कृष्णमूर्ति ज्योतिष: 2013

Friday 20 December 2013

> जन्म वेळ शोधणे ...

+ जन्म वेळ शोधणे -----

Case Study-11



माझ्या वडिलांचा मृत्यू दि . १८-१२-२०११ रोजी पहाटे ३-३० वाजता झाला . एक उत्सुकता म्हणून त्यांची कुंडली काढण्याचा प्रयत्न करीत होतो . त्यांची जन्मतारीख माहित होती पण वेळ माहित नव्हती क़्रूश्न्मुर्ति पद्धती मध्ये वेळ ठरविता येते  त्याप्रमाणे मी प्रयत्न केला . खालीलप्रमाणे
जन्मतारीख ५-१०-१९२७ स्थळ फलटण 

त्यावेळेचे एल यस आर डी घेतले .
 L--गुरु S--केतू R--रवि D--मंगल / केतू  (तारीख-२९-१०-२०१३ वेळ -१६-१८)
गुरूच्या धनु राशीमध्ये केतूचे नक्षत्र आहे. (कारण केतू मंगळाच्या राशीत आहे) म्हणून धनु राशी केतू नक्षत्र रवि सब व केतू सबसब (कारण केतू दोन वेळा आलेला आहे.)
 धनु राशी केतू   नक्षत्ररवि सब केतू सबसब ३-३१-०  to  ३-३३-२० आहे याचा याचा मध्य काढू मध्य १-१०
धनु लग्न ३-३१-०० + ०-१-१० = धनु लग्न ३-३२-१०  निरयन लग्न जन्मवेळी पूर्व क्षितिजावर उदित असताना जन्म झाला असे  येइल.
निरयन जन्मालाग्नावरून जन्मवेळ शोधावा लागेल . निरयन लग्न धनु ३-३२-१० जन्मस्थळ फलटण अक्षांश १७-५९ रेखांश ७४-२६ रेखंतर काळ (-)३२-१६ जन्मतारीख ५-१०-१९२७ या आधारे जन्मवेळ शोधू .
यासाठी जन्मवेळेचा इष्ट सांपातिक काळ शोधावे लागेल
१) निरयन जन्म लग्न  धनु ३-३२-१०
 जन्मवार्षाचे अयनांश +     २२-४४-३१
                                   -----------------------
 सायन जन्म लग्न    धनु २६-१६-४१
म्हणजेच                 ८-२६-१६-४१
अंशात रुपांतर      २६६ -१६-४१
जन्मगाव फलटण १७-५९ आहेत पूर्ण अंश १८ घेऊ .
२) सायन जन्म लग्नजवळ्चे मोठे लग्न  २६६-४२-३२ सां कां  १२-१८
    सायन जन्म लग्नजवळ्चे लहानलग्न २६६-०१-३८सां कां   १२-१५                                                         -----------------------------------------------------------------------
                                                    फरक ००-४०-५४              ००-०३ मिनिटे

वरील वाजबाकीवरून ३-०० मिनिटामध्ये लग्न भाव ४०-५४ कला पुढे गेला . सोयीसाठी ४१ कला घेऊ
हि झाली लग्न  भावाची गती
३) आता जन्म सायन लग्न व लहान लग्न यामधील फरक काढू .
             सायन जन्म लग्न २६६-१६-४१
            सायन लहान  लग्न २६६-०१-३८
                                       ----------------------
                                          ००-१५-०३  सोयीसाठी १५ घेऊ
 ४१ कला जाण्यास १८० सेकंद लागतात तर २५ कला जाण्यासाठी किती ?
                          = १ मिनिट ६ सेकंद
लहान लग्नाचा सां काळ   १२-१५-००
+ २५ कलासाठी सां कळ  ००-०१-०६
                                 -----------------------
जन्मवेळेचा  सां काळ १२-१६-०६ यावरून जन्मवेळ शोधणे खालीलप्रमाणे
  जन्मवेळेचा सां काळ       ता . मि. से 
                                        १२-१६-०६
(-)जन्मतारखेचा सां काळ ०५-४८-२८
                               ----------------------
     संसाकरीत वेळ            ०६-२७-३८
संस्कार करा                  गुणिले १० व भागिले ६   = ६४ सेकंद - १ मिनिट ०४ सेकंद
 संसाकरीत वेळ           ०६-२७-३८
                          (-)            ०१-०४
                                ------------------
       स्थानिक वेळ         ०६-२६-३४
          रेखंतर काळ (+)  ००-३२-१६
                                  -------------------
standard जन्म वेळ      ०६-५८-५०
 जन्मवेळ सकळी  ६ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद अशी येईल 

Thursday 19 December 2013

> शेतजमिनीची विक्री केंव्हा होईल ?

Case Study- 10+ शेतजमिनीची विक्री केंव्हा होईल ?

                                     माझ्या मित्राच्या मुलाकडे एका नावाजलेल्या वाहनाच्या कंपनीची एजन्सी होती . व्यवसायाला  सुरुवात करताना बँकेचे कर्ज काढलेले होते .सुरुवातीला व्यवसाय चांगला चालला होता . सुरुवातीला बँकेचे हप्ते वेळच्यावेळी भरले जात होते,  नंतर नंतर बँकेचे हप्ते  थकत गेले . व्यवसायाला लागणारे भांडवल कमी पडत होते . ऑर्डर खूप येत होत्या . कंपनीकडून वाहन खरेदी करताना कंपनी सर्व रक्कम घेत होती .  वाहंन  विकल्यानंतर कंपनीकडून कमिशन मिळत होते . ऑर्डर प्रमाणे वाहनाची पूर्तता करता येत नव्हती . भांडवल कमी पडत असल्यामुळे व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालत नव्हता . 
                            माझ्या मित्राची शेती खूप होती व ती सर्व पाण्याखाली होती . म्हणून त्याने थोडी शेती विकायचे ठरविले . शेतजमीन विकण्याचा खूप प्रयत्न केला .  भांडवल उभे करण्या इतपत रक्कम मिळत नव्हती .  त्याला मुलाचे कर्ज फेडायचे होते. त्याच बरोबर भांडवल वाढवायचे होते . जी शेतजमीन विकायची होती त्यामध्ये एक बोअर होते ते २४ तास चालणारे होते . त्यामुळे त्याला वाटत होते आपल्याला चांगली रक्कम  मिळू शकेल 
                           एके दिवशी त्याने मला फोन केला व विचारले अरे माझी शेतजमीन केंव्हा विकली जाईल ? मी म्हटले तू माझ्या घरी ये मग बघू काय करायचे ते . 
१६ डिसेंबर संध्याकाळी माझ्या घरी आला व तोच प्रश्न त्याने माल विचारले मी त्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले . मन एकाग्र करून मनात प्रश्न घोळवून ,कुलदैवतेचे स्मरण करून  यातील एक पान  काढ . उजव्या बाजूवरील पान नंबर मला सांग . थोडावेळाने त्याने ७७ नंबर सांगितला . ह्या नंबरवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली  तयार केली. 
         घर प्लॉट जमीन विकण्यासाठी कृष्णमुर्ती नियम -------
        सप्तमस्थान हे घर जमीन विकत घेणार्याचे स्थान . साप्तमापासून चौथे स्थान म्हणजे दशमस्थान हे विकत घेणार्याचे घराचे स्थान  होईल . दशमास्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर १० (४), ५ (११),६ (१२) या भावांचा कार्येश असेल तर जमीन विकली जाईल .  ह्या भावांच्या दशा-अंतर्दाशेमध्ये घटना घडेल . 
दशमभावाचा सब राहू आहे राहूचे कार्येशत्व -----
                         राहू ----
       न . स्वामी गुरु   ----१०,९,११ कयू 
                 सब चंद्र ----६,१,७ कयू 
    स . न . स्वा चंद्र ----६,१,७ कयू 
दशमभावाचा सब राहू ६,१० या भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे शेत जमीन विकली जाणार हे निश्चित झाले . आता जमीन केंव्हा विकली जाणार ह्यासाठी आपणाला दश-अंतर्दशा पाहाव्या लागतील . 
                             प्रश्न्वेली प्रश्नकुंडली चर तत्वाची आहे . म्हणजे घटना लवकर घडणार आहे हे निर्देशित होते . प्रश्न्वेळी चंद्र महादशा ३१ मे २०१९ पर्यंत  व अंतर्दशा गुरूची ३० ऑगस्ट २०१३ पर्यंत  होती . चंद्र  बलवान कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
                      चंद्र ---६,१,७कयु गु दृ १०,९                     गुरु ---११कयू 
   न . स्वामी   चंद्र ---६,१,७कयु गु दृ १०,९                    चंद्र ----६,१,७ क्यू गु दृ १०,९
           सब    गुरु ---११ कयू                                         गुरु ---११ कयू 
    स . न . स्वा चंद्र ---६,१,७ कयू गु दृ १०,९                  चंद्र ---६,१,७ कयू गुरु दृ १०,९ 
चंद्र व गुरु दोन्ही ६,१० या भावाचे बलवान कार्येश आहेत . चंद्र व गुरु जमीन विकण्यास  अनुकूल आहेत आता ६,१०,५ या भावांपैकी पाचवा भाव लागलेला  नाही म्हणून विदशा अशी शोधावी  लागेल जी ५ या भावाची कार्येश आहे . या पत्रिकेमध्ये केतू व मंगळ हे दोनच ५ या भावाचे कार्येश आहेत . 
                 केतू विदशा २७/११/२०१२ ते २६/१२/२०१२
                मंगळ विदशा २१/५/२०१३ ते १८/६/२०१३
    प्रश्न कुंडली चर तत्वाची आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे हे निर्देशित होत आहे . शिवाय छाया ग्रह बलवान असतात म्हणून मी केतूची विदश निवडली .  केतूचे कार्येशत्व ----
                       केतू ---
      न . स्वामी रवि ---५,२
            सब     राहू   ----
    स . न . स्वा गुरु ---१०,९,११ कयू 
   केतू ५,९,१०,११ या भावांचा बलवान कार्येश आहे . याठिकाणी १०,५,६ या भावांची साखळी पूर्ण झाली म्हणून २७/११/२०१२ ते २६/१२/२०१२ या कालावधीत जमीन विकली जाईल असे सांगीतले . वास्तविक जातक १६/१२/२०१२ ला माझ्याकडे  होता  म्हणजे पुढील दहा दिवसात घटना घडणार होती . या दहा दिवसात चंद्र - गुरु -केतू यांचे गोचर भ्रमण अनुकूल होते . याच कालावधीत घटना घडेल असे खात्रीपूर्वक सांगितले . 
                     २९ डिसेंबरला   त्याचा  फोन आला दोन दिवसापूर्वी व्यवहार ठरला . रक्कम फार मोठी होती म्हणून त्याने( पार्टीने ) निम्मी रक्कम माझ्या मित्राला दिली . व राहिलेली रक्कम मार्च२०१३  मध्ये  देऊन कागदोपत्री दस्त करू असे ठरले आहे . 
 

Wednesday 18 December 2013

> कोणी घर देता का --- घर

+ कोणी घर देता का --- घर   

Case Study--9

        हे " नटसम्राट " या गाजलेल्या नाटकांतील   अप्पासाहेब बेलवलकर यांचे वाक्य.  साडेतीन हाताच्या 

देहाला रहायला एक घर हवय . माझ घर ,स्त्री पुरुषांनी गजबलेले घर ,चार भिंतीचे घर ,दगड विटा मातीने 

बांधलेले घर , जिथून कोणीही मला बाहेर  काढणार नाही असे माझे घर , माझ्या स्वप्नातले घर . 
                    
                         हे मिळविण्यासाठी किती तरी  आटापिटा करावा लागतो . तो करूनसुद्धा मिळेल तेंव्हा खर .

ज्यावेळी मिळते तेंव्हा स्वर्ग दोन बोटेच वर राहिलेला असतो .  
               
                                     असाच एक तरुण २२-२५ वर्षाचा स्वत:चे गांव सोडून आला होता . आई वडील त्याला 

सोडून गेले होते . सोबत एक धाकटा भाऊ . ह्याने आयटीआय कोर्स केलेला शिवाय मनुफक्चारिंग चा एक 

वर्षाचा कोर्स केलेला होता . हा  कमिन्स कंपनीत नोकरीला आहे . धाकटा भाऊ पुण्याला एका कंपनीत 

नोकरीला आहे. सध्या हा भाड्याच्या खोलीत रहात आहे . त्याच्या स्वप्नातल्या घरासाठी गेले वर्षभर प्रयत्न 

करीत आहे . आयते घर काही त्याला मिळत नव्हते . किंवा १-२ गुंठे जागाही त्याला मिळत नव्हती .  
                     
                                  एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला  सर , आयते घर काही मिळत नाही .

जे मिळतंय त्याच्या किमंती माझ्या आवाक्या पलीकडच्या आहेत. आता मी २ गुंठ्याचा प्लॉट

मिळविण्याच्या प्रयत्नात आहे . मला प्लॉट केंव्हा मिळेल ? असा प्रश्न त्याने मला विचारला . मी त्याला म्हटले

१ ते २४९ यामधील एखादी संख्या सांग . त्याने थोड एकाग्र होऊन १३१  संख्या सांगितली . ह्या नंबरवरून मी

कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .

 हा प्रश्न मी १४ सप्टेंबर २०१३ रोजी १२. ४८ . ४६ वाजता रे ७४ २६ पू  अ १७ ५९ उ येथे सोडविला . 

पत्रिकेचा अभ्यास करून 

 २३ ऑक्टोंबर २०१३ ते ३१ ऑक्टोंबर २०१३ या कालावधीत तुला घरासाठी प्लॉट मिळेल असे सांगितले . 

                    ३० ऑक्टोंबर रोजी त्याने मला फोन करून सांगितले कालच म्हणजे २९ ऑक्टोंबर ला जागेचा

व्यवहार झाला आहे  व टोकन म्हणून काही रक्कम दिली आहे . पुढील महिन्यात कागदोपत्री दस्त करणार

आहोत . सदरचा प्रश्न मी खालील पद्धतीने सोडविला . -----------

जागा घेण्यासाठी कृष्णमुर्ती नियम ----  चतुर्थ भावाचा उपनक्षत्रस्वामी जर ४,(घर ) ११ (लाभ ) व १२ 

(गुंतवणूक ) या भावांचा कार्येश असेल तर ४,११,१२ या भावांच्या दश अंतर्दाशेमध्ये घर किंवा जागेचा लाभ होतो . 
         
     ह्या कुंडलीमध्ये चातुर्थाचा सब शुक्र आहे  शुक्राचे कार्येशत्व --------
   
                  शुक्र --- १ कास्प्युती 
     न . स्वामी राहू ----१ शु १,८ श यु ४,१,५
           सब     गुरु ---- ९,६ 
स . न . स्वा . गुरु ---- ९,६ 

चातुर्थाचा सब शुक्र  ४ या प्रमुख भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणजे प्लॉट मिळणार हे  नक्की झाले. आता

केंव्हा मिळणार यासाठी दशा - अंतर्दशा पाहाव्या लागतील . 

                      प्रश्न वेळी शुक्र महादशा १७ जुलै २०२५ पर्यंत होती . व अंतर्दशा राहूची १७सप्टेंबर २०१५ पर्यंत

होती . शुक्राचे कार्येशत्व आपण वर पहिले आहे . शुक्र महादशा अनुकूल आहे आता राहूचे कार्येशत्व -----

                           राहू ----१,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
            न . स्वा   राहू -----१,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
                 सब    शुक्र ----१ कस्प युती
        स . न . स्वा राहू ---- १,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
 
            राहू अंतर्दश ४ या प्रमुख भावाची कार्येश आहे . 

प्रश्न वेळी शनि विदशा १३  जानेवारी २०१३ पर्यंत आहे . शनीचे कार्येशत्व -----

                   शनि ----१,४,५ शु यु १,८ राहू यु १
      न स्वा    राहू ----१,शु १,८ श यु १,४,५ मं दृ १०,२
          सब   बुध   ---१२ कस्प युती 
   स . न . स्वा चंद्र -- ३

          शनि ४, १२ या प्रमुख भावांचा कार्येश आहे . 
 
                   शुक्र महादशा ४ राहू अंतर्दशा ४  शनि ४, १२ या भावांचा कार्येश आहे . यामध्ये ११ वा भाव कोठेच

लागत नाही . म्हणून मी सूक्ष्म दशा पहायचे ठरविले कारण प्रश्न कुंडली चर तत्वाची आहे याचा अर्थ घटना

लवकर घडणार आहे . प्रश्नवेलि खालील सूक्ष्म दशा चालू होत्या . 
   
                        केतू --- २४ सप्टेंबर २०१३ पर्यंत 
                         शुक्र ----२३ ऑक्टोंबर २०१३ पर्यंत 
                        रवि -----३१ ऑक्टोंबर २०१३ पर्यंत 

  शुक्र ११ भावाचा कार्येश नाही हे आपण वर पहिलेच आहे . केतू व रवि हे दोन्ही ग्रह ११ या भावाचे कार्येश

आहेत . 

             केतू ---७,मं १०,२ शु दृ १,४,५                                                  रवि ----११
न . स्वा  शुक्र ----१,८,१  कस्प युती श यु १,४,५                         न स्वा  रवि ----११
    सब    रवि   ----११                                                                  सब   चंद्र ----
  स . न . स्वा --रवि ११                                                     स . न . स्वा शुक्र --१,८,१श यु १,४,५

केतू व रवि दोन्ही ४,११ या भावाचे कार्येश आहेत यापैकी कोणती विदशा निवडायची हा प्रश्न पडला होता . मा .

गोंधळेकर सर म्हणतात छाया ग्रह  नेहमी बलवान असतात . शिवाय केतू यशाच्या पायरीवर ११ या भावाचा

कार्येश आहे   पण रवि हा स्वत:च्या नक्षत्रात आहे . तसेच तो लाभेश असून लाभातच आहे ,म्हणून रवि

सुक्श्म्दशा निवडली . 
   
       शुक्र महादशा (४) राहू अंतर्दशा (४) शनि विदशा (४,१२) व रवि (४,११)   म्हणजे २३/१०/२०१३ ते

३१/१०/२०१३ या कालावधीत प्लॉट खरेदी केला जाईल . ह्याच कालावधीत घटना घडली आहे .


प्रा कोरडे पी आर ,
१४२,पद्मावातीनगर ,फलटण
९६२३४७४६२७ / ९४०३८१२६२८
            

Friday 6 December 2013

> पुनर्विवाह ...


Case Study--8

+ पुनर्विवाह

                 गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पुण्याहून एक साधारण ६०-६५ वयाचे गृहस्थ माझ्याकडे आले होते. मला म्हणाले हि माझ्या मुलीची कुंडली . हिचे लग्न झाले होते . पण ४-५ वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे. तिला एक ५-६ वर्षाचा मुलगा आहे. संध्या ती एका शाळेत हडपसर येथे नोकरीला आहे. आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे . पण आमच्यानंतर काय?  कोणाचातरी आधार असणे गरजेचे आहे असे मला वाटते . तिचा पुनर्विवाह होईल का?  हे विचारण्यासाठी मी आलो आहे .
              मी तिच्या पत्रिकेतील जन्मादिनांक ,वेळ व जन्मठीकाण लिहून घेतले व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
           
     पुनर्विवाहसाठी कृष्णमुर्ती नियम ---१) सप्तमाचा सब बुध असेल किंवा रव्यादि ग्रह द्विस्वभाव राशीत असेल ,किंवा त्याचा नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल ,आणि ते सर्व २,७,११ भावांचे कार्येश असतील तर पुनर्विवाह होईल. पुनर्विवाह द्वितीय स्थानावरूनही  पाहतात .
                                                           २) द्वितीय भावाचा सब बुध असेल किंवा रव्यादि ग्रह द्विस्वभाव राशीत असेल  ,किंवा त्याचा नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल ,आणि ते सर्व २,७,११ भावांचे कार्येश असतील तर पुनर्विवाह होईल.                  वरील नियम ह्या कुंडलीला लागू पडतात का ते पाहू ----
                                  हि  कुंडली सिंह लग्नाची व स्थिर तत्वाची आहे . ह्या कुंडलीत सप्तमाचा सब गुरु आहे गुरु मेष  या चर तत्वाच्या राशीत भाग्यात आहे . त्याचा नक्षत्रस्वामी केतू आहे. केतू वृषभ या स्थिर तत्वाच्या राशीत दशमात आहे . सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी  द्विस्वभाव राशीमध्ये नाहीत म्हणजे पुनर्विवाह होणार नाही
                                   आता द्वितीय भावावरून पाहू
              द्वितीय भावाचा सब केतू आहे . केतू वृषभ या स्थिर राशीत दशमात आहे . त्याचा नक्षत्रस्वामी रवि आहे . रवि सिंह या स्थिर राशीत लग्नात आहे . याठिकाणीही द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही. म्हणजे पुनर्विवाह होणार नाही  खात्रीपूर्वक सांगता येते .
                             त्याना स्पष्ट   सांगावे लागले . ते खूप नाराज झाले . नकारात्मक उत्तर देणे हे प्रत्येक ज्योतिषाला अवघडच  वाटत असते. व्यक्ती मोठ्या आशेने आली होती . शेवटी माणूस हा आशेवर जगणारा प्राणी आहे . आज नाही घडले तर उद्या नक्की घडेल  असे त्याला वाटत असते .
                              
                                         मी त्यांना म्हटले अजून एक प्रयत्न करून पाहू . तुम्ही मुलीच्या पुनर्विवाहा संबंधित आला आहात  तर मला १ ते २४९ यामधील एखादी संख्या सांगा . त्यांनी थोड एकाग्र होऊन २०१  हि संख्या सांगितली ह्या नंबरवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .
                           ती मकर लग्नाची चर तत्वाची कुंडली होती .प्रश्न मुलीच्या वडिलांनी विचारला होता म्हणून पंचमस्थान हे मुलीचे लग्नस्थान होईल . पंचाम्स्थानी वृषभ हि स्थिर तत्वाची रास आहे याठिकाणी सुद्धा  मुलीचे लग्नस्थान स्थिर तत्वाचे आहे . पंचम स्थान लग्नस्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे. ह्या
 कुंडलीला वरील नियम लागू पडतात का ते पाहू पंचमापासून साप्तम स्थान म्हणजे लाभस्थान  
        सप्तम स्थानाचा सब ( मूळ कुंडलीचे  लाभस्थान ) राहू आहे . राहू हा वृश्चिक या  स्थिर तत्वाचे राशीत 
सप्त मात आहे . त्याचा नक्षत्रस्वामी शनि  आहे  शनि हा तूळ या चर तत्वाच्या राशीत षष्ठ त  आहे .याठिकाणी हि द्विस्वभाव  राशीचा संबब्ध येत नाही . 
       आता द्वितीय भावावरून पाहू --
     द्वितीय भावाचा सब (मुळ कुंडलिचे षष्ठ स्थान ) केतू आहे . केतू हा वृषभ या स्थिर राशीत  आहे 
त्याचा नक्षत्रस्वामी रवि आहे रवि हा कर्क या चर तत्वाच्या राशीत  आहे . इथे सुधा द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही . 
                           वैशिष्ट्य म्हणजे मुळ कुंडली व प्रश्न कुंडलीत द्वितीयाचा सब केतूच आहे ऽअनि तोही वृषभ या राशीत आहे. सर्व साधारणपणे राहू , केतू यांना बारा राशीतून भ्रमण करण्यास १८ वर्षे लागतात . प्रश्नही नेमका वयाच्या ३६ व्या वर्षी विचारला आहे . 
                            द्विस्वभाव राशीशी संबंध येत नसल्यामुळे २,७,११ या भावाचे कार्येश बघण्याचा प्रश्न येत नाही हा प्रश्न एकूण ४ प्रकारे ( मुळ कुंडली -२,प्रश्न कुंडली-२) तपासाला . तरीही उत्तर   एकच आले . नकार देणे हे प्रत्येक ज्योतिषाच्या वाट्याला येणारे एक कटू सत्य आहे . 
                            आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मना सारख्या घडतात का ? काही घडतात , काही नाही घडत . घडत नाही म्हणून तिथेच थांबायचे का?  सूर्य उगवायचा थांबला आहे का ? तो रोज उगवतोच ना . मग आपण का थांबायचे . नियतीने  जे दान पदरात टाकले आहे  ते स्वीकारायला नको का ? जो स्वीकारतो तोच यशस्वी होतो . ज्योतिषी फक्त प्रारब्धात  काय वाढून ठेवले आहे तेवढेच सांगत असतो . त्याला कोणाचेही प्रारब्ध बदलता  येत नाही . आपली पायवाट आपणालाच चालावयाची आहे.   कोण जाणे पुढे याहीपेक्षा सुंदर असे काही आपली प्रतीक्षा करत असेल . 
                                                                             

Tuesday 26 November 2013

+Case Study-7

एका लग्नाची तिसरी गोष्ट------

                                 वय वर्षे ३२ हे विवाहयोग्य वय असू शकत नाही . विवाहाला जेंव्हा  उशीर  होतो त्यावेळी शनि,मंगळ व हर्शल यांचा संबंध असू शकतो . मंगल वयाच्या २७-२८व्या वर्षी ,शनी वयाच्या २९-३२ व्या वर्षी , व हर्शल ३२-३५  वर्षी विवाह देतो . शनि १,३,५,७,१० व्या स्थानात असतो त्यावेळी विवाहाला उशीर होत असतो. मंगळ १,४,७,८,१२व्या स्थानात  असेल तर विवाहाला उशीर होतो . हर्शल सप्तम स्थानात किंवा हर्षलची सप्तम स्थानावर दृष्टी असेल तर विवाहाला उशीर होत असतो . शुक्र हर्शल युती, प्रतियोग हासुद्धा योग विवाहाला उशीर  करतो चंद्र शनि युती असेल तर ,चंद्र शनीच्या नक्षत्रात ,शनि चंद्राच्या नक्षत्रात ,चंद्रावर  शनीची दृष्टी असेल तर पुनर्फू योगामुळे विवाहाला उशीर होत असतो ,चंद्राचा सब शनि असेल,किंवा शनीचा सब चंद्र असेल तर विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शनि, बुध राहू असेल तरीसुद्धा विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शुक्र ,चंद्र ,मगळ ,रवि गुरु असेल तर विवाह योग्य वयात होतो असा अनुभव प्रत्येक ज्योतिषाला येत असतो .पत्रिका पाहताना विवाहाला उशीर  का होत आहे याचा  विचार होणे गरजेचे आहे . शनि  , मंगळ ,हर्शल चा संबंध आहे का ते पाहीले पाहिजे अन्यथा कालावधी चुकू शकतो .  
              अनुजा जेंव्हा माझ्याकडे आली तेंव्हा तिचे वय ३२ पूर्ण झाले होते  तिने माझा विवाह केंव्हा होईल?  असे विचारले वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र चतुर्थात अंशात्मक प्रतियोग हर्शल (हर्शल दशमात) मी विचारले विवाह ठरला आणि मोडला असे झाले आहे का? तिने सांगितले असे दोन वेळा घडले आहे . एकदा आमच्याकडून घडले, दुसरयांदा मुलाकडून घडले .  
              विवाह योग्य वयात म्हणजे वय वर्षे २० मध्ये चंद्राची महादशा चालू होती ती २८ सप्टेम्बर २००६ पर्यंत होती . चंद्र शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र हर्शल अंशात्मक प्रतियोग आहे म्हणून चंद्राच्या महादाशेमध्ये विवाह झाला नाही . त्यांनतर मंगळाची महादशा मंगळ सुद्धा शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र हर्शल अंशात्मक प्रतियोग आहे मंगळाची महादशा  ऑक्टोंबर २०१३ पर्यंत होती . मंगळ महदशेमध्ये सुद्धा विवाह झाला नाही . तोपर्यंत तिचे  वय ३२ पूर्ण झाले 
              या मुलीचे दोन वेळ विवाह ठरवून मोडले आहेत . पहीला मोडला २०१२ मध्ये सुरुवातीला, दुसरा  २०१२ मध्ये शेवटी शेवटी  . या दोन्ही वेळेला मंगळ  / शुक्र दशा चालू होती . मंगळ शुक्राच्या नक्षत्रात आहे . शुक्र हर्शल प्रतियोग आहे .  
            या नंतरची राहू महादशा २८ सप्टेंबर २०३१ पर्यंत आहे .  राहू कार्येशत्व खालीलप्रमाणे --------
        
 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (6)      Rashi-Swami Moon (7)   6 7
It's N.Swami :-------- Saturn:- (8)   (1) 12  Cusp Yuti: (8)       Jupiter-Yuti  (8)   (2) (11)
It's Sub :------------ Moon:- 7   6 7   
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   4 (9)  Cusp Yuti: (4)       Jupiter-Drusht  (8)   (2) (11)
Itself aspects :------ 1
                

राहू २,७,११ व ८या पूरक भावाचा कार्येश आहे राहूची महादशा विवाहास अनुकूल आहे . राहू दुसऱ्या पायरीला सर्वच भावाचा कार्येश आहे म्हणून राहू महादाशेमध्ये राहू अंतर्दशा गृहीत धरली . राहू अंतर्दाशेमध्ये विदश खालीलप्रमाणे ------
                     राहू / राहू / राहू --२२/२/२०१४ पर्यंत 
                                     गुरु ---४/७/२०१४ पर्यंत 
                                    शनि---७/१२/२०१४ पर्यंत 
  गुरु नक्षत्रात कोणीही नाही म्हणून गुरु  बलवान आहे . गुरु व शनि चे कार्येशत्व -------
      PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (8)   (2) (11)  Cusp Yuti: (8)       Saturn-Yuti  (8)   (1) 12
It's N.Swami :-------- Sun:- (3)     
It's Sub :------------ Ketu:- (12)      Rashi-Swami Saturn (8)   (1) 12
It's Sub's N.Swami :-- Moon:- (7)   6 7   
Itself aspects :------ 3 1 5
 PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 8   1 12  Cusp Yuti: (8)       Jupiter-Yuti  8  2 11
It's N.Swami :-------- Sun:- (3)     
It's Sub :------------ Venus:- 3   4 9  Cusp Yuti: (4)       Jupiter-Drusht  8  2 11
It's Sub's N.Swami :-- Sun:- (3)     
Itself aspects :------ 3 11 6                     

              गुरु व शनि यांची तुलना करता गुरु जास्त बलवान आहे . कारण गुरु लाभेश व धनेश आहे . शनि लग्नेश व व्ययेश आहे . म्हणून राहू महादशा राहू अंतर्दशा गुरु विदशामध्ये विवाहास व्हावयास हवा . तो कालावधी येतो २२ / २ / २०१४ ते ७/७/२०१४ . या कालावधीत विवाह होईल 
            

