कृष्णमूर्ति ज्योतिष: June 2019

Sunday 16 June 2019

Case Study --78

सर, नोकरी लागली बरं  का S  S  S
                              माझ्या प्रा.मित्राचा मुलगा एम टेक  झाला आहे . त्याने मला नोकरी केंव्हा लागेल ? असा प्रश्न विचारला होता. मी कुंडलीचा अभ्यास करून तुला जून मध्ये नोकरी लागेल असे   सांगितले होते . १५ जूनला त्याने मला  फोन करून सांगितले सर , तुम्ही सांगितलेल्या पिरियड मध्ये मला एमएनसी कंपनीत  नोकरी लागली .आहे .  ५ लाखाचे पॅकेज मिळाले . सोमवारी १० जून laकंपनीत जॉईन झालो आहे. तयाचे विवरण खाली देत आहे
जन्म तारीख १५/१/९२  वेळ- ५-१५ पहाटे    स्थळ अ १८,०९ रे ७४,३५
हि धनुलग्नाची  पत्रिका आहे. लग्नाचा सब शुक्र आहे व चंद्राचा नक्षत्र स्वामी शुक्रच आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे .
दशम भावाचा  चा सब २,६,१० भावाचा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते  .
या पत्रिकेत दशम भावाचा सब मंगल आहे . मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ...
मंगळ..१,बु यू १,१०
केतू..७,बू.१,१० बू दृष्ट १,१०
शनी...२,३
चंद्र...५,८,गु दृष्ट ९,४

मंगळ २,६,१० पैकी २,१० भावाचा आहे . नोकरी लागणार हे निश्चित झाले . आता केंव्हा लागेल यासाठी दशा पाहू . प्रश्न पाहतेवेळी मंगल महादाशेमध्ये रवी ची अंतर दशा चालू होती . मंगल ग्रहाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे मंगल रवी दशा २८/४/२०१९ पर्यंत आहे .

मंगळ..१, बू यू १,१०
केतू..७, बू १,१०
शनी..२,३
चंद्र..५,८ गु दृष्ट ९,४
मंगल २,१० भावाचा कार्येश आहे . मंगल दशा अनुकुल  आहे . कुंडलीचे धनु लग्न म्हणजे दविस्वभव रवी अंतर दशेमध्ये घटना घडणार नाही म्हणून पुढील चंद्राची  अंतर दशा घेतली

चंद्र..
शुक्र..१२,६,११
शनी..२,३
चंद्र..५,८ गु दृष्ट ९,४
 चंद्र २,६,११ चा कार्येश आहे
मंगळ २,१० चंद्र २,६,११ या ठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली पुढील विदशां मी राहू ची निवडली कारण पुढील मंगल विदशा विरोधी भावांची ( ५,९ )कार्येश आहे . म्हणून मी राहू ची विदशा  निवडली
राहू...
शुक्र..१२,६,११
शुक्र..
बुध...१,१० मंगळ युती १ केतू दृष्ट ७

राहू ६,१०,११ चा कार्येश
मंगळ चंद्र राहू २८/५/१९ ते २०/६/१९ या कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले

हाच प्रश्न मी नंबर कुंडली ने सोडविला . त्याला मन एकाग्र करून १ ते २४९ या मधील एक संख्या सांग असे सांगितले त्याने २२५ हि संख्या सांगितली . के.पी. नंबर २२५ प्रमाणे मी नंबर कुंडली तयार केली .
दि १६/३/१९ वेळ १९-२३-४२ स्थळ  Phaltan
कुंभ लग्न कुंडली..आहे .
चंद्र हा मनाचा कारक म्हणून मनातील विचार जुळतो का ते पाहू . या कुंडलीत चंद्र पंचमात असून षष्टेश आहे चंद्र गुरूच्या नक्षत्रात आहे गुरु दशमात असून लाभेश व धनेश आहे म्हणजेच चंद्र ५,६ १०,११,२ चा कार्येश आहे याचा अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे . प्रश्न  जेंव्हा मनापासून अतिशय तळमळीने विचारला जातो तेंव्हा त्याचे उत्तर बऱ्याचअंशी बरोबरच येते

दशम भावाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
शनी..१०,१२,११ क यू
शुक्र...११,४,९,१२ क यू
बुध..१ क यू
गुरु...१०,१० क यू मंगलदृष्ट २,३

शनी २,१०,११ च कार्येश
नोकरी लागणार हे निश्चित झाले आता केंव्हा लागेल यासाठी दशा पाहू..
माझ्याकडे आला तेंव्हा
गुरु रवी दशा ६/६/१९ प.होती
गुरु..१० क यू
बुध..१,८,१ क यू r Yu १,७
शनी..१०,१२,११ क यू
शुक्र..११,४,९,१२ क यू

गुरु १०,११ चा कार्येश आहे.
कुंडलीचे लग्न कुंभ म्हणजे स्थिर लग्न म्हणून रवी दशा सोडून दिली.त्यापुढील चंद्राची दशा घेतली.
चंद्र...५,६,५ क यू रा यू ५ के दृष्टी ११
गुरु...१०,१० क यू. मं दृष्ट २,३
रवी..
गुरु...१०,१० क यू. म दृष्ट २,३

चंद्र २,६,१० भावाचा कार्येश आहे

याच ठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण होते म्हणून मी चंद्राची च विदाशा  घेतली.
गुरु चंद्र चंद्र..६/६/१९ ते १६/७/१९ याच कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले .
 दोन्ही कुंडलीमधील कॉमन कालावधी काढला तर  ६/६/१९ ते २०/६/१९ हा येतो जातक १० जुनला नोकरीमध्ये जॉईन झाला आहे

शुभम भवतू!!!

Friday 14 June 2019

Case Study ==77

जन्मवेळ निश्चित करणे .
                                 नागपूर येथील   एका स्त्री ने फेसबुक वरील लेख वाचून मला फोन केला.  . लग्न होऊन २५ वर्षे झाली . पहिली काही वर्षे चांगली गेली .पण नंतर सासू सासर्याच्या त्रास सुरु झाला . परंतु नवरा चांगला आहे . त्याच्याकडून मला काही त्रास झाला नाही . पण इतरांचे करण्यात त्यांनी आतापर्यंत पैसा  खर्च केला आणि डोंगराएवढे कर्ज करून ठेवले . मला एक मुलगा आहे . नवरा स्वतः हि खर्चिक आहे .  घरातील सर्वचजण आपापल्या तंद्रीत असतात. मी फक्त रांधा , वाढा,  उष्टी काढा एवढेच करत राहिले  मी फक्त सगळ्यनसाठी राबत राहिले , माझ्या मनांचा कोणी विचारच करत  नाही. माझ्याकडे कोणाचे लक्षच  जात नाही . माझे काही दुखलं खुपलं तरी कोणी लक्ष देत नाहीत . त्यामुळे नैराश्य आले  आहे मीच माझ्या घरात परकी झालेय . माझ्या घरात माणसे आहेत पण तरी सुद्धा घरात मी  एकटीच असते .
                              मला फक्त जन्म तारीख माहित आहे  पण वेळ माहित नाही . वेळ रात्रीची आहे एवढेच आई सांगते . त्यामुळे  माझ्याकडे माझी पत्रिका नसल्यामुळे मला योग्य ज्योतिष विषयी मार्गदर्शन मिळत नाही .मी विचारले तारीख नक्की आहे का ? स्त्री म्हणाली तारीख नक्की आहे . मी विचारले , वेळ रात्री १२ नंतरची आहे का अगोदरची आहे . ती म्हणाली तेही मला माहित नाही . रात्री आहे एवढे नक्की . मी म्हटले ठीक आहे .मी प्रयत्न करतो . मला तारीख व जन्मस्थळ सांगा . तिने खालील तारीख दिली
२९ / जून /१९७८ वेळ- रात्री जन्मस्थळ रे ७५,४८ अ १८,०३

कृष्णमूर्ती पद्धती मध्ये जन्मवेळ काढता येते . हे फक्त रुलिंग प्लॅनेट वरून शक्य आहे . प्रथम मी पत्रिका काढायला सुरुवात केली त्यावेळेचे रुलिंग घेतले
दि २८/५/२०१९ वेळ -१७-४७-०३ फलटण

Ls गुरु , L -शुक्र , S -गुरु , R -गुरु , D -मगंळ

रुलिंग मध्ये मंगल गुरु शुक्र हे तीन ग्रह आहेत .
१) मंगळ च्या राशी मेष व वृश्च्छिक
२) गुरुचया राशी धनु व मिन
३) शुक्राच्या राशी वृषभ व तुला

मेष,वृश्च्छिक धनु मिन वृषभ किंवा तुला यापैकी कोणतेतरी लग्न असले पाहिजे . यापैकी लग्न कोणते असेल हे ठरविण्यासाठी जातकाने  दिलेल्या तारखेला रात्रीच्या वेळेत कोणती लग्ने  येतात ते पाहू . आता रात्र म्हणजे कोठून कोठपर्यंत घ्यायची हे आधी ठरवावे लागेल . साधारणपणे संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ ७ ते ७-३० असते . म्हणजे रात्री ८ ते  पहाटे ३ पर्यंत च्या काळाला  रात्र म्हणावयास काही हरकत नसावी असे मला वाटते आता आपण रात्रीचा कालावधी ठरविला आहे . या वेळेत कोणती लग्ने  येतात ते पाहू .

१) मकर २०-०८-३० ते २१-५८-५५
२) कुंभ २१-५८-५५ ते २३-३६-३७
३) मिन २३-३६-३७ ते २५-११-५२ ( १-११-५२ am )
३) मेष २५-११-५२ ते २६-५५-४८  (१-११-५२ ते २-५५-४८am )
रात्री ८ पासून पहाटे ३ पर्यंत मकर कुंभ मिन मेष हि लग्ने येतात. यापैकी मकर व कुंभ राशी स्वामी शनी रुलिंग मध्ये नाही म्हणजे मकर व कुंभ लग्न असणार नाही हे निश्च्छित झाले . राहिलेले मिन राशीचा स्वामी गुरु व मेष राशीचा स्वामी मंगल रुलिंगमध्ये आहे त्यामुळे यापैकी कोणते तरी एक लग्न असणार . रुलिंगमध्ये गुरु लग्न नक्षत्र स्वामी म्हणून आला आहे व मंगल वाराचा स्वामी म्हणून आला आहे . प्रतवारीचा विचार करता गुरु मंगळापेक्षा  श्रेष्ठ आहे म्हणून कुंडलीचे लग्न मिन असले पाहिजे . आता लग्न नक्षत्र ठरवायचे. मिन राशी मध्ये गुरु शनी बुध ची नक्षत्रे आहेत  यापैकी शनी बुध रुलिंग मध्ये नाहीत  म्हणून गुरुचे नक्षत्र घयावे लागेल . ( गुरु तीन वेळा रुलिंगमध्ये आलेला आहे )लग्न मिन , नक्षत्र गुरु  इथपर्यंत निच्छित झाले . आता सब व सब सब ठरवावा लागेल. हे ठरविण्यासाठी आपणास कृष्णमूर्ती चे उप उप चे कोष्टक पाहावे लागेल . या कोष्टकामधे मिन लग्न गुरु नक्षत्र च्या पुढे फक्त चंद्र, मंगळ व राहू चे सब शिल्लक आहेत यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणून मंगळ सब घ्यावा लागेल आणि शिल्लक राहिलेला शुक्र सब सब घ्यावा लागेल . थोडक्यात मिन लग्न गुरु नक्षत्र मंगळ सब शुक्र सब सब उदित असताना जातकाचा जन्म झाला असे म्हणता येईल.

यानंतर सॉफ्टवेअर मधील ट्रान्झिट हा ऑप्शन वापरून मिन लग्न गुरु नक्षत्र मंगळ सब शुक्र सब सब कोणत्यावेळेला उदित होते हे आपल्याला ठरविता येईल . ती वेळ येते रात्री ११-४०-१७ pm

दि २९/जून/१९७८ रोजी रात्री ११-४०-१७ वाजता  जातकाचा जन्म झाला असे निश्च्छित सांगता येईल जातकाची वेळ निश्च्छित झाली पण आपण काढलेली वेळ बरोबर आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे . ह्यासाठी मी सब--चंद्र संबंध थेअरी वापरतो. ( किशोर कुमार चे संशोधन )शिवाय आयुष्यातील घटना तपासून पाहतो.
चला तर,  सब --चंद्र थेअरी काय दर्शवते पाहू .....
यासाठी मी जातकाकडून तिच्या पतीची व मुलाची जन्मटिपण मागवून घेतले .
जातकाच्या लग्नाचा संबंध त्याच्या चंद्राशी असला पाहिजे . जातकाच्या पत्रिकेत लग्नाचा सब मंगळ आहे व जातकाचा चंद्र राशी स्वामी मंगलच आहे .

१) पती... चंद्र वृषभ ( शुक्र ) राशीत रोहिणी (चंद्र ) नक्षत्रात
२) मुलगा ... चंद्र कन्या ( बुध   ) राशीत चित्रा  (मंगळ  ) नक्षत्रात
१) जातकाच्या कुंडलीत सप्तम स्थान हे पतीचे स्थान आहे सप्तमाचा सब चा संबंध पतीच्या चंद्र राशी अथवा नक्षत्राशी असावा . जातकाच्या कुंडलीत सप्तमाचा सब राहू  कन्या राशीत रवी नक्षत्रात आहे . पत्नीचा ७ चा सब राहू चा  नक्षत्रस्वामी रवी व पतीच्या पत्रिकेतील चंद्र नक्षत्र स्वामी शुक्र हे युतीत आहेत. येथे सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला
२) जातकाच्या पत्रिकेतील पंचम स्थान हे प्रथम संततीचे स्थान आहे . पंचमाचा सब चा संबंध मुलाच्या पत्रिकेतील चंद्र राशीशी अथवा नक्षत्राशी  असावा . जातकाच्या पत्रिकेत पंचमाचा सब राहू आहे . राहू कन्या राशीत रवी नक्षत्रात आहे.  सब राहूचा  राशी  स्वामी बुध व मुलाचा चंद्र राशी  स्वामी बुध  च आहे . येथे सुद्धा सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला .

म्हणजे आपण ठरविलेली वेळ बरोबर आहे . आता त्यांच्या आयुष्यातील विवाह घटना तपासून पाहू.

१) विवाह ---९/५/९५
या पत्रिकेत सप्तमाचा सब राहू आहे राहू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Mercury 4   4 7
It's N.Swami :-------- Sun:- (4)   6
It's Sub :------------ Ketu:- 1       Rashi-Swami Jupiter 4   1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (11) (12)  Cusp Yuti: (6)  
Itself aspects :------ 1
सप्तमाचा सब राहू ४ थ्या पायरीवर फक्त ११ या भावाचा कार्येश आहे . म्हणून विवाह फक्त झाला .ज्यावेळी विवाहाशी राहू चा संबंध येतो त्यावेळी त्याला विजोड विवाह ( कॉन्ट्रास्ट ) असे म्हणतात. लग्नाच्या वेळी जातकाचे वय नुकतेच १७ संपून १८ वे लागा;ले होते आणि पती इंजिनिअर होऊन नोकरीला लागले होते .  त्याच बरोबर ४,६,१२ या विरोधी भावाचा कार्येश असल्यामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक. विवाह होणे आणि वैवाहिक सौख्य मिळणे या दोन्ही मध्ये खूप अंतर आहे . 

या कालावधीत शुक्र शनि गुरु शनी केतू दशा होती .

शुक्र .... १,२,४,५,१०
शनी... १,४,६,७,१०
गुरु ... १,४,६,१०
शनी... १,४,६,७,१०
केतू ... ६,११,१२

या दशेमध्ये २,५,७,११ हे भाव विवाहाला  अनुकूल परंतु त्याच बरोबर १,४,६,१०,१२ हे प्रतिकूल भाव सुद्धा आहेत म्हणून वैवाहिक सौख्य असमाधान कारक आहे. या पत्रिकेची वेळ सब-चंद्र संबंध पद्धतीने बरोबर येते . शिवाय विवाह व वैवाहिक सौख्य याची पण आपण पडताळणी केली ती सुद्धा बरोबर आली . म्हणजे आपण ठरविलेली वेळ बरोबर आहे

!! शुभम भवतु !!

Tuesday 11 June 2019

Case Study--76

 

विवाह 

                                           गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात,(2012) मला अजून आठवते आहे २०-२२ वर्ष्याचा दोन मुली माझ्याकडे आल्या होत्या  त्यातली एक माझ्या परिचयाची होती दुसरी तिची मैत्रीण होती . परिचित मुलीने तिच्या मैत्रिणीची ओळख करून दिली  म्हणाली हिला ज्योतिषविषयक आपले मार्गदर्शन हवे आहे . तिची मैत्रीण म्हणाली मी पदवीधर आहे सध्या मी ब्युटी पार्लर चा व्यवसाय करीत आहे . घरात माझ्या लग्नासंबंधी स्थळे बघण्याचे चालू आहे . बर्याच वेळा पत्रिका  जुळत नाहीत .वडिलांचा हट्ट आहे पत्रिका जुळल्याशिवाय विवाह करायचा नाही .  हि म्हणाली आमच्या घरच्यांचा सरांच्यावर पूर्ण विश्वास आहे प्रत्येक वेळेला त्यांचा सल्ला घेतात . म्हणून विवाह योग केंव्हा आहे ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत . 
                                             मी विचारले पत्रिका आहे का ? तिने तिची पत्रिका मला दाखविली । ती एक पारंपारिक पत्रिका होती . मी म्हणालो ह्या पत्रिकेवरून मी काही सांगू शकणार नाही . मी  कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका पाहतो . मी त्या पत्रीकेमधील  जन्मतारीख ,जन्मवेळ   जन्मस्थळ  लिहून घेतले . त्यावरून कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली  तयार केली .  
                   कृष्णमुर्ती नियम -- सप्तमाचा सब २,७,११ / ५,८या भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा -अंतर्दाशेमध्ये विवाह होईल .
                            ह्या कुंडलीत सप्तमाचा सब शुक्र आहे . चला तर पाहू शुक्र हा २,७,११ या भावाचा कार्येश आहे का? तो विवाह देणार आहे का ?
      शुक्र --१०
      केतू   --९ कयू चं ७
      शनि --
      शुक्र --९,१२,१०
                           शुक्र  ७  या प्रमुख भावाचा व ९ या पूरक भावाचा बलवान बलवान कार्येश आहे . म्हणजे विवाह होणार हे निच्छित झाले . सर्व साधारणपणे सप्तमाचा सब   चंद्र , शुक्र असेल तर विवाह विवाहयोग्य वयात होतो. आता विवाह केंव्हा होईल ह्या साठी दशा अंतर्दशा पाहाव्या लागतील . 
                           प्रश्न वेळी राहू महादशा ६/ १० /२०२० पर्यंत  होती . व राहुमध्ये बुध अंतर्दशा 
१८ /९ /२०१० ते   ७ / ४/२०१३  होती .
राहू व बुध यांचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
                           
राहू --३ कयू श २,४                                    
चंद्र -- ७                                                     
मंगळ ---७,१,६,७ कयू                                     
चंद्र --- ७                                                     
               
बुध --१०,८,११
शुक्र --९,१२,१० कयू
राहू --३ कयू २ , ४
चंद्र ---७

प्रथम पायरीला राहू २ या प्रमुख भावाचा कार्येश आहे व दुसऱ्या ,तिसऱ्या चौथ्या पायरीला ७ या प्रमुख भावाचा बलवान कार्येश आहे . बुध प्रथम पायरीला ११ व तिसर्या चौथ्या पायरीला २,७ या प्रमुख भावांचा बलवान कार्येश आहे . राहू व बुध दोन्ही विवाहाला अनुकूल आहेत .   याठिकाणी  २, ७ , ११ या भावाची साखळी पूर्ण झाली आहे .  आता विदशा अशी शोधावी लागेल  कि जी जास्तीत जास्त भावांची कार्येश असेल . प्रश्न वेळी  गुरु , शनि यांच्या विदशा खालीलप्रमाणे ---
        राहू / बुध  / गुरु        ९ / ७ /२०१२ ते १० / ११ / २०१२
                         शनि       १० / ११ /२०१२ ते ७ / ४ /२०१३ 
 गुरु --९ , ५ कयू                                  
 शनि --२ , ४                                         
 चंद्र    ---७                                          
 चंद्र ---७                                            
          
शनि --                    
शुक्र --९,१२,१० कयू मं  दृ ७, १ , ६
बुध --१०, ८, ११
शुक्र --९,१२,१० कयू मं दृ ७ , १ , ६



वरील गुरु व शनि चे कार्येशत्व पाहता गुरु २, ७ ,५ या भावांचा कार्येश आहे   शनि सब च्या पायरीला ११ व ८ या पूरक भावाचा बलवान कार्येश आहे .  व त्याचबरोबर १, ६ ,१०, १२ या विरोधी भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणून मी गुरु विदशा निवडली . 
                               राहू  / बुध  / गुरु    ९ /७ / २०१२ ते  १० / ११ /२०१२ या कालावधीत विवाह व्हावयास हवा 
             आपल्याकडे ह्या कालावधीत लग्ने होत नाहीत पण बैठका ,किंवा साखरपुडा होऊ शकतो . २३ मार्च २०१३ ला ह्या मुलीने मला फोन करून सांगितले आजच लग्नासंबंधी बैठक झाली लग्न करावयाचे ठरले आहे . २१ / ५ / २०१३हि लग्नाची तारीख धरली आहे .  लग्न ठरण्याचा कालावधीत शनि विदशा  होती . १० /११/२०१२ ते ७ /४ /२०१३. या ठिकाणी शनि १ ,६ ,१० १२ या विरोधी भावांचा  कार्येश असून   
 सुधा केवळ लग्नेश मंगळ अंशात्मक दृष्टीने सप्तमेश शुक्र ला पहात आहे . शनि दुसर्या व चौथ्या पायरीला
 ७ या प्रमुख भावाचा कार्येश आहे . या पत्रिकेमध्ये केवळ मंगळ दृष्टीने विवाह ठरला आहे .


   Case Studt-75

विवाह योग  केंव्हा आहे. ?
                           असा प्रश्र्न विचारला की . के पी अभ्यासक प्रथम रूलिंग घेतात. आणि संबंधीत भावाचा सब रूलिंग मधे आहे का ते पाहतात. असेल तर योग शोधण्याचा प्रयत्न करतात. सब नसेल तर पुढचा किंवा मागचा सब घेऊन वेळ निश्र्चित करतात. व पत्रिका सोडवितात.एक पत्रिका माझ्याकडे आली होती.सद्याचे मुलीचे वय ४३ होते. 
(गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख वेळ दिली नाही )
माझे मत...
         विवाह योग्य वय किती असते साधारणपणे २५ वर्षे  . आता व्यक्ती चे वय किती आहे .? ४३ चालू आहे. म्हणजे मागील १८ वर्षात योग आलेच नाहीत का ? का आले नाहीत याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. याचा  विचार व्हावयास हवा. उशिर का होतोय हे समजले की पुढे जाता येईल.
कारण २ ७ ११ / ५ ८ हे भाव कोठेना कोठे येत राहणार आहेत. म्हणून अमूक अमूक कालावधी त विवाह होईल असे म्हणायचे का ?. दुसरे असे प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी कुंडली पाहणार म्हणजे प्रत्येकाचे संबंधित भावाचे  सब वेग वेगळे येणार. प्रत्येकाचा कालावधी वेग वेगळा येणार.....  असो
         मि माझे मत मांडतो .....या कुंडलीत चंद्र शनी नक्षत्रात व युतीत आहे. हि युति पंचम भावारंभी आहे . शनीची दृष्टी सप्तम , लाभ, व कुटुंब स्थानावर आहे . २,७,११ हि विवाहाची प्रमुख स्थाने आहे  ह्या स्थानावर शनीची  दृष्टी म्हणून विवाहाचा योग उशिरा आहे . उशिरा म्हणजे किती उशिरा तर ज्यावेळी व्हावा अशी अपेक्षा असते त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. शनीचा संबंध विवाहाशी येतो त्यावेळी माझ्या अभ्यासाप्रमाणे विवाह २९--३२ या वयात होतो. अजून एक सगळ्यात महत्वाचा योग म्हणजे रवी प्लूटो युती सप्तम भावारंभी आहे. स्त्री च्या पत्रिकेत रवी म्हणजे पति . प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे. तो ज्याच्या युतित असतो त्या ग्रहाच्या फळात न्यूनता निर्माण होते. ज्या भावारंभी असतो त्या भावाचे फळ देत नाही. 
( मा. गोंधळेकर सर यांचे संशोधन ) 
 कृष्णमूर्ती पद्धत  ३ स्टेप पर्यंत आहे . १) ग्रह २) ग्रहाचा नक्षत्रस्वामी ३) ग्रहाचा उपनक्षत्रस्वामी 
ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो. हा महत्वाचा नियम आहे आणि त्याचा सब , फळ शुभ असेल का अशुभ असेल ते सांगतो. कधी कधी  एखादी घटना घडेल   असे सूचित केले असेल तरी सुद्धा घटना घडत नाही . असे का होते यावर मा.गोंधळेकर यांनी संशोधन करून असे सिद्ध केले कि भावाच्या सब च्या सब  चा नक्षत्रस्वामी घेतला तर घटना का होत नाही हे लक्षात येते . त्याला त्यांनी ४ स्टेप थेअरी असे नाव दिले आहे .

या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व....
शनी...४ ११ १२ ५ क.यू चं द्रुष्ट ४
शनी...४ ११ १२ ५ क यू चं द्रुष्ट ४
केतू...
रवी ...६

शनी ३-४ पायरीला पुर्णपणे अशुभ ,विरोधी  आहे.  या ठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली . म्हणून

 सदर व्यक्तीचा विवाह होणार नाही ....

2)  उदाहरण  दुसरे   सब ची प्रतिकूलता 
२०१२ साली  एक व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली  आतापर्यंत इतरांचे रिडींग चुकले आहे . हि माझ्या मुलीची पत्रिका  आहे . हीच विवाह योग  केंव्हा आहे असे विचारले 
( गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख वेळ दिलेली नाही )

प्रश्न पहाते  वेळी सप्तमाचा सब गुरु होता. 
दि. --७/६/२०१८ वेळ .. १=३७=२७ दुपारी फलटण   
एल --बुध एस गुरु आर.. शनी  डी --गुरु ,एल एस .. रवी 
सप्तमाचा सब गुरु रुलिंगमध्ये आहे पत्रिका बरोबर आहे . चंद्र शनी च्या नक्षत्रात आहे ..... पुनरफू योग 

 या पत्रिकेत सप्तमाचा सब गुरु आहे 
गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे बलवान भावच दिले आहेत 
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 8   5 8     Rahu-Yuti  8    Ketu-Drusht  2  
It's N.Swami :-------- Mercury:- (8)   2 (11)   
It's Sub :------------ Mercury:- 8   2 11   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (4)   (6) 7   
Itself aspects :------ 2 12 4

गुरु दुसऱ्या पायरीला ८ या दुय्यम भावाचा व ११ या प्रमुख भावाचा कार्येश आहे परंतु ३--४ स्टेपला 
४ , ६ या भावाचा कार्येश आहे . हे भाव पूर्णपणे विरोधी आहेत . 
सबब सदर मुलीचा विवाह अध्याप पर्यंत झाला नाही 

याठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली 

अशा प्रकारच्या जन्म पत्रिका असूनसुद्धा म्हणजे सब ची प्रातिकूलता असताना सुद्धा काहींचे विवाह झाले आहेत. त्याच्या बाबतीत काय घडले ते पाहू 

१) (गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख यावेळी दिली नाही )
प्रश्न पाहाते वेळी चे रुलिंग खालीलप्रमाणे 
दि १७/१२/१८ १०=४६=०१ रात्री फलटण 
Ls --केतू , L --रवी , S --बुध , R --गुरु , D --चंद्र 

या पत्रिकेत सप्तमाचा सब गुरु आहे . गुरु रुलिंगमध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे . 
गुरु कार्येशत्व .. 
गुरु ---
शुक्र .. ५,१०,६ क .यु. 
शुक्र .. ६ क.यु. 
चंद्र .. ६

गुरु ३--४ पायरीला ६ या भावाचा कार्येश आहे . विवाहासाठी पूर्ण विरोधी आहे . तरीसुद्धा ह्या मुलीचा विवाह झालेला आहे . परंतु वैवाहिक जीवन  असमाधानकारक . मुलगी शिकलेली आहे मुलगा कमी शिकलेला . एका दुकानात कामाला आहे . पती पत्नीमध्ये संवाद शून्य , कारणापुरताच . पगार कधी देतो कधी देत नाही. हीच ट्युशन घेते आणि घराचा खर्च भागविते . नवऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही. घटस्फोट घेतला तरी पुढे काय? सगळा  अंधारच . थोडक्यात पत्रिका विवाह दाखवत नसेल आणि तरी सुधा विवाह झाला असेल तर संसार सुख असमाधानकारक असते हेच या उदाहरणावरून दिसून येते. 










Case Study-74

 

पत्रिका मेलन


                   दोन दिवसांपूर्वी एक पत्रिका , पत्रिका जुळ विण्यासाठी आली होती. प्रथम मी आलेली पत्रिका तपासत असतो. पत्रिकेची वेळ बरोबर आहे का ते पाहत असतो. हे मी सब चंद्र संबंध पद्धतीने पाहत असतो . लग्नाचा सब रवी आहे सब चा संबंध चंद्राशी असला पाहिजे. सब रवी बुधाच्या नक्षत्रात आहे. चंद्र मिथुन राशीत आहे. चंद्राचा राशी स्वामी व लग्नाचा सब रवी चा  नक्ष्ट्रस्वामी बुध च आहे. म्हणजे लग्नाच्या सब चा चंद्राशी संबंध आहे याचा अर्थ पत्रिका बरोबर आहे.  ही पत्रिका विवाहासाठी आली आहे म्हणून मी ७ चा सब पहिला. ७ चा सब मंगळ आहे.
मंगळ..
शनी..७,९,७ क.यू. बू ध युती ६,४
शनी...७ क.यू.
शुक्र...७

७ चा सब ७,९ भावाचा कार्येश आहे. त्याच बरोबर ,६,४ च कार्येश आहे. वैवाहिक सौख्य असमाधान कारक.

लग्न कुंडलीत सप्तमात शनी बुध हर्षल व नेपच्यून.
सप्तम भाव  धनु १७,५६,४३ आहे
शनी १९-५१
बुध १६-३३
हर्षल १०-५९
नेप १७-३८
या चा अर्थ शनी बुध नेपच्यून सप्तम भवारंभी आहेत . आणि युतीत आहेत .
७ स्थानात शनी बुध असणे...
शनी बुध दोन्ही नपुसंक ग्रह आहेत. जोडीला नेपच्यून आहे. म्हणून  च वैवाहिक सुख असमाधान कारक. नंतर घटस्फोट वाटचाल सुरू होणार.  नेपच्यून मुले जोडीदाराकडून फसवणूक होऊ शकते . त्यामुळे पत्रिका जुळविण्याचा प्रश्न च आला नाही. संबंधित व्यक्तीला कळ विले. ही पत्रिका जुळत नाही.


Case Study-73

 नोकरी  केंव्हा मिळेल ?

             एक जातक नुकतेच इंजिनिअर मधील पदव्यत्तर पदवी  पूर्ण करीत होता. त्याच्या शेवटच्या सेम.मध्ये तो  कंपनीमध्ये इंटरशिप करत होता .   इंटरशिपचा कालावधी संपत आला होता .   .  .  .  . १८/३/२०१९ ला  इंटरशिप कालावधी संपणार होता. त्याने कंपनीला विचारले येथून पुढे ह्याच कंपनीत माझी नोकरी चालू राहील का  ? ते म्हणाले कंपनीत जागा आहे का ते पहिले पाहिजे . नक्की सांगता येणार नाही. त्यामुळे त्याला टेन्शन आले .त्याच अवस्थेत त्याने मला विचारले मला नोकरी केंव्हा मिळेल ?मी म्हटले  विचार करून मला १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग .त्याने थोडा वेळ विचार करून २२५ हि संख्या सांगितली . या संख्येवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली.

दि १६/३/२०१९ वेळ १९-२३-४२ अं १७-५९ रे ७४-२६ के.पी नं २२५

हि कुंभ लग्नाची कुंडली आहे .
जातकाच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू. चंद्र मनाचा कारक . चंद्र पंचम स्थानात आहे आणि षष्टेश आहे. चंद्र गुरूच्या नक्षत्रात गुरु दशमात लाभेश व धनेश हि आहे म्हणजे चंद्र थोडक्यात २,५,६,१० व ११ चा कार्येश . म्हणजे प्रश्नाचा रोख बरोबर आहे .
दशमाचा सब २,६,१०,११ चा कार्येश असेल तर २,६,१० या भावाच्या संयुक्त दशेत नोकरी मिळेल.
या पत्रिकेत दशमाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे .

 PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (10)   1 (12)  Cusp Yuti: (11)  
It's N.Swami :-------- Venus:- (11)   (4) (9)  Cusp Yuti: (12)  
It's Sub :------------ Mercury:- 1   5 8  Cusp Yuti: (1)       Sun-Yuti  1  7
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
Itself aspects :------ 5 1 8

शनी २,३,१०,११ चा कार्येश आहे . दुसऱ्या पायरीला शुक्र व्यय भावारंभी आहे म्हणजे त्याची षष्ठ  भावावर दृष्टी आहे एकूण शनी २,६,१०,११ या सर्व भावांचा कार्येश आहे नोकरी मिळणार हे निश्च्छित झाले आता केंव्हा मिळणार यासाठी आपण दशा पाहू.. आता जातकाला गुरु मध्ये रवी अंतर दशा चालू आहे .   गुरुचे कार्येश त्व खालीलप्रमाणे         

  PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 10   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  2  3 10
It's N.Swami :-------- Mercury:- (1)   5 (8)  Cusp Yuti: (1)       Sun-Yuti  (1)   (7)
It's Sub :------------ Saturn:- (10)   1 (12)  Cusp Yuti: (11)     
It's Sub's N.Swami :-- Venus:- (11)   (4) (9)  Cusp Yuti: (12)     
Itself aspects :------ 4 2 6                            

 PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 1   7     Mercury-Yuti  1  5 8
It's N.Swami :-------- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
It's Sub :------------ Rahu:- (5)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Mercury (1)   5 (8)  Moon-Yuti  (5)   (6)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
Itself aspects :------ 8                                                                                                      .. 
                                                                                                                                                                    गुरु १०,११ चा कार्येश आहे ४ त्या पायरीला शुक्र व्यय भावारंभी म्हणजे त्याची दृष्टी षष्ठ भावावर आहे 
याचा अर्थ गुरु ६,१०,११ भावाचा कार्येश आहे कुंडलीचे लग्न कुंभ आहे म्हणजे स्थिर तत्वाचे आहे म्हणून रवी अंतर्दशा सोडावी लागेल. त्यापुढील अंतर दशा चंद्राची घ्यावी लागेल. चंद्राचे कार्येशत्व ...                                  
PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (5)   (6)  Cusp Yuti: (5)       Rahu-Yuti  (5)    Ketu-Drusht  (11)  
It's N.Swami :-------- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
It's Sub :------------ Sun:- 1   7     Mercury-Yuti  1  5 8
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
Itself aspects :------ 11

चंद्र २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे . गुरु ६,१०,११ भावांचा ,चंद्र २,६,२०,११ भावांचा कार्येश आता या ठिकाणी सुद्धा मंगळाची  विदशा घेता येणार नाही त्या पुढील राहूची विदशा घ्यावी लागेल                                    
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (5)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Mercury (1)   5 (8)  Moon-Yuti  (5)   (6)
It's N.Swami :-------- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
It's Sub :------------ Moon:- (5)   (6)  Cusp Yuti: (5)       Rahu-Yuti  (5)    Ketu-Drusht  (11)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (10)   2 11  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (2)   (3) 10
Itself aspects :------ 11
                                                                                                                                                                       राहू २,६,१०,११ भावांचा कार्येश आहे . गुरु चंद्र राहू दशेत १४ ऑगस्ट २०१९ ते २६ ओकटोम्बर २०१९ या कालावधीत नोकरी लागेल.                                                                                                                                                                     १५ एप्रिल पर्यंत त्याची शेवटच्या सेम ची परीक्षा संपणार आहे .
गोचर भ्रमण 
गुरु चंद्र राहू दशेमध्ये गुरु राहू हे मंद गतीचे ग्रह आहेत. व चंद्र अतिशीघ्र ग्रह आहे . मंदगतीने ग्रहांचे सब मधील भ्रमण पाहावे लागेल. व चंद्राचे नक्षत्रातील भ्रमण पाहावे लागेल.                                                                           सर्वच ग्रह पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहेत . त्यामुळे गुरु राहूचे गोचर अनुकूल आहे . 
चंद्र शीघ्रगती ग्रह आहे . म्हणून नोकरीचा कारक शनी चे गोचर भ्रमण पाहावे लागेल  परंतु सर्वच ग्रह अनुकूल असल्यामुळे १४ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०१९ पर्यंत गोचर अनुकूल आहे .   याच कालावधीत नोकरी लागणार .                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     

Case Study--72 

पतीचे त्या स्त्री बरोबर संबंध असतील का ?

