कृष्णमूर्ति ज्योतिष: > पुनर्विवाह ...

Friday 6 December 2013

> पुनर्विवाह ...


Case Study--8

+ पुनर्विवाह

                 गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पुण्याहून एक साधारण ६०-६५ वयाचे गृहस्थ माझ्याकडे आले होते. मला म्हणाले हि माझ्या मुलीची कुंडली . हिचे लग्न झाले होते . पण ४-५ वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे. तिला एक ५-६ वर्षाचा मुलगा आहे. संध्या ती एका शाळेत हडपसर येथे नोकरीला आहे. आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे . पण आमच्यानंतर काय?  कोणाचातरी आधार असणे गरजेचे आहे असे मला वाटते . तिचा पुनर्विवाह होईल का?  हे विचारण्यासाठी मी आलो आहे .
              मी तिच्या पत्रिकेतील जन्मादिनांक ,वेळ व जन्मठीकाण लिहून घेतले व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
           
     पुनर्विवाहसाठी कृष्णमुर्ती नियम ---१) सप्तमाचा सब बुध असेल किंवा रव्यादि ग्रह द्विस्वभाव राशीत असेल ,किंवा त्याचा नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल ,आणि ते सर्व २,७,११ भावांचे कार्येश असतील तर पुनर्विवाह होईल. पुनर्विवाह द्वितीय स्थानावरूनही  पाहतात .
                                                           २) द्वितीय भावाचा सब बुध असेल किंवा रव्यादि ग्रह द्विस्वभाव राशीत असेल  ,किंवा त्याचा नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल ,आणि ते सर्व २,७,११ भावांचे कार्येश असतील तर पुनर्विवाह होईल.                  वरील नियम ह्या कुंडलीला लागू पडतात का ते पाहू ----
                                  हि  कुंडली सिंह लग्नाची व स्थिर तत्वाची आहे . ह्या कुंडलीत सप्तमाचा सब गुरु आहे गुरु मेष  या चर तत्वाच्या राशीत भाग्यात आहे . त्याचा नक्षत्रस्वामी केतू आहे. केतू वृषभ या स्थिर तत्वाच्या राशीत दशमात आहे . सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी  द्विस्वभाव राशीमध्ये नाहीत म्हणजे पुनर्विवाह होणार नाही
                                   आता द्वितीय भावावरून पाहू
              द्वितीय भावाचा सब केतू आहे . केतू वृषभ या स्थिर राशीत दशमात आहे . त्याचा नक्षत्रस्वामी रवि आहे . रवि सिंह या स्थिर राशीत लग्नात आहे . याठिकाणीही द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही. म्हणजे पुनर्विवाह होणार नाही  खात्रीपूर्वक सांगता येते .
                             त्याना स्पष्ट   सांगावे लागले . ते खूप नाराज झाले . नकारात्मक उत्तर देणे हे प्रत्येक ज्योतिषाला अवघडच  वाटत असते. व्यक्ती मोठ्या आशेने आली होती . शेवटी माणूस हा आशेवर जगणारा प्राणी आहे . आज नाही घडले तर उद्या नक्की घडेल  असे त्याला वाटत असते .
                              
                                         मी त्यांना म्हटले अजून एक प्रयत्न करून पाहू . तुम्ही मुलीच्या पुनर्विवाहा संबंधित आला आहात  तर मला १ ते २४९ यामधील एखादी संख्या सांगा . त्यांनी थोड एकाग्र होऊन २०१  हि संख्या सांगितली ह्या नंबरवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .
                           ती मकर लग्नाची चर तत्वाची कुंडली होती .प्रश्न मुलीच्या वडिलांनी विचारला होता म्हणून पंचमस्थान हे मुलीचे लग्नस्थान होईल . पंचाम्स्थानी वृषभ हि स्थिर तत्वाची रास आहे याठिकाणी सुद्धा  मुलीचे लग्नस्थान स्थिर तत्वाचे आहे . पंचम स्थान लग्नस्थान धरून कुंडली फिरवून घेतली आहे. ह्या
 कुंडलीला वरील नियम लागू पडतात का ते पाहू पंचमापासून साप्तम स्थान म्हणजे लाभस्थान  
        सप्तम स्थानाचा सब ( मूळ कुंडलीचे  लाभस्थान ) राहू आहे . राहू हा वृश्चिक या  स्थिर तत्वाचे राशीत 
सप्त मात आहे . त्याचा नक्षत्रस्वामी शनि  आहे  शनि हा तूळ या चर तत्वाच्या राशीत षष्ठ त  आहे .याठिकाणी हि द्विस्वभाव  राशीचा संबब्ध येत नाही . 
       आता द्वितीय भावावरून पाहू --
     द्वितीय भावाचा सब (मुळ कुंडलिचे षष्ठ स्थान ) केतू आहे . केतू हा वृषभ या स्थिर राशीत  आहे 
त्याचा नक्षत्रस्वामी रवि आहे रवि हा कर्क या चर तत्वाच्या राशीत  आहे . इथे सुधा द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही . 
                           वैशिष्ट्य म्हणजे मुळ कुंडली व प्रश्न कुंडलीत द्वितीयाचा सब केतूच आहे ऽअनि तोही वृषभ या राशीत आहे. सर्व साधारणपणे राहू , केतू यांना बारा राशीतून भ्रमण करण्यास १८ वर्षे लागतात . प्रश्नही नेमका वयाच्या ३६ व्या वर्षी विचारला आहे . 
                            द्विस्वभाव राशीशी संबंध येत नसल्यामुळे २,७,११ या भावाचे कार्येश बघण्याचा प्रश्न येत नाही हा प्रश्न एकूण ४ प्रकारे ( मुळ कुंडली -२,प्रश्न कुंडली-२) तपासाला . तरीही उत्तर   एकच आले . नकार देणे हे प्रत्येक ज्योतिषाच्या वाट्याला येणारे एक कटू सत्य आहे . 
                            आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मना सारख्या घडतात का ? काही घडतात , काही नाही घडत . घडत नाही म्हणून तिथेच थांबायचे का?  सूर्य उगवायचा थांबला आहे का ? तो रोज उगवतोच ना . मग आपण का थांबायचे . नियतीने  जे दान पदरात टाकले आहे  ते स्वीकारायला नको का ? जो स्वीकारतो तोच यशस्वी होतो . ज्योतिषी फक्त प्रारब्धात  काय वाढून ठेवले आहे तेवढेच सांगत असतो . त्याला कोणाचेही प्रारब्ध बदलता  येत नाही . आपली पायवाट आपणालाच चालावयाची आहे.   कोण जाणे पुढे याहीपेक्षा सुंदर असे काही आपली प्रतीक्षा करत असेल . 
                                                                             

No comments:

Post a Comment