कृष्णमूर्ति ज्योतिष

Monday, 20 April 2020

Case Study--128 

प्रमोशन ---

 
  प्रशांतने माझ्याकडून बऱ्याच वेळा ज्योतिष विषयी सल्ला घेतला होता. त्याला त्याचा  अनुभव आला होता. प्रशांत एका MNC कंपनीत मार्केटिंग विभागात कामाला  आहे .. त्याचे काम हि चांगले आहे  वरिष्ठ त्याच्या कामावर खुश होते. .  म्हणून वरिष्ठ त्याची जबाबदारी वाढविण्याच्या विचारात होते . त्याच कंपनीतील एक दोघांचा परफॉर्मन्स फारसा चांगलं नव्हता. . वरिष्टांना त्याच्या कामाची पद्धत माहित होती. प्रशांतला जर वरील प्रमोशन  देऊ केले तर हा आणखी चांगले काम करेल असा त्यांना विश्वास वाटत होता. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. .प्रमोशन संदर्भातची कुणकुण प्रशांतला लागली होती . म्हणून त्याने मला प्रश्न विचारला , मला प्रमोशन मिळेल का? आणि केंव्हा मिळेल. ? मी म्हटले मनात हा विचार करून १ ते २४९ मधील एक संख्या सांग . त्याने थोडा विचार करून ६६ हि संख्या सांगितली . आजपर्यंत त्याने ज्याज्या वेळेला प्रश्न विचारला त्या त्या वेळेला त्याने ६० ते ७० मधीलच संख्या सांगितली होती. मी म्हटले प्रत्येक वेळेला ठराविकच संख्या कशा सांगतो ? तो म्हणाला माझ्या मनात त्याक्षणी जे येते तीच संख्या मी सांगत असतो. या संख्येनुसार कर्क लग्न येते. आणि कर्क लग्न येत असेल तर उत्तर होकारार्थी  द्यावे असा संकेत आहे .

दि ८ / ११ / २०१९  वेळ-११-४७-०३ स्थळ अ १७,५९ रे ७४,२६  के पी नंबर ६६

हि पत्रिका कर्क लग्नाची आहे .
  प्रमोशन --- दशमाचा सब किंवा नक्षत्रस्वामी २,६,१०,११ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत प्रमोशन मिळते त्याच बरोबर ३,५,९ भावांचा कार्येश असेल तर बदली होऊन प्रमोशन मिळेल. मा.श्री गोंधळेकर सर यांनी बदलीसाठी ३,१०,१२ भाव घ्यावेत असे सुचविले आहे .

या पत्रिकेत दशमाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 6       Rashi-Swami Jupiter 5   6
It's N.Swami :-------- Venus:- (5)   4 (11)  
It's Sub :------------ Moon:- (9)   (1) (2)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (5)   6  Cusp Yuti: (6)    
Itself aspects :------ 12



केतू १,२,५,,६ ९,११ भावाचा कार्येश आहे यापैकी ५,९ बदलीसाठी अनुकूल आहेत. व २,६,११ प्रमोशन साठी अनुकूल आहेत . याचा अर्थ प्रशांतला प्रमोशन मिळणार हे निश्चितपणे सांगता येईल. आता केंव्हा मिळणार यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील . मी ज्यावेळी प्रश्न पहिला त्यावेळी गुरु मध्ये राहू अंतर्दशा चालू होती.

गुरुचे कार्येशत्व ----


PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 5   6  Cusp Yuti: (6)    
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Jupiter (5)   6
It's Sub :------------ Ketu:- 6       Rashi-Swami Jupiter 5   6
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   4 (11)  
Itself aspects :------ 12 10 2

गुरु  ५ बदलीसाठी व ६,११ प्रमोशन साठी अनुकूल आहे . प्रश्न  कुंडलीचे लग्न कर्क आहे हे लग्न चर  तत्वाचे आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे . म्हणून राहू अंतर्दशा विचारात घेतली . राहूचे कार्येशत्व ----


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (4)   12
It's N.Swami :-------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (4)   12
It's Sub :------------ Venus:- 5   4 11  
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (6)   (7) (8) 9  
Itself aspects :------ 6


राहू १२ बदलीसाठी व ६ भाव प्रमोशन साठी अनुकूल आहे .

आता विदशा अशी  शोधावी लागेल ती ३,१०,११ ची कार्येश असेल . ३, आता ज्या घरात राहतो ते बदलण्यासाठी १०,११  प्रमोशनसाठी .

त्यापुढील विदशा मंगळाची आहे  . मंगळाचे कार्येशत्व ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (3)   5 (10)  Cusp Yuti: (4)    
It's N.Swami :-------- Mars:- (3)   5 (10)  Cusp Yuti: (4)    
It's Sub :------------ Saturn:- 6   7 8 9  
It's Sub's N.Swami :-- Venus:- (5)   4 (11)  
Itself aspects :------ 9 6 10



मंगल ३, ५,१० ,११ या तीनही भावाचं कार्येश आहे .



हा कालावधी गुरु राहू मंगल येतो ५ / ११ /२०१९ ते २६ / १२ /२०१९



वरील कालावधीत प्रशांत ची बदली होऊन प्रमोशन मिळणार हे निश्चितपणे सांगतायेईल .

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्या वरिष्ठाने सांगितले तुझे प्रमोशन मंजूर झाले आहे . पुढील महिन्यात तुला नागपूरला जावयाचे  आहे तर त्या दृष्टीने तयारीला लाग . . प्रमोशन ऑर्डर नंतर पाठविण्यात येईल मी सांगितलेल्या कालावधीपेक्षा १० दिवसांनी वरिष्ठानी सांगितले आहे .
प्रशांत १ फेब्रुवारीला २०२० रोजी नागपूरला जॉईन झाला .


शुभंम भवतु !!!

Case Study--120    

 संतती ----


        मुलीचा विवाह झाला तरी आईवडिलांची जबाबदारी संपत नाही . मुलीला एखादी संतती झाली कि आईवडिल खऱ्या अर्थाने जबाबदारीतून मोकळे होतात. पण जर संतती होत नसेल तर काळजी वाढत जाते मग वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात , टेस्ट सर्व नॉर्मल येत असूनसुद्धा संतती होत नसेल तर मात्र टेन्शन वाढत जाते. नंतर ivf टेस्ट घेऊन संतती साठी प्रयत्न केला जातो. तरीही संतती होत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून ज्योतिषाकडे पावले वळतात . अशाच एका स्त्री चा फोन येतो .....  ....मला एक प्रश्न विचारायचा आहे . मला संतती केंव्हा होईल ? आमच्या लग्नाला जवळजवळ १० वर्षे झाली अद्याप संतती नाही. सर्व टेस्ट पॉसिटीव्ह असून सुद्धा  संतती झाली नाही . ivf  टेस्ट सुद्धा ३-४ झाल्या तरीसुद्धा संतती झाली नाही. तर माझ्या नशिबात संततीचा योग्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला . मी म्हटले तुमचे बिर्थ डिटेल्स द्या  .( गोपनीयतेच्या कारणास्तव  या ठिकाणी  बर्थ डिटेल्स दिलेले नाहीत )

                                 हि मकर लग्नाची पत्रिका आहे. प्रथम मी पत्रिका बरोबर आहे कि नाही ते पाहत असतो. लग्नाचा सब गुरु आहे गुरु कुंभ राशीत पूर्व भाद्रपद नक्षत्रात (गुरु ) आहे . चंद्र कर्क राशीत पुष्य नक्षत्रात आहे . सब गुरूचा राशी स्वामी शनी आहे तोच चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे . तसेच इंटर्क्सप्ल लिंक थेअरी प्रमाणे लग्नाचा सब सब शनी आहे आणि चंद्राचा नक्षत्रस्वामी शनी आहे . पत्रिका ची वेळ बरोबर आहे .

 पंचमाचा सब २,५,११ भावाचा कार्येश असेल तर २,५,११ या भावांच्या संयुक्त दशेत संतती होते
या कुंडलीत पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे .....

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9)   (5) 10     Jupiter-Drusht  (2)   (3) (12)
It's N.Swami :-------- Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
It's Sub :------------ Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
Itself aspects :------ 4

शुक्र २ ,५ ,३ ,९चा कार्येश  आहे    २,५ चा कार्येश असूनसुद्धा संतती झाली नाही. भाव ३,९ सुद्धा अनुकूल आहेत . संतती न होण्याचे कारण काय असू शकेल ? तिसऱ्या चौथ्या पायरीला २,३ भाव अनुकूल आहेत पण ४,१२ हे भाव पूर्ण प्रतिकूल आहेत -----
 याठिकाणी शुक्र प्लूटो या ग्रहाच्या पूर्ण युतीत ( ५. ४अंश ) आहे तसेच गुरु बरोबर नेपच्यून या ग्रहाचा ७०. ६ अंशाचा अशुभ योग्य आहे . मंगळ चा  नेपच्यून बरोबर ७१.. ३ चा अशुभ योग्य आहे . या नेपच्यून प्लूटो योगामुळे आज पर्यंत संतती झालेली नाही.

{ पारंपरिक नुसार पंचमेश शुक्र ----
( मकर लग्नाला शुक्र राजयोगकारक ) पंचमेश दशमात व्ययेश गुरूने दृष्ट . पंचमेश शुक्र प्लुटोच्या युतीत . पंचमावर शनी बुध  हर्षल ची दृष्टी  संतती कारक गुरु , व्ययेश गुरु दुसर्या स्थानात गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा नाश करतो कुटुंब वृद्धी नाही मंगळाची पंचम स्थानावर दृष्टी पंचम स्थानावर दोन पाप ग्रहांची दृष्टी येते (शनी मंगल ) . तसेच चंद्राकडून पहिले तर पंचमेश मंगल चंद्राच्या अष्टमात .चंद्राकडून मंगल राजयोगकारक पण तो अष्टमात षष्टेश गुरु ने युक्त }वरील  कारणाने आजपर्यंत  संतती झाली नाही .

सब जर नकार दर्षवित  असेल तर दशा पाहण्याची आवशक्यता नसते तरी सुद्धा मी दशा  पहिल्या प्रथम कुंडली पाहताना शुक्र मध्ये राहू दशा चालू होती .
शुक्राचे कार्येशत्व आपण पहिलेच आहे . राहू चे कार्येशत्व---

 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)    Cusp Yuti: (3)      Rashi-Swami Jupiter (2)   (3) (12)
It's N.Swami :-------- Mercury:- (11)   (6) 9  Cusp Yuti: (11)       Saturn-Yuti  (10)   (1) 2
It's Sub :------------ Mars:- 2   4 11  Cusp Yuti: (2)       Jupiter-Yuti  2  3 12
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
Itself aspects :------ 9


राहू बुध  नक्षत्रात बुध  प्लूटो ३५. ८ अशुभ योग्य आहे मंगल गुरु बरोबर नेपच्यून अशुभ  योग शिवाय  चौथ्या पायरीवर   ४, १२ हे भाव पूर्ण अशुभ ( ४ भाव --पंचमचे व्यय  व  १२ पंचमापासून अष्टम )

संतती होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल . पण हि गोष्ट स्त्रीला सांगणे हे फार अवघड आहे . ह्याला पर्याय काय असू शकेल . दत्तक घेणे . परंतु दत्तक घेण्याचे योग  असले पाहिजे.

दत्तक नियम ---पंचमाचा सब ५ चा कार्येश असून ४ चा कार्येश असेल तर ती व्यक्ती एखादी संतती दत्तक घेते.

पंचम भावाचा सब शुक्र आहे शुक्र ५ व ४ या दोन्ही भावाचा कार्येश आहे त्यामुळे ह्या जातकाला दत्तक घेता येईल . म्हणून मी त्यांना दत्तक घेण्याबद्दल सुचविले . मी सांगण्या अगोदरच त्यांनी दत्तक घेण्याबद्दल विचारविनिमय सुरु केला होता ....

उदाहरण --२

दि--- / ---/१९९२   सकाळी--६-२०

हीचा  विवाह २०१६ रोजी झाला

या पत्रिकेत पंचमाचा सब बुध  आहे बुधाचे कार्येशत्व --

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (1)   1 10     Mars-Drusht  (10)   3 (8)
It's N.Swami :-------- Moon:- (10)   (11)  Cusp Yuti: (11)    
It's Sub :------------ Mars:- 10   3 8  
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (3)      Rashi-Swami Jupiter (12)   (4) (7)  न . केतू ९, १
Itself aspects :------ 7

बुध  ४ त्या पायरीला १२,४,व  एकूण १२,४, १, ८  या प्रमुख विरोधी भावाचा कार्येश आहे संतती झाली नाही.

ह्याची खात्री करहाण्यासाठी हाच प्रश्न मी प्रश्न कुंडलीवरून ( नंबर कुंडली ) सोडविण्याचे ठरविले
ह्या मुलीला मी म्हटले,  मनात मला संतती केंव्हा होईल असा विचार करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा तिने ८७ हि संख्या सांगितली . या वरून मी कुंडली तयार केली .

दि २९ / १० / २०१९ वेळ- १३-३९-१९  स्थळ १७,,५९  रे ७४, २६ के.पी. नंबर ८७

या पत्रिकेत पंचमाचा सब चंद्र आहे 

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 3   12  
It's N.Swami :-------- Jupiter:- (4)   5 (8)  
It's Sub :------------ Venus:- 3   3 10  Cusp Yuti: (4)       Mercury-Yuti  3  2 11
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (4)   5 (8)  
Itself aspects :------ 9

चंद्र ३,४ त्या पायरीला पूर्ण विरोधी  भावाचा ४ ,८ कार्येश आहे संतती होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल.
 मूळ कुंडली व नंबर कुंडली मध्ये एकवाक्यता दिसून येते . थोडक्यात , आडात नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार ?  हेच खरे ......... इथे दत्तक घेण्याचे सुद्धा योग्य नाहीत ......

शुभम भवतु !!!

