Wednesday, 27 August 2014

काळाबरोबर वेळही आली होती -----

                                          ज्योतिषाला जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विवाहाचा . जन्माच्या वेळी पत्रिका काढली जाते आणि विवाहाच्यावेळी बाहेर काढली जाते . त्या खालोखाल शिक्षण , नोकरी , घर ,वाहन , प्रेमविवाह , कर्ज , परदेशगमन . ह्या सर्व समस्याचे ज्योतिष मार्गदर्शन केले जाते . पण काही प्रश्न विचारले जात नाही उदा . मला अपघात केंव्हा  होणार आहे ? माझे आयुष्य किती आहे ? मी आजारी केंव्हा पडणार आहे ? या प्रकारच्या घटना घडल्यानंतर च त्याची कारणमीमांसा शोधली जाते . फार फार तर एखादी व्यक्ती जास्त आजारी असेल तर त्याचे  नातेवाईक प्रश्न  विचारतात . 
                    माझ्या  मित्राची मुलगी डॉक्टर आहे , तिचा पती सुधा डॉक्टर आहे -- म्हणजे होता असे म्हणावे लागेल . दोघांना दोन मुले   आहेत   ( एक मुलगी ,एक  मुलगा ) त्यांची प्रक्टिस उत्तम चालू होती . सर्व काही आनंदी आनंद होता . पण काळाला ते पाहवले नाही . एकदा एका नातेवाईकाच्या मुलीचा साखरपुडा होता म्हणून सर्वचजण गावाला नातेवाईकाकडे   गेले होते . कार्यक्रम पूर्ण व्हायला रात्रीचे ९ वाजले ९=३० वाजता घरी यायला निघाले . पती गाडी चालवत होते . साधारणपणे एका तासानंतर १०=३० ते ११=३० या दरम्यान  समोरून एक वाहन  येत होते  त्याला लाइट्स नव्हते फ़क्त दिशा दिशा दर्शक आलटून पालटून लागत होते  . त्यामुळे नक्की कोणत्या प्रकारचे वाहन आहे हे कळत नव्हते . त्यामुळे जवळ आल्यावर समोरा समोर जोरात टक्कर झाली व ड्रायव्हर ची बाजू पूर्णपणे घासत गेली . त्यामुळे तिचे पतीचे व सासऱ्याच्या बहिणीचा मृत्यू जागेवरच झाला . हि व तिची दोन्ही मुले बाहेर फेकली गेली . हि व हिचा मुलगा बेशुद्ध पडले . मुलीला थोडेसे खरचटले होते . मुलीने आरडा ओरडा करून लोकांना बोलावले . नंतर हॉस्पिटल मध्ये भरती केले . 

पतीचे निधन  कोणत्या योगामुळे झाले  त्याचे विवेचन आपण पाहणार आहोत . प्रथम अपघाताचे नियम कोणते आहेत ते पाहू . 

कृष्णमुर्ती प्रमाणे -----

१) लग्नाचा सब अष्टमाचा कार्येश असेल तर --
२) अष्टमाचा सब लग्नाचा कार्येश असेल तर --
३) लग्नाचा सब चतुर्थाशी अथवा शुक्राशी संबंधित असेल तर वाहनामुळे अपघात होतो . 
४) अष्टमाचा सब मारक बाधक व मोक्ष (४) स्थानाशी संबंध असेल तर अपघातात जीवित हानी होते . 
५) बाधक स्थानाशी संबंध येत नसेल तर जीवित हानी होत नाही 
६) लग्नाचा संबंध ४ भावाशी असेल तर अपघाताचे स्वरूप सामान्य असते . हाच सब ४,१२ या भावाशी संबंधी असेल तर हॉस्पिटल मध्ये जावे लागते . 
७) लग्नाचा सब शनि असून अष्टमाशी संबंध असेल तर उंचीवरून पडून अपघात होतो . 
८) लग्नाचा सब चंद्र असून अष्टमाशी संबंध असेल तर पाण्यात बुडून अपघात होतो 
९) शनि मंगळ यांची अंशात्मक युती असेल तर--
१०) शनि , शाष्टेश ,अष्टमेश व चतुर्थेश यांच्या युतीत असेल तर किंवा शनीची त्यांच्या स्वामीवर दृष्टी असेल तर अपघात होतो . 
११) लग्न  / अष्टम भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशा अंतर्दशे मध्ये अपघात घडतात . 
१२) असे प्रश्न सोडवताना आयुष्य योग पाहावा . लग्नाचा सब १,५,९ भावांचा कार्येश असेल तर दीर्घायू , ( वय वर्षे ६६ च्या पुढे )सब ६,८,१२ भावांचा कार्येश असेल तर अल्पायू ( वय वर्षे ३३ च्या आत ) व १,५,९ / ६,८,१२ भावांचा कार्येश असेल तर मध्यायू  ( वय वर्षे ३३ ते ६६ )

पुरुष जातक ---

जन्मतारीख १४ / ११ / १९६३                    जन्म वेळ -- २=१७=२१           जन्मस्थळ ---सोलापूर 

अपघाताची तारीख ---२३ / ६ / २०००       वेळ --रात्री  १०=३०  ते ११=३० 


१) लग्नाचा सब रवि आहे . रविचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

                         रवि ---३,१,श दृ ५,६
न . स्वामी          गुरु ---७,८
      सब              शुक्र --
स . न . स्वामी     बुध---३,११
लग्नाचा सब १,५ / ६,८  भावांचा  कार्येश आहे म्हणून जातक मध्यायू   ( वय वर्षे ३३ ते ६६ ) लग्नाचा सबचा सब शुक्र आहे . 

२) अष्टमाचा सब गुरु आहे . गुरु चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

                        गुरु ---
न . स्वामी         बुध --३,११
      सब            बुध ---
स . न . स्वामी  गुरु ---७,८

अष्टमाचा सब चा चतुर्थाशी अथवा शुक्राशी संबंध दिसून येत नाही . पत्रिका निट पहिली तर एक गोष्ट लक्षात येईल ,गुरूची नववी दृष्टी मंगळावर आहे . त्यामुळे मंगळाचे कार्येशत्व गुरूला प्राप्त होईल . मंगळ चतुर्थारंभी
 ( ६ अंश )आणि नवमेश आहे . शिवाय मंगळ शुक्र युती आहे . त्यामुळे गुरूला ४,९ या भावांचे कार्येशत्व मिळेल . गुरु १, ३,४,७,८,९,११ या भावांचा बलवान कार्येश आहे . गुरु ची दृष्टी लग्नावर आहे . भावारंभी नाही . अष्टम भावाचा चातुर्थाशी व शुक्राशी संबंध येतो . म्हणून वाहन अपघात झाला . कुंडली सिंह लग्नाची स्थिर तत्वाची आहे . स्थिर लग्नाला नवम भाव बाधक आहे . 
३ ( प्रवास ) , ४ ( वाहन , मोक्ष ), ७ (मारक ), ९ ( बाधक ) ,८ ( मृत्यू ) ज्यावेळी अष्टम भावाचा संबंध चतुर्थ , मारक ,बाधक भावांशी येतो त्यावेळी व्यक्ती वाचण्याची शक्यता नसते .

ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी जातकाची गुरु / राहू  / चंद्र  / गुरु  /शनि दशा चालू होती . 

                         गुरु ---                                                           राहू --१०,बु ३,११ मं दृ ३,९       
न . स्वामी         बुध --३,११                                                      गुरु --७,८                              
      सब             बुध ---                                                            गुरु ---                                   
स . न . स्वामी   गुरु ---७,८                                                     बुध ---३,११                            

       

              चंद्र --२,१२                                                           शनि --५,६ कयू 
              मंगळ --३,९,शु यु ३                                              मंगळ --३,९,शु यु ३
               बुध --                                                                 मंगळ --
               गुरु --७,८                                                           बुध ---३,११


               ( २,३,७,८,९,१२ )                                                   ( ३,६,९,११ )
मृत्यू चा कारक शनि ,मृत्युच्या वेळी उपस्थित आहे चतुर्थाचा सब गुरूच आहे तो अष्टम भावाचा बलवान कार्येश आहे . अष्टमाचा सब गुरु ची मंगळावर दृष्टी , मंगळ चतुर्थ भावारंभी ( ६ अंश ) चतुर्थ व अष्टमाचा संबंध म्हणून वाहन अपघात जातकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे त्यामुळे हॉस्पिटल मध्ये नेण्याची वेळ आली  नाही . 

No comments:

Post a Comment