कृष्णमूर्ति ज्योतिष

Monday 8 June 2020

पुनर्विवाह होईल का ?


माझ्या परिचयाचे  एक जातक एक दिवस मला म्हणाले माझ्या मुलीचा घटस्फोट झाला आहे . सद्य ती नोकरीला आहे . पण आमच्या नंतर तिचे कसे होईल हि आम्हा उभयतांना काळजी लागून राहिली आहे . तिला एक मुलगा आहे . मुलगा आमच्याकडेच आहे . तिचा पुनर्विवाह होईल का ? तिच्या मुला सहित तिला स्वीकारणारा कोणी मिळेल का ? मी म्हटले तिचे जन्म टिपण आहे का ? ते म्हणाले मी ते बरोबर घेऊन आलो आहे .

दि   ३/९/ १९७५   वेळ  ६-४४-२५सकाळी  स्थळ अ  १७,५९  रे ७४,२६

सुधारित वेळ ६-४४-२५ सकाळी ( सब चंद्र संबंध थेअरी व  कस्पल इंटर लिंक थेअरी प्रमाणे )

विवाह---९/७/२०००
घटस्फोट सप्टेंबर २००८

प्रथम आपण विवाह व घटस्फोट ची पडताळणी करून पाहू
विवाह ज्यादिवशी झाला त्यावेळी बुध  गुरु गुरु दशा होती

सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ चा कार्येश असेल तर २,५,७,८,११ च्या सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो.

बुध १,२,४,५,७,९,१०,११ चा कार्येश होता
गुरु ४,९,१०,१२ चा कार्येश होता

विवाहाच्या वेळी २,५,७,९,११ मुले विवाह झाला . पण त्याच बरोबर १,४,१०,१२ भाव हि कार्यान्वित झाले होते . म्हणून वैवाहिक सौख्य असमाधानकारक होते त्याची परिणीती घटस्फोटामध्ये झाली

घटस्फोट झाला त्यावेळी  केतू राहू बुध   दशा होती

सप्तमाचा सब १,४,६,१०,१२ भावांचा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेमध्ये घटस्फोट होतो. कायदेशीर घटस्फोटासाठी ३ भाव ऍक्टिव्ह होणे आवश्यक आहे .

केतू---४,९,१०,१२
राहू... ३,४,५,६,७,८,९,११
बुध ---१,२,४,५,७,९,१०,११

या ठिकाणी दशेमध्ये १,३,४,६,१०,१२  भावामुळे कायदेशीर घटस्फोट झाला

आता पुनर्विवाहाचा विचार करु -----

सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी बुध  असेल किंवा बुधा च्या नक्षत्रात, बुधा च्या युतीत , बुधा च्या दृष्टीत असेल किंवा द्विस्वभाव राशीत असेल आणि २,७,११ चा कार्येश असेल तर पुनर्विवाह होतो.

या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनी कर्क राशीत आहे. शनी चा नक्षत्रस्वामी शनीच आहे ,सब शनी चआहे
शनी कर्क राशीत आहे . कर्क रास हि चर तत्वाची आहे . शनी चा नक्षत्रस्वामी शनी च आहे . येथे कोठे हि द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही, म्हणून हीच दुसरा विवाह होणार नाही.

               काही जण द्वितीय विवाहाचा विचार द्वितीय स्थानावरून सुद्धा करतात.( प्रथम पती  / पत्नीचे मृत्यू स्थान ) द्वितीयेचा सब २,८,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो.

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 12   3 10  
It's N.Swami :-------- Ketu:- (9)      Rashi-Swami Venus (12)   3 (10)
It's Sub :------------ Rahu:- (3)      Rashi-Swami Mars (9)   (4) 9
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (8)   (5) 8  
Itself aspects :------ 7

शुक्र ८ चा कार्येश आहे परंतु शुक्र प्लूटो बरोबर ३८ अंशाचा अशुभ योग्य करीत आहे .तसेच तिसऱ्या पायरीवर मंगल नेपच्यून बरोबर १७८ अंशाचा प्रतियोग करीत आहे . ४ थ्या पायरीवर गुरु चा हर्षल बरोबर प्रतियोग (१७४ ) म्हणून विवाह होणार नाही

काही  जण द्वितीय विवाहाचा विचार नवम भावावरून करतात .
नवामाचा सब २,७,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो . नवामाचा सब गुरु आहे

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 8   5 8  
It's N.Swami :-------- Ketu:- (9)      Rashi-Swami Venus (12)   3 (10)
It's Sub :------------ Ketu:- 9       Rashi-Swami Venus 12   3 10
It's Sub's N.Swami :-- Sun:- (12)   1     Mars-Drusht  (9)   (4) 9
Itself aspects :------ 3 1 5

नावामाचा सब गुरु २,७,११ चा कार्येश नाही.. मंगल नेपच्यून प्रतियोग ( १७८ ) म्हणून द्वितीय विवाह होणार नाही .

त्यानंतर मी म्हटले अजून एक पर्याय आहे तो वापरून पाहू . ----

मी म्हणालो , मनामध्ये माझ्या मुलीचा पुनर्विवाह होईल का ? असा विचार करून ,  मन एकाग्र करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा . त्यांनी थोडावेळ विचार करून २०१ हि संख्या सांगितली . २०१ या संख्येवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .

दि -८ / ८ /२०१२ वेळ १९-०१-५८ स्थळ  --  अ १७,५९ रे  ७४,२६ के.पी. नंबर २०१

आता प्रश्न वडीलानी विचारला आहे म्हणून पंचमस्थान लग्न मानून कुंडली फिरवून घेतली पाहिजे

मनातील विचार जुळतो का ते पाहू---
                       चंद्र हा मनाचा कारक चंद्र पंचमाच्या लाभत म्हणजे तृतीय स्थानात आहे चंद्र पंचमापासून तृतीयेश आहे चंद्र केतू नक्षत्रात आहे केतू पंचमाचा व्ययात म्हणजे चतुर्थात आहे केतू शुक्राचे राशीत आणि शुक्र पंचमात आहे यावरून जातकला मुली बद्धल काळजी वाटते आहे .

                                 फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये सप्तमाचा सब राहू आहे राहू वृश्चिक राशीत आहे व त्याचा नक्षत्रस्वामी शनी आहे शनी तुला राशीत आहे . वृश्चिक रास स्थिर तत्वाची आहे व तुला रास चर तत्वाची आहे . येथे कोठेही बुध अथवा व्दिस्वाभाव राशीचा संबंध आलेला नाही . म्हणून दुसरा विवाह होणार नाही .

द्वितीय स्थानाचा विचार केला तर ----

द्वितीयेचा सब गुरु वृषभ राशीत व त्याच नक्षत्रस्वामी चंद्र मेष राशीत आहे . द्वितीयेचा सब २,८,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो.
 
 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (12)   (8) 
It's N.Swami :-------- Moon:- (11)   3 
It's Sub :------------ Saturn:- 4   9 10  Cusp Yuti: (5)       Mars-Yuti  4  6 7 11
It's Sub's N.Swami :-- Mars:- (4)   6 (7) 11  Cusp Yuti: (5)       Saturn-Yuti  (4)   (9) (10)
Itself aspects :------ 7 5 9

 द्वितीय भावाचा सब नक्षत्र लेव्हल वर ११ चा कार्येश आहे. परंतु ४ थ्या पायरीवर ४,७ १०  या विरोधी भावाचा कार्येश आहे .

नवामाचा सब २,७,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होतो .
 .नवमचा सब केतू आहे केतू फक्त ३ भावाचा कार्येश आहे म्हणून विवाह होणार नाही.

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 12       Rashi-Swami Venus 1   1 5 12
It's N.Swami :-------- Sun:- (3)   4  Cusp Yuti: (3)   
It's Sub :------------ Ketu:- 12       Rashi-Swami Venus 1   1 5 12
It's Sub's N.Swami :-- Sun:- (3)   4  Cusp Yuti: (3)   
Itself aspects :------ 7

 या सर्व  कुंडलीवरून दुसरा विवाह होणार नाही हे निश्चितपणे सांगता येईल. जन्माला येताना जे प्रारब्ध घेऊन येतो ते  भलें  चांगले असेल किंवा वाईट असेल तरी सुद्धा ते भोगले पाहिजे . ज्योतिषी  फक्त आपले भविष्य वाचतो . तो बदलू शकत नाही. फार फार तर येणाऱ्या समस्यांना धीराने तोंड देण्याची मानसिकता तयार करून घेऊ शकतो.

सदरचे जातक २०१२ साली माझ्याकडे आले होते , आता २०२० साल चालू आहे , अद्याप तिचा विवाह झालेला नाही.

शुभंम भवतु  !!!



No comments:

Post a Comment