Monday, 20 July 2020

जन्मवेळ काढणे ----

                         एक स्त्री जातक सद्या कॉलेजचे शिक्षण घेत आहे . ती फोनवर बोलत होती ... म्हणाली माझ्या भावाची पत्रिका पाहाल का ? मी म्हणालो का नाही . ती म्हणाली त्याची जन्मतारीख आहे पण जन्मवेळ नाही . मी म्हणालो आईला विचार , तिला माहित असेल . आई म्हणाली त्याच्यावेळी मी बेशुद्ध होते नक्की केंव्हा जन्म झाला ते मलाही माहित नाही. त्यावेळेची स्थिती फार नाजूक होती. . मी म्हटले ठीक आहे . मला जन्मतारीख व जन्मस्थळ सांग . तिने खालीलप्रमाणे सांगितले

दि ---१९ / १० /२००२ वेळ रात्री १२-३० ते ४-०   स्थळ --अ  १६,४२  रे ७४,१४

कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेटवरून जन्मवेळ शोधात येते . मी कुंडली काढतेवेळी त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले
दि १७ / ७ /२०२० वेळ २०-५९-१८

लग्न नक्षत्रस्वामी  मंगळ , लग्न --शनी ,  नक्षत्र मंगल , रास शुक्र , वार --शुक्र

त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट होते ...

मंगळ *  शनी, मंगळ , शुक्र , शुक्र

जातकाने दिलेल्या वेळेत कोणती लग्ने  होती ते पंचागावरून पहिले

कर्क --००-००-३२ ते २-१२-१५

सिंह --२-१२-१५ ते ४-१८-२१

जातकाने दिलेले वेळेत फक्त हि दोन लग्ने होती . कर्क लग्नाचा स्वामी चंद्र व सिंह लग्नाचा स्वामी रवी . या दोनपैकी एकही  रुलिंग मध्ये नाही . आता प्रश्न पडला कोणते लग्न असेल. थोडा विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जातकाने रात्रीची वेळ दिलेली आहे . याचा अर्थ रुलिंगमध्ये चंद्र यावयास हवा . चंद्र कोणत्या प्रकारे येऊ शकतो.
१) रुलिंग पाहतेवेळी चंद्र लग्नतत्  असेल तर ...
२) किंवा चंद्राची लग्न स्थानावर दृष्टी असेल तर ...
३) किंवा रुलिंगमधील  कोणत्या तरी एका ग्रहाशी चंद्राची युती असेल तर ...

वरील पर्याय पाहता , एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लग्नात चंद्र नाही, तसेच लग्नावर चंद्राची दृष्टी नाही . फक्त रुलिंग मधील शुक्र ग्रहाबरोबर चंद्राची युती आहे  ( चंद्र २३,४५  व शुक्र  १९,१८ )

म्हणून चंद्र रुलींग मध्ये  घेतला

मंगळ *  शनी, मंगळ , शुक्र , ( चंद्र )  शुक्र

रुलिंग मध्ये चंद्र असल्यामुळे जातकाचे लग्न कर्क घेता येईल . कर्क राशी मध्ये पुनर्वसू  ( गुरु ) पुष्य ( शनी ) व आश्लेषा  ( बुद्ध ) नक्षत्रे आहेत यापैकी शनी आपणाला नक्षत्रस्वामी म्हणून घेता येईल . आता फक्त सब व सब सब निवडायचा . मंगल दोन वेळा आला आहे म्हणून खालील दोन लग्ने घेता येतील .

कर्क लग्न शनी नक्षत्र मंगळ सब व मंगळ सब सब
किंवा

कर्क लग्न शनी नक्षत्र मंगळ सब व शुक्र सब सब

यापैकी कोणते घ्यावे ? रुलिंग मध्ये शनी आहे म्हणून मी दुसऱ्या पर्यायाचा विचार करायचे ठरविले .

कर्क लग्न शनी नक्षत्र मंगल सब शुक्र सब सब

कॉम्पुटर मधील ट्रांझिटस ऑपशन वापरून वरील लग्न केंव्हा उदयास येते ते पहिले
जातकाची वेळ येते   ००-५७-००

याठिकाणी वाचक शंका घेतील  की शनी वक्री असताना लग्नशुधी साठी शनी का घेतला?  येथे वेळ रात्रीची असल्यामुळे चंद्र घ्यावा लागला.कर्क राशीमध्ये शनी चे नक्षत्र आहे. रुलिंग मधील दुसरा कोणताच ग्रह कर्क राशीमध्ये नाही. म्हणून या ठिकाणी वक्री ग्रहाचा नियम शिथिल केला.

या पत्रिकेत लग्नाचा सब मंगल आहे सब मंगळाची चंद्रावर पूर्ण दृष्टी आहे म्हणजे आपण काढलेली वेळ बरोबर आहे . ( चंद्र मिन ४ अंश २० कला व मंगळ कन्या ८ अंश १० कला ) सब चंद्र संबंध थेअरी प्रमाणे जन्मवेळ बरोबर आहे .

 
हि वेळ वापरून मी कृष्णमुर्ती प्रमाणे कुंडली तयार केली . जातक सद्या इ १२ वि पास  झाला आहे .
 परंतु इ १० वी   पर्यंतचे शिक्षण घरापासून दूर ठिकाणी झाले आहे .

या पत्रिकेत चतुर्थाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 11   7 8  
It's N.Swami :-------- Mars:- (2)   5 (10)  Cusp Yuti: (3)    
It's Sub :------------ Sun:- 3   2  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (2)   5 (10)  Cusp Yuti: (3)    
Itself aspects :------ 6 2 9

शिक्षणासाठी २ भाव अनुकूल आहे ३ भाव घरापासून दूर ठिकाण दर्शवितो . .

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment