Tuesday, 12 November 2013

Case Study--6

+ जिवेत शरद : शतम 

                                  मृत्यू एक त्रिकालाबाधित सत्य . प्रत्येकाच्या वाट्याला येणारे कटू सत्य.  एका चैतन्याचा अंत ,जीवात्म्याचा परमात्म्यात विलीन होण्याचा क्षण ,  पंचमहाभूतात विलीन होण्याचा क्षण , एका जीवात्म्याचा आणि देहाचा विरहाचा क्षण . 
                                 पण प्रकार वेगवेगळे , अपघातात येणारा मृत्यू ,शांतपणे येणारा मृत्यू ,झोपेत येणारा मृत्यू, असह्य वेदना सहन करीत येणारा मृत्यू , पाण्यात येणारा मृत्यू ,आगीत  भाजून येणारा मृत्यू . 
         मृत्यूला सामोरे जाण्याचा क्षण ……। हे फक्त साधू संताच्या बाबतीत  घडू शकते   मानवाच्या बाबतीत अंशत:  ------

                              माझे वडील वारकरी संप्रदायातले होते . सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आई -वडील    दोघेही चारी धाम करून आले होते . आई -वडील दोघेही आळंदी ते पंढरपूर वारी  पायी करत होते . आजही आई पंढरपूरची वारी पायी करत आहे . 
                             वडिलांनी मधुमेह बरोबर केलेली मैत्री ,ती झाल्यापासून जवळजवळ २०-२५ वर्षे अबाधित ठेवली . पण शेवटी शेवटी  मैत्रीत अंतर पडत गेले  आणि मधुमेहाने वडिलांना पंचमहाभूतात विलीन होण्यासठी मुक्त केले .                 
                    शेवटचे ५-६ महिने वडील जास्त आजारी होते मधुमेहामुळे रक्तातील  साखरेचे प्रमाण कमी जास्त होत होते  रक्तातील Creatinin हा घटक वाढलेला होता त्यामुळे उत्सर्जनचे प्रमाण कमी झाले होते. आणि त्यातच अर्धांगवायू झटका ( फक्त चेहर्यापुरता ) Creatinin चे प्रमाण कमी होत नव्हते  शरीर औषधाला प्रतिसाद  नव्हते . जाण्यापूर्वी  दोन दिवस अगोदर पुन्हा एकदा अर्धांगवायू चा जबरदस्त झटाका आला .  . त्यावेळी मेंदूचे स्कॅन केले . त्यांची सर्व गात्रे शिथिल झाली होती श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता म्हणून  त्यांना व्हेण्टिल्लेटर्वर ठेवले होते .  माझी भाची डॉक्टर आहे . तिने सांगितले ,मामा  infection झाले आहे .वेळ आली आहे ,वाट पाहणे आपल्या हाती आहे . रविवारी पहाटे ३-३.३० वाजता ब्राम्हमुहुर्तावर पंचमहाभूतात  विलीन झाले
एक वारकरी विठ्ठलाला भेटावयास वैकुंठाला  गेला .
                               खरे तर असा प्रश्न कोणी विचारत नाही . मी आजारी केंव्हा पडणार आहे ? मला अपघात केंव्हा होणार आहे ? मला मृत्यू केंव्हा येणार आहे ? फार फार तर  माणूस आजारी असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले  जातात .
                              मीच यासंबंधी  तीन आठवडे अगोदर प्रश्न कुंडली मांडून वडिलांचा आजार केंव्हा  बरा  होईल ते पहिले होते . त्यावेळी माझ्या लक्षात आले फार काळ नाही . नियतीचा पावलांचा सुगावा लागला होता . हे , मी फक्त माझे वकील बंधू यांचेजवळ बोललो होतो .
                       कृष्णमुर्ती पद्धतीने माझ्या पत्रिकेवरून वडिलांच्या मृत्यू बद्धल 
                                 ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोनातून  केलेली चिकित्सा 
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये वडिलांचा विचार  नवम स्थानातून करतात . नवम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून  घेतली आहे . 
                   आजाराचा प्रश्न हा प्रश्न कुंडली वरून सोडवावा असा संकेत आहे कारण  मुळ कुंडली  आयुष्यात जे जे आजार होणार त्याचे निर्देशन करीत असते . प्रश्न कुंडली --त्यावेळी नेमका  कोणता आजार झाला आहे त्याचे निर्देशन करीत असते .    आजारासंबंधी खालील गोष्टी पहाव्यात . -----
                 १) लग्नाच्या सब वरून अल्पायु ,मध्यायू  व दीर्घायू पाहावा 
                 २) शष्ट भाव आजार,रोग दाखवितो 
                ३) व्यय भाव हौस्पिटल दाखवितो 
                ४) अष्टम भाव दोष ,धोका दाखवितो (शस्त्रक्रिया )
                ५) षष्ठ  भावाचा उपनक्षत्र स्वामी हाच आजारपणाचा एकमेव निर्णायक घटक असतो
        जे ग्रह षष्ठ भाव ,लग्न भाव यांच्याशी संबंधित असतात त्यांच्या सामायिक दशेत आजार उद्भवतो .   षष्ठ भावाचा सब द्वादश भावात असून षष्ठ भाव व लग्नाचा बलवान कार्येश असेल तर व्यक्ती असाध्य आजाराने त्रस्त असते .  षष्ठ भावाचा सब द्वादश भावाचा कार्येश असून पंचम व एकादश भावाचा कार्येश असेल तर व्यक्ती औषधोपचाराने बरी होते . षष्ठ भावाबरोबर मारक (२,७) बाधक व अष्टम स्थानाचा विचार करावा लागतो . बाधक स्थानाचा संबंध येत असेल तर व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते अष्टम भावाचा सब आयुष्याच्या शेवटी स्थिती कशी असते हे दर्शवितो . 
     माझी पत्रिकेची लग्नशुद्धि  मा . श्री हिरेमठ यांनी केली आहे .    माझ्या पत्रिकेवरून वडिलाच्या आजारपणात शनि महादश -शनि अंतर्दशा -- राहू विदशा चालू  होती शष्ट भावाचा सब गुरु आहे.  गुरु लग्नाचा, चतुर्थ भावाचा, षष्ठ भावाचा ,नवम भावाचा, दशम भावाचा व व्यय भावाचा सब आहे . गुरुचे कार्येशत्व -----
                            गुरु ----१० कयू 
      न . स्वामी     मंगळ ----२,३,८ श यु २,६
            सब         गुरु  ----- १० कयू     
    स . न .स्वामी मंगळ ----२,३,८ श यु २,६
      गुरु २ ( मारक ) ८ (मृत्यू ,शस्त्रक्रिया ) ६ (रोग, आजार ) व १० ( लाभाचे व्यय ) यांचा बलवान कार्येश आहे . 

                 गुरूमुळे मधुमेह झाला गुरु नवम स्थानात त्यामुळे २०-२५ वर्षे नियंत्रणात होता . गुरु मंगळाच्या नक्षत्रात . मंगल तुळेत व्दितीयात (मारक) आहे. मंगळ शुक्राच्या राशीत आहे . मंगल शस्त्रक्रिया करवितो त्यामुळे प्रोस्ट्रेट ग्लंड ची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच मुळ्व्याधची  शास्त्राक्रीया झाली आहे . (शुक्र-मुळव्याध)  मंगळ शनीच्या युतीत तुल राशीत आहे . मंगळ  (२,३,६,७,८,४) स्नायूचे व मेंदूचे आजार देतो . शनि आकुंचन करणारा आहे . शनीमुळे (२,३,६,७,८,४ ) पक्षाघात (अर्धांगवायू )झाला .सुरुवतीला तो  फक्त चेहर्यापुरता होता कारण शष्ट भावाचा सब गुरु वृषभ राशीत आहे . वृषभ राशीचा अमंल गळा ,घसा ,श्वासनलिका ,अन्ननलिका ,मान यावर आहे . मृत्युपूर्वी वडिलांना घास गिळताना त्रास होत होता . पक्षाघात मेंदूला  रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे झाला   शनि तूळ राशीत असल्यामुळे, तुळ राशीचा संबंध मूत्राशय,मूत्रपिंड यावर आहे .  शनि आकुंचन ,गोठविणारा असल्यामुळे उत्सर्जन कमी होत होते त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळितपणे होत नव्हते . त्याच्यावर ताण पडत होता . रक्तातील क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत होते . डॉक्टर  म्हणाले क्रियेटिनिन हे त्वचेच्या खालच्या  थराला चिकटून राहते . त्यामुळे घाम  येत नाही . व अंगाला खाज सुटते अक्षरश: वडील खाज सुटत असल्यामुळे अंग , पाठ भिंतीला  घासत असत इतकी भयंकर खाज येत होती .
                    वडील आजारी होते त्यावेळी शनि महादाशेमध्ये शनि अंतर्दशा राहू विदशा चालू होती ४/११/२०११ ते २१/४/२०१२ सूक्ष्मदशा गुरूची होती ३/१२/२०११ ते २५/१२/२०११
                     शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
                                  शनि ---२,६,मं यु २,३,८
         न . स्वामी          राहू ---५ श २,६,न . रवि २,४
               सब              बुध ---४,शु यु ४,१०
      स . न . स्वामी      केतू ---११,चं १२ न . गु ९,७,१०
                       शनि २ (मारक) ,३ (अष्टमाचे अष्टम ) ६ (रोग ,आजार )४ (चिरशांती ),७ (बाधक )
१० (लाभाचे व्यय)१२( हौस्पिटल )  सर्वांचा बलवान कार्येश होता . शनि तूळेत मंगळाच्या युतीत होता
                                 राहू ---
             न . स्वामी   रवि ---४ श दृ २,६
                   सब      गुरु ---१० कयू
    स  न . स्वामी मंगळ  ---२,३,८ श यु २,६
राहू २ (मारक) ३ (अष्ट माचे अष्टम )४ (चिरशांती) ६ (रोग,आजार) ८ (मृत्यू )या सर्व भावांचा बलवान कार्येश होता .
                       शनि महादश--- २,३,४,५,६,७,८,९,१०,१२
                      शनि अंतर्दशा
                      राहू विदशा ---   २,३,४,६,८
                गुरु सूक्ष्म दशा ----२,३,६,८,१०
                 शुक्र प्रांणदशा ---१,२,४,६,११,१२
 शुक्र प्राणदशा १४/१२/२०११ ते १८/१२/२०११ पर्यंत होती 
   १८/१२/२०११   पहाटे ३. ३० वाजता निधन झाले .
       
                                  

No comments:

Post a Comment