Monday, 15 June 2020

नोकरी ---


                           मुंबई स्थित एक जातकाला  त्याच्या मुलासंबंधी प्रश्न विचारायचा होता. मी म्हटले मुलाला बोलू द्या. नंतर मुलगा फोनवर बोलू लागला . मला म्हटलं मला मराठी येत नाही . मी म्हटले तू कोणत्याही भाषेत बोल. तो म्हणाला हिंदीत बोलू का ? मी म्हटले ठीक आहे बोल . तो म्हणाला सर, मला दोन कंपनीकडून ऑफर आली आहे . माझा गोंधळ होतोय. कोणती निवडावी . एक आहे Selling Educational package  आणि दुसरी आहे  Dimond M erchant Secretary संदर्भात . यापैकी मी कोणती निवडावी ? 

मी हा प्रश्न ऑपशन थेअरी प्रमाणे सोडवू  असे ठरविले   म्हणून मी म्हटले दोन्ही कंपनी साठी एक संख्या सांग . त्याने पहिल्या कंपनीसाठी ३ संख्या सांगितली . व दुसऱ्या कंपनी साठी ९ हि संख्या सांगितली . 


हा प्रश्न मी दि १५/६/२०२० रोजी  वेळ १४-५२-४० वाजता सोडविला . प्रथम मी ह्या वेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले ते खालीलप्रमाणे 

 

मंगळ *  लग्न शुक्र , नक्षत्र बुध  , रास गुरु , वार   चंद्र ( सोमवार )

 

यामध्ये गुरु,  शुक्र  वक्री  आहेत म्हणून ते सोडून दिले  राहिले फक्त बुध  व चंद्र . रुलिंग साठी कमीतकमी  तीन ग्रह असले  पाहिजेत म्हणून मी लग्न नक्षत्र  स्वामी मंगळ घेतला .आता तीनही ग्रहांच्या राशींची बेरीज घेऊ 

 

मंगळ ---१+८=९

बुध -----३+६=९

चंद्र ----     ४=४

                  --------

                     २२

बेरीज २२ आली . पर्याय फक्त दोन आहेत . म्हणून २ संख्येने भागले . 

 

२२/२= भागाकार ११ बाकी ० आली .

 

 ज्यावेळी बाकी शुन्य येते त्यावेळी शेवटचा पर्याय निवडावा .  शेवटचा पर्याय आहे 

 

  Dimond Merchant Secretary.

 

हाच प्रश्न मी कृष्णमूर्तींच्या सब कोष्टकाप्रमाणे पहिला . 

प्रथम ३ व ९ या संख्येचे  राशीस्वामी , नक्षत्र स्वामी व उपनक्षत्रस्वामी घेतले 

 

संख्या ३=  मंगल केतू  रवी 

संख्या ९= मंगळ केतू बुध 

 

यांची तुलना रुलिंगमधील  ग्रहा बरोबर केली 

 

रुलिंग मधील ग्रह मंगळ ,बुध ,चंद्र 

 

दोन्ही संख्येनुसार पहिले तर मंगल केतू समान आहेत . रुलींग मध्ये मंगळ आहे . फक्त फरक रवी व बुध  मध्ये आहे रुलिंग मध्ये बुध  आहे रवी नाही . म्हणून ९ या    संख्येचा पर्याय  बरोबर आहे . दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले   Dimond Merchant Secretary.

सदर जातकाच्या मुलाला दुसरा पर्याय निवडण्यास सांगितले . 

 

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment