Monday, 13 October 2014

पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल काय ?

                                          सध्या निवडणुकीचे वातावरण आहे . केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे . महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत . महाराष्ट्र मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत . प्रत्येक पक्ष आप आपली ताकद आजमावत आहेत . त्यामध्ये आजी - माजी आमदार आपले नशीब आजमावत आहेत काही ठिकाणी बंडखोरी होत आहे . काही पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे . असेच एक ओळखीची व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली मी सुधा या शर्यती मध्ये आहे . मला XXX  पक्षातर्फे निवडणुकीचे तिकिट मिळेल का ? मी म्हटले मनामध्ये पक्षातर्फे तिकिट मिळेल काय ? हा विचार करून , मन एकाग्र करून १ ते २४९ मधील एक संख्या सांगा . त्याने थोडा विचार करून १४९ हि संख्या सांगितली . 
        
        
        हा प्रश्न मी १८ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ०८=०७=२१ वाजता अ १७,५९ रे ७४. २६ येथे सोडविला

                                       पक्षातर्फे तिकिट म्हणजे निवडणूक लढविण्यासाठी त्या पक्षाने दिलेले एक परवानगीचे पत्र  असते . पत्राचा विचार तृतीय स्थानावरून करतात . पत्र केंव्हा येईल ? बातमी केंव्हा पेपरमध्ये छापून येईल ? बातमी खरी कि खोटी , इच्छित फोन केंव्हा येईल ? जाहिरात पेपर मध्ये केंव्हा छापून येईल ? हस्तलिखित , पुस्तकाचे प्रकाशन केंव्हा होईल ? या सर्वांचा विचार तृतीय स्थानावरून करतात . 


कृष्णमुर्ती नियम -- १) तृतीय भावाचा सब लाभाचा कार्येश असेल तर पक्षातर्फे तिकिट मिळेल . 


राजकारणामध्ये यश --- २) दशमाचा सब १,६,९,१०,११ या भावाचा कार्येश असून गुरु बुध मंगल शनि  इ . ग्रह दशमाचे कार्येश असतील तर राजकारणात यश मिळते . 


दशमाचा सब ६,१०,११ चा कार्येश असेल तर प्रगती होईल , आणि नवम (९) भावाचा कार्येश असेल तर प्रसिद्धी मिळेल . दश - अंतर्दशा संबंधित भावाच्या कार्येश असाव्यात . 


निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल का ? ----


३) लाभाचा सब लग्न  भावाचा कार्येश असेल तर निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होईल .

हि कुंडली वृश्चिक लग्नाची , स्थिर तत्वाची आहे ह्याचा अर्थ , आहे त्या स्थितीत बदल करू नये असे सुचित करीत आहे . 


मनातील विचार जुळतो का ते पाहू  -----


चंद्र मनाचा कारक  , चंद्र अष्टमात मिथुन राशीत , नवम भावारंभी . चंद्राची दृष्टी तृतीय स्थानारांभी .  चंद्र तृतीय स्थानाशी संबंधित आहे . म्हणजे प्रश्न बरोबर आहे . ह्या  कुंडली मध्ये तृतीयाचा सब शनि आहे शनीचे कार्येशत्व -----


शनि ---- 

गुरु ---- ९, २ 
बुध ----
मंगळ ----१,६ 

शनि लाभाचा कार्येश  होत नाही . म्हणजेच पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही . हे सांगता येते . 


तसेच पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होते का ते पाहू . 


लाभाचा सब केतू आहे,  केतूचे कार्येशत्व ----

केतू --- ५, गु ९,२ बुध ११
बुध ---११,राहू युती ११ के दृ ५ 
गुरु ---
बुध --११, राहू युती ११ के दृ ५ 

लाभाचा सब लग्नाचा कार्येश होत नाही म्हणजे पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होत नाही . 

पक्षातर्फे तिकिट मिळणार नाही त्यामुळे निवडणुकीत यश मिळेल का हे पाहण्याचा प्रश्नच येत नाही . 
                                        
                                       संबंधित व्यक्तीला पक्षातर्फे तिकिट मिळाले नाही 

भविष्य काळात राजकारणात यश मिळेल का ? ते पाहू -----


दशमाचा सब राहू आहे ----


राहू --- ११, बुध बु यु ११ 

मंगळ ---१,६ 
गुरु ----
बुध ---११, राहू युती ११ के दृ ५ 

दशमाचा सब राहू १,६,११ या भावाचा बलवान कार्येश आहे  म्हणून भविष्य काळात राजकारणात यश मिळू शकेल . 

3 comments:

 1. Good to see new post & totally on different topic as proven example.

  Regards,
  Santosh Susveerkar

  ReplyDelete
 2. Good eve Prof. Korade sir,
  thanks a lot for your sharing the knowledge about KP astrology.
  whatever have you given, especially the cases you shared shows your keen observation, deep study and vast knowledge, it is very useful for the beginners and the professionals too as they have explained in detail manner.
  Please continue sharing so that all the students get more knowledge.
  Thanks a lot and Pranaam.

  ReplyDelete
 3. नमस्कार, सविस्तर चर्चा व परखड विचार, तसेच व्यावहारिक पणे मांडलेली विचारधारा व सुख समाधान मिळणे हे प्रत्येकाचं अपेक्षित फळ आपापल्या कर्मा प्रमाणे असतेच ह्याचा उल्लेख हे आपले विचार ऐकून आनंद झाला

  ReplyDelete