुध ,चंद्र 

 

दोन्ही संख्येनुसार पहिले तर मंगल केतू समान आहेत . रुलींग मध्ये मंगळ आहे . फक्त फरक रवी व बुध  मध्ये आहे रुलिंग मध्ये बुध  आहे रवी नाही . म्हणून ९ या    संख्येचा पर्याय  बरोबर आहे . दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले   Dimond Merchant Secretary.

सदर जातकाच्या मुलाला दुसरा पर्याय निवडण्यास सांगितले . 

 

शुभम भवतु !!!

Tuesday 9 June 2020

संतती ----

बेळगाव  हुन एक स्त्रीचा फोन ..... सर माझे लग्न होऊन ५ वर्षे झाली अद्याप संतती झाली नाही . सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत . तरीसुद्धा संतती होत नाही . फक्त मासिक धर्म दोन दोन महिन्यांनी कधी दीड महिन्यात येतो. त्यासाठीं  ट्रीटमेंट चालू आहे . मी म्हटले तुमचे बर्थ डिटेल्स द्या . तिने खालीलप्रमाणे डिटेल्स दिले ......
ज्यांना पत्रिकेची पडताळणी करावयाची असेल त्यांनी व्यक्तिगत मेसेंजर वर संपर्क करावा

दि  १४ / -- / १९९० वेळ रात्री ११-५०  स्थळ अ १९,४  रे ७२,५३

पत्रिकेची वेळ सब चंद्र संबंध थेअरी व इंटर  कस्पल लिंक थेअरी प्रमाणे बरोबर आहे .
 प्रथम विवाह पाहू ---सप्तमाचा सब २,७,११ चा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशे मध्ये विवाह होतो.

विवाह ११/६/२०१५ साली झाला . त्यावेळी शुक्र राहू राहू गुरु दशा होती

शुक्र---१,२,३,५,१०
राहू----३,५,६,११,१२
गुरु---- १,२,४,७,९

विवाहाच्या वेळी  २,५,७,११ भाव कार्येश होते त्याच बरोबर १,४,६,१०,१२ हे विरोधी भाव सुद्धा कार्यान्वित होत होते .
संतती-- पंचम भावाचा सब २,५,११ या भावा   पैकी चा कार्येश असेल तर २,५,११ च्या  संयुंक्त दशेमध्ये संतती होते  तसेच पंचम भावाचा सब किंवा सब चा नक्षत्रस्वामी बहुप्रसवा राशीत ( कर्क, वृश्चिक, मिन ) असून २,५,११ पैकी चा कार्येश   असेल तर एकापेक्षा  जास्त संतती होतील      पंचमच सब वंध्या राशीत ( मेष,मिथुन सिंह कन्या ) असेल तर संतती होण्याची शक्यता खूप कमी असते . पंचमाचा सब अल्प अथवा माध्यम प्रसव राशीत असेल तर एखादीच संतती होईल.        या पत्रिकेत पंचमाचा सब मंगल आहे मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---


PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (2)   5 12  
It's N.Swami :-------- Mars:- (2)   5 12  
It's Sub :------------ Mercury:- 5   7 10  Cusp Yuti: (5)    
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   (6) (11)  Cusp Yuti: (3)       Jupiter-Drusht  (7)   1 4
Itself aspects :------ 9 6 10


 मंगल २,३,५,७,११ या भावाचा कार्येश आहे हे सर्व भाव अनुकूल आहेत संतती होणार हे निश्चित सांगता येईल . येथे बुध  प्लूटो प्रतियोग आहे (१७६. ९अंश )          आता केंव्हा होणार यासाठी दशा  पाहू . मी पत्रिका पहिली तेंव्हा     शुक्र महादशा गुरु अंतर्दशा चालू होती. गुरु अंतर्दशा डिसेंबर २०२० पर्यंत होती. येणाऱ्या सहा महिन्यात संतती होणार नाही म्हणून मी पुढील अंतर्दशा शनी ची घेतली शुक्र व शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----                                                                                                                                                                                     PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 3   6 11  Cusp Yuti: (3)       Jupiter-Drusht  7  1 4
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Saturn (1)   2 3
It's Sub :------------ Ketu:- 8       Rashi-Swami Moon 12   8
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (5)   7 (10)  Cusp Yuti: (5)    
Itself aspects :------ 9
                                                                                                                                                                                                                                                                                                                                        PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (1)   2 3  
It's N.Swami :-------- Sun:- (4)   (9)  
It's Sub :------------ Jupiter:- (7)   1 4  Cusp Yuti: (7)    
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (2)      Rashi-Swami Saturn (1)   2 3
Itself aspects :------ 8 4 11

शुक्र २,३,५ चा कार्येश आहे व शनी २,७,९ चा कार्येश आहे . ह्यामध्ये ११ भाव लागत नाही ११ भाव दाखविणारे                                                                                                                                                               
मंगल राहू बुध  हे तीन ग्रह आहेत . मी बुध  विदशा निवडली बुध  पंचम स्थानातं आहे . बुधा चे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 5   7 10  Cusp Yuti: (5)    
It's N.Swami :-------- Venus:- (3)   (6) (11)  Cusp Yuti: (3)       Jupiter-Drusht  (7)   1 4
It's Sub :------------ Jupiter:- (7)   1 4  Cusp Yuti: (7)    
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (2)      Rashi-Swami Saturn (1)   2 3
Itself aspects :------ 11
                                                                                                                                                                    बुद्ध २,५,११ या तीनही भावाचा कार्येश आहे . शुक्र शनी बुध  दशेमध्ये संतती होईल
हा कालावधी येतो २६ / ६ /२०२१ ते ७ / १२ /२०२१          
                                                                                                                                                                       हाच प्रश्न मी नंबर कुंडली प्रमाणे सोडविला . तिच्याकडून एक के.पी नंबर घेतला तिने ९७ नंबर दिला . यानुसार मी कुंडली तयार केली . दि २५ / ५ /२०२०  वेळ-१०-२४-३४ स्थळ अ १७, ५९ रे ७४,२६                                         
रुलिंग ---  शनी* चंद्र , राहू , बुध  , चंद्र           

या नंबर कुंडलीमध्ये पंचमचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --                                            
                                                                                                  
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 10       Rashi-Swami Mercury 10   2 11  Moon-Yuti  10  12
It's N.Swami :-------- Mars:- (6)   4 9  Cusp Yuti: (7)    
It's Sub :------------ Moon:- 10   12     Rahu-Yuti  10    Ketu-Drusht  4 
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (10)      Rashi-Swami Mercury (10)   (2) (11)  Moon-Yuti  (10)   (12)
Itself aspects :------ 5                                                                                                                                                                                                                                                                                                          राहू २,५,७,११ भावाचा कार्येश आहे . संतती होणार हे निश्चित सांगता येईल . आता केंव्हा होईल ह्यासाठी दशा पाहू .     प्रश्न कुंडलीचा कालावधी साधारणपणे एका वर्षाचा धरतात परंतु संततीसाठी २-३ महिने जास्त धरावेत . कारण आपण काढलेल्या कालावधी मध्ये जर ५  पेक्षा  जास्त महिने व्यवस्थित  पार पडले तर ७,८,९ व्या महिन्यात प्रसूती केंव्हाही  होऊ शकते .   कुंडली पाहतेवेळी राहूमध्ये गुरु      अंतर्दशा एप्रिल २०२२ पर्यंत आहे . राहू गुरु चे कार्येशत्व खालील प्रमाणे                                                                                                                                                                                                                                                                                                     PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 10       Rashi-Swami Mercury 10   2 11  Moon-Yuti  10  12
It's N.Swami :-------- Mars:- (6)   4 9  Cusp Yuti: (7)    
It's Sub :------------ Moon:- 10   12     Rahu-Yuti  10    Ketu-Drusht  4 
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (10)      Rashi-Swami Mercury (10)   (2) (11)  Moon-Yuti  (10)   (12)
Itself aspects :------ 5

