कृष्णमूर्ति ज्योतिष: March 2022

Friday 4 March 2022

पोस्टमार्टम ----

                फेसबुक वरील लेख वाचून एका जातकाचा फोन , मला म्हणाले माझ्या कुंडलीची जन्मवेळ नक्की मला माहित नाही. मी २-३ जणांना काढायला सांगितले होते पण प्रत्येकाची वेळ वेगळी येते. माझी जन्मवेळ तुम्ही काढलं का .?  मी म्हटले काढेन . मला तुमचे बर्थ डिटेल्स द्या .   घरातील  सर्वांचे बर्थ डिटेल्स द्यावेत . ( पत्नी , मुले ) त्याच  बरोबर विवाहाची तारीख, आतापर्यंत केलेल्या नोकऱ्यांची तारीख,  बोलता बोलता ते म्हणाले दोन वर्षांपूर्वी पोटातील कॅन्सर डिटेक्ट झाला होता . मी म्हटले ते केंव्हा लक्षात आले त्याची तारीख द्या. मी म्हटले हे सर्व इव्हेंट तपासून पाहता येतील. जातकाने दिलेला  तपशील खालीलप्रमाणे 

दि --२२ /    / १९७५  वेळ सकाळी ८ ते ११  जन्मस्थळ अ १८,४५  रे ७४,१२

जातकाची जन्मवेळ आपणाला निश्चित करावयाची आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ निश्चित  करता येईल. मी कुंडली सोडविली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे 

दि १ मार्च २०२२    वेळ-  २३-२८-२७     स्थळ--अ १७, ५९ रे  ७४ २६

गुरु *  शुक्र  , मंगळ  , शनी , मंगळ 

 

जातकाने दिलेल्या वेळेत दोन लग्ने  येतात. १) वृषभ  २) मिथुन 

मिथुन राशीचा स्वामी बुध  रुलिंग मध्ये नाही . म्हणून मिथुन लग्न असणार नाही . वृषभ राशीचा स्वामी शुक्र रुलिंग मध्ये आहे . म्हणून जातकाचे लग्न वृषभ असले पाहिजे . वृषभ राशी मध्ये रवी चंद्र मंगळाची नक्षत्रे येतात त्यापैकी मंगल रुलिंग मध्ये आहे . म्हणून नक्षत्र  मंगळाचे  घ्यावे  लागेल . वृषभ लग्न मंगल नक्षत्र  असे घयावे लागेल . आता सब व सबसब ठरवू .शिल्लक राहिले गुरु व शनी .यापैकी गुरु लग्न नक्षत्र स्वामी आहे व शनी राशिस्वामी आहे . नक्षत्र स्वामी श्रेष्ठ म्हणून सब गुरु घेतला व सब सब म्हणून शनी घेतला . म्हणजे आपली साखळी झाली शुक्र मंगल गुरु शनी . यावरून लग्न किती अंशावर आहे ते उप उप चे कोष्टक वापरून काढता येईल. ते येते २६ अंश २९ कला ३० विकला . या अंश कला वरून जातकाची जन्मवेळ ट्रान्झिट ऑपशन वापरून आपल्याला ठरवता येईल . जातकाची जन्मवेळ येते   ९-१७-४३ सकाळी. . काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही ह्यासाठी घरातील पत्नी व मुले यांच्या चंद्राशी कनेक्टिव्हीटी येते की ते पाहू. हि वेळ वापरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कॉम्पुटर कुंडली तयार केली . 

हि वृषभ लग्नाची कुंडली आहे आता सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे पडताळून पाहू. 

१)  या पत्रिकेत लग्नाचा सब गुरु शनीच्या नक्षत्रात आहे . शनीची दृष्टी चंद्रावर आहे . 

२) पत्नी-- ७ भावाचा सब गुरु शनीच्या नक्षत्रात आहे आणि पत्नीचा चंद्र राशिस्वामी शनीच आहे . 

३) मोठा मुलगा --लाभाचा सब केतू आहे . केतू वृषाभ राशीत रवी नक्षत्रात आहे मोठ्या मुलाचा चंद्र रवीच्या नक्षत्रात आहे .

४) लहान मुलगा ---दुसरा मुलगा वडिलाच्या पत्रिकेत लग्नावरून पाहायचा . लग्नाचा सब गुरु शनी नक्षत्रात . लहान मुलाचा चंद्र केतू नक्षत्रात आहे . लग्नाचा सब गुरु ची केतू वर दृष्टी आहे . 

अशाप्रकारे सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे जन्मवेळ बरोबर आहे आता अजून खात्री करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग पडताळून पाहू. 

१) विवाह ----२६  /  ५  /  २००२.... या तारखेला चंद्र केतू  मंगल बुध  दशा चालू होती.

७ चा सब २,७,११,५,८ पैकी भावाचं कार्येश असेल तर विवाह होतो . या दशा अंतर्दशेत हे सर्व भाव आले आहेत

चंद्र----१,२,३,७,८,९,१० ११,१२ चा कार्येश आहे 

केतू--२,३,७,८,११ चा कार्येश 

मंगळ ...,२,३,७,८,११   चा कार्येश 

बुध .....,३,४,५,७,८,११ चा कार्येश 

 . 

२)नोकरी .... सदर जातकाने एकच नोकरी केली आहे . १२  /  १  /१९९९ ते १४  /१०  /२०२१ . नोकरी लागली तेंव्हा चंद्र गुरु शनी दशा चालू होती. 

१० भावाचा सब २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते 

चंद्र---१,२,३,७,८,९,१०,११,१२ चा कार्येश 

गुरु .... २,३,८,१०,११ चा कार्येश 

शनी --२,६,१०,११

येथे सर्व  भाव आले आहेत  

                    दोन वर्षांपासून     जातकाच्या पोटात दुखत होते . औषध घेतल्यानंतर बरे वाटत होते. पुढे पुढे जेवण झाले कि उलटी येऊ लागली . सर्व खाल्लेले बाहेर पडत होते .  म्हणून डॉ नि एन्डोस्कोपी केली त्यावेळी पोटात गाठी तयार झालेत हे निष्पन्न झाले. . ह्या गाठी ऑपेरेशन  करून काढावे लागतील असे ठरले .. तत्पूर्वी डॉ म्हणाले मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करून या . सदर जातक मुंबईला गेला टाटा हॉस्पिटल मध्ये चेकिंग केले .  रिपोर्ट वरून डॉ म्हणाले हा   Diffuse Large B cell Lymphoma आहे. ह्याला ऑपेरेशन  जरुरी नाही. हा पोटात औषध घेऊन बरा करता येईल. त्यानुसार त्यांनी ६ डोस घ्यायला सांगितले . ४ डोस घेतल्यानंतर पुन्हा चेकिंग  ला मुंबईला पाठविले. त्यावेळी सर्व गाठी पूर्णपणे नाहीश्या झाल्या होत्या . तरीसुद्धा राहिलेले दोन डोस घेऊन तो कोर्स पूर्ण केला.     

या पत्रिकेमध्ये आजार हा षष्ठ  स्थानावरून पाहावा लागेल . षष्ठ स्थानाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

शनी... २ क .यू 

राहू ... ६ मंगल ९,७ चंद्र दृष्ट ४,३ शनी दृष्ट १ ,८ 

मंगळ --९,७,चंद्र दृष्ट ४,३

राहू ..  ६ मंगल ९,७ चंद्र दृष्ट ४,३ शनी दृष्ट १ ,८ 

शनी राहू नक्षत्रात आहे . राहू ६ व्यस्थानात आहे . ६ स्थानावरून पोटाचा विचार केला जातो. राहुने पोटामध्ये गाठी तयार केल्या . येथे सुद्धा मंगल आहे परांतु ऑपेरेशन  न करता नुसत्या औषधाने कॅन्सर बरा झाला . येथे कोठेही गुरु चा संबंध येत नाही ,आला नाही . त्यामुळे गाठीचा विस्तार झाला नाही . 

महाजनांनी मार्गदर्शन करावे \

शुभंम भवतु !!!