Thursday, 5 November 2020

नोकरी ----

                         फेसबुकवरील लेख वाचून लंडनहून एका स्त्री जातकाचा फोन ..... .म्हणाली सद्य मी यु के मध्ये लंडन येथे राहत आहे . २००६ पासून मी माझे पती व थोरला मुलगा एकत्र रहात होतो. माझे पती कार्डिओग्राफिक सर्जन होते . परंतु सद्याच्या कोरोना महामारीच्या वातावरणात मार्च २०२० मध्ये माझ्या पतींना कोरोना झाला . हा आजार नवीनच असल्यामुले योग्य औषधोपचार होऊ शकले नाहीत . त्यातच त्यांचे एप्रिल मध्ये निधन झाले मला १९ मार्च २०२० ला नोकरी लागली होती परंतु नवऱ्याला कोरोना झाला व कंपनी ने सुद्धा मला कळविले कि सद्य ह्या वातावरणात आम्ही तुला जॉईन करू शकत नाही .  त्यामुळे मलाही नोकरीवर रुजू होता आले नाही . .परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती  माझा येथील  खर्च मला माझ्या मुळावर टाकायचा नव्हता . म्हणून मी पुन्हा नोकरी करायचे ठरविले आहे . मी म्हटले आता तुमचे वय काय आहे ती म्हणाली वय वर्षे ५३ . या वयात सुद्धा तुम्हाला नोकरी करावीशी वाटते , मी म्हटले.  ति म्हणाली येथे जेव्हढे तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही नोकरी करू शकता . वय वर्षे ६५-६७ पर्यंत व्यक्ती नोकरी करू शकते त्यानंतर तिने मला नोकरी केंव्हा लागेल असा प्रश्न विचारला मी म्हटले आपले बर्थ डिटेल्स द्या . तिने खालीलप्रमाणे बर्थ डिटेल्स दिले 

 दि १९/८/१९६७  वेळ--२३-०६  स्थळ--अ १८,३८  रे--७२,५२

कुंडलीचा अभ्यास करून तिला सांगितले नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ मध्ये नोकरी लागेल . ३ नोव्हेंबर ला व्हाट्सअप वर तिचा मेसेज आला कि , काल  म्हणजे २ नोव्हेंबर ला मला कंपनीचे ऑफर लेटर  आले आहे .. व ९ नोव्हेम्बरला मला कंपनीत हजर राहायला सांगितले आहे . कारण ९ तारखेला तेथील लोकडाऊन संपणार आहे . 


मी जेंव्हा कुंडली सोडवायला घेतली दि १४/१०/२०२०  वेळ ---२२-४०-१२ त्यावेळी रुलिंग प्लॅनेट होते खालीलप्रमाणे 

राहू* ,बुध  , रवी,  रवी , बुध 

हि कुंडली मेष लग्नाची चर तत्वाची आहे . . जातकाने आतापर्यंत केलेल्या नोकऱ्या मी पडताळून पहिल्या 

१) सप्टेंबर २०१४    

शनी शुक्र गुरु दशेत लागली 

शनी--२,६,१०,११  शुक्र--२,६ गुरु --२,६,१० चा कार्येश 

 २) नोव्हेंबर २०१७

 शनी चंद्र बुध  लागली 

शनी-२,-६,१०,११  चंद्र --१०,११  बुध ---१०

३) सप्टेंबर २०१८

 शनी मंगल राहू दशेत लागली 

शनी --२,६,१०,११ मंगल--१०,११ राहू --२,६,१० 

ह्या सर्व नोकऱ्या यु.के लंडन मध्ये केल्या आहेत म्हणून परदेशगमनाचे योग्य तपासून पहिला . व्यय भावाचा सब चंद्र ३., ९,१०,११,१२ भावाचा कार्येश आहे व्ययाचा  सब  चंद्र ३,९,१२ परदेश गमन व १० ,११ नोकरीसाठी अनुकूल आहे 

या तीन नोकऱ्या  व्यतिरिक्त भारतात एका शाळेमध्ये  त्यांनी  नोकरी केली आहे . 

दशमाचा सब शुक्र आहे. परंतु रुलिंग मध्ये रवी आहे म्हणून रवी चे कार्येशत्वं 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (4)   5   
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (5)   (2) 7
It's Sub :------------ Venus:- (5)   (2) 7   
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   (2) 7  
Itself aspects :------ 11

रवी २,४,६ चा कार्येश आहे ४ शैक्षणिक क्षेत्र दाखवते . 

येथून पुढील नोकरी केंव्हा लागेल हे पाहण्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील कुंडली सोडवितेवेळी शनी मध्ये ऱाहू चीअंतर  दशा चालू होती. शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (12)   10 (11)   
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Ketu:- 6       Rashi-Swami Venus 5   2 7
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mars (7)   (1) (8)
Itself aspects :------ 6 2 9
 

४ थ्या पायरीवर राहू केतू येत असतील तर त्यांचे नक्षत्र पाहावे . राहू , केतू नक्षत्रात आहे केतू ६,५,२ चे कार्येश आहे 

शनी २,६,१०,११ चा कार्येश आहे . आता राहूचे कार्येशत्व 

 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12       Rashi-Swami Mars 7   1 8
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (5)   (2) 7
It's Sub :------------ Jupiter:- 4   9 12     Mercury-Yuti  4  3 6  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
Itself aspects :------ 7

राहू २,६,१० चा कार्येश आहे . याठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली आहे . यानंतर विदशा मी बुधा ची घेतली कारण रुलिंग बुध आहे .आणि कुंडली मेष चर तत्वाची आहे .बुधाचे कार्येशत्व ----

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Jupiter:- 4   9 12     Mercury-Yuti  4  3 6  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   (3) 6     Jupiter-Yuti  (4)   (9) 12  Moon-Drusht  (10)   4
Itself aspects :------ 10 

शनी म . द. राहू अ .द. बुध  विदशेचा कालावधी आहे   २/११/२०२०  ते ३०/३/२०२१ 

याच कालावधीत जातकाला नोकरी लागली आहे . 

तिला जेंव्हा सांगितले त्यावेळी मी गोचर पहिले नव्हते . तिचा मेसेज आल्यानंतर मी गोचर पहिले . गोचर पाहताना मी शनी व राहूचे सब मधील भ्रमण व बुधा चे नक्षत्रातील भ्रमण पहिले २ नोव्हेंबर २०२० पासून गोचर पाहायला सुरुवात केली 

                             २ नोव्हेम्बरला २०२० ला शनि व राहू , गुरु व शनीच्या सब मध्ये आहे गुरु शनी दोन्ही अनुकूल आहेत . परंतु बुध मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि मंगल वक्री  आहे . ९ नोव्हेंबर ला शनी राहू, गुरूच्या सब मध्ये आहेत. व बुध  मंगळाच्या नक्षत्रात आहे मंगल वक्री आहे . ११ नोव्हेंबर ला शनी राहू,  गुरु च्या सब मध्ये आहे बुध  राहूच्या नक्षत्रात आहे . म्हणजे ११ नोव्हेंबर पासून गोचर अनुकूल आहे . असे असून सुद्धा जातक ९ नोव्हेंबर ला मंगल वक्री असताना कंपनीत हजर होत आहे . येथे दोन दिवसाचा फरक पडला आहे हा फरक केवळ संबंधित स्थळाचे अक्षांश रेखांश व अयनांश  अचूक नसल्यामुळे पडला असेल असे समजायचे का ? तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे. 


शुभम भवतु  !!!

No comments:

Post a Comment