कृष्णमूर्ति ज्योतिष: May 2021

Saturday 15 May 2021

प्लूटो इफेक्ट ----

दोन  दिवसापूर्वी एका  जुन्या जातकाने एक पत्रिका पाठवली . आणि म्हणाली हा माझा भाऊ आहे ह्यच्या विवाहाचा योग्य केंव्हा आहे . वय फार वाढलेले आहे . अजूनही  जुळून  येत नाही  त्याचे बर्थ डिटेल्स खालीलप्रमाणे ---

दिनांक ---१/ ९ /१९८३  वेळ--४-४६ पहाटे जन्मस्थळ अ  १५ , २०   रे ७४,३०

जन्म १९८३ चा आहे म्हणजे आता वय ३८ चालू आहे . प्रथम एवढा उशीर का झाला ह्याचे कारण शोधून काढले पाहिजे सर्वसाधारणपणे   विवाहाला मंगल शनी हर्षल नेपच्यून व प्लूटो या ग्रहांमुळे उशीर होतो .  मंगळामुळे २७--२८  वर्षी विवाह होतो. विवाहामध्ये शनीचा संबंध येतो तेंव्हा वय साधारण २९--३२ असते  ह्यच्याही पुढे विवाहामध्ये हर्षल नेपच्यून व प्लूटो या ग्रहांचा संबंध येतो. हर्षल मुले एकदा  तरी विवाह मोडतो . नेप्च्यूनमुळे जातकाची फसवणूक होऊ शकते त्यामुळेसुद्धा विवाहाला उशीर होतो. विवाहा मध्ये  प्लूटो या ग्रहाचा संबंध येत असेल तर प्लूटो संबंधित घटनाच होऊ देत नाही असा अनुभव येतो . आता नेमके काय झाले ते पाहू ------

नियम --सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी २,७,११,५,८ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये विवाह होतो . 

मी जेंव्हा कुंडली सोडवायला घेतली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे होते ---

१४ / ५ /२०२१ वेळ--१६-३१-३९ 

मंगळ * बुद्ध , मंगळ , शुक्र , शुक्र 

शुक्राच्या राशीत राहू आहे व मंगळाच्या राशीत केतू आहे म्हणजे हे दोन्ही ग्रह रुलिंग मध्ये घेता येतील  या पत्रिकेत ७ भावाचा सब शुक्र आहे शुक्र रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे .या पत्रिकेतील योग  पाहू ---

गुरु हर्षल युती (२ अंश २८ कला ), केतू नेफयून युती ( ५ अंश ,३० कला ) शनी प्लूटो युती ( ३ अंश ४ कला )

या पत्रिकेत सप्तमाचा सब शुक्र आहे . शुक्र रुलिंग मध्ये आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 1   4 11   
It's N.Swami :-------- Ketu:- (5)      Rashi-Swami Mars (12)   5 10
It's Sub :------------ Moon:- (10)   1  Cusp Yuti: (11)     
It's Sub's N.Swami :-- Moon:- (10)   1  Cusp Yuti: (11)     
Itself aspects :------ 8

शुक्र केतू च्या नक्षत्रात आहे केतू नेपच्यून च्या युतीत आहे शुक्र ५,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे म्हणजे विवाह व्हायला हवा होता तरीपण विवाह झाला नाही . 
आता दशा पाहू -----
विवाह योग्य  वय आपण वय वर्षे २५ घेऊ . वयाच्या २५ व्या वर्षी दशा राहूची होती . राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 11       Rashi-Swami Venus 1   4 11
It's N.Swami :-------- Mars:- (12)   5 10  Cusp Yuti: (1)     
It's Sub :------------ Jupiter:- (4)   (6) (9)   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (3)   (7) (8)   
Itself aspects :------ 5


