Saturday, 26 November 2022

सब --चंद्र  सिद्धांत  किंवा सब चंद्र कनेक्शन थेअरी  

लग्नाचा उपनक्षत्र स्वामी किंवा सब हा कोणत्याही प्रकारे चंद्राशी संबंधित असावा .  

१) प्रथम भावाचा सब चंद्र असावा . 

२)  प्रथम भावाचा सब हा कर्क राशीत असावा . 

३)  प्रथम भावाचा सब च राशिस्वामी / नक्षत्र स्वामी हा चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी असावा 

४) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी व चंद्राचा नक्षत्रस्वामी एकाच असावा . 

५) प्रथम भावाचा सब चा नक्षत्रस्वामी व चंद्राचा राशिस्वामी एकाच असावा . 

६) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी / नक्षत्रस्वामी व चंद्राच्या राशिस्वामी /  नक्षत्रस्वामी  यांच्यामध्ये दृष्टी योग्य किंवा युतीत असावेत. 

७) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी / नक्षत्रस्वामी  तिसऱ्या  ग्रहाच्या माध्यमातून  चंद्राच्या राशिस्वामी किंवा नक्षत्रस्वामी शी संबंधित असावेत. 

८) दृष्टी अथवा युती साध्या  कुंडलीप्रमाणे पहावी.  

जन्मवेळेत याही पुढे अचूकता आणण्यासाठी कुटुंबातील सर्वांच्या कुंडल्या घ्याव्यात. ( जातक , जातकाचे आई , वडील, भाऊ , बहीण , बायको , मुलगा मुलगी ) 

जातकाच्या ४ भावाचा सब चा आईच्या पत्रिकेतीळ चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा .  , जातकाच्या ९ व्या भावाचा सब चा वडिलांच्या पत्रिकेतील चंद्राशी वरीलप्रमाणे संबंध असावा . जातकाच्या ११ व्या भावाचा सब चा मोठ्या भावाच्या पत्रिकेतील चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . जातकांच्या ३ ऱ्या भावाचा सब चा धाकटी भावाच्या पत्रिकेतील चंद्राशी वरीलप्रमाणे संबंध असावा . जातकाच्या ७ भावाचा सब चा बायकोच्या पत्रिकेतील चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . जातकाच्या लाभाचा सब चा पहिल्या अपत्याच्या पत्रिकेतील चंद्राशी असावा . जातकाच्या प्रथम भावाचा सब चा जातकाच्या दुसऱ्या अपत्याच्या पत्रिकेतील चंद्राशी असावा. 

अशाप्रकारे नसेल तर जन्मवेळेत  मिनिटे (+)  किंवा (-) करून वेळ निश्चित  करावी 

अशाप्रकारे जातकाच्या पत्रिकेतील लग्न भावाची शुद्धी करता येते. 

जातकाचे लिंग खालीलप्रकारे ठरवावे ---स्त्री , पुरुष 

१)          जातकाचे पत्रिकेतील लग्न भावाचा सब सब हा विषम राशीत असेल तर पहिल्या १५ अंशापर्यंत पुरुष लिंग व नंतरच्या अंशात ( १५ पेक्षा जास्त ) असेल तर स्त्री लिंग समजावे . 

२)  जातकाचे पत्रिकेतील लग्न भावाचा सब सब हा  सम राशीत असेल तर पहिल्या १५ अंशापर्यंत स्त्री लिंग व नंतरच्या अंशात ( १५ पेक्षा जास्त ) असेल तर  पुरुष लिंग समजावे . 

अशाप्रकारे नसेल तर सब सब जुळवून घ्यावा .

Wednesday, 10 August 2022

मेडिकल प्रवेश ---

                              फेसबुक वरील लेख वाचून एका पालकांचा फोन ..... माझ्या मुलीने आता NIIT  ची परीक्षा दिली आहे . तिला मेडिकल जाण्याची खूप इच्छा आहे  आणि तिला खात्री वाटते तिला प्रवेश मिळेल. तरीसुद्धा मनात थोडी धाकधूक वाटत. आहे . ऍडमिशन  मिळेल कि नाही . प्रवेश  नाही मिळाले तर रिपीटेशन क्लास ला बसता येणार नाही. . सद्य रिपीटेशन चे क्लास सुरु झाले आहेत. मी विचारले रिपीटेशन क्लास म्हणजे काय ? म्हणाले ज्यांना NIIT परीक्षेत स्कोअ र होणार नाही असे वाटते.अशा मुलांचे पुढील वर्षासाठी क्लासेस  आतापासून  सुरु करतात. प्रवेश  मिळणार नसेल तर पुढील वर्षासाठी रिपीटेशन क्लास जॉईन करता येईल. ( म्हणजे पुन्हा फी भरायची ६०-७०,०००)

मी म्हटले मुलीकडे फोन द्या . मी हा प्रश्न नंबर कुंडलीनुसार सोडवायचे ठरविले. मुलीला  थोडक्यात नंबर कुंडली बदल माहिती सांगितली . मला मेडिकल प्रवेश मिळेल का ? असा विचार मनात करून  १ ते २४९ या मधील कोणतीही संख्या सांग . संख्या लकी नंबर असू नये.  . तिने ६५ हि संख्या सांगितली .  के.पी नंबर ६५ यावरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडल तयार केली . 

नियम--- ४ त्या भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी  , लाभाचा (११) कार्येश असेल   त्याच बरोबर लाभाचा (११) सब ४ त्या भावाचा कार्येश असेल तर प्रवेश मिळे.ल . दोन्ही नियम लागू होत असतील तरच  प्रवेश मिळेल. ४ त्या भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा . ४ थ्या  भावाचा सब वक्री असला तरी चालेल ,फक्त त्याचा नक्षत्र स्वामी वक्री नसावा . ४थ्या  भावाचा सब वक्री  ग्रहाच्या नक्षत्रात असून  आणि लाभाचा कार्येश असला तरी प्रवेश मिळत नाही . 

दि --८ / ८ /२०२२   वेळ--१२=०५-५७

हि कुंडली कर्क लग्नाची आहे . ज्यावेळी कुंडलीचे कर्क लग्न असते त्यावेळी होकारार्थी उत्तर द्यावे असा एक संकेत आहे . पण हा शॉर्टकट झाला. प्रत्यक्षात कुंडलीवरून काय येते ते पहिले पाहिजे . म्हणून मी कुंडली पाहायला सुरुवात केली . नियमानुसार ४ थ्या भावाचा सब गुरु आहे आता गुरु वक्री  आहे . एक निरीक्षण ज्यावेळी शिक्षणासंबंधी प्रश्न असतात गुरु किंवा बुध ची उपस्थिती असते . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --

गुरु-- 

शनी(व)---८ , ७ , ८ क.यु दृष्टी २ , १० , 

राहू--१० , मंगल १० ,दृ चंद्र ५ ,६ क यु दृ २

शुक्र ---१ , ११

गुरु २,५,६,७,८,१० ११ चा कार्येश आहे गुरु ११ भावाचा कार्येश आहे परंतु गुरु स्वतः वक्री असून शनी ह्या वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे . 

लाभाचा सब राहू आहे . राहू चे कार्येशत्व ----

राहू--१०,११ क .यु मंगळ १०, दृ चंद्र ५

शुक्र --१, ११, दृ ७

शनी---८ क यु 

मंगळ ... १०, दृ चंद्र ५,, ११

लाभाचा सब राहू ४ चा कार्येश नाही .

सबब ह्या मुलीला मेडिकल ला प्रवेश मिळणार नाही. हे खात्रीपूर्वक सांगता येईल .( नियमानुसार ) पुन्हा पुढील वर्षी प्रयत्न करावा . असे सांगितले . अद्याप प्रवेश सुरु झाले नाहीत. घोडे मैदान जवळच आहे . प्रवेशासंबंधी कळले कि आपणाला कळवीनचं . असो .... खरे तर असे प्रश्न ज्योतिषाच्या माध्यमातून सोडवावेत का ? उत्तर होय आले तर ठीक आणि उत्तर नाही आले तर मुलगा मुलगी , चे मानसिक खच्चीकरण होऊ शकते . त्यांना टेन्शन येते. अशी मुले डिप्रेशन  मध्ये गेली  तर लवकर उभारी घेत नाहीत. कारण हल्लीच्या मुलांच्यामध्ये सहनशीलता खूप कमी आहे . तिने जी संख्या  सांगितली ती म्हणजे ६५. या संख्येतून काय अर्थ बोध होतो. ६ भावावरून रोग आजार चा बोध होतो. ५ यावरून औषधोपचार आणि दोघांची बे रीज केली तर ११ येते म्हणजे इच्छापूर्ती. सादर जातकाची मेडिकल ला जाण्याची खूप इच्छा आहे असे दिसते. आता थोडा वेगळा विचार केला तर -- NIIT  परीक्षा हि एक स्पर्धा परीक्षा च आहे . ६५ या संख्येवरून ---सुरवातीला ६ हि संख्या आहे म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर विजय असे म्हणता येईल . परंतु त्यानंतरचा ५ हि संख्या समोरच्याला लाभदायक राहील. थोडक्यात काय  तर प्रवेश मिळणार नाही .. अजून एक ह्या मुलीची MBBS  ला च जाण्याची आहे . ४ भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी स्थिर राशीत असेल तर MBBS  ला ऍडमिशन मिळेल. पण याठिकाणी ४ चा सब गुरु मिन राशीत व त्याचा नक्षत्र स्वामी शनी मकर राशीत आहे मिन रासं  द्विस्वभावी व मकर हि रास चर तत्वाची आहे येथे कोठेही स्थिर राशीचा संबंध आलेला नाही

. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट ला मी सांगितले प्रवेश मिळणार नाही. ७ सप्टेंबर ला निकाल लागला त्यात तिला खूपच कमी मार्क मिळाले . एम बी बी एस ला ऍडमिशन मिळणार नाही ह्याची तिला खात्री झाली . पुन्हा तिने प्रयत्न करायचे ठरविले आहे .  .  महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु  !!!

Tuesday, 9 August 2022

            नोकरी ---

                        एक स्त्री ..नर्स आहे. आतापर्यंत खाजगी हॉ स्पिटल मध्ये १०-१२ वर्षे नोकरी केली. खाजगी हॉस्पिटल मध्ये १०-१२ तास काम करावे लागत होते त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होत होते घराच्या लोकांसाठी पाहिजे तेव्हढा वेळ देता येत नव्हता. . एक मुलगा आहे . त्याच्याकडे लक्ष देता येत नव्हते , म्हणून तिने नोकरी सोडून दिली. एक दोन महिने घरी थांबली सकाळचा वेळ घरकामामध्ये जात होता. पण दुपारी काहीच काम नव्हते. म्हणून पुन्हा तिने नोकरी करण्याचा विचार केला  माझ्याशी संपर्क केला . मला म्हणाली मला सरकारी नोकरी केंव्हा लागेल. ? मी  तिच्या बर्थ डिटेल्स वरून नोकरी केंव्हा लागेल ते सांगितले . त्या प्रमाणे तिला  नगरपालिकेचा कॉल आला .तिची निवड झाली आणि कल्याण ( मुंबई ) ला नोकरी सुरु झाली . प्रश्न पुढेच आहे .मुळची ती पुण्याची पण नोकरीसाठी तीला  डोंबिवलीला राहावे लागत होते . . ती राहते डोंबिवलीला आणि नोकरी आहे कल्याणला . डोंबिवली ते कल्याण हा प्रवास आहे ४ तासाचा .  प्रवासाची दगदग फार होत होती. जाण्यायेण्याचे  चार तास , नोकरीचे आठ तास पुन्हा पाहिल्यासारखेच होत होते . यापूर्वी तीने पुण्यात मुलाखाती दिल्या होत्या . परंतु त्यानंतर तेथील काही कळले नव्हते . अचानक एक दिवस पिंपरी चिंचवड पालीकेचा मेल आला . आपली निवड झाली आहे सात दिवसाच्या आत हजर व्हावे . आता तिच्यापुढे प्रश्न निर्माण झाला .कल्याणची  नोकरी सोडून पुण्याला जावे का . ? एक तर पुण्याला गेले तर प्रवास एक दीड तासाचा होणार आहे . मुलगा मंचरला असतो तेथून एक दीड  तासात पुण्याला येता  येत होते . घराकडे हि लक्ष देता येत होते . मुलांसाठी वेळ देता येणार  होता. पुण्याचे सोयीचे होते . पण निर्णय घेता येत नव्हता. काय करावे ? म्हणून तिने मला प्रश्न विचारला कल्याण कि पिंपरी चिंचवड ची नोकरी करावी ? आर्थिक दृष्टिकोनातून कोणते सोयीचे होईल ?  मी तिला सांगितले दोन्हीसाठी १ ते २४९ मधील एक -एक संख्या सांग. तिने खालीलप्रमाणे संख्या सांगितली 

  १) पिंपरी चिंचवड --५७      २) कल्याण ----७९

मी हा प्रश्न ऑप्शन पद्धतीने सोडवायचे ठरविले . मी ज्यावेळी प्रश्न सोडवायाला घेतला त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले . दि -- ६ / ८ /२०२२ वेळ --१६=३०=३३ 

केतू * , गुरु ( व ) , गुरु  ( व ) , मंगळ  , शनी (व ) 

गुरु व शनी दोन्ही वक्री आहेत म्हणून सोडून दिले . राहिले फक्त मंगळ व केतू . केतूला राशी नाहीत म्हणून केतू ज्या राशीमध्ये आहे त्याचा स्वामी विचारात घेतला . केतू तूळ राशीत आहे म्हणून शुक्र गृहीत धरला . आता मंगल ग्रहाच्या दोन राशी मेष आणि वृश्चिक आणि शुक्राच्या दोन राशी वृषभ व तूळ 

मंगळ --१+८ =९

शुक्र ---२+७ =९

-----------------------

बेरीज येते    १८ . ऑप्शन दोनच आहेत म्हणून १८ ची एक अंकी बेरीज घेतली  १+८=९ , या संख्येला दोन ने भागले . भागाकार ४ बाकी १ आला . बाकी एक आला म्हणून पहिला ऑप्शन हे उत्तर होईल 

आता हाच प्रश्न मी नंबर कुंडलीनुसार करायचे ठरविले .

नियम --- ज्या कुंडलीमध्ये दशम भावाचा सब जर २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर ते ठिकाण निवडावे 

१)  पिंपरी चिंचवड साठी के.पी . नंबर  ५७ घेऊन कुंडली तयार केली 

दि  --६ / ८ /२०२२ वेळ --१७=०१=३४ 

हि मिथुन लग्नाची कुंडली आहे दशम भावाचा सब गुरु आहे गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

गुरु--१० क .यु 

शनी--८

राहू ---११ मंगळ ११ , ६ 

शुक्र ---१ , १२

दशम भावाचा सब ६,१०,११ भावाचा कार्येश आहे    तसेच शनी ८ व्य स्थानी आहे , साध्या कुंडलीनुसार त्याची दृष्टी २ स्थानावर पडते ( अंशात्मक नाही ) म्हणजे एकूणच गुरु २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे . परंतु ८ मुले थोडा त्रास सुधा होऊ शकतो. दशम भावाचा सब १२ भावाचा कार्येश आहे , १२ भाव हॉस्पिटल दाखवितो. 

२)  कल्याण साठी के.पी नंबर ७९ घेऊन कुंडली तयार केली . हि कर्क  लग्नाची कुंडली आहे . 

 दि-- ६ / ८ / २०२२ वेळ -- १७=०७=५५ 

ह्या पत्रिकेत दशम भावाचा सब गुरु च आहे . गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

गुरु-- 

शनी---७

राहू---१०, मंगळ १० , ५ 

शुक्र ---१२, ११ 

या  पत्रिकेत गुरु १०,११ भावाचा कार्येश आहे तसेच ५ या विरोधी भावाचा कार्येश सुद्धा आहे 

दोनही कुंडलीचा विचार करता , पहिला ऑप्शन म्हणजे पिंपरी चिंचवड पालिका हे योग्य राहील . 

दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले . 

म्हणून मी पिंपरी चिंचवड पालिकेची ऑर्डर स्वीकारावी असे सांगितले . हे बोलणे रविवारी झाले . ती म्हणाली त्यांनी सोमवारीच बोलावले आहे   ,  पिंपरी चिंचवड ची ऑर्डर स्वीकारते .आणि कल्याण च्या नोकरीचा राजीनामा देते. ती स्त्री सोमवारी १५ ऑगस्ट ला हजर  झाली . ( तिला १५ ऑगस्ट ला  यावयास सांगितले होते . )

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु !!!

Thursday, 28 July 2022

स्वप्न-- एम एस होण्याचे --४

          एका परिचित स्त्रीचा फोन ---म्हणाली मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीतील माझी बोस एक स्त्री आहे .. तिला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे . मी म्हटले त्यांना फोन करावयास सांगणे . दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीचा फोन आला . तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून आपला फोन नंबर मिळाला . म्हणाली मी एका MNC कंपनीत मॅनेजर या पदावर काम करीत आहे . माझा मुलगा B,E, Mech.  झाला आहे . पण पुढील शिक्षण परदेशात म्हणजे अमेरिकेत घ्यायचे आहे . अशी त्याची खूप इच्छा आहे . अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या . दृष्टीने मी पण तशी तयारी केली आहे . मलाही वाटते त्याने परदेशात एम एस चे शिक्षण घ्यावे. माझ्या मुलाचे   अमेरिकेत एम् एस शिक्षण  होईल का ? तो केंव्हा अमेरिकेला जाईल. ? असा प्रश्न विचारला . मी म्हटले त्याचे बर्थ डिटेल्स व तुम्हा दोघांचे बर्थ डिटेल्स मला लागतील. ठीक आहे म्हणाल्या . मी उद्या तुम्हाला डिटेल्स देते.  त्यांनी खालीलप्रमाणे डिटेल्स दिले . 

जातक--दि  १५  / मार्च  १९९९ वेळ सकाळी ८-५८  पुणे 

आई --३० ऑक्टोबर ७४   वेळ-२=५०am स्थळ--१७,२५  रे ७३,३१

वडील--११ मार्च १९७२  वेळ १=४५  am   स्थळ ---१७,४१ रे ७५,५५

 जातक--दि १५ मार्च  १९९९ वेळ सकाळी ८=५८ स्थळ--पुणे

 हि धनु लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब मंगल शुक्राच्या नक्षत्रात आहे आणि चंद्र सुधा शुक्राच्या नक्षत्रात आहे . जातकाच्या चतुर्थ भावाचा सब राहू आहे  राहू कर्क राशीत बुधा च्या नक्षत्रात आहे . आईचा चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे . जातकाच्या नवम  भावाचा सब राहू आहे राहू कर्क राशीत बुधाच्या नक्षत्रात आहे . वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशिस्वामी गुरू आहे . सब राशी स्वामी चंद्रावर वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरुची दृष्टी आहे . सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे जातकाची वेळ बरोबर आहे .

जातकाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे . पुढील शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत जावयाचे  आहे प्रथम त्याच्या पत्रिकेत परदेशगमनाचा योग्य आहे का ते पहिले पाहिजे . लोक परदेशात वेगवेगळ्या कारणासाठी जातात. कोणी व्यवसाय करणेसाठी , कोणी नोकरी करणेसाठी , कोणी सहल म्हणून जाण्यासाठी परदेश गमन करतात. इथे जातकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी जावयाचे आहे . 

नियम---परदेश गमन ---व्यय भावाचा सब ३,९,१२, पैकी भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ च्या संयुक्त दशेत व्यक्ती परदेशात जाते .  

उच्च शिक्षण --- ९ भावावरून उच्च शिक्षणाचा विचार केला जातो. ९ भावाचा सब ९,११ भावाचा कार्येश असेल तर उच्च शिक्षण होईल.  

या पत्रिकेत व्ययाचा  सब शनी  आहे शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 12   10 11  Cusp Yuti: (1)     
It's N.Swami :-------- Ketu:- (10)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Saturn (12)   10 11  Moon-Yuti  (10)   4
It's Sub :------------ Jupiter:- 12   9 12   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   10 11  Cusp Yuti: (1)     
Itself aspects :------ 7 3 10

 शनी १२ चा कार्येश आहे म्हणजे परदेशगमनाचे योग्य आहेत. तसेच ९ चा दुय्यम कार्येश व लाभाचा बलवान कार्येश आहे .  म्हणजे जातक परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतो. 

आता ९ भावाचा सब पाहू----९ भावाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 11   9 12   
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   10 11   
It's Sub :------------ Rahu:- 4       Rashi-Swami Moon 10   4  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (11)   (3) 6   
Itself aspects :------ 6 4 8

नवम भावाचा सब ३,१२ त्याच बरोबर लाभाचा कार्येश आहे . सदर जातक परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणार. आता केंव्हा जाणार ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील. अमेरिकेतील शैक्षणिक संस्था मधील प्रवेश जानेवारी व सप्टेंबर मध्ये सुरु होतात. या काळात जर परदेशी जाण्याचे योग्य असतील तरच घटना घडणार आहे . 

कुंडली सोडवितेवेळी जातकाची राहू मध्ये मंगळाची अंतर्दशा ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे . राहू मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 4     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Moon 10   4  Moon-Drusht  10  4
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   (3) (6)   
It's Sub :------------ Jupiter:- 12   9 12   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   10 11  Cusp Yuti: (1)     
Itself aspects :------ 10

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 7   1 8   
It's N.Swami :-------- Rahu:- (4)    Cusp Yuti: (5)    Drusht  (११)  Rashi-Swami Moon (10)   4  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Moon:- (10)   4     Ketu-Yuti  (10)    Rahu-Drusht  (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   (1) (8)   
Itself aspects :------ 1 10 2


राहू ३,१२ चा बलवान कार्येश आहे व ९,११ चा दुय्यम कार्येश आहे . मंगल ४ ,११ चा बलवान कार्येश आहे . ह्यात ९ चे बलवान कार्येशत्व आलेले नाही .९ चे बलवान कार्येशत्व फक्त रवी दाखवितो. म्हणून रवी विदशा घेतली . रवीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (11)   (5)  Cusp Yuti: (12)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (12)   (9) 12   
It's Sub :------------ Moon:- (10)   4     Ketu-Yuti  (10)    Rahu-Drusht  (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   (1) (8)   
Itself aspects :------ 6

रवी ९,११ ( उच्च शिक्षण )चा बलवान व ४ चा दुय्यम कार्येश आहे . ९,१२  ( परदेशगमन )चा बलवान कार्येश आहे . 

राहू महादशा मंगल अंतर दशा रवी विदशा चा कालावधी येतो १ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२२. या कालावधीत जातक उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाईल. 

गेल्या आठवड्यात संबंधित स्त्री चा मेसेज आला १८ जुलै ला व्हिसा अँप्रोव्ह झाला . आणि १४ ऑगस्ट ला सदर जातक अमेरिकेला जाण्याचे निश्चित झाले आहे . मी सांगितलेल्या कालावधी पेक्षा १५ दिवस जातक अगोदर जात आहे. महाजनांनी मार्गदर्शन करावे. 

शुभम भवतु !!!

Wednesday, 27 July 2022

 घर विक्री ---

 

               मला माहित असलेल्या स्त्रीचा फोन---आमचे शेजारी , त्यांना  त्यांच्या गावाकडचे घर   विकायचे आहे . इथे त्यांनी कसेबसे पैसे जमवून एक फ्लॅट घेतला आहे . अजून काही पैसे बिल्डरला द्यायचे बाकी आहेत. त्यांचा  विचार आहे गावाकडील घर विकून बिल्डरला पैसे देता येतील . त्यात खूप अडचणी येत आहेत. गावाकडे घरकुल योजनेतून घर बांधलेले आहे . खूप कमी किमतीला मागत आहेत. ते म्हणतात घर केंव्हा विकले जाईल ? . मी म्हटले त्यांचे काही जन्मटिपण  असेल तर द्या. त्यांच्याकडे तारीख आहे . (८ / ११ / १९८४) आणि जनस्थळ देवळा . ते म्हणतात परंतु जन्मवेळ माहित नाही. शिवाय तारीख जी रेकॉर्डला लागली आहे ती पण चुकीची आहे . माझा जन्म चैत्री पाडवा  झाल्यानंतरच आहे . म्हणजे या ठिकाणी तारीख पण चुकीची आहे .वेळ माहित नाही . फक्त त्यादिवशी वार गुरुवार होता हे नक्की . कारण वार गुरुवार म्हणून दत्तात्रय नाव ठेवले आहे . याठिकाणी प्रथम आपल्याला तारीख निश्चित करायची आहे . त्या साठो चैत्र महिन्यातील पाडवा केंव्हा येतो ते पहिले पाहिजे . (प्रतिपदा ) १९८४ साला तील चैत्र महिन्यातील पाडवा २ एप्रिल ला आहे . पण त्यादिवशी वार सोमवार आहे . पाडव्यानंतरचा जन्म आहे आणि वार  गुरुवार आहे . म्हणून मी ५ एप्रिल १९८४ हि तारीख निश्चित केली आणि त्यादिवशी वार गुरुवार आहे . मी म्हटले घरातील सर्वांच्या पत्रिका  म्हणजे जन्मटिपण द्या . तसेच महत्वाच्या घटनेच्या तारखा लागतील . कारण काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही हे पाहण्यासाठी हि सर्व माहिती लागेल. तयांनी खालील मुलांचे जन्मटिपण दिले. 

१) पहिली मुलगी --२ / ०१ /२००५  वेळ १=१५ दुपारी स्थळ अ--१९,४३ रे ७६,२०

२) दुसरी मुलगी  --१४ / ४ /२००७ वेळ --संध्याकाळी ७=४५ स्थळ वरीलप्रमाणे 

३) तिसरा मुलगा --२८ / ६ /२००९ वेळ --१=१५ दुपारी स्थळ--नासिक 

पत्नीची जन्मतारीख वेळ मिळाले नाही .  

४) विवाह---१४ / ५ /२००२

सदर जातक-- जन्मतारीख ५ एप्रिल १९८४ वेळ --माहित नाही स्थळ--- अ २०,२६ रे ७४,१५ यावरून आपणाला सदर जातकाची वेळ ठरवायची आहे .मी ज्यावेळी हा प्रश्न पाहत होतो त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट पाहिले 

दि २३/७/२०२२ वेळ-१२=४२=१७

राहू * शुक्र , रवी  , शुक्र  , शनी (व )

रुलिंग मधील शनी वक्री आहे . त्यामुळे खालील तीन प्रकारच्या साखळी तयार होईल. 

वृषभ राशीमध्ये रवी चे नक्षत्र आहे म्हणून लग्न वृषभ रवी नक्षत्र सब राहू व सब सब शुक्र 

१) वृषभ --रवी --राहू --शुक्र 

तूळ  राशी मध्ये राहूचे नक्षत्र आहे म्हणून लं तूळ नक्षत्र राहू सब रवी सब सब शुक्र 

२) तूळ --राहू --रवी --शुक्र 

सिंह राशीत शुक्राचे नक्षत्र आहे म्हणून लग्न सिंह रवी नक्षत्र सब राहू सब सब शुक्र 

३) सिंह ---रवी --राहू --शुक्र 

          या तीन पैकी एक लग्न निश्चित आहे या तीनही मध्ये राहू महत्वाचा रोल बजावणार आहे . कारण राहू लग्न नक्षत्र म्हणून रुलिंग मध्ये आला आहे . १ व ३ मध्ये आपण रवी नक्षत्र घेतले आहे परंतु रवी चंद्र नक्षत्र म्हणून आला आहे . आणि राहू लग्न नक्षत्र म्हणून आला आहे . लग्न नक्षत्र हे चंद्र नक्षत्रापेक्षा श्रेष्ठ आहे . म्हणून ह्याठिकाणी या जातकाचे तूळ लग्न च असले पाहिजे . . हे लग्न केंव्हा उदयास येईल हे पाहण्यासाठी आपणाला सब सब कोष्टकावरून प्रथम अंश कला ठरविले पाहिजेत . सब सब कोष्टकावरून ह्या लग्नाचे १८ अंश ०३ कला २० विकला येतात. . कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑप्शन  वापरून हे लग्न किती वाजता उदयास येईल ते ठरविता येईल. . त्याची वेळ येते २०-३६-४२ .

हि वेळ धरून मी कुंडली काढली .

 दि--५/४/१९८४ वेळ--रात्री २०=३६=४२  स्थळ अ २०,२६  रे ७४,१५. 

हि तूळ  लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब रवी  आहे . आपण वर घेतलेल्या रुलिंग मध्ये रवी  आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे . लग्नाचा सब रवी आहे आणि चंद्र नक्षत्र रवी च आहे . आता तीनही मुलांचे कनेक्टिव्हीटी सब --चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे येते का पाहू .... 

१) पहिल्या मुलीचा चंद्र कन्या (बुध ) राशीत उत्तरा  (रवी) या नक्षत्रात आहे -

२) दुसऱ्या मुलीचा चंद्र कुंभ (शनी) राशीत शततारका ( राहू) नक्षत्रात आहे 

३) तिसरा मुलगा चंद्र सिंह ( रवी ) राशीत उत्तरा ( रवी ) नक्षत्रात आहे 

जातकाच्या पत्रिकेत पहिली संतती लाभ स्थानावरून पहिली जाते . 

१) जातकाच्या पत्रिकेत लाभ भावाचा सबगुरु आहे .गुरु धनु राशीत शुक्राच्या नक्षत्रात आहे . पहिल्या मुलीचा चंद्र राशी स्वामी बुध  व सब गुरूचा नक्षत्र स्वामी शुक्र हे युतीत आहेत. 

जातकाची दुसरी संतती जातकांच्या प्रथम स्थानावरून पहिली जाते 

२) जातकाच्या पत्रिकेत प्रथम भावाचा सब रवी  आहे , रवी मिन (गुरु)राशीत बुध नक्षत्रात आहे . दुसऱ्या मुलीच्या पत्रिकेत चंद्र कुंभ ( शनी ) राशीत राहू नक्षत्रात आहे. सब चा राशीस्वामी गुरु ची दृष्टी चंद्र राशी स्वामी शनिवर आहे 

जातकाची तिसरी संतती जातकाच्या तृतीय स्थानावरून पहिली जाते . 

३ ) जातकाच्या पत्रिकेत तृतीय भावाचा सब मंगळ आहे मंगळ वृश्चिक राशीत शनी नक्षत्रात आहे .  तिसऱ्या मुलाच्या

 पत्रिकेत , जातकाच्या तृतीय भावाचा सब चा नाक्षत्रस्वामी शनी व चंद्र युतीत आहेत. 

अशाप्रकारे सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे काढलेली जन्मवेळ बरोबर आहे . 

आता त्यांच्या आयुष्यातील घटना पडताळून पाहू . 

 

१) विवाह ---१४ / ५ /२००२ यावेळी राहू   राहू  गुरु दशा  होती

 सप्तम भावाचा सब २,७,११ /५ ८ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत विवाह होतो

राहू---१,२,३,४,५,७,८,९,१०,११ चा  कार्येश आहे  ( अनुकूल भाव १,२,३,४,५,७,८,९,११ )

गुरु--१,२,३,५,७,८,१० चा कार्येश आहे .             ( अनुकूल भाव १,२,३,५,७,८ )


आता मूळ प्रश्नाकडे वळू ---गावाकडील घर केंव्हा विकले जाईल . त्यांना लवकरात लवकर विकून बिल्डर ला पैसे द्यायचे आहेत. त्याने फक्त दोन महिन्याची मुदत दिली आहे . त्यातील १५ दिवस संपलेच आहेत म्हणजे अवधी दीड महिना शिल्लक आहे .

सप्तम स्थान हे घर घेणारी व्यक्ती  . सप्तम स्थानापासून चवथे स्थान म्म्हणजे १० स्थान हे  घेणार्यांचे घराचे स्थान  होईल.सप्तम  स्थानापासून बारावे स्थान म्हणजे ६ स्थान हे घरासाठी केलेली गुंतवणूक होईल. सप्तम  स्थानापासून ११ वे स्थान म्हणजे ५ स्थान हे घर घेणार्यांचे  लाभ स्थान होईल.  

घर विक्री नियम---- दशम भावाचा सब १०,५,६ पैकी चा कार्येश असेल तर त्यांच्या ( १०,५,६ ) संयुक्त दशेत घर विकले जाईल.

दशम भावचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

केतू --२ क यु 

शनी --१,४ दृ गु ,दृ ७, , गु दृ ९, ११

गुरु--३ क यु 

शुक्र --५ , ८

केतू २,३,४,५,९,११ चा कार्येश आहे .ह्यातील ३,५,९,११ भाव अनुकूल आहेत. ह्याचा अर्थ घर विकले जाणार हे नक्की झाले. हे घर केंव्हा विकले जाईल ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील. प्रश्न पाहतेवेळी गुरु मध्ये शनी ची अंतर्दशा चालू होती. २०/१०/२०२१ ते २/५/२०२४ पर्यंत 

गुरु शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 3   3 6  Cusp Yuti: (3)       Saturn-Drusht  1  4 5
It's N.Swami :-------- Venus:- (5)   1 (8)   
It's Sub :------------ Rahu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Venus (5)   1 (8)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (7)   (10)   
Itself aspects :------ 9 7 11

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 1   4 5  Cusp Yuti: (1)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (3)   3 6  Cusp Yuti: (3)       Saturn-Drusht  (1)   (4) 5
It's Sub :------------ Jupiter:- 3   3 6  Cusp Yuti: (3)       Saturn-Drusht  1  4 5
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   1 (8)   
Itself aspects :------ 7 3 10

गुरु ३,५,१० भावाचा कार्येश आहे व शनी ३ ,५ भावाचा कार्येश आहे . ह्यामध्ये ६ भाव आलेला नाही , ६ भाव फक्त रवी  व चंद्र दाखवितात. कुंडलीचे लग्न तुला म्हणजे चर तत्वाचे आहे म्हणून मी रवी विदशा निवडली

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 6   11  Cusp Yuti: (6)     
It's N.Swami :-------- Mercury:- (6)   (9) (12)   
It's Sub :------------ Moon:- 7   10   
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6)   (11)  Cusp Yuti: (6)     
Itself aspects :------ 12

गुरु महादशा शनी अंतर्दशा रवी विदशेचा कालावधी येतो १५ फेब्रुवारी २०२३ ते २ एप्रिल २०२३ . या कालावधीतच घर विकले जाईल. . बिल्डर ने दिलेला दोन महिन्याचा कालावधी या अगोदर संपत आहे . सबब सादर जातकाने पर्यायी व्यवस्था करावी असे सांगितले. महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

 

शुभम भवतु !!!Friday, 4 March 2022

पोस्टमार्टम ----

                फेसबुक वरील लेख वाचून एका जातकाचा फोन , मला म्हणाले माझ्या कुंडलीची जन्मवेळ नक्की मला माहित नाही. मी २-३ जणांना काढायला सांगितले होते पण प्रत्येकाची वेळ वेगळी येते. माझी जन्मवेळ तुम्ही काढलं का .?  मी म्हटले काढेन . मला तुमचे बर्थ डिटेल्स द्या .   घरातील  सर्वांचे बर्थ डिटेल्स द्यावेत . ( पत्नी , मुले ) त्याच  बरोबर विवाहाची तारीख, आतापर्यंत केलेल्या नोकऱ्यांची तारीख,  बोलता बोलता ते म्हणाले दोन वर्षांपूर्वी पोटातील कॅन्सर डिटेक्ट झाला होता . मी म्हटले ते केंव्हा लक्षात आले त्याची तारीख द्या. मी म्हटले हे सर्व इव्हेंट तपासून पाहता येतील. जातकाने दिलेला  तपशील खालीलप्रमाणे 

दि --२२ /    / १९७५  वेळ सकाळी ८ ते ११  जन्मस्थळ अ १८,४५  रे ७४,१२

जातकाची जन्मवेळ आपणाला निश्चित करावयाची आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ निश्चित  करता येईल. मी कुंडली सोडविली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे 

दि १ मार्च २०२२    वेळ-  २३-२८-२७     स्थळ--अ १७, ५९ रे  ७४ २६

गुरु *  शुक्र  , मंगळ  , शनी , मंगळ 

 

जातकाने दिलेल्या वेळेत दोन लग्ने  येतात. १) वृषभ  २) मिथुन 

मिथुन राशीचा स्वामी बुध  रुलिंग मध्ये नाही . म्हणून मिथुन लग्न असणार नाही . वृषभ राशीचा स्वामी शुक्र रुलिंग मध्ये आहे . म्हणून जातकाचे लग्न वृषभ असले पाहिजे . वृषभ राशी मध्ये रवी चंद्र मंगळाची नक्षत्रे येतात त्यापैकी मंगल रुलिंग मध्ये आहे . म्हणून नक्षत्र  मंगळाचे  घ्यावे  लागेल . वृषभ लग्न मंगल नक्षत्र  असे घयावे लागेल . आता सब व सबसब ठरवू .शिल्लक राहिले गुरु व शनी .यापैकी गुरु लग्न नक्षत्र स्वामी आहे व शनी राशिस्वामी आहे . नक्षत्र स्वामी श्रेष्ठ म्हणून सब गुरु घेतला व सब सब म्हणून शनी घेतला . म्हणजे आपली साखळी झाली शुक्र मंगल गुरु शनी . यावरून लग्न किती अंशावर आहे ते उप उप चे कोष्टक वापरून काढता येईल. ते येते २६ अंश २९ कला ३० विकला . या अंश कला वरून जातकाची जन्मवेळ ट्रान्झिट ऑपशन वापरून आपल्याला ठरवता येईल . जातकाची जन्मवेळ येते   ९-१७-४३ सकाळी. . काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही ह्यासाठी घरातील पत्नी व मुले यांच्या चंद्राशी कनेक्टिव्हीटी येते की ते पाहू. हि वेळ वापरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कॉम्पुटर कुंडली तयार केली . 

हि वृषभ लग्नाची कुंडली आहे आता सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे पडताळून पाहू. 

१)  या पत्रिकेत लग्नाचा सब गुरु शनीच्या नक्षत्रात आहे . शनीची दृष्टी चंद्रावर आहे . 

२) पत्नी-- ७ भावाचा सब गुरु शनीच्या नक्षत्रात आहे आणि पत्नीचा चंद्र राशिस्वामी शनीच आहे . 

३) मोठा मुलगा --लाभाचा सब केतू आहे . केतू वृषाभ राशीत रवी नक्षत्रात आहे मोठ्या मुलाचा चंद्र रवीच्या नक्षत्रात आहे .

४) लहान मुलगा ---दुसरा मुलगा वडिलाच्या पत्रिकेत लग्नावरून पाहायचा . लग्नाचा सब गुरु शनी नक्षत्रात . लहान मुलाचा चंद्र केतू नक्षत्रात आहे . लग्नाचा सब गुरु ची केतू वर दृष्टी आहे . 

अशाप्रकारे सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे जन्मवेळ बरोबर आहे आता अजून खात्री करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग पडताळून पाहू. 

१) विवाह ----२६  /  ५  /  २००२.... या तारखेला चंद्र केतू  मंगल बुध  दशा चालू होती.

७ चा सब २,७,११,५,८ पैकी भावाचं कार्येश असेल तर विवाह होतो . या दशा अंतर्दशेत हे सर्व भाव आले आहेत

चंद्र----१,२,३,७,८,९,१० ११,१२ चा कार्येश आहे 

केतू--२,३,७,८,११ चा कार्येश 

मंगळ ...,२,३,७,८,११   चा कार्येश 

बुध .....,३,४,५,७,८,११ चा कार्येश 

 . 

२)नोकरी .... सदर जातकाने एकच नोकरी केली आहे . १२  /  १  /१९९९ ते १४  /१०  /२०२१ . नोकरी लागली तेंव्हा चंद्र गुरु शनी दशा चालू होती. 

१० भावाचा सब २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते 

चंद्र---१,२,३,७,८,९,१०,११,१२ चा कार्येश 

गुरु .... २,३,८,१०,११ चा कार्येश 

शनी --२,६,१०,११

येथे सर्व  भाव आले आहेत  

                    दोन वर्षांपासून     जातकाच्या पोटात दुखत होते . औषध घेतल्यानंतर बरे वाटत होते. पुढे पुढे जेवण झाले कि उलटी येऊ लागली . सर्व खाल्लेले बाहेर पडत होते .  म्हणून डॉ नि एन्डोस्कोपी केली त्यावेळी पोटात गाठी तयार झालेत हे निष्पन्न झाले. . ह्या गाठी ऑपेरेशन  करून काढावे लागतील असे ठरले .. तत्पूर्वी डॉ म्हणाले मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करून या . सदर जातक मुंबईला गेला टाटा हॉस्पिटल मध्ये चेकिंग केले .  रिपोर्ट वरून डॉ म्हणाले हा   Diffuse Large B cell Lymphoma आहे. ह्याला ऑपेरेशन  जरुरी नाही. हा पोटात औषध घेऊन बरा करता येईल. त्यानुसार त्यांनी ६ डोस घ्यायला सांगितले . ४ डोस घेतल्यानंतर पुन्हा चेकिंग  ला मुंबईला पाठविले. त्यावेळी सर्व गाठी पूर्णपणे नाहीश्या झाल्या होत्या . तरीसुद्धा राहिलेले दोन डोस घेऊन तो कोर्स पूर्ण केला.     

या पत्रिकेमध्ये आजार हा षष्ठ  स्थानावरून पाहावा लागेल . षष्ठ स्थानाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

शनी... २ क .यू 

राहू ... ६ मंगल ९,७ चंद्र दृष्ट ४,३ शनी दृष्ट १ ,८ 

मंगळ --९,७,चंद्र दृष्ट ४,३

राहू ..  ६ मंगल ९,७ चंद्र दृष्ट ४,३ शनी दृष्ट १ ,८ 

शनी राहू नक्षत्रात आहे . राहू ६ व्यस्थानात आहे . ६ स्थानावरून पोटाचा विचार केला जातो. राहुने पोटामध्ये गाठी तयार केल्या . येथे सुद्धा मंगल आहे परांतु ऑपेरेशन  न करता नुसत्या औषधाने कॅन्सर बरा झाला . येथे कोठेही गुरु चा संबंध येत नाही ,आला नाही . त्यामुळे गाठीचा विस्तार झाला नाही . 

महाजनांनी मार्गदर्शन करावे \

शुभंम भवतु !!!

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   

 


Monday, 28 February 2022

कॅन्सर असेल का ?-----. २

                                      एक अपरिचित जातकाचा दि १५ / १२ /२०२१ रोजी  फोन , म्हणाला तुमचा नंबर मला गोंधळेकर यांनी दिला ( सदर गृहस्थ माझ्या ओळखीचे आहेत ) मी म्हटले बर , पुढे बोला , तो म्हणाला आम्ही दोघे नोकरीला असतो . माझी पत्नी एका हॉस्पि टल मध्ये नोकरीला आहे . तिथे दरवर्षी मेडिकल चेकअप केले जाते . तसे ह्यावर्षी सुद्धा केले . ह्यावर्षी डॉ नि तिला मॅमोग्राम ची टेस्ट घेण्याचा आग्रह केला . त्याप्रमाणे ती टेस्ट झाली . हि टेस्ट झाली १३ डिसेंबर २०२१ ला . त्या रिपोर्ट वरून डॉ नि सांगितले तिच्या स्तनामध्ये एक छोटी गाठ आहे   आणि ती तपासायला पाठवली पाहिजे . हे तो सांगत असताना त्याच्यावर कमालीचे टेन्शन आले होते . शेवटी तो म्हणाला असे काही असेल का ? मी म्हणालो असे प्रश्न मूळ कुंडलीवरून नाही सोडविता येणार . हा प्रश्न ,प्रश्न कुंडलीवरून सोडवू. नंतर त्याला थोडक्यात प्रश्न कुंडली ( नंबर कुंडली ) बदल सांगितले . १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग . त्याने  ३५ हि संख्या  सांगितली ३५ ह्या संख्येवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .  

दि --१५  /  १२  /२०२१      वेळ--१६-१२-०४       फलटण १७,५९   ७४,२६  के.पी. नंबर ३५

हि वृषभ लग्नाची   आहे . चंद्रावरून जातकाच्या मनात काय आहे ते पाहू . प्रश्न जर  खरोखरच तळमळीने कळकळीने विचारला असेल तर प्रश्नाचे उत्तर बर्याच अंशी  बरोबरच येते अर्थात  होय किंवा नाही . चंद्र व्यय स्थानात म्हणजे मनामध्ये  चिंता काळजी आहे . व्यय स्थान म्हणजे पत्नीचे शष्ट  स्थान होईल ( सप्तम स्थानापासून व्यय स्थान सहावे येते )म्हणजे पत्नीचे आजारासंबंधी प्रश्न असा अर्थ निघतो चंद्राची रास कर्क  तृतीय स्थानी म्हणजे पत्नीच्या बाधकस्थानी ( पत्नीचे वृश्चिक लग्न ) चंद्र शुक्राच्या नक्षत्रात शुक्र अष्टम स्थानात म्हणजे पत्नीच्या द्वितीय स्थानात ,मारक स्थान . शुक्र पत्नीचा सप्तमेश व व्ययेश आहे   पत्नीकडून विचार केला तर चंद्र ६ , ९,१२ , २,७ चा कार्येश होतो . ६ आजार ,१२ हॉस्पिटल २,७ मारक , ९ बाधक . म्हणजे जातकाचा प्रश्न बरोबर आहे . 

 

कॅन्सर --षष्ठ भावाचा संबंध राहुशी येत असेल आणि त्याचा कोणत्याही प्रकारे गुरूशी संबंध येत असेल तर ( युती किंवा  दृष्टी ) कॅन्सरची शक्यता जास्त असते कारण राहू हा शरीरात गाठ निर्माण करतो आणि या गाठीचा विस्तार गुरु करतो . गुरु गाठीतील पेशींची अनावश्यक वाढ करतो. 

येथे पत्नीसंबंधी प्रश्न आहे म्हणून सप्तम स्थान लग्न धरून कुंडली फिरवूंन घेतली आहे 

या पत्रिकेत शष्ट  भावाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

चंद्र---६ क यु 

शुक्र --२, ७ 

राहू ---६   शु २,७ मंगल दृष्ट १२

रवी---१ ,  १०

साध्य कुंडलीप्रमाणे मंगळाची दृष्टी ४ स्थानावर पडते 

चंद्र १,२,४,६,७ , १० , १२ चा कार्येश आहे येथे चंद्राचा सब राहू आहे . राहून गाठ निर्माण केली परंतु राहू बरोबर कोणत्याही प्रकारे गुरूचा संबंध येत नाही . त्यामुळे गाठीचा विस्तार झाला नाही . येथे मंगळाचा संबंध आलेला आहे मंगल शस्त्रक्रिया दाखवितो , म्हणून शस्त्रक्रिया करून गाठ काढली पाहिजे येथपर्यंत मी निष्कर्ष  काढला . सदर जातकाला सांगितले गाठ आहे ती शस्त्रक्रिया करून काढली पाहिजे . परंतु कॅन्सर नाही . हे मी १५ डिसेंबर ला च सांगितले दुसरी दिवशी म्हणजे १६ डिसेम्बरला गाठीचा बायोप्सीचा रिपोर्ट येणार होता . त्या दिवशी जातकाकडून काहीच रिप्लाय आला नाही . मी एक दिवस वाट पाहून मीच त्याला फोन केला ,आणि वैचारले काय झाले . त्याने सांगितले डॉ म्हणतात कॅन्सर आहे . मी ठासून म्हटले शक्यच नाही . मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. . त्यानंतर तो म्हणाला हा cure होणार कॅन्सर आहे . बरा होणार कॅन्सर  आहे . हे मी प्रथमच ऐकत होतो . आतापर्यंत कॅन्सरवर  औषध नाही हे माहित होते . मग त्याने सांगितले डॉ म्हणतात हा                                                               TUBULAR BREAST CARCINOVA STAGE--I . असा आहे . हा कॅन्सर पहिल्या स्टेजवरच आहे म्हणून हा काढून टाकता येईल त्यानंतर रेडिएशन थेरपी करून पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो. 

२३ /१२/२०२१ रोजी ऑपरेशन करून गाठ काढली . त्यानंतर रेडिएशन थेरपी वापरून १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पेशंट पूर्ण बारा झाला . शुक्र राहू बुध  राहू दशेमध्ये शश्त्रक्रिया केली 

अशाप्रकारचं एक लेख यापूर्वी प्रसिद्ध केला आहे . त्यामध्ये सुद्धा राहूच समबंध येत होता पण गुरूच संबंध आलेला नाही. त्यावेळी गाठीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. फक्त शस्त्रक्रिया करून गाठ काढली होती. 

असो--- महाजनांनी मार्गदर्शन करावे ----

शुभम भवतु !!!