Wednesday, 8 April 2020

Case  study   --154  

विवाह विलंब ----

नाशिकहून एका स्त्रीचा फोन ---फेसबुकवरील आपले लेख मी वाचत असते . मला एक प्रश्न विचारायचा आहे मी विचारले काय विचारायचे आहे . माझ्या मुलाचा विवाह केंव्हा होईल. ? मूला चे जन्मतारीख वेळ व जन्मस्थळ द्या . ते खालील प्रमाणे ---
दि- २६ / -- / १९८८ वेळ ००-१६ स्थळ-- अ २१. ०९ रे ७९, ०१

प्रथा पत्रिकेची वेळ बरोबर आहे का ते पाहू .
१) लग्नाचा सब बुद्ध चंद्राच्या नक्षत्रात . २) त्रितियाचा सब मंगल वृश्चिक राशीत शनी नक्षत्रात . धाकट्या भावाच्या पत्रिकेत चंद्र मिथुन (बुद्ध ) राशीत आद्रा  ( राहूच्या ) नक्षत्रात सब मंगळाची दृष्टी भावाच्या चंद्रावर आहे . तसेच सब मंगल शनी नक्षत्रात शनीची दृष्टी चंद्र नक्षत्र राहूवर आहे . ३) नावामाचा सब रवी कन्या राशीत (बुद्ध ) हस्त  ( चंद्र ) नक्षत्रात सब रवीची वडिलांच्या चंद्रावर दृष्टी आहे . सब रवीचा राशिस्वामी बुद्ध तो वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशीशी स्वामी आहे . पत्रिकेची वेळ बरोबर आहे .
,
मी  दि १ / ४ / २०२०  रोजी  पत्रिका सोडविली . त्यावेळेचे  रुलिंग ----

बुध *  चंद्र , राहू,  बुध , बुध

 नियम-- सप्तमाचा सब २,७,११  / ५, ८ चा कार्येश असेल तर   संयुक्त दशेमध्ये विवाह होईल.
या पत्रिकेत सप्तमाचा सब बुद्ध आहे . बुद्ध रुलिंग मध्ये आहे .

बुधाचे कार्येशत्व ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (3)   (1) 4     Sun-Yuti  (3)   3  Moon-Drusht  (9)   (2)
It's N.Swami :-------- Moon:- (9)   (2)     Sun-Drusht  (3)   3  Mercury-Drusht  (3)   (1) 4
It's Sub :------------ Jupiter:- (4)   (7) (10)  
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (3)   (1) 4  Mars-Drusht  (5)   6 (11)  Jupiter-Drusht  (4)   (7) (10)
Itself aspects :------ 10


बुद्ध २,३,५,७,९, ११ या सर्व भावाचा कार्येश आहे . असे असून सुद्धा विवाह झाला नाही. मुलाचे वय आता ३८ चालू आहे बुध २,३,५,७,९,११ या भावाबरोबर १,४,१०,१२ या प्रतिकूल भावाचा सुद्धा कार्येश आहे . तसेच बुद्ध नेपच्यून बरोबर ७६.. ४ अंशाचा अशुभ योग्य करत आहे .

आता आपण दशा पाहू ---

मुलाच्या आईने सांगितले होते आम्ही २०१३ पासून स्थळे पाहत आहोत. पण अद्याप कोठे जुळले नाही .
२०१३ साली शुक्राची दशा चालू होती . शुक्र दशा २२/१०/२०१२ ते २२ / १० / २०३२ पर्यंत आहे

शुक्र  / शुक्र ---२२ / २ /२०१६
          रवी ---२१ / २ /२०१७
         चंद्र ---२३ /१० /२०१८
          मंगळ --२३ / १२ /२०१९
कुंडलीचे लग्न मिथुन आहे द्विस्वभाव राशीचे म्हणून आपण रवी अंतर्दशा विचारात घेऊ

शुक्राचे कार्येशत्व ---

 PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 3   5 12  
It's N.Swami :-------- Sun:- (3)   3     Mercury-Yuti  (3)   (1) 4  Moon-Drusht  (9)   (2)
It's Sub :------------ Ketu:- (6)      Rashi-Swami Jupiter (4)   (7) (10)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   5 12  
Itself aspects :------ 10

शुक्र रवी नक्षत्रात आहे . रवी आणि नेपच्यून यामध्ये ७५.. २ चा अशुभ योग्य आहे . त्यामुलर हि शुक्र अंतर्दशा   सोडून  दिली. त्यानंतर शुक्र मध्ये रवी अंतर दशा . रवी नेपच्यून अशुभ योग्य रवी अंतर सोडून दिली .
त्यानंतर चंद्र अंतर दशा . चंद्र फक्त ४. भावाचा कार्येश आहे म्हणू चंद्र अंतर्दशा सोडून दिली. त्यापुढील मंगल
अंतर्दशा पहिली परंतु मंगल हर्षल युती ७-०अंश आहे .म्हणजे डिसेंबर २०१९ पर्यंत विवाह झाला नाही आता  राहू अंतरदशा पाहू ---

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (3)   (1) 4  Mars-Drusht  (5)   6 (11)  Jupiter-Drusht  (4)   (7) (10)
It's N.Swami :-------- Rahu:- (12)      Rashi-Swami Mercury (3)   (1) 4  Mars-Drusht  (5)   6 (11)  Jupiter-Drusht  (4)   (7) (10)
It's Sub :------------ Ketu:- (6)      Rashi-Swami Jupiter (4)   (7) (10)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   5 12  
Itself aspects :------ 7

राहू ३,५,७,११ चा कार्येश आहे . त्याच बरोबर १,४,६,१०,१२ या प्रतिकूल भावाचा कार्येश आहे . म्हणून वैवाहिक सौख्य असमाधानकारक राहील . मुलानेच तडजोड केली पाहिजे . या अंतर्दशे मध्ये विवाह होऊ शकेल .

उदाहरण दुसरे ---
बारामती हुन एक स्त्री ने असाच प्रश्न विचारला आहे . माझा विवाह केंव्हा होईल /

जन्मतारीख --२४  /-- /८३  पहाटे ३-०   अ १९,०६ रे ७४,४५

कुंडली पाहतेवेळी रुलिंग ---
 २ / ४ /२०२०            २०-१०-१५

  राहू * शुक्र , शनी  , चंद्र  , गुरु

 पत्रिकेत ७ चा सब शनी आहे शनी  रुलिंग आहे

शनीचे कार्येशत्व ---


PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 6   10 11  
It's N.Swami :-------- Mars:- (2)   1 8     Rahu-Yuti  (2)    Ketu-Drusht  (8) 
It's Sub :------------ Venus:- (4)   2 7  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (1)   (3) 6  Cusp Yuti: (2)       Moon-Drusht  (7)   4
Itself aspects :------ 1 9 4

शनी २,३,७,८ चा कार्येश असून सुद्धा विवाह नाही कारण सब शनी व प्लूटो अंशात्मक युतीत आहेत (१ अंश )
आता दशेचा विचार करू --
कुंडली पाहतेवेळी शुक्र केतू दशा चालू होती .
शुक्र --१,२,३,४,७,८
केतू ---१,२,३,४,६,७,८,९,१०,११,१२

२,३,७,८,११ अनुकूल भाव असताना विवाह झाला नाही त्याच बरोबर १,४,६,१०,१२ प्रतिकूल भावाचा कार्येश आहे म्हणून नोव्हेंबर २०२० पर्यंत विवाह नाही . यानंतर रवी दशा २०२६ पर्यंत आहे
रवी ---२,५
राहू---२ बु १,३, मं यु २
राहू --
मंगल-- २ रा यु के दृष्ट ८

रवी नेपच्यून प्रतियोग १७६ अंश
मंगल नेपच्यून  प्रतियोग १७९ अंश
राहू नेपच्यून प्रतियोग १७७ अंश .

वरील योगामुळे रवी महादशेत म्हणजे  २०२६ पर्यंत विवाह होणार नाही .

 
शुभम भवतु !!!



 


Friday, 27 March 2020

Case  study --153   नोकरी---२


                   सद्या नोकरीविषयक प्रश्न जास्त विचारले जातात . त्यात कोरोना चे  आगमन झाले आहे . भारतातील सर्वच राज्यात  कोरोना हळू हळू आपले पाय पसरवत आहे . लोकांना भविष्य काळाचे गांभीर्य वाटत नाही.औधोगिक जगतात याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. आताच  संपूर्ण औधोगिक यंत्रणा ठप्प झाली आहे . येणाऱ्या काळात  कामगार कपात हि होऊ शकते .
                 नागपूर हुन एका जातकाचा फोन -----सद्य ज्या कंपनीत काम करत आहे  तिथे खूप कामाचा टेन्शन आहे ताणतणाव खूप वाढला आहे म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिला आहे . तीन महिन्याचा नोटीस कालावधी चालू आहे त्यातील एक महिना संपलेला आहे . मी खूप ठिकाणी अर्ज केला पण कोठूनही प्रतिसाद येत नाही . येणाऱ्या काळात मला दुसरी नोकरी मिळेल का ? असा प्रश्न  तिने विचारला. तिचे जन्मटिपण खालीलप्रमाणे ----

दि ---२० / -- /१९९२  वेळ ---- स्थळ अ १९,२४ रे ७२, ४६

याप्रमाणे मी कुंडली तयार केली कुंडली सिंह लग्नाची आहे
लग्नाचा सब राहू आहे चंद्र राहू युतीत आहेत म्हणजे पत्रिका बरोबर आहे .
 मी कुंडली पहिली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे ----
दि १५/३/२०२०  वेळ ११-३०-२५  फलटण

शनी * मंगल, बुध    मंगल , रवी
सादर जातकाने नोकरीचा राजीनामा दिला आहे सद्य नोटीस पिरिअड चालू आहे .
प्रश्न विचारला आहे मला नोकरी केंव्हा लागेल ?

दशमाचा सब  २,६,१० भावा चा कार्येश असेलतर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये नोकरी लागेल.

या पत्रिकेत दशमाचा सब शनी आहे शनी रुलिंगमध्ये आहे

शनीचे कार्येशत्व----
शनी ---५,६
मंगल--७
राहू--
केतू-- १०, बु ८,२,११ न रा ४,१२

शनी २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे . दुसरी नोकरी मिळणार हे निश्चित सांगता येईल.
तत्पूर्वी आताची नोकरी केंव्हा लागली ते तपासून पाहू आताची नोकरी  १ऑगस्ट २०१३ मध्ये लागली होती त्यावेळी चंद्र गुरु बुध  दशा होती.

चंद्र -----२,३,४,८,९,१०,११
गुरु ---२,३,८,९,१०,११,१२
बुद्ध --३,५,६,७,९,

चंद्र २,१०,११ गुरु २,१०,११ व बुध ६ भावाचं कार्येश आहे  येथे २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली होती .

पुढील नोकरी केंव्हा लागेल यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील.

कुंडली पाहतेवेळी मंगल मध्ये मंगल अंतर्दशा चालू होती. ती ३/ ७ / २०२० पर्यंत आहे .
मंगळाचे कार्येशत्व ----
मंगळ --
बुध ---८,२,११
बुध ---
शुक्र-- ९,३

सादर जातकाने राजीनामा दिला आहे  (३,९ ) २,११ भाव नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहेत

मूळ कुंडलीचे लग्न सिंह आहे म्हणजे स्थिर तत्वाचे आहे . मंगल अंतर्दशे मध्ये घटना घडणार नाही म्हणून मी पुढील राहूची अंतर्दशा घेतली . राहूचे कार्येशत्व----
राहू ---
केतू--- १०,८,२,११
गुरु ---१२
केतू-- १०,बु ८,२,११ न रा ४,१२

राहू २,१०,११ भावाचा कार्येश आहे .

आता विदशा अशी शोधावी लागेल ती ६ भावाची कार्येश असली पाहिजे . यपत्रिकेत शनी व बुध दोनच ग्रह ६ भावाचे कार्येशत्व दाखवितात.
शनी व बुध चे कार्येशत्व---

शनी ---५,६
मंगल--७
राहू--
केतू-- १०, बु ८,२,११ न रा ४,१२

बुधाचे  कार्येशत्व---
बुध ---
शुक्र --९,३,९ क. यु.
शनी---५,६
मंगल---७

मंगल महादशा राहू अंतर दशा व शनी  विदशा मध्ये नोकरी लागेल. हा कालावधी येतोय
२० ओक्टोमाबर २०२० ते २० डिसेंबर २०२० तसेच बुध  सुद्धा अनुकूल आहे बुध  विदशा १२/२/२०२१ पर्यंत आहे

हाच प्रश्न मी नंबर कुंडलीने सुद्धा सोडविला . त्या जातकाने १०९ नंबर दिला होता. हा प्रश्न मी १६ मार्च ला सोडविला  आहे

दि-१६/३/२०२० वेळ--१०-५४-४१ फलटण के.पी. नं १०९

चंद्र मनाचा कारक चंद्रतृतियांत  लाभेश आहे . चंद्र बुद्ध नक्षत्रात आहे बुश लग्नेश व दशमेश आहे व सब शनी पंचमेश व षष्टेश आहे. प्रश्नाचा रोख बरोबर आहे .

दशमाचा सब रवी आहे रवीचे कार्येशत्व ---
रवी --७.क.यु
गुरु--४,७,मं यु ४
राहू-- १०,बु ६,१
राहू ---१०, बुध  ६,१

रवी ६,१० भावाचा कार्येश आहे . नोकरी मिळणार हे नक्की झाले .  केंव्हा मिळणार ह्यासाठी दशा पाहू.
कुंडली तपासतेवेळी बुधमध्ये शनी अंतर्दशा चालू होती हि दशा १४/४/२०२० पर्यंत आहे. कुंडलीचे

लग्न  कन्या आहे कन्या द्विस्वभाव राशीचे आहे म्हणून शनी अंतर्दशेमध्ये घटना घडणार नाही म्हणून बुध  महादशा सोडून दिली . त्यापुढील केतू महादशा घेतली केतू महादशा १५/४/२०२७ पर्यंत आहे . केतुचे कार्येशत्व---
केतू --४ गु ४,७
केतू--४ गु ४,७,
शनी-- ५ क.यु
रवी---६,१२,७

/केतू  ६ भावाचा कार्येश आहे
केतू मध्ये शुक्र अंतर्दशा १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे . शुक्राचे कार्येशत्व ---
शुक्र----८,२,९
 शुक्र----८,२,९
मंगळ
 शुक्र----८,२,९

शुक्र २ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . २,६,१० ची साखळी जुळविण्यासाठी फक्त १० भावाची आवश्यकता आहे . १० भाव फक्त रवी व राहू दाखवितात.  म्हणून  केतू शुक्र रवी किंवा केतू शुक्र राहू या दशेत नोकरी लागेल. केतू शुक्र रवी  च कालावधी येतो २० / ११ / २०२० ते १२ / १२ /२०२० . या कालावधीत नोकरी लागेल. परंतु या कालावधीत गोचर अनुकूल असेल तरच नोकरी लागेल .

गोचर भ्रमण
खालील प्रमाणे गोचर अनुकूल आहे .

१) मूळ कुंडली --४ / ११ / २०२० ते  २० / १२ /२०२०  अनुकूल आहे.


२) प्रश्न कुंडली ---२० /११ /२०२० ते  १२ / १२ /२०२० अनुकूल आहे

दोन्ही कुंडलीमधील  कालावधीचा विचार केला तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नोकरी लागणार हे निश्चित सांगता येईल.  हे तिला सांगितल्यानंतर ती म्हणाली मग मी आता राजीनामा मागे घेऊ का ? मी म्हटले तसे शक्य असेल तर जरूर घयावा  वरील कालावधीत प्रयत्न करावेत. नाहीतरी घरी बसून काय करणार ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

शुभम भवतु   !!!











Tuesday, 24 March 2020

नोकरी ----
                     माझ्या कॉलेज मधील एक प्रशासकीय कर्मचारी चा फोन -- आपण घरी आहात  का ? मी म्हटले आहे , या . थोड्यावेळाने ते माझ्या घरी आले . मला म्हणाले माझा मुलगा एका एम एन सी कंपनीत नोकरी करत आहे . या कंपनीत  तो ३ वर्षे आहे. कंपनीत काम खूप असते परंतु त्या प्रमाणात पगार नाही . पगारात वाढ हि मिळत नाही . त्याला नोकरी बदलायची आहे . तर हि नोकरी सोडून दुसरी चांगली नोकरी मिळेल का असा प्रश्न विचारला . त्याने त्याची पत्रिका आणली होती मी त्यातील जन्म तारीख वेळ  व जन्मस्थळ लिहून घेतले ते खालीलप्रमाणे ...
दि --१मे १९९४  वेळ ... स्थळ अ १७,५९ रे ७४,२६

या नुसार मी कृष्णमूर्ती पद्धतीने  कॉम्पुटरवर  कुंडली काढली . कुंडली तपासताना प्रथम कुंडलीची वेळ बरोबर आहे का ते पाहत असतो . यासाठी कुंडली पाहतेवेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले
दि ४ / ११ /२०१९    वेळ- ११--४१--५५

लग्न नक्षत्रस्वामी रवी , लग्न - गुरु , नक्षत्र --चंद्र , रास .. शनी , वार - सोम चंद्र

या पत्रिकेत दशमाचा सब गुरु आहे . गुरु रुलिंग मध्ये आहे म्हणजे कुंडली बरोबर आहे .
तसेच सब चंद्र संबंध थेअरी प्रमाणे ---
लग्नाचा सब केतू वृषभ राशीत रवी नक्षत्रात आहे  व चंद्र मकर राशीत रवी नक्षत्रात आहे सब चा नक्षत्रस्वामी रवी आहे तोच चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे म्हणून कुंडली बरोबर आहे .
आता आहे हि नोकरी सोडून नवीन नोकरी मिळण्यासाठी दशमाचा सब ३,५,९, पैकी व २,६,१० पैकी चा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये दुसरी नोकरी मिळते

या पत्रिकेत दशमाचा सब गुरु आहे . गुरु चे कार्येशत्व खालील प्रमाणे
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 12   3 6     Sun-Drusht  6  11
It's N.Swami :-------- Rahu:- (1)      Rashi-Swami Mars (5)   (2) 7
It's Sub :------------ Venus:- 7   1 8  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (3)   (10)  
Itself aspects :------ 7 5 9

गुरु १,२,३,५,१० चा कार्येश आहे यातील ३,५ नोकरी सोडण्यासाठी व २,१० नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहे .
कुंडली पाहतेवेळी राहू मध्ये शनी ची अंतर्दशा चालू होती. राहू चे कार्येशत्व खालील प्रमाणे

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 1       Rashi-Swami Mars 5   2 7
It's N.Swami :-------- Jupiter:- (12)   3 6     Sun-Drusht  (6)   (11)
It's Sub :------------ Mars:- (5)   (2) 7  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (6)   (9) 12     Sun-Yuti  (6)   (11)  Jupiter-Drusht  (12)   3 6  Saturn-Drusht  (4)   4 5
Itself aspects :------ 8

राहू २,४,५,६,९,११,१२ चा कार्येश आहे या पैकी ५,९ , नोकरी सोडण्यासाठी व २,६,११ नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहेत . . मूळ कुंडलीचे लग्न तुला आहे म्हणजे लग्न चर तत्वाचे आहे याचा अर्थ घटना लवकर घडणार आहे . म्हणून मी शनी अंतर्दशा घ्यायचे ठरविले शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (4)   4 5     Jupiter-Drusht  (12)   3 6
It's N.Swami :-------- Rahu:- (1)      Rashi-Swami Mars (5)   (2) 7
It's Sub :------------ Venus:- 7   1 8  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (3)   (10)  
Itself aspect

येथे हि शनी ३,५, नोकरी सोडण्यासाठी  व २,१० नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहे . तसे म्हटले तर आपणाला पाहिजे ते सर्व भाव मिळाले आहेत . म्हणून मी २,६,१०,११ हे सर्व भाव कोणती विदशा दाखवते ते पाहायचे ठरविले शुक्र सर्व भावांचा कार्येश आहे म्हणून  मी शुक्र विदशा घेतली शुक्राचे कार्येशत्व ---

LANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 7   1 8  
It's N.Swami :-------- Moon:- (3)   (10)  
It's Sub :------------ Rahu:- 1       Rashi-Swami Mars 5   2 7
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (12)   3 6     Sun-Drusht  (6)   (11)
Itself aspects :------ 2

४ थ्या पायरीवर मंगळाची गुरु वर दृष्टी आहे म्हणून  मंगळामुळे गुरूला २,५ चे कार्येशत्व मिळेल.
राहू महादशा शनी अंतर्दशा शुक्र विदशा मध्ये नोकरी लागणार हे निश्चित झाले हा कालावधी येतो
६ / १० /२०१९  ते २७ /३ /२०२० हा कालावधी तर आपण निश्चित केला . पण ह्या कालावधीत गोचर अनुकूल असेल तरच घटना घडणार आहे . म्हणून मी गोचर पाहायचे ठरविले

गोचर भ्रमण ----
खालील कालावधी मध्ये गोचर भ्रमण अनुकूल आहे
१) २५ /११ /२०१९ ते १ /१२ /२०१९
२) १ / २ /२०२० ते १६ / २ /२०२०
३) २९ / २ /२०२० ते ११ / ३ /२०२०

यानंतर २-३. महिन्यांनी सदर कर्मचाऱ्याचा मुलगा वडिलांसोबत आला . पुन्हा तिच प्रस्तावना सांगितली . आता मी ठरविले हा प्रश्न नंबर कुंडलीप्रमाणे सोडवू . मी म्हटले मनामध्ये , आहे हि नोकरी सोडून दुसरी नोकरी केंव्हा मिळेल  असा विचार मनात करून , मन एकाग्र करून १ ते २४९ मधील एक संख्या सांग त्याने १५६ हि संख्या सांगितली . नंबर देतानासुद्धा व्यक्ती त्याच्या प्रारब्धानुसार देते ह्याचे मी परीक्षण केले आहे . या संख्ये मध्ये अर्थ लपलेला असतो. १५६ यामध्ये १ म्हणजे ती स्वतः व्यक्ती , ५ म्हणजे नोकरी सोडण्याचा विचार , ६ म्हणजे दुसरी नोकरी मिळणे . मी १५६ या संख्येवरून कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
कुंडली सोडवितेवेळी खालिलप्रमणे रुलिंग प्लॅनेट होते ---

९ जानेवारी २०२० संध्याकाळी १९-४०-०९  के पी नं १५६
शनी * चंद्र , राहू  , बुध ,  गुरु

या पत्रिकेत दशमाचा सब चंद्र  आहे . चंद्राचे कार्येशत्व --


PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (7)   (9)     Rahu-Yuti  (7)    Mars-Drusht  (12)   1 (6)  Ketu-Drusht  (1) 
It's N.Swami :-------- Rahu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Mercury (2)   (8) (11)  Moon-Yuti  (7)   (9)  Mars-Drusht  (12)   1 (6)  Jupiter-Drusht  (2)   2 (5)
It's Sub :------------ Jupiter:- (2)   2 (5)  Cusp Yuti: (2)       Ketu-Yuti  (1)    Rahu-Drusht  (7) 
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   7 12  
Itself aspects :------ 2
चंद्र  २,६,,११ या सर्व भावाचा कार्येश आहे .  आहे याचा अर्थ नोकरी मिळणार हे निश्चित झाले . आता केंव्हा मिळणार यासाठी दशा पाहू . कुंडली पाहतेवेळी राहू महादशा   गुरु अंतर्दशा शनी विदशा होती.
राहूचे कार्येशत्व ---


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Mercury (2)   (8) (11)  Moon-Yuti  (7)   (9)  Mars-Drusht  (12)   1 (6)  Jupiter-Drusht  (2)   2 (5)
It's N.Swami :-------- Rahu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Mercury (2)   (8) (11)  Moon-Yuti  (7)   (9)  Mars-Drusht  (12)   1 (6)  Jupiter-Drusht  (2)   2 (5)
It's Sub :------------ Mercury:- (2)   (8) (11)     Sun-Yuti  (2)   (10)  Saturn-Yuti  (2)   3 (4)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (3)   7 12 
Itself aspects :------ 2

गुरुचे कार्येशत्व ...

 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (2)   2 (5)  Cusp Yuti: (2)       Ketu-Yuti  (1)    Rahu-Drusht  (7) 
It's N.Swami :-------- Venus:- (3)   7 12  
It's Sub :------------ Venus:- 3   7 12  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (12)   1 (6)  Cusp Yuti: (1)    
Itself aspects :------ 8 6 10

शनी चे कार्येशत्व ....

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 2   3 4     Mercury-Yuti  2  8 11  Sun-Yuti  2  10
It's N.Swami :-------- Sun:- (2)   (10)     Mercury-Yuti  (2)   (8) (11)  Saturn-Yuti  (2)   3 (4)
It's Sub :------------ Moon:- (7)   (9)     Rahu-Yuti  (7)    Mars-Drusht  (12)   1 (6)  Ketu-Drusht  (1) 
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Mercury (2)   (8) (11)  Moon-Yuti  (7)   (9)  Mars-Drusht  (12)   1 (6)  Jupiter-Drusht  (2)   2 (5)
Itself aspects :------ 8 4 11

राहू २,३,४,५,६,७,८,९,१० भावाचा कार्येश आहे . गुरु १,२,३,५,६,७,१२ भावाचा कार्येश आहे व शनी १,२,४,५,६,७,८,९,१०,११,१२ भावाचा कार्येश आहे

राहू महादशा गुरु अंतर्दशा व शनी विदशा चा कालावधी येतो ७/१२/२०१९ ते २४/४/२०२० सादर मुलगा माझ्याकडे ९ जानेवारीला आला म्हणजे ९ जानेवारी २०२० ते २४/४/२०२० या कालावधीत नोकरी लागणार हे निश्चित सांगता येईल
आता आपण मूळ कुंडली व प्रश्न कुंडली यांची तुलना केली तर   १ / २ /२०२० ते १६ / २ /२०२०  व  २९ / २ /२०२० ते ११ / ३ /२०२०  हा कालावधी कॉमन येतो. याच कालावधीत नोकरी लागेल असे सांगितले .

१६-१७ मार्च ला वडिलांचा फोन --ते म्हणाले त्याला दुसरी नोकरी मिळाली . मी विचारले नेमके केंव्हा घडले  ? त्यांनी सांगितले ६ मार्च ला मुलाखत झाली व ११ तारखेला ऑफर लेटर मिळाले .  तुमाची सर्व कागद्पत्राची पूर्तता करून  १ एप्रिल ला जॉईन व्हा असे कंपनीने सांगितले आहे सदर मुलाने ऑफर लेटर मिळाल्यानंतर अगोदरच्या कंपनीचा राजीनामा दिलेला आहे .

हा लेख लिहितेवेळी (२४/३/२०२० ) संपूर्ण भारत भर LOCKDOWN  जाहीर झाला होता . सदर मुलगा १ एप्रिलला कंपनीत जॉईन होणार का ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . शनी विदशेमध्ये शनी पहिल्या पायरीला प्लूटोच्या  युतीत आहे व ४ थ्या पायरीला बुध प्लुटोच्या युतीत आहे . आतापर्यंत प्लुटोने सकारात्मकता दर्शविली नाही . पाहू या काय होते ते .........
 मी आपणाला सांगेनच .... आशा करू या त्याला नोकरी मिळो ....

Saturday, 28 December 2019

Case  Study -150       

                                          दत्तक कन्या --जन्मवेळ काढणे 

                     एकत्र कुटुंब पद्धतीचे आताच्या काळात जवळ जवळ विसर्जन झाले आहे . प्रत्येक जण स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा गरजा वाढत चालल्या आहेत.   मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोघांनी पैसे कमविणे गरजेचे झाले आहे . सद्याचे कुटुंब बऱ्याच ठिकाणी त्रिकोणी च पाहायला मिळते आहे . म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी. क्वचित ठिकाणी दुसरी संधी घेण्याचा प्रयत्न दिसतोय. परंतु काही ठिकाणी संतती दत्तक घेण्याकडे कलही  दिसून येतोय. पण ह्यामुळे  एकगोष्ट कमी होत चाललेली आहे ती म्हणजे नाते . समजा   एखादा घरात फक्त मुलगी असेल तर भाऊ  नाही किंवा मुलगा असेल तर बहीण नाही त्यामुळे भविष्यकाळात मामा , मामी , काका ,काकी , आत्या , मावशी म्हणजे कोण ? यांच्या व्याख्या मुलांना शिकवाव्या लागणार आहेत. किंवा एकलुताएक  मुलगा,  मुलगी असेल तर मोठेपणी कोणीतरी आधार म्हणून जवळचे असे कोणी असणारच नाही . ह्याला ही एक अपवाद आहे स्वतःचा मुलगा असताना सुद्धा अनाथ आश्रमातून एक मुलगी दत्तक घेतली जाते. हि एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न दिसून येतो हि बाब खरोखरच कौतुकास्पद नक्कीच आहे . 
                                          बंगलोर स्थित एक स्त्री फोन वर बोलत होती .... माझ्या बहिणीला एक मुलगा आहे पण तरी सुद्धा तिने   एक मुलगी दत्तक घेतली आहे . तिची जन्मतारीख निश्चित आहे . पण तिची वेळ काही मिळू शकली नाही . दत्तक घेण्याची प्रोसेस आता ऑनलाइन झाली आहे . आम्ही एक वर्षांपूर्वी फॉर्म भरला होता. अगदी वर्षाच्या शेवटी संबंधित संस्थेकडून फोन आला . म्हणाले एक दोन वर्षाची मुलगी आहे . आम्ही प्रथम जाऊन  मुलीला पाहून आलो व १५ दिवसात दत्तक घेण्याची प्रोसेस पूर्ण करून मुलीला घरी,  घेऊन आलो. आपला लेख वाचनात आला म्हणून मी तुमच्याशी संपर्क करीत आहे . मुलीचा जन्मस्थळाची अचूक माहिती कळली नाही पण ज्याठिकाणाहून आणली त्याच्या जवळच्या खेड्यात तीचा जन्म झाला आहे एवढे कळले एवढ्या माहितीवरून तुम्ही तिची पत्रिका काढू शकाल का ? असे मला विचारले . मी  म्हटले ,. मी प्रयत्न करतो . मनात म्हटले रुलिंग प्लॅनेट ने सहकार्य केले तर मी हि पत्रिका काढू शकेन . त्यांनी दिलेली माहिती खालीलप्रमाणे ---

दि २३ फेब्रुवारी २०१५  वेळ --------- स्थळ अ  १७,१७   रे ७४,१२

कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्म वेळ  ठरविता येते . पण रुलिंग प्लॅनेट हे दैवी मार्गदर्शन आहे हे सगळ्यांनाच लाभते असे नाही. बऱ्याच वेळा रुलिंग प्लॅनेट ने मला सहकार्य केले आहे . मी ज्यावेळी कुंडली काढायचे ठरविले तेंव्हा खालील रुलिंग होते

दि २४/१२/२०१९  वेळ --१६-००-११

लग्न नक्षत्र स्वामी रवी , लग्नस्वामी  -शुक्र , नक्षत्र स्वामी शनी , राशी स्वामी- मंगळ , वार स्वामी--मंगळ

 रवी* शुक्र, शनी, मंगळ, मंगळ

रुलिंग मध्ये रवी आहे याचा अर्थ जन्म दिवसा  झाला आहे हे निश्चित . यापूर्वीच्या लेखात रुलिंगमध्ये चंद्र आला होता म्हणून आपण रात्र गृहीत धरली होती . आता दिवस कोठपासून कोठ पर्यंत घ्यायचा हे ठरवावे लागेल. सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत च्या कालावधीला दिवस म्हणता येईल. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी जन्मठिकाणी सूर्योदय सकाळी ६-५५-०१ आहे व सूर्यास्त १८-३७-४८ पर्यंत आहे  याच्या मधील काळ म्हणजे एकूण ११ तास ४२मिनिटे आहे एकूण अंदाजे सहा लग्ने येतील आता पंचागामध्ये या वेळेला कोणती लग्ने  येतात ते पाहू
    १) कुंभ --६-२३-००७ ते ८-०१-०५   स्वामी शनी
    २) मिन--८-०१-०५ ते ९-३६-४३      स्वामी गुरु
    ३) मेष --९-३६-४३ ते ११-२१-१४    स्वामी मंगळ
    ४) वृषभ --११-२१-१४ ते १३-२१-३५  स्वामी शुक्र
    ५) मिथुन --१३-२१-३५  ते १५-३३-५३ स्वामी बुध
    ६) कर्क ---१५-३३-५३ ते १७-४६-११  स्वामी चंद्र
    ७) सिंह ---१७-४६-११ ते १९-५३-०३  स्वामी रवी

दि २३ फेब्रुवारी २०१५ रोजी वरील कालावधीत एकूण सात लग्ने येतात . यापैकी कुंडलीचे एकच लग्न असणार आहे . आलेल्या  लग्न स्वामींची तुलना रुलिंग प्लॅनेट बरोबर केली तर --- रुलिंग मध्ये गुरु बुध चंद्र नाहीत . म्हणजे मिन , मिथुन  व कर्क लग्न असणार नाही . आता शिल्लक राहिली  कुंभ, मेष , वृषभ, सिंह .                                        
        कुंभ, मेष , वृषभ, सिंह .
                     कुंभ (शनी ) , मेष (मंगळ ) वृषभ (शुक्र ), सिंह ( रवी ) सर्व राशी स्वामी रुलिंग प्लॅनेट मध्ये आहेत या पैकी एक लग्न असणार हे नक्की .

                     दत्तक कन्येचे आपल्याला लग्न , लग्न नक्षत्र , सब व सब सब ठरवायचे आहे . रुलिंग प्लॅनेट मधील ग्रहांचा विचार करू.------
                        १)  यामध्ये रवी लग्न नक्षत्र स्वामी आहे . म्हणून सिंह लग्नाचा विचार प्रथम करू . सिंह राशीमध्ये केतू शुक्र व रवीची नक्षत्रे आहेत . यापैकी शुक्र व रवी रुलिंग मध्ये आहेत. परंतु रवी दोनदा आलेला नाही म्हणून सिंह लग्न  रवी नक्षत्र घेता येणार नाही . म्हणून सिंह रास शुक्र नक्षत्र घ्यावे लागेल. शनी नक्षत्र स्वामी आहे म्हणून सब शनी घ्यावा लागेल व सब सब म्हणून मंगळ घ्यावा लागेल . सिंह रास शुक्र नक्षत्र शनी सब व मंगळ सब सब , जेंव्हा उदयास येईल त्यावेळी दत्तक कन्येचा जन्म असेल . उप उपचे कोष्टक वापरले तर २३ अंश २० कला २५ विकला येतात. या अंशावरून कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून वेळ येते १९-२५-१४ . हि वेळ सूर्यास्तानंतर ची आहे म्हणून हि वेळ आपणाला घेता येणार नाही. सिंह लग्न असू  शकत नाही
                      २) त्यापुढील शुक्राचा विचार करू वृषभ राशीमध्ये रवी चंद्र मंगळा ची नक्षत्रे आहेत. यापैकी रवी मंगल रुलिंगमध्ये आहेत. लग्न वृषभ नक्षत्र रवी घेतले तर मंगळा चा सब उपलब्ध नाही. म्हणून वृषभ लग्न रवी नक्षत्र मंगल सब घेता येणार  नाही
                      ३) आता उलट विचार  करू वृषभ लग्न , मंगल नक्षत्र  घेतले तर रवीचा सब उपलब्ध नाही म्हणून वृषभ लग्न मंगल नक्षत्र रवी सब घेता येत नाही .
                      ४) वृषभ लग्न मंगल नक्षत्र सब म्हणून शनी उपलब्ध आहे. म्हणून वृषभ लग्न मंगळ नक्षत्र शनी सब व रवी सब सब घेऊन अंश  किती येतात पाहू. अंश येतात २९-०४-३०. यावरून कॅम्पुटर मधील ट्रान्झिटऑपशन  वापरून वेळ येते  १३-१७-३८  दुपारी
                      ५) अजून एक पर्याय आहे . वृषभ लग्न रवी नक्षत्र शनी सब मंगल सब सब असे सुद्धा होऊ शकेल हि साखळी वापरून वेळ येते ११-३८-०१  सकाळी
                      ६) आपल्याला दोन वेळा मिळाल्या आहेत . यापैकी एक वेळ नक्की असणार आहे . पण कसे ठरवायचे ? ज्या पत्रिकेत  दत्तक जाण्याचा योग्य असेल ती पत्रिका खरी . आणि त्या पत्रिकेची वेळ हीच दत्तक कन्येची जन्म वेळ असणार.
                 .
        दत्तक जाण्याचा योग्य --संदर्भ-- ज्योतिषांचा संदर्भ ग्रंथ --नेमीचंद सोनार पान  नंबर १५६ क्रं ४६

                           चतुर्थाचा सबलॉर्ड हा द्विस्वभाव राशीत (मिथुन, कन्या, धनु , मिन ) असला पाहिजे किंवा बुध असला पाहिजे किंवा बुधाशी संबंधित असला पाहिजे  आणि अष्टमाचा कार्येश असेल तर ते मूल  दत्तक जाते .
  ( या संदर्भात चंद्र बुधाची गोष्ट आहे )
द्विस्वभाव राशीत या मागील अर्थ --त्या मुलाच्या दोन आया म्हणजे एक जन्म देणारी आई ,  दुसरी पालन पोषण करणारी आई असणे आणि अष्टमाचा कार्येश असला पाहिजे  कारण अष्टम स्थान हे दत्तक घरी वारसा प्राप्त होणे आणि मूळ जन्मदात्यापासून फारकत. या दोन्ही कारणा साठी तो अष्टमाचा कार्येश असला पाहिजे.


दि   २३/२/२०१५  वेळ ११-३८-०१  स्थळ अ  १७,१७   रे ७४,१२ हि वेळ वापरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली    या पत्रिकेत चतुर्थाचा सब चंद्र मेष राशीत आहे मेष रास चर रास  आहे द्विस्वभाव नाही .  याठिकाणी पहिला भाग पूर्ण होत नाही पण तो अष्टमाचा कार्येश आहे . येथे चंद्र अष्टमाचा कार्येश आहे पण चंद्र द्विस्वभाव राशीत नाही. म्हणून हि वेळ असणार नाही . हे नक्की सांगता येईल . 

दि  २३/२/२०१५    वेळ- १३-१७-३८ दुपारी    स्थळ अ  १७,१७    रे ७४,१२

या पत्रिकेत चतुर्थाचा सब राहू आहे राहू कन्या राशीत आहे कन्या हि द्विस्वभाव रास आहे राहू बुधाचे प्रतिनिधित्व करतो . कन्या राशीचा स्वामी बुध  अष्टमात ( भावचलित कुंडलीत )आहे या ठिकाणी दोन्ही गोष्टीची पूर्तता झाली आहे . म्हणून दत्तक कन्येची वेळ दुपारी १३-१७-३८ आहे हे नक्की सांगता येईल. अशा प्रकारे आपण रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने दत्तक कन्येची वेळ निश्चित केली . 

                  अजून सब चंद्र संबंध थेअरी प्रमाणे ह्या कुंडलीची सत्यता पडताळून पाहू.खरे तर याठिकाणी हि थेअरी लागू पडणार नाही. कारण मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे . त्यांची  स्वतः ची नाही. तरीसुद्धा ह्या पद्धतीने तिची वेळ बरोबर आहे का ते पाहण्याचा प्रयत्न केला आहे .

१) दत्तक मुलीचे वडील-- चंद्र मिथुन (बुध ) आद्रा (राहू ) नक्षत्र
२) दत्तक मुलीची आई ---चंद्र तुला (शुक्र) विशाखा (गुरु ) नक्षत्र
३) दत्तक मुलीचा भाऊ --चंद्र सिंह (रवी ) पूर्वा ( शुक्र ) नक्षत्र

दत्तक मुलीच्या पत्रिकेत लग्नाचा सब शनी वृश्च्छिक ह्या मंगळाच्या राशीत आहे व चंद्र राशिस्वामी मंगल च आहे
मुलीचे नवम भावाचा सब ( वडील) बुद्ध आहे तो वडिलांच्या पत्रिकेत चंद्राचा राशिस्वामी आहे
मुलीचे चतुर्थ भावाचा सब राहू आहे राहू बुधा चे प्रतिनिधित्व करतो आईच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्रस्वामी गुरुची दृष्टी बुधवार आहे .
मुलीच्या पत्रिकेत लाभाचा सब ( थोरला भाऊ ) रवी आहे भावाच्या पत्रिकेत चंद्र राशिस्वामी रवी आहे .
अशाप्रकारे सब चंद्र संबंध पद्धतीने सुद्धा पत्रिकेची वेळ बरोबर  सिद्ध होतेय
                                अजून एक प्रश्न बाकी राहतो तो म्हणजे ज्यांनी कन्या दत्तक घेतली आहे त्यांच्या पत्रिकेत दत्तक घेण्याचा योग्य आहे का ? हे पाहायला पाहिजे .  
दत्तक घेण्याचा नियम --पंचमाचा सबलॉर्ड पंचमाचा कार्येश असून चतुर्थाचा हि कार्येश असेल तर ती व्यक्ती एखादे मूल  दत्तक घेते . 

दि ----------- १२-०८ am   स्थळ रे ७२,४९  अ  १८,५८

या पत्रिकेत पंचमाचा सब रवी आहे आणि रवीचे कार्येशत्व खालील प्रमाणे 

 PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 4   7 
It's N.Swami :-------- Mars:- (3)   3 (10) 
It's Sub :------------ Mercury:- (4)   5 (8)     Saturn-Drusht  (7)   (1) (12)
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (5)    Cusp Yuti: (6)      Rashi-Swami Moon (9)   (6)
Itself aspects :------ 11

पंचमाचा सब रवी ४ व ५ दोन्हीचा कार्येश आहे .


शुभम भवतु  !!!


Monday, 16 December 2019

Case  study --132 

 जन्मवेळ काढणे


                                    एक आजी ... वय वर्षे ७०.... फोनवर बोलत होत्या . मला म्हणाल्या आयुष्याच्या नाटकाचे दोन अंक संपले आहेत . तिसरा अंक सुरु झाला आहे . या ७० वर्षात अनेक चढ उतार आले . अनेक पावसाळे पाहीले . येणाऱ्या प्रत्येक समस्यांना हे माझेच कर्म आहे समजून स्वीकारत गेले . पुढे जात राहिले . अनेक समस्यांना तोंड देत इथपर्यंत आले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात शिक्षिकेची नोकरी केली ती पण दोन तीन वर्षे केली नंतर फक्त शिकवण्या घेत राहिले . नंतर लग्न झाले . मला दोन मुले आहेत . दोन्ही मुलांची लग्ने  झाली आहेत . दोन सुना आल्या . दोन्ही सुन्या खूप चांगल्या आहेत . एक नातू आहे .नातवा बरोबर वेळ कसा जातो ते कळत  नाही. आता कोणतीही चिंता नाही देवधर्म चालू आहे . अधून मधून फेसबुक पाहत असते . त्यात तुमचा जन्मवेळ निश्चिती चा लेख पाहिल्यानंतर मलाही वाटायला लागले कि आपलीसुद्धा कुंडली असावी. पण मला तारीख फक्त माहित आहे आणि ती खरी आहे . पण वेळ माहित नाही . आणि आता नात्यात वेळ सांगणारे  वयस्कर असे कोणी राहिले नाही. आयुष्यात कधी भविष्य पहिले नाही. पाहावे असे कधी वाटले नाही . मला माझी रास सुद्धा माहित नाही . त्यामुळे मला माझी कुंडली काढता येत नाही. तर माझी कुंडली तुम्ही काढू शकाल का ? असा प्रश्न त्यांनी विचारला . मी म्हटले निदान वेळ शब्दात तरी , म्हणजे सकाळ दुपार संद्याकाळी, रात्री पहाटे असे काही सांगता येईल का ? त्या म्हणाल्या ते हि मी सांगू शकत नाही. फक्त तारीख व स्थळ निश्चित आहे . मी म्हटले , बर .... मी प्रयत्न करतो . तुमची तारीख व स्थळ  मला सांगा . त्यांनी खालीलप्रमाणे सांगितली .

दि १२ /७ /४९  वेळ --माहित नाही  स्थळअ २०,५६ रे ७७,४५

कृष्णमूर्ती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ ठरविता येते . पण रुलिंग प्लॅनेट हे दैवी मार्गदर्शन आहे हे सगळ्यांनाच लाभते असे नाही. मी ज्यावेळी कुंडली काढायचे ठरविले तेंव्हा खालील रुलिंग होते

 दि १५/११/२०१९  वेळ १२-२२-४८
लग्न नक्षत्रस्वामी चंद्र , लग्न -शनी , नक्षत्रस्वामी मंगल , राशी स्वामी बुध ,वाराचा  स्वामी शुक्र

म्हणजे चंद्र * शनी,मंगळ , बुध , शुक्र

रुलिंग मधील ग्रहांचा विचार केला तर ...
शनी---मकर व कुंभ
मंगळ ---मेष व वृश्चिक
बुद्ध ---मिथुन व कन्या
शुक्र --- वृषभ व तूळ

               मकर मध्ये रवी चंद्र मंगळ हि नक्षत्रे आहेत व कुंभ मध्ये मंगळ राहू गुरु हि नक्षत्रे आहेत यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे मकर किंवा कुंभ असू शकते . मेष राशी मध्ये केतू शुक्र रवी नक्षत्रे आहेत व वृश्चिक मध्ये गुरु शनी बुध आहेत यापैकी शुक्र व शनी बुध हि नक्षत्रे आहेत . म्हणजे मेष व वृश्चिक असू शकते . मिथुन राशी मध्ये मंगळ राहू गुरु हि नक्षत्रे आहेत व कन्या राशी मध्ये रवी चंद्र मंगल हि नक्षत्रे आहेत यापैकी  मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे मिथुन कन्या यापैकी एक असू शकते . वृषभ राशीमध्ये रवी चंद्र मंगळ हि नक्षत्रे आहेत व तुला राशी मध्ये मंगळ राहू गुरु हि नक्षत्रे आहेत . यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे वृषभ किंवा तुला असू शकते . थोडक्यात हि आठ हि लग्ने  असू शकतात . यापैकी कोणते तरी एकच लग्न असणार आहे . ते कसे ठरवायचे हा प्रश्न पडला . शेवटी लग्न नक्षत्र स्वामी चा विचार करायचे ठरविले लग्न नक्षत्र स्वामी चंद्र आहे . रुलिंग मध्ये ज्यावेळी चंद्र येतो त्यावेळी जन्म रात्रीचा असतो आणि रुलिंग मध्ये रवी असेल तर जन्म दिवसा  असतो. परंतु समजा  रुलिंग मध्ये रवी व चंद्र दोन्ही असतील तर ..... इथे श्रेष्ठ कोण आहे ते पाहावे लागेल. जर रवी श्रेष्ठ असेल आणि चंद्र दुसऱ्या प्रतीचा असेल तर संध्याकाळी जन्म असेल . आणि चंद्र रवी पेक्षा श्रेष्ठ असेल तर जन्म पहाटेचा असेल . आता एक आपल्याला कळले आहे कि जन्म रात्रीचा आहे .

आता रात्र म्हणजे कोठून कोठपर्यंत घ्यायची हे ठरवावे लागेल. रात्र म्हटली कि संध्याकाळी ७-३० ते पहाटे ३-० वाजेपर्यंत च्या काळाला रात्र म्हणता येईल परंतु आजी म्हणतात तारीख १२/७/४९ हि नक्की आहे . याचा अर्थ रात्री १२ ते ३ हा कालावधी आपणाला घेता येणार नाही . कारण रात्री १२ नंतर तारीख बदलणार आहे . म्हणून जन्म वेळ ठरविण्यासाठी आपणाला संध्याकाळी ७-३० ते रात्री १२ वाजेपर्यंत चा कालावधी घ्यावा लागेल. या कालावधीत पंचागामध्ये कोणती लग्ने येतात ते पाहू . ती खालीलप्रमाणे आहेत .

मकर  १९-१२-४१ ते २१-०१-२६              स्वामी शनी
कुंभ -- २१-०१-२६ ते २२-३६-४१            स्वामी  शनी
मिन -- २२-३६-४१ ते ००-०९-११            स्वामी  गुरु

वरीलपैकी फक्त शनी रुलिंग मध्ये आहे . याचा अर्थ मकर किंवा कुंभ लग्न असले पाहिजे . मकर राशी मध्ये उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा हि रवी चंद्राची मंगळाची  नक्षत्रे आहेत व कुंभ राशी मध्ये धनिष्ठा शततारका पूर्वाभाद्रपदा हि मंगल राहू गुरुची नक्षत्रे आहेत. रुलिंग मध्ये मंगल आहे म्हणजे मकर किंवा कुंभ यापैकी एक लग्न असणार . पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला याव्यतिरिक्त कोण आहे ते पाहू . रुलिंग मध्ये चंद्र व राहू आहे ( बुधा च्या राशीत राहू आहे ) चंद्र लग्न नक्षत्रस्वामी आहे व राहू तिसऱ्या प्रतीचा आहे लग्न नक्षत्रस्वामी श्रेष्ठ म्हणून कुंडलीचे लग्न मकरच असले पाहिजे . हे निश्चित पणे सांगता येईल.

 मकर लग्न निश्चित झाले / आता नक्षत्र स्वामी ठरवू . रुलिंग मध्ये शिल्लक राहिले मंगल , राहू व शुक्र यापैकी मंगळ नक्षत्र स्वामी आहे म्हणून नक्षत्र मंगळाचे घ्यावे लागेल. आता सब व सब सब ठरवू रुलिंग मध्ये शिल्लक राहिले राहू व शुक्र . शुक्र हा वाराचा स्वामी आहे म्हणून सब राहू घ्यावा लागेल व शुक्र सब सब घ्यावा लागेल.  लग्न मकर  नक्षत्र मंगल  सब राहू व सब सब शुक्र  जेंव्हा उदयास येईल त्यावेळी आजीचा जन्म झाला असे म्हणता येईल.लग्न किती अंशावर आहे हे ठरविण्यासाठी आपणाला कृष्णमूर्तीचे उप उप चे कोष्टक पाहावे लागेल . त्या कोष्टकावरून लग्नाचे अंश येतात २५ अंश ,३३ कला , ४० विकला . येथूनपुढे कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून या अंश कला विकलांना वेळ किती येते ते पाहता येईल. वेळ येते रात्री २०-४६-२४. अशाप्रकारे आजींची जन्मवेळ येते रात्री ८-४६-२४. आता काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही ते पाहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील घटना तपासून पाहता येतील.

१) विवाह  --२३ मे  १९७४
२) प्रथम संतती ---३ एप्रिल १९७६
३) दुसरा मुलगा ---२१ नोव्हेंबर १९८०

१) विवाह   २३ मे  १९७४

विवाहाच्या वेळी गुरु महादशा गुरु अंतर दशा व शनी विदशा चालू होती .
विवाह सप्तमाचा  सब २,७,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये विवाह होतो .

गुरु ---२,६,११,१२ चा कार्येश आहे
शनी ---१,५,७,८ चा कार्येश आहे

विवाहाच्या वेळी २,५,७,८,११ भाव कार्येश होते .

२) प्रथम संतती ---३ एप्रिल १९७६

प्रथम संततीच्या वेळी गुरु शनी शनी दशा चालू होती .
संतती --पंचमाचा सब २,५,११ चा कार्येश असेलतर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये संतती होते .
गुरु २,६,११,१२ चा कार्येश आहे
शनी ---१,५,७,८ चा कार्येश आहे

प्रथम संततीच्या वेळी २,५,११ भाव कार्येश होते.

३) दुसरा मुलगा ---२१ नोव्हेंबर १९८०
दुसऱ्या संततीच्या वेळी गुरु केतू केतू दशा चालू होती

गुरु ---२,६,११,१२ चा कार्येश आहे
केतू ---१,३,४,५,७,८,१० चा कार्येश आहे

द्वितीय संततीच्या वेळी २,३,५,७,११ कार्येश होते ७ स्थान हे द्वितीय संततीचे स्थान आहे .

शुभम भवतु !!!


Sunday, 10 November 2019

Case Study--122

विवाह ----विलंब  


                                                      वय वर्षे ३६ हे विवाहयोग्य वय असू शकत नाही . विवाहाला जेंव्हा  उशीर  होतो त्यावेळी शनि,मंगळ व हर्शल नेपच्यून प्लूटो या ग्रहांचा संबंध असू शकतो . मंगल वयाच्या २७-२८व्या वर्षी ,शनी वयाच्या २९-३२ व्या वर्षी , व हर्शल मुले ठरलेला विवाह मोडू शकतो म्हणून सुद्धा विवाह लांबतो. नेप्क्युन मुले कधी कधी विवाहापूर्वी फसवणूक झाल्यामुळे विवाहाला विलंब होऊ शकते. कधी कधी विवाहानंतर आपली फसवणूक झाली असे लक्षात येते. प्लूटो चा जेंव्हा संबंध येतो लग्न फार उशिरा किंवा होत सुद्धा नाही. . . शनि १,३,५,७,१० व्या स्थानात असतो त्यावेळी विवाहाला उशीर होत असतो. मंगळ १,४,७,८,१२व्या स्थानात  असेल तर विवाहाला उशीर होतो . हर्शल सप्तम स्थानात किंवा हर्षलची सप्तम स्थानावर दृष्टी असेल तर विवाहाला उशीर होत असतो . शुक्र हर्शल युती, प्रतियोग हासुद्धा योग विवाहाला उशीर  करतो चंद्र शनि युती असेल तर ,चंद्र शनीच्या नक्षत्रात ,शनि चंद्राच्या नक्षत्रात ,चंद्रावर  शनीची दृष्टी असेल तर पुनर्फू योगामुळे विवाहाला उशीर होत असतो ,चंद्राचा सब शनि असेल,किंवा शनीचा सब चंद्र असेल तर विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शनि, बुध राहू असेल तरीसुद्धा विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शुक्र ,चंद्र , ,रवि गुरु असेल तर विवाह योग्य वयात होतो असा अनुभव प्रत्येक ज्योतिषाला येत असतो .पत्रिका पाहताना विवाहाला उशीर  का होत आहे याचा  विचार होणे गरजेचे आहे . शनि  , मंगळ ,हर्शल नेपच्यून  प्लूटो चा संबंध आहे का ते पाहीले पाहिजे अन्यथा कालावधी चुकू शकतो .
  उदा १ )                        अहमदनगर हुन एका मुलीचा फोन ..मला  म्हणाली मला एक प्रश्न विचारायचा आहे . मी म्हटले काय विचारायचे आहे . ? माझ्या भावाचा विवाह केंव्हा होईल. ? मी म्हटले भावाचे बर्थ डिटेल्स द्या. २-३दिवसांनी फोन करा. त्यांनी दिलेले डिटेल्स मी लिहून घेतले. याठिकाणी मी बर्थ डिटेल्स दिलेले नाही . ज्याना पडताळणी करायची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा. सद्या वय वर्ष ३६ संपत आले आहे .

दि -------वेळ ------ स्थळ  अ १७,४३  रे ७३ ४८

मी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली. माझ्याकडे आलेली प्रत्येक कुंडली मी प्रथम तिची वेळ तपासून घेत असतो. आणि हे मी सब  चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे तपासात असतो. या थेअरी प्रमाणे दिलेली वेळ चुकीची होती म्हणून मी ती दुरुस्त करून घेतली .  . ती खालीलप्रमाणे ----
सद्य जातकाचे वय ३६ पूर्ण आहे
१) लग्नाचा सब शनी व चंद्र युतीत आहेत.
२) मोठी बहीण --लाभाचा सब शनी तुला ( शुक्र ) चित्रा (मंगल ) नक्षत्रात
सब चा नक्षत्रस्वामी मंगळ आहे जो मोठ्या बहिणीच्या पत्रिकेत चंद्राचा राशी स्वामी आहे .
३) लहान बहीण --- तृतीयेचा सब शनी तुला ( शुक्र ) चित्र ( मंगळ ) नक्षत्रात
 सब चा नक्षत्र स्वामी मंगल आहे जो लहान बहिणीच्या पत्रिकेत चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे .

आता सब चंद्र कनेक्शन थेअरीप्रमाणे वेळ निश्चित केली आहे .

आता विवाहाचा विचार करू.----

सप्तमाचा सब २,५,७,८,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत विवाह होतो .

हि पत्रिका तुला लग्नाचीआहे सप्तमाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 1   3 6     Mars-Drusht  7  2 7
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   (4) (5)  
It's Sub :------------ Rahu:- 8       Rashi-Swami Mercury 7   9 12
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   2 7     Sun-Yuti  (7)   (11)  Jupiter-Drusht  (1)   (3) (6)
Itself aspects :------ 8 6 10

गुरु ३,५,७,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे  गुरु अनुकूल भावाचा कार्येश असून सुद्धा विवाह झाला नाही.
गुरु हर्षल पूर्ण युतीत (०. ८ ), हर्षलमुळे ठरलेला विवाह मोडतो , गुरूचा नक्षत्रस्वामी शनी प्लूटोच्या  अंशात्मक युतीत  ( १. ६ ), गुरूचा सब राहू नेपच्यून प्रतियोग ( १७७. ७ ) नेपच्यून मुले फसवणूक होते . व मंगल हर्षल प्रतियोग  ( १७८. १ ). आहे . हर्षल  नेपच्यून प्लूटो यांच्या योगामुळे विवाह झाला नाही.
दशेचा विचार करायचे ठरविले तर मी पत्रिका पहिली त्यावेळी शनी मध्ये शुक्राची अंतर्दशा मार्च २०२० पर्यन्त होती.

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 12   4 5  
It's N.Swami :-------- Mars:- (7)   2 7     Sun-Yuti  (7)   (11)  Jupiter-Drusht  (1)   (3) (6)
It's Sub :------------ Sun:- (7)   (11)     Mars-Yuti  (7)   2 7
It's Sub's N.Swami :-- Sun:- (7)   (11)     Mars-Yuti  (7)   2 7
Itself aspects :------ 7 3 10

शनी ३,७,११ या अनुकूल भावांचा कार्येश

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 9   1 8  Cusp Yuti: (9)    
It's N.Swami :-------- Jupiter:- (1)   (3) (6)     Mars-Drusht  (7)   2 7
It's Sub :------------ Saturn:- 12   4 5  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   2 7     Sun-Yuti  (7)   (11)  Jupiter-Drusht  (1)   (3) (6)
Itself aspects :------ 3

 शुक्र ३,७,९,११ अनुकूल भावांचा कार्येश

शनी दशेमध्ये शनी प्लूटो युती. शनी मंगळाच्या नक्षत्रात मंगल हर्षल प्रतियोग आहे . शुक्राच्या अंतर्दशेमध्ये शुक्र गुरु च्या नक्षत्रात गुरु हर्षल युती. शनी सब मध्ये शनी प्लूटो युतीत ह्यामुळे अद्याप पर्यंत  विवाह झाला नाही. वय वर्षे ३७ पर्यंत

उदा. २)  हि एक वय वर्ष ३७ ची पत्रिका आहे अद्याप विवाह झाला नाही .

दि ------ वेळ ------- स्थळ --अ १९,५१  रे ७३,५९

वरील पत्रिकेनुसार ह्याही पत्रिकेची वेळ मी सब चंद्र कनेक्शन पद्धतीने निश्चित केली आहे . हि पत्रिका तुला लग्नाची आहे . ह्या पत्रिकेत सप्तमाचा सब बुध  आहे . खरे तर सप्तमाचा सब बुध असू नये कारण बुध द्वित्व दाखवितो . परंतु बुध जर २,७,११,५,८ चा कार्येश असेल तर वाईट घडणार नाही . ह्या पत्रिकेत सप्तमाचा सब बुध आहे . बुधचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ...

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 10   9 12  Cusp Yuti: (11)       Jupiter-Drusht  2  3 6
It's N.Swami :-------- Ketu:- (1)      Rashi-Swami Mars (2)   2 7
It's Sub :------------ Saturn:- 1   4 5     Moon-Drusht  7  10
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (7)      Rashi-Swami Venus (12)   1 (8)
Itself aspects :------ 5

बुध २,७,११,८ चा अनुकूल भावाचा कार्येश आहे . तरीसुद्धा अद्याप विवाह झाला नाही. सद्याच्या
काळात विवाहयोग्य वय किती असते ? साधारणपणे वय वर्ष २५ धरले तर वय वर्ष२५ च्या दरम्यान मंगळाची दशा चालू होती. जुलै २०१४ पर्यंत . मंगळाचे कार्येशत्व

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 2   2 7  
It's N.Swami :-------- Mercury:- (10)   (9) 12  Cusp Yuti: (11)       Jupiter-Drusht  (2)   (3) (6)
It's Sub :------------ Moon:- (7)   10     Saturn-Drusht  (1)   (4) (5)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (12)   1 (8)  
Itself aspects :------ 8 5 9

मंगळ २,३,५,,७,८,९,११ या अनुकूल भावाचा कार्येश असून सुद्धा विवाह झाला नाही. मंगल ग्रहाच्या ४ त्या पायरीवर शुक्र नेपच्यून यामध्ये ७१. चा अशुभ योग्य आहे . नेपच्यून मुले फसवणूक होऊ शकते  किंवा लांबणीवर पडते . तसेच तिसऱ्या पायरीवर चंद्र शनी दृष्ट आहे . ह्याला पुनरफू योग्य म्हणतात, ह्यामुळेही लग्नाला उशीर होऊ शकतो. विवाहामध्ये जर शनी ग्रहाचा संबंध येत असेल तर विवाह २९-३२ दरम्यान होतो असा माझा अनुभव आहे . पण वय वर्ष ३२ तर उलटून गेले . तरीसुद्धा विवाह झाला नाही . त्यापुढील दशा राहूची आहे राहूचे कार्येशत्व ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Venus 12   1 8
It's N.Swami :-------- Sun:- (11)   11  
It's Sub :------------ Ketu:- 1       Rashi-Swami Mars 2   2 7
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (1)   (4) (5)     Moon-Drusht  (7)   10
Itself aspects :------ 2

राहू ५,७,११ चा कार्येश आहे राहू दशा विवाहाला अनुकूल आहे .
मी कुंडली पहिली तेंव्हा राहू मध्ये गुरुची अंतर्दशा संपत आली होती गुरु दशेत शेवटी शेवटी घटना घडत नाहीत. असा अनुभव आहे  म्हणून मी पुढील अंतर्दशा शनीची निवडली . राहू शनी दशा ४/७/२०२२ पर्यंत आहे .
शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 1   4 5     Moon-Drusht  7  10
It's N.Swami :-------- Rahu:- (7)      Rashi-Swami Venus (12)   1 (8)
It's Sub :------------ Mars:- 2   2 7  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (10)   (9) 12  Cusp Yuti: (11)       Jupiter-Drusht  (2)   (3) (6)
Itself aspects :------ 7 3 10

शनी २,३,७,९,११ भावाचा कार्येश आहे . त्यापुढील विदशा बुध  व केतूची आहे . बुध  व केतू २,७,११ भावाचे कार्येश आहेत.

राहू शनी बुध दशा ८ / २ / २० ते ४/७/२०  या कालावधीत होऊ शकतो.
राहू शनी केतू ४/७/२० ते ३/९/२० हि दशा अनुकूल आहे.
साधारणपणे १५ जुलै पर्यंत आपणाकडे विवाहाचे मुहूर्त असतात. . त्यानंतर नोव्हेंबर पासून सुरु होतात. म्हणून ह्या कालावधीत विवाह ठरू शकतो.सप्तमाचा सब बुध राहू केतू शी संबंधित आहे म्हणून विवाह हा विजोड असू शकेल . म्हणजे रंग रूप मध्ये contrast , किंवा वय जास्त असू शकते, किंवा घटस्फोटित स्त्री  , किंवा आंतरजातीय असू शकतो.

शुभम भवतु !!!

Saturday, 2 November 2019

                                                Case Study  --124

जन्मवेळ निश्चित करणे -----

                      रायगड हुन एक स्त्री तिच्या मुलाबरोबर माझ्याकडे आली होती. प्रथम तिने मुलाच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला . तीचा  मुलगा सद्या इ. ११ साय न्स  शिकत आहे . त्याच्या पुढील शिक्षणाबद्दल तिला मार्गदर्शन हवे होते . त्यासंदर्भात    मुलाला मार्गदर्शन केले , त्यानंतर ती स्त्री म्हणाली माझी पत्रिका काढायची आहे . मी म्हटले त्यासाठी माझ्याकडे यायची गरज नव्हती . तुमच्या  गावी सुद्धा कोणीही पत्रिका काढून दिली असती . त्यावर ती म्हणाली माझी जन्म तारीख मला माहित आहे पण माझी वेळ मला माहित नाही. मी म्हटले वेळ कमीतकमी शब्दात तरी सांगता येईल का ? . म्हणजे सकाळी , दुपारी , संद्याकाळी, रात्री , पहाटे .एवढं तरी सांगितले पाहिजे . ती म्हणाली माझी आत्या म्हणतेय तुझा जन्म सकाळी झाला आहे. ठीक आहे . मी काढण्याचा प्रयत्न करतो . तिने सांगितलेले जन्मटिपण  खालीलप्रमाणे ---

दि ३ जानेवारी १९८३    वेळ -- सकाळी     स्थळ--  अ १७,४१   रे ७३,५९

कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ काढता येते . मी पत्रिका काढायला घेतली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट पाहिले ते खालीलप्रमाणे होते .

दि- १ नोव्हेंबर २०१९  वेळ २१-३३-३९ स्थळ फलटण

लग्न नक्षत्रस्वामी राहू , लग्न स्वामी बुध  , चंद्र नक्षत्रस्वामी केतू , चंद्र राशिस्वामी गुरु , वार शुक्रवार

राहू *   बुध   , केतू , गुरु , शुक्र

आता ,  स्त्रीने सांगितले आहे जन्म सकाळी झाला आहे . सकाळी म्हणजे  दुपारी बारा वाजेपर्यंत च्या कालावधीला आपण सकाळ म्हणावयास काही हरकत नसावी . या वेळेत पंचागामध्ये कोणती लग्ने  येतात ते पाहू.


      १) धनु -----५-४९-०७ ते ७-५५-४१   स्वामी गुरु
 
      २) मकर ----७-५५-४१ ते ९-४६-२२  स्वामी शनी
 
      ३) कुंभ -----९-४६-२२ ते ११-२४-२३   स्वामी शनी
 
      ४) मिन ----११-२४-२३  ते  १२-५९-५७  स्वामी गुरु

रुलिंग मध्ये शनी नाही म्हणजे मकर व कुंभ लग्न असणार नाही हे निश्चित सांगता येईल . रुलिंग मध्ये गुरु आहे आहे म्हणजे धनु किंवा मिन लग्न असणार हे ठामपणे सांगता येईल . आता धनु व मिन यापैकी कोणते लग्न असेल ते पाहू . धनु राशीत मूळ (केतू ) , पूर्वाषाढा (शुक्र ) उत्तराषाढा (रवी ) नक्षत्रे आहेत . यापैकी केतू व शुक्र रुलिंगमध्ये आहेत म्हणजे आपणाला धनु लग्न घेता येईल. आता मिन लग्नाचा विचार करू. मिन राशीमध्ये पूर्वाभाद्रपदा (गुरु) उत्तराभाद्रपदा (शनी) , रेवती (बुध ) नक्षत्रे आहेत . यापैकी गुरु व बुध रुलिंग मध्ये आहे . म्हणजे मिन लग्न सुद्धा आपण घेऊ शकतो.

 धनु व मिन यापैकी कोणते लग्न घ्यावे या संबंधी विचार करू ---

प्रथम आपण मिन लग्नाचा विचार करू....

                      मिन राशीमध्ये गुरु शनी बुधाची नक्षत्रे आहेत . मिन लग्न व गुरु नक्षत्र घेता येणार नाही कारण गुरु दोनदा आलेला नाही . रुलिंग मध्ये शनी नाही , म्हणून मिन लग्न व बुध नक्षत्र घ्यावे लागेल. . आता सब व सब सब ठरवू. रुलिंग मध्ये केतू व शुक्र शिल्लक आहेत यापैकी केतू नक्षत्र  स्वामी आहे व शुक्र वाराचा  स्वामी आहे .वाराचा  स्वामी पेक्षा , नक्षत्र स्वामी श्रेष्ठ म्हणून केतू सब म्हणून घेता येईल व शुक्र सब सब म्हणून घेता येईल. मिन लग्न बुध नक्षत्र केतू सब व शुक्र सब सब ज्यावेळी उदयास येईल त्यावेळी जातकाचा जन्म झाला असे म्हणता येईल. यानंतर कॉम्पुटर मधील ट्रान्झिट हा ऑपशन  वापरून जातकाची जन्मवेळ ठरवू  शकतो. ती वेळ येते १२-२३-२३. परंतु हि वेळ दुपारी १२ नंतर येते . म्हणून हि वेळ आपणाला घेता येणार नाही . आता राहिलेला शेवटचा पर्याय म्हणजे धनु लग्न

धनु लग्न --- धनु राशी मध्ये रुलिंग मधील केतू शुक्र नक्षत्रे आहेत . केतू नक्षत्रस्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून धनु लग्न व केतू नक्षत्र असे घ्यावे लागेल. आता सब व सब सब ठरवू.  शिल्लक राहिले बुध  व शुक्र यामध्ये बुध लग्न स्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून सब बुध  व शुक्र सब सब घ्यावा लागेल.
धनु लग्न केतू नक्षत्र बुध  सब व शुक्र सब सब ज्यावेळी उदयास येईल त्यावेळी जातकाचा जन्म झाला असे म्हणता येईल. कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून जातकाची जन्मवेळ ठरवू. ती वेळ येते ६-४१-१४ सकाळी

जातकची जन्म वेळ आली सकाळी ६-४१-१४ . या वेळेनुसार जातकाची पत्रिका तयार केली .

दि ३ जानेवारी १९८३ वेळ-- सकाळी ६-४१-१४ स्थळ---अ १७,४१   रे ७३,५९

आता आपण काढलेली वेळ बरोबर आहे का ते  पाहण्यासाठी सब चंद्र कनेक्शन थेअरी चा वापर करून पाहू. व त्याच्या   आयुष्यातील घटना तपासून पाहू.

 सब चंद्र कनेक्शन थेअरी --- १)   लग्नाचा सब बुध आहे व चंद्र सिंह राशीत केतू नक्षत्र आहे .सब बुध व चंद्र राशी स्वामी रवी युतीत आहेत. सब बुध रवी नक्षत्रात व चंद्र नक्षत्र स्वामी केतू ,रवी केतू युतीत आहेत.
                                           २) पंचम स्थान हे प्रथम संततीचे स्थान आहे जातकाला पहिला मुलगा आहे . जातकाच्या पत्रिकेतील पंचमाचा सब चा संबंध मुलाच्या चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्रस्वामी शी असला पाहिजे . जातकाच्या पत्रिकेतील पंचमाचा सब गुरु   आहे व मुलाच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरु  च आहे (मिन )
                                            ३) सप्तम स्थान हे पतीचे स्थान आहे जातकाच्या पत्रिकेतील सप्तमाचा सब चा संबंध पतीच्या पत्रिकेतील चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी शी असला पाहिजे जातकाच्या पत्रिकेत  सप्तमाचा सब शनी आहे शनी तूळ  राशीत राहू  नक्षत्रात आहे राहू बुधा चे प्रतिनिधित्व करत आहे . पतीच्या पत्रिकेत चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे .
अशाप्रकारे सब चंद्र कनेक्शन थेअरी वापरून आपण वेळेची खात्री केली.

आता त्यांच्या आयष्यातील घटना तपासून पाहू .

१) विवाह--१६ /०४ / २०००

सप्तम भावाचं सब २,५,८,७,११, पैकीचा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो
या कालावधीत शुक्र शनी चंद्र  दशा होती

शुक्र --१,६,७,९     चा कार्येश
शनी ---१,३, ४, ६,७,१०,११ चा कार्येश
चंद्र  ---१,३,४,८,१०,११,१२ चा कार्येश

या दशेत  ३,७,८,९,११ भाव विवाहाला अनुकूल होते .

२) प्रथम संतती ---३० / ७ / २००२

पंचम भावाचं सब २,५,११ पैकी चा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेमध्ये संतती  होते.
या कालावधीत शुक्र बुध रवी दशा होती.

शुक्र --१,६,७,९     चा कार्येश
बुध ---१,३,४,७,९,१०,११,१२  चा कार्येश
रवी ---१,६,७  चा कार्येश

या दशेत ७,९,११ भाव संतती साठी अनुकूल आहेत.( पंचमचे पंचम म्हणून नवम भाव )

३) नोकरी ---नोव्हेंबर २०१६

दशम भावाचा सब २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये नोकरी लागते.

वरील कालावधीत चंद्र शनी मंगळ  ची दशा होती

चंद्र ---१,३,४, ८,१०,११,१२   चा कार्येश
शनी ---१,३,४, ६,१०,११ चा कार्येश
मंगळ  ----२,३,१०,११,१२       चा कार्येश   

या दशेत २,६,१०,११ भाव नोकरीसाठी अनुकूल होते.          
अशा प्रकारे आपण काढलेली जन्मवेळ सब चंद्र कनेक्शन थेअरी व त्यांच्या आयुष्यातील घटना ची पडताळणी करून निश्चित केली .

शुभम भवतु !!!  

Sunday, 13 October 2019

Case Study---106

शोध --जावयाचा --२


                                        फेसबुकवरील लेख वाचून एका अपिरिचित व्यक्तीने मला नागपूरहून फोन केला . म्हणाले माझी मुलगी अमेरिकेत असते . ती डॉक्टर आहे . तिने अमेरिकेत एम एस  केले आहे . आता सद्या तिची इंटरशिप चालू आहे . आता आम्हाला वाटते तिचा विवाह व्हावा . आहे . तर तिच्या विवाहासाठी आपण मार्गदर्शन करावे . साधारणपणे तिचा विवाह कोणत्या कालावधीत होऊ शकतो . त्यादृष्टीने आम्हाला प्रयत्न करता येईल. आम्ही  शक्यतो तिकडचेच  एखादे स्थळ पाहण्याचा  प्रयत्न करीत आहोत. बऱ्याच वेळा  पालक वर्ग मुलगा मुलगी नोकरी व्यवसाय मध्ये स्थिर झाली कि त्याच्या विवाहाचे प्रयत्न सुरु करतात. आणि दोन तीन वर्ष प्रयत्न करूनही विवाह ठरत नाही त्यावेळी ज्योतिषाकडे धाव घेतात. मला वाटते ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी एखादा तज्ज्ञ ज्योतिषाकडून मुला  मुलीचे विवाहाचे योग केंव्हा आहे ते जाणून घ्यावेत. व त्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. म्हणजे वेळ व पैसा  वाचेल.
                                   मी त्यांच्या घरातील सर्वांचे बर्थ  डिटेल्स मागवून घेतले ( आई,वडील धाकटी  बहिण  व डॉक्टर मुलीचे  ) गोपनीयतेच्या कारणास्तव येथे त्यांचे बर्थ  डिटेल्स दिलेले नाहीत .ज्यांना पडताळणी करावयाची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा

दि -------- वेळ ------- स्थळ   रे ७३,५२  अ  १८,३२

                                        प्रथम मी या पत्रिकेची लग्नशुद्धी करून घेतली . लग्नाचा सब शुक्र रवीच्या नक्षत्रात आहे जो तिच्या पत्रिकेत चंन्द्राचा नक्षत्रस्वामी आहे तृतीय स्थान धाकटी बहीण तृतीयेचा सब गुरु सिंह राशीत रवीच्या नक्षत्रात आहे बहिणीच्या पत्रिकेत चंद्र राहू नक्षत्रात आहे . सब चा नक्षत्रस्वामी रवी, चंद्र ( धाकटी बहीण ) नक्षत्रस्वामी राहू युतीत आहेत. चतुर्थ स्थान आईचे आहे चतुर्थाचा सब शनी चंद्र नक्षत्रात आहे . आईच्या पत्रिकेत चंद्र सिंह राशीत केतूच्या नक्षत्रात आहे सब चा नक्षत्रस्वामी चंद्र व चंद्र ( आई )नक्षत्रस्वामी केतू युतीत आहेत. नवम स्थान  वडिलांचे आहे नवम स्थानाचा सब शनी आहे जो वडिलांच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्रस्वामी आहे . ह्यावरून पत्रिकेची वेळ बरोबर आहे हे सिद्ध होते . मुलगी डॉक्टर आहे  ( दंत वैध  )

                                चतुर्थाचा सब  ४,५,६ ,७ ,८ ,९, १० चा कार्येश असून रवी मंगल केतू शी संबंधित असेल तर वयक्ती डॉक्टर होते. चतुर्थाचा  / नवमाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व  खालीलप्रमाणे


 PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (10)   10 (11)  
It's N.Swami :-------- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
It's Sub :------------ Ketu:- 2       Rashi-Swami Mercury 4   3 6
It's Sub's N.Swami :-- Mars:- (2)   (1) 8  
Itself aspects :------ 4 12 7


चतुर्थाचा / नवमचा सब शनी आहे शनी हाडे व दाताचा कारक आहे . शनी चंद्राच्या नक्षत्रात केतूच्या सब मध्ये आहे . केतू वैद्य आहे . मंगल शस्त्रक्रिया . तसेच ५,११   भाव औषधोपचार ६ भाव आजार, रोग ७ ,१० वैद्यकीय व्यवसाय  म्हणून  सदर मुलगी दंत  वैद्य आहे .

सदर मुलीने अमेरिकेत एम एस केले आहे .
व्ययाचा सब ४,९,११ चा कार्येश असेल व्यक्ती परदेशात उच्च शिक्षण घेते .

व्ययाचा सब बुध आहे बुधा चे कार्येशत्व

 PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's Sub :------------ Saturn:- (10)   10 (11)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
Itself aspects :------ 10

४ थ्या पायरीवर चंद्र आहे चंद्र आणि गुरु ची युती आहे( ८ अंश ) म्हणून गुरूमुळे ५,९,१२ चे कार्येशत्व बुधाला मिळेल. बुध ३,४,५,६,७,९,१०,११,१२ चा कार्येश आहे . ह्यामधील ४,५,६,९,११,१२ मुले परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले

आता आपण तिच्या विवाहाचा विचार करू. ----

सप्तमाचा सब २,७,११,५,८ या पैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत विवाह होतो.
मी पत्रिका पहिली त्यावेळेचे रुलिंग ----

दि  ४/१०/१९  वेळ २२-४२-३२

मंगळ *  बुध   केतू   गुरु   शुक्र                 ( बुध  / राहू ,  गुरु / केतू )

या पत्रिकेत सप्तमाचा सब बुध  आहे बुध रुलिंग मध्ये आहे . बुधा चे कार्येशत्व ----

खरे तर सप्तमाचा सब बुध  असू नये , कारण बुध  द्वित्व दाखवितो. एकापेक्षा जास्त विवाह परंतु बुध  जर २,७,११,५,८ हे भाव दाखवीत असेल तर काही वाईट परिणाम घडणार नाहीत .

 PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's Sub :------------ Saturn:- (10)   10 (11)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
Itself aspects :------ 10

४ थ्या पायरीवर चंद्र आहे चंद्र आणि गुरु ची युती आहे ( ८ अंश ) म्हणून गुरूमुळे ५,९,१२ चे कार्येशत्व बुधाला मिळेल.

वरील पत्रिकेत बुध  ३,४,५,६,७, ९, १०,११ ,१२ चा कार्येश आहे

३,५,७,९,११ हे भाव अनुकूल आहेत . ४,६,१०,१२ भाव प्रतिकूल आहेत. येथे सप्तम भावाचा संबंध पंचम भावाशी येतोय . एखादी पुरुष व्यक्ती आयुष्यात येऊ शकते . परंतु पंचम भावाचा सब रवी ७ चा कार्येश नाही . म्हणून प्रेम विवाह होणार नाही . बुध ४,१० ,३,९,१२ चा कार्येश आहे ४,१० मुळे मुलगी राहते त्या गावातील ( आईच्या नात्यातील )व  ३,९,१२  मुळे परदेशात गेलेला,  स्थळ असेल.

आता आपण विवाह केंव्हा होईल हे पाहण्यासाठी पत्रिकेतील दशा पाहू

                                                 प्रथम पत्रिका पहिली त्यावेळी राहू मध्ये बुधा ची अंतर्दशा चालू आहे . याच  बरोबर ७ चा सब बुध स्वनक्षत्रात ,  शनीच्या सबमधे आहे . याठिकाणी शनीचा संबंध येतोय . शिवाय शनी चंद्राच्या नक्षत्रात आहे . म्हणजे पुनरफू योग  आहे . विवाह उशिरा होणार आहे . आता उशिरा म्हणजे किती उशिरा समजायचे , ज्यावेळी आई वडिलांना विवाह व्हावा असे वाटते त्यानंतर २-३ वर्षांनी विवाह होतो. माझ्यामते ज्यावेळी विवाहामध्ये शनीचा संबंध येतो त्यावेळी विवाहाचे वय २९ ते ३२ असते. म्हणून मी बुध  अंतर्दशा सोडून दिली . त्यापुढील केतू अंतर दशा घेतली राहूचे कार्येशत्व -----


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (8)      Rashi-Swami Jupiter (5)   (9) (12)
It's N.Swami :-------- Ketu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)
It's Sub :------------ Sun:- 5   5  
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)
Itself aspects :------ 3



राहू २,३,४,५,६,८,९, १२ भावांचा कार्येश आहे . यापैकी २,३,५,८,९ हे भाव अनुकूल आहेत  विवाहासाठी ६ भाव असू च नये कारण ६ भाव दूरत्व निर्माण करतो. या पत्रिकेत सर्वच ग्रह ६ भाव दाखवितात. २,३,५,८,९अनुकूल भावामुळे   राहू दशेत  विवाह होणार . आता केतू अंतर्दशेचा विचार करू . केतुचे कार्येशत्व ---



PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 2       Rashi-Swami Mercury 4   3 6
It's N.Swami :-------- Mars:- (2)   (1) 8  
It's Sub :------------ Venus:- (5)   2 (7)  Cusp Yuti: (6)       Moon-Yuti  (5)   4
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   5  
Itself aspects :------ 9


केतू २,५,६,७, भावांचा कार्येश आहे यातील २,५,७ अनुकूल आहेत .
आता त्या पुढील शुक्राची  विदशा . शुक्राचे कार्येशत्व ----

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (5)   2 (7)  Cusp Yuti: (6)       Moon-Yuti  (5)   4
It's N.Swami :-------- Sun:- (5)   5  
It's Sub :------------ Saturn:- (10)   10 (11)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
Itself aspects :------ 12


शुक्र ५,६,७,१०,११ भावांचा कार्येश आहे  यातील ५,७,११ अनुकूल आहेत .
राहू महादशा केतू अंतर्दशा शुक्र विदशा म्हणजे एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत विवाह होईल .
राहू महादशा   केतू अंतर दशा  शुक्र विदशा मध्ये (१,४, ६ , १०,१२ ) हे भाव असल्यामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक राहील .

    गोचर भ्रमण---- या कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल असेल तरच विवाह होईल . राहू केतू हे मंद गतीचे ग्रह असल्यामुळे त्यांचे सब मधील भ्रमण व शुक्र शीघ्र गतीचा ग्रह असल्यामुळे त्याचे नक्षत्रातील भ्रमण पाहावे लागेल . खालील कालावधीत राहू केतू व शुक्राचे गोचर भ्रमण अनुकूल आहे 

           १) २८ एप्रिल २०२२ ते ११ मे  २०२२

           २) ४ जुन २०२२        ते १५ जून २०२२                     

वरील कालावधीत च विवाह होईल. असे सांगता येईल. विवाह ठरणे आणि होणे यामध्ये अंतर असू शकते . कार्यालयाच्या तारखा या काळात उपलब्ध असतील तर या काळात विवाह होईल नाहीतर या काळात विवाह ठरू शकतो. 

वडिलांनी अजून एक प्रश्न विचारला आहे मुलगी विवाहानंतर अमेरिकेत कायमस्वरूपी राहील का ? व्ययाचा  सब बुध कर्क या चर राशीत ,. बुधाचा नक्षत्रस्वामी बुध च आहे म्हणून त्याचा सब शनी हा नक्षत्रस्वामी म्हणून घेतला आणि शनी मकर राशीत म्हणजे चर राशीत आहे म्हणून मुलगी अमेरिकेत कायमस्वरूपी राहणार नाही असे सांगितले .

महाजनांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात .

शुभंम भवतु  !!!

Friday, 11 October 2019

                                                         Case Study--108

            स्वप्न --एम एस होण्याचे --३

                                         एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न हे संबंधित व्यक्ती च्या पत्रिकेवरून  तसेच कुटुंबातील इतरांच्या पत्रिकेवरून सोडविता यायला हवा . उदा. समजा  कुटुम्बात आई वडील मुलगा मुलगी असतील तर कोणा  एकाचा  प्रश्न सर्वांच्या पत्रिकेतून पाहता यायला हवा . सर्वच पत्रिकेत एक वाक्यता यायला हवी. ह्यावरून आपण ठामपणे भाकीत करू शकू . असे मला वाटते . यासाठी कुटुंबातील सर्वांच्या पत्रिकेची प्रथम लग्नशुद्धी करून घेतली पाहिजे . मी याठिकाणी अशाप्रकारे  प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे . महाजनांनी आपले अभिप्राय द्यावेत .
                                                 एका मुलाच्या आईने बेळगावहून फोन केला म्हणाली मी आपला फेसबूक वरील स्वप्न--- एम एस होण्याचे हा लेख वाचला आहे  माझ्या मुलाला एम एस करण्यासाठी परदेशी जाण्यची इछा  आहे . म्हणून मी  प्रश्न विचारत आहे माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल का ? त्याला स्कॉलरशिप मिळेल का ? आता तो सद्या इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे .त्याने GRE  आणि TOFFEL च्या परीक्षा दिल्या आहेत .त्याचा स्कोअर उत्तम आहे . त्याला  खात्री आहे . फक्त त्याला वाटते चांगली युनिव्हर्सिटी मिळावी . मी त्यांचे स्वतः चे , मुलाचे  ,वडिलांचे व मोठ्या मुलीचे जन्म टिपण मागवून घेतले . गोपनीयतेच्या कारणास्तव मी येथे बर्थ डिटेल्स दिलेले नाहीत . ज्यांना पडताळणी करायची असेल  त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा
सर्व प्रथम मी सर्व पत्रिकांची लग्न शुद्धी  सब चंद्र कनेक्शन पद्धतीने करून घेतली .


१)  मुलाची कुंडली
                    दि ---------वेळ -------स्थळ--- रे ७२,५४ अ  १९,०३
             हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे .

            परदेशात उच्च शिक्षण --नियम--- व्ययाचा सब ३,९,१२ बेरोबर  ४,९,११ पैकी चा कार्येश असेल तर परदेशात उच्च शिक्षण होईल.
 
व्ययाचा सब बुध  आहे . बुधाचे कार्येशत्व ----


PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 12   8 11  
It's N.Swami :-------- Saturn:- (5)   3 (4)  
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Sun (12)   10
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
Itself aspects :------ 7

बुध ३,९,१२ बरोबर ४,९ चा कार्येश आहे . परदेशात उच्च शिक्षण होणार असे सांगता येईल

नवमचासब रवि  आहे  रविचे   कर्येश्त्व----

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 12   10  Cusp Yuti: (1)    
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   (8) (11)  
It's Sub :------------ Mercury:- 12   8 11  
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (5)   3 (4)  
Itself aspects :------ 7

रवि  5 11चा कार्येश आहे परदेशात उच्च शिक्षण होणार ( श्री गोंधळेकर सर )

२) आता आईची पत्रिका पाहू  आईची पत्रिका कन्या लग्नाची आहे

दि ------ वेळ ------ स्थळ  रे ७५,३४  अ  २१,०१

आईच्या पत्रिकेत  पंचम स्थान प्रथम अपत्य व सप्तम स्थान हे दुसरे अपत्य होईल . प्रथम कन्या आहे व द्वितीय मुलगा आहे . म्हणून सप्तम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेऊ . फिरवून घेतलेल्या कुंडलीत व्यय भावाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व ----

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 8     Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Mercury 7   5 8
It's N.Swami :-------- Moon:- (7)   6  
It's Sub :------------ Mercury:- 7   5 8     Venus-Yuti  7  4 9
It's Sub's N.Swami :-- Venus:- (7)   (4) (9)     Mercury-Yuti  (7)   5 8
Itself aspects :------ 2


आईच्या पत्रिकेत सुद्धा व्ययभावाचा सब केतू ४,९ चा कार्येश आहे म्हणजे आईच्या पत्रिकेतून मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार असे म्हणता येईल

३)आता वडिलांची पत्रिका पाहू

दि ----- वेळ ----- स्थळ -- रे ७३,५२  अ  १८,३२

 वडिलांची पत्रिका वृश्चिक लग्नाची आहे .
वडिलांच्या पत्रिकेत दुसरे अपत्य प्रथम स्थानावरून पाहावे लागेल कारण लाभ स्थानावरून प्रथम संतती पहिली जाते व लग्न स्थानावरून द्वितीय संतती पहिली जाते . या ठिकणी कुंडली फिरविण्याची आवश्यकता नाही

व्यय भावाचा सब बुध आहे बुधाचे कार्येशत्व ----


PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 7   8 11     Venus-Yuti  7  7 12
It's N.Swami :-------- Moon:- (8)   (9)  
It's Sub :------------ Saturn:- (3)   3 (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (10)   (1) (6)  
Itself aspects :------ 1

 
बुध ४,६,९ भावाचा कार्येश आहे . वडिलांच्या पत्रिकेत सुद्धा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार हे सांगता येईल.

४) आता मोठ्या बहिणीची पत्रिका पाहू

दि -------- वेळ -------- स्थळ -----रे ७३,४७ अ १९,५९

हि धनु लग्नाची पत्रिका आहे 

धाकटा भाऊ म्हणजे तृतीय स्थान येईल . तृतीय स्थान हे लग्न धरून कुंडली फिरवून घेतली .
या पत्रिकेत व्यय भावाचा सब ४,९,११ पैकीचा कार्येश आहे का ते पाहू . फिरवून घेतलेल्या कुंडली मध्ये व्यय भावाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व ----

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 4   4 9     Mars-Yuti  4  3 10
It's N.Swami :-------- Moon:- (9)   (6)  
It's Sub :------------ Mercury:- 4   5 8  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (4)   (3) (10)     Venus-Yuti  (4)   4 9
Itself aspects :------ 10



या ठिकाणी व्यय भावाचा सब शुक्र ४,६,९ भावाचा कार्येश आहे . म्हणजे याही बहिणीच्या पत्रिकेतून धाकटा भाऊ उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार हे नक्की सांगता येईल.

५)                             अजून एक  प्रयत्न करायचे ठरविले . आईना  सांगितले , मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी केम्व्हा जाईल असा विचार मनात करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा. त्यांनी १७३ हि संख्या सांगितली . या संख्येवरून मी कुंडली तयार  केली. हि कुंडली  धनु  लग्नाची आहे .

दि --७/१० / २०१९  वेळ १४-१०-५३  स्थळ  रे ७४,२६ अ १७,५९

पंचम स्थान मुलाचे लग्न स्थान होईल पंचम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली

व्ययाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व ----

 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (8)   9 (12) 
It's N.Swami :-------- Mercury:- (6)   3 6 
It's Sub :------------ Rahu:- (3)      Rashi-Swami Mercury (6)   3 6  Saturn-Drusht  (9)   (10) (11)
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (3)      Rashi-Swami Mercury (6)   3 6  Saturn-Drusht  (9)   (10) (11)
Itself aspects :------ 2 12 4


गुरु ३,९,१२ बरोबरच ९,११ चा कार्येश आहे . मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार

 अशा प्रकार कुटुंबातील सर्वांच्या पत्रिकेतून मुलगा उच्च शिक्षणासाठी  परदेशी जाणार हे ठामपणे सांगता येईल .

आईने आणखी एक प्रश्न विचारला आहे . त्याला स्कॉलरशिप मिळेल का ? ते पाहू ----

मुलाची कुंडली --
  दि ---------वेळ -------स्थळ--- रे ७२,५४ अ  १९,०३

  हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे .

स्कॉलरशिपसाठी  नियम---अष्टमाचा सब २,६,११ पैकी चा कार्येश असेल तर २,६,११ च्या सयुंक्त दशेत स्कॉलरशिप मिळेल.
या पत्रिकेत अष्टमाचा सब मंगल आहे मंगळाचे कार्येशत्व ----

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 10   1 6  
It's N.Swami :-------- Sun:- (12)   10  Cusp Yuti: (1)    
It's Sub :------------ Venus:- (1)   (7) 12  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   (8) (11)  
Itself aspects :------ 5 2 6


४ थ्या पायरीवर बुध  आहे . या बुधावर चंद्राची दृष्टी आहे ( ४  अंश ३८ कला ) त्यामुळे ६ भावाचे कार्येशत्व मंगळाला मिळेल. . मंगल ६,८,११ भावाचा कार्येश आहे . म्हणजे स्कॉलरशिप मिळणार हे नक्की झाले .

आता परदेशी केंव्हा जाणार ? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे . जातकाला घटना कोणत्या काळात घडेल याची उत्सुकता जास्त असते . नुसतेच घडेल , होईल असे सांगून चालत नाही.. त्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील . आता जातक इंजिनिअरिंग च्या  ४ थ्या वर्षात आहे . म्हणजे जुलै ऑगस्ट २०२० मध्ये त्याचे इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण होईल . त्यानंतरच्या  दशा पाहाव्या लागतील

मी जेंव्हा कुंडली पहिली तेंव्हा राहू मध्ये गुरुची अंतर्दशा चालू  होती . गुरुची अंतर्दशा ६ जुलै २०२१ पर्यंत आहे

राहूचे कार्येशत्व
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (9)      Rashi-Swami Sun (12)   10
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
It's Sub :------------ Venus:- (1)   (7) 12  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   (8) (11)  
Itself aspects :------ 4

राहू ३,९,१२ /  ४,९,११ चा कार्येश आहे राहू अनुकूल आहे . कुंडलीचे लग्न वृश्चिक आहे म्हणजे स्थिर तत्व आहे म्हणून गुरु अंतर दशेत घटना घडणार नाही त्यापुढील अंतर्दशा शनीची आहे . शनीचे कार्येशत्व ---


PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 5   3 4  
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
It's Sub :------------ Sun:- 12   10  Cusp Yuti: (1)    
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   (8) (11)  
Itself aspects :------ 12 8 3


शनी १,३,४,५,८,११,१२ चा कार्येश आहे त्यातील ३, १२ / ४,११ अनुकूल आहेत शनीची अंतर्दशा ६ जुलै २०२१ ते
१२ मे  २०२४ पर्यंत आहे , या मधील  कोणत्या वर्षात  जाणार त्यासाठी विदशा पाहावी लागेल.  त्यापुढील विदशा बुधा ची आहे बुधाची विदशा १८ डिसेंबर २०२१ ते १४ मे २०२२ पर्यंत आहे . बुधा  चे कार्येशत्व ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 12   8 11  
It's N.Swami :-------- Saturn:- (5)   3 (4)  
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Sun (12)   10
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
Itself aspects :------ 7


बुध  ३,९,१२ / ४,९ चा कार्येश आहे .

सादर जातक उच्च शिक्षणासाठी राहू शनी बुध  दशे मध्ये डिसेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत परदेशी जाईल .

                                          ह्या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी वाटते वरील सर्वांच्या पात्रिकेतून उच्च शिक्षण होणार असे दिसत असले तरी मुलाच्या पत्रिकेत व्यया चां सब बुध प्लुटो च्य युतीत आहे. प्लुटो ने आतापर्यंत अनुकूलता दाखविलेली नाही. पण मला असे वाटते पहिल्या २ पायरीला प्लुटो संबंध येत असेल तर त्याचा अशुभ परिणाम होणार नाही.३-४ पायरीला आला असता तर कदाचित संबंधित घटना घडणार नाही. याठिकाणी प्लुटो चा संबंध पहिल्या पायरीला येतोय.नंतर नाही म्हणून मला असे वाटते मुलगा उच्च शिक्षण घेणार


महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा

शुभंम भवतु !!!




Wednesday, 2 October 2019

                                                     Case Study--104   


स्वप्न--एम एस होण्याचे-२
                                   
                                                        फेसबुकवरील माझा , स्वप्न एम एस होण्याचे हा लेख वाचून एका मुलाच्या आईने पुणयाहून फोन केला . माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे . माझ्या मुलाची एम एस होण्याची खूप इच्छा आहे . तो हुशार सुद्धा आहे १२ वि परीक्षेत त्याला ८० टक्के मार्क्स मिळाले होते . यापूर्वी ऑल इंडिया लेव्हल एक परीक्षा झाली होती त्यात त्याचा   १८ वा नंबरआला होता. आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न सुद्धा करीत आहे . माझी इच्छा आहे त्याने एम एस करावे. माझा प्रश्न असा आहे कि तो परदेशात एम एस करेल का ? तशी संधी त्याला मिळेल का ? मिळणार असेल तर त्या दृष्टीने मला आतापासूनच पैशाची तरतूद करावी लागेल . त्याला पाठविण्याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे . शैक्षणिक कर्ज काढावे लागेल किं त्याला स्कॉलरशिप मिळेल  ते पण सांगा आणि नसेल मिळणार तर त्याने दुसरे कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे हि सांगा.

             मी मुलाचे बिर्थ डिटेल्स त्यांच्याकडून मागवून घेतले गोपनीयतेच्या कारणास्तव येथे बिर्थ डेटल्स दिलेले नाही .. ज्यांना पडताळणी करावयाची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा .

दि -------वेळ ----- स्थळ--- रे ७२,५८ अ १९,१२

हि वृश्च्छिक लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब शनी केतू नक्षत्रात आहे व चंद्र धनु  राशीत केतूच्या नक्षत्रात आहे . चतुर्थ स्थानचा सब  ( आई ) . शुक्र बुधा च्या राशीत चंद्राच्या नक्षत्रात आहे आहे आईच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरुची दृष्टी बुधवार आहे. नवम  भावाचा सब (वडील) गुरु आहे वडिलांच्या पत्रिकेत चंद्र गुरूच्या नक्षत्रात आहे . याचा अर्थ पत्रिका बरोबर आहे

परदेशात उच्च शिक्षण --- व्यय भावाचा सब ३,९,१२ बरोबर ४,९,११ पैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत परदेशात उच्च शिक्षण होईल.

या पत्रिकेत व्यय भावाचा सब शुक्र आहे . शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (1)   (3) (10)     Jupiter-Drusht  (7)   (5) 8
It's N.Swami :-------- Sun:- (2)   1  Cusp Yuti: (2)       Mercury-Yuti  (2)   2 (11)
It's Sub :------------ Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
Itself aspects :------ 8

शुक्र ३,९,१२ परदेशगमनासाठी अनुकूल आहे तसेच ९,११ उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे .
सदर जातक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार हे निश्चितपणे सांगता येईल.

आता दुसरा प्रश्न .... परदेशी जाण्यासाठी पैशाची सोय  होईल का ते पाहू. त्याच्या आईने विचारले आहे त्याला स्कॉलरशिप मिळेल का ? स्कॉलरशिपसाठी नियम ----

अष्टमाचा सब २,६,११ चा कार्येश असेल तर स्कॉलरशिप मिळेल.

या पत्रिकेत अष्टमाचा सब केतू आहे . केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ...


 PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 6     Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn 8   6 7
It's N.Swami :-------- Mars:- (12)   4 (9)  
It's Sub :------------ Moon:- 4   12  
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn (8)   6 7
Itself aspects :------ 1




केतू २,६,११ पैकी ६ भावाचा कार्येश आहे म्हणजे त्याला स्कॉलरशिप मिळणार हे सांगता येईल.

आता  शैक्षणिक कर्ज मिळेल का  ते पाहू .. कर्जाचा विचार षष्ठ स्थानावरून करतात. षष्ठ  भावाचा सब २,६,११ . चा कार्येश असेल तर शैक्षणिक कर्ज मिळेल . षष्ठ  भावाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व ----


PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 4   12  
It's N.Swami :-------- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn (8)   6 7
It's Sub :------------ Ketu:- 6     Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn 8   6 7
It's Sub's N.Swami :-- Mars:- (12)   4 (9)  
Itself aspects :------ 11



चंद्र ६ भावाचा कार्येश आहे शैक्षणिक कर्ज मिळेल असे सांगता येईल. आतापर्यंत सगळ्याच गोष्टी अनुकूल झाल्या आहेत पण तो ज्यावेळी जाणार तो काळ अनुकूल आहे का ते पहिले पाहिजे तरच ह्या गोष्टी  शक्य आहेत . ह्यासाठी त्याच्या पत्रिकेतील दशा आपणास पाहाव्या लागतील
                                        आता तो इंजियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे . शै .वर्ष २०१९-२०२० मध्ये ३ रे वर्ष पूर्ण होईल. व साधारणपणे जुलै २०२१ मध्ये त्याचे ४ थे वर्ष पूर्ण होईल. जुलै २०२१ नंतर चा कालावधीत त्याचे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणे घडेल का ते पाहू.परदेशातील शिक्षण साधारणपणे सप्टेंबर महिन्यात सुरु होते . या काळात शुक्रामध्ये बुधा ची अंतर दशा चालू आहे शुक्र / बुध जून २०२४ पर्यंत आहे . शुक्र बुधा चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ....


PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (1)   (3) (10)     Jupiter-Drusht  (7)   (5) 8
It's N.Swami :-------- Sun:- (2)   1  Cusp Yuti: (2)       Mercury-Yuti  (2)   2 (11)
It's Sub :------------ Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
Itself aspects :------ 8



PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (2)   2 (11)  Cusp Yuti: (2)       Sun-Yuti  (2)   1
It's N.Swami :-------- Moon:- (4)   12  
It's Sub :------------ Rahu:- (12)    Cusp Yuti: (1)      Rashi-Swami Sun (2)   1
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn (8)   6 7
Itself aspects :------ 8

शुक्र  ३,९,११,१२ चा कार्येश आहे व बुध ४,६,११,१२ चा कार्येश आहे आपणास  आवश्यक  असलेल्या ३,९,१२ व ४,९,११ भावाचे कार्येशत्व आहे .

शुक्र महादशा  बुध अंतर दशा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे . २०२१ ते २०२४ या कालावधीत त्याचे शिक्षण होईल असे सांगता येईल.
                                       आता आईची पत्रिका काय म्हणतेय ते पाहू . आईच्या पत्रिकेत मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल का ? आईच्या पत्रिकेत पंचम स्थान हे मुलाचे लग्न स्थान होईल. पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली  आईची पत्रिका  वृश्चिक लग्नाची आहे . पंचम स्थानात मिन रास  आहे .
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये व्यया चा सब रवी आहे . रवीचे कार्येशत्व

 PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (8)   (6)     Venus-Yuti  (8)   3 8
It's N.Swami :-------- Saturn:- (4)   11 12 
It's Sub :------------ Venus:- (8)   3 8  Cusp Yuti: (9)       Sun-Yuti  (8)   (6)  Rahu-Yuti  (9)    Ketu-Drusht  (3)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (4)   11 12 
Itself aspects :------ 3

 रवी ४,६,९ चा कार्येश आहे  सब रवी ४,९ चा कार्येश आहे . जातक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार .



महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा .

शुभम भवतु  !!!