कृष्णमूर्ति ज्योतिष

Friday 27 March 2020

Case  study --153   नोकरी---२


                   सद्या नोकरीविषयक प्रश्न जास्त विचारले जातात . त्यात कोरोना चे  आगमन झाले आहे . भारतातील सर्वच राज्यात  कोरोना हळू हळू आपले पाय पसरवत आहे . लोकांना भविष्य काळाचे गांभीर्य वाटत नाही.औधोगिक जगतात याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. आताच  संपूर्ण औधोगिक यंत्रणा ठप्प झाली आहे . येणाऱ्या काळात  कामगार कपात हि होऊ शकते .
                 नागपूर हुन एका जातकाचा फोन -----सद्य ज्या कंपनीत काम करत आहे  तिथे खूप कामाचा टेन्शन आहे ताणतणाव खूप वाढला आहे म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिला आहे . तीन महिन्याचा नोटीस कालावधी चालू आहे त्यातील एक महिना संपलेला आहे . मी खूप ठिकाणी अर्ज केला पण कोठूनही प्रतिसाद येत नाही . येणाऱ्या काळात मला दुसरी नोकरी मिळेल का ? असा प्रश्न  तिने विचारला. तिचे जन्मटिपण खालीलप्रमाणे ----

दि ---२० / -- /१९९२  वेळ ---- स्थळ अ १९,२४ रे ७२, ४६

याप्रमाणे मी कुंडली तयार केली कुंडली सिंह लग्नाची आहे
लग्नाचा सब राहू आहे चंद्र राहू युतीत आहेत म्हणजे पत्रिका बरोबर आहे .
 मी कुंडली पहिली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे ----
दि १५/३/२०२०  वेळ ११-३०-२५  फलटण

शनी * मंगल, बुध    मंगल , रवी
सादर जातकाने नोकरीचा राजीनामा दिला आहे सद्य नोटीस पिरिअड चालू आहे .
प्रश्न विचारला आहे मला नोकरी केंव्हा लागेल ?

दशमाचा सब  २,६,१० भावा चा कार्येश असेलतर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये नोकरी लागेल.

या पत्रिकेत दशमाचा सब शनी आहे शनी रुलिंगमध्ये आहे

शनीचे कार्येशत्व----
शनी ---५,६
मंगल--७
राहू--
केतू-- १०, बु ८,२,११ न रा ४,१२

शनी २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे . दुसरी नोकरी मिळणार हे निश्चित सांगता येईल.
तत्पूर्वी आताची नोकरी केंव्हा लागली ते तपासून पाहू आताची नोकरी  १ऑगस्ट २०१३ मध्ये लागली होती त्यावेळी चंद्र गुरु बुध  दशा होती.

चंद्र -----२,३,४,८,९,१०,११
गुरु ---२,३,८,९,१०,११,१२
बुद्ध --३,५,६,७,९,

चंद्र २,१०,११ गुरु २,१०,११ व बुध ६ भावाचं कार्येश आहे  येथे २,६,१०,११ ची साखळी पूर्ण झाली होती .

पुढील नोकरी केंव्हा लागेल यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील.

कुंडली पाहतेवेळी मंगल मध्ये मंगल अंतर्दशा चालू होती. ती ३/ ७ / २०२० पर्यंत आहे .
मंगळाचे कार्येशत्व ----
मंगळ --
बुध ---८,२,११
बुध ---
शुक्र-- ९,३

सादर जातकाने राजीनामा दिला आहे  (३,९ ) २,११ भाव नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहेत

मूळ कुंडलीचे लग्न सिंह आहे म्हणजे स्थिर तत्वाचे आहे . मंगल अंतर्दशे मध्ये घटना घडणार नाही म्हणून मी पुढील राहूची अंतर्दशा घेतली . राहूचे कार्येशत्व----
राहू ---
केतू--- १०,८,२,११
गुरु ---१२
केतू-- १०,बु ८,२,११ न रा ४,१२

राहू २,१०,११ भावाचा कार्येश आहे .

आता विदशा अशी शोधावी लागेल ती ६ भावाची कार्येश असली पाहिजे . यपत्रिकेत शनी व बुध दोनच ग्रह ६ भावाचे कार्येशत्व दाखवितात.
शनी व बुध चे कार्येशत्व---

शनी ---५,६
मंगल--७
राहू--
केतू-- १०, बु ८,२,११ न रा ४,१२

बुधाचे  कार्येशत्व---
बुध ---
शुक्र --९,३,९ क. यु.
शनी---५,६
मंगल---७

मंगल महादशा राहू अंतर दशा व शनी  विदशा मध्ये नोकरी लागेल. हा कालावधी येतोय
२० ओक्टोमाबर २०२० ते २० डिसेंबर २०२० तसेच बुध  सुद्धा अनुकूल आहे बुध  विदशा १२/२/२०२१ पर्यंत आहे

हाच प्रश्न मी नंबर कुंडलीने सुद्धा सोडविला . त्या जातकाने १०९ नंबर दिला होता. हा प्रश्न मी १६ मार्च ला सोडविला  आहे

दि-१६/३/२०२० वेळ--१०-५४-४१ फलटण के.पी. नं १०९

चंद्र मनाचा कारक चंद्रतृतियांत  लाभेश आहे . चंद्र बुद्ध नक्षत्रात आहे बुश लग्नेश व दशमेश आहे व सब शनी पंचमेश व षष्टेश आहे. प्रश्नाचा रोख बरोबर आहे .

दशमाचा सब रवी आहे रवीचे कार्येशत्व ---
रवी --७.क.यु
गुरु--४,७,मं यु ४
राहू-- १०,बु ६,१
राहू ---१०, बुध  ६,१

रवी ६,१० भावाचा कार्येश आहे . नोकरी मिळणार हे नक्की झाले .  केंव्हा मिळणार ह्यासाठी दशा पाहू.
कुंडली तपासतेवेळी बुधमध्ये शनी अंतर्दशा चालू होती हि दशा १४/४/२०२० पर्यंत आहे. कुंडलीचे

लग्न  कन्या आहे कन्या द्विस्वभाव राशीचे आहे म्हणून शनी अंतर्दशेमध्ये घटना घडणार नाही म्हणून बुध  महादशा सोडून दिली . त्यापुढील केतू महादशा घेतली केतू महादशा १५/४/२०२७ पर्यंत आहे . केतुचे कार्येशत्व---
केतू --४ गु ४,७
केतू--४ गु ४,७,
शनी-- ५ क.यु
रवी---६,१२,७

/केतू  ६ भावाचा कार्येश आहे
केतू मध्ये शुक्र अंतर्दशा १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे . शुक्राचे कार्येशत्व ---
शुक्र----८,२,९
 शुक्र----८,२,९
मंगळ
 शुक्र----८,२,९

शुक्र २ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . २,६,१० ची साखळी जुळविण्यासाठी फक्त १० भावाची आवश्यकता आहे . १० भाव फक्त रवी व राहू दाखवितात.  म्हणून  केतू शुक्र रवी किंवा केतू शुक्र राहू या दशेत नोकरी लागेल. केतू शुक्र रवी  च कालावधी येतो २० / ११ / २०२० ते १२ / १२ /२०२० . या कालावधीत नोकरी लागेल. परंतु या कालावधीत गोचर अनुकूल असेल तरच नोकरी लागेल .

गोचर भ्रमण
खालील प्रमाणे गोचर अनुकूल आहे .

१) मूळ कुंडली --४ / ११ / २०२० ते  २० / १२ /२०२०  अनुकूल आहे.


२) प्रश्न कुंडली ---२० /११ /२०२० ते  १२ / १२ /२०२० अनुकूल आहे

दोन्ही कुंडलीमधील  कालावधीचा विचार केला तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नोकरी लागणार हे निश्चित सांगता येईल.  हे तिला सांगितल्यानंतर ती म्हणाली मग मी आता राजीनामा मागे घेऊ का ? मी म्हटले तसे शक्य असेल तर जरूर घयावा  वरील कालावधीत प्रयत्न करावेत. नाहीतरी घरी बसून काय करणार ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

शुभम भवतु   !!!











No comments:

Post a Comment