Sunday, 11 October 2020

नोकरी ---

                           जातक मॅनेजर पदावर काम करीत होता . कंपनीने त्याच्यवर एका  प्रोजेक्ट ची जबाबदारी सोपविली होती. वर्षभर काम करून त्याने प्रोजेक्ट जवळ जवळ पूर्ण केला होता. यावर त्याचे प्रमोशन अवलंबून होत. तो खुशीत  होता. ह्यावेळी आपल्याला प्रमोशन नक्की मिळणार ह्याची त्याला खात्री होती. परंतु नियतीच्या मनात वेगळेच घोळत होते. त्याचे सर्व काम त्याच्या बॉसने स्वतः चे नावावर दाखविले . आणि त्याचे प्रमोशन झाले . त्याच्या बॉसला मनातून ह्या जातकाबद्दल भीती  वाटत होती  आज ना उद्या हा वरिष्ठाना सांगेल. त्यामुळे तो त्याला त्रास देऊ लागला . म्हणाला तू राजीनामा दे  नाहीतर मी तुला काढून टाकतो. त्यामुळे  त्याला  राजीनामा देणे भाग  पडले आयुष्याच्या मध्यावर अशा प्रकारे नोकरी सोडावी लागणे हे त्याचे दुर्दैव . पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात केली . कामाचा त्याला १०-१२ वर्षाचं अनुभव होता त्याला वाटत होत आपल्याला नोकरी सहजच मिळेल पण जस जसे दिवस जाऊ लागले तस तसे त्याचे टेन्शन वाढत चालले होते कारण वरच्या पदावरच्या नोकऱ्या जास्त प्रमाणात नसतात. आतापर्यंत जे सेव्हिंग केले होते त्यावर त्याचे घरखर्च कसातरी भागत होता. पण हे किती दिवस चालणार . दिवसेंदिवस त्याचे  डिप्रेशन वाढत होते अशा अवस्थेत त्यांने  मला फोन केला आणी  वरील सर्व सांगितले मला नोकरी केंव्हा मिळेल असा प्रश्न विचारला जवळ जवळ एक वर्ष झाले होते . मी त्याला ठराविक कालावधी सांगितला . मला आठवते मी त्याला नोव्हेंबर डिसेंबर २०१९ सांगितलेले होते . त्यावेळी तो म्हणाला म्हणजे अजून  सहा महिने थांबावे लागेल. चालेल मी नक्कीच वाट पाहीन . त्यानंतर ३-४ महिन्यांनी त्याने मला फोन केला , म्हणाला  तुम्हीं म्हणालात त्या प्रमाणे मला हैद्राबाद चा कॉल आला   माझे मुलाखतीचे तीन राऊंड झाले आहेत . मी  एच आर बरोबर बोललो.  तो म्हणाला तुमची निवड झाली आहे . थोड्या दिवसात तुम्हाला ऑफर लेटर येईल . इथेही नशिबाने दगा दिला . ऑफर लेटर  आलेच नाही. तो खूप निराश झाला . पुन्हा त्याने माझ्याशी संपर्क केला . तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित जुळून आले होते पण त्याचे ऑफर लेटर आले नाही . पुन्हा एकदा माझी पत्रिका पहा ना .... माझे रिडींग चुकले होते . 

मी पुन्हा पत्रिका तपासायला सुरुवात केली . असे का झाले ..... आणि त्याला सांगितले ऑगस्ट सप्टेंबर २०२० . या महिन्यात तुला नोकरी लागेल . तो म्हणाला , अजून सहा महिने ? ठीक आहे . आणि लॉक डाउन सुरूझाले . कोरोनाने  हळू हळू पाय पसरायला सुरुवात केली होती. बऱ्याचकंपन्यांनी नोकर कपात केली होती . सगळेच ठप्प झाले होते . हे सहा  महिने कसेबसे ढकलत होता. जुलै महिन्याच्या शेवटी त्याच फोन आला म्हणाला सर, एका MNC कंपनीचा कॉल आला होता सर्व मुलाखतीचे राऊंड online क्रॅक केले .मुलाखतीच्या वेळी मी त्यांना स्पष्ट सांगितले कि माझा २ वर्षाचा गॅप आहे . असे असून सुद्धा माझी निवड झाली फक्त ऑफर लेटर आले नाही . 

                 १७ ऑगस्ट ला पुन्हा फोन आला म्हणाला सर, ते म्हणाले तुम्ही दोन वर्षाचा गॅप बदल खरे सांगितले म्हणून ऑफर लेटर  देत आहोत .१० तारखेला रात्री ९ वाजता त्यांनी माझ्या ई -मेलवर ऑफर लेटर पाठविले व दिनांक ११ऑगस्ट २०२० रोजी  ऑन लाईन जॉईन करून घेतले . आणि लगेचच लोकडउन असल्यामुळे वर्क फ्रॉम होम साठी काम सुरु झाले . काम खूप होते म्हणून तुम्हाला फोन करायला उशीर झाला .

 त्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे ------.

जन्म तारीख--२ एप्रिल १९७९   वेळ--३-२५ ( सुधारित ) पहाटे  पुणे 

हि मकर लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब शुक्र आहे . शुक्र चंद्र राशिस्वामी आहे . म्हणजे सब चंद्र  कनेक्शन थेअरी प्रमाणे जन्मवेळ बरोबर आहे . 

नियम -- दशमाचा सब २,६,१०,११ पैकी भावाचा कार्येश असेल तर २,६,१० या भावांच्या सयुंक्त दशेमध्ये नोकरी लागेल . खरे तर दशमाचा  सब . पाहण्याची आवश्यता नाही . यापूर्वी २-३ नोकऱ्या केल्या आहेत  डारेक्ट  दशा पहिली तरी चालले असते . प्रश्न कुंडलीमध्ये पाहावे लागले असते . दशमाचा सब मंगल आहे मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --


PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (2)   (3) (10) (11)     Mercury-Yuti  (2)   6  Jupiter-Drusht  (6)   (12)
It's N.Swami :-------- Jupiter:- (6)   (12)   
It's Sub :------------ Rahu:- 7       Rashi-Swami Sun 2   8
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
Itself aspects :------ 9 6 10

तिसऱ्या पायरीवर राहू अष्टम भावारंभी आहे त्यामुळे त्याची दृष्टी द्वितीय भावावर पडते . 

मंगल २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे 

 मी कुंडली पहिली ९/५/२०१९   वेळ  १०-१८-१४  त्यावेळी रुलिंग असे होते    

 गुरु * बुध , राहू , बुध   , गुरु 

 आता दशा पाहू -- कुंडली पाहतेवेळी गुरु मध्ये मंगळाची अंतर्दशा होती . गुरु मंगळाचे कार्येशत्व ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 6   12   
It's N.Swami :-------- Saturn:- (7)   1 2     Venus-Drusht  (1)   4 (5) (9)
It's Sub :------------ Mercury:- 2   6     Mars-Yuti  2  3 10 11  Jupiter-Drusht  6  12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   1 2     Venus-Drusht  (1)   4 (5) (9)
Itself aspects :------ 1 11 3

गुरु २., ६ , १० पैकी कोणत्याही भावाचा कार्येश नाही म्हणून गुरु महादशा सोडून देता येणार नाही. कारण कुंडली मकर लग्नाची चर तत्वाची आहे 

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (2)   (3) (10) (11)     Mercury-Yuti  (2)   6  Jupiter-Drusht  (6)   (12)
It's N.Swami :-------- Jupiter:- (6)   (12)   
It's Sub :------------ Rahu:- 7       Rashi-Swami Sun 2   8
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
Itself aspects :------ 9 6 10

मंगळ २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे कुंडली चर तत्वाची आह म्हणून त्या पुढील राहूची विदशा घेतली 

( रुलिंग मध्ये राहू आहे )

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Sun 2   8
It's N.Swami :-------- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
It's Sub :------------ Saturn:- 7   1 2     Venus-Drusht  1  4 5 9
It's Sub's N.Swami :-- Venus:- (1)   4 (5) (9)     Saturn-Drusht  (7)   1 2
Itself aspects :------ 2

राहू अष्टम भावारंभी आहे त्याची दृष्टी द्वितीय भावावर येते म्हणून राहू २ चे कार्येश दाखवितो. गुरु मंगल राहू चा  कालावधी येतो १५/११/२०१९ ते ५/१/२०२०

त्याला सांगताना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नोकरी लागेल असे सांगितले होते . परंतु या काळात फक्त मुलाखती झाल्या . त्याला नोकरी लागली नाही . पुन्हा जेंव्हा पत्रिका तपासावयास घेतली त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे राहू चा नेपच्यून बरोबर केंद्र योग्य आहे ( ९४ अंश ) यामुळे घटना   घडली नाही . यावर महाजनांनी  मार्गदर्शन करावे. 

म्हणून मी फक्त विदशा बदलली . राहू च्या ऐवजी रवी ची विदशा घेतली कारण रवी सर्वच म्हणजे २,६,१०,११ भावाचा कार्येश आहे . रवीचे कार्येशत्व ---

 ( या पत्रिकेत फक्त मंगल आणि रवी च २,६,१०,११ चे कार्येशत्व दाखवितात . )

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (2)   (8)   
It's N.Swami :-------- Mercury:- (2)   6     Mars-Yuti  (2)   (3) (10) (11)  Jupiter-Drusht  (6)   (12)
It's Sub :------------ Mercury:- 2   6     Mars-Yuti  2  3 10 11  Jupiter-Drusht  6  12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   1 2     Venus-Drusht  (1)   4 (5) (9)
Itself aspects :------ 9

गुरु महादशा मंगल अंतर्दशा व रवी विदशा चा कालावधी येतो १७/८/२०२० ते ३/९/२०२०. 

त्याला सांगताना ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नोकरी लागेल. असे सांगितले . 

याप्रमाणे जातक दिनांक ११/८/२०२० रोजी  नोकरीवर रुजू झाला . मी सांगितलेल्या कालावधी पेक्षा सहा दिवस अगोदर रुजू झाला आहे . हा सहा दिवसाचा फरक अयनांश आणि अक्षांश रेखांश मधील फरकामुळे पडू शकतो. 


शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment