Monday, 15 July 2019

Case Study--81

परदेशगमन

                     फेसबुकवर पदार्पण केल्यापासून वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्व वाचकांचे आभार. .  वाचकांच्या समस्येमध्ये प्रामुख्याने विवाह,वैवाहिक सौख्य , घटस्फोट ,नोकरी ,सरकारी नोकरी ,परदेशांत नोकरी याचे प्रमाण खूप आहे .दरवर्षी असंख्य विध्यार्थी वेगवेगळ्या शाखेतील डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत . जेवढ्या संख्येने बाहेर पडतात त्याप्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत . व्यवसाय करायचे म्हटले तर कोणता करायचा हे कळत  नाही . बर, अमुक एक करायचे म्हटले तरी त्याचे ज्ञान असणे  आवश्यक आहे . आणि व्यवसायसाठी लागणारे   भांडवल कोठून आणायचे ?. कर्ज काढून भांडवल उभे केले तरी भविष्यकाळात व्यवसाय चांगला चालेल याची शाश्वती नाही . नाही चालला तरी घेतलेले कर्ज फेडायचे कसे ? अशाप्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून  जातक शक्यतो नोकरी करण्याचा प्रयत्न करतो. भारतात मिळत नसतील तर परदेशात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात . असाच एक जातक बऱ्यापैकी नोकरीचा अनुभव असलेला, परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करत होता. सद्य एका  एमएनसी कंपनीत नोकरीला आहे . पण त्याला कंपनीतर्फे परदेशात जाण्याची इच्छा होती. कंपनी दरवर्षी एका व्यक्तीला परदेशात पाठवीत असते गेली दोन वर्षे ह्या जातकाला कंपनी सांगते अमेरिकेला जायची तयारी ठेवा ऐनवेळी दुसऱ्याच व्यक्तीला पाठविले जायचे . त्यामुळे सदर  जातक वैतागला होता . ह्याच अवस्थेत त्याने मला फोन केला माझ्या पत्रिकेत परदेशगमनाचे योग आहेत का.? आणि मी कंपनीतर्फे अमेरिकेला जाईन का ? जाणार असेल तर केंव्हा .?    त्याला म्हटले तुझे बिर्थ डिटेल्स दे . आणि ३-४ दिवसांनी फोन कर. पाहू तुझ्या पत्रिकेत परदेशगमनाचे योग आहेत का ?

त्याचे बिर्थ डिटेल्स खालीलप्रमाणे ---
दि २१ / ७ /८५  वेळ ---       स्थळ -- अ १९,३७ रे ७४,४०
 ( वेळ मी दिलेली नाही . ज्यांना पत्रिकेची पडताळणी करावयाची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा )
(प्रश्नसोडविला त्यावेळी तारीख होती २९ / ६ / २०१९ )

हि कुंडली सिंह लग्नाची आहे लग्नाचा सब गुरु आहे व चंद्र राशी स्वामी गुरूच आहे म्हणजे वेळ बरोबर आहे सदर व्यक्ती कंपनीत नोकरीला आहे ह्याला फक्त कंपनीतर्फे अमेरिकेला जायचे आहे. येथे  नोकरीचे ठिकाण बदलणार आहे . अंतर्गत बदल करायचा आहे . त्यासाठी परदेशगमनाचे योग आहेत का ते पाहायचे आहे.
परदेशगमनासाठी व्ययाचा  (१२) सब ३,९,१२ भावापैकी  तसेच २,६,१० पैकी चा कार्येश असेल तर जातक परदेशी जाईल .ह्या कुंडलीत व्ययाचा सब शुक्र आहे
२९/६/२०१९ ७-३६-४३ फलटण

शनी *  L चंद्र , S शुक्र , R मंगल, D  शनी
रुलिंगमध्ये शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व ---

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (7)   3 (10)     Mars-Yuti  (7)   (4) 9
It's N.Swami :-------- Jupiter:- (5)   5 8     Saturn-Drusht  (3)   (6) 7
It's Sub :------------ Mars:- (7)   (4) 9     Venus-Yuti  (7)   3 (10)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (5)   5 8     Saturn-Drusht  (3)   (6) 7
Itself aspects :------ 2

शुक्र ३ व ६,१० या भावाचा कार्येश आहे . म्हणजे कंपनीतर्फे परदेशी जाण्याचे योग  आहेत . ७ भाव हा सुद्धा परदेशी जाणेसाठी अनुकूल आहे
आता दशा पाहू मी जेंव्हा पत्रिका तपासात होतो त्यावेळी रवी मध्ये बुध दशा चालू होती. ११ जुलै २०१९ पर्यंत
रवीचे कार्येशत्व ---
PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 5   1
It's N.Swami :-------- Moon:- (8)   (12)
It's Sub :------------ Jupiter:- 5   5 8     Saturn-Drusht  3  6 7
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   (1)
Itself aspects :------ 12

रवी १२ या अनुकूल  भावाचा कार्येश आहे कुंडलीचे लग्न सिंह हे स्थिर तत्वाचे आहे म्हणून बुध अंतर्दशेत घटना घडणार नाही . त्यापुढील अंतर्दशा केतूची आहे केतुचे कार्येशत्व ---

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- (3)      Rashi-Swami Mars (7)   (4) 9  Saturn-Yuti  (3)   (6) 7
It's N.Swami :-------- Jupiter:- (5)   5 8     Saturn-Drusht  (3)   (6) 7
It's Sub :------------ Moon:- 8   12
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (5)   (2) (11)
Itself aspects :------ 10


केतू ३,५ / २,६,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . ३,९,१२ पैकी ३,१२ भाव लागले तसेच २,६,१० पैकी २,६ भाव कार्यान्वित झाले . आता राहिले ९ व १० हे भाव फक्त मंगल राहू आणि शनी हे दाखवितात या पैकी कोणाची विदशा घ्यायची . यासाठी रुलिंगमध्ये कोण आहे ते पाहू . रुलिंग मधये मंगळ व शनी आहेत परंतु स्थिर लग्न आहे म्हणून मी शनीची विदशा घेतली शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (3)   (6) 7     Ketu-Yuti  (3)    Rahu-Drusht  (9)
It's N.Swami :-------- Jupiter:- (5)   5 8     Saturn-Drusht  (3)   (6) 7
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Venus (7)   3 (10)  Saturn-Drusht  (3)   (6) 7
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   (1)
Itself aspects :------ 10 6 1

शनी ३,५,९ / ६,१० या भावाचा कार्येश आहे . म्हणून रवी केतू शनी दशेमधे म्हणजेच ९ ऑक्टोबर २०१९ ते 
२९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत परदेशगमन घडेल. 
याठिकाणी एक शंका निर्माण झाली . ती अशी कि कंपनीने यापूर्वी २ वेळा तयारी करायला सांगितले होते पण ऐनवेळेला दुसऱ्या व्यक्तीला पाठविला . याठिकाणी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे विदशा शनी बरोबर नेपच्यून चा ३६ अंशाचा अशुभ योग होत आहे . त्यामुळे येथे सुद्धा हुलकावणी मिळू शकते म्हणून मी पुढील बुद्धाचा विचार केला पण बुध  ९,१० चा कार्येश नाही . म्हणून केतूची अंतर्दशा सोडून दिली . पुढील अंतर्दशा शुक्राची घेतली शुक्राचे कार्येशत्व आपण अगोदर पहिले आहे . शुक्र ३ / ६,१० चा कार्येश आहे म .द रवी
अं द. शुक्र विदशा मंगळ घेतली . मंगळाचे कार्येशत्व .... 
PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (7)   (4) 9     Venus-Yuti  (7)   3 (10)
It's N.Swami :-------- Jupiter:- (5)   5 8     Saturn-Drusht  (3)   (6) 7
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Venus (7)   3 (10)  Saturn-Drusht  (3)   (6) 7
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   (1)
Itself aspects :------ 2 11 3

या दशेत म्हणजे ५/३/२० ते २६/३/२० परदेशगमन घडेल .आता शेवटची पायरी गोचर अनुकूल असेल तरच परदेशगमन घडेल. रवी शुक्र मंगल हे तिन्ही ग्रह जलदगतीने ग्रह आहेत  त्यांचे नक्षत्रातील भ्रमण पाहावे लागेल. वरील काळात या तिन्ही ग्रहाचे नक्षत्रातील भ्रमण अनुकूल आहे . याच कालावधीत परदेशगमन घडेल
परिणामासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल. पाहू काय हीतेय ते .

शुभम भवतु !!!2 comments:

  1. Civil Lab Equipment Manufacturer is the leading Manufacturer, Supplier and Exporter of Civil Engineering Lab Equipments or instruments. Established in 2005.

    Mob: +91-9891445495, +91-8448366515, +918587026175
    Phone : +91-11-23657121
    Website : http://setestindia.com, http://civillabequipmentmanufacturer.com

    ReplyDelete