कृष्णमूर्ति ज्योतिष: November 2013

Tuesday 26 November 2013

+Case Study-7

एका लग्नाची तिसरी गोष्ट------

                                 वय वर्षे ३२ हे विवाहयोग्य वय असू शकत नाही . विवाहाला जेंव्हा  उशीर  होतो त्यावेळी शनि,मंगळ व हर्शल यांचा संबंध असू शकतो . मंगल वयाच्या २७-२८व्या वर्षी ,शनी वयाच्या २९-३२ व्या वर्षी , व हर्शल ३२-३५  वर्षी विवाह देतो . शनि १,३,५,७,१० व्या स्थानात असतो त्यावेळी विवाहाला उशीर होत असतो. मंगळ १,४,७,८,१२व्या स्थानात  असेल तर विवाहाला उशीर होतो . हर्शल सप्तम स्थानात किंवा हर्षलची सप्तम स्थानावर दृष्टी असेल तर विवाहाला उशीर होत असतो . शुक्र हर्शल युती, प्रतियोग हासुद्धा योग विवाहाला उशीर  करतो चंद्र शनि युती असेल तर ,चंद्र शनीच्या नक्षत्रात ,शनि चंद्राच्या नक्षत्रात ,चंद्रावर  शनीची दृष्टी असेल तर पुनर्फू योगामुळे विवाहाला उशीर होत असतो ,चंद्राचा सब शनि असेल,किंवा शनीचा सब चंद्र असेल तर विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शनि, बुध राहू असेल तरीसुद्धा विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शुक्र ,चंद्र ,मगळ ,रवि गुरु असेल तर विवाह योग्य वयात होतो असा अनुभव प्रत्येक ज्योतिषाला येत असतो .पत्रिका पाहताना विवाहाला उशीर  का होत आहे याचा  विचार होणे गरजेचे आहे . शनि  , मंगळ ,हर्शल चा संबंध आहे का ते पाहीले पाहिजे अन्यथा कालावधी चुकू शकतो .  
              अनुजा जेंव्हा माझ्याकडे आली तेंव्हा तिचे वय ३२ पूर्ण झाले होते  तिने माझा विवाह केंव्हा होईल?  असे विचारले वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र चतुर्थात अंशात्मक प्रतियोग हर्शल (हर्शल दशमात) मी विचारले विवाह ठरला आणि मोडला असे झाले आहे का? तिने सांगितले असे दोन वेळा घडले आहे . एकदा आमच्याकडून घडले, दुसरयांदा मुलाकडून घडले .  
              विवाह योग्य वयात म्हणजे वय वर्षे २० मध्ये चंद्राची महादशा चालू होती ती २८ सप्टेम्बर २००६ पर्यंत होती . चंद्र शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र हर्शल अंशात्मक प्रतियोग आहे म्हणून चंद्राच्या महादाशेमध्ये विवाह झाला नाही . त्यांनतर मंगळाची महादशा मंगळ सुद्धा शुक्राच्या नक्षत्रात ,शुक्र हर्शल अंशात्मक प्रतियोग आहे मंगळाची महादशा  ऑक्टोंबर २०१३ पर्यंत होती . मंगळ महदशेमध्ये सुद्धा विवाह झाला नाही . तोपर्यंत तिचे  वय ३२ पूर्ण झाले 
              या मुलीचे दोन वेळ विवाह ठरवून मोडले आहेत . पहीला मोडला २०१२ मध्ये सुरुवातीला, दुसरा  २०१२ मध्ये शेवटी शेवटी  . या दोन्ही वेळेला मंगळ  / शुक्र दशा चालू होती . मंगळ शुक्राच्या नक्षत्रात आहे . शुक्र हर्शल प्रतियोग आहे .  
            या नंतरची राहू महादशा २८ सप्टेंबर २०३१ पर्यंत आहे .  राहू कार्येशत्व खालीलप्रमाणे --------
        
 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (6)      Rashi-Swami Moon (7)   6 7
It's N.Swami :-------- Saturn:- (8)   (1) 12  Cusp Yuti: (8)       Jupiter-Yuti  (8)   (2) (11)
It's Sub :------------ Moon:- 7   6 7   
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   4 (9)  Cusp Yuti: (4)       Jupiter-Drusht  (8)   (2) (11)
Itself aspects :------ 1
                

राहू २,७,११ व ८या पूरक भावाचा कार्येश आहे राहूची महादशा विवाहास अनुकूल आहे . राहू दुसऱ्या पायरीला सर्वच भावाचा कार्येश आहे म्हणून राहू महादाशेमध्ये राहू अंतर्दशा गृहीत धरली . राहू अंतर्दाशेमध्ये विदश खालीलप्रमाणे ------
                     राहू / राहू / राहू --२२/२/२०१४ पर्यंत 
                                     गुरु ---४/७/२०१४ पर्यंत 
                                    शनि---७/१२/२०१४ पर्यंत 
  गुरु नक्षत्रात कोणीही नाही म्हणून गुरु  बलवान आहे . गुरु व शनि चे कार्येशत्व -------
      PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (8)   (2) (11)  Cusp Yuti: (8)       Saturn-Yuti  (8)   (1) 12
It's N.Swami :-------- Sun:- (3)     
It's Sub :------------ Ketu:- (12)      Rashi-Swami Saturn (8)   (1) 12
It's Sub's N.Swami :-- Moon:- (7)   6 7   
Itself aspects :------ 3 1 5
 PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 8   1 12  Cusp Yuti: (8)       Jupiter-Yuti  8  2 11
It's N.Swami :-------- Sun:- (3)     
It's Sub :------------ Venus:- 3   4 9  Cusp Yuti: (4)       Jupiter-Drusht  8  2 11
It's Sub's N.Swami :-- Sun:- (3)     
Itself aspects :------ 3 11 6                     

              गुरु व शनि यांची तुलना करता गुरु जास्त बलवान आहे . कारण गुरु लाभेश व धनेश आहे . शनि लग्नेश व व्ययेश आहे . म्हणून राहू महादशा राहू अंतर्दशा गुरु विदशामध्ये विवाहास व्हावयास हवा . तो कालावधी येतो २२ / २ / २०१४ ते ७/७/२०१४ . या कालावधीत विवाह होईल 
            

Tuesday 12 November 2013

Case Study--6

+ जिवेत शरद : शतम 

                                  मृत्यू एक त्रिकालाबाधित सत्य . प्रत्येकाच्या वाट्याला येणारे कटू सत्य.  एका चैतन्याचा अंत ,जीवात्म्याचा परमात्म्यात विलीन होण्याचा क्षण ,  पंचमहाभूतात विलीन होण्याचा क्षण , एका जीवात्म्याचा आणि देहाचा विरहाचा क्षण . 
                                 पण प्रकार वेगवेगळे , अपघातात येणारा मृत्यू ,शांतपणे येणारा मृत्यू ,झोपेत येणारा मृत्यू, असह्य वेदना सहन करीत येणारा मृत्यू , पाण्यात येणारा मृत्यू ,आगीत  भाजून येणारा मृत्यू . 
         मृत्यूला सामोरे जाण्याचा क्षण ……। हे फक्त साधू संताच्या बाबतीत  घडू शकते   मानवाच्या बाबतीत अंशत:  ------

                              माझे वडील वारकरी संप्रदायातले होते . सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आई -वडील    दोघेही चारी धाम करून आले होते . आई -वडील दोघेही आळंदी ते पंढरपूर वारी  पायी करत होते . आजही आई पंढरपूरची वारी पायी करत आहे . 
                             वडिलांनी मधुमेह बरोबर केलेली मैत्री ,ती झाल्यापासून जवळजवळ २०-२५ वर्षे अबाधित ठेवली . पण शेवटी शेवटी  मैत्रीत अंतर पडत गेले  आणि मधुमेहाने वडिलांना पंचमहाभूतात विलीन होण्यासठी मुक्त केले .                 
                    शेवटचे ५-६ महिने वडील जास्त आजारी होते मधुमेहामुळे रक्तातील  साखरेचे प्रमाण कमी जास्त होत होते  रक्तातील Creatinin हा घटक वाढलेला होता त्यामुळे उत्सर्जनचे प्रमाण कमी झाले होते. आणि त्यातच अर्धांगवायू झटका ( फक्त चेहर्यापुरता ) Creatinin चे प्रमाण कमी होत नव्हते  शरीर औषधाला प्रतिसाद  नव्हते . जाण्यापूर्वी  दोन दिवस अगोदर पुन्हा एकदा अर्धांगवायू चा जबरदस्त झटाका आला .  . त्यावेळी मेंदूचे स्कॅन केले . त्यांची सर्व गात्रे शिथिल झाली होती श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता म्हणून  त्यांना व्हेण्टिल्लेटर्वर ठेवले होते .  माझी भाची डॉक्टर आहे . तिने सांगितले ,मामा  infection झाले आहे .वेळ आली आहे ,वाट पाहणे आपल्या हाती आहे . रविवारी पहाटे ३-३.३० वाजता ब्राम्हमुहुर्तावर पंचमहाभूतात  विलीन झाले
एक वारकरी विठ्ठलाला भेटावयास वैकुंठाला  गेला .
                               खरे तर असा प्रश्न कोणी विचारत नाही . मी आजारी केंव्हा पडणार आहे ? मला अपघात केंव्हा होणार आहे ? मला मृत्यू केंव्हा येणार आहे ? फार फार तर  माणूस आजारी असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले  जातात .
                              मीच यासंबंधी  तीन आठवडे अगोदर प्रश्न कुंडली मांडून वडिलांचा आजार केंव्हा  बरा  होईल ते पहिले होते . त्यावेळी माझ्या लक्षात आले फार काळ नाही . नियतीचा पावलांचा सुगावा लागला होता . हे , मी फक्त माझे वकील बंधू यांचेजवळ बोललो होतो .
                       कृष्णमुर्ती पद्धतीने माझ्या पत्रिकेवरून वडिलांच्या मृत्यू बद्धल 
                                 ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोनातून  केलेली चिकित्सा 
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये वडिलांचा विचार  नवम स्थानातून करतात . नवम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून  घेतली आहे . 
                   आजाराचा प्रश्न हा प्रश्न कुंडली वरून सोडवावा असा संकेत आहे कारण  मुळ कुंडली  आयुष्यात जे जे आजार होणार त्याचे निर्देशन करीत असते . प्रश्न कुंडली --त्यावेळी नेमका  कोणता आजार झाला आहे त्याचे निर्देशन करीत असते .    आजारासंबंधी खालील गोष्टी पहाव्यात . -----
                 १) लग्नाच्या सब वरून अल्पायु ,मध्यायू  व दीर्घायू पाहावा 
                 २) शष्ट भाव आजार,रोग दाखवितो 
                ३) व्यय भाव हौस्पिटल दाखवितो 
                ४) अष्टम भाव दोष ,धोका दाखवितो (शस्त्रक्रिया )
                ५) षष्ठ  भावाचा उपनक्षत्र स्वामी हाच आजारपणाचा एकमेव निर्णायक घटक असतो
        जे ग्रह षष्ठ भाव ,लग्न भाव यांच्याशी संबंधित असतात त्यांच्या सामायिक दशेत आजार उद्भवतो .   षष्ठ भावाचा सब द्वादश भावात असून षष्ठ भाव व लग्नाचा बलवान कार्येश असेल तर व्यक्ती असाध्य आजाराने त्रस्त असते .  षष्ठ भावाचा सब द्वादश भावाचा कार्येश असून पंचम व एकादश भावाचा कार्येश असेल तर व्यक्ती औषधोपचाराने बरी होते . षष्ठ भावाबरोबर मारक (२,७) बाधक व अष्टम स्थानाचा विचार करावा लागतो . बाधक स्थानाचा संबंध येत असेल तर व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते अष्टम भावाचा सब आयुष्याच्या शेवटी स्थिती कशी असते हे दर्शवितो . 
     माझी पत्रिकेची लग्नशुद्धि  मा . श्री हिरेमठ यांनी केली आहे .    माझ्या पत्रिकेवरून वडिलाच्या आजारपणात शनि महादश -शनि अंतर्दशा -- राहू विदशा चालू  होती शष्ट भावाचा सब गुरु आहे.  गुरु लग्नाचा, चतुर्थ भावाचा, षष्ठ भावाचा ,नवम भावाचा, दशम भावाचा व व्यय भावाचा सब आहे . गुरुचे कार्येशत्व -----
                            गुरु ----१० कयू 
      न . स्वामी     मंगळ ----२,३,८ श यु २,६
            सब         गुरु  ----- १० कयू     
    स . न .स्वामी मंगळ ----२,३,८ श यु २,६
      गुरु २ ( मारक ) ८ (मृत्यू ,शस्त्रक्रिया ) ६ (रोग, आजार ) व १० ( लाभाचे व्यय ) यांचा बलवान कार्येश आहे . 

                 गुरूमुळे मधुमेह झाला गुरु नवम स्थानात त्यामुळे २०-२५ वर्षे नियंत्रणात होता . गुरु मंगळाच्या नक्षत्रात . मंगल तुळेत व्दितीयात (मारक) आहे. मंगळ शुक्राच्या राशीत आहे . मंगल शस्त्रक्रिया करवितो त्यामुळे प्रोस्ट्रेट ग्लंड ची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच मुळ्व्याधची  शास्त्राक्रीया झाली आहे . (शुक्र-मुळव्याध)  मंगळ शनीच्या युतीत तुल राशीत आहे . मंगळ  (२,३,६,७,८,४) स्नायूचे व मेंदूचे आजार देतो . शनि आकुंचन करणारा आहे . शनीमुळे (२,३,६,७,८,४ ) पक्षाघात (अर्धांगवायू )झाला .सुरुवतीला तो  फक्त चेहर्यापुरता होता कारण शष्ट भावाचा सब गुरु वृषभ राशीत आहे . वृषभ राशीचा अमंल गळा ,घसा ,श्वासनलिका ,अन्ननलिका ,मान यावर आहे . मृत्युपूर्वी वडिलांना घास गिळताना त्रास होत होता . पक्षाघात मेंदूला  रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे झाला   शनि तूळ राशीत असल्यामुळे, तुळ राशीचा संबंध मूत्राशय,मूत्रपिंड यावर आहे .  शनि आकुंचन ,गोठविणारा असल्यामुळे उत्सर्जन कमी होत होते त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळितपणे होत नव्हते . त्याच्यावर ताण पडत होता . रक्तातील क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत होते . डॉक्टर  म्हणाले क्रियेटिनिन हे त्वचेच्या खालच्या  थराला चिकटून राहते . त्यामुळे घाम  येत नाही . व अंगाला खाज सुटते अक्षरश: वडील खाज सुटत असल्यामुळे अंग , पाठ भिंतीला  घासत असत इतकी भयंकर खाज येत होती .
                    वडील आजारी होते त्यावेळी शनि महादाशेमध्ये शनि अंतर्दशा राहू विदशा चालू होती ४/११/२०११ ते २१/४/२०१२ सूक्ष्मदशा गुरूची होती ३/१२/२०११ ते २५/१२/२०११
                     शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
                                  शनि ---२,६,मं यु २,३,८
         न . स्वामी          राहू ---५ श २,६,न . रवि २,४
               सब              बुध ---४,शु यु ४,१०
      स . न . स्वामी      केतू ---११,चं १२ न . गु ९,७,१०
                       शनि २ (मारक) ,३ (अष्टमाचे अष्टम ) ६ (रोग ,आजार )४ (चिरशांती ),७ (बाधक )
१० (लाभाचे व्यय)१२( हौस्पिटल )  सर्वांचा बलवान कार्येश होता . शनि तूळेत मंगळाच्या युतीत होता
                                 राहू ---
             न . स्वामी   रवि ---४ श दृ २,६
                   सब      गुरु ---१० कयू
    स  न . स्वामी मंगळ  ---२,३,८ श यु २,६
राहू २ (मारक) ३ (अष्ट माचे अष्टम )४ (चिरशांती) ६ (रोग,आजार) ८ (मृत्यू )या सर्व भावांचा बलवान कार्येश होता .
                       शनि महादश--- २,३,४,५,६,७,८,९,१०,१२
                      शनि अंतर्दशा
                      राहू विदशा ---   २,३,४,६,८
                गुरु सूक्ष्म दशा ----२,३,६,८,१०
                 शुक्र प्रांणदशा ---१,२,४,६,११,१२
 शुक्र प्राणदशा १४/१२/२०११ ते १८/१२/२०११ पर्यंत होती 
   १८/१२/२०११   पहाटे ३. ३० वाजता निधन झाले .
       
                                  

Monday 11 November 2013

Case Study-5

मला  नोकरी केंव्हा लागेल ?

                             एका परिचित व्यक्ती  म्हणाली सर माझा मुलगा बी सी एस झाला आहे . त्याने पुण्यात 
पुष्कळ मुलाखती दिल्या आहेत पण अद्ध्याप  नोकरी मिळाली नाही . मी त्याला म्हटले एकदा मुलाला घेऊन माझ्याकडे या मग बघू काय करावयाचे . मुलगा दर शनिवारी , रविवारी घरी येत असे . एका शनिवारी तो आणि त्याचा मुलगा माझ्या घरी आले . मुलगा म्हणाला सर मी खूप इंटरव्ह्यू दिलेत पण जागतिक मंदी असल्यामुळे नोकरी काही मिळत नाही .  नोकरी केंव्हा लागेल ? असा प्रश्न त्याने मला विचारला मी  
त्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले आणि म्हटले मला नोकरी केंव्हा मिळेल हा  विचार मनात आणायचा लदैवतेचे स्मरण करावयाचे ,एकाग्र होऊन या पुस्तकातील पान  काढ ,उजव्या बाजूच्या पानावरील नंबर मला सांग . त्याने थोडावेळ एकाग्र होऊन मला १३९ हा नंबर दिला . त्या नंबर वरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली काढली .
        हा प्रश्न मी दि . १० जुलै २०१२ रोजी संध्याकाळी १८-०३-५० वाजता सोडविला . आणि त्याला सांगितले ऑगस्ट , सप्टेंबर  मध्ये नोकरी लागेल .   त्यानंतर वडील माझी फी द्यायला लागले. मी मुलाला म्हटले तुझा पाहिला पगार झाला की माझी फी आणून दे.            
             सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मुलाचे वडील पेढ्याचा बॉक्स घेऊन आले . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनद ओसंडून वाहत होता .  मुलाविषयी भरभरून बोलत होते. १००-१२५ मुले इंटरव्ह्यूला  होती त्यामधील ६ मुलांची निवड केली . त्यामध्ये माझ्या मुलाचा नंबर लागला . तो विप्रो  कंपनी मध्ये नोकरीला लागला आहे .
                 
                              मुलाने सांगितले अगोदर सरांच्याकडे जावा . आणि त्यांना सांगा . मलाही खुप आनंद झाला . आनंद ह्यासाठी वडिलांची परिस्थिती चांगली नव्हती . त्यांचा व्यवसाय चालत नव्हता . त्यात मुलाला नोकरी लागली म्हणून वडील खूप आनंदात होते
                 
                                 या कुंडलीत मनातील विचार जुळतो का ते पाहू .  चंद्र हा मनाचा कारक ह्या कुंडलीत चंद्र दशमेश आहे . षष्ठ भावारंभी आहे . म्हणजे प्रश्न नोकरीसंबंधी आहे हे बरोबर आहे
             
     कृष्णमुर्ती नियम --- दशमाचा सब जर २,६,१०,११  भावांचा कार्येश असेल तर २ ६ १० कार्येश भावाच्या संयुक्त दशेमध्ये नोकरी लागते . 
             
     ह्या कुंडलीत दशमाचा सब शुक्र आहे . त्याचे कार्येशत्व  खालीलप्रमाणे ---
         

                                     शुक्र ---७,८ कयू
              न . स्वामी         चंद्र ---५,१०,६
                    सब             शनि---
             स . न . स्वामी   मंगळ ---११,२
      

                          शुक्र २,६,१०,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . म्हणजे नोकरी लागणार हे नक्की झाले . आता 
नोकरी केंव्हा   लागणार ह्यासाठी दशा -अंतर्दशा पाहाव्या लागतील .
            

                                प्रश्नवेळी बुध महादशा ११ फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे . व केतूची अंतर्दशा ६ जुलै २०१३ 
पर्यंत आहे     बुध व  केतूचे बलवान कार्येशत्व खालील प्रमाणे
                                  
                बुध---९,१० कयू                                                    
                बुध---९,१० कयू                                                        
                बुध---९,१० कयू                                             
                बुध---९,१० कयू                                                               



            केतू ---७,शु   
           रवि ---९
          शुक्र ---७,८ कयू
          चंद्र --- ५,१०,६ कयू         

बुध १० भावाचा व केतू ६,१० भावांचा बलवान कार्येश आहे . म्हणजे बुध महादश केतू अंतर्दशा नोकरीसाठी अनुकूल आहे . आता विदशा  अशी शोधावी लागेल ती २,११ भावांची कार्येश असेल .
                  
                        प्रश्नवेळेची कुंडली  चर तत्वाची आहे म्हणजे घटना  लवकर घडणार आहे. पुढील विदशा शुक्राची आहे शुक्र २,६,१०,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . म्हणजे शुक्र विदशा नोकरीसाठी अनुकूल आहे .

बुध महादशा( १० )केतू अंतर्दशा ( ६,१० )शुक्र विदशा  (२,६,१०,११ ) याभावांची कार्येश आहे .
          

                                शुक्र विदाशेच्या ३० जुलै २०१२ ते २९ सप्टेंबर २०१२ या कालावधीत नोकरी लागणार 
असे ठामपणे म्हणता येईल . त्यावेळी   गोचर पहिले नव्हते . फक्त औगस्ट सप्टेंबर मध्ये नोकरी लागेल असे सांगितले होते .सप्टेंबर मध्ये  वडील म्हणाले  मुलाचा पगार झाला आहे म्हणजे औगस्ट मध्ये नोकरी लागली असावी .
        
                      गोचर भ्रमण ---    बुध, केतू व शुक्र यामध्ये यामध्ये केतू हा मंद गतीचा ग्रह आहे त्याचे सब मधील भ्रमण पाहावे लागेल व बुध शुक्र शीघ्र गतीचे ग्रह असल्यामुळे त्यांच्या  नक्षत्र स्वमिचे भ्रमण पाहावे लागेल .
             
                                  १) केतूचे भ्रमण पाहू ---केतू ३० जुलै २०१२ रोजी शुक्राच्या सब मध्ये आहे १ औगास्त  २०१२ रोजी केतूच्या सब मध्ये, केतू १५ औगास्त २०१२ पर्यंत केतूच्या सब मध्ये आहे . केतू पहिल्या दोन पायरीला अनुकूल नाही .  १६ औगस्ट २०१२ ते १९ सप्टेंबर २०१२ पर्यंत बुधाच्या सब मध्ये बुध पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहे .
            
                              २) बुध --- बुध १६ /८/ २०१२  शनि नक्षत्रात, २१ / ८ /  २०१२ ते २८ / ८ / २०१२ पर्यंत बुध 
नक्षत्रात आहे .  शनि बुध दोन्ही पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहेत .
                             
