कृष्णमूर्ति ज्योतिष

Sunday 16 June 2019

Case Study --78

सर, नोकरी लागली बरं  का S  S  S
                              माझ्या प्रा.मित्राचा मुलगा एम टेक  झाला आहे . त्याने मला नोकरी केंव्हा लागेल ? असा प्रश्न विचारला होता. मी कुंडलीचा अभ्यास करून तुला जून मध्ये नोकरी लागेल असे   सांगितले होते . १५ जूनला त्याने मला  फोन करून सांगितले सर , तुम्ही सांगितलेल्या पिरियड मध्ये मला एमएनसी कंपनीत  नोकरी लागली .आहे .  ५ लाखाचे पॅकेज मिळाले . सोमवारी १० जून laकंपनीत जॉईन झालो आहे. तयाचे विवरण खाली देत आहे
जन्म तारीख १५/१/९२  वेळ- ५-१५ पहाटे    स्थळ अ १८,०९ रे ७४,३५
हि धनुलग्नाची  पत्रिका आहे. लग्नाचा सब शुक्र आहे व चंद्राचा नक्षत्र स्वामी शुक्रच आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे .
दशम भावाचा  चा सब २,६,१० भावाचा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते  .
या पत्रिकेत दशम भावाचा सब मंगल आहे . मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ...
मंगळ..१,बु यू १,१०
केतू..७,बू.१,१० बू दृष्ट १,१०
शनी...२,३
चंद्र...५,८,गु दृष्ट ९,४

मंगळ २,६,१० पैकी २,१० भावाचा आहे . नोकरी लागणार हे निश्चित झाले . आता केंव्हा लागेल यासाठी दशा पाहू . प्रश्न पाहतेवेळी मंगल महादाशेमध्ये रवी ची अंतर दशा चालू होती . मंगल ग्रहाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे मंगल रवी दशा २८/४/२०१९ पर्यंत आहे .

मंगळ..१, बू यू १,१०
केतू..७, बू १,१०
शनी..२,३
चंद्र..५,८ गु दृष्ट ९,४
मंगल २,१० भावाचा कार्येश आहे . मंगल दशा अनुकुल  आहे . कुंडलीचे धनु लग्न म्हणजे दविस्वभव रवी अंतर दशेमध्ये घटना घडणार नाही म्हणून पुढील चंद्राची  अंतर दशा घेतली

चंद्र..
शुक्र..१२,६,११
शनी..२,३
चंद्र..५,८ गु दृष्ट ९,४
 चंद्र २,६,११ चा कार्येश आहे
मंगळ २,१० चंद्र २,६,११ या ठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली पुढील विदशां मी राहू ची निवडली कारण पुढील मंगल विदशा विरोधी भावांची ( ५,९ )कार्येश आहे . म्हणून मी राहू ची विदशा  निवडली
राहू...
शुक्र..१२,६,११
शुक्र..
बुध...१,१० मंगळ युती १ केतू दृष्ट ७

राहू ६,१०,११ चा कार्येश
मंगळ चंद्र राहू २८/५/१९ ते २०/६/१९ या कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले

हाच प्रश्न मी नंबर कुंडली ने सोडविला . त्याला मन एकाग्र करून १ ते २४९ या मधील एक संख्या सांग असे सांगितले त्याने २२५ हि संख्या सांगितली . के.पी. नंबर २२५ प्रमाणे मी नंबर कुंडली तयार केली .
दि १६/३/१९ वेळ १९-२३-४२ स्थळ  Phaltan
कुंभ लग्न कुंडली..आहे .
चंद्र हा मनाचा कारक म्हणून मनातील विचार जुळतो का ते पाहू . या कुंडलीत चंद्र पंचमात असून षष्टेश आहे चंद्र गुरूच्या नक्षत्रात आहे गुरु दशमात असून लाभेश व धनेश आहे म्हणजेच चंद्र ५,६ १०,११,२ चा कार्येश आहे याचा अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे . प्रश्न  जेंव्हा मनापासून अतिशय तळमळीने विचारला जातो तेंव्हा त्याचे उत्तर बऱ्याचअंशी बरोबरच येते

दशम भावाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
शनी..१०,१२,११ क यू
शुक्र...११,४,९,१२ क यू
बुध..१ क यू
गुरु...१०,१० क यू मंगलदृष्ट २,३

शनी २,१०,११ च कार्येश
नोकरी लागणार हे निश्चित झाले आता केंव्हा लागेल यासाठी दशा पाहू..
माझ्याकडे आला तेंव्हा
गुरु रवी दशा ६/६/१९ प.होती
गुरु..१० क यू
बुध..१,८,१ क यू r Yu १,७
शनी..१०,१२,११ क यू
शुक्र..११,४,९,१२ क यू

गुरु १०,११ चा कार्येश आहे.
कुंडलीचे लग्न कुंभ म्हणजे स्थिर लग्न म्हणून रवी दशा सोडून दिली.त्यापुढील चंद्राची दशा घेतली.
चंद्र...५,६,५ क यू रा यू ५ के दृष्टी ११
गुरु...१०,१० क यू. मं दृष्ट २,३
रवी..
गुरु...१०,१० क यू. म दृष्ट २,३

चंद्र २,६,१० भावाचा कार्येश आहे

याच ठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण होते म्हणून मी चंद्राची च विदाशा  घेतली.
गुरु चंद्र चंद्र..६/६/१९ ते १६/७/१९ याच कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले .
 दोन्ही कुंडलीमधील कॉमन कालावधी काढला तर  ६/६/१९ ते २०/६/१९ हा येतो जातक १० जुनला नोकरीमध्ये जॉईन झाला आहे

शुभम भवतू!!!

No comments:

Post a Comment