कृष्णमूर्ति ज्योतिष

Sunday 22 September 2019

स्वप्न --एम एस होण्याचे

                            ग्वाल्हेर हुन एका आईचा फोन .. माझा मुलगा इंजिनिअर झाला आहे . त्याला परदेशात जाऊन एम एस करायचे आहे . आणि माझी पण खूप इच्छा आहे त्याने एम एस करावे . माझ्या मुलाचा ज्योतिषावर विश्वास नाही. म्हणून त्याच्या परस्पर मी तुम्हाला विचारते कि , माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात केंव्हा जाईल. ? आईने असा प्रश्न विचारला आहे म्हणजे तिला , मुलगा उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणार आहे हे नक्की. फक्त तो केंव्हा जाणार आहे हे तिला जाणून घ्यायचे आहे . सद्याच्या काळात जग फार जवळ आलेले आहे . परदेशात जायचे हे काही अप्रुप  राहिलेले नाही. परदेशात कोण  जाते , परदेशात वेगवेगळ्या कारणासाठी जातात. कोणी नोकरीसाठी जातात. कोणी कंपनी तर्फे परदेशात जातात. कोणी सहल म्हणून टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून जातात. कोणी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. कोणी औषधोपचार साठी परदेशात जातात. कोणी व्यवसाय निमित्त परदेशात जातात. अशी वेगवेगळी कारणे असू शकतात. कारणाशिवाय कोणी परदेशी  जात नाही.

                                                     कृष्णमूर्ती मध्ये परदेशी जाण्यासाठीचा नियम --व्यय भावाचा सब ३,९,१२ भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ या भावाच्या कार्येश दशेत व्यक्ती परदेशी जाते . शिक्षणासाठी ३,९,१२ भावाबरोबर ४,९,११ हे भाव असले पाहिजेत . नोकरीसाठी ३,९,१२ बरोबर २,६,१० भाव असले पाहिजेत. व्यवसायासाठी ३,९,१२ बरोबर ६,७,१० भाव असले पाहिजेत . सहल म्हणून जायचे असेल तर ३,९,१२ भावाबरोबर ५,११ भाव असले पाहिजेत.
                                         गोपनीयतेच्या कारणास्तव याठिकाणी मी संबंधित जातकाचे बर्थ डिटेल्स दिले नाहीत . ज्यांना पत्रिकेची पडताळणी करावयाची असेल तर त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा.

जातक दि ---  वेळ -- स्थळ रे ७३,१८ अ  १६,५९

हि कर्क लग्नाची कुंडली आहे
या पत्रिकेत लग्न भावाचा सब मंगल आहे व चंद्र नक्षत्र स्वामी मंगल च आहे . तसेच चतुर्थाचा सब शनी आहे , शनी मिन राशीत बुधा च्या नक्षत्रात आहे आईच्या पत्रिकेत चंद्र वृश्च्छिक राशीत गुरूच्या नक्षत्रात आहे सब शनीचा राशी स्वामी गुरु आहे जो आईच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्र स्वामी आहे जातकाच्या पत्रिकेत नवम  (वडील) भावाचा सब शुक्र आहे वडिलांच्या पत्रिकेत चंद्राचा राशी स्वामी शुक्रंच   आहे  म्हणजे दिलेली कुंडली बरोबर आहे आता आपण मूळप्रश्ना कडे वळू -----

१)   व्यय भावाचा सब  बुध  आहे .बुधाचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 5   3 12     Moon-Drusht  11  1
It's N.Swami :-------- Ketu:- (7)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Saturn (8)   7 8
It's Sub :------------ Mars:- 6   5 10     Venus-Yuti  6  4 11
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   (2)  Cusp Yuti: (5)

बुध ३,९,१२ पैकी कोणत्याही भावाचा कार्येश नाहीत्याच बरोबर ४,११ भाव सुद्धा नाहीत सादर जातक परदेशी जाऊ शकत नाही. व्यय भावाचा सब जर नकार दर्शवित असेल तर दशा पाहण्याचा प्रश्न येत नाही. .हि गोष्ट मुलाच्या आईला सांगणे हि अवघड जबाबदारी माझ्यावर आली. सर्वच जातकांना प्रश्नाचे उत्तर ज्योतिषाने सकारात्मक द्यावे हि अपेक्षा असते . पण आयुष्यात सर्वच गोष्टी मानसारखया घडतात. का ? पण  मला वाटते वास्तव काय आहे ते स्पष्ट सांगावे नाहीतर ज्योतिष शात्राशी  प्रतारणा केल्यासारखे होईल.
याची खात्री करण्यासाठी मी थोडे वेगळ्या पद्धतीने विचार  करायचे ठरविले. आईच्या पत्रिकेत मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल का ? हे पाहण्याचे ठरविले. .

२)  आईची पत्रिका  दि ---- वेळ ---  स्थळ   रे ७३,१८ अ  १६,५९

हि मिन लग्नाची पत्रिका आहे .लग्नाचा सब शुक्र आहे शुक्र मिन राशीत शनी नक्षत्रात व चंद्र वृश्च्छिक राशीत गुरु नक्षत्रात सब चा राशी स्वामी गुरु आहे जो चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे . पंचमाचा सब राहू आहे राहू मेष या मंगळाच्या राशीत शुक्राच्या नक्षत्रात . पंचमाचा सब राहूच राशी स्वामी मंगल जो मुलाच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्रस्वामी आहे . सप्तमाचा सब शुक्र आहे जो पतीच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी आहे म्हणजे आईची पत्रिका बरोबर आहे .

पंचमात कर्क रास आहे. आईच्या पत्रिकेत पंचम स्थान हे मुलाचे लग्न स्थान होईल. म्हणून पंचम हे लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली.
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये व्यय भावाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 8   4 11  
It's N.Swami :-------- Saturn:- (8)   (7) 8     Jupiter-Drusht  (12)   (6) 9
It's Sub :------------ Rahu:- 9       Rashi-Swami Mars 3   5 10
It's Sub's N.Swami :-- Venus:- (8)   4 (11)  
Itself aspects :------ 3

शुक्र शनी नक्षत्रात गुरूने दृष्ट आहे म्हणून १२ भावाचा कार्येश आहे परंतु ३-४ पायरीला पूर्णपणे अशुभ आहे
सबब सादर जातक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकत नाही. दोन्ही पत्रिकेत एक वाक्यात येतेय.

३)  नंबर कुंडली प्रमाणे प्रयत्न करून पाहण्याचे ठरविले. जातकाचे आईना सांगितले मनामध्ये माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी केंव्हा जाईल असा विचार करून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा . त्यांनी १९१ हि संख्या दिली.  नंबर १९१ वरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली. हि मकर लग्नाची कुंडली आहे चंद्र लग्नातच आहे म्हणजे प्रश्न मनापासून विचारला आहे . या पत्रिकेत पंचम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली

फिरवून घेतलेल्या कुण्डलिमध्ये व्यय भावाचा सब राहू आहे राहूचे कार्येशत्व खालील प्रमाणे


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   2 (5)  Saturn-Drusht  (8)   9 (10)
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   8 (11)     Mars-Drusht  (4)   7 (12)
It's Sub :------------ Jupiter:- 7   8 11     Mars-Drusht  4  7 12
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (4)   2 (5)     Venus-Yuti  (4)   (1) (6)
Itself aspects :------ 8

व्यय भावाचा सब दुसऱ्या पायरीला १२ भावाचा कार्येश आहे  परंतु ३-४ पायरीला फक्त ४ भावाचा कार्येश आहे उच्च शिक्षणासाठी ९  भाव आवश्यक आहे . तो नाही .

येथे सुद्धा उत्तर नकारात्मक आले.

४) शेवटचा पर्याय म्हणून मी वडिलांची पत्रिका पहायचे ठरविले . वडिलांच्या पत्रिकेत मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी केम्व्हा जाईल हे पाहायचे ठरविले .

 दि ----- वेळ---- स्थळ रे ७२,५८ अ १९,१३

कृष्णमूर्ती मध्ये प्रथम मुलाचा विचार लाभ स्थानावरून  करतात म्हणून लाभ स्थान लग्न स्थान  धरून कुंडली फिरवून घेतली.फिरवून घेतलेल्या कुंडली मध्ये व्यय भावाचा सब राहू   आहे . राहू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे




PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 11     Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury 1   2 11
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   5 (8)  Cusp Yuti: (8)       Mars-Drusht  (1)   (4) (9)  Saturn-Drusht  (6)   6 7
It's Sub :------------ Mercury:- 1   2 11  
It's Sub's N.Swami :-- Sun:- (12)   1     Venus-Yuti  (12)   (3) (10)
Itself aspects :------ 5



राहू ३,  ९,  १२ अनुकूल भावाचा कार्येश आहे त्याच बरोबर ९,११ अनुकूल भावाचा कार्येश आहे . वडिलांच्या पत्रिकेतून मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार असा निष्कर्ष निघतो . आता पर्यंत आपण एकूण ४ पत्रिकांचा अभ्यास केला पैकी ३ पत्रिकेत नकार आलेला आहे व एका पत्रिकेत होकार आलेला आहे . म्हणजे टक्केवारीत म्हणायचे झाले तर २५ टक्के शक्यता आहे.

महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा .

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment