कृष्णमूर्ति ज्योतिष

Thursday, 31 August 2017

 विवाह केंव्हा ? 
पुरूष दिनांक   १७/१/९० ८-१३ सकाळी     स्थळ -फलटण

एल  एस  आर  डी
शनी केतू गुरू गुरू Ls राहू
३१/८/१७  ६-३०-३१ फलटण
७ चा सब मुळ कुंडलीमधे शुक्र आहे
रूलिंग मधे शुक्र नाही. म्हणून केतू घेतला . सब केतू घेऊन वेळ येते . सकाळी ८-१०-५७
 ७ चा सब केतू ....
केतू..७ चं ८
बुध..११ ६
मंगळ..११ क यू द्रुष्टी ५ भावारंभी
बुध.. ११ ६

सब केतू ५ , ७ ,८ , ११ चा कार्येश.  केतू विवाहाला अनुकूल आहे
 आता दशा पाहू....
राहू शुक्र ६-११-१५ ते ६/११/१८
 राहू..
मंगळ..११ ३ ४
मंगळ..११ क यू द्रुष्टी ५
बुध.. ११ ६

राहू ३ ५ ११ चा कार्येश
शुक्र..
रवि..१२ शु यु १२ ९ १०
बुध..
शुक्र..१२ ९  १० र युती

शुक्र १०  १२ या विरोधी भावांचा कार्येश.म्हणून त्यापुढील रवी अंतर्दशा

रवी..१२ शु युती १२ ९ १०
रवी..१२ शु युती १२ ९ १०
शनी.. १२,कयू  २
शुक्र..१२ ९ १० र यूती १२

रवी २,  ९ चा कार्येश आहे
 चंद्र विदशा
चंद्र..८
चंद्र.।८
राहू..
मंगळ.. ११ ३ ४ ११ क यू द्रुष्टी ५
चंद्र  ३  ५ ८ ११ चा कार्येश

राहू रवी चंद्र  या दशेमध्ये विवाह होईल . हा कालावधी येतो २२-११-१८ ते २०/१२/१८
 राहू.३, ५ , ११
रवी.२ , ९
चंद्र. ३, ५, ८ ,११

कधी कधी ७ भाव न लागता ५  ८ भाव कार्येश असतानासुद्धा  विवाह होतो.
 एक गोष्ट नमूद करावी वाटते७ चा सब केतू बुधाच्या नक्षत्रात आहे व बुध हर्षल नेपच्यून च्या युतीत आहे त्यामुळे विवाह ठरणे , मोडणे असे होऊ शकते. तसेच नेपच्यून मुळे फसवणूक होऊ शकते
 ७ चा सब केतू कर्क या चर राशीत नक्षत्रस्वमी बुध धनु या व्दिस्वभाव राशीत आहे .व
 केतू ६ ,,८ चा कार्येश  म्हणून व्दिभार्या योग

Saturday, 26 August 2017

ब्युटी पार्लर व्यवसायातून लाभ होईल का?

स्त्री: १९-८-२०१७
 १८-०९
राजगुरूनगर(पुणे)
अ-१८ :५४  रे-७३ :५६
के.पी  नं  2

नियम: दशमाचा सब २,६,१०,११  व ७ चा कार्येश असून मंगळाशी संबंधित असेल तर व्यवसायात लाभ होतो.
 १० चा सब ५ चा हि कार्येश असावा . ५ कला, सौंदर्य
१० चा सब चा शुक्राशी संबंध असावा
(न.स्वामी, द्रुष्टी , युती ,)

बुध शुक्र    सौंदर्य ,
शुक्र शनी केसांचे सौंदर्य
सप्तम भावावरून गिर्हाईक चा बोध होतो . सप्तम भावाचा सब बुध आहे

 बुध शुक्र...लहान कुमारवयीन मुली
 मंगळ शुक्र ...तरूण स्त्रिया
रवी शुक्र ..उच्चभ्रु  स्त्रिया,
शनी शुक्र ..वयस्कर स्त्रिया
ग्राहक असू शकतील
१० चा सब बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे .
बुधाचे कार्येशत्व...

बुध..
शुक्र..४ , २, ३, ७, दृष्टी १०
रवी..५  रा यु. ५ के द्रुष्ट ११
केतू..११ श ८ १२ र द्रु ५श द्रु ८ १२
           न. मंगळ ५ ,१ ,९
१० चा.सब बुध २, ३, ४, ५, ७ ,८, ९ ,१०, ११ ,१२ चा कार्येश आहे
५ कला, ७ व्यवसाय १० व्यवसाय ११ लाभ .  शुक्र मिथुन २८-५-१६ आहे व ४ भावारंभ मिथुन २४-७-५२ आहे म्हणून शुक्र ४ भावारंभी आहे (फरक ३-५७-२४ ) त्याची दृष्टी १० भावारंभी आहे
शिवाय मंगळ ग्रहाचा संबंध आहे
सदर ची व्यक्ती व्यवसाय करेल.


सध्याच्या दशा पाहू....
गुरू मधे राहू २८/३/१८ पर्यंत.
गुरू राहू २८/३/२०१८ पर्यंत आहे. गुरु नंतर शनी दशा सुरु होईल

 गुरू .. .                                          राहू .. ५ र ५                                     शनी .. ८,१२,९ क  यु
मंगळ ..५,१,९                                केतू .. ११ श ८,१२ र दृ ५                     बुध .. ५
राहू .. ५ र ५                                  केतू ..                                                गुरु ..
केतू .. ११ श ८,१२ र दृ ५                 मंगळ .. ५,१,९                                    मंगळ .. ५,१,९


वरील गुरु राहू व शनी दशा पाहता सर्वच १,५,८,९,११,१२ च्या कार्येश आहेत यामध्ये २,६,१० भाव कोठेच नाहीत .
५  ८। १२ हे भाव व्यवसाय करण्यास अनुकूल नाहीत ८ भाव अडथळे १२ भाव अनावश्यक खर्च / गुंतवणूक दाखवतात
 पार्लर च्या व्यवसायात लाभाचे प्रमाण अल्प राहील .
 ६ भाव असणे आवश्यक आहे.  कारण ७ भाव हे गिर्हाईक आहे त्याच्या पैशाचा व्यय म्हणजे  ६ भाव होतो
  फक्त १०  ११ लागणे म्हणजे आपल्या इच्छैखातर व्यवसाय चालू ठेवणे असे होईल
तसेच दशम भावारंभी प्लूटो ग्रह आहे . दशम भावारंभ धनु २४-७-५२ आहे व प्लूटो धनु २३-१३-३६ आहे म्हणजे फक्त ५४ कला १६ विकला चे अंतर आहे प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे यामुळे सुद्धा पार्लरचा व्यवसाय फायदेशीर ठरणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल .

किंवा ५। ८। १२ हे भाव समोरच्या व्यक्ती चे २। ६। ११ भाव होतात. दर महिन्याला ठराविक रक्कम घेऊन दुसर्याला चालवायला देणे हे फक्त होऊ शकेल.
 परंतू भागिदारी त करू नये. 

Friday, 25 August 2017

माझ्या मुलाचा विवाह  केंव्हा होईल ?.... 

औरंगाबाद येथील एका पालकांनी गेल्या महिन्यात माझ्याशी संपर्क साधून त्यांच्या मुलाचा विवाह केंव्हा होईल अशा प्रश्न विचारला .
मुलाची जन्मतारीख  .. २/९/९०
जन्मवेळ ........ संध्याकाळी ५-१५
जन्मस्थळ  ...... नासिक

वरील तारीख व वेळेनुसार मी केपी पद्धतीने कुंडली तयार केली
मी ज्या दिवशी कुंडली पहिली त्या दिवसाचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे
तारीख २५/८/२०१७ वेळ ८-४६-२२ सकाळी फलटण
लग्न .. बुध     नक्षत्र -चंद्र     राशी -बुध    वार -शुक्रवार  लग्न नक्षत्र --चंद्र

कुंडलीनुसार सप्तमा चा सब केतू आहे . रुलिंग प्लॅनेट मध्ये केतू नाही . पुढील शुक्र व मागील बुध  रुलिंग प्लॅनेटमध्ये  आहे यापैकी कोणता निवडावा .....
बुध  लग्न स्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून मी बुधा ची निवड केली
सप्तमाचा सब बुध  निश्चित केला . सप्तमाचा सब बुध  घेतल्यामुळे जातकाची जन्मवेळ येते १७-१०-१३
बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
कृष्णमूर्ती नियम = सप्तमाचा सब २,७,११ याभावांचा कार्येश असेल तर २,७,११,या भावांच्या सयुंक्त दशे विवाह होतो. कधी कधी ७ भाव न लागता ५,८  हे भाव लागतात
बुध .. ८ कस्प युती
रवी .. ७
रवी ..
शुक्र .. ७ , ५  , ९

बुद्ध ५ ,७  , ८ ,९ या भावाचा कार्येश आहे म्हणजे विवाह होणार हे निश्चित .
आता केंव्हा होईल यासाठी दशा अंतर्दशा पाहू
कुंडली प्रथम पहिली त्यावेळी राहू महादशा शुक्र अंतर्दशा चालू होती .

राहूचे कार्येशत्व
राहू .. १२ शनी १२ ,१ ,२ चंद्र युती १२ गुरु द्रु ६ , ३
चंद्र .. १२ ,१ राहू युती १२ केतू द्रु  ६
मंगळ .. ४ , ११
रवी .. ७

राहू २, ३ ,७ ,११ चा कार्येश आहे राहू अनुकूल आहे आता अंतर्दशा शुक्र पाहू
शुक्र ..
केतू,, ६ चंद्र १२ गुरु युती ६ चं द्रु १२
केतू..
शनी .. १२, १ ,२ ..

शुक्र १ , ६,१२ या विरोधी भावाचा कार्येश आहे म्हणून हि अंतर्दशा सोडून दिली
त्यापुढील अंतर्दशा रवीची आहे रवीचे कार्येशत्व

रवी ..
शुक्र .. ७,५,१०
रवी..
शुक्र .. ७,५,१०

रवी ५,७ या भावांचा कार्येश आहे

लग्नकुंडली मकर या चर तत्वांची आहे म्हणून रवीची विदशा घेतली

राहू रवी रवी या दशेमध्ये विवाह होईल .
विवाहाचा कालावधी येतो १६/१/१९ ते १/२/१९
सादर पालकांना जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुलाचा विवाह होईल असे सांगितले .





Tuesday, 28 June 2016



              नोकरीमधे  बदल आहे का ?

                                                    भिजीत एका मल्टीनेशनल कंपनी मधे नोकरीला होता. यापूर्वी त्याने २  ३ नोकरया सोडलया होत्या. आता ज्या कंपनी मधे नोकरी करतो त्या ठिकाणी त्याला वरीष्ट खुप त्रास देत होते त्यामुळे तो वैतागलेला होता म्हणून त्याने मला प्रश्न विचारला की आताच्या  नोकरीमधे काही  बदल आहे का? ही नोकरी सोडुन दूसरी नोकरी मिळेल का? मि म्हटले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग. त्याने ७५ ही संख्या सांगितली

     हा प्रश्न मि २८।९।२०१३ रोजी १८़३०़०७ वाजता    अ १७  ५९  व    रे ७४  २६ येथे सोडविला
ही कुंडली कर्क लग्नाची आहे
नियम... दशमाचा सब ३  ५  ९  । २  ६  १०  ११ या भावांचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा अंतर दशेमधे दूसरी नोकरी मिळेल
३  ५  ९  नोकरी सोडन्यासाठी व २  ६  १०  ११ दूसरी नोकरी मिलण्यासाठी
दशमाचा सब रवि आहे
रवि...२  ३  क यु
चंद्र...१२
मंगळ...
बुध  ...३
रवि २  ३  १२ या भावांचा कार्येश आहे
या मधे ३ बदल सुचवितो व २ दूसरी नोकरी मिळणार है सूचित करतो
नोकरी मधे बदल केंव्हा  होईलयासाठी दशा अंतर दशा पाहिल्या
प्रश्न वेळी गुरु मधे शुक्र ची अन्तर्दशा चालू होती
*गुरु..१२  ६      
गुरु..१२  ६        
बुध...                                                 
मंगळ...१  ५  १० 
*शुक्र...
गुरु..१२  ६
केतु...९  १०  कयु मं १  ५  १०
शुक्र...४  ११
गुरु  १ ५ ६ १० १२ चा व शुक्र १ ४ ५ ९ १०   या भावांचा कार्येश आहे
५  ९  १२ हे  भाव बदल सुचवितात व ६  १०  ११ हे दूसरी नोकरी मिळणार हे सुचवितात
३  ५  ९  व २  ६  १०  ११ ही साखळी जूळण्यासाठी विदशा अशी शोधावी लागेल  की जी ३  २ या भावांचि कार्येश असेल
पुढील विदशा रविची  आहे रविचे कार्येश
रवि...२  ३  क यु
चंद्र...१२
मंगल...
बुध...३


रवि विदशा २  ३  भावाची कार्येश आहेनोकरी मिळण्यासाठी २ ६ १० ११  व सोडन्यासाठी ३  ५  ९  ही साखळी पूर्ण होतेगुरु महादशेत शुक्र अंतर दशेत व रवि विदशेत घटना घडनार  आहे प्रश्न कुंडली चार तत्वाचि आहे हयाचा अर्थ घटना लवकर घडणार आहे है सूचित होतेगुरु शुक्र रवि दशेत म्हणजे ११।२।१४ ते ३१।३।१४ या कालावधीत नोकरी मधे बदल होणार असे सांगितलेगोचर भ्रमन....वरील कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल असेल तरच घटना घडेलगुरु शुक्र रवि यामधे गुरु मंद गतिचा ग्रह आहे म्हणून त्याचे सब मधील भ्रमण पहावे लागेल१) गुरु या कालावधीत वक्री आहे पण गुरु ११ फेब्रुवारीला २०१४ ला शुकराचया सब मधे आहे शुक्र वक्री नाही ६ मार्चला मार्गी झाला तो ३१ मार्च २०१४ शुकराचया सब मधे आहे शुक्र पहिल्या २ पायरीला अनुकूल आहे२) शुक्र हा शीघ्र गतिचा ग्रह आहे त्याचे नक्षत्र स्वामीचे भ्रमण पहावे लागेल ११ फेब्रुवारीला२०१४ ला शुक्र शुक्राच्या च नक्षत्रात आहे.  २२ फेब्रुवारीला रविचया नक्षत्रात आहे ११ मार्च २०१४ ला चंदराचयान नक्षत्रात व २५ मअर्च ला मंगलाचया नक्षत्रात  शुक्र रवि चंद्र मंगल हे सर्व पहिल्या २ पायरीला अनुकूल  आहे३ ) रविचे नक्षत्र भ्रमण लहावे लागेल रवि  ११ फेब ला मंगलाचया नक्षत्रात २० फेब्रुवारी ला राहुच्या नक्षत्रात ५ मार्च ला गुरुच्या नक्षत्रात व १८ मार्च ला शनिचया नक्षत्रात आहे मंगळ राहू गुरु शनि है सर्व पहिल्या दोन पायरीला अनुकूल  आहेतवरील कालावधीत म्हणजे ११ फेब्रुवारी २०१४ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल होते  म्हणून बदल याच कालावधीत झालासदर व्यक्तिने २७ फेबृवारीला नोकरी लागली असे सांगितले

Friday, 24 June 2016

निवडणूक ..... एक अनुभव

                                मागील विधानसभा निवडणुकीच्या काळातील घटना आहे. केन्द्रामधे भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रामधे  ऑक्टोंबर नोव्हेंबर २०१४ मधे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामधे आजि  माजि आमदार आपले नशिब आजमावित होते. प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावित होते.कही पक्षामधे नवीन चेहरयाना संधि देन्याचा प्रयत्न दिसत होता. अशीच एक ओलखीचि व्यक्ति माझ्याकडे आली व महनलिमि सुद्धा या शर्यतीमधे आहे कारण त्याच्या नावाची चर्चा चालली होती हे माझ्या कानावर आले होते त्य व्यक्तिने .... या पाक्षातरफे मला टिकिट मिळेल का? असा प्रश्न मला विचारला. मि म्हटले पक्षा तर्फे टिकिट मिळेल का असा विचार करुण कुलदैवतेचे स्मरण करून  १ ते २४९ या मधिल एक संख्या सांगा. त्याने थोड़ावेल विचार करून मला १४९ ही संख्या सांगितली हा प्रश्न मि १८ सप्टेम्बर २०१४ रोजी रात्री ८़७़२१ वाजता फलटण येथे सोडविला व ..... या पक्षा तर्फे आपणास टिकिट मिळणार नाहि असे स्पष्ट सांगितले.  ते कसे सांगितले त्याचे विवेचन खालीलप्रमाणे.....

पक्षातरफे टिकिट म्हणजे निवडणूक लधविन्यासठि त्या पक्षाने दिलेले एक परवानगीचे पत्र असते पत्राचा विचार तृतीय स्थानापासुन करतात. पत्र केनवहा येईल? बातमी पेपरमधे केनवहा छापुन येईल? इच्छित फोन केनवहा येईल? बातमी खरी की खोटी?  जाहिरात् पेपर मधे केनवहा छापुन येईल?
हस्तलिखित , पुस्तकाचे प्रकाशन केंवहा होईल या सर्वांचा विचार तृतीय स्थानावरुन करतात
कृश्रनमुर्तिचा नियम ..... तृतीय भावाचा सब लाभाचा कार्येश असेल तर पक्षातरफे टिकिट मिळेल

निवडणूक लढ़विन्याचि इच्छापूर्ति होईल का?

नियम.... लाभाचा सब लगनभावाचा कार्येश होत असेल तर इच्छा पूर्ण होईल
या दोन नियमांचा वापर या उदाहरणामधे केला आहे.
मनातील विचार जुलतो का ते पाहु
चंद्र मनाचा कारक , चंद्र अष्टमात मिथुन राशित नवम स्थानारंभी आहे. चंद्राची दृष्टि तृतीय स्थानारंभी आहे म्हणजे प्रश्न बरोबर आहे.

चंद्र तृतीय स्थानाशी संबंधित आहे म्हणजे प्रश्न बरोबर आहे

य कुंडली मधे तृतियाचा सब शनि  आहे
शनिचे कार्येशत्व......
शनि...
गुरु...९,२
बुध....
मंगळ...१,६
तृतियाचा सब शनि लाभाचा कार्येशहॉट नाही म्हणजेच पक्षातरफे टिकिट मिळणार नाही हे सांगता येते
पक्षातरफे निवडणूक लढविणयाचि इच्छापूर्ति होते का ते पाहु
लाभाचा सब केतु  आहे
केतु... ५ गुरु ९,२,११
बुध...११ राहु यु ११ केतु दृ ५
गुरु...
बुध...११ राहु यु ११  केतु दृ  ५
लाभाचा सब लग्न भावाचा कार्येश होत नाहि तृतियाचा सब  लाभाचा कार्येश हॉट नाही व लाभाचा सब  लगनाचा कार्येश होत नाहि म्हणजे पक्षातरफे टिकिट मिळणार  नाही हे संगता येते
 सदर व्यक्तीला टिकिट मिळाले नाहि

उदाहरण दूसरे........
 जून २०१५ मधे सातारा जिल्हा प्रार्थमिक शिक्षक बैंकेची निवडणूक झाली त्यावेळी
श्री अनिल मला म्हणाले मागील पंच वार्षिक निवडणुकीत मी उभा राहिलो होतो  पण त्यावेळी मि पराभूत झालो होतो परंतु यावेळी मला उभे राहण्याची खुप इच्छा आहे  तर XXX  या पक्षा तर्फे मला निवडणुकीचे टिकिट मिळेल का?
कारण मिळण्यासाठी सुधा स्पर्धा आहेच
टिकिट मिळाले तर निवडणुकीत यश मिळेल का?  मि म्हणालो हा प्रश्न मनात धरून , कुलदेवतेचे स्मरण करुन  १ ते २४९  या पैकि एक संख्या सांगा त्यानी थोड़ावेल मन  एकाग्र करुन १४७ ही संख्या सांगितली

ह प्रश्न मि १६ मे २०१५ रोजी ११़२२़३८ वाजता फलटण ( अ १७  ५९  रे ७४  २६ )

येथे सोडविला त्याच दिवशी तुला पक्षातर्फ टिकिट मिळणार व तु निवडून येणार असे सांगितले
त्याचे विवेचन खालीलप्रमाणे....
ही कुंडली वृष्चिक लग्नाची आहे
पक्षातरफे टिकिट मिळेल का?  .....
तृतीया चा सब राहू आहे

राहु....

चंद्र...6 क यु 6
राहु...
चंद्र...6 क यु 6

राहु शष्ट भावाचा बलवान कार्येश  आहे पण लाभाचा कार्येश होत नाही


लाभाचा सब लग्नाचा कार्येश होतो का ते पाहु

लाभाचा सब शनि आहे
शनि...1,3,4 मं दृ 7  2
शनि...1,3,4 मं दृ 7  2
शुक्र...6  12
राहु...11 बुध 7 न चं 6

लाभाचा सब लगनाचा कार्येश आहे

म्हणजे निवडणूक लढ़विन्याचि इछा पूर्ण होत आहे

शष्ट भाव हा प्रतिस्पर्धयावर मात करण्याचे स्थान आहे.

आतापर्यंत आपण शष्ट भाव स्पर्धा परीक्षा, कोर्ट केस व क्रिकेट मैच साठी वापर करीत आलो आहोत निवडणुकित
पक्षा तरफे टिकिट मिळविणे ही सुधा एक स्पर्धाच आहे
म्हणून       १)   तृतीयांचा सब शष्टाचा कार्येश असेल          त्याच बरोबर
                  २)   लाभाचा सब लग्नाचा कार्येश असेल                तर टिकिट मिळेल असेच या उदाहरनातुन दिसून येते श्री अनिलला पक्षातरफे निवडणूक लढ़विन्यासठी टिकिट मिळाले 
पक्षातरफे टिकिट मिळविन्यासाठी स्पर्धा/ चढ़ाओढ असेल तर मला वाटते शष्ट भावाचा विचार व्हावयास हवा

दोन कुंडली मधिल साम्य.....


1) दोन्ही कुंडल्या वृश्चिक लगनाच्या आहेत

2) दोन्ही मधे तृतियाचा सब शष्टाचा कार्येश आहे
3) दोन्ही मधे तृतियाचा सब लाभाचा कार्येश नाही

दोन्ही कुंडली मधिल फरक


1) श्री सुनिलच्या पत्रीकेत लाभाचा सब लगनाचा कार्येश होत नाही म्हणून श्री सुनिलला टिकिट मिळाले नाही

2) श्री अनिलच्या पत्रीकेत लाभाचा सब लगनाचा कार्येश हॉट आहे म्हणून श्री अनिलला टिकिट मिळाले आहे

निवडणुकीत यश मिळेल का?


नियम......शष्टाचा सब 2  6  10  11 यापैकी भावाचा कार्येश असेल तर 2  6  10  11 या भावानचया कार्येश ग्रहांचया दशेत यश मिळते


निवडणूक साठी अनुकूल भाव 1  2  3  6  10  11

                      प्रतिकूल भाव  7  8  9  12  4  5

प्रश्न करत्यासाठी...शष्ट भाव  आवश्यक

प्रतिस्परध्यासाठी...द्वादश भाव आवश्यक

शष्ट भावाचा सब चंद्र आहे

चंद्र... 6 कयु
केतु...5गु 9 न श 1  3  4  मं दृ 7  2
मंगळ..7  2 श दृ 1  3  4
रवि...7  10

शष्टाचा सब चंद्र  1  2  3  6  10  अनुकूल आहे व 4  5  7 9

 भाव प्रतिकूल आहे संख्यात्मक 5 भाव अनुकूल आहेत म्हणून प्रश्न कर्ता विजयी होईल असे सांगता येते
लभाचा सब शनि आहे शनि चे कार्येशत्व....
शनि...1  3  4
शनि...1  3  4
शुक्र...8  12
राहू...11 बु 7 न चं 6

निवडणूक निकालाच्या वेळी दशा खालील प्रमाणे

केतु  मंगल  चंद्र दशा होती
केतू...
शनि...1  3  4  मं दृ 7  2
राहू...
चंद्र...6  कयु
अनकूल  1  2  3  6
प्रतिकूल  4  7

मंगळ...7  2  श दृ 1  3  4

रवि... 7  10 कयु
शुक्र...6  12
राहू...11 बु 7  न च 6
अनुकूल  1  2  3  6  10  11
प्रतिकूल  4  7  8  12
चंद्र...6 कयु
केतू... 5 गु 9
मंगल..7  12  श दृ 1  3  4
रवि...7  10
अनुकूल  1  3  6  10
प्रतिकूल  5  7  9  12

महादशा अन्तर्दशा श्री अनिल व प्रतिस्पर्धी याना अनुकूल असून सुधा केवळ शष्टाचा सब 4 पायरीवर 10 भावाचा बलवान कार्येश आहे  आणि लाभाचा सब  शनि 4 थ्या यशाच्या पायरीवर 11  6  भावांचा बलवान कार्येश आहे म्हणून श्री अनिल निवडून  आले. श्री अनिलला 667 पैकी 428 मते मिळाली व प्रतिस्परध्याला 197 मते मिळाली आतापर्यनतचा इतिहास श्री अनिल विक्रमी मतानी निवडून  आले. पुढ़ारी वृत्तपत्राने त्यांची विशेष नोंद घेऊन त्यांच्या साठी एक स्वतंत्र परिछेद छापला आहे.







         वडीलोपार्जीत मालमत्तेत हिस्सा मिळेल का?

वडिलोपार्जीत मालमत्ता ही अष्टम स्थानावरुन पाहिली जाते अष्टम भावाचा सब 4  8  11 या भावांचा कार्येश असेल तर 4 8  11 या कार्येश ग्रहांचया दशेत जमीनी मधे हिस्सा मिळतो अथवा घर मधे
काहीवेला 4 लागत नाही पण 2  दागिने  6  11 पैशाचया रुपात हिस्सा मिळतो

केपि नंबर 141  24 जून 16 वेल 18=47=35 फलटण


अष्टमचा सब रवि आहे


रविचे कार्येश त्व....


रवि...8 , 11

राहु...10 र 8  11  गु यु 10  3  6
गुरु...
शुक्र...8

अष्टमाचा सब रवि राहुचया नक्षत्रात आहे मालमत्ता शापित असावि(राहु)


                यामधे 4 भाव  लागत  नाही घर अथवा जमीन मिळणार नाही


               परंतु 6  8  11 भावामुले पैशाचया रुपात नक्की मिळेल

 मंगळ दशा चालू आहे

मंगल

गुरु....10  3  6 रहु यु 10 केतु दृ 4
रवि....8  11
राहु...10 र  8  11 गु यु 10  3  6

मंगल  शुक्र  रवि

17 औक्तोंबर 18 ते 7 नोवहे 18
या कालावधीत मिळेल

शुक्र

राहु...10  र 8  11  गु यु  10  3  6
बुध...8
मंगल....1  2  7

रवि...8  11

राहु....10 र 8  11 गु यु 10  3  6
गुरु...
शुक्र... 8
            संबंधित व्यक्तिची घर जमीन मिळून मालमत्ता 1.5 ते  2 कोटींची आहे
त्यात वाटेकरी  7 जण आहेत
प्रत्येकी कमित कमी 20-- 25 लाख मिलतील

Tuesday, 21 June 2016

           ---------- संतती केंव्हा होईल ?
                        प्रत्येक स्त्री चे एक स्वप्न असते आपला संसार सुखी असावा आपल्या भावना जपणारा जिवापाड प्रेम करणारा एक सखा असावा.  पण प्रतयेकाची स्वप्ने पूर्ण झाली असती तर दु:ख औषधाला देखील राहिले नसते. 
         पण असा सखा मिळाला तरी संसार सुखाचा होईल याचि शाश्वती देता येत नाही. 
जोपर्यंत आपल्या मुलीला एखादी संतति होत नाही तोपर्यंत आई वडीलांचि काळजी संपत नाही
                अशाच एका स्त्री चे विवाह होउन तीन वर्षे झाली होती. अद्धयाप संतति झाली नाही पण तीन गर्भपात झाले. प्रत्येक स्त्रिला वाटत असते आपल्या संसार वेलिवर एखादे फूल उमलावे. पण वेलीवर फूल उमलायचे आधीच ते गलून पडत होते.अशावेळी घरातील वयस्कर स्त्रीयामधे शंका निर्माण होते तदनंतर वैधकिय चाचण्या  सुरु होतात त्यातून संतति झालीच नाहीतर स्त्री हतबल होते, आणी सुखी संसाराची स्वप्ने हळू हळू विरळ  होउ लागतात.
शेवटचा पर्याय म्हणून ज्योतिषाकडे पाउले  वळायला  लागतात 
                               प्रश्न विचारला जातो     माझ्या नशिबात संतति सौख्य आहे का?
          अशाच एका अभागी स्त्रीने मला प्रश्न विचारला मला संतति केंवहा होईल्? मि तिचे जन्मटिपण घेतले तीची जन्म तारीख ३।४।८८ वेळ १८़१० मुम्बई
 हा प्रश्न मि  १४।६।१६ रोजी संध्याकाळी ५़=३३़=०४ वाजता  येथे ( अ १७  ५९  रे ७४  २६)सोडविला
 कृष्णमूर्ति नियम.... पंचमाचा सब २  ५  ११ या भावानचा बलवान कार्येश असेल तर २  ५  ११ भावानचया कार्येश ग्रहाचया दशेमधे संतति होते
 या पत्रीकेत पंचमाचा सब मंगळ आहे
त्यावेलेचे          एल एस आर डी
एल -मंगळ  एस -मंगळ आर -बुध  डी -मंगळ  एल एस शनि  
पंचमाचा सब मंगळ  एल एस आर डी मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे
मंगळा चे कार्येशतत्व 
मंगळ.....
रवि....७
शनी...४
केतु...१२ र  ७ न र ७

या कुंडली मधे पंचमाचा सब

मंगळ 3 व 4 पायरिला 4,7,12 य भावानचा कार्येश आहे संततिला पूर्ण विरोधी भाव  आहे

    

    हाच प्रश्न मि के पि नंबर प्रमाणे सोडविन्याचा प्रयत्न केला
तिच्या कडून 1 ते 249 या पैकि एक नंबर विचारुन घेतला
तिने 79 नंबर दिला
याप्रमाणे ह प्रश्न मि 16/6/16 रोजी सकाळी 7=17=39 वाजता फलटण येथे सोडवला----- खालिलप्रमाने
या पत्रीकेत पंचमाचा सब चंद्र  आहे
चंद्र....
राहु....2 कयु र 11 गुरु युति 2  6  9
शनि...4  7
बुध....10  12

के पि नंबर कुंडली मधे सुधा पंचमाचा सब चंद्र 3 व 4 पायरीला 4  7  10  12  या भावानचा कार्येश आहे   हे  भाव संततिला पूर्ण विरोधी   आहेत


पंचमाचा सब संबंधित घटनेला नकार देत असेल तर दशा अनतरदशा पाहण्याची आवशक्याता भसत नाही



या पत्रीकेत संतति कारक गुरु आणि प्लूटो यांच्या मधे प्रतियोग आहे (6 अंश)
                प्लूटो हा ग्रह स्फोटक विध्वंस करणारा आहे.  हया ग्रहा  बरोबर जो ग्रह असतो अथवा युति असते त्या ग्रहची फले कमी करतो अथवा नष्ट करतो

गर्भपात झाले त्यावेळी नेमके कशामुळे  झाले त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न  केला
1) पहिला  जून  2014
गुरु  बुध  गुरु   1/4/14  ते 21/7/14
**गुरु  8 कयु
   केतु  12  र  7  न र 7
   बुध
   शनि  3,5,4 कयु गु दृ 8
** बुध
    शनि  3,5,4कयु गु दृ  8
    शनि  4  कयु
    केतु  12  र  7  न  र  7
3  5  भाव असून सुधा 4,7,8,12  मुळे गर्भपात झाला

2) दूसरा  ऑक्टोम्बर 2015

गुरु  केतु  बुध  17/9/15  ते  5/11/15

गुरु बुधाचे कार्येशतत्व  वर  काढले  आहे


केतु

रवि  7
केतु
रवि  7
गुरु  केतु  बुध  पूर्णपणे प्रतिकूल

3) तीसरा गर्भपात  7/6/2016

गुरु  शुक्र  चंद्र  3/6/16  ते  23/8/16

**गुरु  8 कयु                                      शुक्र   ८,२,९                              चंद्र १,११

   केतु  12  र  7  न र 7                         रवी   ७                                    मंगळ   ४

   बुध                                                   बुध                                          शुक्र   ८,२,९

   शनि  3,5,4 कयु गु दृ 8                     शनी ३,५,४ कयू गु दृ ८              रवी   ७


अनुकूल     ५                                       २  , ५                                            २, ११
प्रतिकूल ४,७,८,१२                               ४,७,८                                          १,४,७,८

या दशेमधे 2,5,11 भाव असून सुधा  केवळ 1,4,7.8,12 मुळे गर्भपात झाला




Sunday, 12 June 2016

स्त्री  26 नोव्हेंबर 77 वेळ 9=50  स्थळ--अ 17  59  रे 74  26

पुनर्विवाह होईल का?
सप्तामाचा सब शनि आहे
L शनि  S  राहु   R  बुध    D चंद्र
सब शनि LSRD मधे आहे म्हणजे वेळ बरोबर आहे

कृ नियम ....सप्तामाचा सब द्विस्वभाव राशीत अथवा त्याचा नक्षत्र स्वामी द्विस्वभाव राशोत असेल व 2 7 11 या भावाचा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो


अथवा द्वितियाचा सब 2 8 11 चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो


शनि सिंह या स्थिर राशित असून त्याचा नक्षत्रस्वमि केतु मीन या द्विस्वभाव राशित आहे म्हणून द्वितीय विवाह होउ शकतो


शनि....

केतु...3 गुरु 6 1
राहु....
चंद्र....5

1 3 5 6 हे फारसे विवाहाला अनुकूल नाहीत

म्हणून द्वितीय विवाह करु नये कारण वैवाहिक सौख्य मिळणार नाही  कारण् शनि 1 3 6 च कार्येश आहे

फक्त मैत्रीपूर्ण सबंध ठेवता येतील (5)


तिने सांगितले माझे एका व्यक्ति बरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत .

 No Sex (6)
द्वितियाचा सब राहु आहे
प्रथम पत्नीचे मृत्यु स्थान म्हणजे द्वितीय स्थान येईल म्हणून द्वितीय स्थानावरुन द्वितीय विवाह पहावा तसेच द्वितीय स्थानापासुन सप्तम स्थान महणजे 8 स्थान येते म्हणून
द्वितियाचा सब 2,8,11 चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो.

राहुचे कारयेशत्व

 राहु....
चंद्र....5
बुध....
केतु....3 गुरु 6,1 न बुध 12

राहु 4 पयरिला 1  3  6  12 या भावानचा कारयेश

आहे म्हणून वैवाहिक सुख मिळणार नाही
 म्हणून द्वितीय विवाह करु नये


* पोलिस भरती होईल का?*

*दि 12/8/94 वेळ 7=10am अ 18  9  रे 74  35

L  चंद्र  S चंद्र  R  शुक्र  D  रवि

रविचया राशित राहु आहे लग्न नक्षत्र बुध आहे

आता राहु/ चंद्र दशा चालू आहे


* दशमाचा सब शुक्र आहे

शुक्र रूलिंग मधे आहे तसेच दशे मधिल राहु व चंद्र रूलिंग मधे आहेत
म्हणजे जन्म वेळ बरोबर आहे
दशमाचे सब  शुक्र चे कार्येशत्व....
शुक्र....
चंद्र....2
चंद्र....
मंगळ....10 , 4
कृ नियम ... दशमाचा सब 2  6  10  11 या भावंचा कार्येश असेल तर 2  6  10  11 या कार्येश ग्रहांचया दशेमधे नोकरी मिळते
* शुक्र 2  10 या भावांचा कार्येश आहे
याचा अर्थ पोलिस विभाग मधे नोकरी मिळणार हे नक्की झाले शिवाय पोलिस अथवा मिलिट्री मधे नोकरी साठी रवि अथवा मंगळ याचा संबंध असावा लागतो तसा या ठिकाणी शुक्राचया सब च्या  सब चा नक्षत्र स्वामी मंगल आहे सर्वच गोष्टी या ठिकाणी जुळून आल्या आहेत
आता नोकरी केंवहा मिळणार...
सध्या राहु मधे चंद्र दशा चालू आहे
त्यापुढील मंगळ अंतर दशा
राहु/ मंगळ/ शनि चा कालावधि...
24/2/17 ते 25/4/17  असा आहे

* राहु...

  गुरु... 3  5  8
  बुध.... 12  11 र यु 12  11
  बुध.....12  11  र यु 12  11

राहु  11 च कार्येश आहे


* मंगळ...10  4

  मंगळ....10  4
  शुक्र.....
  चंद्र.... 2

मंगळ  2 4 10 चा कार्येश आहे


* शनि...7  6

  राहु.... 3  शु  2
  शुक्र....
  चंद्र.... 2

* शनि  2  6 चा कार्येश आहे

राहु मंगल शनि दशे मधे 2  6  10  11 ची  साखळी पूर्ण झाली
* वरील कालावधि मधे म्हणजे
24/2/17 ते 25/4/17  मधे नोकरी मिळणार हे नक्की झाले

Saturday, 18 October 2014

इच्छित मुलाशी विवाह होईल का?

                                         वरील प्रश्न एका आईने आपल्या मुलीबद्धल विचारला आहे .मुलगी सुशिक्षित ,सुसंस्कृत घराण्यातील आहे . ती औरंगाबाद मध्ये नोकरी करीत आहे . तिचे एका मुलावर प्रेम आहे . मुलगा आमच्या जातीतला नाही . आमचा त्याला विरोध आहे . आम्ही उभयतांनी तिला खूप समजावून सांगितले . पण ती ऐकायला तयार नाही . ती म्हणते मी लग्न केले तर याच मुलाशी करेन . आम्हाला तिची खूप काळजी वाटते . कारण मुलगा शिकलेला आहे पण नोकरीमध्ये जास्त काळ टिकत नाही . आता सध्या त्याला नोकरी नाही . म्हणून त्यांनी मला विचारले ह्याच मुलाशी तिचे लग्न होईल का? आणि एक के पी नंबर (९१) दिला . 

                                   के पी नंबर देताना सुधा प्रश्नाच्या अनुषंगाने दिला जातो . के पी नंबर ९१ मधील ९ आकडा मुलीचे पंचम स्थान ( प्रेम प्रणय ) दाखवितो व दोघांची बेरीज केली तर १० येते म्हणजे लाभाचे व्यय स्थान व मुलीच्या सप्तमाचे व्यय स्थान म्हणजे शष्ट स्थान . प्रश्नाचा रोख बरोबर आहे . 

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का ? या प्रश्नासाठी के पी नियम -----
सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसून , स्थिर राशीत असेल व  २,७,११ या
भावाचा कार्येश असेल तर २,७,११ या भवाच्या कार्येश ग्रहाच्या दशेमध्ये विवाह होतो .

मी कॉम्पुटर वर के पी नंबर ९१ प्रमाणे कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली .
                        दि ११ / ८ / २०१४ वेळ ७=४६=५८  स्थळ अ १७,५९ रे ७४,२६ .

हि सिंह लग्नाची कुंडली आहे . आईच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ---
सिंह लग्न म्हणजे स्थिर तत्वाची कुंडली आहे . चंद्र शष्ट स्थानात व्ययेश आहे ( चिंता , काळजी ) चंद्र मंगळाच्या नक्षत्रात मंगल मुलीचा पंचमेश ( प्रेम , प्रणय ) आणि व्ययेश . मंगल मुलीच्या लाभस्थानात
 ( तृतीय स्थानात ) म्हणजे  प्रश्नाचा रोख बरोबर आहे प्रश्न मुलीसंबंधी विचारला आहे .
                                           पंचम स्थान मुलीचे लग्न स्थान होईल . पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . मुलीच्या कुंडलीत सप्तमाचा ( मूळ कुंडलीचे लाभस्थान ) सब गुरु आहे  गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

गुरु ---८ कयू
शनि ---११,३
चंद्र ---२ बु दृ ८
मंगळ ---११,१२,५
                                                   साप्तमचा सब गुरु अष्टम भावारंभी आहे . गुरु कर्क या चर राशीत आहे . गुरूचा नक्षत्रस्वामी शनि लाभात तूळ या चर राशीत आहे . गुरूचा सब चंद्र द्वितीयात कुंभ या स्थिर राशीत आहे . पण सब त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो म्हणून त्याचा नक्षत्रस्वामी मंगल  यशाच्या चौथ्या पायरीवर लाभात तूळ या चर राशीत आहे ' याठिकाणी चार राशीचे प्राबल्य आहे म्हणून ह्या मुलीचा विवाह ह्याच मुलाशी होणार नाही असे सांगितले .
                                                 पंचमाचा सब गुरु आहे . गुरु सप्तमाचा कार्येश नाही म्हणजे  प्रेमाचे रुपांतर विवाहामध्ये  होणार नाही . त्यामुळे दश अंतर्दशा पाहण्याची आवशक्यता नाही .
                                               सप्तमाचा सब गुरु २,३,५,८,१२ या  भावांचा कार्येश आहे . यामधील ३,८,१२ मुळे त्यांच्यामध्ये वादविवाद , संघर्ष होऊ शकतो  व प्रेमभंग होण्याची शक्यता जास्त आहे . मुलगीच (१२) मुळे . माघार घेईल . सबब ह्या मुलाशी लग्न होणार नाही .

                    खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडे मुलीची जन्मपत्रिका मागितली .
   जन्म तारीख ---- २२ / ८ / १९९१         जन्मवेळ ----  २३-३८          जन्मस्थळ ---- अ १९,१०  रे ७३,०५
   त्यावेळेचे एल , एस , आर , डी
                      दि    ११ / ८ / ३४                   वेळ --१०-२२-३२

                              एल --बुध  / राहू , एस ---मंगळ  , आर --शनि  ,  डी ---चंद्र

सप्तमाचा  सब मंगळ आहे एल एस आर डी मध्ये मंगळ आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
मंगळाचे कार्येशत्व ---

मंगळ ---- ५. ७
रवि ----४ बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१
राहू ----८ , ९ क यु गु ४,१२
शु क र --४,१ बु यु ४,३,६,गु यु ४,१२, र यु ४

प्रथमदर्शनी मंगळ  पहिल्या पायरीला ५,७ या भावांचा कार्येश आहे त्यामुळे प्रेमविवाह होईल असे वाटते पण दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या पायरीला मंगळ १,४,६,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे  .

तसेच पंचमाचा सब  राहू आहे --- राहू एल एस आर डी मध्ये आहे

राहूचे कार्येशत्व ----
राहू ----८,९
शुक्र ---४,१ बु यु ४,३,६गु यु ४,१२ र यु ४
शनि ---९,१०,११ चं यु ९
रवि ---४,बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१

                                       पंचमाचा सब राहू सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून प्रेमाचे रुपांतर प्रेम विवाहामध्ये होत नाही . पंचमातला मंगळ धाडसी पणा देतो . पण तो कन्या राशीमध्ये असल्यामुळे हट्टीपणा मुले , अविचारामुळे व अविवेकीपानामुळे पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते . सबब सदर मुलीने हा विवाह करू नये . कारण पंचमाचा सब राहू , सप्तमाचा सब मंगळ १,४,६,८,१२ या विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे . तसेच सप्तमेश , सप्तमाचा सब मंगळ कन्या राशीमध्ये असल्यामुळे  हा मुलगा खोटारडाआहे .  किंवा याच्याकडून फसवणूक होऊ शकते .

                        हा प्रश्न मी ११ ऑगस्ट २०१४ रोजी सोडविला , गेल्या आठवड्यात त्यांच्या शेजाऱ्याकडून कळले कि मुलगी नोकरी सोडून मुंबईला गेली आहे . ह्या दोन्घामध्ये काहीतरी बिनसले असावे असे वाटते . 

Monday, 13 October 2014

पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल काय ?

                                          सध्या निवडणुकीचे वातावरण आहे . केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे . महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत . महाराष्ट्र मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत . प्रत्येक पक्ष आप आपली ताकद आजमावत आहेत . त्यामध्ये आजी - माजी आमदार आपले नशीब आजमावत आहेत काही ठिकाणी बंडखोरी होत आहे . काही पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे . असेच एक ओळखीची व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली मी सुधा या शर्यती मध्ये आहे . मला XXX  पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल का ? मी म्हटले मनामध्ये पक्षातर्फे तिकिट मिळेल काय ? हा विचार करून , मन एकाग्र करून १ ते २४९ मधील एक संख्या सांगा . त्याने थोडा विचार करून १४९ हि संख्या सांगितली . 
        
        
        हा प्रश्न मी १८ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ०८=०७=२१ वाजता अ १७,५९ रे ७४. २६ येथे सोडविला

                                       पक्षातर्फे तिकिट म्हणजे निवडणूक लढविण्यासाठी त्या पक्षाने दिलेले एक परवानगीचे पत्र  असते . पत्राचा विचार तृतीय स्थानावरून करतात . पत्र केंव्हा येईल ? बातमी केंव्हा पेपरमध्ये छापून येईल ? बातमी खरी कि खोटी , इच्छित फोन केंव्हा येईल ? जाहिरात पेपर मध्ये केंव्हा छापून येईल ? हस्तलिखित , पुस्तकाचे प्रकाशन केंव्हा होईल ? या सर्वांचा विचार तृतीय स्थानावरून करतात . 


कृष्णमुर्ती नियम -- १) तृतीय भावाचा सब लाभाचा कार्येश असेल तर पक्षातर्फे तिकिट मिळेल . 


राजकारणामध्ये यश --- २) दशमाचा सब १,६,९,१०,११ या भावाचा कार्येश असून गुरु बुध मंगल शनि  इ . ग्रह दशमाचे कार्येश असतील तर राजकारणात यश मिळते . 


दशमाचा सब ६,१०,११ चा कार्येश असेल तर प्रगती होईल , आणि नवम (९) भावाचा कार्येश असेल तर प्रसिद्धी मिळेल . दश - अंतर्दशा संबंधित भावाच्या कार्येश असाव्यात . 


निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल का ? ----


३) लाभाचा सब लग्न  भावाचा कार्येश असेल तर निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल .

हि कुंडली वृश्चिक लग्नाची , स्थिर तत्वाची आहे ह्याचा अर्थ , आहे त्या स्थितीत बदल करू नये असे सुचित करीत आहे . 


मनातील विचार जुळतो का ते पाहू  -----


चंद्र मनाचा कारक  , चंद्र अष्टमात मिथुन राशीत , नवम भावारंभी . चंद्राची दृष्टी तृतीय स्थानारांभी .  चंद्र तृतीय स्थानाशी संबंधित आहे . म्हणजे प्रश्न बरोबर आहे . 



ह्या  कुंडली मध्ये तृतीयाचा सब शनि आहे शनीचे कार्येशत्व -----


शनि ---- 

गुरु ---- ९, २ 
बुध ----
मंगळ ----१,६ 

शनि लाभाचा कार्येश  होत नाही . म्हणजेच पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही . हे सांगता येते . 


तसेच पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होते का ते पाहू . 


लाभाचा सब केतू आहे,  केतूचे कार्येशत्व ----

केतू --- ५, गु ९,२ बुध ११
बुध ---११,राहू युती ११ के दृ ५ 
गुरु ---
बुध --११, राहू युती ११ के दृ ५ 

लाभाचा सब लग्नाचा कार्येश होत नाही म्हणजे पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होत नाही . 

पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही त्यामुळे निवडणुकीत यश मिळेल का हे पाहण्याचा प्रश्नच येत नाही . 
                                        
                                       संबंधित व्यक्तीला पक्षातर्फे तिकिट मिळाले नाही 

भविष्य काळात राजकारणात यश मिळेल का ? ते पाहू -----


दशमाचा सब राहू आहे ----


राहू --- ११, बुध बु यु ११ 

मंगळ ---१,६ 
गुरु ----
बुध ---११, राहू युती ११ के दृ ५ 

दशमाचा सब राहू १,६,११ या भावाचा बलवान कार्येश आहे  म्हणून भविष्य काळात राजकारणात यश मिळू शकेल . 





Monday, 8 September 2014

 ( आयुर्वेद )औषधोपचार चालू करावे  का?

                                     
                         एक स्त्री जातक तिच्या ११ वर्षाच्या मुलाबरोबर आली होती . तिचा मुलगा इयत्ता ६ वी मध्ये शिकत होता .   पण त्याची उंची फक्त १०० से . मी . होती.   आपण " पा " सिनेमा पाहीला असेल च . त्यामध्ये अमिताभ बच्चन चा चेहरा जसा दाखविला आहे तसाच त्याचा चेहरा दिसत होता . वयोमानानुसार त्याची उंची वाढत नव्हती . उंची वाढविण्यासाठी त्याला हार्मोन्स ची इंजेक्शन दिली जात होती ( रोज एक या प्रमाणे ) असे दोन वर्षे दिली होती हार्मोन्स मुले त्याची उंची फक्त ४" वाढली होती परंतु त्यानंतर त्याच्या उंचीमध्ये वाढ झाली नाही . हार्मोन्स मुळे एक साइड इफेक्ट निर्माण झाला तो म्हणजे त्याच्या शरीरामध्ये क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत गेले ते साधारपणे ६. ० इतके वाढले . साधारणपणे त्याचे प्रमाण ०. ५ ते १. ५ इतकेच असले पाहिजे . वाढलेले क्रियेटिनिन मुत्रावटे बाहेर पडायला पाहिजे  पण ते बाहेर पडत नव्हते . त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी झाले . इंटर नेट वर मी क्रियेटिनिन बधल मी माहिती मिळविली . क्रियेटिन हा घटक आपल्या स्नायू मध्ये असतो शरीराला उर्जा पुरविण्याचे काम क्रियेटिन करतो . उर्जा पुरवत असताना त्याचे रुपांतर क्रियेटिनिन मध्ये होत असते . हे क्रियेटिनिन मुत्रावटे बाहेर टाकले जाते . क्रियेटिनिन वाढण्याची कारणे तीन आहेत  . १) उच्च रक्तदाब   २) मधुमेह  ३) हायपर टेन्शन  म्हणून मी त्यांना साखर तपासण्यासाठी सांगितले पण रिपोर्ट  Nil  आला . उच्च दाब असण्याची शक्यता नाही  राहिले फक्त हायपर टेन्शन . हायपर टेन्शनची अनेक कारणे आहेत , त्यामध्ये नैराश्य , आळस , आत्मविश्वास कमी वगैरे .  त्याला चालताना त्रास होतो . कधीकधी चालताना तोल जातो . अशक्त पणा वाटतो . यासर्वावर उपचार म्हणून होमिओपथिकची औषधे चालू केली  होमिओपथिक औषधामुळे क्रियेटिनिन कमी झाले अंदाजे ४ . ० पण  अधून मधून ते वाढत होते . त्याच्या आईला वाटले होमिओपथिक बरोबर आयुर्वेद औषधे द्यावी . म्हणून तिने मला प्रश्न विचारला कि आयुर्वेद औषधे चालू करावी का ? 

औषधोपचार चा विचार पंचम स्थानावरून केला जातो पंचम स्थानाचा सब खालीलप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे औषधोपचार करावे 

पंचमाचा सब रवि असेल तर अलोपथि , चंद्र -होमिओपथि , बुध - आयुर्वेद , मंगळ - इलेक्ट्रिक शोक  अथवा फ़िजिओथेरपि  राहू --युनानी , केतू - मंत्रोपचार व आयुर्वेद . 
नियम --पंचमाचा सब वरील प्रमाणे असेल आणि ५,९,११ या भावांचा बलवान कार्येश असेल तर आयुर्वेद औषधे सुरु करावी 

                               त्यांना मी सांगितले मनामध्ये यासंबंधी विचार करा व मला १ ते २४९ या मधील एक 

संख्या सांगा त्यांनी त्याप्रमाणे विचार करून मला ५० हि संख्या सांगितली 
                             ५० या संख्ये मधील ५ या संख्येवरून औषधाधोपचारचा विचार केला जातो परंतु  पुढील ० 

या संख्ये वरून परिणाम शुन्य होईल असा मी विचार केला परंतु कुंडली काय म्हणते हे पाहण्यासाठी 

मी ५० या संख्ये वरून कृष्णमुर्ती प्रमाणे एक कुंडली तयार केली . हा प्रश्न मी दि . ६ सप्टेंबर २०१४ रोजी       

११=१३=५३     वाजता     अ १७,५९ रे . ७४,२६ येथे सोडविला 

प्रश्न आईने विचारला म्हणून , पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . 

हि कुंडली तूळ लग्नाची , चर तत्वाची आहे म्हणजे ११ वे स्थान बाधक स्थान होईल . 

या कुंडली मध्ये पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

शुक्र --११
केतू --६ , गु १०,३     ( केतू --मंत्रोपचार  व आयुर्वेद )
राहू -- १२, बु १२,९    ( राहू --युनानी , बुध --आयुर्वेद )
मंगळ --१,२,७         ( मंगळ --इलेक्ट्रिक शोक , फ़िजिओथेरपि )

                                               पंचमाचा सब शुक्र सिंह या स्थिर राशीत आहे म्हणजे आहे ह्यात बदल करू नये , पण सबचा नक्षत्रस्वामी केतू मीन या द्विस्वभाव राशीत आहे , नक्षत्रस्वामी बदल करावा असे सुचित करीत आहे . यापैकी काय निवडावे असा प्रश्न मला पडला .  एकूण शुक्राचे कार्येशत्व पाहता शुक्र जास्त प्रमाणात प्रतिकूल भावांचा कार्येश आहे  म्हणून मी ठरविले बदल करू नये . बदल केला तर आजार  बळावण्याची शक्यता जास्त आहे . यशाच्या चतुर्थ पायरीवर मंगल २,७ या मारक भावांचा कार्येश असून वृश्चिक या स्थिर राशीत आहे . 

          शुक्र   ११ ( बाधक ) , २,७ ( मारक ) , १२ ( हॉस्पिटल ) , ६ ( आजार , रोग ) या भावांचा बलवान कार्येश आहे . फक्त ९ या अनुकूल भावांचा बलवान कार्येश आहे . प्रतिकूल भाव जास्त आहेत म्हणून त्याचा आजार जास्त वाढेल म्हणून मी त्यांना मी सांगितले कि आयुर्वेद औषधे चालू  करू नका 

आता दशांचा विचार करू --- प्रश्न वेळी रवि महादाशेमध्ये शुक्राची अंतर दशा चालू आहे . रविचे कार्येशत्व ---

रवि --
शुक्र --११,८
राहू --१२, बु १२ , ९
मंगळ --१,२,७

शुक्राचे कार्येशत्व आपण वर पाहिलेच आहे . रवि  ११ ( बाधक ) , ८ ( अशुभ स्थान ) १२ ( हॉस्पिटल ) , २,७ 
( मारक ) , या भावांचा बलवान कार्येश आहे . म्हणजे दशा सुधा अनुकूल नाही . सबब आयुर्वेद औषधे चालू करू नयेत असे सांगितले . 

Wednesday, 27 August 2014

काळाबरोबर वेळही आली होती -----

                                          ज्योतिषाला जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विवाहाचा . जन्माच्या वेळी पत्रिका काढली जाते आणि विवाहाच्यावेळी बाहेर काढली जाते . त्या खालोखाल शिक्षण , नोकरी , घर ,वाहन , प्रेमविवाह , कर्ज , परदेशगमन . ह्या सर्व समस्याचे ज्योतिष मार्गदर्शन केले जाते . पण काही प्रश्न विचारले जात नाही उदा . मला अपघात केंव्हा  होणार आहे ? माझे आयुष्य किती आहे ? मी आजारी केंव्हा पडणार आहे ? या प्रकारच्या घटना घडल्यानंतर च त्याची कारणमीमांसा शोधली जाते . फार फार तर एखादी व्यक्ती जास्त आजारी असेल तर त्याचे  नातेवाईक प्रश्न  विचारतात . 
                    माझ्या  मित्राची मुलगी डॉक्टर आहे , तिचा पती सुधा डॉक्टर आहे -- म्हणजे होता असे म्हणावे लागेल . दोघांना दोन मुले   आहेत   ( एक मुलगी ,एक  मुलगा ) त्यांची प्रक्टिस उत्तम चालू होती . सर्व काही आनंदी आनंद होता . पण काळाला ते पाहवले नाही . एकदा एका नातेवाईकाच्या मुलीचा साखरपुडा होता म्हणून सर्वचजण गावाला नातेवाईकाकडे   गेले होते . कार्यक्रम पूर्ण व्हायला रात्रीचे ९ वाजले ९=३० वाजता घरी यायला निघाले . पती गाडी चालवत होते . साधारणपणे एका तासानंतर १०=३० ते ११=३० या दरम्यान  समोरून एक वाहन  येत होते  त्याला लाइट्स नव्हते फ़क्त दिशा दिशा दर्शक आलटून पालटून लागत होते  . त्यामुळे नक्की कोणत्या प्रकारचे वाहन आहे हे कळत नव्हते . त्यामुळे जवळ आल्यावर समोरा समोर जोरात टक्कर झाली व ड्रायव्हर ची बाजू पूर्णपणे घासत गेली . त्यामुळे तिचे पतीचे व सासऱ्याच्या बहिणीचा मृत्यू जागेवरच झाला . हि व तिची दोन्ही मुले बाहेर फेकली गेली . हि व हिचा मुलगा बेशुद्ध पडले . मुलीला थोडेसे खरचटले होते . मुलीने आरडा ओरडा करून लोकांना बोलावले . नंतर हॉस्पिटल मध्ये भरती केले . 

पतीचे निधन  कोणत्या योगामुळे झाले  त्याचे विवेचन आपण पाहणार आहोत . प्रथम अपघाताचे नियम कोणते आहेत ते पाहू . 

कृष्णमुर्ती प्रमाणे -----

१) लग्नाचा सब अष्टमाचा कार्येश असेल तर --
२) अष्टमाचा सब लग्नाचा कार्येश असेल तर --
३) लग्नाचा सब चतुर्थाशी अथवा शुक्राशी संबंधित असेल तर वाहनामुळे अपघात होतो . 
४) अष्टमाचा सब मारक बाधक व मोक्ष (४) स्थानाशी संबंध असेल तर अपघातात जीवित हानी होते . 
५) बाधक स्थानाशी संबंध येत नसेल तर जीवित हानी होत नाही 
६) लग्नाचा संबंध ४ भावाशी असेल तर अपघाताचे स्वरूप सामान्य असते . हाच सब ४,१२ या भावाशी संबंधी असेल तर हॉस्पिटल मध्ये जावे लागते . 
७) लग्नाचा सब शनि असून अष्टमाशी संबंध असेल तर उंचीवरून पडून अपघात होतो . 
८) लग्नाचा सब चंद्र असून अष्टमाशी संबंध असेल तर पाण्यात बुडून अपघात होतो 
९) शनि मंगळ यांची अंशात्मक युती असेल तर--
१०) शनि , शाष्टेश ,अष्टमेश व चतुर्थेश यांच्या युतीत असेल तर किंवा शनीची त्यांच्या स्वामीवर दृष्टी असेल तर अपघात होतो . 
११) लग्न  / अष्टम भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशा अंतर्दशे मध्ये अपघात घडतात . 
१२) असे प्रश्न सोडवताना आयुष्य योग पाहावा . लग्नाचा सब १,५,९ भावांचा कार्येश असेल तर दीर्घायू , ( वय वर्षे ६६ च्या पुढे )सब ६,८,१२ भावांचा कार्येश असेल तर अल्पायू ( वय वर्षे ३३ च्या आत ) व १,५,९ / ६,८,१२ भावांचा कार्येश असेल तर मध्यायू  ( वय वर्षे ३३ ते ६६ )

पुरुष जातक ---

जन्मतारीख १४ / ११ / १९६३                    जन्म वेळ -- २=१७=२१           जन्मस्थळ ---सोलापूर 

अपघाताची तारीख ---२३ / ६ / २०००       वेळ --रात्री  १०=३०  ते ११=३० 


१) लग्नाचा सब रवि आहे . रविचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

                         रवि ---३,१,श दृ ५,६
न . स्वामी          गुरु ---७,८
      सब              शुक्र --
स . न . स्वामी     बुध---३,११
लग्नाचा सब १,५ / ६,८  भावांचा  कार्येश आहे म्हणून जातक मध्यायू   ( वय वर्षे ३३ ते ६६ ) लग्नाचा सबचा सब शुक्र आहे . 

२) अष्टमाचा सब गुरु आहे . गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

                        गुरु ---
न . स्वामी         बुध --३,११
      सब            बुध ---
स . न . स्वामी  गुरु ---७,८

अष्टमाचा सब चा चतुर्थाशी अथवा शुक्राशी संबंध दिसून येत नाही . पत्रिका निट पहिली तर एक गोष्ट लक्षात येईल ,गुरूची नववी दृष्टी मंगळावर आहे . त्यामुळे मंगळाचे कार्येशत्व गुरूला प्राप्त होईल . मंगळ चतुर्थारंभी
 ( ६ अंश )आणि नवमेश आहे . शिवाय मंगळ शुक्र युती आहे . त्यामुळे गुरूला ४,९ या भावांचे कार्येशत्व मिळेल . गुरु १, ३,४,७,८,९,११ या भावांचा बलवान कार्येश आहे . गुरु ची दृष्टी लग्नावर आहे . भावारंभी नाही . अष्टम भावाचा चातुर्थाशी व शुक्राशी संबंध येतो . म्हणून वाहन अपघात झाला . कुंडली सिंह लग्नाची स्थिर तत्वाची आहे . स्थिर लग्नाला नवम भाव बाधक आहे . 
३ ( प्रवास ) , ४ ( वाहन , मोक्ष ), ७ (मारक ), ९ ( बाधक ) ,८ ( मृत्यू ) ज्यावेळी अष्टम भावाचा संबंध चतुर्थ , मारक ,बाधक भावांशी येतो त्यावेळी व्यक्ती वाचण्याची शक्यता नसते .

ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी जातकाची गुरु / राहू  / चंद्र  / गुरु  /शनि दशा चालू होती . 

                         गुरु ---                                                           राहू --१०,बु ३,११ मं दृ ३,९       
न . स्वामी         बुध --३,११                                                      गुरु --७,८                              
      सब             बुध ---                                                            गुरु ---                                   
स . न . स्वामी   गुरु ---७,८                                                     बुध ---३,११                            

       

              चंद्र --२,१२                                                           शनि --५,६ कयू 
              मंगळ --३,९,शु यु ३                                              मंगळ --३,९,शु यु ३
               बुध --                                                                 मंगळ --
               गुरु --७,८                                                           बुध ---३,११


               ( २,३,७,८,९,१२ )                                                   ( ३,६,९,११ )
मृत्यू चा कारक शनि ,मृत्युच्या वेळी उपस्थित आहे चतुर्थाचा सब गुरूच आहे तो अष्टम भावाचा बलवान कार्येश आहे . अष्टमाचा सब गुरु ची मंगळावर दृष्टी , मंगळ चतुर्थ भावारंभी ( ६ अंश ) चतुर्थ व अष्टमाचा संबंध म्हणून वाहन अपघात जातकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे त्यामुळे हॉस्पिटल मध्ये नेण्याची वेळ आली  नाही . 

Thursday, 31 July 2014

कुर्यात सदा मंगलम 

                                         माझ्या भावाचा मित्र एकदा मंडइत भेटला व म्हणाला माझ्या मुलीचे लग्नासाठी प्रयत्न चालू आहेत पण अध्याप कुठे जुळत नाही . मी म्हटले तिची जन्मतारीख जन्मवेळ दे . त्याने घरी फोन करून मला तिची जन्मतारीख जन्मवेळ व जन्मस्थळ दिले . मी ते लिहून घेतले . त्यानंतर बरेच दिवस त्याची गाठ पडली नाही . मी चौकशी केली तेंव्हा  कळले कि त्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे . त्याला मधुमेह होता . पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती . ती बरेच दिवस होती . त्यानंतर पायाला गंगारिंग झाले . त्यातच बायपास सर्जरी झाली . दोन दिवस  पुण्याला हौस्पितल मध्ये admit होता . शेवटी सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले .  हि गोष्ट माझ्या मनाला फार लागली . त्यानंतर मी त्याच्या घरी फोन केला . व त्याच्या पत्नीला सांगितले दोन महिन्यापूर्वी त्याची माझी भेट झाली होती त्यावेळी तुमच्या मुलीच्या लग्नासंबंधी चर्चा करत होतो  पण अचानक असे घडलेले मला माहित नव्हते त्यामुळे  मी संपर्क साधू शकलो नाही . त्यावेळी त्या म्हणाल्या मी तुमच्या घरी येते . मी म्हटले ठीक आहे,  या.    
                                         एके दिवशी त्या मुलीला घेऊन घरी आल्या व म्हणाल्या या मुलीचा लग्नाचा योग केंव्हा आहे ? माझ्याकडे मुलीच्या जन्माचे टिपण होते . त्यावरून मी कृष्णमुर्ती प्रमणे कुंडली  तयार केली . तसेच मुलीकडून एक केपी नंबर घेतला व दोन्ही पत्रिकेचा आभ्यास करून त्यांना सांगितले ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ या कालावधीत लग्न होईल . आणि त्याच कालावधीत लग्न झाले . माझे उत्तर बरोबर आले.  कसे  ते खालीलप्रमाणे 
हा प्रश्न  दि . २३ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडविला . 
स्त्री जातक  जन्मतारीख --२२ जून १९८७ जन्मवेळ --सकाळी ९-१४ जन्मस्थळ -सातारा 
या कुंडलीत सप्तमाचा सब बुध आहे . बुधाचे कार्येशत्व ---
बुध --१२ कयु 
गुरु -- ९,६
शनि --५ क्यू 
बुध ---१२,३,१२ कयू   मं यु १२

 कृष्णमुर्ती नियम ---सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर २,७,११, / ५., ८ या भावांच्या  सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो . 

बुध ३,५ या पूरक भावांचा कार्येश आहे . म्हणजे लग्न होणार  नक्की . आता केंव्हा होणार ह्यासाठी आपणाला 
दश - अंतर दशा पाहाव्या लागतील . प्रश्न्वेळी मंगळाची महादशा ,गुरु अंतर दशा ,  होती . 
मंगळ  / गुरु दशा ११ / ८ /२०१३ ते १८ / ७ / २०१४ पर्यंत आहे  

मंगल --                             गुरु ---                                 केतू ---३ क यु                      शुक्र ---११
गुरु --९,६                            केतू ---२,३ क यु बु १२,३       चंद्र ---१०,१                           चंद्र ---१०
शुक्र --११ क यु                    शुक्र ---११ क यु                    राहू ---८,९ क यु गु ९,६          केतू ---३ क यु 
चंद्र ---१०,१ , १० क यु          चंद्र ---१०                             शनि ---५,७  शु दृ १०,४         चंद्र ---१०,१ 

 रवि ---११                                                                    चंद्र ---१० क यु 
मंगळ ---१२, बु यु १२                                                    शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७
चंद्र ----१०                                                                     गुरु ---
शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७                                      केतू ---२,३ क यु बु १२ ,३ 

मंगल महादशा  (११ ) गुरु अंतर्दशा  (२,११ ) या  भावांची बलवान कार्येश आहे . २,७,११ या भावांची साखळी पूर्ण  होण्यासाठी विदशा  अशी शोधावी  लागेल ती म्हणजे ७ या भावांची कार्येश असेल .  वरील ग्रहांचे कार्येश पाहता फक्त रवि ,चंद्र, केतू  ७ या भावाची कार्येश आहे . यामध्ये चंद्र २,७,११ या तिन्ही भावांची कार्येश आहे .   म्हणून मी चंद्र विदश निवडली . मंगळ / गुरु  / चंद्र ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ हा कालावधी आहे  
९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४  याच कालावधीत विवाह होईल . 
                                       ह्या मुलीचा विवाह २४ एप्रिल २०१४ रोजी झाला आहे . 

हाच  प्रश्न मी केपी नंबर ११५ ने  सोडविला 

केपी नंबर ११५ वरून मी  कृष्णमुर्ती पद्धतीने  तयार केली . 
दि . २३ / ११ / २०१३ वेळ -१५-५३-२२    स्थळ -- अ १७,५९  रे ७४,२६

या कुंडलीत सप्तमाचा सब  राहू आहे . 

राहू -- १,२ क यु शु दृ ४,९
राहू --- १,२ क यु शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१०, शु दृ ४,९

सप्तमाचा  सब २ या प्रमुख भावाचा व ९ या पूरक भावाचा कार्येश  आहे राहू केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी त्यावेळी ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने  देतात . विवाह केंव्हा केंव्हा होईल   त्या साठी  दशा अंतर दशा पाहू . प्रश्न वेळी शनि महादशा व चंद्राची अंतर्दशा  चालू होती. शनि व चंद्र ची कार्येशत्व खालीलप्रमाणे 

                           शनि ---                                            चंद्र ---१०,११  क यु 
                           गुरु ---१०,शु दृ ४,९                            शनि --२,५,६ बु यु २
                           शनि --                                             चंद्र ---१०,११ क यु 
                           गुरु ---१० शु दृ ४,९                            शनि -- २,५,६ बु यु २
अनुकूल भाव                 ( ९ )                                                 ( २,५,११ )

शनि महादशा ( ९) चंद्र अंतर्दशा   ( २ , ५ , ११ )या  भावाची बलवान कार्येश आहे . पुढील विदशा खालीलप्रमाणे 

शनि / चंद्र  / राहू   २८ / १० /२०१३ ते  २३ / १ / २०१४   पर्यंत 
                   गुरु                               १० / ४ /२०१४
                  शनि                              १० / ७ /२०१४

गुरु --१० शु दृ ४,९ 
गुरु --१० शु दृ ४,९
केतू --७,८ क यु मं १२,३,८
केतू --७,८ क यु मं १२,३,८

गुरु ३,७,८ या   भाव बलवान कार्येश आहे . या ठिकाणी २, ७ , ११ / ५ , ८ भावांची साखळी  पूर्ण होते . म्हणून शनि महादशा चंद्र अंतर्दशा व गुरु विदशा म्हणजे २३ / १ /२०१४ ते १० / ४ /२०१४ या कालावधीत विवाह व्हावयास हवा . 
ह्या मुलीचा सुपारी व साखरपुडा ४ फेब्रुवारी २०१४ ला झाला . विवाह २४ / ४ /२०१४ रोजी झाला