कृष्णमूर्ति ज्योतिष

Friday 11 October 2019

                                                         Case Study--108

            स्वप्न --एम एस होण्याचे --३

                                         एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न हे संबंधित व्यक्ती च्या पत्रिकेवरून  तसेच कुटुंबातील इतरांच्या पत्रिकेवरून सोडविता यायला हवा . उदा. समजा  कुटुम्बात आई वडील मुलगा मुलगी असतील तर कोणा  एकाचा  प्रश्न सर्वांच्या पत्रिकेतून पाहता यायला हवा . सर्वच पत्रिकेत एक वाक्यता यायला हवी. ह्यावरून आपण ठामपणे भाकीत करू शकू . असे मला वाटते . यासाठी कुटुंबातील सर्वांच्या पत्रिकेची प्रथम लग्नशुद्धी करून घेतली पाहिजे . मी याठिकाणी अशाप्रकारे  प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे . महाजनांनी आपले अभिप्राय द्यावेत .
                                                 एका मुलाच्या आईने बेळगावहून फोन केला म्हणाली मी आपला फेसबूक वरील स्वप्न--- एम एस होण्याचे हा लेख वाचला आहे  माझ्या मुलाला एम एस करण्यासाठी परदेशी जाण्यची इछा  आहे . म्हणून मी  प्रश्न विचारत आहे माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल का ? त्याला स्कॉलरशिप मिळेल का ? आता तो सद्या इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे .त्याने GRE  आणि TOFFEL च्या परीक्षा दिल्या आहेत .त्याचा स्कोअर उत्तम आहे . त्याला  खात्री आहे . फक्त त्याला वाटते चांगली युनिव्हर्सिटी मिळावी . मी त्यांचे स्वतः चे , मुलाचे  ,वडिलांचे व मोठ्या मुलीचे जन्म टिपण मागवून घेतले . गोपनीयतेच्या कारणास्तव मी येथे बर्थ डिटेल्स दिलेले नाहीत . ज्यांना पडताळणी करायची असेल  त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा
सर्व प्रथम मी सर्व पत्रिकांची लग्न शुद्धी  सब चंद्र कनेक्शन पद्धतीने करून घेतली .


१)  मुलाची कुंडली
                    दि ---------वेळ -------स्थळ--- रे ७२,५४ अ  १९,०३
             हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे .

            परदेशात उच्च शिक्षण --नियम--- व्ययाचा सब ३,९,१२ बेरोबर  ४,९,११ पैकी चा कार्येश असेल तर परदेशात उच्च शिक्षण होईल.
 
व्ययाचा सब बुध  आहे . बुधाचे कार्येशत्व ----


PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 12   8 11  
It's N.Swami :-------- Saturn:- (5)   3 (4)  
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Sun (12)   10
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
Itself aspects :------ 7

बुध ३,९,१२ बरोबर ४,९ चा कार्येश आहे . परदेशात उच्च शिक्षण होणार असे सांगता येईल

नवमचासब रवि  आहे  रविचे   कर्येश्त्व----

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 12   10  Cusp Yuti: (1)    
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   (8) (11)  
It's Sub :------------ Mercury:- 12   8 11  
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (5)   3 (4)  
Itself aspects :------ 7

रवि  5 11चा कार्येश आहे परदेशात उच्च शिक्षण होणार ( श्री गोंधळेकर सर )

२) आता आईची पत्रिका पाहू  आईची पत्रिका कन्या लग्नाची आहे

दि ------ वेळ ------ स्थळ  रे ७५,३४  अ  २१,०१

आईच्या पत्रिकेत  पंचम स्थान प्रथम अपत्य व सप्तम स्थान हे दुसरे अपत्य होईल . प्रथम कन्या आहे व द्वितीय मुलगा आहे . म्हणून सप्तम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेऊ . फिरवून घेतलेल्या कुंडलीत व्यय भावाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व ----

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 8     Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Mercury 7   5 8
It's N.Swami :-------- Moon:- (7)   6  
It's Sub :------------ Mercury:- 7   5 8     Venus-Yuti  7  4 9
It's Sub's N.Swami :-- Venus:- (7)   (4) (9)     Mercury-Yuti  (7)   5 8
Itself aspects :------ 2


आईच्या पत्रिकेत सुद्धा व्ययभावाचा सब केतू ४,९ चा कार्येश आहे म्हणजे आईच्या पत्रिकेतून मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार असे म्हणता येईल

३)आता वडिलांची पत्रिका पाहू

दि ----- वेळ ----- स्थळ -- रे ७३,५२  अ  १८,३२

 वडिलांची पत्रिका वृश्चिक लग्नाची आहे .
वडिलांच्या पत्रिकेत दुसरे अपत्य प्रथम स्थानावरून पाहावे लागेल कारण लाभ स्थानावरून प्रथम संतती पहिली जाते व लग्न स्थानावरून द्वितीय संतती पहिली जाते . या ठिकणी कुंडली फिरविण्याची आवश्यकता नाही

व्यय भावाचा सब बुध आहे बुधाचे कार्येशत्व ----


PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 7   8 11     Venus-Yuti  7  7 12
It's N.Swami :-------- Moon:- (8)   (9)  
It's Sub :------------ Saturn:- (3)   3 (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (10)   (1) (6)  
Itself aspects :------ 1

 
बुध ४,६,९ भावाचा कार्येश आहे . वडिलांच्या पत्रिकेत सुद्धा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार हे सांगता येईल.

४) आता मोठ्या बहिणीची पत्रिका पाहू

दि -------- वेळ -------- स्थळ -----रे ७३,४७ अ १९,५९

हि धनु लग्नाची पत्रिका आहे 

धाकटा भाऊ म्हणजे तृतीय स्थान येईल . तृतीय स्थान हे लग्न धरून कुंडली फिरवून घेतली .
या पत्रिकेत व्यय भावाचा सब ४,९,११ पैकीचा कार्येश आहे का ते पाहू . फिरवून घेतलेल्या कुंडली मध्ये व्यय भावाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व ----

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 4   4 9     Mars-Yuti  4  3 10
It's N.Swami :-------- Moon:- (9)   (6)  
It's Sub :------------ Mercury:- 4   5 8  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (4)   (3) (10)     Venus-Yuti  (4)   4 9
Itself aspects :------ 10



या ठिकाणी व्यय भावाचा सब शुक्र ४,६,९ भावाचा कार्येश आहे . म्हणजे याही बहिणीच्या पत्रिकेतून धाकटा भाऊ उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार हे नक्की सांगता येईल.

५)                             अजून एक  प्रयत्न करायचे ठरविले . आईना  सांगितले , मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी केम्व्हा जाईल असा विचार मनात करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा. त्यांनी १७३ हि संख्या सांगितली . या संख्येवरून मी कुंडली तयार  केली. हि कुंडली  धनु  लग्नाची आहे .

दि --७/१० / २०१९  वेळ १४-१०-५३  स्थळ  रे ७४,२६ अ १७,५९

पंचम स्थान मुलाचे लग्न स्थान होईल पंचम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली

व्ययाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व ----

 PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (8)   9 (12) 
It's N.Swami :-------- Mercury:- (6)   3 6 
It's Sub :------------ Rahu:- (3)      Rashi-Swami Mercury (6)   3 6  Saturn-Drusht  (9)   (10) (11)
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (3)      Rashi-Swami Mercury (6)   3 6  Saturn-Drusht  (9)   (10) (11)
Itself aspects :------ 2 12 4


गुरु ३,९,१२ बरोबरच ९,११ चा कार्येश आहे . मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार

 अशा प्रकार कुटुंबातील सर्वांच्या पत्रिकेतून मुलगा उच्च शिक्षणासाठी  परदेशी जाणार हे ठामपणे सांगता येईल .

आईने आणखी एक प्रश्न विचारला आहे . त्याला स्कॉलरशिप मिळेल का ? ते पाहू ----

मुलाची कुंडली --
  दि ---------वेळ -------स्थळ--- रे ७२,५४ अ  १९,०३

  हि कुंडली वृश्चिक लग्नाची आहे .

स्कॉलरशिपसाठी  नियम---अष्टमाचा सब २,६,११ पैकी चा कार्येश असेल तर २,६,११ च्या सयुंक्त दशेत स्कॉलरशिप मिळेल.
या पत्रिकेत अष्टमाचा सब मंगल आहे मंगळाचे कार्येशत्व ----

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 10   1 6  
It's N.Swami :-------- Sun:- (12)   10  Cusp Yuti: (1)    
It's Sub :------------ Venus:- (1)   (7) 12  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   (8) (11)  
Itself aspects :------ 5 2 6


४ थ्या पायरीवर बुध  आहे . या बुधावर चंद्राची दृष्टी आहे ( ४  अंश ३८ कला ) त्यामुळे ६ भावाचे कार्येशत्व मंगळाला मिळेल. . मंगल ६,८,११ भावाचा कार्येश आहे . म्हणजे स्कॉलरशिप मिळणार हे नक्की झाले .

आता परदेशी केंव्हा जाणार ? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे . जातकाला घटना कोणत्या काळात घडेल याची उत्सुकता जास्त असते . नुसतेच घडेल , होईल असे सांगून चालत नाही.. त्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील . आता जातक इंजिनिअरिंग च्या  ४ थ्या वर्षात आहे . म्हणजे जुलै ऑगस्ट २०२० मध्ये त्याचे इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण होईल . त्यानंतरच्या  दशा पाहाव्या लागतील

मी जेंव्हा कुंडली पहिली तेंव्हा राहू मध्ये गुरुची अंतर्दशा चालू  होती . गुरुची अंतर्दशा ६ जुलै २०२१ पर्यंत आहे

राहूचे कार्येशत्व
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (9)      Rashi-Swami Sun (12)   10
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
It's Sub :------------ Venus:- (1)   (7) 12  
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   (8) (11)  
Itself aspects :------ 4

राहू ३,९,१२ /  ४,९,११ चा कार्येश आहे राहू अनुकूल आहे . कुंडलीचे लग्न वृश्चिक आहे म्हणजे स्थिर तत्व आहे म्हणून गुरु अंतर दशेत घटना घडणार नाही त्यापुढील अंतर्दशा शनीची आहे . शनीचे कार्येशत्व ---


PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 5   3 4  
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
It's Sub :------------ Sun:- 12   10  Cusp Yuti: (1)    
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   (8) (11)  
Itself aspects :------ 12 8 3


शनी १,३,४,५,८,११,१२ चा कार्येश आहे त्यातील ३, १२ / ४,११ अनुकूल आहेत शनीची अंतर्दशा ६ जुलै २०२१ ते
१२ मे  २०२४ पर्यंत आहे , या मधील  कोणत्या वर्षात  जाणार त्यासाठी विदशा पाहावी लागेल.  त्यापुढील विदशा बुधा ची आहे बुधाची विदशा १८ डिसेंबर २०२१ ते १४ मे २०२२ पर्यंत आहे . बुधा  चे कार्येशत्व ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 12   8 11  
It's N.Swami :-------- Saturn:- (5)   3 (4)  
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Sun (12)   10
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3)      Rashi-Swami Saturn (5)   3 (4)
Itself aspects :------ 7


बुध  ३,९,१२ / ४,९ चा कार्येश आहे .

सादर जातक उच्च शिक्षणासाठी राहू शनी बुध  दशे मध्ये डिसेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत परदेशी जाईल .

                                          ह्या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी वाटते वरील सर्वांच्या पात्रिकेतून उच्च शिक्षण होणार असे दिसत असले तरी मुलाच्या पत्रिकेत व्यया चां सब बुध प्लुटो च्य युतीत आहे. प्लुटो ने आतापर्यंत अनुकूलता दाखविलेली नाही. पण मला असे वाटते पहिल्या २ पायरीला प्लुटो संबंध येत असेल तर त्याचा अशुभ परिणाम होणार नाही.३-४ पायरीला आला असता तर कदाचित संबंधित घटना घडणार नाही. याठिकाणी प्लुटो चा संबंध पहिल्या पायरीला येतोय.नंतर नाही म्हणून मला असे वाटते मुलगा उच्च शिक्षण घेणार


महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा

शुभंम भवतु !!!




No comments:

Post a Comment