कृष्णमूर्ति ज्योतिष

Sunday 10 November 2019

Case Study--122

विवाह ----विलंब  


                                                      वय वर्षे ३६ हे विवाहयोग्य वय असू शकत नाही . विवाहाला जेंव्हा  उशीर  होतो त्यावेळी शनि,मंगळ व हर्शल नेपच्यून प्लूटो या ग्रहांचा संबंध असू शकतो . मंगल वयाच्या २७-२८व्या वर्षी ,शनी वयाच्या २९-३२ व्या वर्षी , व हर्शल मुले ठरलेला विवाह मोडू शकतो म्हणून सुद्धा विवाह लांबतो. नेप्क्युन मुले कधी कधी विवाहापूर्वी फसवणूक झाल्यामुळे विवाहाला विलंब होऊ शकते. कधी कधी विवाहानंतर आपली फसवणूक झाली असे लक्षात येते. प्लूटो चा जेंव्हा संबंध येतो लग्न फार उशिरा किंवा होत सुद्धा नाही. . . शनि १,३,५,७,१० व्या स्थानात असतो त्यावेळी विवाहाला उशीर होत असतो. मंगळ १,४,७,८,१२व्या स्थानात  असेल तर विवाहाला उशीर होतो . हर्शल सप्तम स्थानात किंवा हर्षलची सप्तम स्थानावर दृष्टी असेल तर विवाहाला उशीर होत असतो . शुक्र हर्शल युती, प्रतियोग हासुद्धा योग विवाहाला उशीर  करतो चंद्र शनि युती असेल तर ,चंद्र शनीच्या नक्षत्रात ,शनि चंद्राच्या नक्षत्रात ,चंद्रावर  शनीची दृष्टी असेल तर पुनर्फू योगामुळे विवाहाला उशीर होत असतो ,चंद्राचा सब शनि असेल,किंवा शनीचा सब चंद्र असेल तर विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शनि, बुध राहू असेल तरीसुद्धा विवाहाला उशीर होतो. सप्तमाचा सब शुक्र ,चंद्र , ,रवि गुरु असेल तर विवाह योग्य वयात होतो असा अनुभव प्रत्येक ज्योतिषाला येत असतो .पत्रिका पाहताना विवाहाला उशीर  का होत आहे याचा  विचार होणे गरजेचे आहे . शनि  , मंगळ ,हर्शल नेपच्यून  प्लूटो चा संबंध आहे का ते पाहीले पाहिजे अन्यथा कालावधी चुकू शकतो .
  उदा १ )                        अहमदनगर हुन एका मुलीचा फोन ..मला  म्हणाली मला एक प्रश्न विचारायचा आहे . मी म्हटले काय विचारायचे आहे . ? माझ्या भावाचा विवाह केंव्हा होईल. ? मी म्हटले भावाचे बर्थ डिटेल्स द्या. २-३दिवसांनी फोन करा. त्यांनी दिलेले डिटेल्स मी लिहून घेतले. याठिकाणी मी बर्थ डिटेल्स दिलेले नाही . ज्याना पडताळणी करायची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा. सद्या वय वर्ष ३६ संपत आले आहे .

दि -------वेळ ------ स्थळ  अ १७,४३  रे ७३ ४८

मी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली. माझ्याकडे आलेली प्रत्येक कुंडली मी प्रथम तिची वेळ तपासून घेत असतो. आणि हे मी सब  चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे तपासात असतो. या थेअरी प्रमाणे दिलेली वेळ चुकीची होती म्हणून मी ती दुरुस्त करून घेतली .  . ती खालीलप्रमाणे ----
सद्य जातकाचे वय ३६ पूर्ण आहे
१) लग्नाचा सब शनी व चंद्र युतीत आहेत.
२) मोठी बहीण --लाभाचा सब शनी तुला ( शुक्र ) चित्रा (मंगल ) नक्षत्रात
सब चा नक्षत्रस्वामी मंगळ आहे जो मोठ्या बहिणीच्या पत्रिकेत चंद्राचा राशी स्वामी आहे .
३) लहान बहीण --- तृतीयेचा सब शनी तुला ( शुक्र ) चित्र ( मंगळ ) नक्षत्रात
 सब चा नक्षत्र स्वामी मंगल आहे जो लहान बहिणीच्या पत्रिकेत चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे .

आता सब चंद्र कनेक्शन थेअरीप्रमाणे वेळ निश्चित केली आहे .

आता विवाहाचा विचार करू.----

सप्तमाचा सब २,५,७,८,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत विवाह होतो .

हि पत्रिका तुला लग्नाचीआहे सप्तमाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 1   3 6     Mars-Drusht  7  2 7
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   (4) (5)  
It's Sub :------------ Rahu:- 8       Rashi-Swami Mercury 7   9 12
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   2 7     Sun-Yuti  (7)   (11)  Jupiter-Drusht  (1)   (3) (6)
Itself aspects :------ 8 6 10

गुरु ३,५,७,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे  गुरु अनुकूल भावाचा कार्येश असून सुद्धा विवाह झाला नाही.
गुरु हर्षल पूर्ण युतीत (०. ८ ), हर्षलमुळे ठरलेला विवाह मोडतो , गुरूचा नक्षत्रस्वामी शनी प्लूटोच्या  अंशात्मक युतीत  ( १. ६ ), गुरूचा सब राहू नेपच्यून प्रतियोग ( १७७. ७ ) नेपच्यून मुले फसवणूक होते . व मंगल हर्षल प्रतियोग  ( १७८. १ ). आहे . हर्षल  नेपच्यून प्लूटो यांच्या योगामुळे विवाह झाला नाही.
दशेचा विचार करायचे ठरविले तर मी पत्रिका पहिली त्यावेळी शनी मध्ये शुक्राची अंतर्दशा मार्च २०२० पर्यन्त होती.

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 12   4 5  
It's N.Swami :-------- Mars:- (7)   2 7     Sun-Yuti  (7)   (11)  Jupiter-Drusht  (1)   (3) (6)
It's Sub :------------ Sun:- (7)   (11)     Mars-Yuti  (7)   2 7
It's Sub's N.Swami :-- Sun:- (7)   (11)     Mars-Yuti  (7)   2 7
Itself aspects :------ 7 3 10

शनी ३,७,११ या अनुकूल भावांचा कार्येश

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 9   1 8  Cusp Yuti: (9)    
It's N.Swami :-------- Jupiter:- (1)   (3) (6)     Mars-Drusht  (7)   2 7
It's Sub :------------ Saturn:- 12   4 5  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   2 7     Sun-Yuti  (7)   (11)  Jupiter-Drusht  (1)   (3) (6)
Itself aspects :------ 3

 शुक्र ३,७,९,११ अनुकूल भावांचा कार्येश

शनी दशेमध्ये शनी प्लूटो युती. शनी मंगळाच्या नक्षत्रात मंगल हर्षल प्रतियोग आहे . शुक्राच्या अंतर्दशेमध्ये शुक्र गुरु च्या नक्षत्रात गुरु हर्षल युती. शनी सब मध्ये शनी प्लूटो युतीत ह्यामुळे अद्याप पर्यंत  विवाह झाला नाही. वय वर्षे ३७ पर्यंत

उदा. २)  हि एक वय वर्ष ३७ ची पत्रिका आहे अद्याप विवाह झाला नाही .

दि ------ वेळ ------- स्थळ --अ १९,५१  रे ७३,५९

वरील पत्रिकेनुसार ह्याही पत्रिकेची वेळ मी सब चंद्र कनेक्शन पद्धतीने निश्चित केली आहे . हि पत्रिका तुला लग्नाची आहे . ह्या पत्रिकेत सप्तमाचा सब बुध  आहे . खरे तर सप्तमाचा सब बुध असू नये कारण बुध द्वित्व दाखवितो . परंतु बुध जर २,७,११,५,८ चा कार्येश असेल तर वाईट घडणार नाही . ह्या पत्रिकेत सप्तमाचा सब बुध आहे . बुधचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ...

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 10   9 12  Cusp Yuti: (11)       Jupiter-Drusht  2  3 6
It's N.Swami :-------- Ketu:- (1)      Rashi-Swami Mars (2)   2 7
It's Sub :------------ Saturn:- 1   4 5     Moon-Drusht  7  10
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (7)      Rashi-Swami Venus (12)   1 (8)
Itself aspects :------ 5

बुध २,७,११,८ चा अनुकूल भावाचा कार्येश आहे . तरीसुद्धा अद्याप विवाह झाला नाही. सद्याच्या
काळात विवाहयोग्य वय किती असते ? साधारणपणे वय वर्ष २५ धरले तर वय वर्ष२५ च्या दरम्यान मंगळाची दशा चालू होती. जुलै २०१४ पर्यंत . मंगळाचे कार्येशत्व

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 2   2 7  
It's N.Swami :-------- Mercury:- (10)   (9) 12  Cusp Yuti: (11)       Jupiter-Drusht  (2)   (3) (6)
It's Sub :------------ Moon:- (7)   10     Saturn-Drusht  (1)   (4) (5)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (12)   1 (8)  
Itself aspects :------ 8 5 9

मंगळ २,३,५,,७,८,९,११ या अनुकूल भावाचा कार्येश असून सुद्धा विवाह झाला नाही. मंगल ग्रहाच्या ४ त्या पायरीवर शुक्र नेपच्यून यामध्ये ७१. चा अशुभ योग्य आहे . नेपच्यून मुले फसवणूक होऊ शकते  किंवा लांबणीवर पडते . तसेच तिसऱ्या पायरीवर चंद्र शनी दृष्ट आहे . ह्याला पुनरफू योग्य म्हणतात, ह्यामुळेही लग्नाला उशीर होऊ शकतो. विवाहामध्ये जर शनी ग्रहाचा संबंध येत असेल तर विवाह २९-३२ दरम्यान होतो असा माझा अनुभव आहे . पण वय वर्ष ३२ तर उलटून गेले . तरीसुद्धा विवाह झाला नाही . त्यापुढील दशा राहूची आहे राहूचे कार्येशत्व ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 7       Rashi-Swami Venus 12   1 8
It's N.Swami :-------- Sun:- (11)   11  
It's Sub :------------ Ketu:- 1       Rashi-Swami Mars 2   2 7
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (1)   (4) (5)     Moon-Drusht  (7)   10
Itself aspects :------ 2

राहू ५,७,११ चा कार्येश आहे राहू दशा विवाहाला अनुकूल आहे .
मी कुंडली पहिली तेंव्हा राहू मध्ये गुरुची अंतर्दशा संपत आली होती गुरु दशेत शेवटी शेवटी घटना घडत नाहीत. असा अनुभव आहे  म्हणून मी पुढील अंतर्दशा शनीची निवडली . राहू शनी दशा ४/७/२०२२ पर्यंत आहे .
शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 1   4 5     Moon-Drusht  7  10
It's N.Swami :-------- Rahu:- (7)      Rashi-Swami Venus (12)   1 (8)
It's Sub :------------ Mars:- 2   2 7  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (10)   (9) 12  Cusp Yuti: (11)       Jupiter-Drusht  (2)   (3) (6)
Itself aspects :------ 7 3 10

शनी २,३,७,९,११ भावाचा कार्येश आहे . त्यापुढील विदशा बुध  व केतूची आहे . बुध  व केतू २,७,११ भावाचे कार्येश आहेत.

राहू शनी बुध दशा ८ / २ / २० ते ४/७/२०  या कालावधीत होऊ शकतो.
राहू शनी केतू ४/७/२० ते ३/९/२० हि दशा अनुकूल आहे.
साधारणपणे १५ जुलै पर्यंत आपणाकडे विवाहाचे मुहूर्त असतात. . त्यानंतर नोव्हेंबर पासून सुरु होतात. म्हणून ह्या कालावधीत विवाह ठरू शकतो.सप्तमाचा सब बुध राहू केतू शी संबंधित आहे म्हणून विवाह हा विजोड असू शकेल . म्हणजे रंग रूप मध्ये contrast , किंवा वय जास्त असू शकते, किंवा घटस्फोटित स्त्री  , किंवा आंतरजातीय असू शकतो.

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment