Saturday, 18 October 2014

इच्छित मुलाशी विवाह होईल का?

                                         वरील प्रश्न एका आईने आपल्या मुलीबद्धल विचारला आहे .मुलगी सुशिक्षित ,सुसंस्कृत घराण्यातील आहे . ती औरंगाबाद मध्ये नोकरी करीत आहे . तिचे एका मुलावर प्रेम आहे . मुलगा आमच्या जातीतला नाही . आमचा त्याला विरोध आहे . आम्ही उभयतांनी तिला खूप समजावून सांगितले . पण ती ऐकायला तयार नाही . ती म्हणते मी लग्न केले तर याच मुलाशी करेन . आम्हाला तिची खूप काळजी वाटते . कारण मुलगा शिकलेला आहे पण नोकरीमध्ये जास्त काळ टिकत नाही . आता सध्या त्याला नोकरी नाही . म्हणून त्यांनी मला विचारले ह्याच मुलाशी तिचे लग्न होईल का? आणि एक के पी नंबर (९१) दिला . 

                                   के पी नंबर देताना सुधा प्रश्नाच्या अनुषंगाने दिला जातो . के पी नंबर ९१ मधील ९ आकडा मुलीचे पंचम स्थान ( प्रेम प्रणय ) दाखवितो व दोघांची बेरीज केली तर १० येते म्हणजे लाभाचे व्यय स्थान व मुलीच्या सप्तमाचे व्यय स्थान म्हणजे शष्ट स्थान . प्रश्नाचा रोख बरोबर आहे . 

इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का ? या प्रश्नासाठी के पी नियम -----
सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसून , स्थिर राशीत असेल व  २,७,११ या
भावाचा कार्येश असेल तर २,७,११ या भवाच्या कार्येश ग्रहाच्या दशेमध्ये विवाह होतो .

मी कॉम्पुटर वर के पी नंबर ९१ प्रमाणे कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली .
                        दि ११ / ८ / २०१४ वेळ ७=४६=५८  स्थळ अ १७,५९ रे ७४,२६ .

हि सिंह लग्नाची कुंडली आहे . आईच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू ---
सिंह लग्न म्हणजे स्थिर तत्वाची कुंडली आहे . चंद्र शष्ट स्थानात व्ययेश आहे ( चिंता , काळजी ) चंद्र मंगळाच्या नक्षत्रात मंगल मुलीचा पंचमेश ( प्रेम , प्रणय ) आणि व्ययेश . मंगल मुलीच्या लाभस्थानात
 ( तृतीय स्थानात ) म्हणजे  प्रश्नाचा रोख बरोबर आहे प्रश्न मुलीसंबंधी विचारला आहे .
                                           पंचम स्थान मुलीचे लग्न स्थान होईल . पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . मुलीच्या कुंडलीत सप्तमाचा ( मूळ कुंडलीचे लाभस्थान ) सब गुरु आहे  गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

गुरु ---८ कयू
शनि ---११,३
चंद्र ---२ बु दृ ८
मंगळ ---११,१२,५
                                                   साप्तमचा सब गुरु अष्टम भावारंभी आहे . गुरु कर्क या चर राशीत आहे . गुरूचा नक्षत्रस्वामी शनि लाभात तूळ या चर राशीत आहे . गुरूचा सब चंद्र द्वितीयात कुंभ या स्थिर राशीत आहे . पण सब त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो म्हणून त्याचा नक्षत्रस्वामी मंगल  यशाच्या चौथ्या पायरीवर लाभात तूळ या चर राशीत आहे ' याठिकाणी चार राशीचे प्राबल्य आहे म्हणून ह्या मुलीचा विवाह ह्याच मुलाशी होणार नाही असे सांगितले .
                                                 पंचमाचा सब गुरु आहे . गुरु सप्तमाचा कार्येश नाही म्हणजे  प्रेमाचे रुपांतर विवाहामध्ये  होणार नाही . त्यामुळे दश अंतर्दशा पाहण्याची आवशक्यता नाही .
                                               सप्तमाचा सब गुरु २,३,५,८,१२ या  भावांचा कार्येश आहे . यामधील ३,८,१२ मुळे त्यांच्यामध्ये वादविवाद , संघर्ष होऊ शकतो  व प्रेमभंग होण्याची शक्यता जास्त आहे . मुलगीच (१२) मुळे . माघार घेईल . सबब ह्या मुलाशी लग्न होणार नाही .

                    खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडे मुलीची जन्मपत्रिका मागितली .
   जन्म तारीख ---- २२ / ८ / १९९१         जन्मवेळ ----  २३-३८          जन्मस्थळ ---- अ १९,१०  रे ७३,०५
   त्यावेळेचे एल , एस , आर , डी
                      दि    ११ / ८ / ३४                   वेळ --१०-२२-३२

                              एल --बुध  / राहू , एस ---मंगळ  , आर --शनि  ,  डी ---चंद्र

सप्तमाचा  सब मंगळ आहे एल एस आर डी मध्ये मंगळ आहे म्हणजे जन्मवेळ बरोबर आहे .
मंगळाचे कार्येशत्व ---

मंगळ ---- ५. ७
रवि ----४ बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१
राहू ----८ , ९ क यु गु ४,१२
शु क र --४,१ बु यु ४,३,६,गु यु ४,१२, र यु ४

प्रथमदर्शनी मंगळ  पहिल्या पायरीला ५,७ या भावांचा कार्येश आहे त्यामुळे प्रेमविवाह होईल असे वाटते पण दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या पायरीला मंगळ १,४,६,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे  .

तसेच पंचमाचा सब  राहू आहे --- राहू एल एस आर डी मध्ये आहे

राहूचे कार्येशत्व ----
राहू ----८,९
शुक्र ---४,१ बु यु ४,३,६गु यु ४,१२ र यु ४
शनि ---९,१०,११ चं यु ९
रवि ---४,बु यु ४,३,६ गु यु ४,१२ शु यु ४,१

                                       पंचमाचा सब राहू सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून प्रेमाचे रुपांतर प्रेम विवाहामध्ये होत नाही . पंचमातला मंगळ धाडसी पणा देतो . पण तो कन्या राशीमध्ये असल्यामुळे हट्टीपणा मुले , अविचारामुळे व अविवेकीपानामुळे पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते . सबब सदर मुलीने हा विवाह करू नये . कारण पंचमाचा सब राहू , सप्तमाचा सब मंगळ १,४,६,८,१२ या विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे . तसेच सप्तमेश , सप्तमाचा सब मंगळ कन्या राशीमध्ये असल्यामुळे  हा मुलगा खोटारडाआहे .  किंवा याच्याकडून फसवणूक होऊ शकते .

                        हा प्रश्न मी ११ ऑगस्ट २०१४ रोजी सोडविला , गेल्या आठवड्यात त्यांच्या शेजाऱ्याकडून कळले कि मुलगी नोकरी सोडून मुंबईला गेली आहे . ह्या दोन्घामध्ये काहीतरी बिनसले असावे असे वाटते . 

No comments:

Post a Comment