Wednesday, 4 September 2019

Case Studt-94नोकरी ----
               भारतिय संस्क्रुतिचे चार पुरुशार्थ धर्म , अर्थ , काम , मोक्श ज्योतिषशास्रात कुंडली मधील १,५,९ त्रिकोणाला धर्म त्रिकोण म्हणतात २,६,१० त्रिकोणाला अर्थ त्रिकोण , ३,७,११ काम त्रिकोण व ४,८,१२ ला मोक्ष त्रिकोण म्हणतात सद्याच्या काळात माणसाचे सरासरी आयुष्यमान ७०-८० असे गृहीत धरले तर पहिली २० वर्षे मध्ये १,५,९ त्रिकोणाची फळे मिळतात . माणसाची क्रयशक्ती जास्तीतजास्त २,६,१० अर्थ त्रिकोण व ३,७,११ काम त्रिकोणामध्येच वापरली जाते . वय वर्षे २० ते ६०. ६० नंतर ४,८,१२ या मोक्ष त्रिकोणाची फळे मिळतात. प्रामुख्याने १,२,३,४ याच स्थानाची संपूर्ण आयुष्यात फळे मिळत असतात . ( १-धर्म ,२-अर्थ ,३-काम , ४-मोक्ष  ) पहिली २० वर्षे  आई वडिलांच्या छत्राखाली वावरत असतो. शेवटची २० वर्षे आपल्या मुलांच्या छत्राखाली किंवा वृद्धाश्रमात वावरत असतो. मधली २० ते ६० वर्षे याच काळात आपण स्वतः ला घडवत असतो. स्वतः ला सुंदर बनविण्याचा प्रयत्न करत असतो. मी , माझे जे काही आहे ते २० ते ६० वर्षे या काळातच घडत असते कारण पहिली २० वर्षे परांवलंबी, शेवटची २० वर्षे परांवलंबी च असतात  अर्थ त्रिकोण आणि काम त्रिकोण हे एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थ त्रिकोण म्हणजे अर्थाजनाला सुरुवात करणे मग ते नोकरीतून असेल किंवा व्यवसायातून असेल. काम त्रिकोण म्हणजे आपली महत्वाकांक्षा , स्वप्ने , हाव ,हव्यास , उपभोग ची पूर्तता करणे . जसे आपले अर्थाजन असेल त्याच प्रमाणात आपण कामत्रिकोणाची पूर्तता करू शकतो. म्हणून माणूस मोठी स्वप्ने, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अर्थाजन करत असतो. मग तो सरळ मार्गानी किंवा आडमार्गाने . पैसा असला कि सगळे आपोआप मागे येत असतात. पण खरच का हो ,  पैसा म्हणजे सर्वस्व आहे ? मला नाही वाटत.

                   हि फार जुनी केस स्टडी आहे. त्यावेळी मला बऱ्यापैकी कृष्णमूर्ती पद्धत समजायला लागली होती . माझी काही भाकिते बरोबर येत होती आणि काही चुकतेही होती. माझ्या कॉलेज मधील बहुतेकांना माझ्या ज्योतिषशास्त्र अभ्यास बदल कल्पना  होती . माझ्या कॉलेज मधील प्रशासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा माझ्या घरी आला , व म्हणाला सर, मी एम सी ए झालो आहे . आत्तापर्यंत २-३ मुलाखती झाल्या , अगदी तिसऱ्या राऊंड पर्यंत जात होतो. परंतु माझी निवड काही होत नाही. तर मला नोकरी केंव्हा लागेल. ? असा प्रश्न मला विचारला . हा  प्रश्न मी दोन पद्धतीने सोडविला . एक रुलिंग प्लॅनेट प्रमाणे व दुसरे नंबर कुंडली प्रमाणे .
 १)  रुलिंग प्लॅनेट----

मी ज्यावेळी प्रश्न  पाहिला त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे ----

L -मंगळ , S --केतू , R --रवी , D --बुध   (२/१०/२०१३   सकाळी 10-20 )

रुलिंग मधील लग्न वृश्च्छिक होते . पण वृश्च्छिक राशी मध्ये केतू चे नक्षत्र नाही म्हणून मी मेष लग्न निश्चित केले
( याठिकाणी सिंह रास केतू नक्षत्र असे घेता येईल पण रवी राशिस्वामी आहे व मंगळ लग्न स्वामी आहे लग्न स्वामी हा राशी स्वामी पेक्षा श्रेष्ठ म्हणून मेष लग्न घेतले ) मेष राशीत केतुचे नक्षत्र आहे मेष रास  केतू नक्षत्र व रवी सब मधून ज्यावेळी रवीचे भ्रमण होईल त्यावेळी नोकरी लागेल. कृष्णमूर्ती कोष्टकाप्रमाणे मेष रास केतू नक्षत्र रवी सब ३अंश ० कला  ते ३ अंश ४० कला पर्यंत आहे . अंदाजे ३-४ अंश मधून रवीचे भ्रमण होईल त्यावेळी नोकरी लागेल. १४ एप्रिल ला रवीचे भ्रमण मेष राशीतून सुरु होते. रवीची रोजची गती अंदाजे १ अंश ३-४ अंश अंतर जायला १७-१८ तारीख येईल . . परंतु मी त्याला  एप्रिल महिन्यात नोकरी लागेल असे सांगितले

