Sunday, 22 November 2020

संतती ---

माझ्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन ---- तो म्हणाला मला तुम्हाला भेटायचे आहे . मी त्याला रविवारी यायला सांगितले रविवारी सकाळी १० वाजता ती व्यक्ती आली  म्हणाली  मला एक प्रश्न विचारायचं आहे . मी म्हटले काय विचारायचे आहे . तो म्हणाला आमच्या लग्नाला ७ वर्षे झाली परंतु अद्याप संतती नाही; आमच्या दोघांच्या ट्रीटमेंट चालू आहेत . मार्च २०१८ मध्ये एक गर्भपात झाला आहे त्यानंतर काही नाही . मी म्हटले दोघांचे बर्थ डिटेल्स आहेत का ? हो, आहेत. मी ते लिहून घेतले . ते खालीलप्रमाणे --- प्रथम मी त्यांच्या पत्नीच्या पत्रिकेचा विचार करायचे ठरविले . कारण गर्भपात होतोय याचा अर्थ गर्भधारणा होतेय . .म्हणजे पतीकडे दोष असणार नाही.  स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ स्थिर राहत नाही . त्यामागे काय कार्यकारण भाव असावा हे पाहण्यासाठी स्त्री च्या पत्रिकेचा विचार प्रथम करायचे ठरविले .  

दिनांक---२३/९/१९८६        वेळ-- १६-२०       स्थळ अ १८,०७ रे ७५,०१

हि मकर लग्नाची कुंडली आहे . मी ज्यावेळी पत्रिका सोडवायला घेतली त्यावेळी खालील रुलिंग होते . 

दि २२/११/२०    वेळ १०-१८-४४

शुक्र * गुरु , मंगल , शनी , रवी 

नियम --पंचमाचा सब जर २,५,११ भावाचा कार्येश असेल तर २,५,११ कार्येश ग्रहांच्या दशेत संतती होते . 

या पत्रिकेत पंचमाचा सब शुक्र आहे . शुक्र रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे शुक्राचे  कार्येशत्व खालीलप्रमाणे

 PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9)   (4) 9  
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Jupiter (1)   2 11 (12)  Mars-Drusht  (11)   3 10
It's Sub :------------ Moon:- 3   7  Cusp Yuti: (4)    
It's Sub's N.Swami :-- Sun:- (8)    Cusp Yuti: (8)    
Itself aspects :------ 4

शुक्र १,२,४,८,९,११,१२ चा कार्येश आहे . यातील २,९,११ संतती होण्यास अनुकूल आहेत पहिल्या दोन स्टेप प्रमाणे घटना घडते व ३,४ स्टेप मुले घटनेचे परिणाम दिसून येतात . शुभ कि अशुभ . पहिल्या दोन स्टेपमुळे गर्भधारणा झाली परंतु ३-४ स्टेप मध्ये ४,८ हे भाव पूर्ण विरोधी असल्यामुळे गर्भपात झाला ३-४ स्टेप मध्ये पूर्ण विरोधी भाव असल्यामुळे संतती होण्याची शक्यता नाही. या व्यतिरिक्त अजून काही कारणे आहेत 

१) पंचमाचा सब शुक्र प्लूटो युतीत आहेत ( ६.५), शुक्राचा हर्षल बरोबर ३६.३ च अशुभ योग्य होत आहे तसेच ४ थ्या पायरीवर रवी चा प्लूटो बरोबर ३५. ७ चा व नेपच्यून बरोबर केंद्र योग्य ( ९२. ९) होत आहे 

२) गर्भधारणा होतेय परंतु गर्भपात होतोय याचा अर्थ गर्भ स्थिर राहात नाही म्हणजे याठिकाणी चर राशीचा संबंध असावा . पंचमाचा सब शुक्र तूळ या चर राशीत आहे . सब , राहूच्या नक्षत्रात आहे राहू मिन या द्विस्वभाव व बहुप्रसव राशीत आहे . परंतु राहू २८ अंश ११ कला वर आहे . द्विस्वभाव राशीमध्ये चर व स्थिर दोन्ही तत्वे आहेत .पहिले १५ अंश स्थिर तत्वाचे , १५ ते ३० अंश चर तत्वाचे आहेत . राहू २८ अंश आहे म्हणजे राहू चर तत्वामध्येच आहे . 

३) राहू शुक्र गुरु दशेत गर्भपात झाला त्यावेळी ----

राहू---५,६,८,१०

शुक्र ----१,२,४,८,९,११,१२

गुरु ----१,१०,१२

राहू शुक्र गुरु ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी आहेत . म्हणून गर्भपात झाला . 

४) कुंडलीची भाषा --नाशिकचे प्रकाशन या पुस्तकात स्त्री पुरुषांचे प्रजनन क्षमता पाहण्याचे सूत्र आहे यासंबंधी माझे मित्र श्री काजरेकर सर, व सौ प्रज्ञा तिखे मॅडम यांनी फेसबुक वर यापूर्वी लेख लिहिले होते . यामध्ये स्त्री च्या बाबतीत चंद्र , मंगळ ( मासिक धर्म ) व गुरु (संतती ) यांच्या राशी अंश कला ची बेरीज करायची असते जो बिंदू येईल त्यावरून लग्न  व नवमांश ठरवायचे जर लग्न  व नवमांश सम असतील तर प्रजनन क्षमता बलवान असते . लग्न  विषम व नवमांश सम असेल तर मध्यम बलवान ,( किंवा याच्या उलट ).लग्न  व नवमांश दोन्ही विषम असतील तर प्रजनन क्षमता दुर्बल असते . या पत्रिकेत -----

          रा   अंश    कला 

चंद्र----२ , ०७ , १३ 

मंगळ --९ , २८ , ३४

गुरु ----११, २२ , ३९

---------------------

           २३,  २८ , २६

११,२८ ,२६   रास कुंभ व नवमांश मिथुन आहे . दोन्ही विषम असतील तर प्रजनन क्षमता दुर्बल असते याठिकाणी प्रजनन क्षमता दुर्बल आहे म्हणून संतती होणार नाही . अजून  खात्री करण्यासाठी मी नंबर कुंडलीचा विचार करायचे ठरविले. . संबंधित स्त्री कडून मी एक नंबर घेतला स्त्री ने ४३ नंबर दिला . 

दि २२/११/२० वेळ १०-३६-४१   फलटण 

या पत्रिकेत पंचमाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व --

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12       Rashi-Swami Venus 5   12
It's N.Swami :-------- Mars:- (10)   6  
It's Sub :------------ Jupiter:- 8   7 8 11     Saturn-Yuti  8  9 10
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6)   (4)  
Itself aspects :------ 6

राहू पूर्ण विरोधी भावांचा कार्येश आहे . सबब सदर स्त्रीला संतती  होणार नाही असे खात्रीपूर्वक सांगता येईल. आता याला दुसरा पर्याय काय असू शकतो . दत्तक घेणे . 

नियम--- पंचमाचा सब ५,४ या दोन्ही भावांचा कार्येश असेल तर दत्तक घेता येईल. 

वरील मूळ पत्रिकेत पंचमाचा सब शुक्र आहे

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9)   (4) 9  
It's N.Swami :-------- Rahu:- (2)      Rashi-Swami Jupiter (1)   2 11 (12)  Mars-Drusht  (11)   3 10
It's Sub :------------ Moon:- 3   7  Cusp Yuti: (4)    
It's Sub's N.Swami :-- Sun:- (8)    Cusp Yuti: (8)    
Itself aspects :------ 4

शुक्र १,२,४,८,९,११ भावांचा कार्येश आहे . यात ५ भाव नाही . परंतु ९ भाव हा पंचमापासून पंचम येतो. म्हणून ९ भाव पंचम धरावयास काही हरकत नसावी . शुक्र ५व ४ या दोन्ही भावांचा कार्येश आहे . म्हणून सदर स्त्री दत्तक घेऊ शकते . महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा . 


शुभंम भवतु !!!No comments:

Post a Comment