Monday, 20 April 2020

Case Study--128 

प्रमोशन ---

 
  प्रशांतने माझ्याकडून बऱ्याच वेळा ज्योतिष विषयी सल्ला घेतला होता. त्याला त्याचा  अनुभव आला होता. प्रशांत एका MNC कंपनीत मार्केटिंग विभागात कामाला  आहे .. त्याचे काम हि चांगले आहे  वरिष्ठ त्याच्या कामावर खुश होते. .  म्हणून वरिष्ठ त्याची जबाबदारी वाढविण्याच्या विचारात होते . त्याच कंपनीतील एक दोघांचा परफॉर्मन्स फारसा चांगलं नव्हता. . वरिष्टांना त्याच्या कामाची पद्धत माहित होती. प्रशांतला जर वरील प्रमोशन  देऊ केले तर हा आणखी चांगले काम करेल असा त्यांना विश्वास वाटत होता. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. .प्रमोशन संदर्भातची कुणकुण प्रशांतला लागली होती . म्हणून त्याने मला प्रश्न विचारला , मला प्रमोशन मिळेल का? आणि केंव्हा मिळेल. ? मी म्हटले मनात हा विचार करून १ ते २४९ मधील एक संख्या सांग . त्याने थोडा विचार करून ६६ हि संख्या सांगितली . आजपर्यंत त्याने ज्याज्या वेळेला प्रश्न विचारला त्या त्या वेळेला त्याने ६० ते ७० मधीलच संख्या सांगितली होती. मी म्हटले प्रत्येक वेळेला ठराविकच संख्या कशा सांगतो ? तो म्हणाला माझ्या मनात त्याक्षणी जे येते तीच संख्या मी सांगत असतो. या संख्येनुसार कर्क लग्न येते. आणि कर्क लग्न येत असेल तर उत्तर होकारार्थी  द्यावे असा संकेत आहे .

दि ८ / ११ / २०१९  वेळ-११-४७-०३ स्थळ अ १७,५९ रे ७४,२६  के पी नंबर ६६

हि पत्रिका कर्क लग्नाची आहे .
  प्रमोशन --- दशमाचा सब किंवा नक्षत्रस्वामी २,६,१०,११ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत प्रमोशन मिळते त्याच बरोबर ३,५,९ भावांचा कार्येश असेल तर बदली होऊन प्रमोशन मिळेल. मा.श्री गोंधळेकर सर यांनी बदलीसाठी ३,१०,१२ भाव घ्यावेत असे सुचविले आहे .

या पत्रिकेत दशमाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 6       Rashi-Swami Jupiter 5   6
It's N.Swami :-------- Venus:- (5)   4 (11)  
It's Sub :------------ Moon:- (9)   (1) (2)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (5)   6  Cusp Yuti: (6)    
Itself aspects :------ 12केतू १,२,५,,६ ९,११ भावाचा कार्येश आहे यापैकी ५,९ बदलीसाठी अनुकूल आहेत. व २,६,११ प्रमोशन साठी अनुकूल आहेत . याचा अर्थ प्रशांतला प्रमोशन मिळणार हे निश्चितपणे सांगता येईल. आता केंव्हा मिळणार यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील . मी ज्यावेळी प्रश्न पहिला त्यावेळी गुरु मध्ये राहू अंतर्दशा चालू होती.

गुरुचे कार्येशत्व ----


PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 5   6  Cusp Yuti: (6)    
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Jupiter (5)   6
It's Sub :------------ Ketu:- 6       Rashi-Swami Jupiter 5   6
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   4 (11)  
Itself aspects :------ 12 10 2

गुरु  ५ बदलीसाठी व ६,११ प्रमोशन साठी अनुकूल आहे . प्रश्न  कुंडलीचे लग्न कर्क आहे हे लग्न चर  तत्वाचे आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे . म्हणून राहू अंतर्दशा विचारात घेतली . राहूचे कार्येशत्व ----


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (4)   12
It's N.Swami :-------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (4)   12
It's Sub :------------ Venus:- 5   4 11  
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (7) (8) 9  
Itself aspects :------ 6


राहू १२ बदलीसाठी व ६ भाव प्रमोशन साठी अनुकूल आहे .

आता विदशा अशी  शोधावी लागेल ती ३,१०,११ ची कार्येश असेल . ३, आता ज्या घरात राहतो ते बदलण्यासाठी १०,११  प्रमोशनसाठी .

त्यापुढील विदशा मंगळाची आहे  . मंगळाचे कार्येशत्व ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (3)   5 (10)  Cusp Yuti: (4)    
It's N.Swami :-------- Mars:- (3)   5 (10)  Cusp Yuti: (4)    
It's Sub :------------ Saturn:- 6   7 8 9  
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   4 (11)  
Itself aspects :------ 9 6 10मंगल ३, ५,१० ,११ या तीनही भावाचं कार्येश आहे .हा कालावधी गुरु राहू मंगल येतो ५ / ११ /२०१९ ते २६ / १२ /२०१९वरील कालावधीत प्रशांत ची बदली होऊन प्रमोशन मिळणार हे निश्चितपणे सांगतायेईल .

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्या वरिष्ठाने सांगितले तुझे प्रमोशन मंजूर झाले आहे . पुढील महिन्यात तुला नागपूरला जावयाचे  आहे तर त्या दृष्टीने तयारीला लाग . . प्रमोशन ऑर्डर नंतर पाठविण्यात येईल मी सांगितलेल्या कालावधीपेक्षा १० दिवसांनी वरिष्ठानी सांगितले आहे .
प्रशांत १ फेब्रुवारीला २०२० रोजी नागपूरला जॉईन झाला .


शुभंम भवतु !!!

No comments:

Post a Comment