Tuesday, 11 June 2019


   Case Studt-75

विवाह योग  केंव्हा आहे. ?
                           असा प्रश्र्न विचारला की . के पी अभ्यासक प्रथम रूलिंग घेतात. आणि संबंधीत भावाचा सब रूलिंग मधे आहे का ते पाहतात. असेल तर योग शोधण्याचा प्रयत्न करतात. सब नसेल तर पुढचा किंवा मागचा सब घेऊन वेळ निश्र्चित करतात. व पत्रिका सोडवितात.एक पत्रिका माझ्याकडे आली होती.सद्याचे मुलीचे वय ४३ होते. 
(गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख वेळ दिली नाही )
माझे मत...
         विवाह योग्य वय किती असते साधारणपणे २५ वर्षे  . आता व्यक्ती चे वय किती आहे .? ४३ चालू आहे. म्हणजे मागील १८ वर्षात योग आलेच नाहीत का ? का आले नाहीत याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. याचा  विचार व्हावयास हवा. उशिर का होतोय हे समजले की पुढे जाता येईल.
कारण २ ७ ११ / ५ ८ हे भाव कोठेना कोठे येत राहणार आहेत. म्हणून अमूक अमूक कालावधी त विवाह होईल असे म्हणायचे का ?. दुसरे असे प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी कुंडली पाहणार म्हणजे प्रत्येकाचे संबंधित भावाचे  सब वेग वेगळे येणार. प्रत्येकाचा कालावधी वेग वेगळा येणार.....  असो
         मि माझे मत मांडतो .....या कुंडलीत चंद्र शनी नक्षत्रात व युतीत आहे. हि युति पंचम भावारंभी आहे . शनीची दृष्टी सप्तम , लाभ, व कुटुंब स्थानावर आहे . २,७,११ हि विवाहाची प्रमुख स्थाने आहे  ह्या स्थानावर शनीची  दृष्टी म्हणून विवाहाचा योग उशिरा आहे . उशिरा म्हणजे किती उशिरा तर ज्यावेळी व्हावा अशी अपेक्षा असते त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. शनीचा संबंध विवाहाशी येतो त्यावेळी माझ्या अभ्यासाप्रमाणे विवाह २९--३२ या वयात होतो. अजून एक सगळ्यात महत्वाचा योग म्हणजे रवी प्लूटो युती सप्तम भावारंभी आहे. स्त्री च्या पत्रिकेत रवी म्हणजे पति . प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे. तो ज्याच्या युतित असतो त्या ग्रहाच्या फळात न्यूनता निर्माण होते. ज्या भावारंभी असतो त्या भावाचे फळ देत नाही. 
( मा. गोंधळेकर सर यांचे संशोधन ) 
 कृष्णमूर्ती पद्धत  ३ स्टेप पर्यंत आहे . १) ग्रह २) ग्रहाचा नक्षत्रस्वामी ३) ग्रहाचा उपनक्षत्रस्वामी 
ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो. हा महत्वाचा नियम आहे आणि त्याचा सब , फळ शुभ असेल का अशुभ असेल ते सांगतो. कधी कधी  एखादी घटना घडेल   असे सूचित केले असेल तरी सुद्धा घटना घडत नाही . असे का होते यावर मा.गोंधळेकर यांनी संशोधन करून असे सिद्ध केले कि भावाच्या सब च्या सब  चा नक्षत्रस्वामी घेतला तर घटना का होत नाही हे लक्षात येते . त्याला त्यांनी ४ स्टेप थेअरी असे नाव दिले आहे .

या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व....
शनी...४ ११ १२ ५ क.यू चं द्रुष्ट ४
शनी...४ ११ १२ ५ क यू चं द्रुष्ट ४
केतू...
रवी ...६

शनी ३-४ पायरीला पुर्णपणे अशुभ ,विरोधी  आहे.  या ठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली . म्हणून

 सदर व्यक्तीचा विवाह होणार नाही ....

2)  उदाहरण  दुसरे   सब ची प्रतिकूलता 
२०१२ साली  एक व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली  आतापर्यंत इतरांचे रिडींग चुकले आहे . हि माझ्या मुलीची पत्रिका  आहे . हीच विवाह योग  केंव्हा आहे असे विचारले 
( गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख वेळ दिलेली नाही )

प्रश्न पहाते  वेळी सप्तमाचा सब गुरु होता. 
दि. --७/६/२०१८ वेळ .. १=३७=२७ दुपारी फलटण   
एल --बुध एस गुरु आर.. शनी  डी --गुरु ,एल एस .. रवी 
सप्तमाचा सब गुरु रुलिंगमध्ये आहे पत्रिका बरोबर आहे . चंद्र शनी च्या नक्षत्रात आहे ..... पुनरफू योग 

 या पत्रिकेत सप्तमाचा सब गुरु आहे 
गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे बलवान भावच दिले आहेत 
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 8   5 8     Rahu-Yuti  8    Ketu-Drusht  2  
It's N.Swami :-------- Mercury:- (8)   2 (11)   
It's Sub :------------ Mercury:- 8   2 11   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (4)   (6) 7   
Itself aspects :------ 2 12 4

गुरु दुसऱ्या पायरीला ८ या दुय्यम भावाचा व ११ या प्रमुख भावाचा कार्येश आहे परंतु ३--४ स्टेपला 
४ , ६ या भावाचा कार्येश आहे . हे भाव पूर्णपणे विरोधी आहेत . 
सबब सदर मुलीचा विवाह अध्याप पर्यंत झाला नाही 

याठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली 

अशा प्रकारच्या जन्म पत्रिका असूनसुद्धा म्हणजे सब ची प्रातिकूलता असताना सुद्धा काहींचे विवाह झाले आहेत. त्याच्या बाबतीत काय घडले ते पाहू 

१) (गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख यावेळी दिली नाही )
प्रश्न पाहाते वेळी चे रुलिंग खालीलप्रमाणे 
दि १७/१२/१८ १०=४६=०१ रात्री फलटण 
Ls --केतू , L --रवी , S --बुध , R --गुरु , D --चंद्र 

या पत्रिकेत सप्तमाचा सब गुरु आहे . गुरु रुलिंगमध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे . 
गुरु कार्येशत्व .. 
गुरु ---
शुक्र .. ५,१०,६ क .यु. 
शुक्र .. ६ क.यु. 
चंद्र .. ६

गुरु ३--४ पायरीला ६ या भावाचा कार्येश आहे . विवाहासाठी पूर्ण विरोधी आहे . तरीसुद्धा ह्या मुलीचा विवाह झालेला आहे . परंतु वैवाहिक जीवन  असमाधानकारक . मुलगी शिकलेली आहे मुलगा कमी शिकलेला . एका दुकानात कामाला आहे . पती पत्नीमध्ये संवाद शून्य , कारणापुरताच . पगार कधी देतो कधी देत नाही. हीच ट्युशन घेते आणि घराचा खर्च भागविते . नवऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही. घटस्फोट घेतला तरी पुढे काय? सगळा  अंधारच . थोडक्यात पत्रिका विवाह दाखवत नसेल आणि तरी सुधा विवाह झाला असेल तर संसार सुख असमाधानकारक असते हेच या उदाहरणावरून दिसून येते. 


1 comment:

  1. Civil Lab Equipment Manufacturer is the leading Manufacturer, Supplier and Exporter of Civil Engineering Lab Equipments or instruments. Established in 2005.

    Mob: +91-9891445495, +91-8448366515, +918587026175
    Phone : +91-11-23657121
    Website : http://setestindia.com, http://civillabequipmentmanufacturer.com

    ReplyDelete