                   एक लेडी डॉक्टर ,. तिचे एका डॉक्टर बरोबर विवाह झालेला होता . दोघांची प्रक्टिस चांगली चाललेली होती . सगळे काही व्यवस्थितित चालले होते . दोन वर्षात तिला एक मुलगा झाला  . घरी फक्त सासू सासरे हि दोघ आणि त्यांचा मुलगा .एवढेच होते . हि घराचे सगळे आवरून दवाखान्यात जात होती ती दवाखान्यात जाते त्यावेळी सासू सासरे मुलाची काळजी घेतात . 
                        सगळ्याच गोष्टी व्यावास्थितीत चालल्या तर ते जीवन कसले . कधी कधी आयुष्यात  अचानक एखादे वादळ येते आणि सगळेच बदलून जाते . आयुष्य ढवळून निघते .
                           दोघेही स्वतंत्र प्रक्टिस पुण्यामध्ये करीत आहेत . पति कडे एक नवीन शिकाऊ लेडी डॉक्टर प्रक्टिस करण्यास येत होती .  ती आल्यापासूनच या दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले होते  तिला कळेना पति यापूर्वी असे कधी वागत नव्हते . आताच काय झाले ?सध्या नवरा तिच्यासाठी वेळ देत नव्हता . हिच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली .
                             एके दिवशी तिने मला फोन करून विचारले माझ्या पतीचे त्या स्त्री बरोबर तश्या प्रकारचे संबंध असतील का ? मी म्हटले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग तिने १५७  संख्या सांगितली . हा प्रश्न मी
   २८ एप्रिल २०१४ रोजी दुपारी १५=३८=५७ वाजता अ १७,५९ रे ७४,२६ येथे सोडविला .
               कृष्णमुर्ती नियम -- पंचमाचा सब द्विस्वभाव राशीत असून ५ व ११   या भावाचा कार्येश असेल तर संबंध असतील व पंचमाचा सब स्थिर राशीत असून ६ व १२ भावांचा कार्येश असेल तर संबंध असणार नाहीत
               हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे . पत्नीने प्रश्न विचारला आहे म्हणून सप्तम स्थान पतीचे लग्न स्थान होईल . सप्तमा स्थान वृषभ लग्न आहे म्हणून सप्तमस्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे .
              पतीचे पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---
           
             शुक्र --
न स्वा    गुरु --२,८
सब       मंगळ --५ कास्प युती
स न स्वा चंद्र --११,३,के यु ११

                       येथे पंचमाच सब शुक्र कन्या या द्विस्वभाव राशीत असून ५ व ११ या भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे पतीचे त्या स्त्री बरोबर संबंध आहेत हे सिद्ध होते . शुक्र लग्नेश आहे . सब चा नक्षत्रस्वामी गुरु हा सुधा मिथुन  द्विस्वभाव राशीत आहे . संबंध आहेत हे खात्रीपूर्वक सांगता येते . 
                    आता महादशा अंतर्दशा पाहू --
प्रश्न पाहते वेळी केतू महादशे मध्ये रवीची अंतर्दशा चालू होती केतूचे कार्येशत्व ----


केतू --११,  मं ४,१२ चं यु ११,३               रवि --११,बु यु ११          चंद्र --
केतू --११,मं   ४,१२ चं यु ११,३               शुक्र --१०,१                  केतू --११,मं ४,१२ चं यु ११,३
चंद्र --                                                 शुक्र --                         रवि --११,बु यु ११
केतू --११,मं   ४,१२, चं यु ११,३              गुरु ---२,८                    शुक्र --- १०, १


मंगळ --५                            राहू --५,शु १०,१ चं दृ ११,३          गुरु --२,८              शनि --६,९
चंद्र ---११,के यु ११                 मंगळ --४,१२,५ क यु                गुरु --२,८               गुरु --२,८
बुध --११ , १२ क यु                शुक्र ---                                    गुरु --२,८               शुक्र --
शुक्र -- १०,१                          गुरु --२,८                                  गुरु ---२ , ८           गुरु --२,८


राहू व केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने देतात  

वरील सर्व ग्रहांचे कार्येशत्व पाहता केतू मध्ये रवि , चंद्र , मंगळ व राहू अंतर्दशे पर्यंत संबंध चालू राहतील . 
गुरु अंतर्दशे मध्ये गुरु ५, ११  भावाचा कार्येश नाही तसेच शनि ५, ११ भावांचा कार्येश नाही . गुरु अंतर्दशे पासून म्हणजे १६ मे २०१६ पासून संबंध संपुष्टात येतील . 

Monday 10 June 2019

Case Study-71


स्त्री ३/५/९२ २०-५५ वाघोली पुणे
लग्नाचा सब बुध मिन  राशीत बुध नक्षत्रात
चंद्र वृषभ राशीत  रवी नक्षत्रात इथे सब चंद्र संबंध येत नाही.  म्हणून वेळेत बदल करून सब शुक्र घेतला त्यासाठी वेळेत ८ मी. ३५ से. जास्त घेतले. २१-०३
या वेळेनुसार लग्नाचा सब शुक्र येतो.
यानुसार सब शुक्र व चंद्र राशी स्वामी शुक्र आहे
 येथे सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला.
१ ) पती..चंद्र वृष्छिक राशीत बुध नक्षत्रात
२) धाकटी बहीण..चंद्र कर्क राशीत शनी नक्षत्रात
३) सगळ्यात धाकटा भाऊ...
 चंद्र कर्क राशीत शनी नक्षत्रात
स्त्री पत्रिकेत धाकटी बहीण म्हणजे तिसरे स्थान तृतीय भावाचा सब  हा धाकट्या बहिणीच्या चाद्र शी संबंधित असावा.
३ च सब रवी आहे
धाकट्या बहिणीच्या पत्रिकेत चंद्र कर्क राशीत शनी नक्षत्रात आहे.
३ चा सब रवी चा राशीस्वामी व चंद्र नक्षत्र स्वामी शनी आहे.
सगळ्यात धाकटा भाऊ म्हणजे स्त्री च्या पत्रिकेत पंचम स्थान . पंचामाचा सब चंद्र हा धाकट्या भावाच्या पत्रिकेत चंद्र कर्क राशीत आहे.
पती...स्त्री क्या पत्रिकेत ७ च सब  पतीच्या पत्रिकेत chandrashi संबंधित असावा.
स्त्री क्या पत्रिकेत ७ चा सब बुध
पतीच्या पत्रिकेत चंद्र बुधाच्या नक्षत्रात येथे ही सब चंद्र संबंध येतो.
 आता उलटे पाहू. म्हणजे पतीच्या पत्रिकेत ७ च सब हा पत्नी क्या chandrashi संबंधित असावा .
पती च्या पत्रिकेत ७ च सब शुक्र आहे . पत्नी च्या पत्रिकेत चंद्रवृषभ राशीत आहे.  चंद्राचा राशी स्वामी व  पत्नी च ७ चा सब  शुक्र च आहे येथेही सब चंद्र संबंध येतोय.

Case Study--70


पत्नी...६/५/७८ ००-४५ पुणे
ही पत्रिका BTR करायची आहे मी खालीलप्रमाणे  सब चंद्र संबंध पद्धतीने केली
१) पती...चंद्र सिंह राशीत केतू नक्षत्रात
२)कन्या..चंद्र मकर राशीत रवी नक्षत्रात
३) पुत्र...चंद्र कन्या राशीत चंद्र नक्षत्रात
दिलेली वेळ ००-४५
दुरुस्त केलेली वेळ ००-३८-५६

स्त्री..लग्नाचा सब मंगळ
चंद्र मेष राशीत
सब मंगळ व चंद्र राशी स्वामी मंगळ आहे.
सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला 
१) पती..
स्त्री च्या पत्रिकेत ७ चा सब चंद्र आहे. 
पतीच्या पत्रिकेत चंद्र सिंह राशीत केतू नक्षत्रात.
पतीचा चंद्र राशी स्वामी रवी व स्त्री चा ७ चा  सब चंद्र दोघेही सिंह राशीत एकत्र.आहेत
२) कन्या.. पत्नीचे ५ चा सब बुध ( प्रथम संतती )आहे. कन्येच्या पत्रिकेत चंद्र मकर राशीत रवी नक्षत्रात
सब बुध  व कन्येचा  चंद्र नक्षत्र स्वामी रवी , दोघांचे राशी स्वामी शनी (कुंभ )आहे.
३) पुत्र...
पत्नीचे ७ च सब चंद्र आहे ( दुसरी संतती = ७ स्थान )
पुत्र पत्रिकेत चंद्र कन्या राशीत चंद्र नक्षत्रात
पत्नीचा ७ चा सब व मुलाचा चंद्राचा नक्षत्र स्वामी चंद्र च आहे.
अशा प्रकारे सब चंद्र संबंध प्रस्थापित होतो.


उदा...२) 
बहीण..२१/१०/९० ७-१६-३९  रे ७२,४९,३३ अ १८,५८,३०
भाऊ...१०/५/९४ १२-१०     रे ७३,११ अ १७,४५

बहीण...लग्नाचा सब शनी
चंद्र वृष्छिक राशीत गुरु नक्षत्रात
सब शनी धनु राशीत आहे
सब शनी चा राशी स्वामी गुरु आहे व चंद्राचा नक्ष्ट्रस्वमी गुरु च आहे येथे सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला .
बहिणीच्या पत्रिकेत धाकटा भाऊ म्हणजे तृतीय स्थान होईल. तृतीय स्थानाचा सब बुध आहे ह्याचा भावाच्या   चंद्राशी संबंध असला पाहिजे.
भावाचा चंद्र सिंह राशीत केतू नक्षत्रात आहे. 
भावाच्या पत्रिकेत सब बुध वृषभ राशीत आहे.  
केतू ला राशी नाहीत म्हणू केतू ज्या राशीत आहे त्याच्या स्वामी च विचार करावा. केतू वृषभ राशीत आहे. म्हणजे सब बुध व चंद्राचा नक्षत्र स्वामी केतू दोघेही वृषभ राशीत आहेत. 
येथे चंद्र सब संबंध आला

आता भावाची पत्रिका पाहू...
लग्नाचा सब गुरु आहे.
चंद्र सिंह राशीत केतू नक्षत्रात 
भावाच्या पत्रिकेत गुरु तुळ या शुक्राच्या राशीत आहे.
चंद्राचा नक्षत्र स्वामी केतू वृषभ राशीत आहे. 
सब गुरु चा राशी स्वामी शुक्र व   चंद्र नक्षत्र स्वामी केतू , केतूचा राशी स्वामी शुक्र च आहे. 
येथे ही सब चंद्र संबंध आला
आता ११ स्थान हे मोठ्या बहिणीचे होईल लाभाचा सब  गुरु आहे ह्याचा संबंध बहिणीच्या चंद्राशी  असला पाहिजे.
बहिणीचा चंद्र वृश्छिक राशीत गुरु च्या  नक्षत्रात आहे. 
म्हणजे सब गुरु व चंद्र नक्षत्र स्वामी गुरु च आहे येथे ही सब चंद्र प्रस्थापित झाला .

 भाऊ..१८/५/९४ वेळ १२-१० रे ७३,११ अ १७,४५
प्रश्न नोकरीचा आहे.
१० चा सब चंद्र
चंद्र...१ क. यू
केतू..१०,१० क. यू शु ११ र यू १०
केतू..१० क. यू.
रवी...१०,२ के यू १०

चंद्र २,१०,११ च कार्येश आहे.
म्हणजे नोकरी लागली पाहिजे
सदर भाऊ सद्या अमेरिकेत आहे. नोकरीचे खूप प्रयत्न करीत आहे पण नोकरी लागत नाही.
२,३,४ पायरीला केतू व रवी वर प्लुटो ची दृष्टी आहे अनुक्रमे १७७.१ व १७९.६
प्लुटो हा ग्रह चा संबंध नोकरी शी येत असेल तर ह्याला नोकरी लागणार नाही. असे वाटते
व्य याचा सब शुक्र ५,९,११ च कार्येश आहे त्यामुळे उच्च शिक्षण परदेशात झाले. पण नोकरी नाही.
सद्या शुक्र २७/४/२१ पर्यंत आहे
आता शुक्र बुध चालू २६/२/२० प.
शुक्र...५,९,११
बुध...१,५,९,१०,११,१२
२,६ वे स्थान फक्त राहू केतू दाखवितात.
राहू..केतू चा कालावधी संपलेला आहे.
शुक्र केतू...२७/४/२१ पर्यंत आहे
केतू ..२,३,४,६,१० चा कार्येश आहे
परंतु केतू रवी नक्षत्रात आहे
केतू व रवी वर प्लुटो ची पूर्ण अंशात्मक दृष्टी आहे.
त्यामुळे २७/४/२१ पर्यंत नोकरीची शक्यता कमीच