कृष्णमूर्ति ज्योतिष: March 2019

Friday 15 March 2019

Case Study--68

नोकरी केंव्हा मिळेल ?

 हा प्रश्न मुलाच्या आईने विचारला आहे . मुलगा MCA झाला आता सद्य पुण्यात असतो एक वर्ष झाले तो नोकरीसाठी प्रयत्न करतोय परंतु अद्याप त्याला नोकरी लागली नाही . मी मुलाचे जन्मटिपण मागितले ते मी लिहून घेतले
दि २९/७/९४ वेळ १५=३५ अहमदनगर
हि वृश्च्छिक लग्नाची कुंडली आहे
दशमाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे  .
PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (5)   9
It's N.Swami :-------- Ketu:- (6)    Cusp Yuti: (6)      Rashi-Swami Mars (7)   (1) 6
It's Sub :------------ Ketu:- 6     Cusp Yuti: (6)      Rashi-Swami Mars 7   1 6
It's Sub's N.Swami :-- Venus:- (9)   7 12  Cusp Yuti: (10)       Mars-Drusht  (7)   (1) 6
Itself aspects :------ 12

चंद्र १,५,६,७,९,१० चा कार्येश आहे . चंद्र १,६,७,१० नोकरी व्यवसाय साठी अनुकूल आहे 
चंद्र मेष राशीत आहे चंद्र केतूच्या नक्षत्रात आहे केतू सुद्धा मेष राशीत आहे मेष रास चर रास  आहे सदर व्यक्ती व्यवसायच  करेल . व्यवसाय साठी मंगल  व ६,७ भाव आवश्यक आहेत येथे चंद्र ६,७ भावाचा कार्येश आहे व केतू मंगळाच्या राशीत आहे . मी ह्या संदर्भात त्याच्याशी चर्चा केली  तो म्हणाला वर्षभर मी नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे अजून यश मिळत नाही . कधी कधी पहिला राउंड सुद्धा मी क्रॅक करू शकलो नाही . प्रयत्न खूप करतो पण काही सध्या होत नाही. मी विचारले अजून काही अर्थाजनासाठी तू वेगळे काही प्रयत्न केले होते का ? तो हो म्हणाला मी म्हटले काय केले ? तो म्हणाला मी फराळाचे पदार्थ करून देणे . हा छोटा उधोग केला होता त्यात थोडासा फायदा झाला कारण पहिल्यांदाच करत होतो . अनुभव नव्हता आणि मार्केटिंग कमी पडले जास्त लोंकाशी संपर्क करू शकलो नव्हतो. मी मनात म्हटले हि वाटचाल त्याच्या पत्रिकेच्या अनुषंगानेच 
घडत होती  . यासंदर्भात आईशी चर्चा केली . त्याच्या पत्रिकेत नोकरीपेक्षा व्यवसायाची शक्यता जास्त आहे 

शुभ मंगल --------सावधान  

                                         माझ्या भावाचा मित्र एकदा मंडइत भेटला व म्हणाला माझ्या मुलीचे लग्नासाठी प्रयत्न चालू आहेत पण अध्याप कुठे जुळत नाही . मी म्हटले तिची जन्मतारीख जन्मवेळ दे . त्याने घरी फोन करून मला तिची जन्मतारीख जन्मवेळ व जन्मस्थळ दिले . मी ते लिहून घेतले . त्यानंतर बरेच दिवस त्याची गाठ पडली नाही . मी चौकशी केली तेंव्हा  कळले कि त्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे .   हि गोष्ट माझ्या मनाला फार लागली . त्यानंतर मी त्याच्या घरी फोन केला . व त्याच्या पत्नीला सांगितले दोन महिन्यापूर्वी त्याची माझी भेट झाली होती त्यावेळी तुमच्या मुलीच्या लग्नासंबंधी चर्चा करत होतो  पण अचानक असे घडलेले मला माहित नव्हते त्यामुळे  मी संपर्क साधू शकलो नाही . त्यावेळी त्या म्हणाल्या मी तुमच्या घरी येते . मी म्हटले ठीक आहे,  या.    
                                         एके दिवशी त्या मुलीला घेऊन घरी आल्या व म्हणाल्या या मुलीचा लग्नाचा योग केंव्हा आहे ? माझ्याकडे मुलीच्या जन्माचे टिपण होते . त्यावरून मी कृष्णमुर्ती प्रमणे कुंडली  तयार केली . तसेच मुलीकडून एक केपी नंबर घेतला ( के . पी नंबर  ११५ ) व दोन्ही पत्रिकेचा आभ्यास करून त्यांना सांगितले ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ या कालावधीत लग्न होईल . आणि त्याच कालावधीत लग्न झाले . माझे उत्तर बरोबर आले.  कसे  ते खालीलप्रमाणे 
हा प्रश्न  दि . २३ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडविला . 
स्त्री जातक  जन्मतारीख --२२ जून १९८७ जन्मवेळ --सकाळी ९-१४ जन्मस्थळ -सातारा 
या कुंडलीत सप्तमाचा सब बुध आहे . बुधाचे कार्येशत्व ---
बुध --१२ कयु 
गुरु -- ९,६
शनि --५ क्यू 
बुध ---१२,३,१२ कयू   मं यु १२

 कृष्णमुर्ती नियम ---सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर २,७,११, / ५., ८ या भावांच्या  सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो . 

बुध ३,५ या पूरक भावांचा कार्येश आहे . म्हणजे लग्न होणार  नक्की . आता केंव्हा होणार ह्यासाठी आपणाला 
दश - अंतर दशा पाहाव्या लागतील . प्रश्न्वेळी मंगळाची महादशा ,गुरु अंतर दशा ,  होती . 
मंगळ  / गुरु दशा ११ / ८ /२०१३ ते १८ / ७ / २०१४ पर्यंत आहे  

मंगल --                             गुरु ---                                 केतू ---३ क यु                      शुक्र ---११
गुरु --९,६                            केतू ---२,३ क यु बु १२,३       चंद्र ---१०,१                           चंद्र ---१०
शुक्र --११ क यु                    शुक्र ---११ क यु                    राहू ---८,९ क यु गु ९,६          केतू ---३ क यु 
चंद्र ---१०,१ , १० क यु          चंद्र ---१०                             शनि ---५,७  शु दृ १०,४         चंद्र ---१०,१ 

 रवि ---११                                                                    चंद्र ---१० क यु 
मंगळ ---१२, बु यु १२                                                    शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७
चंद्र ----१०                                                                     गुरु ---
शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७                                      केतू ---२,३ क यु बु १२ ,३ 

मंगल महादशा  (११ ) गुरु अंतर्दशा  (२,११ ) या  भावांची बलवान कार्येश आहे . २,७,११ या भावांची साखळी पूर्ण  होण्यासाठी विदशा  अशी शोधावी  लागेल ती म्हणजे ७ या भावांची कार्येश असेल .  वरील ग्रहांचे कार्येश पाहता फक्त रवि ,चंद्र, केतू  ७ या भावाची कार्येश आहे . यामध्ये चंद्र २,७,११ या तिन्ही भावांची कार्येश आहे .   म्हणून मी चंद्र विदश निवडली . मंगळ / गुरु  / चंद्र ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ हा कालावधी आहे  
९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४  याच कालावधीत विवाह होईल . 
                                       ह्या मुलीचा विवाह २४ एप्रिल २०१४ रोजी झाला आहे . 

हाच  प्रश्न मी केपी नंबर ११५ ने  सोडविला 

केपी नंबर ११५ वरून मी  कृष्णमुर्ती पद्धतीने  एक कुंडली तयार केली . 
दि . २३ / ११ / २०१३ वेळ -१५-५३-२२    स्थळ -- अ १७,५९  रे ७४,२६

या कुंडलीत सप्तमाचा सब  राहू आहे . 

राहू -- १,२ क यु शु दृ ४,९
राहू --- १,२ क यु शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१०, शु दृ ४,९

सप्तमाचा  सब २ या प्रमुख भावाचा व ९ या पूरक भावाचा कार्येश  आहे राहू केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी त्यावेळी ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने  देतात . विवाह केंव्हा केंव्हा होईल   त्या साठी  दशा अंतर दशा पाहू . प्रश्न वेळी शनि महादशा व चंद्राची अंतर्दशा  चालू होती. शनि व चंद्र ची कार्येशत्व खालीलप्रमाणे 

                           शनि ---                                            
                           गुरु ---१०,शु दृ ४,९                            
                           शनि --                                             
                           गुरु ---१० शु दृ ४,९                            
अनुकूल भाव                 ( ९ )                                                 

चंद्र ---१०,११  क यु 
शनि --२,५,६ बु यु २
चंद्र ---१०,११ क यु 
शनि -- २,५,६ बु यु २
अनुकूल भाव    ( २,५,११ ) 



शनि महादशा ( ९) चंद्र अंतर्दशा   ( २ , ५ , ११ )या  भावाची बलवान कार्येश आहे . पुढील विदशा खालीलप्रमाणे 

शनि / चंद्र  / राहू   २८ / १० /२०१३ ते  २३ / १ / २०१४   पर्यंत 
                   गुरु                               १० / ४ /२०१४
                  शनि                              १० / ७ /२०१४

गुरु --१० शु दृ ४,९ 
गुरु --१० शु दृ ४,९
केतू --७,८ क यु मं १२,३,८
केतू --७,८ क यु मं १२,३,८

गुरु ३,७,८ या   भाव बलवान कार्येश आहे . या ठिकाणी २, ७ , ११ / ५ , ८ भावांची साखळी  पूर्ण होते . म्हणून शनि महादशा चंद्र अंतर्दशा व गुरु विदशा म्हणजे २३ / १ /२०१४ ते १० / ४ /२०१४ या कालावधीत विवाह व्हावयास हवा . 
ह्या मुलीचा सुपारी व साखरपुडा ४ फेब्रुवारी २०१४ ला झाला . विवाह २४ / ४ /२०१४ रोजी झाला 
  

Saturday 9 March 2019

स्त्री.. दुसऱ्या संततीसाठी प्रयत्न  करावा का ?  अजुन एक व्हावा अशी खूप इच्छा आहे
के.पी न.१९८
१८/२/१९ वेळ १३-४६-५८ फलटण
मी यावेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . हि मकर लग्नाची कुंडली आहे . आता मनातील विचार जुळतो का ते पाहू . चंद्र सप्तमात आहे . म्हणजे दुसऱ्या संततीच्या स्थानात आहे आणि तो सप्तमेश आहे
चंद्रा सप्तमात,सपत्मेश चंद्र सप्तमात म्हणून दुसऱ्यासंततीची  अपेक्षा. प्रश्न बरोबर.
मकर लग्नाची कुंडली
५ च सब शुक्र
शुक्र...१२,५,१०,श यू १२
शुक्र...१२,५,१०,श यू १२
शनी...
शुक्र...१२,५,१०,श यू १२

शुक्र ५ भावाचा अनुकूल आहे पण त्याच बरोबर १२,१०,या प्रतिकूल भावाचा कार्येश आहे.भाव १० हे पंचमपासून सहावे येते . व १२ भाव पंचमापासून आठवे येते संततीचे मृत्यू स्थान त्यामुळे संतती होणार नाही .
शिवाय शुक्र प्लूटो युती ५.५ अंश
शनी प्लूटो युती ५.४ अंश
प्लूटो च्या  योगामुळे संतती होणार नाही .
 दशेचं विचार केला तर शनी  ८/५/१९ पर्यंत आहे. ह्या कालावधीत संतती होणार नाही.
म्हणून पुढील दशेच विचार करू. पुढील दशाबुधाची आहे .
बुध.. २ क.यू
राहू...६,चंद्र ७
मंगळ...
केतू...१२,श १२,न.र.१,८

राहू वर प्लूटो ची दृष्टी
केतू प्लूटो युती.
बुध पहिल्या पायरीला २ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . परंतु बुध ३-४ पायरीवर १२,१,८ पूर्ण विरोधी भावाचा कार्येश.१ भाव हा २ भावाचा नाश करणारा आहे . म्हणजे कुटुंब वृद्धीला विरोध , ८ भाव हे पंचमापासून ४ थे येते. म्हणजे संततीचा पहिले मोक्ष स्थान , १२ भाव हा पंचमापासून आठवे म्हणजे च मृत्यू स्थान येते . भाव २ मुले गर्भ धारणा होऊ शकेल . परंतु १,८,१२ मुले गर्भपात होणार . आता सध्याचा काळ  अनुकल नाही .

बुध बुध ३/१०/२१ पर्यंत आहे.त्यामुळे दशा सुद्धा अनुकूल नाहीत .

शुभम भवतु