कृष्णमूर्ति ज्योतिष: July 2022

Thursday 28 July 2022

स्वप्न-- एम एस होण्याचे --४

          एका परिचित स्त्रीचा फोन ---म्हणाली मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीतील माझी बोस एक स्त्री आहे .. तिला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे . मी म्हटले त्यांना फोन करावयास सांगणे . दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीचा फोन आला . तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून आपला फोन नंबर मिळाला . म्हणाली मी एका MNC कंपनीत मॅनेजर या पदावर काम करीत आहे . माझा मुलगा B,E, Mech.  झाला आहे . पण पुढील शिक्षण परदेशात म्हणजे अमेरिकेत घ्यायचे आहे . अशी त्याची खूप इच्छा आहे . अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या . दृष्टीने मी पण तशी तयारी केली आहे . मलाही वाटते त्याने परदेशात एम एस चे शिक्षण घ्यावे. माझ्या मुलाचे   अमेरिकेत एम् एस शिक्षण  होईल का ? तो केंव्हा अमेरिकेला जाईल. ? असा प्रश्न विचारला . मी म्हटले त्याचे बर्थ डिटेल्स व तुम्हा दोघांचे बर्थ डिटेल्स मला लागतील. ठीक आहे म्हणाल्या . मी उद्या तुम्हाला डिटेल्स देते.  त्यांनी खालीलप्रमाणे डिटेल्स दिले . 

जातक--दि  १५  / मार्च  १९९९ वेळ सकाळी ८-५८  पुणे 

आई --३० ऑक्टोबर ७४   वेळ-२=५०am स्थळ--१७,२५  रे ७३,३१

वडील--११ मार्च १९७२  वेळ १=४५  am   स्थळ ---१७,४१ रे ७५,५५

 जातक--दि १५ मार्च  १९९९ वेळ सकाळी ८=५८ स्थळ--पुणे

 हि धनु लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब मंगल शुक्राच्या नक्षत्रात आहे आणि चंद्र सुधा शुक्राच्या नक्षत्रात आहे . जातकाच्या चतुर्थ भावाचा सब राहू आहे  राहू कर्क राशीत बुधा च्या नक्षत्रात आहे . आईचा चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे . जातकाच्या नवम  भावाचा सब राहू आहे राहू कर्क राशीत बुधाच्या नक्षत्रात आहे . वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशिस्वामी गुरू आहे . सब राशी स्वामी चंद्रावर वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरुची दृष्टी आहे . सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे जातकाची वेळ बरोबर आहे .

जातकाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे . पुढील शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत जावयाचे  आहे प्रथम त्याच्या पत्रिकेत परदेशगमनाचा योग्य आहे का ते पहिले पाहिजे . लोक परदेशात वेगवेगळ्या कारणासाठी जातात. कोणी व्यवसाय करणेसाठी , कोणी नोकरी करणेसाठी , कोणी सहल म्हणून जाण्यासाठी परदेश गमन करतात. इथे जातकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी जावयाचे आहे . 

नियम---परदेश गमन ---व्यय भावाचा सब ३,९,१२, पैकी भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ च्या संयुक्त दशेत व्यक्ती परदेशात जाते .  

उच्च शिक्षण --- ९ भावावरून उच्च शिक्षणाचा विचार केला जातो. ९ भावाचा सब ९,११ भावाचा कार्येश असेल तर उच्च शिक्षण होईल.  

या पत्रिकेत व्ययाचा  सब शनी  आहे शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 12   10 11  Cusp Yuti: (1)     
It's N.Swami :-------- Ketu:- (10)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Saturn (12)   10 11  Moon-Yuti  (10)   4
It's Sub :------------ Jupiter:- 12   9 12   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   10 11  Cusp Yuti: (1)     
Itself aspects :------ 7 3 10

 शनी १२ चा कार्येश आहे म्हणजे परदेशगमनाचे योग्य आहेत. तसेच ९ चा दुय्यम कार्येश व लाभाचा बलवान कार्येश आहे .  म्हणजे जातक परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतो. 

आता ९ भावाचा सब पाहू----९ भावाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 11   9 12   
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   10 11   
It's Sub :------------ Rahu:- 4       Rashi-Swami Moon 10   4  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (11)   (3) 6   
Itself aspects :------ 6 4 8

नवम भावाचा सब ३,१२ त्याच बरोबर लाभाचा कार्येश आहे . सदर जातक परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणार. आता केंव्हा जाणार ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील. अमेरिकेतील शैक्षणिक संस्था मधील प्रवेश जानेवारी व सप्टेंबर मध्ये सुरु होतात. या काळात जर परदेशी जाण्याचे योग्य असतील तरच घटना घडणार आहे . 

कुंडली सोडवितेवेळी जातकाची राहू मध्ये मंगळाची अंतर्दशा ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे . राहू मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 4     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Moon 10   4  Moon-Drusht  10  4
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   (3) (6)   
It's Sub :------------ Jupiter:- 12   9 12   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   10 11  Cusp Yuti: (1)     
Itself aspects :------ 10

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 7   1 8   
It's N.Swami :-------- Rahu:- (4)    Cusp Yuti: (5)    Drusht  (११)  Rashi-Swami Moon (10)   4  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Moon:- (10)   4     Ketu-Yuti  (10)    Rahu-Drusht  (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   (1) (8)   
Itself aspects :------ 1 10 2


राहू ३,१२ चा बलवान कार्येश आहे व ९,११ चा दुय्यम कार्येश आहे . मंगल ४ ,११ चा बलवान कार्येश आहे . ह्यात ९ चे बलवान कार्येशत्व आलेले नाही .९ चे बलवान कार्येशत्व फक्त रवी दाखवितो. म्हणून रवी विदशा घेतली . रवीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (11)   (5)  Cusp Yuti: (12)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (12)   (9) 12   
It's Sub :------------ Moon:- (10)   4     Ketu-Yuti  (10)    Rahu-Drusht  (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   (1) (8)   
Itself aspects :------ 6

रवी ९,११ ( उच्च शिक्षण )चा बलवान व ४ चा दुय्यम कार्येश आहे . ९,१२  ( परदेशगमन )चा बलवान कार्येश आहे . 

राहू महादशा मंगल अंतर दशा रवी विदशा चा कालावधी येतो १ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२२. या कालावधीत जातक उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाईल. 

गेल्या आठवड्यात संबंधित स्त्री चा मेसेज आला १८ जुलै ला व्हिसा अँप्रोव्ह झाला . आणि १४ ऑगस्ट ला सदर जातक अमेरिकेला जाण्याचे निश्चित झाले आहे . मी सांगितलेल्या कालावधी पेक्षा १५ दिवस जातक अगोदर जात आहे. महाजनांनी मार्गदर्शन करावे. 

शुभम भवतु !!!

Wednesday 27 July 2022

 घर विक्री ---

 

               मला माहित असलेल्या स्त्रीचा फोन---आमचे शेजारी , त्यांना  त्यांच्या गावाकडचे घर   विकायचे आहे . इथे त्यांनी कसेबसे पैसे जमवून एक फ्लॅट घेतला आहे . अजून काही पैसे बिल्डरला द्यायचे बाकी आहेत. त्यांचा  विचार आहे गावाकडील घर विकून बिल्डरला पैसे देता येतील . त्यात खूप अडचणी येत आहेत. गावाकडे घरकुल योजनेतून घर बांधलेले आहे . खूप कमी किमतीला मागत आहेत. ते म्हणतात घर केंव्हा विकले जाईल ? . मी म्हटले त्यांचे काही जन्मटिपण  असेल तर द्या. त्यांच्याकडे तारीख आहे . (८ / ११ / १९८४) आणि जनस्थळ देवळा . ते म्हणतात परंतु जन्मवेळ माहित नाही. शिवाय तारीख जी रेकॉर्डला लागली आहे ती पण चुकीची आहे . माझा जन्म चैत्री पाडवा  झाल्यानंतरच आहे . म्हणजे या ठिकाणी तारीख पण चुकीची आहे .वेळ माहित नाही . फक्त त्यादिवशी वार गुरुवार होता हे नक्की . कारण वार गुरुवार म्हणून दत्तात्रय नाव ठेवले आहे . याठिकाणी प्रथम आपल्याला तारीख निश्चित करायची आहे . त्या साठो चैत्र महिन्यातील पाडवा केंव्हा येतो ते पहिले पाहिजे . (प्रतिपदा ) १९८४ साला तील चैत्र महिन्यातील पाडवा २ एप्रिल ला आहे . पण त्यादिवशी वार सोमवार आहे . पाडव्यानंतरचा जन्म आहे आणि वार  गुरुवार आहे . म्हणून मी ५ एप्रिल १९८४ हि तारीख निश्चित केली आणि त्यादिवशी वार गुरुवार आहे . मी म्हटले घरातील सर्वांच्या पत्रिका  म्हणजे जन्मटिपण द्या . तसेच महत्वाच्या घटनेच्या तारखा लागतील . कारण काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही हे पाहण्यासाठी हि सर्व माहिती लागेल. तयांनी खालील मुलांचे जन्मटिपण दिले. 

१) पहिली मुलगी --२ / ०१ /२००५  वेळ १=१५ दुपारी स्थळ अ--१९,४३ रे ७६,२०

२) दुसरी मुलगी  --१४ / ४ /२००७ वेळ --संध्याकाळी ७=४५ स्थळ वरीलप्रमाणे 

३) तिसरा मुलगा --२८ / ६ /२००९ वेळ --१=१५ दुपारी स्थळ--नासिक 

पत्नीची जन्मतारीख वेळ मिळाले नाही .  

४) विवाह---१४ / ५ /२००२

सदर जातक-- जन्मतारीख ५ एप्रिल १९८४ वेळ --माहित नाही स्थळ--- अ २०,२६ रे ७४,१५ यावरून आपणाला सदर जातकाची वेळ ठरवायची आहे .मी ज्यावेळी हा प्रश्न पाहत होतो त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट पाहिले 

दि २३/७/२०२२ वेळ-१२=४२=१७

राहू * शुक्र , रवी  , शुक्र  , शनी (व )

रुलिंग मधील शनी वक्री आहे . त्यामुळे खालील तीन प्रकारच्या साखळी तयार होईल. 

वृषभ राशीमध्ये रवी चे नक्षत्र आहे म्हणून लग्न वृषभ रवी नक्षत्र सब राहू व सब सब शुक्र 

१) वृषभ --रवी --राहू --शुक्र 

तूळ  राशी मध्ये राहूचे नक्षत्र आहे म्हणून लं तूळ नक्षत्र राहू सब रवी सब सब शुक्र 

२) तूळ --राहू --रवी --शुक्र 

सिंह राशीत शुक्राचे नक्षत्र आहे म्हणून लग्न सिंह रवी नक्षत्र सब राहू सब सब शुक्र 

३) सिंह ---रवी --राहू --शुक्र 

          या तीन पैकी एक लग्न निश्चित आहे या तीनही मध्ये राहू महत्वाचा रोल बजावणार आहे . कारण राहू लग्न नक्षत्र म्हणून रुलिंग मध्ये आला आहे . १ व ३ मध्ये आपण रवी नक्षत्र घेतले आहे परंतु रवी चंद्र नक्षत्र म्हणून आला आहे . आणि राहू लग्न नक्षत्र म्हणून आला आहे . लग्न नक्षत्र हे चंद्र नक्षत्रापेक्षा श्रेष्ठ आहे . म्हणून ह्याठिकाणी या जातकाचे तूळ लग्न च असले पाहिजे . . हे लग्न केंव्हा उदयास येईल हे पाहण्यासाठी आपणाला सब सब कोष्टकावरून प्रथम अंश कला ठरविले पाहिजेत . सब सब कोष्टकावरून ह्या लग्नाचे १८ अंश ०३ कला २० विकला येतात. . कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑप्शन  वापरून हे लग्न किती वाजता उदयास येईल ते ठरविता येईल. . त्याची वेळ येते २०-३६-४२ .

हि वेळ धरून मी कुंडली काढली .

 दि--५/४/१९८४ वेळ--रात्री २०=३६=४२  स्थळ अ २०,२६  रे ७४,१५. 

हि तूळ  लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब रवी  आहे . आपण वर घेतलेल्या रुलिंग मध्ये रवी  आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे . लग्नाचा सब रवी आहे आणि चंद्र नक्षत्र रवी च आहे . आता तीनही मुलांचे कनेक्टिव्हीटी सब --चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे येते का पाहू .... 

१) पहिल्या मुलीचा चंद्र कन्या (बुध ) राशीत उत्तरा  (रवी) या नक्षत्रात आहे -

२) दुसऱ्या मुलीचा चंद्र कुंभ (शनी) राशीत शततारका ( राहू) नक्षत्रात आहे 

३) तिसरा मुलगा चंद्र सिंह ( रवी ) राशीत उत्तरा ( रवी ) नक्षत्रात आहे 

जातकाच्या पत्रिकेत पहिली संतती लाभ स्थानावरून पहिली जाते . 

१) जातकाच्या पत्रिकेत लाभ भावाचा सबगुरु आहे .गुरु धनु राशीत शुक्राच्या नक्षत्रात आहे . पहिल्या मुलीचा चंद्र राशी स्वामी बुध  व सब गुरूचा नक्षत्र स्वामी शुक्र हे युतीत आहेत. 

जातकाची दुसरी संतती जातकांच्या प्रथम स्थानावरून पहिली जाते 

२) जातकाच्या पत्रिकेत प्रथम भावाचा सब रवी  आहे , रवी मिन (गुरु)राशीत बुध नक्षत्रात आहे . दुसऱ्या मुलीच्या पत्रिकेत चंद्र कुंभ ( शनी ) राशीत राहू नक्षत्रात आहे. सब चा राशीस्वामी गुरु ची दृष्टी चंद्र राशी स्वामी शनिवर आहे 

जातकाची तिसरी संतती जातकाच्या तृतीय स्थानावरून पहिली जाते . 

३ ) जातकाच्या पत्रिकेत तृतीय भावाचा सब मंगळ आहे मंगळ वृश्चिक राशीत शनी नक्षत्रात आहे .  तिसऱ्या मुलाच्या

 पत्रिकेत , जातकाच्या तृतीय भावाचा सब चा नाक्षत्रस्वामी शनी व चंद्र युतीत आहेत. 

अशाप्रकारे सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे काढलेली जन्मवेळ बरोबर आहे . 

आता त्यांच्या आयुष्यातील घटना पडताळून पाहू . 

 

१) विवाह ---१४ / ५ /२००२ यावेळी राहू   राहू  गुरु दशा  होती

 सप्तम भावाचा सब २,७,११ /५ ८ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत विवाह होतो

राहू---१,२,३,४,५,७,८,९,१०,११ चा  कार्येश आहे  ( अनुकूल भाव १,२,३,४,५,७,८,९,११ )

गुरु--१,२,३,५,७,८,१० चा कार्येश आहे .             ( अनुकूल भाव १,२,३,५,७,८ )


आता मूळ प्रश्नाकडे वळू ---गावाकडील घर केंव्हा विकले जाईल . त्यांना लवकरात लवकर विकून बिल्डर ला पैसे द्यायचे आहेत. त्याने फक्त दोन महिन्याची मुदत दिली आहे . त्यातील १५ दिवस संपलेच आहेत म्हणजे अवधी दीड महिना शिल्लक आहे .

सप्तम स्थान हे घर घेणारी व्यक्ती  . सप्तम स्थानापासून चवथे स्थान म्म्हणजे १० स्थान हे  घेणार्यांचे घराचे स्थान  होईल.सप्तम  स्थानापासून बारावे स्थान म्हणजे ६ स्थान हे घरासाठी केलेली गुंतवणूक होईल. सप्तम  स्थानापासून ११ वे स्थान म्हणजे ५ स्थान हे घर घेणार्यांचे  लाभ स्थान होईल.  

घर विक्री नियम---- दशम भावाचा सब १०,५,६ पैकी चा कार्येश असेल तर त्यांच्या ( १०,५,६ ) संयुक्त दशेत घर विकले जाईल.

दशम भावचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

केतू --२ क यु 

शनी --१,४ दृ गु ,दृ ७, , गु दृ ९, ११

गुरु--३ क यु 

शुक्र --५ , ८

केतू २,३,४,५,९,११ चा कार्येश आहे .ह्यातील ३,५,९,११ भाव अनुकूल आहेत. ह्याचा अर्थ घर विकले जाणार हे नक्की झाले. हे घर केंव्हा विकले जाईल ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील. प्रश्न पाहतेवेळी गुरु मध्ये शनी ची अंतर्दशा चालू होती. २०/१०/२०२१ ते २/५/२०२४ पर्यंत 

गुरु शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 3   3 6  Cusp Yuti: (3)       Saturn-Drusht  1  4 5
It's N.Swami :-------- Venus:- (5)   1 (8)   
It's Sub :------------ Rahu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Venus (5)   1 (8)
It's Sub's N.Swami :-- Moon:- (7)   (10)   
Itself aspects :------ 9 7 11

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 1   4 5  Cusp Yuti: (1)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (3)   3 6  Cusp Yuti: (3)       Saturn-Drusht  (1)   (4) 5
It's Sub :------------ Jupiter:- 3   3 6  Cusp Yuti: (3)       Saturn-Drusht  1  4 5
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   1 (8)   
Itself aspects :------ 7 3 10

गुरु ३,५,१० भावाचा कार्येश आहे व शनी ३ ,५ भावाचा कार्येश आहे . ह्यामध्ये ६ भाव आलेला नाही , ६ भाव फक्त रवी  व चंद्र दाखवितात. कुंडलीचे लग्न तुला म्हणजे चर तत्वाचे आहे म्हणून मी रवी विदशा निवडली

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 6   11  Cusp Yuti: (6)     
It's N.Swami :-------- Mercury:- (6)   (9) (12)   
It's Sub :------------ Moon:- 7   10   
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6)   (11)  Cusp Yuti: (6)     
Itself aspects :------ 12

गुरु महादशा शनी अंतर्दशा रवी विदशेचा कालावधी येतो १५ फेब्रुवारी २०२३ ते २ एप्रिल २०२३ . या कालावधीतच घर विकले जाईल. . बिल्डर ने दिलेला दोन महिन्याचा कालावधी या अगोदर संपत आहे . सबब सादर जातकाने पर्यायी व्यवस्था करावी असे सांगितले. महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

 

शुभम भवतु !!!