२)   नंबर कुंडली प्रमाणे ------


मुलाला  सांगितले आपण अजून एका पद्धतीने प्रश्न सोडवू .  तू मनात नोकरीसंबंधी विचार करून १ ते २४९ मधील एक संख्या सांग त्याने थोडावेळ विचार करून १८५ हा नंबर सांगितला या नंबर वरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली.
दि २ / १० /  २०१३  वेळ सकाळी , फलटण

हि कुंडली धनु लग्नाची आहे म्हणजे द्विस्वभाव राशीची .

नियम --१० भावाचा सब २,६,१०,११  पैकी भावाचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येश दशेत नोकरी लागेल .

या पत्रिकेत १० भावाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (10)   (5) 10  Saturn-Yuti  (10)   (2)
It's N.Swami :-------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (10)   (5) 10  Saturn-Yuti  (10)   (2)
It's Sub :------------ Ketu:- 4       Rashi-Swami Mars 7   4 11  Saturn-Drusht  10  2
It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   (5) 10   
Itself aspects :------ 5-

राहू २,१० भावाचा कार्येश आहे म्हणजे सादर जातकाला नोकरी लागणार हे निश्चित झाले . आता केंव्हा लागणार ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील

प्रश्न पाहतेवेळी केतू मध्ये शनी अंतर्दशा चालू होती .

केतुचे कार्येशत्व ---

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 4       Rashi-Swami Mars 7   4 11  Saturn-Drusht  10  2
It's N.Swami :-------- Venus:- (10)   (5) 10   
It's Sub :------------ Venus:- 10   5 10    
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (6)   (1) (3) (12)  Cusp Yuti: (7)    
Itself aspects :------ 11

केतू  ६,१० या अनुकूल भावाचा कार्येश आहे . कुंडलीचे लग्न धनु  आहे म्हणजे द्विस्वभावी . म्हणून शनी अंतर्दशे मध्ये घटना घडणार नाही  त्यापुढील अंतर्दशा बुधाची घेतली बुद्धाचे कार्येशत्व ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 10   6 7 9  Cusp Yuti: (10)    
It's N.Swami :-------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (10)   (5) 10  Saturn-Yuti  (10)   (2)
It's Sub :------------ Jupiter:- (6)   (1) (3) (12)  Cusp Yuti: (7)    
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (6)   (1) (3) (12)  Cusp Yuti: (7)    
Itself aspects :------ 5बुध २,६,१० भावाचा कार्येश आहे

केतू महादशा( ६,१० ) बुध  (२,६,१० )  चा कार्येश आहे यामध्ये ११ भाव कोठेच लागत नाही म्हणून कोणती विदशा ११ भाव दाखविते ते पाहू. रुलिंग प्रमाणे आपण केतू व बुध  वापरला आहे पुढील विदशा शुक्र रवी चंन्द्र आहेत रुलिंग मध्ये शुक्र चंद्र नाहीत रवी आहे पण रवी ११ भाव दाखवत नाही शुक्र ६,११ व चंद्र २,१०,११ भावाचा कार्येश आहे . म्हणून मी चंद्राची विदशा निश्चित केली .

केतू महादशा  (६,१० )  बुद्ध अंतर दशा ( २,६,१० ) चंद्र विदशा ( २,१०,११ ) या कालावधीत नोकरी लागेल आणि हा कालावधी येतो १६ एप्रिल २०१४ ते १६ मे २०१४.

सादर जातकाने १९ एप्रिल ला नोकरी लागल्याचे फोनवर सांगितले .उत्तरच्या जवल पोहचन्याचा आनंद ह वेगलच असतो . 

शुभम भवतु !!!

1 comment:

  1. Civil Lab Equipment Manufacturer is the leading Manufacturer, Supplier and Exporter of Civil Engineering Lab Equipments or instruments. Established in 2005.

    Mob: +91-9891445495, +91-8448366515, +918587026175
    Phone : +91-11-23657121
    Website : http://setestindia.com, http://civillabequipmentmanufacturer.com

    ReplyDelete