कृष्णमूर्ति ज्योतिष

Monday 20 April 2020

Case Study--120    

 संतती ----


        मुलीचा विवाह झाला तरी आईवडिलांची जबाबदारी संपत नाही . मुलीला एखादी संतती झाली कि आईवडिल खऱ्या अर्थाने जबाबदारीतून मोकळे होतात. पण जर संतती होत नसेल तर काळजी वाढत जाते मग वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात , टेस्ट सर्व नॉर्मल येत असूनसुद्धा संतती होत नसेल तर मात्र टेन्शन वाढत जाते. नंतर ivf टेस्ट घेऊन संतती साठी प्रयत्न केला जातो. तरीही संतती होत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून ज्योतिषाकडे पावले वळतात . अशाच एका स्त्री चा फोन येतो .....  ....मला एक प्रश्न विचारायचा आहे . मला संतती केंव्हा होईल ? आमच्या लग्नाला जवळजवळ १० वर्षे झाली अद्याप संतती नाही. सर्व टेस्ट पॉसिटीव्ह असून सुद्धा  संतती झाली नाही . ivf  टेस्ट सुद्धा ३-४ झाल्या तरीसुद्धा संतती झाली नाही. तर माझ्या नशिबात संततीचा योग्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला . मी म्हटले तुमचे बिर्थ डिटेल्स द्या  .( गोपनीयतेच्या कारणास्तव  या ठिकाणी  बर्थ डिटेल्स दिलेले नाहीत )

                                 हि मकर लग्नाची पत्रिका आहे. प्रथम मी पत्रिका बरोबर आहे कि नाही ते पाहत असतो. लग्नाचा सब गुरु आहे गुरु कुंभ राशीत पूर्व भाद्रपद नक्षत्रात (गुरु ) आहे . चंद्र कर्क राशीत पुष्य नक्षत्रात आहे . सब गुरूचा राशी स्वामी शनी आहे तोच चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे . तसेच इंटर्क्सप्ल लिंक थेअरी प्रमाणे लग्नाचा सब सब शनी आहे आणि चंद्राचा नक्षत्रस्वामी शनी आहे . पत्रिका ची वेळ बरोबर आहे .

 पंचमाचा सब २,५,११ भावाचा कार्येश असेल तर २,५,११ या भावांच्या संयुक्त दशेत संतती होते
या कुंडलीत पंचमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे .....

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (9)   (5) 10     Jupiter-Drusht  (2)   (3) (12)
It's N.Swami :-------- Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
It's Sub :------------ Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
Itself aspects :------ 4

शुक्र २ ,५ ,३ ,९चा कार्येश  आहे    २,५ चा कार्येश असूनसुद्धा संतती झाली नाही. भाव ३,९ सुद्धा अनुकूल आहेत . संतती न होण्याचे कारण काय असू शकेल ? तिसऱ्या चौथ्या पायरीला २,३ भाव अनुकूल आहेत पण ४,१२ हे भाव पूर्ण प्रतिकूल आहेत -----
 याठिकाणी शुक्र प्लूटो या ग्रहाच्या पूर्ण युतीत ( ५. ४अंश ) आहे तसेच गुरु बरोबर नेपच्यून या ग्रहाचा ७०. ६ अंशाचा अशुभ योग्य आहे . मंगळ चा  नेपच्यून बरोबर ७१.. ३ चा अशुभ योग्य आहे . या नेपच्यून प्लूटो योगामुळे आज पर्यंत संतती झालेली नाही.

{ पारंपरिक नुसार पंचमेश शुक्र ----
( मकर लग्नाला शुक्र राजयोगकारक ) पंचमेश दशमात व्ययेश गुरूने दृष्ट . पंचमेश शुक्र प्लुटोच्या युतीत . पंचमावर शनी बुध  हर्षल ची दृष्टी  संतती कारक गुरु , व्ययेश गुरु दुसर्या स्थानात गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा नाश करतो कुटुंब वृद्धी नाही मंगळाची पंचम स्थानावर दृष्टी पंचम स्थानावर दोन पाप ग्रहांची दृष्टी येते (शनी मंगल ) . तसेच चंद्राकडून पहिले तर पंचमेश मंगल चंद्राच्या अष्टमात .चंद्राकडून मंगल राजयोगकारक पण तो अष्टमात षष्टेश गुरु ने युक्त }वरील  कारणाने आजपर्यंत  संतती झाली नाही .

सब जर नकार दर्षवित  असेल तर दशा पाहण्याची आवशक्यता नसते तरी सुद्धा मी दशा  पहिल्या प्रथम कुंडली पाहताना शुक्र मध्ये राहू दशा चालू होती .
शुक्राचे कार्येशत्व आपण पहिलेच आहे . राहू चे कार्येशत्व---

 PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)    Cusp Yuti: (3)      Rashi-Swami Jupiter (2)   (3) (12)
It's N.Swami :-------- Mercury:- (11)   (6) 9  Cusp Yuti: (11)       Saturn-Yuti  (10)   (1) 2
It's Sub :------------ Mars:- 2   4 11  Cusp Yuti: (2)       Jupiter-Yuti  2  3 12
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   (3) (12)  Cusp Yuti: (2)       Mars-Yuti  (2)   (4) 11
Itself aspects :------ 9


राहू बुध  नक्षत्रात बुध  प्लूटो ३५. ८ अशुभ योग्य आहे मंगल गुरु बरोबर नेपच्यून अशुभ  योग शिवाय  चौथ्या पायरीवर   ४, १२ हे भाव पूर्ण अशुभ ( ४ भाव --पंचमचे व्यय  व  १२ पंचमापासून अष्टम )

संतती होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल . पण हि गोष्ट स्त्रीला सांगणे हे फार अवघड आहे . ह्याला पर्याय काय असू शकेल . दत्तक घेणे . परंतु दत्तक घेण्याचे योग  असले पाहिजे.

दत्तक नियम ---पंचमाचा सब ५ चा कार्येश असून ४ चा कार्येश असेल तर ती व्यक्ती एखादी संतती दत्तक घेते.

पंचम भावाचा सब शुक्र आहे शुक्र ५ व ४ या दोन्ही भावाचा कार्येश आहे त्यामुळे ह्या जातकाला दत्तक घेता येईल . म्हणून मी त्यांना दत्तक घेण्याबद्दल सुचविले . मी सांगण्या अगोदरच त्यांनी दत्तक घेण्याबद्दल विचारविनिमय सुरु केला होता ....

उदाहरण --२

दि--- / ---/१९९२   सकाळी--६-२०

हीचा  विवाह २०१६ रोजी झाला

या पत्रिकेत पंचमाचा सब बुध  आहे बुधाचे कार्येशत्व --

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (1)   1 10     Mars-Drusht  (10)   3 (8)
It's N.Swami :-------- Moon:- (10)   (11)  Cusp Yuti: (11)    
It's Sub :------------ Mars:- 10   3 8  
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (3)      Rashi-Swami Jupiter (12)   (4) (7)  न . केतू ९, १
Itself aspects :------ 7

बुध  ४ त्या पायरीला १२,४,व  एकूण १२,४, १, ८  या प्रमुख विरोधी भावाचा कार्येश आहे संतती झाली नाही.

ह्याची खात्री करहाण्यासाठी हाच प्रश्न मी प्रश्न कुंडलीवरून ( नंबर कुंडली ) सोडविण्याचे ठरविले
ह्या मुलीला मी म्हटले,  मनात मला संतती केंव्हा होईल असा विचार करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा तिने ८७ हि संख्या सांगितली . या वरून मी कुंडली तयार केली .

दि २९ / १० / २०१९ वेळ- १३-३९-१९  स्थळ १७,,५९  रे ७४, २६ के.पी. नंबर ८७

या पत्रिकेत पंचमाचा सब चंद्र आहे 

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 3   12  
It's N.Swami :-------- Jupiter:- (4)   5 (8)  
It's Sub :------------ Venus:- 3   3 10  Cusp Yuti: (4)       Mercury-Yuti  3  2 11
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (4)   5 (8)  
Itself aspects :------ 9

चंद्र ३,४ त्या पायरीला पूर्ण विरोधी  भावाचा ४ ,८ कार्येश आहे संतती होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगता येईल.
 मूळ कुंडली व नंबर कुंडली मध्ये एकवाक्यता दिसून येते . थोडक्यात , आडात नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार ?  हेच खरे ......... इथे दत्तक घेण्याचे सुद्धा योग्य नाहीत ......

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment