संतती ---
माझ्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन ---- तो म्हणाला मला तुम्हाला भेटायचे आहे . मी त्याला रविवारी यायला सांगितले रविवारी सकाळी १० वाजता ती व्यक्ती आली म्हणाली मला एक प्रश्न विचारायचं आहे . मी म्हटले काय विचारायचे आहे . तो म्हणाला आमच्या लग्नाला ७ वर्षे झाली परंतु अद्याप संतती नाही; आमच्या दोघांच्या ट्रीटमेंट चालू आहेत . मार्च २०१८ मध्ये एक गर्भपात झाला आहे त्यानंतर काही नाही . मी म्हटले दोघांचे बर्थ डिटेल्स आहेत का ? हो, आहेत. मी ते लिहून घेतले . ते खालीलप्रमाणे --- प्रथम मी त्यांच्या पत्नीच्या पत्रिकेचा विचार करायचे ठरविले . कारण गर्भपात होतोय याचा अर्थ गर्भधारणा होतेय . .म्हणजे पतीकडे दोष असणार नाही. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ स्थिर राहत नाही . त्यामागे काय कार्यकारण भाव असावा हे पाहण्यासाठी स्त्री च्या पत्रिकेचा विचार प्रथम करायचे ठरविले .
दिनांक---२३/९/१९८६ वेळ-- १६-२० स्थळ अ १८,०७ रे ७५,०१
हि मकर लग्नाची कुंडली आहे . मी ज्यावेळी पत्रिका सोडवायला घेतली त्यावेळी खालील रुलिंग होते .
दि २२/११/२० वेळ १०-१८-४४
शुक्र * गुरु , मंगल , शनी , रवी
नियम --पंचमाचा सब जर २,५,११ भावाचा कार्येश असेल तर २,५,११ कार्येश ग्रहांच्या दशेत संतती होते .
या पत्रिकेत पंचमाचा सब शुक्र आहे . शुक्र रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9) (4) 9
It's N.Swami :-------- Rahu:- (2) Rashi-Swami Jupiter (1) 2 11 (12) Mars-Drusht (11) 3 10
It's Sub :------------ Moon:- 3 7 Cusp Yuti: (4)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (8) Cusp Yuti: (8)
Itself aspects :------ 4
शुक्र १,२,४,८,९,११,१२ चा कार्येश आहे . यातील २,९,११ संतती होण्यास अनुकूल आहेत पहिल्या दोन स्टेप प्रमाणे घटना घडते व ३,४ स्टेप मुले घटनेचे परिणाम दिसून येतात . शुभ कि अशुभ . पहिल्या दोन स्टेपमुळे गर्भधारणा झाली परंतु ३-४ स्टेप मध्ये ४,८ हे भाव पूर्ण विरोधी असल्यामुळे गर्भपात झाला ३-४ स्टेप मध्ये पूर्ण विरोधी भाव असल्यामुळे संतती होण्याची शक्यता नाही. या व्यतिरिक्त अजून काही कारणे आहेत
१) पंचमाचा सब शुक्र प्लूटो युतीत आहेत ( ६.५), शुक्राचा हर्षल बरोबर ३६.३ च अशुभ योग्य होत आहे तसेच ४ थ्या पायरीवर रवी चा प्लूटो बरोबर ३५. ७ चा व नेपच्यून बरोबर केंद्र योग्य ( ९२. ९) होत आहे
२) गर्भधारणा होतेय परंतु गर्भपात होतोय याचा अर्थ गर्भ स्थिर राहात नाही म्हणजे याठिकाणी चर राशीचा संबंध असावा . पंचमाचा सब शुक्र तूळ या चर राशीत आहे . सब , राहूच्या नक्षत्रात आहे राहू मिन या द्विस्वभाव व बहुप्रसव राशीत आहे . परंतु राहू २८ अंश ११ कला वर आहे . द्विस्वभाव राशीमध्ये चर व स्थिर दोन्ही तत्वे आहेत .पहिले १५ अंश स्थिर तत्वाचे , १५ ते ३० अंश चर तत्वाचे आहेत . राहू २८ अंश आहे म्हणजे राहू चर तत्वामध्येच आहे .
३) राहू शुक्र गुरु दशेत गर्भपात झाला त्यावेळी ----
राहू---५,६,८,१०
शुक्र ----१,२,४,८,९,११,१२
गुरु ----१,१०,१२
राहू शुक्र गुरु ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी आहेत . म्हणून गर्भपात झाला .
४) कुंडलीची भाषा --नाशिकचे प्रकाशन या पुस्तकात स्त्री पुरुषांचे प्रजनन क्षमता पाहण्याचे सूत्र आहे यासंबंधी माझे मित्र श्री काजरेकर सर, व सौ प्रज्ञा तिखे मॅडम यांनी फेसबुक वर यापूर्वी लेख लिहिले होते . यामध्ये स्त्री च्या बाबतीत चंद्र , मंगळ ( मासिक धर्म ) व गुरु (संतती ) यांच्या राशी अंश कला ची बेरीज करायची असते जो बिंदू येईल त्यावरून लग्न व नवमांश ठरवायचे जर लग्न व नवमांश सम असतील तर प्रजनन क्षमता बलवान असते . लग्न विषम व नवमांश सम असेल तर मध्यम बलवान ,( किंवा याच्या उलट ).लग्न व नवमांश दोन्ही विषम असतील तर प्रजनन क्षमता दुर्बल असते . या पत्रिकेत -----
रा अंश कला
चंद्र----२ , ०७ , १३
मंगळ --९ , २८ , ३४
गुरु ----११, २२ , ३९
---------------------
२३, २८ , २६
११,२८ ,२६ रास कुंभ व नवमांश मिथुन आहे . दोन्ही विषम असतील तर प्रजनन क्षमता दुर्बल असते याठिकाणी प्रजनन क्षमता दुर्बल आहे म्हणून संतती होणार नाही . अजून खात्री करण्यासाठी मी नंबर कुंडलीचा विचार करायचे ठरविले. . संबंधित स्त्री कडून मी एक नंबर घेतला स्त्री ने ४३ नंबर दिला .
दि २२/११/२० वेळ १०-३६-४१ फलटण
या पत्रिकेत पंचमाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व --
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12 Rashi-Swami Venus 5 12
It's N.Swami :-------- Mars:- (10) 6
It's Sub :------------ Jupiter:- 8 7 8 11 Saturn-Yuti 8 9 10
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6) (4)
Itself aspects :------ 6
राहू पूर्ण विरोधी भावांचा कार्येश आहे . सबब सदर स्त्रीला संतती होणार नाही असे खात्रीपूर्वक सांगता येईल. आता याला दुसरा पर्याय काय असू शकतो . दत्तक घेणे .
नियम--- पंचमाचा सब ५,४ या दोन्ही भावांचा कार्येश असेल तर दत्तक घेता येईल.
वरील मूळ पत्रिकेत पंचमाचा सब शुक्र आहे
PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9) (4) 9
It's N.Swami :-------- Rahu:- (2) Rashi-Swami Jupiter (1) 2 11 (12) Mars-Drusht (11) 3 10
It's Sub :------------ Moon:- 3 7 Cusp Yuti: (4)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (8) Cusp Yuti: (8)
Itself aspects :------ 4
शुक्र १,२,४,८,९,११ भावांचा कार्येश आहे . यात ५ भाव नाही . परंतु ९ भाव हा पंचमापासून पंचम येतो. म्हणून ९ भाव पंचम धरावयास काही हरकत नसावी . शुक्र ५व ४ या दोन्ही भावांचा कार्येश आहे . म्हणून सदर स्त्री दत्तक घेऊ शकते . महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा .
शुभंम भवतु !!!