कृष्णमूर्ति ज्योतिष

Tuesday 11 June 2019

Case Study-74

 

पत्रिका मेलन


                   दोन दिवसांपूर्वी एक पत्रिका , पत्रिका जुळ विण्यासाठी आली होती. प्रथम मी आलेली पत्रिका तपासत असतो. पत्रिकेची वेळ बरोबर आहे का ते पाहत असतो. हे मी सब चंद्र संबंध पद्धतीने पाहत असतो . लग्नाचा सब रवी आहे सब चा संबंध चंद्राशी असला पाहिजे. सब रवी बुधाच्या नक्षत्रात आहे. चंद्र मिथुन राशीत आहे. चंद्राचा राशी स्वामी व लग्नाचा सब रवी चा  नक्ष्ट्रस्वामी बुध च आहे. म्हणजे लग्नाच्या सब चा चंद्राशी संबंध आहे याचा अर्थ पत्रिका बरोबर आहे.  ही पत्रिका विवाहासाठी आली आहे म्हणून मी ७ चा सब पहिला. ७ चा सब मंगळ आहे.
मंगळ..
शनी..७,९,७ क.यू. बू ध युती ६,४
शनी...७ क.यू.
शुक्र...७

७ चा सब ७,९ भावाचा कार्येश आहे. त्याच बरोबर ,६,४ च कार्येश आहे. वैवाहिक सौख्य असमाधान कारक.

लग्न कुंडलीत सप्तमात शनी बुध हर्षल व नेपच्यून.
सप्तम भाव  धनु १७,५६,४३ आहे
शनी १९-५१
बुध १६-३३
हर्षल १०-५९
नेप १७-३८
या चा अर्थ शनी बुध नेपच्यून सप्तम भवारंभी आहेत . आणि युतीत आहेत .
७ स्थानात शनी बुध असणे...
शनी बुध दोन्ही नपुसंक ग्रह आहेत. जोडीला नेपच्यून आहे. म्हणून  च वैवाहिक सुख असमाधान कारक. नंतर घटस्फोट वाटचाल सुरू होणार.  नेपच्यून मुले जोडीदाराकडून फसवणूक होऊ शकते . त्यामुळे पत्रिका जुळविण्याचा प्रश्न च आला नाही. संबंधित व्यक्तीला कळ विले. ही पत्रिका जुळत नाही.


No comments:

Post a Comment