राहू  पहिल्या तीनही पायरीवर प्रतिकूल भावांचा कार्येश आहे फक्त ४ थ्या पायरीवर ३,७,८ भावांचा कार्येश आहे . राहू दशा विवाहाला अनुकूल असून सुद्धा विवाह झाला नाही ह्याला एकमेव कारण ४ थ्या पायरीवर शनी प्लुटोच्या युतीत आहे . राहू महादशा सप्टेंबर २०१० पर्यंत होती. २०१० पर्यंत विवाह झाला नाही. त्यानंतर गुरु महादशा सप्टेंबर २०२६पर्यंत आहे गुरु महादाशेमध्ये गुरु अंतर्दशा ऑक्टोबर २०१२ पर्यंत आहे गुरु चे कार्येशत्व 

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (4)   (6) (9)   
It's N.Swami :-------- Saturn:- (3)   (7) (8)   
It's Sub :------------ Venus:- 1   4 11   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (5)      Rashi-Swami Mars (12)   5 10
Itself aspects :------ 11 9 1


४ थ्या पायरीवर केतू बुध  नक्षत्रात आहे बुध  २ ऱ्या स्थानात आहे . एकूण गुरु २,३,५,७,८ भावाचा कार्येश असून सुद्धा गुरु अंतर्दशेत विवाह झाला नाही . कारण गुरु शनीच्या नक्षत्रात आहे शनी प्लूटो युती आहे ( ३ अंश ४ कला )त्यापुढील अंतर्दशा शनीची आहे शनी अंतर्दशा  मे  २०१५ आहे म्हणून २०१५ पर्यंत विवाह झाला नाही .तयानांतर बुधा ची अंतर दशा बुध  २ भावाचा कार्येश आहे बुध  अनुकूल असूनसुद्धा विवाह झाला नाही बुध  अंतर्दशा ऑगस्ट २०१७ पर्यंत होती . महादशा . अंतर्दशा तरी विवाहाला अनुकूल असली पाहिजे  महादशा गुरु अनुकूल नाही अजून एक विचार प्रवाह असाही आढळून येतो तो म्हणजे पहिल्या दोन पायरीवर जर प्लूटो चा संबंध येत असेल तर अशुभ परिणाम होत नाही . येथे  ह्या विचारला छेद जातोय येथे दुसऱ्या पायरीवर प्लुटोचा संबंध आला आहे . तरी सुद्धा घटना घडली नाही .  पुढील केतू अंतर्दशा जुलै २०१८ पर्यंत होती. केतुचे कार्येशत्व ---

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 5       Rashi-Swami Mars 12   5 10
It's N.Swami :-------- Mercury:- (2)   3 12   
It's Sub :------------ Jupiter:- (4)   (6) (9)   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (3)   (7) (8)   
Itself aspects :------ 11



केतू २,३,७,८,९ चा कार्येश असूनसुद्धा विवाह झाला नाही . केतू नेपच्यून च्या युतीत ( ५ अंश ३० कला ) व ४ थ्या पायरीवर शनी प्लूटो युतीत आहे ( ३ अंश ४ कला ) त्यापुढील शुक्र अंतर्दशा मार्च २०२१ पर्यंत  होती . शुक्र ५,११ भावाचा कार्येश असून सुद्धा या कालावधीत विवाह झाला नाही . त्यापुढे रवी,चंद्र मंगल राहू अंतर दशा शिल्लक आहेत . यापैकी मंगल ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी भावाचा कार्येश आहे व राहू अनुकूल आहे पण  ४थ्या पायरीवर शनी प्लूटो च्या युतीत आहे मंगल व राहू अंतार्दशे मध्ये विवाह होणार नाही रवी  व चंद्राच्या ४ त्या पायरीवर केतू आहे आणि केतू नेपच्यून युती आहे ( ५ अंश ३० कला )   गुरु महादशेत विवाह होणार नाही . त्यावेळी जातकाचे वय ५२ असणार आहे 

 सप्तमाचा सब शुक्र केतूच्या नक्षत्रात आहे केतू नेप्च्यूनच्या युतीत आहे शुक्र ५ ११ भावांचा कार्येश आहे सप्तमाचा संबंध ५ स्थानाशी म्हणजे एखादे अफेअर असू शकते . येथे नेपच्यून मुळे फसवणूक झाली असावी . 
महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभम भवतु  !!!