Monday, 8 September 2014

 ( आयुर्वेद )औषधोपचार चालू करावे  का?

                                     
                         एक स्त्री जातक तिच्या ११ वर्षाच्या मुलाबरोबर आली होती . तिचा मुलगा इयत्ता ६ वी मध्ये शिकत होता .   पण त्याची उंची फक्त १०० से . मी . होती.   आपण " पा " सिनेमा पाहीला असेल च . त्यामध्ये अमिताभ बच्चन चा चेहरा जसा दाखविला आहे तसाच त्याचा चेहरा दिसत होता . वयोमानानुसार त्याची उंची वाढत नव्हती . उंची वाढविण्यासाठी त्याला हार्मोन्स ची इंजेक्शन दिली जात होती ( रोज एक या प्रमाणे ) असे दोन वर्षे दिली होती हार्मोन्स मुले त्याची उंची फक्त ४" वाढली होती परंतु त्यानंतर त्याच्या उंचीमध्ये वाढ झाली नाही . हार्मोन्स मुळे एक साइड इफेक्ट निर्माण झाला तो म्हणजे त्याच्या शरीरामध्ये क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत गेले ते साधारपणे ६. ० इतके वाढले . साधारणपणे त्याचे प्रमाण ०. ५ ते १. ५ इतकेच असले पाहिजे . वाढलेले क्रियेटिनिन मुत्रावटे बाहेर पडायला पाहिजे  पण ते बाहेर पडत नव्हते . त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी झाले . इंटर नेट वर मी क्रियेटिनिन बधल मी माहिती मिळविली . क्रियेटिन हा घटक आपल्या स्नायू मध्ये असतो शरीराला उर्जा पुरविण्याचे काम क्रियेटिन करतो . उर्जा पुरवत असताना त्याचे रुपांतर क्रियेटिनिन मध्ये होत असते . हे क्रियेटिनिन मुत्रावटे बाहेर टाकले जाते . क्रियेटिनिन वाढण्याची कारणे तीन आहेत  . १) उच्च रक्तदाब   २) मधुमेह  ३) हायपर टेन्शन  म्हणून मी त्यांना साखर तपासण्यासाठी सांगितले पण रिपोर्ट  Nil  आला . उच्च दाब असण्याची शक्यता नाही  राहिले फक्त हायपर टेन्शन . हायपर टेन्शनची अनेक कारणे आहेत , त्यामध्ये नैराश्य , आळस , आत्मविश्वास कमी वगैरे .  त्याला चालताना त्रास होतो . कधीकधी चालताना तोल जातो . अशक्त पणा वाटतो . यासर्वावर उपचार म्हणून होमिओपथिकची औषधे चालू केली  होमिओपथिक औषधामुळे क्रियेटिनिन कमी झाले अंदाजे ४ . ० पण  अधून मधून ते वाढत होते . त्याच्या आईला वाटले होमिओपथिक बरोबर आयुर्वेद औषधे द्यावी . म्हणून तिने मला प्रश्न विचारला कि आयुर्वेद औषधे चालू करावी का ? 

औषधोपचार चा विचार पंचम स्थानावरून केला जातो पंचम स्थानाचा सब खालीलप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे औषधोपचार करावे 

पंचमाचा सब रवि असेल तर अलोपथि , चंद्र -होमिओपथि , बुध - आयुर्वेद , मंगळ - इलेक्ट्रिक शोक  अथवा फ़िजिओथेरपि  राहू --युनानी , केतू - मंत्रोपचार व आयुर्वेद . 
नियम --पंचमाचा सब वरील प्रमाणे असेल आणि ५,९,११ या भावांचा बलवान कार्येश असेल तर आयुर्वेद औषधे सुरु करावी 

                               त्यांना मी सांगितले मनामध्ये यासंबंधी विचार करा व मला १ ते २४९ या मधील एक 

संख्या सांगा त्यांनी त्याप्रमाणे विचार करून मला ५० हि संख्या सांगितली 
                             ५० या संख्ये मधील ५ या संख्येवरून औषधाधोपचारचा विचार केला जातो परंतु  पुढील ० 

या संख्ये वरून परिणाम शुन्य होईल असा मी विचार केला परंतु कुंडली काय म्हणते हे पाहण्यासाठी 

मी ५० या संख्ये वरून कृष्णमुर्ती प्रमाणे एक कुंडली तयार केली . हा प्रश्न मी दि . ६ सप्टेंबर २०१४ रोजी       

११=१३=५३     वाजता     अ १७,५९ रे . ७४,२६ येथे सोडविला 

प्रश्न आईने विचारला म्हणून , पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे . 

हि कुंडली तूळ लग्नाची , चर तत्वाची आहे म्हणजे ११ वे स्थान बाधक स्थान होईल . 

या कुंडली मध्ये पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

शुक्र --११
केतू --६ , गु १०,३     ( केतू --मंत्रोपचार  व आयुर्वेद )
राहू -- १२, बु १२,९    ( राहू --युनानी , बुध --आयुर्वेद )
मंगळ --१,२,७         ( मंगळ --इलेक्ट्रिक शोक , फ़िजिओथेरपि )

                                               पंचमाचा सब शुक्र सिंह या स्थिर राशीत आहे म्हणजे आहे ह्यात बदल करू नये , पण सबचा नक्षत्रस्वामी केतू मीन या द्विस्वभाव राशीत आहे , नक्षत्रस्वामी बदल करावा असे सुचित करीत आहे . यापैकी काय निवडावे असा प्रश्न मला पडला .  एकूण शुक्राचे कार्येशत्व पाहता शुक्र जास्त प्रमाणात प्रतिकूल भावांचा कार्येश आहे  म्हणून मी ठरविले बदल करू नये . बदल केला तर आजार  बळावण्याची शक्यता जास्त आहे . यशाच्या चतुर्थ पायरीवर मंगल २,७ या मारक भावांचा कार्येश असून वृश्चिक या स्थिर राशीत आहे . 

          शुक्र   ११ ( बाधक ) , २,७ ( मारक ) , १२ ( हॉस्पिटल ) , ६ ( आजार , रोग ) या भावांचा बलवान कार्येश आहे . फक्त ९ या अनुकूल भावांचा बलवान कार्येश आहे . प्रतिकूल भाव जास्त आहेत म्हणून त्याचा आजार जास्त वाढेल म्हणून मी त्यांना मी सांगितले कि आयुर्वेद औषधे चालू  करू नका 

आता दशांचा विचार करू --- प्रश्न वेळी रवि महादाशेमध्ये शुक्राची अंतर दशा चालू आहे . रविचे कार्येशत्व ---

रवि --
शुक्र --११,८
राहू --१२, बु १२ , ९
मंगळ --१,२,७

शुक्राचे कार्येशत्व आपण वर पाहिलेच आहे . रवि  ११ ( बाधक ) , ८ ( अशुभ स्थान ) १२ ( हॉस्पिटल ) , २,७ 
( मारक ) , या भावांचा बलवान कार्येश आहे . म्हणजे दशा सुधा अनुकूल नाही . सबब आयुर्वेद औषधे चालू करू नयेत असे सांगितले . 

No comments:

Post a Comment