Sunday, 7 June 2020

प्रेम विवाह ---

                           बंगलोर हून आयटी क्षेत्रातील एक जातक फोनवर बोलत होता. माझ्या कंपनी मध्ये माझी कलिग्ज ने मला , ज्योतिष मार्गादर्शन कोणाकडून मिळू शकेल का? असा प्रश्न विचारला . मी आपले लेख फेसबुकवर वाचले होते त्यामुळे मला तुमचे नाव आठवले म्हणून तुंम्हाला फोन केला . . बर , पुढे  मी म्हणालो . ती म्हणाली माझ्यावतीने तूच त्यांना प्रश्न विचार . जातक म्हणाला माझ्या सहकार्याचे एका मुलाबरोबर अफेअर चालू आहे .( विद्यार्थी दशे पासून ) पण सद्या  त्यांच्यामध्ये वाद होत आहेत . मी म्हटले कशावरून वाद होत आहेत. तिला वाटतंय तो सद्या दुसऱ्याच मुलीबरोबर आहे. ती म्हणते हा माझ्याशी विवाह करेल का  ? का तो इतर ठिकाणी गुंतला आहे  ?  मी म्हटले मला दोघांचे बर्थ डिटेल्स लागतील  . तो म्हणाला ठीक आहे,   . मी तुम्हाला  डिटेल्स देतो . त्याने खालीलप्रमाणे डिटेल्स दिले .

जन्म तारीख २/--/९४  वेळ ७-५०  am  अ २१,०३ रे ७५,४६   ( मुलगी )

जन्मतारीख  ११/--/१९९५   सकाळी ११-२४   अ १९,५३ रे ७५,२०   (मुलगा )

प्रथम मुलीची पत्रिका पाहू --

हि सिंह लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब चा राशी स्वामी व चंद्र राशी स्वामी शुक्रच आहे . म्हणजे  पत्रिका बरोबर आहे
मुलीच्या पत्रिकेत पंचम व सप्तम चा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 3   5 8  
It's N.Swami :-------- Rahu:- (3)      Rashi-Swami Venus (1)   3 10
It's Sub :------------ Saturn:- 7   6 7  
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (3)      Rashi-Swami Venus (1)   3 10
Itself aspects :------ 9 7 11

४थ्या  पायरीवर राहू आहे . राहू गुरु नक्षत्रात आहे  गुरु ३,५,८ भावाचा कार्येश आहे . एकूण गुरु १,३,५,८ भावाचा कार्येश आहे . राहू प्लूटो च्या युतीत आहे (५. अंश ) गुरु  नेपच्यून बरोबर ७५. ३ च अशुभ योग्य करीत आहे . नेपच्यून मुले ह्या मुलीची फसवणूक होणार हे नक्की सांगता येईल. तसेच विवाह बाबतीत राहूच संबंध येत असेल विवाह कॉन्ट्रास्ट असतो. येथे मुलगी मुलापेक्षा ५ महिन्यांनी मोठी आहे .

प्रेम विवाह -- सप्तमाचा सब जर पंचमाचा कार्येश असेल तर अफेअर असते व पंचमाचा सब जर सप्तमाचा कार्येश असेल तर अफेअर चे रूपांतर विवाहामध्ये होईल

या पत्रिकेत पंचम व सप्तम भावाचा सब शुक्र च आहे सप्तमाचा सब शुक्र पंचमाचा कार्येश आहे. पण पंचमाचा सब शुक्र सप्तमाचा कार्येश होत नाही म्हणून हा प्रेमविवाह होणार नाही . प्रेमविवाहामध्ये जेंव्हा राहूच संबंध येतो त्यावेळी शारीरिक आकर्षण मुले एकत्र येतात .राहू प्लूटो युतीमुळे हा विवाह होण्याची शक्यता खूप कमी.

आता मुलाची पत्रिका पाहू ....

मुलाची पत्रिका मिन लग्नाची आहे . मुलाच्या पत्रिकेत लग्नाचा सब चंद्रच आहे म्हणून पत्रिकेची वेळ बरोबर आहे . मुलाच्या  पत्रिकेत सप्तमाचा सब मंगळ आहे . मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (6)   2 (9)  Cusp Yuti: (6)    
It's N.Swami :-------- Ketu:- (2)    Cusp Yuti: (2)      Rashi-Swami Mars (6)   2 (9)  Saturn-Drusht  (12)   11 12
It's Sub :------------ Jupiter:- (8)   (1) 10  Cusp Yuti: (9)       Venus-Yuti  (8)   (3) 8  Saturn-Drusht  (12)   11 12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   11 12  
Itself aspects :------ 12 9 1

सप्तमाचा सब मंगळ    १,२,३,६,८, ९ ,१२ भावाचा कार्येश आहे त्यातील ९ भाव हा पंचमापासून पाचवा आहे म्हणून अफेअर आहे असे म्हणता येईल . आता पंचमा च सब पाहू . पंचमाचा सब रवी आहे रवीचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (10)   6  
It's N.Swami :-------- Sun:- (10)   6  
It's Sub :------------ Sun:- (10)   6  
It's Sub's N.Swami :-- Sun:- (10)   6  
Itself aspects :------ 4

पंचमाचा  सब रवी फक्त १० भावाचा कार्येश आहे . पंचमाचा सब रवी सप्तम भावाचा कार्येश होत नाही सबब हा प्रेम विवाह होणार नाही असे म्हणता येईल . मुलाच्या पत्रिकेत खालील अशुभ योग्य होत आहेत.
गुरु प्लूटो ६.. ९ वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र प्लुटोच्या युतीत ( ३. ९ ) राहूचे हर्षल नेपच्यून बरोबर अनुक्रमे ७४.,८ , ७१. ७ . तसेच पंचमच सब रवी ची  हर्षल नेपच्यून बरोबर ५. ५ व २. ४ युती आहे .अजून एक गोष्ट अनुभवास येते ती म्हणजे जेंव्हा पंचमाचा संबंध दशम स्थानाशी येतो तेंव्हा ते ज्या ठिकाणी नोकरी करत असतात त्या ऑफिस मधील च एकाद्या  मुलीशी प्रेम संबंध होतात  या पत्रिकेत पंचम भावाचा सब १० चा कार्येश आहे .
त्यामुळे मुलगी म्हणते ते , तो दुसऱ्या मुलीबरोबर फिरत आहे ते बरोबर असावे .
वरील सर्व योगामुळे हा प्रेम विवाह होणार नाही असे खात्रीपूर्वक सांगता येईल . ह्या कुंडल्या दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे आल्या होत्या . अद्याप त्यांचा विवाह झाला नाही.

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment