Thursday, 4 July 2019

Case Study-79

आज एक प्रश्न आला आहे.
परदेशी कंपनी मध्ये पैसे गुंतविले आहेत. ते केंव्हा मिळतील ? सदर व्यक्तीने लंडन मधील माईनिंग कंपनी मध्ये पैसे गुंतविले आहेत. कंपनी त्याला पैसे देऊ करते, पण ती कमिशन मागते. तुम्ही कमिशनचे पैसे पाठवा लगेचच आम्ही तुमच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करतो. सदर व्यक्तीकडे कमिशन एवढे पैसे नाहीत. त्याने सांगितले कमिशन वजा करून पैसे पाठवा. कंपनी म्हणतेय तसे आम्ही करू शकत नाही.म्हणून त्याने हा प्रश्न मला विचारलं आहे.
ह्यासाठी दोन वेगवेगळे नियम वाचण्यात आले आहेत काही ठिकाणी २ भावाचा सब पहावा असे म्हटले आहे. दुसरा भाव हा आपण बँकेत असलेली रोकड,डाग दागिने,किंवा deposits दर्शवितो. म्हणजे दोन भावाचा सब २,६,११ चा कार्येश असेल तर २,६,११ च्या संयुक्त दशेत पैसे मिळतील. दुसरा नियम ८ चा सब २,६,११ चा कार्येश असेल तर त्यांच्या दशेमध्ये पैसे मिळतील.

के.पी. नं २०१ दि १५/६/१९ ११-५०-२५ Phaltan

मकर लग्न
ह्या पत्रिकेमध्ये २,८ चा सब शनी आहे.
२ व ८ च सब शनी

शनी..१२ क यू
शुक्र..४
बुध..६
गुरु...१०,३,११ क यू

शनी ६,११ चा कार्येश आहे म्हणजे पैसे मिळणार पहिल्या दोन पायरीवर ४,१२ मुले गुंतवणूक दिसते आहे परंतु ३-४ पायरीला बुधा वर प्लुटो ची दृष्टी १७४अंश ३० कला व
गुरु बरोबर ३३,४२ चा अशुभ योग करीत आहे. प्लुटो योगामुळे पैसे मिळणार नाहीत.(माझे गुरू श्री गोंधळेकर सरांचे प्लुटो वरील संशोधन )प्लुटो इतर ग्रहांबरोबर ३६,७२ अंशाचा अशुभ योग करीत असेल संबंधित घटना घडत नाही असा आजपर्यंत चा अनुभव आहे.

आता दशा बघू..

शनी शनी २५ डिसेंबर २०२० प.आहे.

शनीचे कार्येश आपण पहिलेच आहे.त्यानंतर शनी बुध ४सप्टेंबर २०२३ प.आहे.
शनी प्लुटो बरोबर युती ३,३६
सबब पैसे मिळणार नाहीत.

याची खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडे मूळ कुंडली ची मागणी केली.
ती खालीलप्रमाणे
२१/४/७९ १३-३० अ १९,५२ रे ७५,२०
लग्नाचा सब मंगळ आहे व चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आहे सब चंद्र संबंध आहे. म्हणजे वेळ बरोबर आहे. ही कुंडली कर्क लग्नाची आहे.

विशेष म्हणजे याही पत्रिकेत २,८ चा सब शनी च आहे

शनी..
शुक्र. .८,४,११ गुरु दृष्ट १२,६
शुक्र...
शनी...१
शनी ३-४ पायरीला पूर्ण विरोधी आहे. या ठिकाणी प्लुटो चा कोणताही योग नाही.

प्रश्न kundaline दिलेले उत्तर व मूळ कुंडली मधील उत्तर यांच्यात एकवाक्यता दाखवीत आहे.

शुभम भवतु !!!

1 comment:

  1. Civil Lab Equipment Manufacturer is the leading Manufacturer, Supplier and Exporter of Civil Engineering Lab Equipments or instruments. Established in 2005.

    Mob: +91-9891445495, +91-8448366515, +918587026175
    Phone : +91-11-23657121
    Website : http://setestindia.com, http://civillabequipmentmanufacturer.com

    ReplyDelete