Sunday, 3 November 2013

Case Study-1

+ विवाह ----  पत्रिकामेलन 

             शेकडा ९९ % लोकांचे विवाह होतात . विवाह केंव्हा होईल ? या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न अभिप्रेत 

आहे  तो म्हणजे त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल ? विवाह करणे एवढेच उधिष्ट नसते तर त्यापुढील 

कमीतकमी    २५-३० वर्षे वैवाहिक जीवन चांगले असले पाहिजे . हे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा 

विवाहासाठी पत्रिका जुळवताना फक्त गुणमेलन पहिले जाते १८ पेक्षा जास्त  गुण असतील तर विवाह  

जुळविला जातो . अन्यथा नाही . 
                 
                       गुणमेलन पाहताना फक्त चंद्राचा व त्याच्या नक्षत्राचा विचार केला जातो . गुण 

पाहण्याचे एक साधे कोष्टक असते . दोघांची रास व जन्मनक्षत्र माहित असेल कि झाले . पंचागातील 

कोष्टकावरून कोणालाही किती गुण पडतात हे सांगता येईल .

संपूर्ण आयुष्याचे गणित या कोष्टकावरून ठरवायचे का ? 

हे तुम्हाला पटतंय का? ---------नाही ना .

 पत्रिका जुळविताना खालील गोष्टी पहाव्यात . 

१) वर-वधूचे आयुष्यमान   

२) शरीरप्रकृती  

३) जननक्षमता 

४) आर्थिक बाब 

५)नजीकच्या काळात येणारे  आजार 

६) दोघांचे पत्रीकेमधील रवि ग्रहामधील योग  

७)चंद्र हा मनाचा कारक म्हणून  चंद्रा मधील योग

८) एकमेकावरील प्रेम पाहण्यासाठी मुलीचा मंगल व मुलाचा शुक्र यामधील योग

९) एकमेकांना समजून घेणारे  म्हणजे रवि व गुरु यांचेमधील योग 

१०)वादविवाद संघर्ष यासाठी रवि व हर्शल यामधील योग

११) दोघांमधील संवाद ,विचार यासाठी चंद्र व बुध यामधील योग 

१२) विवाहानंतर येणाऱ्या दशा - अंतर्दशा वैवाहिक जीवनाला पोषक आहेत कि  नाही . वरील सर्व 

गोष्टी विवाह जुळवताना पहिल्या पाहिजेत . 
                   
                           विवाह  हि एक तडजोड आहे . सर्व गुणसम्पन कोण आहे? सुखी माणसाचा सदरा कोणाला

सापडला आहे? वाद - विवाद कोठे होत नाहीत ? भांडण कोठे होत नाही? त्यावेळी एकमेकांना समजून घेणारे

योग आहेत   का?  हे नको का पाहायला ?----------  आता मला सांगा केवळ गुण पाहून विवाह करणे हे

कितपत योग्य आहे?     असे म्हणतात विवाह स्वर्गात ठरविले जातात ,आपण फक्त ते पृथ्वीवर साजरे करत

असतो.  
        
  या व्यतिरिक्त कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे जन्मवेळेचे रुलिंग   प्लनेट जुळले पाहिजे . व वराचा सप्तमाचा सब

वधूच्या २,७,११ या भावांचा कार्येश आणि वधूचा सप्तमाचा सब वराच्या  २,७,११ या भावांचा कार्येश असला

पाहिजे . 

वराचे जन्मवेलेचे ग्रह वधूचे पत्रिकेत वैवाहिक सौख्य दाखवतात का ते पाहिले पाहिजे  तसेच वधूचे जन्मवेलेचे

ग्रह वराचे पत्रिकेत वैवाहिक सौख्य दाखवतात का हे पहिलेच पाहिजे . 

                                    गेल्या आठवड्यात एक  पती- पत्नी माझ्याकडे आले होते . त्यांच्या मुलीचे

विवाहासंदर्भात पत्रिका जुळविण्यासाठी आले होते . आमच्या मुलीसाठी हे एक स्थळ आले आहे. मुलगा

इंजिनियर आहे . एका मल्टी   नेशनल कंपनीत नोकरीला आहे. पगार चांगला आहे . स्वत :चा flat आहे . घरी

गाडी आहे . त्यांनी मुलीला पाहिलेले आहे . ते आमच्या मुलीसाठी फार आग्रह करीत आहेत . आम्ही एके

ठिकाणी पत्रिका दाखविली आहे , त्यांनी २५ गुण जुळतात . लग्न करावयास हरकत नाही .असे सांगितले आहे
.                                 
मग माझ्याकडे का आलात ? मी विचारले . आमचे शेजारचे म्हणाले तुमच्याकडे

पत्रिका दाखवून मगच निर्णय घ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे  आलो आहोत . ठीक आहे . मी मुला-मुलीची

पत्रिका पहिली व त्यांना सांगितले पत्रिका जुळत नाही . ते म्हणाले का ? अहो मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक

सौख्य नाहीच . जो मुलगा संतती देऊच शकणार नाही त्याच्याशी  लग्न  का लावायचे ?

      १) सप्तमभावाचा सब  शनि आहे. शनि तुळेत राहूच्या नक्षत्रात पंचमात आहे पंचमात शनि मंगळ युती आहे
.      
ज्यावेळी सप्तमभावाचा उप नक्षत्र स्वामी व त्याचा नक्षत्र स्वामी शनि , राहू , केतू असेल म्हणजे शनि -

राहू ,शनि - केतू , राहू - केतू असेल तर वैवाहिक सौख्य असमाधानकारक  असते . 

                      कोणताही एक ग्रह घटना घडवत नाही . ग्रहांचा समूह परिणाम घडवीत असतो . 

      २) वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र व्ययात राहूच्या युतीत . राहू ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या

ग्रहापासून मिळणाऱ्या सौख्याची हानी करतो . 

      ३) शुक्र रवीच्या युतीत व्ययात आहे . शुक्र अस्तंगत आहे . शुक्राणू संख्या गर्भधारणेसाठी पुरेसा नाही . 

      ४) व्ययात रवि , बुध , शुक्र , राहू युतीत आहेत . 

      ५) पंचम स्थानात दोन पापग्रह शनि , मंगळ यांची उपस्थिती 

      ६) सर्वात महत्वाचे म्हणजे  प्लुटो     हा पापग्रह स्फोटक , विध्वंस करणारा पंचम भावारंभी आहे . तो

            संतती स्थानाची हानी करतो .  

      ७) शुक्र नेपच्यून प्रतियोगआहे . नेपच्यून फसवणूक करणारा ग्रह आहे . 

      ८) पंचम भावाचा सब रवि व्ययात , व्ययाचा  बलवान कार्येश  रवि मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ अष्टमेश

शनीच्या युतीत पंचमात  संतती सौख्य नाही . 

      ९) विवाहाचा कारक गुरु व संतती चा कारक गुरु हा नवमांश कुंडलीत सिंह  वंध्या राशीत आहे . 

                     आता मला सांगा अशा    मुलाबरोबर विवाह केला तर ह्या गोष्टी केंव्हा लक्षात येणार ?,

लग्नानंतर २-३  वर्षांनी . म्हणजे मुलीच्या वैवाहिक सौख्याचे बारा वाजणार . तेथून पुढे घटोस्फोट कडे

वाटचाल सुरु होणार ----

प्रा . कोरडे पी आर . 
१४२, पद्मावातीनगर फलटण 
९६२३४७४६२७ / ९४०३८१२६२८

No comments:

Post a Comment