 ३) शुक्र---- शुक्र १६ / ८ / २०१२ पासून राहू  च्या नक्षत्रात ,२३ /८ /२०१२ पासून गुरु च्या 
नक्षत्रात ५ सप्टेंबर पासून शनि नक्षत्रात  राहू गुरु शनि पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहेत .
       

  म्हणजे १६ /८ / २०१२ ते २८ /८ /२०१२ या कालावधीत नोकरी लागली असावी .

शुभम भवतु 

Sunday 10 November 2013

Case Study--4

ज्योतिष --कृष्णमुर्ती ज्योतिष 

शुभमंगल ---------सावधान --

                                आज शिक्षणाच्या प्रसारामुळे मु ला-मुलींचे शिक्षण घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. उच्च 

शिक्षण घेतल्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी  नोकरी करण्याकडे कल  वाढत चाललेला आहे. त्यामध्ये 

मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत आहे. तसेच वेगवेगळ्या  समाजामध्ये विवाहाचे वय 

वेगवेगळे असते. आई-वडिलांना त्यांच्या विवाहाची काळजी वाटत असते.  विवाह योग्य वयात होणे गरजेचे 

असते .  असे त्यांच्या अनुभवावरून त्यांना वाटत असते .  

                             
                   एक साधारण २०-२२ वयाची मुलगी  (२०१२) जुलै महिन्यात पत्रिका जुळते का? हे पहाण्यासाठी

आली होती . बऱ्याच वेळा पत्रिका जुळत नसायची किंवा मुला-मुलींची पसंती व्हावयाची नाही  एका दिवस मी

तिला म्हणालो आपण विवाह योग केंव्हा आहे ते पाहू . तुझी पत्रिका बरोबर आहे का?  वेळ बरोबर आहे का?

ती म्हणाली तारीख बरोबर आहे . पण वेळ नक्की किती आहे ते मला  माहित नाही . मी  म्हटले ठीक आहे.

आपण वेगळ्या पद्धतीने पाहू . कृष्णमुर्ती पद्धतीने  याला एक पर्याय आहे. तो म्हणजे नंबर कुंडली . ज्या

काळात योग आहे त्या काळात  प्रयत्न करता येइल. व आपले उंबरठे झिजवायचे श्रम कमी होतील.   मी तिला

सांगितले कुलदैवताचे स्मरण करून ,विवाहाचा प्रश्न मनात घोळवून  १ ते २४९ पैकी एक संख्या सांग .  तिने

मला १३७ ही संख्या सांगितली या १३७ नंबर वरून मी एक कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .हा प्रश्न

मी २८/७/२०१२ रोजी दुपारी १५-३९-४६  वाजता रे ७४,२६ पू  अ १७,५९ उ येथे सोडविला .  या प्रश्न कुंडलीचा

अभ्यास करून २१/१२/२०१२ ते २५ / ५/२०१३ पर्यंतविवाह  होईल असे   सांगितले 
                                  
                                                १८ मे २०१३ रोजी तिचा विवाह झालेला आहे 

हे मी कसे ठरविले ते खालीलप्रमाणे

चंद्र प्रश्नाचा रोख  बरोबर दाखवितो कि नाही ते पाहू 

चंद्र   राहू युती आहे . चंद्र शनीच्या नक्षत्रात आहे. शनि चतुर्थेश पंचमेश  आहे चंद्र कुटुंब स्थानारंभी आहे

प्रश्नाचा रोख बरोबर आहे. विवाहासाबंधी  मनात काळजी आहे. 

 कृष्णमुर्ती नियम ---  सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर विवाह होतो विवाह त्यांच्या

दशा -अन्तर्दशेमधे होतो. येथे सप्तमाचा सब राहू आहे . राहू विवाह होणार कि नाही ते आपणाला सांगणार आहे

.तर राहूचे बलवान कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
                       
                             राहू ----१,मं ११,२ चं यु १,१०
        न . स्वामी     शनि ---१२,४,५
               सब        केतू ---७,शु ८ चं दृ १,१०
  स . न . स्वामी    रवि ----९,बु यु ९
                     
                                       राहू ११,२,७ या भावांचा व ५ , ८ या पूरक भावांचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे

विवाह होणार हे नक्की झाले . आत केंव्हा होणार ह्य्साठी आपल्याला दशा-अंतर्दशा पाहाव्या लागतील . 
                 
                              प्रश्न्वेळी शनि महादशा २२/७/२०२३ पर्यंत होती शनीचे कार्येशत्व पुढीलप्रमाणे ----
                         
                            शनि ---
      न . स्वामी      मंगळ ---११,२,१२ कयू 
                सब      शनि --
       न . स्वामी     मंगळ ---११,२,१२ कयू

शनि २,७,११ पैकी ११,२ या भावांचा कार्येश आहे . दृष्टीचा विचार केला तर गुरूची मंगळावर दृष्टी आहे . दृष्टीमुळे

७,८ या भावांचा हि कार्येश आहे. शनि २,७,११ या तिन्ही भावांचा कार्येश आहे. . प्रश्न्वेळी  शुक्र अंतर्दशा चालू

होती . ती १३ जुलै २०१४ पर्यंत आहे . शुक्राचे बलवान कार्येशत्व पुढीलप्रमाणे --
                 
                          शुक्र --८
   न स्वामी         मंगल --११,२,१२ कयू 
   सब                 गुरु --- ७,३,६,८ कयू 
    स . न .स्वामी चंद्र ----१,१०रा यु १ के दृ ७
               
                                      शुक्र पहिल्या दोन पायरीला २,११ या प्रमुख भावन्चाव ८ या पूरक भावाचा कार्येश

आहे .तिसर्या चौथ्या पायरीला ७ व ८ या भावांचा कार्येश आहे . त्याचबरोबर ६,१०,१२ या विरोधी भावांचाही

बलवान कार्येश आहे.              प्रश्न्वेळी खालील विदशा चालू होत्या 
       
           शनि/शुक्र /राहू ------२१/१२/२०१२ पर्यंत 
                     
                           गुरु ----- २५/५/२०१३  पर्यंत 
       
         राहू , गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 
                     
                        राहू -----१,मं ११,२ चं यु १,१०                        गुरु -----७,३,६,८ कयू 
 
  न . स्वामी      शनि ---१२,४,५                                           चंद्र ----१,१०,राहू यु १,के दृ ७

   सब               केतू ---७,शु ८ चं दृ १,१०                              शनि ---

स . न . स्वामी   रवि ----९,बु यु ९                                        मंगल ---११,२,१२ क्यू गु. दृ ७,३,८
 
                         राहू-गुरु ची तुलना करता गुरु विदशा मी निश्चित केली  कारण गुरु यशाच्या चौथ्या पायरीला

११,२  भावांचा  कार्येश आहे. व दृष्टीमुळे ७,८  भावांचा  कार्येश आहे.
               
                        शनि / शुक्र / गुरु म्हणजे २१ / १२ /२०१२ ते २५ / ५ /२०१३ या कालावधीत विवाह  होईल सांगितले

आणि त्याच कालावधीत विवाह  झाला आहे.


Wednesday 6 November 2013

Case Study-3

+ शोध जावयाचा -----

            ज्योतिष शास्त्रात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विवाहाचा   मुलगी वयात आली कि आई वडिलांचे वरसंशोधन सुरु होते . आपल्या मुलीला  समजून घेणारा वर मिळेल का? सासरची माणसे  तिला सांभाळून घेतील का?असे  आई-वडिलांचे  मनात विचार येत असतात . जसजसा या कार्याला उशीर होत  जातो तसतसा आई-वडिलांची चिंता आणखीन वाढत जाते . असेच एके दिवशी जानेवारी महिन्यात एक स्त्री तिच्या २०-२२ वर्षाच्या मुलीबरोबर माझ्याकडे आली .  मी विचारले काय प्रश्न आहे? स्त्री म्हणाली हि माझी मुलगी ,हिचा विवाहयोग केंव्हा आहे ते पहायचे होते. मुलीची पत्रिका आहे का? तिने एक पारंपारिक पत्रिका दिली . यापत्रीकेवरून मला सांगता येणार नाही . मी पत्रीकेमधील जन्मतारीख ,वेळ व जन्मस्थळ लिहून घेतले . माझ्या संगणकामध्ये कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . त्या पत्रिकेचा अभ्यास करून  सांगितले २७ मे २०१२ ते  २५ जुलै २०१२ पर्यंत विवाह होईल .

 (जन्मतारीख २५/७/१९९०   वेळ --११. ३० सकाळी    स्थळ रे -७४. १०, पूर्व , अ १८. ७  उत्तर )

                 मुलीचा विवाह १३ जून २०१२ रोजी झाला आहे . 

पत्रिकेचे विवेचन खालीलप्रमाणे आहे. 

विवाहासंबधी कृष्णमुर्ती नियम --- सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी जर २,७,११ /५,८ या भावांचा कार्येश असेल तर विवाह होइल. हा विवाह त्या भावा च्या दश-अंतर्दशेमध्ये होइल. 

या पत्रिकेमध्ये सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र आहे त्याचे बलवान कार्येशत्व खालीलप्रमाणे 

                      चंद्र-- १२कयू 

  न. स्वामी  शुक्र ----९,२

         सब     राहू ----

स  न .स्वामी चंद्र ---११,१२

            चंद्र २,११  भावांचा बलवान कार्येश आहे . म्हणजे विवाह होणार हे नक्की . पण केंव्हा होणार  प्रश्न उरतोच . ह्यासाठी महादशा -अंतर्दशा पहाव्या लागतील . प्रश्नवेळि चंद्राची महादशा होती . चंद्राची महादशा २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत होती . चंद्राचे कार्येशत्व आपण वर पहिलेच आहे . चंद्र २,११ या भावांचा कार्येश आहे. गुरु अंतर्दशा २९/१०/२०११ ते २७/२/२०१३ पर्यंत आहे . गुरुचे  कार्येशत्व खालीलप्रमाणे फक्त  बलवान

                      गुरु--- १०

      न . स्वामी गुरु---१०

      सब      मंगळ ---७,३,८

 स. न . स्वामी शुक्र --९,२

      गुरु विवाहासाठी अनुकूल असणाऱ्या म्हणजे २,७,९,३ भावांचा बलवान कार्येश आहे . तसेच ८ या पूरक भावाचा बलवान कार्येश आहे.

             चंद्र २,११ भावाचा गुरु अन्तर्दशा २,७ या भावांची  कार्येश आहे . आता विदशा  अशी शोधावी लागेल ती ७,११ किंवा जास्तीतजास्त भावांची कार्येश असेल  विदशा खालीलप्रमाणे       

                            विदशा शनि   २/१/२०१२ ते १९/३/२०१२

                                       बुध     १९/३/२०१२ ते २७/५/२०१२

                                      केतू     २७/५/२०१२ ते २५/६/२०१२

                     शनि ---                       बुध -----११,२              केतू ---१०,चं ११ मं दृ ७,३,८

    न . स्वामी रवि ---१०,१२               बुध ----११,२                शनि ---४,५,६

          सब      चंद्र ---                        शनि ---                        राहू ----

स . न .स्वामी शुक्र  --९,२                 रवि ----१०,१२               चंद्र ----११,१२  कयू 

       

शनि फक्त २ भावांचा कार्येश आहे त्याचबरोबर १०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे . बुध तिसरया  चौथ्या पायरीला पूर्णपणे प्रतिकूल आहे. म्हणून मी केतू विदशा निवडली केतू पहिल्या पायरीला ११,७ व ८ या पूरक भावांचा कार्येश आहे दुसरया पायरीला ५ या पूरक भावाचा व चौथ्या पायरीला ११ या प्रमुख भावाचा कार्येश आहे . छाया ग्रह जास्त बलवान असतात म्हणून मी केतू विदश निश्चित केली .

   चंद्र महादश -गुरु अंतर्दशा केतू विदशा म्हणजे २७ मे २०१२ ते २५ जुलै२०१२ या कालावधीत विवाह होईल असे सांगितले .

   गोचर भ्रमण ---

 गुरु व केतू हे मंदगतीचे ग्रह असल्यामुळे त्यांचे सब मधील भ्रमण पाहावे लागेल .

 .    प्रथम गुरु याचे भ्रमण पाहू ---२७ मे  २०१२ रोजी गुरु गुरूच्या सब मध्ये , ३० मे  रोजी शनीच्या सब मध्ये आहे . गुरु व शनि पहिल्या दोन्ही पायरीला  अनुकूल नाहीत(गुरु-१० ) (शनि -१०,१२ ) गुरु ८ जुन २०१२ ते १५ जून २०१२ पर्यंत बुधाच्या सब मध्ये, १६ जुन २०१२ ते १९ जून २०१२ पर्यंत केतूच्या सबमध्ये  बुध (११,१) व केतू (११,७,३,८) पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहेत . म्हणजे गुरु ८जून २०१२ ते १९ जून २०१२ पर्यंत अनुकूल आहे.

  केतू ग्रह -----

  केतू ८ जून ते १९ जुन ०१२ पर्यंत  चंद्राच्या सबमध्ये आहे चंद्र पहि ल्या दोन पायरीला  अनुकूल आहे. (२,९,५)

चंद्र अतिशीघ्र ग्रह आहे  त्याचे गोचर भ्रमण पहिले नाही

    ८ जून २०१२ ते १९ जून २०१२ याकालावधीत म्हणजे १३ जून २०१२ रोजी विवाह झालेला आहे . 

 


Tuesday 5 November 2013

फायलीन वादळ 

                    आंध्रच्या किनार पट्टीवर फायलीन वादळ झाले त्यावेळी मनात उठलेले विचारांचे वादळ शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे . सकाळ वर्तमान पत्रात एक फोटो आला होता त्यामध्ये एक माणूस त्याचे वादळात पडलेले घर पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करीत होता .
                                           चहुबाजूनी आभाळ दाटून आले  होते . वार्याचा वेग वाढला होता . आज पावसाच्या धारा पृथ्वीवर कोसळण्याची चिन्हे दिसायला लागली होती . बहुतेक आज पावसाचे तांडव नृत्य सोसावे लागणार होते 
                    माणसाच्या आयुष्यातसुद्धा  अस घडत  कधी कधी अशावेळी माणूस हताश होतो .  सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरतात .  अघटीत घडत असते त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो  निसर्गाला ,नियतीला वाट मोकळी करून ध्यावी लागते . 
                  बंड ,  हे बंडच असते ,निसर्गाविरुद्ध केलेले बंड , निसर्ग तुमच्यात कधी ढवळाढवळ करतो का? नाही ना ! हजारो वर्षापासून त्याचे सृष्टीचक्र नियमित अव्याहतपणे चालू आहे . मग त्याच्या विरुद्ध बंड , त्याला  कसे मानवणार ? मानवाला पृथ्वीवर आणण्यासाठी  त्याला केंव्हा तरी   असे  तडाखे द्यावेच लागतात . त्यावेळी माणूस कोठे ताळ्यावर येतो. निसर्गाची तडाखे देण्याची प्रवृत्तीतून मानवाने काहीतरी शिकावे  हीच  निसर्गाची अपेक्षा असते . 
                आव्हान ,जरूर ध्याव , पण समोरची व्यक्ती बघून ध्याव ना! हत्तीपुढे सस्याची काय कथा .माणूस राक्षस बनत चालला आहे . त्याची भूक वाढत चालली आहे .  पचेल तेवढेच खाव ना ! निसर्ग  एका घासात पृथ्वीला गिळंकृत करू शकतो . वामनाने नाही का तीन पावलात स्वर्गलोक , पृथ्वीलोक व पाताळलोक आक्रमित केला . मानव , वामन होऊ शकत नाही हे मात्र खरे . शेवटी "मर्यादा" हा शब्द मानवापुढे लावावाच लागतो . तो पूर्ण होऊ शकत नाही . अपूर्णता हा त्याचा स्थायीस्वभाव बनलेला आहे . अतिरेक केलाच तर कडेलोट ठरलेला . आहे फक्त विनाश --विनाश --------- मग --पुन्हा घर बांधायला सुरुवात -----

Monday 4 November 2013

  Case Studt-2 

ज्योतिष --कृष्णमुर्ती ज्योतिष 

बदली -----अटळ 

                              माझ्या मित्राचा मुलगा एका राष्ट्रीय बँकेत नोकरीला  आहे मुळातच  हुशार असल्यामुळे  बँकेच्या अंतर्गत परीक्षा देऊन लहान वयातच बँकेच्या मनेजर पदापर्यंत पोहचला होता .  आक्टोंबर महिन्यात त्याने मला प्रश्न विचारला सर ,माझी बदली होईल का? मी म्हटले १ ते २४९ पैकी एक संख्या दे . त्याने ३८ नंबर सांगितला हा प्रश्न मी दि . १६. १०. २०१२ रोजी ७. ४५. ५७ वाजता सोडविला . त्याच दिवशी तुझी बदली १८ मार्च २०१३ ते ७ एप्रिल २०१३  कालावधीत होईल . असे फोनवर सांगितले . त्यावर तो म्हणाला आमच्या बदल्या मार्च एप्रिल महिन्यात होतच नाहीत . बदल्या झाल्याच तर जून जुलै महिन्यात होतात . मी म्हटले घोडेमैदान जवळच आहे . पाहू  काय होतंय ते. माझा कृष्णमुर्ती फोर स्टेप थेअरी वर पूर्ण विश्वास होता . मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचा फोन आला सर माझी बदली झाली आहे . मला १८ मार्चला नागपूरला हजर व्हावयाचे आहे . तर १८ मार्च ह दिवस कसा आहे ते पाहून सांगा . 

                   

         के. पि. नंबर देतानासुद्धा प्रश्नाच्या अनुषंगानेच नंबर  दिला जातो   . हे मी खूपवेळा परीक्षण केले आहे. नंबर दिला तो ३८ त्यामध्ये ३ संख्या  बदल सुचवितो व  ८ हि संख्या अपमानास्पद बदली . बदली होणार हे नक्की . 

       

            बदलीसाठी कृष्ण्मुर्तीचा नियम --- बर्याच लेखामध्ये बदली होण्यासाठी दशमाचा सब तीन,पाच,नऊ  भावांचा कार्येश असेल तर बदली होते. असे म्हटले आहे. मा . गोंधळेकर सरांनी काही लेखामध्ये दशमाचा सब तीन ,दहा,बारा या भावांचा कार्येश असेल तर बदली होते . असे म्हटले आहे . 

        वरील कुंडलीमध्ये दशमाचा सब बुध आहे व बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे फक्त  बलवान  भाव दिले आहेत . 

                                बुध----६,२,६ कयू 

        न . स्वामी        गुरु ----१२,८,११,१ कयू 

                सब          गुरु ----

    स . न . स्वामी     चंद्र ----५,३           

दशमभावाचा सब बुध ३,५,१२ या भावांचा कार्येश म्हणजे बदली होणार हे निश्चित झाले बदली केंव्हा होणार यासाठी महादशा अंतर्दशा पाहाव्या लागतील . प्रश्नवेळि राहू महादश २० आक्टोंबर २०२९ पर्यंत आहे . व राहू अंतर्दशा ३ जुलै २०१४ पर्यंत आहे . बदली होण्यास साधारपणे ४-५ महिन्याचा कालावधीत लागतो . म्हणून मी राहू अंतर्दशा गृहीत धरली . राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

                             राहू----

      न . स्वामी .    शनि ---५,९,१०

            सब          शनि --

 स . न . स्वामी राहू ----६ मं ६,७ 

         

                 बदली होण्यासाठी राहू ५,९,१० या भावांचा कार्येश आहे . राहू महादशा राहू 

अंतर्दशा बदली होण्यासाठी अनुकूल आहे. आता राहू महादाशेमध्ये विदश पुढीलप्रमाणे 

आहेत. 

                विदशा   शनि २६/७/२०१२ ते २९/१२/२०१२ पर्यंत 

                              बुध २९/१२/२०१२ ते १८/५/२०१२ 

                              केतू १८/५/२०१२ ते  १४/७/२०१३  

                        शनि --                                                                           

न . स्वामी       राहू    ---६ मं ६,७                          

      सब            राहू                                                

स . न . स्वामी शनि ---५,९,१०                               

                        बुध---६,२,६  

  न . स्वामी       गुरु ---१२,८,११,१ कयू 

    सब               गुरु ---

  स . न . स्वामी चंद्र ---५,३

राहू व शनि या दोन्ही ग्रहांचे कार्येशत्व एकच असल्यामुळे मी शनि विदश सोडून दिली . व बुध विदश गृहीत धरली . बुध  ३,१२ या भावांचा कार्येश असल्यामुळे२९ /१२ / २०१२ ते १८/५/२०१३ यापर्यंत बदली होईल राहू महादशा राहू अन्यर्दशा बुध विदशा  म्हणजे २९/१२/२०१२ ते १८/५/२०१३ या कालावधीत बदली होईल .

 गोचर भ्रमण -----

 वरील कालावधीत जर गोचर भ्रमण अनुकूल असेल तरच बदलीची घटना घडून येईल . अन्यथा नाही . मा ग़ोन्धलेकर सरांनी गोचर भ्रमण पाहताना दोन विभाग  आहेत. एक शीघ्र गतीच्या ग्रहाचे नक्षत्र स्वामीचे भ्रमण पाहावे व मंद गतीच्या ग्रहाचे साब्मधील भ्रमण पाहावे 





               प्रथम  राहू या मंद गतीच्या ग्रहाचेभ्रमण पाहू--- वरील कालावधीत राहू २९ डिसेंबरला चंद्राचे सब मध्ये , ५ जानेवारीला रवीच्या सबमध्ये ,१८ जानेवारीला  सबमध्ये आहे. राहू २८  फेब्रुवारी २०१३ शुक्राच्या सबमध्ये आहे. चंद्र ,रवि ,शुक्र पहिल्या दोन पायरीला बदलीसाठी  अनुकूल नाहीत . राहू १ मार्च २०१३ पासून केतूच्या सबमध्ये आहे . केतू पहिल्या दोन पायरीला (१२,४,१,५ ) बदलीसाठी अनुकूल आहे . राहू १ मार्च २०१३ ते १९ एप्रिल २०१३ पर्यंत अनुकूल आहे .आता बुध  शीघ्र गतीचा ग्रह आहे .  म्हणून त्याचा नक्षत्रस्वामी पाहावा .

        बुध १ मार्च  २०१३ ते १७ मार्च २०१३ पर्यंत वक्री आहे . १८ मार्च २०१३ पासून बुध हा राहूच्या नक्षत्रात आहे २ अप्रिल २०१३ ते ७एप्रिल २०१३ पर्यंत गुरूच्या नक्षत्रात आहे . राहू  गुरु पहिल्या दोन पायरीला अनुकूल आहे. बुध ८ अप्रिल २०१३ पासून शनीच्या नक्षत्रात आहे . शनि पहिल्या दोन पायरीला अनुकूल नाही . म्हणजे १८ मार्च  २०१३ ते ७ एप्रिल २०१३ हा कालावधी बदलीसाठी अनुकूल आहे.   याच कालावधीत बदली झाली आहे