कृष्णमूर्ति ज्योतिष

Friday 14 June 2019

Case Study ==77

जन्मवेळ निश्चित करणे .
                                 नागपूर येथील   एका स्त्री ने फेसबुक वरील लेख वाचून मला फोन केला.  . लग्न होऊन २५ वर्षे झाली . पहिली काही वर्षे चांगली गेली .पण नंतर सासू सासर्याच्या त्रास सुरु झाला . परंतु नवरा चांगला आहे . त्याच्याकडून मला काही त्रास झाला नाही . पण इतरांचे करण्यात त्यांनी आतापर्यंत पैसा  खर्च केला आणि डोंगराएवढे कर्ज करून ठेवले . मला एक मुलगा आहे . नवरा स्वतः हि खर्चिक आहे .  घरातील सर्वचजण आपापल्या तंद्रीत असतात. मी फक्त रांधा , वाढा,  उष्टी काढा एवढेच करत राहिले  मी फक्त सगळ्यनसाठी राबत राहिले , माझ्या मनांचा कोणी विचारच करत  नाही. माझ्याकडे कोणाचे लक्षच  जात नाही . माझे काही दुखलं खुपलं तरी कोणी लक्ष देत नाहीत . त्यामुळे नैराश्य आले  आहे मीच माझ्या घरात परकी झालेय . माझ्या घरात माणसे आहेत पण तरी सुद्धा घरात मी  एकटीच असते .
                              मला फक्त जन्म तारीख माहित आहे  पण वेळ माहित नाही . वेळ रात्रीची आहे एवढेच आई सांगते . त्यामुळे  माझ्याकडे माझी पत्रिका नसल्यामुळे मला योग्य ज्योतिष विषयी मार्गदर्शन मिळत नाही .मी विचारले तारीख नक्की आहे का ? स्त्री म्हणाली तारीख नक्की आहे . मी विचारले , वेळ रात्री १२ नंतरची आहे का अगोदरची आहे . ती म्हणाली तेही मला माहित नाही . रात्री आहे एवढे नक्की . मी म्हटले ठीक आहे .मी प्रयत्न करतो . मला तारीख व जन्मस्थळ सांगा . तिने खालील तारीख दिली
२९ / जून /१९७८ वेळ- रात्री जन्मस्थळ रे ७५,४८ अ १८,०३

कृष्णमूर्ती पद्धती मध्ये जन्मवेळ काढता येते . हे फक्त रुलिंग प्लॅनेट वरून शक्य आहे . प्रथम मी पत्रिका काढायला सुरुवात केली त्यावेळेचे रुलिंग घेतले
दि २८/५/२०१९ वेळ -१७-४७-०३ फलटण

Ls गुरु , L -शुक्र , S -गुरु , R -गुरु , D -मगंळ

रुलिंग मध्ये मंगल गुरु शुक्र हे तीन ग्रह आहेत .
१) मंगळ च्या राशी मेष व वृश्च्छिक
२) गुरुचया राशी धनु व मिन
३) शुक्राच्या राशी वृषभ व तुला

मेष,वृश्च्छिक धनु मिन वृषभ किंवा तुला यापैकी कोणतेतरी लग्न असले पाहिजे . यापैकी लग्न कोणते असेल हे ठरविण्यासाठी जातकाने  दिलेल्या तारखेला रात्रीच्या वेळेत कोणती लग्ने  येतात ते पाहू . आता रात्र म्हणजे कोठून कोठपर्यंत घ्यायची हे आधी ठरवावे लागेल . साधारणपणे संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ ७ ते ७-३० असते . म्हणजे रात्री ८ ते  पहाटे ३ पर्यंत च्या काळाला  रात्र म्हणावयास काही हरकत नसावी असे मला वाटते आता आपण रात्रीचा कालावधी ठरविला आहे . या वेळेत कोणती लग्ने  येतात ते पाहू .

१) मकर २०-०८-३० ते २१-५८-५५
२) कुंभ २१-५८-५५ ते २३-३६-३७
३) मिन २३-३६-३७ ते २५-११-५२ ( १-११-५२ am )
३) मेष २५-११-५२ ते २६-५५-४८  (१-११-५२ ते २-५५-४८am )
रात्री ८ पासून पहाटे ३ पर्यंत मकर कुंभ मिन मेष हि लग्ने येतात. यापैकी मकर व कुंभ राशी स्वामी शनी रुलिंग मध्ये नाही म्हणजे मकर व कुंभ लग्न असणार नाही हे निश्च्छित झाले . राहिलेले मिन राशीचा स्वामी गुरु व मेष राशीचा स्वामी मंगल रुलिंगमध्ये आहे त्यामुळे यापैकी कोणते तरी एक लग्न असणार . रुलिंगमध्ये गुरु लग्न नक्षत्र स्वामी म्हणून आला आहे व मंगल वाराचा स्वामी म्हणून आला आहे . प्रतवारीचा विचार करता गुरु मंगळापेक्षा  श्रेष्ठ आहे म्हणून कुंडलीचे लग्न मिन असले पाहिजे . आता लग्न नक्षत्र ठरवायचे. मिन राशी मध्ये गुरु शनी बुध ची नक्षत्रे आहेत  यापैकी शनी बुध रुलिंग मध्ये नाहीत  म्हणून गुरुचे नक्षत्र घयावे लागेल . ( गुरु तीन वेळा रुलिंगमध्ये आलेला आहे )लग्न मिन , नक्षत्र गुरु  इथपर्यंत निच्छित झाले . आता सब व सब सब ठरवावा लागेल. हे ठरविण्यासाठी आपणास कृष्णमूर्ती चे उप उप चे कोष्टक पाहावे लागेल . या कोष्टकामधे मिन लग्न गुरु नक्षत्र च्या पुढे फक्त चंद्र, मंगळ व राहू चे सब शिल्लक आहेत यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणून मंगळ सब घ्यावा लागेल आणि शिल्लक राहिलेला शुक्र सब सब घ्यावा लागेल . थोडक्यात मिन लग्न गुरु नक्षत्र मंगळ सब शुक्र सब सब उदित असताना जातकाचा जन्म झाला असे म्हणता येईल.

यानंतर सॉफ्टवेअर मधील ट्रान्झिट हा ऑप्शन वापरून मिन लग्न गुरु नक्षत्र मंगळ सब शुक्र सब सब कोणत्यावेळेला उदित होते हे आपल्याला ठरविता येईल . ती वेळ येते रात्री ११-४०-१७ pm

दि २९/जून/१९७८ रोजी रात्री ११-४०-१७ वाजता  जातकाचा जन्म झाला असे निश्च्छित सांगता येईल जातकाची वेळ निश्च्छित झाली पण आपण काढलेली वेळ बरोबर आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे . ह्यासाठी मी सब--चंद्र संबंध थेअरी वापरतो. ( किशोर कुमार चे संशोधन )शिवाय आयुष्यातील घटना तपासून पाहतो.
चला तर,  सब --चंद्र थेअरी काय दर्शवते पाहू .....
यासाठी मी जातकाकडून तिच्या पतीची व मुलाची जन्मटिपण मागवून घेतले .
जातकाच्या लग्नाचा संबंध त्याच्या चंद्राशी असला पाहिजे . जातकाच्या पत्रिकेत लग्नाचा सब मंगळ आहे व जातकाचा चंद्र राशी स्वामी मंगलच आहे .

१) पती... चंद्र वृषभ ( शुक्र ) राशीत रोहिणी (चंद्र ) नक्षत्रात
२) मुलगा ... चंद्र कन्या ( बुध   ) राशीत चित्रा  (मंगळ  ) नक्षत्रात
१) जातकाच्या कुंडलीत सप्तम स्थान हे पतीचे स्थान आहे सप्तमाचा सब चा संबंध पतीच्या चंद्र राशी अथवा नक्षत्राशी असावा . जातकाच्या कुंडलीत सप्तमाचा सब राहू  कन्या राशीत रवी नक्षत्रात आहे . पत्नीचा ७ चा सब राहू चा  नक्षत्रस्वामी रवी व पतीच्या पत्रिकेतील चंद्र नक्षत्र स्वामी शुक्र हे युतीत आहेत. येथे सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला
२) जातकाच्या पत्रिकेतील पंचम स्थान हे प्रथम संततीचे स्थान आहे . पंचमाचा सब चा संबंध मुलाच्या पत्रिकेतील चंद्र राशीशी अथवा नक्षत्राशी  असावा . जातकाच्या पत्रिकेत पंचमाचा सब राहू आहे . राहू कन्या राशीत रवी नक्षत्रात आहे.  सब राहूचा  राशी  स्वामी बुध व मुलाचा चंद्र राशी  स्वामी बुध  च आहे . येथे सुद्धा सब चंद्र संबंध प्रस्थापित झाला .

म्हणजे आपण ठरविलेली वेळ बरोबर आहे . आता त्यांच्या आयुष्यातील विवाह घटना तपासून पाहू.

१) विवाह ---९/५/९५
या पत्रिकेत सप्तमाचा सब राहू आहे राहू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Mercury 4   4 7
It's N.Swami :-------- Sun:- (4)   6
It's Sub :------------ Ketu:- 1       Rashi-Swami Jupiter 4   1 10
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (11) (12)  Cusp Yuti: (6)  
Itself aspects :------ 1
सप्तमाचा सब राहू ४ थ्या पायरीवर फक्त ११ या भावाचा कार्येश आहे . म्हणून विवाह फक्त झाला .ज्यावेळी विवाहाशी राहू चा संबंध येतो त्यावेळी त्याला विजोड विवाह ( कॉन्ट्रास्ट ) असे म्हणतात. लग्नाच्या वेळी जातकाचे वय नुकतेच १७ संपून १८ वे लागा;ले होते आणि पती इंजिनिअर होऊन नोकरीला लागले होते .  त्याच बरोबर ४,६,१२ या विरोधी भावाचा कार्येश असल्यामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक. विवाह होणे आणि वैवाहिक सौख्य मिळणे या दोन्ही मध्ये खूप अंतर आहे . 

या कालावधीत शुक्र शनि गुरु शनी केतू दशा होती .

शुक्र .... १,२,४,५,१०
शनी... १,४,६,७,१०
गुरु ... १,४,६,१०
शनी... १,४,६,७,१०
केतू ... ६,११,१२

या दशेमध्ये २,५,७,११ हे भाव विवाहाला  अनुकूल परंतु त्याच बरोबर १,४,६,१०,१२ हे प्रतिकूल भाव सुद्धा आहेत म्हणून वैवाहिक सौख्य असमाधान कारक आहे. या पत्रिकेची वेळ सब-चंद्र संबंध पद्धतीने बरोबर येते . शिवाय विवाह व वैवाहिक सौख्य याची पण आपण पडताळणी केली ती सुद्धा बरोबर आली . म्हणजे आपण ठरविलेली वेळ बरोबर आहे

!! शुभम भवतु !!

No comments:

Post a Comment