कृष्णमूर्ति ज्योतिष

Tuesday 5 November 2013

फायलीन वादळ 

                    आंध्रच्या किनार पट्टीवर फायलीन वादळ झाले त्यावेळी मनात उठलेले विचारांचे वादळ शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे . सकाळ वर्तमान पत्रात एक फोटो आला होता त्यामध्ये एक माणूस त्याचे वादळात पडलेले घर पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करीत होता .
                                           चहुबाजूनी आभाळ दाटून आले  होते . वार्याचा वेग वाढला होता . आज पावसाच्या धारा पृथ्वीवर कोसळण्याची चिन्हे दिसायला लागली होती . बहुतेक आज पावसाचे तांडव नृत्य सोसावे लागणार होते 
                    माणसाच्या आयुष्यातसुद्धा  अस घडत  कधी कधी अशावेळी माणूस हताश होतो .  सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरतात .  अघटीत घडत असते त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो  निसर्गाला ,नियतीला वाट मोकळी करून ध्यावी लागते . 
                  बंड ,  हे बंडच असते ,निसर्गाविरुद्ध केलेले बंड , निसर्ग तुमच्यात कधी ढवळाढवळ करतो का? नाही ना ! हजारो वर्षापासून त्याचे सृष्टीचक्र नियमित अव्याहतपणे चालू आहे . मग त्याच्या विरुद्ध बंड , त्याला  कसे मानवणार ? मानवाला पृथ्वीवर आणण्यासाठी  त्याला केंव्हा तरी   असे  तडाखे द्यावेच लागतात . त्यावेळी माणूस कोठे ताळ्यावर येतो. निसर्गाची तडाखे देण्याची प्रवृत्तीतून मानवाने काहीतरी शिकावे  हीच  निसर्गाची अपेक्षा असते . 
                आव्हान ,जरूर ध्याव , पण समोरची व्यक्ती बघून ध्याव ना! हत्तीपुढे सस्याची काय कथा .माणूस राक्षस बनत चालला आहे . त्याची भूक वाढत चालली आहे .  पचेल तेवढेच खाव ना ! निसर्ग  एका घासात पृथ्वीला गिळंकृत करू शकतो . वामनाने नाही का तीन पावलात स्वर्गलोक , पृथ्वीलोक व पाताळलोक आक्रमित केला . मानव , वामन होऊ शकत नाही हे मात्र खरे . शेवटी "मर्यादा" हा शब्द मानवापुढे लावावाच लागतो . तो पूर्ण होऊ शकत नाही . अपूर्णता हा त्याचा स्थायीस्वभाव बनलेला आहे . अतिरेक केलाच तर कडेलोट ठरलेला . आहे फक्त विनाश --विनाश --------- मग --पुन्हा घर बांधायला सुरुवात -----

No comments:

Post a Comment