कृष्णमूर्ति ज्योतिष: October 2021

Tuesday 19 October 2021

 नोकरी----

फेसबुकवरील लेख वाचून एका स्त्री जातकाचा फोन ----- प्रथम  तिने तिच्या वैवाहिक समस्येबद्दल चा प्रश्न   विचारला . . माझी  घटस्फोटाची केस चालू आहे माझा घटस्फोट केंव्हा होईल यासंबंधी प्रश्न विचारला. तिच्याप्रश्नबद्दल  उत्तर दिल्यानंतर तिने तिच्या भावाबद्दल प्रश्न विचारला . माझा भाऊ आताच इंजिनिअर ची परीक्षा पास  झाला आहे . . नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे . त्याला नोकरी केंव्हा लागेल ? असा प्रश्न मला विचारला . मी म्हटले त्याला मला फोन करावयास सांगणे दोन दिवसांनी त्याने मला फोन केला . तो म्हणाला नुकताच मेकॅनिकल इंजिनिअर झालो आहे . सद्य नोकरी साठी प्रयत्न करीत आहे . मला नोकरी केंव्हा लागेल आसा प्रश्न त्याने विचारला ... त्याचे बर्थ डिटेल्स  खालीलप्रमाणे ----

दि --१९ / ७ /९५ वेळ रात्री १-३० am सांगली 

प्रथम त्याची जन्मवेळ सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे शुद्ध करून घेतली जन्मवेळ बरोबर आहे 

हि कुंडली मेष लग्नाची आहे प्रश्न सोडविताना मी त्यावेळेचे रुलिंग घेतले ते खालीलप्रमाणे 

दि --१३ / /७ /२१ वेळ २३=२४=२२ फलटण 

शनी*  लग्न--गुरु , चंद्र नक्षत्रस्वामी --केतू , चंद्र राशी स्वामी --रवी , वार --मंगळ 

नियम ---दशम भावाचा सब २,६,१० पैकी भावांचा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते

या पत्रिकेत दशम भावाचा सब गुरु आह . गुरु रुलिंग मध्ये आहे . . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 7   9 12   
It's N.Swami :-------- Saturn:- (11)   (10) 11     Mars-Drusht  (5)   (1) (8)
It's Sub :------------ Mars:- (5)   (1) (8)     Saturn-Drusht  (11)   (10) 11
It's Sub's N.Swami :-- Sun:- (3)   5   
Itself aspects :------ 2 12 4

गुरु २,३ पायरीला १०, ११ भावांचा कार्येश आहे म्हणजे नोकरी लागणार हे नक्की झाले . आता केंव्हा लागणार ह्यसाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील..... कुंडलीचे लग्न मेष आहे चर लग्न आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे . 

कुंडली  सोडवितेवेळी शुक्र महादशा मध्ये गुरुची अंतर्दशा चालू होती. 

शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (3)   (2) 7     Mercury-Yuti  (3)   3 6
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   (9) 12   
It's Sub :------------ Saturn:- 11   10 11     Mars-Drusht  5  1 8
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (9) 12   
Itself aspects :------ 9

शुक्र पहिल्या पायरीला   २ भावाचा कार्येश आहे दुसऱ्या व चौथ्या पायरीला ७ भावाचा कार्येश आहे . जेंव्हा ७ भाव कार्यान्वित होतो त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची , काही कालावधीसाठी नोकरी लागते गुरुचे कार्येशत्व आपण यापूर्वी पहिलेच आहे गुरु १०,११ भावाचा कार्येश आहे . २,६,१० भावाची साखळी जुळण्यासाठी ६ भाव अद्याप लागला नाही . कुंडली सोडवितेवेळी मंगल ग्रहाची विदशा चालू होती. परंतु मंगळ  हा ५ ,९ या विरोधी भावाचा कार्येश आहे म्हणून मी राहू विदशा निश्चित  केली राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
It's N.Swami :-------- Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
It's Sub :------------ Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
Itself aspects :------ 1

राहू २,६ भावाचा कार्येश आहे याठिकाणी २,६,१०,११ भावांची  साखळी जुळली . 

शुक्र महादशा गुरु अंतर्दशा व राहू विदशा चा कालावधी येतो २० / ८ /२०२१ ते १३ / १ / २०२२

या कालावधीत नोकरी लागेल. असे सांगितले परंतु हा कालावधी जवळजवळ ५ महिन्याचा होतो म्हणून अजून कमी कालावधी सांगता येईल का आसा विचार करून   राहुचीच सूक्ष्मदश घेतली शुक्र गुरु राहू राहू दशेचा कालावधी येतो २० /८ / २०२१ ते ११ / ९ / २०२१  या कालावधीत नोकरी लागेल असे संगीतलें . 

त्याच्या बहिणीचा १८ ऑक्टोबर २०२१ ला फोन आलं . तिने सांगितले सप्टेंबर महिन्याच्या शेवटी त्याचा इंटरव्हू झाला . त्यात त्याची निवड झाली १८ ऑक्टोबर २०२१ ला ऑफर लेटर मिळाले . मी सांगितले त्यापेक्षा एक महिना कालावधी जास्त लागला . हा फरक अक्षांश रेखांश व अयनांश मुले पडू शकतो. उद्या तो नोकरीवर जॉईन होणार आहे सदर जातक १९ ऑक्टोबर २०२१ ला नोकरीवर रुजू झाला त्याला कर्नाटक राज्यात एका एमएनसी कंपनीत नोकरी लागली आहे त्याला ६. ५ लाखाचे पॅकेज मिळाले . सद्य वर्क फ्रॉम दिले आहे . 

महाजनांनी मार्गदर्शन करावे 

शुभंम भवतु  !!!

Sunday 3 October 2021

 स्वप्न एम एस होण्याचे ---३

                     फेसबुकवरील लेख वाचून एका जातकाचा फोन --- म्हणाला मी इंजिनिअर आहे सध्या नोकरी करत आहे नोकरीची तीन वर्षे झाली आहेत . पण मला अमेरिकेत M.S. करण्याची खूप इच्छा आहे . परदेशात माझे उच्च शिक्षण होईल का ? परदेशातील स्कॉलरशिप मिळेल का ? नाहीतर उच्च शिक्षणासाठी मला शैक्षणिक लोन मिळेल का ? परदेशात मला नोकरी मिळेल का ? परदेशात मी स्थायिक होईन का ? किंवा मी इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय करू शकतो का ? अशा प्रकारे प्रश्नांची सरबत्ती केली . मी म्हटले  हे सगळे करण्यासाठी प्रथम तुझ्या पत्रिकेत परदेशगमनाचे योग्य आहेत का ते पहिले पाहिजे . ते जर असतील तर तुझ्या पत्रिकेचा अभ्यास करून सांगता येईल. त्यासाठी तुझे बर्थ  डिटेल लागेल. जातकाचे बर्थ डिटेल खालीलप्रमाणे 

जन्म तारीख ३० / ७ /१९९५ वेळ --९-४७ am  स्थळ अ १९,१७  रे ७३,२

हि पत्रिका कन्या लग्नाची आहे 

लग्नाचा सब राहू आहे राहू तुला राशीत (शुक्र ) राहूच्या नक्षत्रात आहे . 

चंद्र सिंह राशीत (रवी ) केतूच्या नक्षत्रात आहे 

लग्नाचा सब चा राशिस्वामी शुक्र व चंद्राचा राशिस्वामी रवी युतीत आहेत. 

म्हणून पत्रिकेची वेळ बरोबर आहे 

 

आता आपल्याला एकूण कोणाते प्रश्न सोडवायचे आहेत त्याच विचार करू . 

१) परदेशगमन योग्य 

२) परदेशात उच्च शिक्षण होईल का ?

३) उछ  शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळेल का ? 

४) उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळेल का ? 

५) परदेशात नोकरी मिळेल का ?

६) परदेशात स्थायिक होईन का ? 

७) इम्पोर्ट एक्स्पोर्ट चा व्यवसाय होईल का ? 

८) घटना केंव्हा घडेल ?

१)  प्रथम पहिल्या प्रश्नाचा विचार करू ---परदेशगमन चा योग्य आहे का ? 

नियम--- व्यय भावाचा सब ३,९,१२ यापैकी भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ च्या संयुक्त दशे मध्ये परदेशगमन होते. 

या पत्रिकेत  व्यय भावाचा सब शुक्र आहे . शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (11)   2 (9)   
It's N.Swami :-------- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
It's Sub :------------ Mercury:- (11)   1 (10)     Sun-Yuti  (11)   12  Jupiter-Drusht  (3)   (4) (7)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
Itself aspects :------ 5

शुक्र ३,४,५,६,७,९,१०,११ भावाचा कार्येश आहे शुक्र ३,९ या अनुकूल भावाचा व ५,७ पूरक भावाचा कार्येश आहे 

म्हणून जातक परदेशात जाऊ शकतो. 

२) दुसरा प्रश्न ---परदेशात उच्च शिक्षण होईल का ?

नियम---व्यय भावाचा सब  व ४,९,११ पैकी भावाचा कार्येश असेल तर त्याच्या संयुक्त दशेमध्ये  परदेशात उच्च शिक्षण होऊ शकते . 

व्यय भावाचा सब शुक्र  आहे शुक्राचे कार्येशत्व आपण वर पहिलेच आहे 

शुक्र ४,९,११ या तीनही भावाचा कार्येश आहे . म्हणून जातकाचे परदेशात उच्च शिक्षण होऊ शकते . 

