कृष्णमूर्ति ज्योतिष

Wednesday 22 July 2020

नोकरी ----

एका जातकाच्या मित्राचा मुलगा कॅनडा मध्ये नोकरी करत आहे . मागील महिन्यात तेथोल त्याची नोकरी गेली. तिथेच नोकरीचे प्रयत्न करीत असताना  . त्याला दोन कंपनी च्या नोकरीचे ऑफर लेटर आले आहे .दोन्ही  कंपनी चान्गल्या  आहेत . यापैकी कोणती निवडावी असा त्याच्या मनात गोंधळ उडाला आहे . जातकाला मी विचारले त्याचा फोन केंव्हा येणार आहे . तो म्हणाला आज रात्री ८-३० वाजता. (२२/७/२०२०)  मी म्हणालो फोन आला कि त्याच्या कडून दोन कंपनीसाठी दोन वेगवेगळे नंबर घ्या . ( १ ते २४९ या पैकी ) काळ रात्री ९-०० वाजता जातकाचा मला व्हाट्सअप वर मेसेज आला . त्यामध्ये दोन कंपनीसाठी दोन वेगवेगळे नंबर होते . ते खालीलप्रमाणे....

१) LYFT कंपनी -------------१४२
२) रॉयल बँक ऑफ कॅनडा ---१२१

मी हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवायचे ठरविले

१) ऑपशन थेअरी ----

ह्यासाठी मी प्रश्न सोडवितानाचे रुलिंग प्लॅनेट घेतले

शनी* गुरु , केतू  , रवी  , बुध

गुरु व शनी वक्री  आहेत . म्हणून गुरु व शनी विचार केला नाही . तसेच केतू गुरूच्या राशीत आहे म्हणून त्याचा सुद्धा विचार केला नाही . राहिले फक्त रवी व बुध . यांच्या राशी अंकाची बेरीज घेतली ----

रवी ------५
बुध ---३+६=९

-------------------
                 १४
रुलिंगमध्ये बुद्ध आला आहे म्हणूनत्यातून ३ वजा केले .   १४- ३ =११
पर्याय फक्त दोनच आहेत म्हणून ११ या संख्येला २ ने भागले

११ / २ =  भागाकार ५ व बाकी १ शिल्लक

म्हणून पहिला पर्याय   LYFT  कंपनी . हे उत्तर आले .


२) कृष्णमूर्ती सब चे कोष्टक

पहिली कंपनी चा नंबर १४२ व दुसऱ्या कंपनीसाठी १२१ नंबर आहे .
 याचे कोरुलर घेतले म्हणजे राशी स्वामी , नक्षत्र स्वामी , उपनक्षत्रस्वामी

१) नंबर १४२ ---शुक्र , गुरु , केतू
२) नंबर १२१---बुध , मंगल , मंगल

या दोघांची रुलिंग प्लॅनेट बरोबर केली

रुलिंग प्लॅनेट ----शनी * गुरु , केतू , रवी  , बुध
 जास्तीतजास्त ग्रह कोणत्या पर्यायाला जुळतात ते पाहिले

पहिला पर्याय नंबर १४२ या मधील गुरु व केतू रुलिंगमध्ये आहेत व दुसरा पर्याय नंबर १२१ या मधील फक्त बुध  रुलिंग मध्ये आहे .

पहिल्या पर्यायचे दोन ग्रह जुळतात. दुसऱ्या पर्यायाने एक च ग्रह जुळतो. म्हणून पहिला पर्याय हेच उत्तर

LYFT . दोन्ही पद्धतीने एकाच उत्तर येते.

शुभम भवतु  !!!

No comments:

Post a Comment