Tuesday 12 November 2013

Case Study--6

+ जिवेत शरद : शतम 

                                  मृत्यू एक त्रिकालाबाधित सत्य . प्रत्येकाच्या वाट्याला येणारे कटू सत्य.  एका चैतन्याचा अंत ,जीवात्म्याचा परमात्म्यात विलीन होण्याचा क्षण ,  पंचमहाभूतात विलीन होण्याचा क्षण , एका जीवात्म्याचा आणि देहाचा विरहाचा क्षण . 
                                 पण प्रकार वेगवेगळे , अपघातात येणारा मृत्यू ,शांतपणे येणारा मृत्यू ,झोपेत येणारा मृत्यू, असह्य वेदना सहन करीत येणारा मृत्यू , पाण्यात येणारा मृत्यू ,आगीत  भाजून येणारा मृत्यू . 
         मृत्यूला सामोरे जाण्याचा क्षण ……। हे फक्त साधू संताच्या बाबतीत  घडू शकते   मानवाच्या बाबतीत अंशत:  ------

                              माझे वडील वारकरी संप्रदायातले होते . सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आई -वडील    दोघेही चारी धाम करून आले होते . आई -वडील दोघेही आळंदी ते पंढरपूर वारी  पायी करत होते . आजही आई पंढरपूरची वारी पायी करत आहे . 
                             वडिलांनी मधुमेह बरोबर केलेली मैत्री ,ती झाल्यापासून जवळजवळ २०-२५ वर्षे अबाधित ठेवली . पण शेवटी शेवटी  मैत्रीत अंतर पडत गेले  आणि मधुमेहाने वडिलांना पंचमहाभूतात विलीन होण्यासठी मुक्त केले .                 
                    शेवटचे ५-६ महिने वडील जास्त आजारी होते मधुमेहामुळे रक्तातील  साखरेचे प्रमाण कमी जास्त होत होते  रक्तातील Creatinin हा घटक वाढलेला होता त्यामुळे उत्सर्जनचे प्रमाण कमी झाले होते. आणि त्यातच अर्धांगवायू झटका ( फक्त चेहर्यापुरता ) Creatinin चे प्रमाण कमी होत नव्हते  शरीर औषधाला प्रतिसाद  नव्हते . जाण्यापूर्वी  दोन दिवस अगोदर पुन्हा एकदा अर्धांगवायू चा जबरदस्त झटाका आला .  . त्यावेळी मेंदूचे स्कॅन केले . त्यांची सर्व गात्रे शिथिल झाली होती श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता म्हणून  त्यांना व्हेण्टिल्लेटर्वर ठेवले होते .  माझी भाची डॉक्टर आहे . तिने सांगितले ,मामा  infection झाले आहे .वेळ आली आहे ,वाट पाहणे आपल्या हाती आहे . रविवारी पहाटे ३-३.३० वाजता ब्राम्हमुहुर्तावर पंचमहाभूतात  विलीन झाले
एक वारकरी विठ्ठलाला भेटावयास वैकुंठाला  गेला .
                               खरे तर असा प्रश्न कोणी विचारत नाही . मी आजारी केंव्हा पडणार आहे ? मला अपघात केंव्हा होणार आहे ? मला मृत्यू केंव्हा येणार आहे ? फार फार तर  माणूस आजारी असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले  जातात .
                              मीच यासंबंधी  तीन आठवडे अगोदर प्रश्न कुंडली मांडून वडिलांचा आजार केंव्हा  बरा  होईल ते पहिले होते . त्यावेळी माझ्या लक्षात आले फार काळ नाही . नियतीचा पावलांचा सुगावा लागला होता . हे , मी फक्त माझे वकील बंधू यांचेजवळ बोललो होतो .
                       कृष्णमुर्ती पद्धतीने माझ्या पत्रिकेवरून वडिलांच्या मृत्यू बद्धल 
                                 ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोनातून  केलेली चिकित्सा 
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये वडिलांचा विचार  नवम स्थानातून करतात . नवम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून  घेतली आहे . 
                   आजाराचा प्रश्न हा प्रश्न कुंडली वरून सोडवावा असा संकेत आहे कारण  मुळ कुंडली  आयुष्यात जे जे आजार होणार त्याचे निर्देशन करीत असते . प्रश्न कुंडली --त्यावेळी नेमका  कोणता आजार झाला आहे त्याचे निर्देशन करीत असते .    आजारासंबंधी खालील गोष्टी पहाव्यात . -----
                 १) लग्नाच्या सब वरून अल्पायु ,मध्यायू  व दीर्घायू पाहावा 
                 २) शष्ट भाव आजार,रोग दाखवितो 
                ३) व्यय भाव हौस्पिटल दाखवितो 
                ४) अष्टम भाव दोष ,धोका दाखवितो (शस्त्रक्रिया )
                ५) षष्ठ  भावाचा उपनक्षत्र स्वामी हाच आजारपणाचा एकमेव निर्णायक घटक असतो
        जे ग्रह षष्ठ भाव ,लग्न भाव यांच्याशी संबंधित असतात त्यांच्या सामायिक दशेत आजार उद्भवतो .   षष्ठ भावाचा सब द्वादश भावात असून षष्ठ भाव व लग्नाचा बलवान कार्येश असेल तर व्यक्ती असाध्य आजाराने त्रस्त असते .  षष्ठ भावाचा सब द्वादश भावाचा कार्येश असून पंचम व एकादश भावाचा कार्येश असेल तर व्यक्ती औषधोपचाराने बरी होते . षष्ठ भावाबरोबर मारक (२,७) बाधक व अष्टम स्थानाचा विचार करावा लागतो . बाधक स्थानाचा संबंध येत असेल तर व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते अष्टम भावाचा सब आयुष्याच्या शेवटी स्थिती कशी असते हे दर्शवितो . 
     माझी पत्रिकेची लग्नशुद्धि  मा . श्री हिरेमठ यांनी केली आहे .    माझ्या पत्रिकेवरून वडिलाच्या आजारपणात शनि महादश -शनि अंतर्दशा -- राहू विदशा चालू  होती शष्ट भावाचा सब गुरु आहे.  गुरु लग्नाचा, चतुर्थ भावाचा, षष्ठ भावाचा ,नवम भावाचा, दशम भावाचा व व्यय भावाचा सब आहे . गुरुचे कार्येशत्व -----
                            गुरु ----१० कयू 
      न . स्वामी     मंगळ ----२,३,८ श यु २,६
            सब         गुरु  ----- १० कयू     
    स . न .स्वामी मंगळ ----२,३,८ श यु २,६
      गुरु २ ( मारक ) ८ (मृत्यू ,शस्त्रक्रिया ) ६ (रोग, आजार ) व १० ( लाभाचे व्यय ) यांचा बलवान कार्येश आहे . 

                 गुरूमुळे मधुमेह झाला गुरु नवम स्थानात त्यामुळे २०-२५ वर्षे नियंत्रणात होता . गुरु मंगळाच्या नक्षत्रात . मंगल तुळेत व्दितीयात (मारक) आहे. मंगळ शुक्राच्या राशीत आहे . मंगल शस्त्रक्रिया करवितो त्यामुळे प्रोस्ट्रेट ग्लंड ची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच मुळ्व्याधची  शास्त्राक्रीया झाली आहे . (शुक्र-मुळव्याध)  मंगळ शनीच्या युतीत तुल राशीत आहे . मंगळ  (२,३,६,७,८,४) स्नायूचे व मेंदूचे आजार देतो . शनि आकुंचन करणारा आहे . शनीमुळे (२,३,६,७,८,४ ) पक्षाघात (अर्धांगवायू )झाला .सुरुवतीला तो  फक्त चेहर्यापुरता होता कारण शष्ट भावाचा सब गुरु वृषभ राशीत आहे . वृषभ राशीचा अमंल गळा ,घसा ,श्वासनलिका ,अन्ननलिका ,मान यावर आहे . मृत्युपूर्वी वडिलांना घास गिळताना त्रास होत होता . पक्षाघात मेंदूला  रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे झाला   शनि तूळ राशीत असल्यामुळे, तुळ राशीचा संबंध मूत्राशय,मूत्रपिंड यावर आहे .  शनि आकुंचन ,गोठविणारा असल्यामुळे उत्सर्जन कमी होत होते त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळितपणे होत नव्हते . त्याच्यावर ताण पडत होता . रक्तातील क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत होते . डॉक्टर  म्हणाले क्रियेटिनिन हे त्वचेच्या खालच्या  थराला चिकटून राहते . त्यामुळे घाम  येत नाही . व अंगाला खाज सुटते अक्षरश: वडील खाज सुटत असल्यामुळे अंग , पाठ भिंतीला  घासत असत इतकी भयंकर खाज येत होती .
                    वडील आजारी होते त्यावेळी शनि महादाशेमध्ये शनि अंतर्दशा राहू विदशा चालू होती ४/११/२०११ ते २१/४/२०१२ सूक्ष्मदशा गुरूची होती ३/१२/२०११ ते २५/१२/२०११
                     शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
                                  शनि ---२,६,मं यु २,३,८
         न . स्वामी          राहू ---५ श २,६,न . रवि २,४
               सब              बुध ---४,शु यु ४,१०
      स . न . स्वामी      केतू ---११,चं १२ न . गु ९,७,१०
                       शनि २ (मारक) ,३ (अष्टमाचे अष्टम ) ६ (रोग ,आजार )४ (चिरशांती ),७ (बाधक )
१० (लाभाचे व्यय)१२( हौस्पिटल )  सर्वांचा बलवान कार्येश होता . शनि तूळेत मंगळाच्या युतीत होता
                                 राहू ---
             न . स्वामी   रवि ---४ श दृ २,६
                   सब      गुरु ---१० कयू
    स  न . स्वामी मंगळ  ---२,३,८ श यु २,६
राहू २ (मारक) ३ (अष्ट माचे अष्टम )४ (चिरशांती) ६ (रोग,आजार) ८ (मृत्यू )या सर्व भावांचा बलवान कार्येश होता .
                       शनि महादश--- २,३,४,५,६,७,८,९,१०,१२
                      शनि अंतर्दशा
                      राहू विदशा ---   २,३,४,६,८
                गुरु सूक्ष्म दशा ----२,३,६,८,१०
                 शुक्र प्रांणदशा ---१,२,४,६,११,१२
 शुक्र प्राणदशा १४/१२/२०११ ते १८/१२/२०११ पर्यंत होती 
   १८/१२/२०११   पहाटे ३. ३० वाजता निधन झाले .