३ )  तिसरा प्रश्न ---उच्च शिक्षणासाठी परदेशातील स्कॉलरशिप मिळेल का ? 

स्कॉलरशिपचा विचार आठव्या भावावरून पहिला जातो . 

नियम --अष्टम भावाचा सब २,६,८,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत स्कॉलरशिप मिळेल.

या पत्रिकेत अष्टम भावाचा सब केतू आहे , केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- (8)      Rashi-Swami Mars (1)   3 8
It's N.Swami :-------- Ketu:- (8)      Rashi-Swami Mars (1)   3 8
It's Sub :------------ Rahu:- (2)      Rashi-Swami Venus (11)   2 (9)
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (2)      Rashi-Swami Venus (11)   2 (9)
Itself aspects :------ 2

केतू २,८,९,११ भावाचा कार्येश आहे . यातील २,८,११ भाव स्कॉलरशिप दर्शवितात . ९,११ उच्च शिक्षण दर्शवितात. 

सादर जातकाला उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीप मिळू शकते 

४) चौथा प्रश्न -- परदेशातील उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळेल का ? 

कर्जाचा विचार षष्ठ स्थानावरून करतात . 

नियम -- षष्ठ  भावाचा सब २,६,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये शैक्षणिक कर्ज मिळू शकते . 

षष्ठ  भावाचा सब बुध आहे  बुधा चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (11)   1 (10)     Sun-Yuti  (11)   12  Jupiter-Drusht  (3)   (4) (7)
It's N.Swami :-------- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
It's Sub :------------ Jupiter:- 3   4 7   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
Itself aspects :------ 5

षष्ठ भावाचा सब बुद्ध ६,१०,११ चा कार्येश आहे  शैक्षणिक कर्ज मिळू शकते 

५) पाचवा प्रश्न ---परदेशात नोकरी मिळेल का ?

नियम ---व्यय भावाचा सब जर ३,९,१२, पैकी व २,६,१० पैकी भावाचा काययेश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत परदेशात नोकरी मिळेल 

व्यय भावाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत आपण वर पहिलेच  आहे . 

शुक्र ३,४,५,६,७,९,१०,११ भावाचा कार्येश आहे . यामध्ये ६,१०,११ भाव नोकरीसाठी अनुकूल आहेत . ३ ,९  व ५,७ पूरक भाव परदेशातील नोकरीसाठी अनुकूल आहेत.

 किंवा हाच प्रश्न आपण खालीलप्रमाणे सोडवू शकतो 

दशम भावाचा सब ३,९,१२ पैकी व २,६,१० पैकी भावाचा कार्येश असेल तर परदेशात नोकरी लागेल 

दशम भावाचा सब बुध  आहे बुधा चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (11)   1 (10)     Sun-Yuti  (11)   12  Jupiter-Drusht  (3)   (4) (7)
It's N.Swami :-------- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
It's Sub :------------ Jupiter:- 3   4 7   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
Itself aspects :------ 5

बुध ३,४,५,६,७,१०,११ यामध्ये ३,व ५,७ पूरक भाव परदेशासाठी अनुकूल आहेत तसेच ६,१०,११ भाव नोकरीसाठी अनुकूल आहेत 

६) सहावा प्रश्न--- परदेशात स्थायिक होईन का ? 

याबाबतीत दोन मतप्रवाह आहेत . व्यय स्थानात स्थिर रास असेल तर परदेशात कायम स्वरूपी वास्तव्य होईल. या पत्रिकेत व्यय स्थानी सिंह रास  आहे सिंह रास  स्थिर तत्वाची आहे . येथे स्थिर रास  असल्यामुळे कायम स्वरूपी वास्तव्य होईल असे म्हणता येईल. 

किंवा  व्यय भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी स्थिर राशीत असेल तर परदेशात कायम स्वरूपी वास्तव्य होईल. 

या पत्रिकेत व्यय भावाचा सब शुक्र कर्क या चर राशीत आहे व त्याचा नक्षत्र स्वामी शनी मिन या द्विस्वभाव राशीत आहे . ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फळ देतो असा विचार केला तर काही काळासाठी परदेशात वास्तव्य होईल अस्से   म्हणता येईल.

७) सातवा प्रश्न ----इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यायसाय होईल का ? 

नियम---दशम भावाचा सब ३,४,११,१२ भावाचा कार्येश असेल तर इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यायसाय करू शकतो . 

 तसेच दशम भावाचा सब २.,६,७,१० भावाचा कार्येश असेल तर जातक व्यायसाय करु  शकतो . 

 दशम भावाचा सब बुध  आहे  बुधा चे कार्येशत्व आपण वर पहिलेच आहे . 

बुध ३,४,५,६,७,१०,११ यामध्ये ३,व ५,७ पूरक भाव एक्स्पोर्ट साठी ४,१०,११ इम्पोर्ट साठी तसेच ६,७,१०,११ भाव व्ययसायासाठी अनुकूल आहेत . बुध शनीच्या नक्षत्रात आहे शनी मिन या द्विस्वभाव राशीत आहे. म्हणून जातक नोकरी व व्यवसाय दोन्ही करू शकतो. सद्य जातक नोकरी करतच आहे भविष्यकाळात जातक व्यवसाय करू शकतो.

 ८) घटना केंव्हा घडेल. ?

याच प्रश्नासाठी जातक जास्त उत्सुक असतो . यासाठी आपणाला दशा अंतर्दशा पाहाव्या लागतील . जातकाने जेंव्हा प्रश्न विचारला तेंव्हा रवी मध्ये शुक्राची अंतर्दशा १६ /३ /२०२२२ पर्यंत होती 

रवी---१,३,४,५,६,७,१०,११,१२ चा कार्येश आहे 

शुक्र ---३,४,५,७,९,१०,११ चा कार्येश आहे 

परंतु कुंडलीचे लग्न कन्या आहे कन्या लग्न द्विस्वभाव राशीचे आहे . ह्या अंतर दशेत घटना घडणार नाही म्हणून मी शुक्र  अंतर्दशा पर्यायाने रवी महादशा सोडून दिली . त्यापुढील चंद्र महादशेचा विचार करायचे ठरविले . चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे आहे . 

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 12   11   
It's N.Swami :-------- Ketu:- (8)      Rashi-Swami Mars (1)   3 8
It's Sub :------------ Mercury:- (11)   1 (10)     Sun-Yuti  (11)   12  Jupiter-Drusht  (3)   (4) (7)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (5) 6  Cusp Yuti: (7)     
Itself aspects :------ 6

चंद्र १,३,४,५,६,७,८,१०,११ चा कार्येश आहे . यातील ३, व  ५,७ पूरक भाव परदेशगमनासाठी अनुकूल आहेत ४,११ उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहेत .त्या पुढील  मंगळ अंतर्दशा मंगळाचे कार्येशत्व ----

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (1)   3 8   
It's N.Swami :-------- Moon:- (12)   11   
It's Sub :------------ Mars:- (1)   3 8   
It's Sub's N.Swami :-- Moon:- (12)   11   
Itself aspects :------ 7 4 8

मंगल १२ भावाचा कार्येश आहे १२ भाव परदेशगमनासाठी अनुकूल आहे . यात ९ भाव आलेला नाही , म्हणून मी राहूची विदशा घेतली राहूचे कार्येशत्व ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)      Rashi-Swami Venus (11)   2 (9)
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Venus (11)   2 (9)
It's Sub :------------ Rahu:- (2)      Rashi-Swami Venus (11)   2 (9)
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (2)      Rashi-Swami Venus (11)   2 (9)
Itself aspects :------ 8

राहू ९,११ भावाचा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे . 

चंद्र महादशा मंगल अंतर्दशा राहू विदशा याचा कालावधी येतो २७ / १ / २०२३ ते २८ / २ /२०२३

परंतु या कालावधीत अमेरिकेतील शैक्षणिक संस्था सुरु होत नाहीत . शैक्षणिक संस्था सप्टेंबर मध्ये सुरु होतात . म्हणून मी हा कालावधी सोडून दिला . पूर्ण मंगळ अंतर्दशा सोडून दिली . त्यापुढील राहू अंतर्दशा घेतली राहूचे कार्येशत्व आपण वर पहिलेच आहे . राहू २,९,११ चा कार्येश आहे यातील ९,११ उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे . 

चंद्र महादशा राहू अंतर्दशा राहू विदशा घेतली ह्या दशेत कालावधी येतो १५ / ८ / २०२३ ते ५ / ११ / २०२३ या कालावधीत जातक परदेशात उच्च शिक्षणासाठी जाईल. परंतु यात १२ व भाव आलेला नाही . म्हणून त्यातीलच शनी ची सूक्ष्म दशा घेतली शनी चे कार्येशत्व ----

 PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 6   5 6  Cusp Yuti: (7)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (3)   (4) (7)   
It's Sub :------------ Mars:- (1)   3 8   
It's Sub's N.Swami :-- Moon:- (12)   11   
Itself aspects :------ 1 9 4

 शनी १,३,४,७,१२ चा कार्येश आहे यातील ३,७,१२ भाव परदेशगमनासाठी अनुकूल आहेत .

चंद्र महादशा राहू अंतर्दशा राहू विदशा व शनी सूक्ष्मदशा चा कालावधी येतो ८ / ९ /२०२३ ते २१ / ९ / २०२३ 

या कालावधीत जातक परदेशी उच्च शिक्षणासाठी जाईल . 

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभम भवतु !!!