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (5)   5 (8)     Saturn-Yuti  (5)   6 (7)
It's N.Swami :-------- Sun:- (9)   (1)     Mars-Drusht  (6)   4 9
It's Sub :------------ Saturn:- (5)   6 (7)     Jupiter-Yuti  (5)   5 (8)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (9)   (1)     Mars-Drusht  (6)   4 9
Itself aspects :------ 12 10 2                                                                                                                                 
     राहू २,५,११ चा कार्येश आहे गुरु २,५,७,९ चा कार्येश आहे . दोन्ही अनुकूल आहेत . विदशा निवडताना जी सर्व भावाची कार्येश असेल ती निवडावी चंद्र २,५,११ चा कार्येश आहे . आणि रुलिंगमध्ये चंद्र आहे  म्हणून मी चंद्र विदशा निवडली . चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --                                                                                                                                                                                                                                                            PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 10   12     Rahu-Yuti  10    Ketu-Drusht  4 
It's N.Swami :-------- Rahu:- (10)      Rashi-Swami Mercury (10)   (2) (11)  Moon-Yuti  (10)   (12)
It's Sub :------------ Jupiter:- (5)   5 (8)     Saturn-Yuti  (5)   6 (7)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (9)   (1)     Mars-Drusht  (6)   4 9
Itself aspects :------ 5                                                                                                                                                                                                                                                                                                          महादशा अंतर्दशा विदशा  मध्ये ६,८,१२ भाव सुद्धा कार्यान्वित झाले आहेत खूप काळजी घेतली पाहिजे .                                                                                                                                                                                 राहू महादशा गुरु अंतर्दशा चंद्र विदशा  १२ / ८ / २०२१ ते २४ / १० /२०२१  या कालावधीत संतती येईल.                                                                                                                                                                                     या कालावधीत गोचर अनुकूल असेल तरच संतती होईल. गोचर भ्रमण खालील कालावधीत अनुकूल आहे .                                                                                                                                                                                  २ सप्टेंबर २०२१ ते २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत गोचर अनुकूल आहे . 
मूळ कुंडलीवरून आलेला कालावधी व प्रश्न कुंडलीवरून आलेला कालावधी मध्ये साम्य आहे . याचकाळात संतती होईल असे निश्चित सांगता येईल.                                                                                                                                                                                                                                                                                 शुभम भवतु  !!!                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  

Monday 8 June 2020

पुनर्विवाह होईल का ?


माझ्या परिचयाचे  एक जातक एक दिवस मला म्हणाले माझ्या मुलीचा घटस्फोट झाला आहे . सद्य ती नोकरीला आहे . पण आमच्या नंतर तिचे कसे होईल हि आम्हा उभयतांना काळजी लागून राहिली आहे . तिला एक मुलगा आहे . मुलगा आमच्याकडेच आहे . तिचा पुनर्विवाह होईल का ? तिच्या मुला सहित तिला स्वीकारणारा कोणी मिळेल का ? मी म्हटले तिचे जन्म टिपण आहे का ? ते म्हणाले मी ते बरोबर घेऊन आलो आहे .

दि   ३/९/ १९७५   वेळ  ६-४४-२५सकाळी  स्थळ अ  १७,५९  रे ७४,२६

सुधारित वेळ ६-४४-२५ सकाळी ( सब चंद्र संबंध थेअरी व  कस्पल इंटर लिंक थेअरी प्रमाणे )

विवाह---९/७/२०००
घटस्फोट सप्टेंबर २००८

प्रथम आपण विवाह व घटस्फोट ची पडताळणी करून पाहू
विवाह ज्यादिवशी झाला त्यावेळी बुध  गुरु गुरु दशा होती

सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ चा कार्येश असेल तर २,५,७,८,११ च्या सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो.

बुध १,२,४,५,७,९,१०,११ चा कार्येश होता
गुरु ४,९,१०,१२ चा कार्येश होता

विवाहाच्या वेळी २,५,७,९,११ मुले विवाह झाला . पण त्याच बरोबर १,४,१०,१२ भाव हि कार्यान्वित झाले होते . म्हणून वैवाहिक सौख्य असमाधानकारक होते त्याची परिणीती घटस्फोटामध्ये झाली

घटस्फोट झाला त्यावेळी  केतू राहू बुध   दशा होती

सप्तमाचा सब १,४,६,१०,१२ भावांचा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेमध्ये घटस्फोट होतो. कायदेशीर घटस्फोटासाठी ३ भाव ऍक्टिव्ह होणे आवश्यक आहे .

केतू---४,९,१०,१२
राहू... ३,४,५,६,७,८,९,११
बुध ---१,२,४,५,७,९,१०,११

या ठिकाणी दशेमध्ये १,३,४,६,१०,१२  भावामुळे कायदेशीर घटस्फोट झाला

आता पुनर्विवाहाचा विचार करु -----

सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी बुध  असेल किंवा बुधा च्या नक्षत्रात, बुधा च्या युतीत , बुधा च्या दृष्टीत असेल किंवा द्विस्वभाव राशीत असेल आणि २,७,११ चा कार्येश असेल तर पुनर्विवाह होतो.

या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनी कर्क राशीत आहे. शनी चा नक्षत्रस्वामी शनीच आहे ,सब शनी चआहे
शनी कर्क राशीत आहे . कर्क रास हि चर तत्वाची आहे . शनी चा नक्षत्रस्वामी शनी च आहे . येथे कोठे हि द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही, म्हणून हीच दुसरा विवाह होणार नाही.

               काही जण द्वितीय विवाहाचा विचार द्वितीय स्थानावरून सुद्धा करतात.( प्रथम पती  / पत्नीचे मृत्यू स्थान ) द्वितीयेचा सब २,८,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो.

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 12   3 10  
It's N.Swami :-------- Ketu:- (9)      Rashi-Swami Venus (12)   3 (10)
It's Sub :------------ Rahu:- (3)      Rashi-Swami Mars (9)   (4) 9
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (8)   (5) 8  
Itself aspects :------ 7

शुक्र ८ चा कार्येश आहे परंतु शुक्र प्लूटो बरोबर ३८ अंशाचा अशुभ योग्य करीत आहे .तसेच तिसऱ्या पायरीवर मंगल नेपच्यून बरोबर १७८ अंशाचा प्रतियोग करीत आहे . ४ थ्या पायरीवर गुरु चा हर्षल बरोबर प्रतियोग (१७४ ) म्हणून विवाह होणार नाही

काही  जण द्वितीय विवाहाचा विचार नवम भावावरून करतात .
नवामाचा सब २,७,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो . नवामाचा सब गुरु आहे

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 8   5 8  
It's N.Swami :-------- Ketu:- (9)      Rashi-Swami Venus (12)   3 (10)
It's Sub :------------ Ketu:- 9       Rashi-Swami Venus 12   3 10
It's Sub's N.Swami :-- Sun:- (12)   1     Mars-Drusht  (9)   (4) 9
Itself aspects :------ 3 1 5

नावामाचा सब गुरु २,७,११ चा कार्येश नाही.. मंगल नेपच्यून प्रतियोग ( १७८ ) म्हणून द्वितीय विवाह होणार नाही .

त्यानंतर मी म्हटले अजून एक पर्याय आहे तो वापरून पाहू . ----

मी म्हणालो , मनामध्ये माझ्या मुलीचा पुनर्विवाह होईल का ? असा विचार करून ,  मन एकाग्र करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा . त्यांनी थोडावेळ विचार करून २०१ हि संख्या सांगितली . २०१ या संख्येवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .

दि -८ / ८ /२०१२ वेळ १९-०१-५८ स्थळ  --  अ १७,५९ रे  ७४,२६ के.पी. नंबर २०१

आता प्रश्न वडीलानी विचारला आहे म्हणून पंचमस्थान लग्न मानून कुंडली फिरवून घेतली पाहिजे

मनातील विचार जुळतो का ते पाहू---
                       चंद्र हा मनाचा कारक चंद्र पंचमाच्या लाभत म्हणजे तृतीय स्थानात आहे चंद्र पंचमापासून तृतीयेश आहे चंद्र केतू नक्षत्रात आहे केतू पंचमाचा व्ययात म्हणजे चतुर्थात आहे केतू शुक्राचे राशीत आणि शुक्र पंचमात आहे यावरून जातकला मुली बद्धल काळजी वाटते आहे .

                                 फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये सप्तमाचा सब राहू आहे राहू वृश्चिक राशीत आहे व त्याचा नक्षत्रस्वामी शनी आहे शनी तुला राशीत आहे . वृश्चिक रास स्थिर तत्वाची आहे व तुला रास चर तत्वाची आहे . येथे कोठेही बुध अथवा व्दिस्वाभाव राशीचा संबंध आलेला नाही . म्हणून दुसरा विवाह होणार नाही .

द्वितीय स्थानाचा विचार केला तर ----

द्वितीयेचा सब गुरु वृषभ राशीत व त्याच नक्षत्रस्वामी चंद्र मेष राशीत आहे . द्वितीयेचा सब २,८,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो.
 
 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (12)   (8) 
It's N.Swami :-------- Moon:- (11)   3 
It's Sub :------------ Saturn:- 4   9 10  Cusp Yuti: (5)       Mars-Yuti  4  6 7 11
It's Sub's N.Swami :-- Mars:- (4)   6 (7) 11  Cusp Yuti: (5)       Saturn-Yuti  (4)   (9) (10)
Itself aspects :------ 7 5 9

 द्वितीय भावाचा सब नक्षत्र लेव्हल वर ११ चा कार्येश आहे. परंतु ४ थ्या पायरीवर ४,७ १०  या विरोधी भावाचा कार्येश आहे .

नवामाचा सब २,७,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो .
 .नवमचा सब केतू आहे केतू फक्त ३ भावाचा कार्येश आहे म्हणून विवाह होणार नाही.

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 12       Rashi-Swami Venus 1   1 5 12
It's N.Swami :-------- Sun:- (3)   4  Cusp Yuti: (3)   
It's Sub :------------ Ketu:- 12       Rashi-Swami Venus 1   1 5 12
It's Sub's N.Swami :-- Sun:- (3)   4  Cusp Yuti: (3)   
Itself aspects :------ 7

 या सर्व  कुंडलीवरून दुसरा विवाह होणार नाही हे निश्चितपणे सांगता येईल. जन्माला येताना जे प्रारब्ध घेऊन येतो ते  भलें  चांगले असेल किंवा वाईट असेल तरी सुद्धा ते भोगले पाहिजे . ज्योतिषी  फक्त आपले भविष्य वाचतो . तो बदलू शकत नाही. फार फार तर येणाऱ्या समस्यांना धीराने तोंड देण्याची मानसिकता तयार करून घेऊ शकतो.

सदरचे जातक २०१२ साली माझ्याकडे आले होते , आता २०२० साल चालू आहे , अद्याप तिचा विवाह झालेला नाही.

शुभंम भवतु  !!!



Sunday 7 June 2020

प्रेम विवाह ---

                           बंगलोर हून आयटी क्षेत्रातील एक जातक फोनवर बोलत होता. माझ्या कंपनी मध्ये माझी कलिग्ज ने मला , ज्योतिष मार्गादर्शन कोणाकडून मिळू शकेल का? असा प्रश्न विचारला . मी आपले लेख फेसबुकवर वाचले होते त्यामुळे मला तुमचे नाव आठवले म्हणून तुंम्हाला फोन केला . . बर , पुढे  मी म्हणालो . ती म्हणाली माझ्यावतीने तूच त्यांना प्रश्न विचार . जातक म्हणाला माझ्या सहकार्याचे एका मुलाबरोबर अफेअर चालू आहे .( विद्यार्थी दशे पासून ) पण सद्या  त्यांच्यामध्ये वाद होत आहेत . मी म्हटले कशावरून वाद होत आहेत. तिला वाटतंय तो सद्या दुसऱ्याच मुलीबरोबर आहे. ती म्हणते हा माझ्याशी विवाह करेल का  ? का तो इतर ठिकाणी गुंतला आहे  ?  मी म्हटले मला दोघांचे बर्थ डिटेल्स लागतील  . तो म्हणाला ठीक आहे,   . मी तुम्हाला  डिटेल्स देतो . त्याने खालीलप्रमाणे डिटेल्स दिले .

जन्म तारीख २/--/९४  वेळ ७-५०  am  अ २१,०३ रे ७५,४६   ( मुलगी )

जन्मतारीख  ११/--/१९९५   सकाळी ११-२४   अ १९,५३ रे ७५,२०   (मुलगा )

प्रथम मुलीची पत्रिका पाहू --

हि सिंह लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब चा राशी स्वामी व चंद्र राशी स्वामी शुक्रच आहे . म्हणजे  पत्रिका बरोबर आहे
मुलीच्या पत्रिकेत पंचम व सप्तम चा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 3   5 8  
It's N.Swami :-------- Rahu:- (3)      Rashi-Swami Venus (1)   3 10
It's Sub :------------ Saturn:- 7   6 7  
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (3)      Rashi-Swami Venus (1)   3 10
Itself aspects :------ 9 7 11

४थ्या  पायरीवर राहू आहे . राहू गुरु नक्षत्रात आहे  गुरु ३,५,८ भावाचा कार्येश आहे . एकूण गुरु १,३,५,८ भावाचा कार्येश आहे . राहू प्लूटो च्या युतीत आहे (५. अंश ) गुरु  नेपच्यून बरोबर ७५. ३ च अशुभ योग्य करीत आहे . नेपच्यून मुले ह्या मुलीची फसवणूक होणार हे नक्की सांगता येईल. तसेच विवाह बाबतीत राहूच संबंध येत असेल विवाह कॉन्ट्रास्ट असतो. येथे मुलगी मुलापेक्षा ५ महिन्यांनी मोठी आहे .

प्रेम विवाह -- सप्तमाचा सब जर पंचमाचा कार्येश असेल तर अफेअर असते व पंचमाचा सब जर सप्तमाचा कार्येश असेल तर अफेअर चे रूपांतर विवाहामध्ये होईल

या पत्रिकेत पंचम व सप्तम भावाचा सब शुक्र च आहे सप्तमाचा सब शुक्र पंचमाचा कार्येश आहे. पण पंचमाचा सब शुक्र सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून हा प्रेमविवाह होणार नाही . प्रेमविवाहामध्ये जेंव्हा राहूच संबंध येतो त्यावेळी शारीरिक आकर्षण मुले एकत्र येतात .राहू प्लूटो युतीमुळे हा विवाह होण्याची शक्यता खूप कमी.

आता मुलाची पत्रिका पाहू ....

मुलाची पत्रिका मिन लग्नाची आहे . मुलाच्या पत्रिकेत लग्नाचा सब चंद्रच आहे म्हणून पत्रिकेची वेळ बरोबर आहे . मुलाच्या  पत्रिकेत सप्तमाचा सब मंगळ आहे . मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (6)   2 (9)  Cusp Yuti: (6)    
It's N.Swami :-------- Ketu:- (2)    Cusp Yuti: (2)      Rashi-Swami Mars (6)   2 (9)  Saturn-Drusht  (12)   11 12
It's Sub :------------ Jupiter:- (8)   (1) 10  Cusp Yuti: (9)       Venus-Yuti  (8)   (3) 8  Saturn-Drusht  (12)   11 12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   11 12  
Itself aspects :------ 12 9 1

सप्तमाचा सब मंगळ    १,२,३,६,८, ९ ,१२ भावाचा कार्येश आहे त्यातील ९ भाव हा पंचमापासून पाचवा आहे म्हणून अफेअर आहे असे म्हणता येईल . आता पंचमा च सब पाहू . पंचमाचा सब रवी आहे रवीचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (10)   6  
It's N.Swami :-------- Sun:- (10)   6  
It's Sub :------------ Sun:- (10)   6  
It's Sub's N.Swami :-- Sun:- (10)   6  
Itself aspects :------ 4

पंचमाचा  सब रवी फक्त १० भावाचा कार्येश आहे . पंचमाचा सब रवी सप्तम भावाचा कार्येश होत नाही सबब हा प्रेम विवाह होणार नाही असे म्हणता येईल . मुलाच्या पत्रिकेत खालील अशुभ योग्य होत आहेत.
गुरु प्लूटो ६.. ९ वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र प्लुटोच्या युतीत ( ३. ९ ) राहूचे हर्षल नेपच्यून बरोबर अनुक्रमे ७४.,८ , ७१. ७ . तसेच पंचमच सब रवी ची  हर्षल नेपच्यून बरोबर ५. ५ व २. ४ युती आहे .अजून एक गोष्ट अनुभवास येते ती म्हणजे जेंव्हा पंचमाचा संबंध दशम स्थानाशी येतो तेंव्हा ते ज्या ठिकाणी नोकरी करत असतात त्या ऑफिस मधील च एकाद्या  मुलीशी प्रेम संबंध होतात  या पत्रिकेत पंचम भावाचा सब १० चा कार्येश आहे .
त्यामुळे मुलगी म्हणते ते , तो दुसऱ्या मुलीबरोबर फिरत आहे ते बरोबर असावे .
वरील सर्व योगामुळे हा प्रेम विवाह होणार नाही असे खात्रीपूर्वक सांगता येईल . ह्या कुंडल्या दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे आल्या होत्या . अद्याप त्यांचा विवाह झाला नाही.

शुभम भवतु !!!

Monday 20 April 2020

Case Study--128 

प्रमोशन ---

 
  प्रशांतने माझ्याकडून बऱ्याच वेळा ज्योतिष विषयी सल्ला घेतला होता. त्याला त्याचा  अनुभव आला होता. प्रशांत एका MNC कंपनीत मार्केटिंग विभागात कामाला  आहे .. त्याचे काम हि चांगले आहे  वरिष्ठ त्याच्या कामावर खुश होते. .  म्हणून वरिष्ठ त्याची जबाबदारी वाढविण्याच्या विचारात होते . त्याच कंपनीतील एक दोघांचा परफॉर्मन्स फारसा चांगलं नव्हता. . वरिष्टांना त्याच्या कामाची पद्धत माहित होती. प्रशांतला जर वरील प्रमोशन  देऊ केले तर हा आणखी चांगले काम करेल असा त्यांना विश्वास वाटत होता. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. .प्रमोशन संदर्भातची कुणकुण प्रशांतला लागली होती . म्हणून त्याने मला प्रश्न विचारला , मला प्रमोशन मिळेल का? आणि केंव्हा मिळेल. ? मी म्हटले मनात हा विचार करून १ ते २४९ मधील एक संख्या सांग . त्याने थोडा विचार करून ६६ हि संख्या सांगितली . आजपर्यंत त्याने ज्याज्या वेळेला प्रश्न विचारला त्या त्या वेळेला त्याने ६० ते ७० मधीलच संख्या सांगितली होती. मी म्हटले प्रत्येक वेळेला ठराविकच संख्या कशा सांगतो ? तो म्हणाला माझ्या मनात त्याक्षणी जे येते तीच संख्या मी सांगत असतो. या संख्येनुसार कर्क लग्न येते. आणि कर्क लग्न येत असेल तर उत्तर होकारार्थी  द्यावे असा संकेत आहे .

दि ८ / ११ / २०१९  वेळ-११-४७-०३ स्थळ अ १७,५९ रे ७४,२६  के पी नंबर ६६

हि पत्रिका कर्क लग्नाची आहे .
  प्रमोशन --- दशमाचा सब किंवा नक्षत्रस्वामी २,६,१०,११ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत प्रमोशन मिळते त्याच बरोबर ३,५,९ भावांचा कार्येश असेल तर बदली होऊन प्रमोशन मिळेल. मा.श्री गोंधळेकर सर यांनी बदलीसाठी ३,१०,१२ भाव घ्यावेत असे सुचविले आहे .

या पत्रिकेत दशमाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 6       Rashi-Swami Jupiter 5   6
It's N.Swami :-------- Venus:- (5)   4 (11)  
It's Sub :------------ Moon:- (9)   (1) (2)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (5)   6  Cusp Yuti: (6)    
Itself aspects :------ 12



केतू १,२,५,,६ ९,११ भावाचा कार्येश आहे यापैकी ५,९ बदलीसाठी अनुकूल आहेत. व २,६,११ प्रमोशन साठी अनुकूल आहेत . याचा अर्थ प्रशांतला प्रमोशन मिळणार हे निश्चितपणे सांगता येईल. आता केंव्हा मिळणार यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील . मी ज्यावेळी प्रश्न पहिला त्यावेळी गुरु मध्ये राहू अंतर्दशा चालू होती.

गुरुचे कार्येशत्व ----


PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 5   6  Cusp Yuti: (6)    
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Jupiter (5)   6
It's Sub :------------ Ketu:- 6       Rashi-Swami Jupiter 5   6
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   4 (11)  
Itself aspects :------ 12 10 2

गुरु  ५ बदलीसाठी व ६,११ प्रमोशन साठी अनुकूल आहे . प्रश्न  कुंडलीचे लग्न कर्क आहे हे लग्न चर  तत्वाचे आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे . म्हणून राहू अंतर्दशा विचारात घेतली . राहूचे कार्येशत्व ----


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (4)   12
It's N.Swami :-------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (4)   12
It's Sub :------------ Venus:- 5   4 11  
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (7) (8) 9  
Itself aspects :------ 6


राहू १२ बदलीसाठी व ६ भाव प्रमोशन साठी अनुकूल आहे .

आता विदशा अशी  शोधावी लागेल ती ३,१०,११ ची कार्येश असेल . ३, आता ज्या घरात राहतो ते बदलण्यासाठी १०,११  प्रमोशनसाठी .

त्यापुढील विदशा मंगळाची आहे  . मंगळाचे कार्येशत्व ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (3)   5 (10)  Cusp Yuti: (4)    
It's N.Swami :-------- Mars:- (3)   5 (10)  Cusp Yuti: (4)    
It's Sub :------------ Saturn:- 6   7 8 9  
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   4 (11)  
Itself aspects :------ 9 6 10



मंगल ३, ५,१० ,११ या तीनही भावाचं कार्येश आहे .



हा कालावधी गुरु राहू मंगल येतो ५ / ११ /२०१९ ते २६ / १२ /२०१९



वरील कालावधीत प्रशांत ची बदली होऊन प्रमोशन मिळणार हे निश्चितपणे सांगतायेईल .

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्या वरिष्ठाने सांगितले तुझे प्रमोशन मंजूर झाले आहे . पुढील महिन्यात तुला नागपूरला जावयाचे  आहे तर त्या दृष्टीने तयारीला लाग . . प्रमोशन ऑर्डर नंतर पाठविण्यात येईल मी सांगितलेल्या कालावधीपेक्षा १० दिवसांनी वरिष्ठानी सांगितले आहे .
प्रशांत १ फेब्रुवारीला २०२० रोजी नागपूरला जॉईन झाला .


शुभंम भवतु !!!